छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १८: फूड फोटोग्राफी

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
9 Dec 2017 - 2:05 pm

नमस्कार मंडळी,

यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. काही अवधीनंतर आज याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - 'फूड फोटोग्राफी' किंवा 'खाद्यपदार्थांचे छायाचित्रण'. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या खाद्यपदार्थाचे नेत्रसुखद छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे. खाद्यपदार्थ शाकाहारी असावा की मांसाहारी, याचे बंधन नाही.

इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका 'साहित्य संपादक' या आयडीला  व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे ३१ डिसेंबर २०१७. प्रवेशिकेबरोबर खाद्यपदार्थाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा.

स्पर्धकांना प्रत्येकी एकच छायाचित्र प्रवेशिका पाठवता येईल. एकापेक्षा जास्त छायाचित्रे पाठविल्यास पहिले छायाचित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधित अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित करू शकता.

स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. कुठलीही प्रवेशिका स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे सर्व अधिकार साहित्य संपादक मंडळाला असतील.

यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे:

स्पर्धा क्र. १)  मानवनिर्मित स्थापत्य  (छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा)
स्पर्धा क्र. २) आनंद
स्पर्धा क्र. ३) ऋतू (Seasons)
स्पर्धा क्र. ४) उत्सव प्रकाशाचा
स्पर्धा क्र. ५) भूक
स्पर्धा क्र. ६) व्यक्तिचित्रण
स्पर्धा क्र. ७) शांतता
स्पर्धा क्र. ८) चतुष्पाद प्राणी
स्पर्धा क्र. ९) सावली
स्पर्धा क्र. १०) कृष्णधवल छायाचित्रे
स्पर्धा क्र. ११) प्रतीक्षा
स्पर्धा क्र. १२) पाऊस
स्पर्धा क्र. १३) माझ्या घरचा बाप्पा
स्पर्धा क्र. १४) जलाशय
स्पर्धा क्र. १५) कृषी
स्पर्धा क्र. १६) फूल
स्पर्धा क्र. १७) रस्ता

तसेच खालील छायाचित्रांवर टिचकी मारून आधीच्या काही स्पर्धांचे धागे बघता येतील.



टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे आणि येथे उपलब्ध आहे. तरीही काही अडचण आल्यास साहित्य संपादक ईमेल आयडीला (sahityasampadak डॉट mipa ऍट gmail.com) तुम्ही प्रवेशिका ईमेलने पाठवू शकता. ईमेलचा विषय 'छायाचित्रण स्पर्धा क्र. १८ प्रवेशिका' असा असावा. तसेच मेलमध्ये तुमचे मिपाचे सदस्यनाम आणि बिल्ला क्रमांक स्पष्टपणे नमूद केलेले असावे.

छायाचित्रणआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

9 Dec 2017 - 7:00 pm | पद्मावति

वाह!
मिपाकरांकडून अनेकानेक उत्तम कलाकृतींच्या प्रतीक्षेत...

तुषार काळभोर's picture

9 Dec 2017 - 7:11 pm | तुषार काळभोर

मिपाकरांकडून अनेकानेक उत्तम कलाकृतींच्या प्रतीक्षेत...
आणि पाककृतीच्याही प्रतीक्षेत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2017 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

चटकदार विषय ! आता भूक खवळवणारे फोटो पाहण्याची उत्सुकता लागली आहे. :)

तुषार काळभोर's picture

11 Dec 2017 - 7:40 am | तुषार काळभोर

हॉटेलमध्ये काढलेले फोटो चालतील की घरचेच पदार्थ हवेत? की फक्त स्वतः बनवलेले?

कुठलेही खाद्यपदार्थ चालतील. स्वतः बनवलेले असावेत असे बंधन नाही.

नाखु's picture

11 Dec 2017 - 9:05 am | नाखु

चमचमीत, चटकदार मिसळीचा फोटो टाकून ये/del>
टाकू नयेत

मोर्चा काढला जाईल

अखिल मिपा मिसळभक्त आस्वादक महामंडळ

इशारा हलके घेणे
स्पर्धकांना शुभेच्छा

असंका's picture

11 Dec 2017 - 9:23 am | असंका

+1...

तुषार काळभोर's picture

11 Dec 2017 - 11:20 am | तुषार काळभोर

पुणे?
रामनाथ

ठाणे?
मामलेदार

कोल्हापूर?
कोल्हापूर

केडी's picture

11 Dec 2017 - 4:08 pm | केडी

आधी प्रकशित झालेल्या पाककृतींचे (मिपा वर) छायाचित्र दिलेले चालेल का?

काय राव शॉर्टकट मारताय. नवीन पाकृ पाहिजे तुमच्याकडून. काय म्हणता मिपाकर? ;-)

छायाचित्र पूर्वप्रकाशित नसावे. पाकृ आधी प्रकाशित केलेली असली तरी चालेल.

चांदणे संदीप's picture

12 Dec 2017 - 1:01 pm | चांदणे संदीप

मी तर म्हणतो यांना सक्तीचे जीवनगौरव देऊन टाका! ;)

Sandy

सांरा's picture

11 Dec 2017 - 4:48 pm | सांरा

कोणी त्रिमितीय तंत्रज्ञान वापरून काढलेला फोटो
पाठवला तर चालेल का?

एखादे उदाहरण देता का? म्हणजे तुम्हांला कसले त्रिमितीय छायाचित्र अभिप्रेत आहे हे समजेल.

सांरा's picture

12 Dec 2017 - 12:39 pm | सांरा

मी एखादे थ्री दि ऍनिमेशन सॉफ्टवेअर वापरून एखादा फोटो तयार केला तर कसे? एखाद्याकडे (म्हणजे मी) महागडा कॅमेरा नसल्यास bokeh आणि इतर इफेक्ट आणणे अडचणीचे जाते.

तुमची जे म्हणताय त्याला डिजिटल कोलाज किंवा डिजिटल पेंटिंग वगैरे म्हणता येईल. छायाचित्रण नाही. येथे छायाचित्रणाची 'कला' जास्त महत्त्वाची आहे. छायाचित्र कॅमेरा घेत नाही, कॅमेऱ्यामागचा छायाचित्रकार घेतो हे लक्षात घ्या. महागडी उपकरणे नाहीत म्हणून स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असे करू नका. मोबाईलनेही छान फोटो घेता येतात.

थ्री दि सॉफ्टवेअर जसे माया आणि ब्लेंडर मध्ये खाडी गोष्ट जसे उदा. लाडू पूर्ण हाताने बनवतो तसा मळून बनवता येतो.त्यानंतर त्याचे मटेरियल ठरवावे लागते. त्यानंतर प्रकाश योजना करावी लागते. शेवटी त्या सॉफ्टवेअर मध्ये अनेक उपलब्ध कॅमेऱ्यांपैकी (उदा कॅनन, निकॉन) एक वापरून फोटो घ्यावा लागतो. त्यामुळे हि गोष्ट जवळपास फोटोग्राफ़ीजवळ जाते आणि पुरेसे स्वातंत्र्य हि मिळते, त्यासाठी मी वरील शंका विचारली होती.

बाकी महागडी उपकरणे नाहीत म्हणून स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असं काही नाही, फक्त विचारण्यासाठी विचारले हो.

भाते's picture

11 Dec 2017 - 4:57 pm | भाते

स्पर्धेचा आणि आमचाही!

प्रवेशिकेबरोबर खाद्यपदार्थाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा. "नंतर पाकृचा संपूर्ण आणि सचित्र वेगळा धागा काढणे आवश्यक आहे." हि अट त्यात अवश्य घाला.
संमं, कृपया निकाल शक्यतो विकांतालाच जाहिर करता आला तर बघा. ऑफिसमध्ये रोजच्या कामाच्या त्रासातून काही क्षण विरंगुळा म्हणुन मिपावर आल्यावर डोळयांवर आणि पोटावर अत्याचार नको.
आधी दिपक आणि सानिकाला व्यनि करुन रोमावस्थेतून जागे करा.

किल्लेदार's picture

12 Dec 2017 - 8:21 am | किल्लेदार

उगाच लोकांच्या भुका चाळवायला म्हणून. म्हणजे पटापट प्रवेशिका येतील

पदार्थ कुठला ते आठवत नाही पण आधी ब्रँडी पेटवून हॉटेलवाल्याने पोट पेटवायचा प्रयत्न केला.

IMG_0665

वैदेहीजी's picture

12 Dec 2017 - 4:02 pm | वैदेहीजी

Harishchandra Gad

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2017 - 11:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथे तुम्ही थंबनेलची लिंक दिलेली आहे. त्याऐवजी चित्र पूर्ण आकारात उघडून त्याची लिंक वापरल्यास चित्र दिसू लागेल.

जयंत कुलकर्णी's picture

12 Dec 2017 - 4:47 pm | जयंत कुलकर्णी

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

चौकटराजा's picture

17 Dec 2017 - 7:41 pm | चौकटराजा

पुण्याला डॉ कानिट्कर हे एक गाजलेले छायाचित्रकार होते. त्यानी उत्तम फोटोची अगदी सोपी व्याख्या केली होती. ज्या फोटोत तुम्हाला शिरावेसे वाटते तो " उत्तम" फोटो.
जकु साहेब ते डोसे फन्ना करावेसे वाटतायत हो !

वैदेहीजी's picture

12 Dec 2017 - 4:58 pm | वैदेहीजी

गेल्याच महिन्यात हरीशचंद्र गडावर जाणे झाले. तेव्हा काढलेला भूक खवळवणारा फोटो :)

Harishchandra Gad

देशोदेशीचे खाद्यपदार्थ

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Nov 1, 2016 at 4:51pm PDT

पेरू : लिमा बीन्स सॅलड (पुनो)

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Jan 22, 2016 at 11:06am PST

इटली : रिबन पास्ता (ग्वाटेमाला)

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Dec 19, 2015 at 12:29pm PST

जपान : सुशी (कोलोरॅडो)

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Mar 2, 2017 at 7:38pm PST

इथिओपिया : इंजिरा व भाज्या (वॉशिंग्टन)

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Dec 11, 2016 at 8:45am PST

थाईलँड : टोफू करी (रंगून)

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Jan 23, 2016 at 6:24pm PST

भारत : पारंपरिक आसामी थाळी (गुवाहाटी)

चांदणे संदीप's picture

14 Dec 2017 - 10:50 am | चांदणे संदीप

आसले ऑस्ट्रेलियावाले बॅट्समन असल्यावर आम्ही केनियावाल्यांनी कुठं. जायाचं??? :(

फुडाच्या फोटोग्राफीचा धसका घेतलेला... ;)
Sandy

समर्पक's picture

15 Dec 2017 - 1:05 am | समर्पक

आवं आस काय नसतंय... आपल्या आनंदासाठी आपण खेळायचं नि इतरांच्या खेळाचा आनंद घेत आपलाही खेळ अजून बरा करायचा झालं... त्यामुळे बिनधास्त टाका चौकार षटकार किंवा गुगलीसुद्धा...

सहज म्हणून तुमचा instagram अकाउंट पहिले , खरंच खुप सुंदर फोटो काढता तुम्ही...

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Dec 2017 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पर्धेकरिता नाही...

पाहताक्षणी, मनात व डोळ्यांत भरणारे; आणि "गट्टम करावे की फक्त बघतच रहावे" अशी द्विधा मनःस्थिती करणारे खाद्यपदार्थांचे सादरीकरण...

(सर्व चित्रे जालावरून साभार)

भुमन्यु's picture

19 Dec 2017 - 7:46 pm | भुमन्यु

मागे एका consultancy प्रोजेक्टमध्ये मिशलिन स्टार चेफ्सना ट्रॅक करत होतो. भारी अनुभव होता. त्यांचे वेगवेगळ्या थीम्सचे रेस्टॉरंट्स, प्रत्येक रेसिपी मागची मेहनत आणि एकेका ईन्ग्रेडिएंट वापरण्यामागिल कल्पना आणि विचार थक्क करुन ठेवतो. म्हात्रे काकांनी म्हणल्याप्रमाणे !!गट्टम करावे की बघतच रहावे!! हा प्रश्न पडायचा.

तुषार काळभोर's picture

21 Dec 2017 - 8:06 pm | तुषार काळभोर

कालपासून abpमाझाच्या साईटवर आशिष सुर्यवंशीचा ब्लॉग सुरू झालाय. फोटोग्राफीवर. आज दुसऱ्या भागात नॅशनल जिओग्राफीक च्या त्या प्रसिद्ध फोटोविषयी लिहिलंय.
Nat

श्रीरंग_जोशी's picture

24 Dec 2017 - 10:58 am | श्रीरंग_जोशी

मिपावरच्या छायाचित्रणकला स्पर्धा या लोकप्रिय उपक्रमाचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल साहित्य संपादकांचे मनःपूर्वक धन्यवाद.

यंदाचा विषय रोचक अन प्रथम दर्शनी वाटतो त्यापेक्षा बराच आव्हानात्मक आहे असे मला वाटते.

हा एक विषयाच्या जवळ जाणारा मी फार पूर्वी काढलेला फोटो (स्पर्धेसाठी नाही).

'स्वयं'पाक व घरगुती चित्रण

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Aug 13, 2017 at 5:58pm PDT

कोळाचे पोहे

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Aug 6, 2016 at 10:11pm PDT

भरलीमिरची

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Sep 12, 2016 at 7:09pm PDT

शेवभाजी

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Aug 10, 2016 at 2:20pm PDT

फणसाची भाजी

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Jun 29, 2016 at 8:32pm PDT

भरलीवांगी

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Dec 15, 2015 at 7:07pm PST

केळफुलाची भाजी

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Apr 20, 2016 at 4:35pm PDT

भरलेकारले

A post shared by Shardul Takalkar (@samarpak) on Dec 12, 2016 at 9:14pm PST

हळदीचे लोणचे : पूर्वतयारी

क्या बात है! फूड फोटोग्राफी म्हणजे कुठल्या फाइव्ह स्टार रेसिपीचेच फोटो असायला हवेत असे काही नसते, घरगुती साध्यासाध्या पदार्थांचेही फोटो तितकेच अप्रतिम आणि कलात्मक असू शकतात हे तुम्ही दाखवून दिले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2018 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिसले नाही.

-दिलीप बिरुटे

सर्वसाक्षी's picture

28 Dec 2017 - 7:33 pm | सर्वसाक्षी

खाद्यपदार्थ सजावट की खाद्यपदार्थाचे प्रकाशचित्रण. दोन्ही पूर्णतः भिन्न आहेत.भारी सजावट पदार्थाचे रुप खुलविते पण अनेकदा लक्ष्य सजावटीकडे अधिक वेधले जाते पण त्यात पदार्थाचा तपशिल गौण होतो.

तुषार काळभोर's picture

28 Dec 2017 - 8:11 pm | तुषार काळभोर

'फोटो' सुंदर हवा...
'साध्या पदार्थाचा चांगला फोटो' हा 'चांगल्या पदार्थाच्या साध्या फोटो'पेक्षा जास्त आवडेल, बहुधा...
बाकी सर्व सदस्यशाही मतदानाने निवड होणार असल्याने सदस्यांना जे आणि जसे आवडेल तसे... कदाचित एखादा 'फोडणीच्या पोळीचा' 'सुंदर' फोटोही जिंकेल!

पॉइंट ब्लँक's picture

3 Jan 2018 - 7:49 pm | पॉइंट ब्लँक

बेंगलोर मधील Le Charcoal ह्या रेस्टॉरंट साठि फुड फोटोग्राफि (प्रोफेशनल नव्हते) प्रायोगिक तत्वावर करायचा योग आला. त्यातील काहि इथे शेअर करत आहे. हा माझा फुड फोटोग्राफि चा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे सुधारणा करण्यास नक्किच स्कोप आहे. इथे असलेल्या उस्तदांनी जरुर सुचवाव्यात :)

दोन एकदम साधे फोटो
मालपोवा
DSC_0160

दहि कबाब
DSC_0309

मशरुम टिक्का मसाला
DSC_0188_1

पुढिल डिशेस मांसाहारि आहेत, नावे विसरलो |:
DSC_0165

DSC_0282

DSC_0277

दाल बुखारि
DSC_0236

DSC_0241

मसाले वापरुन केलेलि सजावट
DSC_0252

DSC_0256

पुलाव
DSC_0316

DSC_0319

काहि पेयजल
DSC_0230

DSC_0219

DSC_0206

समर्पक आणि पॅाइंट ब्लॅन्कचा दणका!

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jan 2018 - 3:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

https://www.youtube.com/watch?v=FqP7gkwj4F0

व्हिडीओची एमेबेडेड लिंक टाकताना पूर्वपरीक्षण गंडत होते म्हणुन लिंक पण अ‍ॅडवली आहे. जर हिकडे दिसत नसेल तर लिंक वर क्लीकवा.

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

10 Jan 2018 - 8:38 am | श्रीरंग_जोशी

मतदानाचा धागा अजुन प्रकाशित व्हायचा असल्याने आणखी एक 'स्पर्धेसाठी नाही' गटातला फोटो इथे डकवतो.

हापिसातल्या हॉलिडे सिझन चॉकलेट्सचा फोन कॅमेर्‍याने काढलेला एक फोटो.

प्रचेतस's picture

10 Jan 2018 - 8:49 am | प्रचेतस

मतदानाचा धागा कधी येतोय?

एकनाथ जाधव's picture

12 Jan 2018 - 3:45 pm | एकनाथ जाधव

+१

काही तांत्रिक अडचणींस्तव उशीर होत आहे. क्षमस्व. लवकरात लवकर प्रवेशिका आणि मतदानाचा धागा काढण्यात येईल.

केडी's picture

7 Feb 2018 - 10:21 am | केडी

+1

आर्य's picture

14 Jan 2018 - 5:53 pm | आर्य

.

तीन महिने उलटले प्रवेशिका देऊन . तांत्रिक अडचण दूर झाली का?

केडी's picture

22 Mar 2018 - 9:33 pm | केडी

+१

Bhakti's picture

3 Jun 2021 - 9:15 pm | Bhakti

मस्तच!
आनंद यातले प्रचि खरच मस्तच!