एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात?

साधा मुलगा's picture
साधा मुलगा in काथ्याकूट
6 Dec 2017 - 11:28 pm
गाभा: 

टीप :
हा धागा जे मुख्यतः इंग्लिश TV/वेब सेरीअल बघतात त्यांच्यासाठी काढला आहे. मराठी/हिंदी सिरीअल साठी नाही.
इंग्लिश सिरीअल बघतो म्हणजे आपण कोणी हुच्च आहोत असा आव आणायचं नाहीये, मराठी/हिंदी मध्ये काही बघण्यासारखे आहे अस वाटतं नाही, तरीही काही अपवादात्मक पर्याय असल्यास नक्की सांगा.
स्पोईलर देऊ नयेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------
मागे मिपावर बऱ्याच वेळा एखाद्या सीरिअल वर धागे निघाले आहेत. GOT वाल्यांनी स्वतंत्र धागा काढला होता. याचा सातवा सिझन चांगला झाला तरी बराच प्रेदिक्तेबल होता.
breaking bad हि सीरिअल माझी बघून झाली, पाहून धन्य झालो. आता उशिराने का होईना Narcos बघायला चालू केली आहे, विषय पुन्हा drug traffickingवगैरे आहे, तरी अजून रंगत आल्यासारखी वाटत नाही, सिझन १ चालू आहे. Javier Pena चे काम चांगले आहे पण बाकी सर्व ठीक ठाक , पाब्लो इस्कोबार पण अगदीच ढ़ंम्पाळ्या घेतलाय. दम वाटत नाही. Narcos संपल्यावर मार्वेल चे Punisher बघायचा विचार आहे.
breaking bad बघितल्यानंतर Better Call Saul बघावीशी वाटते.
SitCom अजून जुन्याच पाहत आहे. Friends, Seinfeld, Everybody Loves Raymond (Comedy Central वर लागते) याच्या पलीकडे अजून गेलेलो नाही.
आपल्या प्रतिक्रिया आणि अनुभवांच्या प्रतीक्षेत आहे.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

6 Dec 2017 - 11:52 pm | कपिलमुनी

कालच Westworld ही सिरीयलचा पहिला सीझन पहिला . मस्त आहे , पूर्वी या कल्पनेवर आधारित सेम नावाचा चित्रपट येऊन गेलाय पण सीरीज छान आहे. 7/10

त्यापूर्वी ब्लॅक मिरर चे 3 सीझन पाहिले . प्रत्येक भाग वेगळा आणि प्रत्येक सीझन मध्ये साधारण 3 भाग असतात. विषयाचे वेगळेपण हे ठळकपणे जाणवते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच प्रतिबिंब दिसते. 8.5/10. तिसरा सीझन लैच भारी आहे.

The Big bang theory ही sitcom पाहतो , मजेशीर आहे. पहिल्या काही भागात पात्रांची ओळख Zआली की मजा वाढते 7/10

अगोचर's picture

7 Dec 2017 - 12:01 am | अगोचर

हॅरी पॉटर सारखी आहे पण मोठ्यांसाठी

भक्त प्रल्हाद's picture

7 Dec 2017 - 12:30 am | भक्त प्रल्हाद

रुद्रम (मराठी)
आणि
पिचर्स , ट्रिपलींग (हिंग्लीश)

नक्की पहा.

अनन्त अवधुत's picture

7 Dec 2017 - 1:56 am | अनन्त अवधुत

आवर्जून सांगण्यासारखे म्हणजे :
१. नार्कोज : तुम्ही पाहत आहात. सिझन २ थोडा बोअर होतो. आणि मुळात ड्रग ट्रॅफिकिंग मधले २-४ विकी पेजेस वाचले असतील तर आणखीन इंटरेस्ट येतो.
२. बर्न नोटीस : एक नंबर सिरीज आहे. एक हेर ज्याच्यासोबत शासन संबंध संपवते (त्याला बर्न नोटीस असे नाव आहे) तो कसा जगतो. बर्न नोटीस ज्याने इश्यू केली त्याला शोधतो वगैरे वगैरे शेवटचे १-२ सिझन मात्र लांबवले आहेत.
३.मॉंक: एक अव्वल दर्जाचा पोलीस , ओसीडी ने त्रस्त होतो. पोलीस दल सोडतो. त्याचा सहृदयी बॉस, खाजगी गुप्तहेर होण्याला मदत करतो. आणि तो गुन्हे उकलायला मदत करतो. जरा जुनी सिरीज आहे. फार विनोद नाही, हाणामारी नाही. आवड अपनी अपनी.
४. सीएसआय एन वाय: न्यायवैद्यकीय विज्ञान. सीएसआय एल ए सारखीच , पण यातले गुन्हे आणि त्यांचा शोध मात्र सीएसआय एल ए पेक्षा उजवा.
अजून आहेत.. आठवतील तशा सांगत जाईन.
सगळे नेटफ्लिक्स वर होते /आहेत

एमी's picture

7 Dec 2017 - 8:15 am | एमी

चांगला धागा आहे.

मी नुकतंच friends चं बिंज केलं. मजा आली.
आता दर तिमाहीला एक सिरीज बघायची ठरवलं आहे. जानेवारीत The wire बघेन.

नुकत्याच दोन मोठ्या सिरियल सलगपणे संपवल्या.

१. लॉस्ट

ही तशी जुनी सिरिज, पण प्रत्येक भाग खिळवून ठेवणारी. 'द अदर्स" आल्यानंतर तर अजूनच मजा येते. मात्र सिरिज संपल्यावर बरेसचे दुवे जोडायचे राहूनच गेले आहेत कदाचित ते प्रेक्षकाच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिले असतील. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय, फ्लॅशबॅक्स आणि फ्लॅशफॉर्वर्ड्सचा प्रभावी वापर, प्रभावी पार्श्वसंगीत ह्या जमेच्या बाजू.

२. ब्रेकिंग बॅड

निव्वळ अप्रतिम. मनुष्यस्वभावाचे अत्यंत बारिक चित्रीकरण, सर्वच कलाकारांचा दमदार अभिनय आणि ब्रायन क्रॅन्स्टन तर अहाहाहा... चुकवू नये अशीच.

लॉस्ट जब्राट. पण शेवट जमला नाही त्यांना. :(

अनन्त अवधुत's picture

7 Dec 2017 - 1:27 pm | अनन्त अवधुत

जनरली, २४ आणि प्रिझन ब्रेक पण पाहतात असे माझ्या पाहण्यात आले आहे.
आणि फ्रेंड्स पाहणारे हाऊ आय मेट युवर मदर. अर्थात माझा सॅम्पल डेटा फार छोटा आहे :)

मी 'हाऊ आय मेट युवर मदर' सिरीज पहिली आहे, (शेवटचा एपिसोड सोडून) . मजेदार आहे.
शेवट पहिला नाही कारण मला तो शेवट काही पटला नाही.

या ६ ही सिरीजचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत. नक्की पहा.

पगला गजोधर's picture

7 Dec 2017 - 9:14 am | पगला गजोधर

१. शॉट्स फायर्ड
२. द तालवार्स
३. द वॉकिंग डेड लेटेस्ट सिजन

पगला गजोधर's picture

7 Dec 2017 - 9:14 am | पगला गजोधर

*द तलवार्स (आरुषी हत्याकांड)

फ्लॅश, arrow आणि गॉथम सुरु केलेल्या. बऱ्या आहेत. कार्टून सारखा तोचतोपणा यायला लागला आणि सोडून दिल्या.
डायरेक्ट कार्टून बघायला बरी. नवीन काही सुरु नाही केलंय.

ब्रेकिंग बॅड बघायला सुरुवात केली होती पण एका एपिसोडवर थांबलोय तो अजून थांबलोच आहे.
ट्रिपलिंग ऑल टाईम फेवरेट, परमनंट रुममेट्स बघायला सुरु केली आहे.

ङ्रग्जबद्दल पहायचं असेल तर 'द वायर' पहाच. अर्थात वेगवान गोष्ट, जोरदार वॉयलंस वगैरे अजिबात नाही यात पण प्रचंड परिणामकारक.

कपिलमुनी's picture

7 Dec 2017 - 2:47 pm | कपिलमुनी

The Vikings

हिस्टरी चॅनेलची द वायकिंग हा पीरीयड ड्रामा मस्त आहे. अक्शन , हिस्टरी आणि हीरोइझम याचा सुरेख संगम आहे

सध्या SATC बघतेय.. सेकंड सीझन चालू आहे.. चांगली वाटतेय अजून तरी.. खूपशी गर्ली सिरीयल आहे.. रिलेशनशिप ड्रामा..

थोड्याच दिवसात, नवऱ्याला वेळ झाला कि स्ट्रेन्जर थिंग्स सुरु करणार ..

हर्मायनी's picture

8 Dec 2017 - 10:38 am | हर्मायनी

स्ट्रेन्जर थिंग्स ह्या सिरीयल चा नुकताच सेकंड सीझन आला आहे. हि सिरीयल पॅरलल युनिव्हर्स वगैरे कल्पनांवर अधिकारीत आहे. बघायला मजा येईल असे वाटते.
पण थोडी स्कॅरी असू शकेल असे वाटते म्हणून एकटीने बघायची हिम्मत नाही होते.

ती देव पटेलची सिरीयल संपली का ?

पिवळा डांबिस's picture

9 Dec 2017 - 12:05 am | पिवळा डांबिस

ही म्हणत असाल तर ३ सीझन होऊन संपली...
सीझन १,२,३ हे अनुक्रमे उत्तम, मध्यम आणि सोसो वाट्ले. विशेषतः त्यातल्या प्रेमप्रकरणांनी काव आणला!
एरिन सोर्केन च्या सिरियल्स मला आवड्तात, त्याच्या राजकीय मतांशी १००% असहमत असूनही...
कारण त्याचं प्रेसेन्टेशन चांगलं असतं. द वेस्ट विंग ही अशीच एक त्याची चांगली सिरियल होती...

सिरुसेरि's picture

12 Dec 2017 - 1:38 pm | सिरुसेरि

skins - या सिरीजमधील त्याचे काम पाहुन slumdog millionaire साठी निवड झाली म्हणतात .

पिवळा डांबिस's picture

12 Dec 2017 - 11:21 pm | पिवळा डांबिस

आह! ती नाही मी पाहिलेली....

चांदणे संदीप's picture

8 Dec 2017 - 3:59 pm | चांदणे संदीप

ब्रेकिंग बॅड पाहून झालेल्या सर्वांनी बेटर कॉल चुकवू नये असे माझे मत. ब्रेकींग बॅडची नशा उतरवू न देता वेगळीच खुमारी येते.

सॉलचा अप्रतिम अभिनय!! आणखी सांगत नाही... मेलडी खाव...

Sandy

चांदणे संदीप's picture

8 Dec 2017 - 4:02 pm | चांदणे संदीप

ब्रेकिंग बॅड पाहिली नसेल तर ती पाहून घ्या आधी. त्याशिवाय मोक्षप्राप्ती इल्ले!

Sandy

कपिलमुनी's picture

9 Dec 2017 - 2:22 am | कपिलमुनी

हाउस ऑफ कार्ड्स चे नाव अजून कोणी कसे घेतले नाही ?
मुख्य पात्र आणि राजकीय गेम भारी आहेत.

मराठी मध्ये अशी एखादी सिरीयल यावी फुल्ल पोटेनशियाल आहे

पगला गजोधर's picture

9 Dec 2017 - 10:31 am | पगला गजोधर

वेगवेगळ्या जाती धर्म पंथ राजकीय/सांस्कृतिक संघ/पक्ष
यांची ना हरकत सेन्सॉर सर्टिफिकेट घेण्यात निर्मात्याची उभी हयात खर्च होईल इथे...

उगा काहितरीच's picture

9 Dec 2017 - 5:46 am | उगा काहितरीच

सध्या (परत एकदा ) GOT पहातोय. ब्रेकिंग बॕड , नार्कोज वगैरे अप्रतिम असेल असे वाटते. पण GOT च्या अनुभवावरून सध्या तरी दुरच रहातोय . जेव्हा GOT पहिल्यांदा बघत होतो तेव्हा इतकी जास्त उत्कंठा असे की सकाळी ८ वाजता अॉफिस असून पण रात्री १-२ वाजेपर्यंत बघत असे. शनिवार/रविवारी एक -एक सिझन पुर्ण संपवलेले आहेत. एकदा सुरू केले की कदाचित सोडवणारच नाही. त्यामुळे सध्या तरी नो सिरीज ! ;-)

अनिता's picture

9 Dec 2017 - 10:56 am | अनिता

***** = Very strong story , BOT = based on/close to true events

1) Breaking Bad***** (5 seasons)(Mix of truth and fantasy)
2) Better Call Saul***** (Season 1 and 2)
3) Black Sails*** (3 seasons) (Mix of truth and fantasy)
4) GOT**** (7 seasons)
5) Turn - Washingtons spies*** (4 seasons)(BOT)
6) The 100 **
7) The Vikings****
8) The Night Manager***** (6 strong episodes)(BOT)
9) Animal Kingdom (South California Criminal Family, interesting theme)
10) Peaky Blinders ***** (Mix of truth and fantasy)
11) Narcos (2 seasons)***** (BOT)(Google about Pena and Pablo. Very true characterization in the series of people and events)
12) Hell on Wheels *****(BOT)
13) Queen of the south (2 seasons)
14) Magic City ****(BOT- How Miami hoteling business came to be)
15) Longmire****
16) Westworld ***

अनिता's picture

9 Dec 2017 - 11:00 am | अनिता

the last kingdom

नेटफ्लिक्सवर ब्लॅक मिरर आणि डार्क(मुळची जर्मन) या दोन सीरिज पाहाच. डार्क तर अक्षरशः जागेवरून उठू पण देत नाही. ब्लॅक मिरर ,पहिल्या सिझनचा पहिला एपिसोड थोडासा बोअरिंग आहे. पण तेवढी कळ काढून तसाच पाहत राहा. नंतरच एपिसोड्स निव्वळ अफाट आहेत.
वेस्टवर्ल्ड पण पाहाच.

कपिलमुनी's picture

12 Dec 2017 - 3:30 pm | कपिलमुनी

डार्क आणि स्ट्रेंजर थिंग्ज यामधे बर्‍याच सिमिलर गोष्टी वाटत नाहीत का ?

आनंदयात्री's picture

13 Dec 2017 - 12:18 am | आनंदयात्री

हेच लिहायला आलो होतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2017 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेटफ्लिक्सवरची टायटल्स (कंसातले आकडे एकूण भागांचे आहेत)...

House of Cards (65)
Vikings (29)
Tudors (10)
Roman Empire (6)
Medici (8)
South Pacific (6)
Tales by Light (Photography) (12)
Magnificent Century (48)
How Universe Works : Season 2 (8)
Shooter (18)
Inexplicable Universe (6)
Afghanistan : The Great Game (2)
Wildebeest Migration (1)
Narcos (30)
Pablo Escobar (74)
Shark (2)
Spartacus (39)
Great Barrier Reef (3)
Shark Tank : Season 7 (29) + Season 8 (23)
Wild China (6)
Wild Patagonia (3)
Cosmos : A Space Odyssey (13)
Marco Polo (20)
El Chapo (20)
Better call Saul (30)

संवैधानिक इशारा : वरची सगळी टायटल्स ४.५ किवा ५* रेटींगवाली आहेत. एकदा सुरू केली की संपल्याशिवाय चैन पडत नाही. बिंज व्यसनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो ! ;) :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Dec 2017 - 10:55 am | डॉ सुहास म्हात्रे

चुकून राहिलेली दोन नावे...

ब्रेकिंग बॅड
क्राउन

मारवा's picture

9 Dec 2017 - 11:53 pm | मारवा

द वायर
ही अप्रतिम मालिका ज्यांनी बघितलेली नसेल त्यांनी अवश्य बघावी. अप्रतिम मालिका आहे इतकेच म्हणतो.
विशेषतः पहीला व दुसरा सीझन त्यातही दुसर्‍या सीझन चा शेवटुन दुसरा भाग
अभिनय/ वास्तव/ टायटल्स/ साँग्ज/ थीम्स /स्क्रिप्ट
समाजशास्त्र मानसशास्त्र अनेकोनेक बाबींसाठी ही मालीका एकवेळ तरी अवश्य बघावी.
एक सकस फार वेगळं काहीतरी पाहील्याचा निखळ आनंद हमखास मिळेल.

ब्रेकींग बॅड तो बस नाम ही काफी है !

सध्या The Deuce ही वायर वाल्या डेव्हीड सायमनची मालिका बघायला सुरुवात केलेली आहे. सत्तरीच्या दशकातील न्युयॉर्क मधील पॉर्न इंडस्ट्री ही थीम
अजुन काही पहील्या भागात तरी फारसं गावलं नाही. पण बघणारे पुढे कळेल कदाचीत

वॉकींग डेड चा पहीला सीझन आवडला पण काहीसा किळसवाणा वाटला. तरी पुढील सीझन बघायचेत
व एक प्रिझन ब्रेक चे कौतुक फार ऐकलय ती एक बघायचीय

पगला गजोधर's picture

10 Dec 2017 - 11:09 am | पगला गजोधर

समाजशास्त्र मानसशास्त्र अनेकोनेक बाबींसाठी ही मालीका एकवेळ तरी अवश्य बघावी.

मारवाजी,
आपल्याला जर, द वायर, सीरिअल, आवडली असेल, तर,
शॉट्स फायर्ड, ही नवी सीरिअल पाहू शकता, अशी
सुचवणी मी देतो...

मारवा's picture

10 Dec 2017 - 11:02 pm | मारवा

शॉट्स फायर्ड, विषयी माहीत नव्हते.
कुठल्या चॅनलवर ? काय थीम ?

येडाफुफाटा's picture

10 Dec 2017 - 11:50 pm | येडाफुफाटा

मी वायर वर थोडं लिहिलं होतं वर्ड फॉरम्याट मध्ये पण इथे कॉपी पेस्ट का होत नाहीये समजत नाही. काही मदत करू शकाल काय?

पगला गजोधर's picture

11 Dec 2017 - 4:54 pm | पगला गजोधर

स्टार वर्ल्ड प्रीमियम,

मध्यवर्ती:
अमेरिकेत
समजा, एका कृष्णवर्णीय पोलिसाकडून, जर एका श्वेतवर्णीय महाविद्यालयीन तरुणाची, पोलीस तपासणीसाठी थांबवण्यात आले असताना न्यायिक हत्या झाली तर ?
(अमेरिकेत असं नियमितपणे होतं, फक्त पोलीस गोरे व हत्या झालेले आफ्रिकनअमेरिकन असतात, या काल्पनिक घटनेत उलट झालंय)

येडाफुफाटा's picture

10 Dec 2017 - 11:41 pm | येडाफुफाटा
येडाफुफाटा's picture

10 Dec 2017 - 11:42 pm | येडाफुफाटा

उत्तम

येडाफुफाटा's picture

10 Dec 2017 - 11:47 pm | येडाफुफाटा
येडाफुफाटा's picture

10 Dec 2017 - 11:48 pm | येडाफुफाटा

एक बाजुने गेम ऑफ थ्रोन्स फार जबरदस्त आदिम मानवी भावना चेतवणारी वाटते जसे क्रौर्य मत्सर हिंसा सेक्स इ.
त्यातला ह्युमन एलीमेंट ही आवडतो. व एक पुर्ण काल्पनिक फॅन्टसी च्या बाजुने निर्मीती असुन त्यात रीअलीझम आणणे हे भारी वाटते.
उलट ही उदाहरण असते कधी एकदम रीअलीस्टीक कथानकात फॅन्टास्टीक थीम्स असतात

तर हे आवडते.

मात्र तरीही....
गेम ऑफ थ्रोन्स कधी कधी चाइल्डीश वाटते
एक निखळ बावनकशी मनोरंजन म्हणून एनीटाइम ग्रेट

शिवाय इनसेस्ट सारखे टबु चा वापर...

पगला गजोधर's picture

11 Dec 2017 - 4:58 pm | पगला गजोधर

तुम्हाला जी ओ टी, बालिश वाटते कधीकधी, हा तुमचा चॉईस...

एक पुर्ण काल्पनिक फॅन्टसी च्या बाजुने निर्मीती असुन त्यात रीअलीझम आणणे हे भारी वाटते.

जरी काल्पनिक ... तरी वास्तविक इतिहासातून/राजकारनातून
याचे प्लॉट आधारित आहे...

गेम चे पहिले ३ सिझन जेवढे चांगले झाले तेवढे पुढचे होऊ शकले नाहीयेत. अन्य फँटसी सिरीज प्रमाणे "गाळलेली पत्रे व कथानके" यामुळे पुढील सिझन मध्ये दिग्दर्शकांची गोची झालीये (हॅरी पॉटर चे ५ पासूनचे भाग असेच गणलेत असे माझे वैयक्तिक मत आहे). आर्थिक व अन्य कारणामुळे हे होतेच. ३ नंतर चे सीजन फॉर्मॅलिटी म्हणून पाहतोय.
आणि तो मार्टिनबाबा ६ व पुस्तक पण काढत नाहीये.

गेम ऑफ थ्रोन्स कधी कधी चाइल्डीश वाटते

हे मत मी ४ पासून पुढील सीजन साठी मान्य करतो.

(हॅरी पॉटर चे ५ पासूनचे भाग असेच गणलेत असे माझे वैयक्तिक मत आहे) >> चित्रपट कि पुस्तक?

पुस्तकांमधे ५ आणि ६ मलापण एवढी आवडत नाहीत पण ७वे जबरदस्त आहे.
चित्रपट सगळेच ठीकठाक आहेत.

चित्रपट. पुस्तकं ५ आणि ६ बरीआहेत. एकूणच हाय फँटसी रुपेरी पडद्यावर आणणे फार कठीण काम आहे.

एकूणच हाय फँटसी रुपेरी पडद्यावर आणणे फार कठीण काम आहे. >> सहमत!

पॉपकॉर्न's picture

10 Dec 2017 - 5:38 am | पॉपकॉर्न

राणी एलिझाबेथ बद्दलची हि मालिका. भारतावर एकेकाळी राज्य केलेल्या या राणीबद्दल बरीच नवीन माहिती कळते.
यातील माऊंट बॅटन बद्दल- हेच ते इंडियाचे व्हॉईसरॉय जे भारत देऊन आले आणि आपली बायकोही हे उल्लेख रोचक वाटतात. मी हि सिरीज पाहत होतो त्यावेळी भारतात दिल्लीतील प्रदूषण आणि त्यावरील घडामोडी घडत होत्या. अशाच घटना त्यावेळी लंडन मध्ये घडल्या होत्या ते एका भागात दाखवले आहे. ते बघतांना इतिहासाची कशी पुनरावृत्ती होते ते अनुभवायला मिळाले.

मंदार कात्रे's picture

10 Dec 2017 - 12:52 pm | मंदार कात्रे

The Practice पहिले ७ सीझन्स जबरदस्त कोर्ट ड्रामा ABC / FOX
The X Files- FOX- all seasons
Fringe - Fox - all seasons
How I met your Mom- CBS- all seasons
Black Mirror -BBC

न्यूजरूम पण चांगली आहे

पक्षी's picture

11 Dec 2017 - 7:07 pm | पक्षी

अरेच्या, Two and a half men चा उल्लेख कोणीही केला नाही. अतिशय उत्तम विनोदी मालिका, नक्की बघावी अशी. उत्तम विनोदी प्रसंग आणि पात्र असलेली.
अगोदर बघितली होती पण परत एकदा सर्व भाग download करून बघायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत ४ भाग भागून झाले आहेत. थोडी unethical वाटते पण मनोरंजक आहे. आणि मॉडेल म्हणाल तर, एकसे बढकर एक. अर्रर्रआ, नुसता राडा. प्रसंग तर इतके छान रंगवले आहेत कि नुसते आठवले तरी हसू येते.

हि मालिका संपल्या नंतर Friends आणि नंतर GOT बघायची आहे. ह्या धाग्यात खूप लोकांनी उल्लेख केल्या मुले Breaking Bad सुद्धा बघेल.

अर्रे हो, permanent roommates विसरलो कि. तुनळी किंवा TVF वर आहे हे मालिका, नक्की बघा..

अभिदेश's picture

12 Dec 2017 - 2:39 am | अभिदेश

बघाच. जबरदस्त. खटल्याला कसे नाट्यपूर्ण वळण दिले जाते ते अप्रतिम.

आनंदयात्री's picture

13 Dec 2017 - 12:35 am | आनंदयात्री

या दोन सिरीजही पाहण्याजोग्या आहेत.

१. Homeland
२. Indian Summers

पगला गजोधर's picture

13 Dec 2017 - 9:35 am | पगला गजोधर

नुकतीच "ब्रॉडवॉक एम्पायर" नावाची सीरिअल, अमेरिकेतील
१०० वर्ष्यापूर्वी दारूबंदी या विषयाला मध्यवर्ती घेऊन सुरू झालीय, ती सुध्दा बघणेबल वाटतीये....

संजय पाटिल's picture

13 Dec 2017 - 1:47 pm | संजय पाटिल

गॉर्डी शोअर बद्दल कोणाला काही माहिती आहे काय? नक्की काय प्रकार आहे? तुनळी वर एक भाग बघीतला.. अतिशय व्हलगर वाटला..

कपिलमुनी's picture

13 Dec 2017 - 5:15 pm | कपिलमुनी

आपल्या भोवती आणि आपन बाळगत असलेल्या अनेक भ्रमाचा भोपळा फोडणारी मालिका !

नक्की बघा ! मज्जा येते

स्थितप्रज्ञ's picture

14 Dec 2017 - 4:19 pm | स्थितप्रज्ञ

हल्लीच प्रकाशित झालेली Moving Out नामक मराठी वेब सीरिज चांगली वाटली.

साबु's picture

14 Dec 2017 - 7:21 pm | साबु

Game of Throwns
Dexter
Prison Break
Person of interest
White Collar
House MD
The Good Wife
True Detective
Breaking Bad
Mentalist
Permanent room mates (Hindi)
The Tripling (Hindi)
The Night manager
Baked (Hindi)
Bang baja baarat (Hindi)
Pitchers (Hindi)
Sex chat with pappu and papa (Hindi)
Girl in the city (Hindi)

साबु's picture

28 Dec 2017 - 1:35 pm | साबु

जर्मन टिवी सिरिझ...based on womwhole and time travel. Good concept. available on Netflix.

मारवा's picture

28 Dec 2017 - 7:06 pm | मारवा

Steven Moffat आणि Mark Gatiss ची शेरलॉक ही अद्वितीय मालिका निव्वळ अप्रतिम आहे.
माझ्या माहीतीप्रमाणे १ वर्षाला केवळ ३ च भाग व मधला एक स्पेशल एपिसोड धरुन ७-८ वर्षात केवळ १३ मोजके भाग इतकीच निर्मीती केलेली आहे.
अभिनय स्टोरीज आर्ट डिरेक्शन केवळ दर्जेदार
ही सीरीज पाहीलेली नसल्यास एकवार अवश्य पाहावी ही आग्रहाची शिफारस
शेरलॉक चा सर्वस्वी आगळा अविष्कार
मॉडर्न टाइम्स ने मजा दुप्पट