गूढ अंधारातील जग -४

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
16 Dec 2017 - 9:07 pm

गूढ अंधारातील जग -४
पाणबुडीची संरचना --
. तिचे मूळ हेतू हे शत्रूच्या जहाजाच्या नजरेस न पडता त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन त्याच्या वर हल्ला करायचा. त्यामुळे सुरुवातीला पाणबुडी तयार केली ती जहाजासारखी निमुळती होती आणि वरचा भाग पाण्याच्या जरासा खाली गेला तरी चालत होता. जशी जशी विमानांची प्रगती होत गेली तशी पाणबुडीला पाण्याच्या जास्तीत जास्त खाली आणि जास्तीत जास्त वेगाने जाण्याची आवश्यकता निर्माण झाली. यामुळे पाणबुडीचा निमुळता आकार सोडून अश्रूबिंदू (teardrop) सारखा आकार म्हणजे देवमासा किंवा डॉल्फिन सारखा मोठे डोके आणि मागे निमुळता होत गेलेला आकार घेतला गेला.
निसर्गातून माणूस हे शिकला कि मोठे डोके असले तर बाकी शरीर त्यामागे आपसूक येते ज्यामुळे पाण्याखालचा रोध(drag) कमी होतो आणि वेग २-३ पटीने वाढतो.
आता अशी संरचना करण्यात काही मूळ भौतिकशात्राचे नियम आवश्यक असतात. एक म्हणजे पाण्याखाली गेलात कि दर दहा मीटर ला पाण्याचा दाब १ atm (atmosphere) ~ किंवा साधारण १ बार इतका वाढत जातो. जेंव्हा तुम्ही १०० मीटर जात तेंव्हा पाण्याचा १० बार + वरील हवेचा १ मिळून ११ बार इतका दबाव येतो.
१ बार =१४ psi म्हणजेच साधारण एक इंचाला १४ पौन्ड दबाव. आपल्या कारच्या टायर मध्ये २८ ते ३५ psi इतका दबाव असतो म्हणजेच २ ते २.५ बार.
आपण जितके खोल जात तितका हा दबाव वाढत जातो. पाणबुडी जितकी खोल जाईल तितकी संपूर्णपणे ती अदृश्य होत जाते आणि तिचा माग काढणे अशक्य होत जाते.
इतका दबाव असेल तर पाणबुडीची बाहेरील भिंत हि तितकी मजबूत असायला हवी शिवाय त्याची गोलाई हि अतिशय अचूकपणे तयार करावी लागते अन्यथा जो भाग वेडावाकडा होईल त्यावर अनियमित दाब पडून तो चिरडलला जाण्याची शक्यता असते.
पाणबुडीचे दोन सांगाडे म्हणजे दोन नळकांडी असतात. हि अतिशय लवचिक पण शक्तिशाली अशा खास पोलादाची (high tensile pressure steel) नळकांडी असतात. एक आतील सांगाडा (hull) आणि एक बाहेरील सांगाडा.
.
पाणबुडीच्या आत मध्ये माणसे सुरक्षित पणे राहण्यासाठी आतील सांगाडा हा पूर्णपणे दबाव सहन करेल (pressure hull) असा असतो याची जाडी दोन ते तीन इंच असते आणि बाहेरील सांगाडा ज्यात पाणी भरता येईल अशा टाक्या (BALLAST TANKS) किंवा पाणतीराच्या नळ्या (torpedo tube), सोनार इ उपकरणे ठेवता येतील असा.
पाणबुडी डुबकी मारण्यासाठी या बाहेरील सांगाड्यात असलेल्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी भरून घेते त्यामुळे तिचे वजन जास्त झाले कि पाण्याखाली जाते आणि हेच तिला वर यायचे असेल तर याच टाक्यांमध्ये दाबाखाली असलेली हवा सोडली जाते. यामुळे टाक्यांमधील पाणी बाहेर टाकले जाते आणि पाणबुडीचे वजन कमी होऊन त पाण्यावर येते.
पाणबुडी पाण्यातून पुढे जाण्यासाठी मागच्या भागावर एक पंखा (प्रॉपेलर) बसवलेला असतो. माशांना जसे कल्ले असतात तसेच फिन पाणबुडीला असतात ज्यामुळे पाणबुडी खाली वर डावी उजवीकडे जाऊ शकते. (विमानात जसे पंखांना रडर, लिडिंग आणि ट्रेलिन्ग एजेस असतात). फरक एवढाच आहे कि विमान त्याच्या पुढे जाण्याच्या गतीमुळे हवेत उचलले (lift) जाते. या उलट पाणबुडी आपल्या पाण्यातील वजनामुळे वर खाली जाऊ शकते किंवा वजनरहित अवस्थेत एकाच जागी सर्व गोष्टी बंद करून "थंड पडून" राहू शकते.
नुसताच सांगाडा कसा असावा असे नाही तर पाणबुडीतील वजन कसे विभागून गेले पाहिजे याचे पण एक शास्त्र असते अन्यथा सर्व वजन वर आले तर पाण्याखाली जाताना पाणबुडी उलटी होऊ शकेल.
पाणबुडीचा पंखा(प्रॉपेलर) हा मोठा आणि बरीच पाती असलेला पण हळू फिरणारा असतो. कारण जितक्या जोरात पंखा फिरवला जाईल तितका जास्त आवाज येईल आणि पाणबुडीचा ठावठिकाणा लावणे सोपे जाईल.
हा पंख फिरवण्यासाठी डिझेल च्या पाणबुडीत डिझेल इंजिनाने वीज निर्मिती केली जाते आणि या विजेवर पंखा चालवून पाणबुडी पुढे नेली जाते. हीच वीज असंख्य बॅटरीच्या माळेत साठवली जाते आणि त्यामुळे जेंव्हा हि पाणबुडी पाण्याखाली बुडी मारते तेंव्हा या बॅटरीतील विजेवर पाणबुडी चालवली जाते. पण जसे मोबाईलची बॅटरी काही विशिष्ट वेळाने परत चार्ज करावी लागते तशीच पाणबुडीची बॅटरी चार्ज करावी लागते. यासाठी पाणबुडीला पृष्ठभागावर यावे लागते. अशा वेळेस पाणबुडीचा ठावठिकाणा शत्रूला लागण्याचा सर्वात जास्त धोका असतो.
अणुपाणबुडीमध्ये अणुभट्टीमध्ये युरेनियम चे विघटन होऊन मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. हि ऊर्जा प्रचंड दाबाखाली असलेल्या पाण्यात शोषली जाते आणि ती भट्टीच्या बाहेर आल्यावर त्याच्या साहाय्याने बाहेरच्या दुसऱ्या पाइपलाइनमध्ये वाफ तयार केली जाते. या वाफेवर टर्बाईन चालवले जाते ज्याच्या साहाय्याने पाणबुडीचा पंखाहि चालवला जातो आणि वीजहि निर्माण केली जाते.
आपली भारतीय बनावटीची अणुपाणबुडी अरिहंतची अणुभट्टी ८३ मेगावॅटची आहे(१ लाख ११ हजार हॉर्स पॉवर)
हि म्ह्ण्जे एक षष्ठांश पुण्याला पुढची ४० वर्षे ( कदाचित ५० किंवा ६० वर्षे) अव्याहत वीज पुरवण्याची क्षमता
अणुपाणबुडीत अतिशय समृद्ध युरेनियम वापरले जाते (२०-३० %). यामुळे अणुपाणबुड्याना २५- ३० वर्षे पर्यंत इंधन परंत भरण्याची आवश्यकता पडत नाही. बहुसंख्य पाणबुड्याना त्यांच्या उपयुक्त आयुष्यकाळात इंधन भरण्याची आवश्यकता पडत नाही.
कल्पना करा -- तुम्ही एक मोटार विकत घेतलीत आणि आयुष्यभरात तुम्हाला पेट्रोल पंपावर जायलाच लागणार नाही.
असे असताना सर्व देश फक्त अणुपाणबुड्याच का ठेवत नाहीत. उगाच डिझेलच्या पाणबुड्या कशाला?
याचे उत्तर असे आहे.
१) डिझेलच्या पाणबुड्या आकाराने लहान असल्यामुळे एखाद्या अरुंद कालव्यात किंवा उपसागरात, समुद्रधुनीत किंवा बंदराच्या तोंडाशी जाणे तिला सहज शक्य असते. याउलट अणुपाणबुडीचा आकार प्रचंड असल्याने तिला अशा चिंचोळ्या पाण्याच्या मार्गात घुसणे किंवा लपून राहणे कठीण असते.
कालच नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या कालव्हेरी या पाणबुडीचीही वजन १८७० टन आहे. तर अरिहंतचे ६००० टन आणि रशियाकडून घेतलेली "चक्र"चे वजन १२००० टन आहे.
२) अणुपाणबुडी बांधण्याचा खर्च प्रचंड असतो आणि त्याचे तंत्रज्ञान कोणीही दुसऱ्याला विकत नाही. पण आपण संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या भारतात तयार केल्यामुळे अरिहंतची किंमत ६००० कोटी रुपये आहे. तर आज नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या कालव्हेरीचीही किंमत पण ४००० कोटीच्या आसपास आहे.
https://economictimes.indiatimes.com/news/defence/home-made-submarines-c...
एतद्देशीय तंत्रज्ञान वापरणे का आवश्यक आहे हे यावरून समजेल.
३) अणुपाणबुडी "बंद करून थंडपणे" बसता येत नाही. कारण पंखा आणि इतर सर्व गोष्टी बंद केल्यातरी अणुभट्टीत उष्णता निर्माण होत राहतेच त्यामुळे ती थंड ठेवण्यासाठी त्यात दाबाखाली असलेले पाणी फिरवत ठेवावे लागते आणि या पम्प प्रणालीचा "आवाज" येतोच. शिवाय या पाण्यातून निर्माण झालेली उष्णता समुद्रात फेकली जाते याच्यामुळे समुद्रात गरम पाण्याचे प्रवाह निर्माण होतात आणि असे प्रवाह जर उथळ समुद्रात तयार झाले तर पाणबुडीचा ठावठिकाणा लावणे शत्रूच्या विमानांना किंवा पाणबुडी विरोधी जहाजांना सोपे जाते.
sindhurakshak
.
चक्र
२०१५ च्या मलबार युद्ध कवायतीत भारतीय पाणबुडी (नौसेनेच्या अधिकृत पत्रा प्रमाणॅ) सिन्धुध्वज ( पण"सिन्धुराज"विकीनुसार) ने भाग घेतला होता पण पूर्ण सरावात अमेरिका आणि जपानच्या नौदलाला आपली पाणबुडी एकदाही शोधता आली नाही. त्यांचे थिओडोर रुझवेल्ट हि अणुशक्तीवर चालणारी विमानवाहू नौका आणि लॉस एंजेलिस क्लासची अणुपाणबुडी आणि इतर नौका होत्या . याउलट "सिन्धुध्वज" पाणबुडीने बरेच दिवस रूझवेल्टच्या "वासावर" आणि तिला पाणतीराच्या टप्प्यात ठेवून काढले आणि लॉस एंजेलिस पाणबुडीचा दोन वेळेस माग लागला होता.
अशीच परिस्थिती आपल्या चक्र या पहिल्या अणुपाणबुडीची (१९८९) होती. संपूर्ण सरावाच्या दरम्यान "चक्र" आपल्या "विराट" या विमानवाहू नौकेच्या मागावर आणि तिला क्षेपणास्त्रे आणि पाणतीराच्या टप्प्यात ठेवून होती. पण विराटला आणि तिच्यावर असलेल्या सीकिंग या पाणबुडी विरोधी हेलिकॉप्टरला एकदाही "चक्र"चा माग काढता आला नव्हता.

डिझेलच्या पाणबुड्या आपली सर्वच्या सर्व यंत्रे बंद करून थंड बसून राहतात तेंव्हा त्यातील नौसैनिकाना पण गरज असेल तरच हालचाल करण्यास परवानगी असते. अगदी पाणबुडीतील भांडीसुद्धा घासली जात नाहीत. कारण पाण्यात आवाज पाच पट वेगाने प्रवास करतो त्यामुळे जेंव्हा एखाद्या चिंचोळ्या समुद्रधुनीत पाणबुडी दबा धरून बसलेली असते तेंव्हा सगळेच्या सगळे नौसैनिक एकतर शांतपणे येणारे सर्व आवाज ऐकत असतात किंवा झोपलेले तरी असतात. अशा वेळेस शौचास गेले तरी त्याच्या पाण्याचा पम्प सुद्धा चालवला जात नाही.
पाणबुडी हि पोलादाची बनलेली असल्यामुळे ती पाण्यात असताना पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्रात बदल घडवते हे बल त्यामुळे वाढवले जाते.https://en.wikipedia.org/wiki/Ferromagnetism. याशिवाय पाणबुडीत असलेल्या जनरेटर मोटर यामुळे पण चुंबकीय क्षेत्र तयार होत असते.
पाणबुडी शोधणारी विमाने MAD (MAGNETIC ANOMALY DETECTOR) हे यंत्र वापरून पाणबुडी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पाणबुड्या आपले चुंबकीय क्षेत्र कमीत कमी कसे करता येईल यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरात असतात. यात तयार झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने चुंबकीय क्षेत्र तयार करून "असलेले क्षेत्र" शून्य केले जाते. या प्रक्रियेला डिगॉसिंग (degaussing) आणि डिपर्मिंग(deperming) म्हणतात
A sea-going metal-hulled ship or submarine, by its very nature, develops a magnetic signature as it travels, due to a magneto-mechanical interaction with Earth's magnetic field. It also picks up the magnetic orientation of the earth's magnetic field where it is built. This signature can be exploited by magnetic mines or facilitate the detection of a submarine by ships or aircraft with magnetic anomaly detection (MAD) equipment. Navies use the deperming procedure, in conjunction with degaussing, as a countermeasure against this.
हे प्रश्न सोडवण्यासाठी रशियाने शीत युद्ध काळात एक अतिशय अफलातून कल्पना काढली होती. ती म्हणजे पूर्ण पाणबुडी टायटॅनियम या धातूची बनवली होती.अल्फा क्लास पाणबुडी.
टायटॅनियम हा धातू चुंबकीय नाही आणि अतिशय लवचिक आणि प्रचंड दबाव सहन करणारा असा आहे. त्यातून या पाणबुडीच्या अणुभट्टीला थंड ठेवण्यासाठी कुलंट म्हणून त्यांनी दबावाखाली पाण्याच्या ऐवजी "द्रवरूप शिसे आणि कथलाचा" वापर केला होता. या द्रवरूप धातूची उष्णता शोषून घेण्याची क्षमता कमालीची जास्त असते त्यामुळे हि अणुभट्टी आणि पाणबुडी अतिशय लहान आकाराची बनवणे शक्य झाले यामुळे हि पाणबुडी फक्त २३०० टनची होती पण अणुभट्टीची शक्ती १५३ मेगावॅट( तुलनेसाठी आपली अरिहंत ६००० टन आहे आणि अणुभट्टी ८३ मेगावॅट आहे)हि पाणबुडी पाण्याखालून ७६ किमी ताशी जाऊ शकत असे
या द्रवरूप धातूचा फायदा असा होत असे कि जर अणुभट्टीला छिद्र पडले तर त्यातील हा द्रवरूप धातू बाहेर पडून ते छिद्र सील होऊन जाते. हि पाणबुडी १००० मीटर पेक्षा खोल जाऊ शकत असे. याची बातमी बाहेर आल्यावर अमेरिका आणि तिची दोस्त राष्ट्रे यांची हबेलंडी उडाली. कारण यावेळेपर्यंत त्यांच्याकडे असलेले पाणतीर एवढ्या खोलीपर्यंतच्या दबावाला टिकूच शकत नव्हते.शिवाय त्यावेळचे पाणतीर ७६ किमी ताशी वेगानेही जात नव्हते यामुळे त्यांना त्वरेने नवीन पाणतीर निर्माण करावे लागले.
अर्थात या पाणबुडीचे आपले विविक्षित प्रश्न होतेच. पहिली गोष्ट म्हणजे टायटॅनियमचे वेल्डिंग करणे हि अतिशय कौशल्याची गोष्ट होती. दुसरे म्हणजे रशियाच्या हिवाळ्यात हि अणुभट्टी देखरेखीसाठी बंद करणे शक्यच नव्हते कारण द्रवरूप शिसे आणि कथिल गोठून भट्टीच बंद होत असे.
क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

mayu4u's picture

16 Dec 2017 - 9:30 pm | mayu4u

आता लेख वाचतो.

पु भा प्र.

खूप सुंदर माहिती त्याहून सोप्या शब्दात..

संग्राम's picture

16 Dec 2017 - 10:19 pm | संग्राम

+1

अफलातून रोचक माहिती आहे डॉक..

पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Dec 2017 - 10:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा भाग, त्यातील रोचक माहितीमुळे, विशेष आवडला !

सिंधुरक्षकचे नाव वाचून, ८ फेब्रुवारी २०१३ ला नॉर्वेच्या ट्रुम्सो बंदरात ती उभी असताना, तिचे दर्शन झाले होते त्याची आठवण आली...

दर भागाबरोबर ही मालिका अधिकाधिक रोचक बनत चालली आहे. पुभाप्र.

सतिश गावडे's picture

17 Dec 2017 - 7:16 pm | सतिश गावडे

लोकवस्तीच्या इतक्या जवळ असलेल्या बंदरात जातात का युद्धनौका?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 9:24 am | डॉ सुहास म्हात्रे

ट्रुम्सो उत्तर धृविय प्रदेशातील एक तुलनेने मध्यम आकाराचे/खोल बंदर आहे. सकाळी सिंधुरक्षक ज्या गोदीला लागली होती तिच्यावरून आदल्या संध्याकाळी मी सहज फेरी मारली होती. तिच्या बाजूच्या डॉकला आमचे २००+ प्रवाश्यांना घेऊन जाणारे क्रूझ शिप लागले होते.

फोटोत उजव्या बाजूला तांबडी इमारत दिसत आहे तिच्या समोरच्या जेट्टीवरून आमची मासेमारी बोट सुटली.

सिंधुरक्षक रशियातून नविनीकरण (रिफर्बिशिंग) करून परतत असताने तिने ट्रुम्सोला भेट दिली होती.

Nitin Palkar's picture

16 Dec 2017 - 10:49 pm | Nitin Palkar

अतिशय विस्मयकारक माहिती. जयंत नारळीकरांनी विज्ञान कथांबद्दल लिहिताना एकाठिकाणी असे म्हटले आहे विज्ञान कथाकारांनी विज्ञानाची नाळ न सोडता कथा लिहावी. तुम्ही लिहित असलेले लेख कथा नसूनही कथे प्रमाणे उत्कंठा वर्धक आहेत. हाही भाग खूप आवडला. पुभाप्र. पुलेशु!

इरसाल's picture

16 Dec 2017 - 10:50 pm | इरसाल

छान.
जरी पाणबुडी वर आणायची असली की हवा सोडुन सुरक्षित जागीच वर आणत असावेत, पण काही कारणाने सोडलेल्या हवेमुळे पाणबुडीचा पत्ता शत्रुला लागु शकतो का?

सुबोध खरे's picture

16 Dec 2017 - 11:37 pm | सुबोध खरे

दाबाखाली असलेली हवा सिलिंडर मधून बाहेरील सांगाड्यात सोडली जाते (पहिले चित्र पहा.)ज्यामुळे या सांगाड्यातील पाणी बाहेर समुद्रात झडपेतून फेकले जाते. हवा दोन सांगाड्यांच्या मध्ये राहते त्यामुळे पाणबुडी हलकी होऊन वर येते.

मार्मिक गोडसे's picture

16 Dec 2017 - 11:21 pm | मार्मिक गोडसे

हवा??? पाणी बाहेर ढकलण्यासाठी हवेचा दाब वापरला जात असेल.

ग्रेट! भारतीय पाणबुड्यांची गौरवशाली कामगिरी वाचून खूप अभिमान वाटला.

लेख फारच छान आणि सोप्या भाषेत लिहिला आहे. पुभालटा.

स्मिता.'s picture

17 Dec 2017 - 12:52 am | स्मिता.

सोप्या भाषेत पणबुडीची माहिती वाचायला खूप आवडतंय. लेखमालेवर नजर ठेवून आहे.

अर्धवटराव's picture

17 Dec 2017 - 1:18 am | अर्धवटराव

किती प्रचंड अभ्यास करावा लागत असेल हे सगळं डेव्हलप करायला.
अनेकानेक धन्य्वाद डॉ. साहेब.

अतिशय उत्तम लेख मालिका. सर्वच भाग उत्तम

१ बार =१४ psi म्हणजेच साधारण एक इंचाला १४ पौन्ड दबाव.

एका चौरस इंचाला 1 पौंड-फोर्स बल असे हवे.

high tensile pressure steel)

मुळात प्रेशर वेसल मध्ये आत जास्त प्रेशर असेल तर tensile stress तयार होतो परंतु बाहेर जास्त प्रेशर असेल तर compressive stress तयार होतो जे पाणबुडी च्या बाबतीत होते, मग पाणबुडी साठी high tensile pressure steel हे मटेरियल का लागत असावे असा प्रश्न पडलाय? तुम्हाला HSS high strength steel म्हणायचे आहे का?

दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे titanium जरी मॅग्नेटिक नसले तरी ते मोटार जनरेटर च्या मॅग्नेटिक फील्ड ला थांबवू शकत नाही, मॅग्नेटिक insulation श्यक्य नाही.
असो हे लहान (कदाचित महत्वाचे नसलेले) प्रश्न सोडता अत्यन्त उपयुक्त आणि रोचक अशी मालिका. पुभाप्र

सुबोध खरे's picture

17 Dec 2017 - 7:26 am | सुबोध खरे
सुबोध खरे's picture

17 Dec 2017 - 7:30 am | सुबोध खरे

high tensile pressure steel मी इतके संदर्भ वाचले आहेत त्यात कुठे कुठे हे आलं ते परत एकदा वाचून तुम्हाला सांगतो. तरीही मी अभियंता नाही,। ही माझी चूक असू शकते. कृपया सांभाळून घ्यावे__/\__
वर एक संदर्भ दिला आहे.

सुबोध खरे's picture

17 Dec 2017 - 7:31 am | सुबोध खरे

high tensile pressure steel मी इतके संदर्भ वाचले आहेत त्यात कुठे कुठे हे आलं ते परत एकदा वाचून तुम्हाला सांगतो. तरीही मी अभियंता नाही,। ही माझी चूक असू शकते. कृपया सांभाळून घ्यावे__/\__
वर एक संदर्भ दिला आहे.

अमितदादा's picture

17 Dec 2017 - 11:35 am | अमितदादा

HY-80 हे high tensile, high yield strength steel आहे, यातील high yield strength steel हा शब्द महत्वाचा. तुम्ही मटेरियल साठी वापरलेला शब्दप्रयोग असे सूचित करतो की tensile strength > comp. Strength म्हणून मला प्रश्न पडला, पण मी पण चुकीचा असू शकेन मी ही माझ्या परीने असे कोणते स्टील आहे हे शोधून पाहतो.
Titanium पाणबुडी ची मॅग्नेटिक signature कमी असते हे मान्य.
शंका निरसन केल्या बद्दल धन्यवाद.
माझ्या पहिल्या प्रतिसादातील पाहिलं वाक्य हे 1 ऐवजी 14 असे धरून वाचावे.

हा प्रतिसाद लिहिताना माझी घाई झाली, मी high tensile pressure steel बाबत उपस्थित केलेली शंका HY-८० या स्टील ला सुधा लागू होते याच कारण त्याच्या मध्ये सुधा high tensile हा शब्द वापरलेला आहे. मुळात कोणत्याही मटेरीअल ची tensile आणि compresive strength समान नसते, स्टील साठी त्यातील फरक कमी असतो, त्यामुळे ती एकसमान आहे असे समजतो, पण alloy स्टील मध्ये वेगवेगळे घटक/मेटल वापरून तो फरक आपण कमी जास्त करू शकतो. स्टील च्या नावात मध्ये high tensile हा शब्द वापरणे म्हणजे त्याची tensile strength हि compressive strength पेक्षा जास्त असते असा माझा समज झाला , जो बरोबर आहे कि चुकीचा हे शोधून पाहतो. जर माझा समज बरोबर असेल तर असे मटेरीअल पाणबुडी साठी का वापरतात हि शंका राहतेच. जर माझा समज चुकीचा असेल तर काही प्रश्नच नाही.
विषया व्यतरिक्त अवांतर झाल्याबद्दल क्षमा असावी, परंतु वरच्या प्रतिसादात चूक झाल्यामुळे हा प्रतिसाद लिहावा लागला. पुढच्या लेखात एवढ अवांतर होणार नाही याची काळजी घेईन.

सुबोध खरे's picture

17 Dec 2017 - 7:58 am | सुबोध खरे

titanium जरी मॅग्नेटिक नसले तरी ते मोटार जनरेटर च्या मॅग्नेटिक फील्ड ला थांबवू शकत नाही,
मोटार किंवा जनरेटर मध्ये तयार होणारे चुंबकीय क्षेत्र कमी करण्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे डी पर्मिंग किंवा डी गॉसिंग केले जाते. याबद्दल वर लिहिले आहे.
मुळात अणूपाणबुडी मध्ये पाणबुडी चालवण्यासाठी मोटार किंवा जनरेटरची आवश्यकता पडत नाही तर ते काम दुय्यम सर्किटमध्ये तयार होणाऱ्या वाफेनेच केले जाते.त्यामुळे पाणबुडी त असलेली विजेची उपकरणे चालवण्यासाठी वीज लागते त्यासाठी असलेला जनरेटर आणि ती वीज साठवण्यासाठी असलेली बॅटरी हे छोटे असतात. पाणबुडी लपून बसते तेंव्हा हे जनरेटर बंद करून बॅटरीवर उपकरणे चालवता येतात. त्याशिवाय या पाणबुडीचा आकारही इतर अणू पाणबुड्या पेक्षा फारच लहान होता या मुळे टायटॅनियंमच्या अणू पाणबुडीची चुंबकीय क्षेत्र (magnetic signature) अतिषयच कमी असे.

Ranapratap's picture

17 Dec 2017 - 12:10 pm | Ranapratap

अतिशय माहिती पूर्ण लेख. पुढील भाग लवकर टाका.

चिर्कुट's picture

17 Dec 2017 - 12:20 pm | चिर्कुट

फार रोचक माहिती समजत आहे...

पु भा प्र

टवाळ कार्टा's picture

17 Dec 2017 - 12:42 pm | टवाळ कार्टा

भारी

वकील साहेब's picture

17 Dec 2017 - 12:49 pm | वकील साहेब

अतिशय रोचक माहिती. पु भा प्र

दुर्गविहारी's picture

17 Dec 2017 - 12:49 pm | दुर्गविहारी

केवळ महान !!!! प्रणाम स्विकारा डॉक. ______/\____
क्रमशः आहे हे वाचुक आनंद झाला.

नाखु's picture

17 Dec 2017 - 3:24 pm | नाखु

प्रचारकी व हट्टाग्रही धाग्यात गुरफटत असलेल्या मिपाला सुखद झुळूक दिली त्याबद्दल अभिनंदन करतो

नितवाचक नाखु पांढरपेशा

पैसा's picture

17 Dec 2017 - 3:59 pm | पैसा

जबरदस्त लिखाण!

दीपक११७७'s picture

17 Dec 2017 - 4:26 pm | दीपक११७७

नेहमीप्रमाणे उत्तम झाला ह भाग सुध्दा!
पुढील भाग प्रतीक्षेत

कुमार१'s picture

17 Dec 2017 - 5:54 pm | कुमार१

अतिशय रोचक माहिती !

सतिश गावडे's picture

17 Dec 2017 - 7:03 pm | सतिश गावडे

"गाझी अटॅक" चित्रपटातून या अद्भूत तंत्रज्ञानाची आणि त्यासंबंधीत माणसांच्या कष्टाची थोडीफार ओळख झाली होती. मात्र तो चित्रपट असल्याने त्या वास्तवाचा कल्पनाविस्तार केला असण्याची शक्यता आहे.

तुम्ही स्वतः नौदलात होता आणि प्रत्यक्ष काम केलेल्या नौसेनिकांकडून वास्तववादी माहिती घेऊन लेखमाला लिहीत आहात त्यामुळे ही लेखमाला नक्कीच वेगळी आहे.

रशियन पाणबुडी सारखी पाणबुडी भारताला बांधता आली नाही का ? इकडे तर रशिया सारखा हिवाळा पण नसतो, काय कारण असावे ?

रशियन पाणबुडी सारखी पाणबुडी भारताला बांधता आली नाही का ? इकडे तर रशिया सारखा हिवाळा पण नसतो, काय कारण असावे ?

सुबोध खरे's picture

29 Dec 2017 - 12:43 pm | सुबोध खरे

सिंधुघोष क्लासच्या रशियन पाणबुड्या या डिझेलवर चालणाऱ्या आहेत.
भारताकडे अणुतंत्रज्ञान असल्याने डिझेलवर चालणाऱ्या पाणबुड्या तयार करण्यापेक्षा अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी तयार करणे हे दूरगामी दृष्टीने जास्त फायदेशीर ठरणारे आहे. कारण अणुपाणबुडीत ठेवलेली अणुशस्त्रास्त्रें हि देशावर झालेल्या सर्वंकष अणुहल्ल्यानंतरही सुरक्षित राहतात आणि ज्या देशाने असा हल्ला केला त्यावर प्रतिहल्ला चढ़वुन त्याचा संपूर्ण विध्वंस करणे शक्य होते. या MAD(MUTUALLY ASSUARED DESTRUCTION) तत्वामुळे दुसऱ्या देशावर अणुहल्ला करण्याचे साहस कोणताही देश करू धजला नाही.
खरं तर १९६२ च्या युद्धातील पराभवानंतर भारताने धडा शिकून १९७४ मध्ये अणुस्फोट केला. त्यामुळे चीनची दुःसाहस करण्याची हमम झाली नाही असे अनेक आंतर राष्ट्रीय लष्करी तज्ञ मानतात.
असलेल्या साधनसामुग्री आणि वित्त स्थितीचा विचार केल्यास उपलब्ध वित्त आणि साधनसामुग्रीचा सत्पात्री वापर (OPTIMAL UTILIZATION) करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या विचारवंतांनी हा विचार केला असावा. कारण अण्वस्त्रे प्रसार विरोधी करार (NPT) प्रमाणे अणुपाणबुडी दुसऱ्याला विकत येत नाही. पण डिझेलवर चालणाऱ्या पाणबुड्या सहज विकत मिळतात
(चक्र १ आणि आता चक्र २ या अणुपाणबुड्या भारताने रशियाकडून भाड्याने घेण्याचे हेच कारण आहे).

उपेक्षित's picture

17 Dec 2017 - 7:22 pm | उपेक्षित

जबरी चालू आहे मालिका डॉक.... _/\_

तुमच्या मुळे नवीन माहिती कळत आहे अन ही मालिका अशीच पुढे चालू राहू द्या.
तुमचे लेखन फारच सुरेख आहे तुमच्या अनुभवांच्या कथांमुळे ज्ञानामध्ये नवीन नवीन भर पडते ..
तुमचे लेखन चालू राहण्यासाठी फार फार शुभेच्छा.
..

मराठी कथालेखक's picture

18 Dec 2017 - 12:13 am | मराठी कथालेखक

एक शंका

पूर्ण सरावात अमेरिका आणि जपानच्या नौदलाला आपली पाणबुडी एकदाही शोधता आली नाही.

जपानचे स्वतःचे सैन्य नाही असे ऐकून आहे, मग जपानचे नौदल कसे काय ?
बाकी लेखमाला वाचून गाझी अ‍ॅटॅक हा चित्रपटातील चित्रण अधिक वास्तववादी वाटू लागलेय. चित्रपट बघताना काही वेळा शंका येत होती की "हे काय दाखवत आहेत, खरंच असं काही असेल की उगाच काही पण दाखवतायत... " पण आता असे वाटतेय की तो चित्रपट खरंच अभ्यासपूर्वक बनवलाय. तुम्ही एकदा चित्रपट पाहून त्याची समीक्षा करावी ही विनंती.

तुषार काळभोर's picture

18 Dec 2017 - 8:09 am | तुषार काळभोर

Japan Maritime Self-Defense Force
जपानी सेना व नौदल हे स्वसंरक्षणासाठी आहे.

सुबोध खरे's picture

18 Dec 2017 - 8:23 am | सुबोध खरे
नरेंद्र गोळे's picture

19 Dec 2017 - 10:42 am | नरेंद्र गोळे

खरे साहेब, ह्या माहितीचे पुस्तक करा. आपल्या विद्यार्थ्यांना अशीच पुस्तके, वाचायला मिळाली पाहिजेत.
आणि ही माहिती खर्‍याखुर्‍या अनुभूतीने लिहून काढायला तुमच्याविना योग्य व्यक्ती विरळाच सापडू शकेल.

टवाळ कार्टा's picture

19 Dec 2017 - 3:07 pm | टवाळ कार्टा

+११११११

सुधीर कांदळकर's picture

20 Dec 2017 - 8:13 am | सुधीर कांदळकर

लेखन. एवढा किचकट विषय इतक्या रंजंकपणे मांडणे...

हॅट्स ऑफ डॉक्टरसाहेब.

आपली पाणबुडी न दिसल्याचे काही देशांनी जाहीर करणे हा त्यांच्या डावपेचाचा भाग असू शकतो. तुमचे गुपित आम्हाला कळले आहे हे कोणताही थोडीफार अक्कल असलेला शत्रू जाहीर करणार नाही. राजकारणात कोण कुणाचा कायम मित्रही नसतो वा कायम शत्रूही नसतो. आपण छोट्यांना खेळतांना मुद्दाम बाद करीत नाही त्यातला प्रकार असू शकतो. अर्थात ही केवळ एक शक्यता.

एका सुरेख लेखमालेबद्दल धन्यवाद.

सुबोध खरे's picture

20 Dec 2017 - 10:12 am | सुबोध खरे

युद्ध सरावात भाग घेणाऱ्या सर्व देशांचे पर्यवेक्षक वॉर रूम/ ऑपरेशन रूम मध्ये हजर असतात आणि केलेल्या अन्वेषण( DETECTION), रडार/ मिसाईल लॉक ऑन इ चे संपूर्ण विश्लेषण तेथे असते.
२०१५ च्या अगोदरपासून अमेरिका आपल्या किलो(सिंधू) क्लास च्या पाणबुड्यांची भाग घ्यावा या बद्दल आग्रही होता पण भारत सरकारने त्याला प्रतिबंध केला होता. शेवटी २०१५ मध्ये भारत सरकारने त्याला परवानगी दिली पण कोणताही दुसऱ्या देशाचा पर्यवेक्षक या पाणबुडीवर येणार नाही या अटीवरच. "अजूनतरी" या सिंधू क्लासच्या पाणबुड्या सहजासहजी शोधणे फार कठीण आहे.
याशिवाय कोणत्याही पाणबुडीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी समुद्रतळ, त्यातील सांदीकोपरे, तेथिल हवामान, पाण्याचे तापमान, पाण्याचे प्रवाह त्यातील ऋतुमानानुसार होणारा बदल, तेथले जलचर इ सर्व याची अमूल्य माहिती जमा करून ठेवलेली असते हि माहिती कधीही कोणत्याही परराष्ट्राला पुरवली जात नाही. प्रत्येक जहाज पाणबुडीचा आपला एक "आवाज" असतो. हि माहितीसुद्धा जमा केलेली/ नोंद केलेली असते अनुभवी अधिकाऱ्यांना त्यावरून आवाजावरून कोणते जहाज जात आहे याची माहिती समजते.
एखाद्या घराण्याच्या गायकी सारखी हि गुपिते अधिकारी एका पिढीकडून दुसऱ्या पिढी कडे संक्रमित करतात. तेंव्हा ती दुसऱ्या राष्ट्राला देणे अशक्य गोष्ट आहे. असे सराव हे सर्वांच्या सामान शत्रू बरोबर एकत्र युद्ध करायचा प्रसंग आला तर आपसातील ताळमेळ राहावा यासाठी केले जातात. मलबार हा सराव चीन या समान शत्रू विरुद्ध युद्धासाठी आहे हे उघड आहे.

चामुंडराय's picture

20 Dec 2017 - 7:41 pm | चामुंडराय

>> पाणबुडीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी समुद्रतळ, त्यातील सांदीकोपरे, तेथिल हवामान, पाण्याचे तापमान, पाण्याचे प्रवाह त्यातील ऋतुमानानुसार होणारा बदल, तेथले जलचर इ. .....

तुम्हाला कदाचित तेथील पाणीमान म्हणायचे असावे :)

सुबोध खरे's picture

20 Dec 2017 - 8:19 pm | सुबोध खरे

))--((

वा..माहिती सहज सोप्या भाषेत देत आहात. लेखाचे मागील भाग व आत्ताच भाग नुकतेच वाचून झाले. आवडले. तसेच नविन माहिती मिळाली.

शेखरमोघे's picture

20 Dec 2017 - 8:04 pm | शेखरमोघे

नेहमीसारखाच अतीशय माहितीपूर्ण आणि तरीही सोप्या भाषेतला लेख - आवडला. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!

अनिंद्य's picture

21 Dec 2017 - 11:06 am | अनिंद्य

रोचक
पु भा प्र

खटपट्या's picture

26 Dec 2017 - 11:06 pm | खटपट्या

एका फटक्यात सगळे भाग वाचून काढले. पुढचे भाग पटापट येउदेत.

महत्वपूर्ण माहिती असलेले लेखन...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी आजची स्वाक्षरी :- स्विंग जरा... स्विंग जरा...स्विंग जरा... ;) :- Jai Lava Kusa

प्रमोद देर्देकर's picture

31 Dec 2017 - 4:29 pm | प्रमोद देर्देकर

जबरदस्त लिखाण साहेब.