शेजाऱ्याचा डामाडुमा - भारत आणि सख्खा शेजारी मालदीव - भाग १

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
9 Nov 2017 - 4:48 pm

प्रस्तावना:

माझ्या 'शेजाऱ्याचा डामाडुमा' (http://www.misalpav.com/node/38362) ह्या मालिकेतील नेपाळबद्दलची लेखमाला मिपावर बऱ्याच लोकांनी वाचली. काहींनी इथेच लेखांवर उत्साहवर्धक प्रतिक्रिया देऊन तर काहींनी व्यक्तिगत संदेश पाठवून लेखन आवडल्याचे सांगितले. इथे वाचून काहींनीं अन्य माध्यमांमध्ये लिहाल का अशी विचारणा केली. बरे वाटले, आनंद झाला.

यथावकाश पुढचा देश कोणता, पुढे कधी लिहिणार अशी प्रेमळ दटावणीही झाली. आज -उद्या करता करता बरेच दिवस झाले, लेखन काही पुढे सरकत नव्हते. आता लिहायला घेतो आहे, भारताच्या दुसऱ्या सख्ख्या शेजाऱ्याबद्दल - मालदीव बद्दल. नेपाळप्रमाणेच मी ह्या नितान्तसुंदर देशाच्याही प्रेमात आहे म्हणून नेपाळनंतर दुसरा नंबर मालदीवचा.

पहिला भाग आज प्रकाशित करत आहे. ह्या भागात फक्त काही चित्रे आणि संवाद ....

* * *

मी राहायला असलेल्या अतिमहागड्या रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर कलात्मक अक्षरात लिहिलेली पाटी :-
In this peaceful heaven, made from Kanuhura are:-
- The steps from your villa down to the water
- The child’s play desk overlooking white beach sand
- The mahogany clasp on your Heidi Klein bikini
- The old chess set at the Handhuvaru bar

(मी - ओक्के, कानुहुरा म्हणजे लाकूडच ना ?)

* * *

या या या ... तुमची बोट येण्याचीच वाट पाहत होते. थोडं बाहेरच थांबा, हा कलिंगड कापते आणि मग आमच्या ह्या बेटावर तुमचे 'ऑफिशियल' स्वागत करते. नाहीतर उगाच वादळ यायचे...

(मी - !)

* * *

सर, तुमच्या शरीराचे वजन ८ किलो जास्त आहे. त्या हनीमाधू बेटावर फार लोक जात नाहीत ना, म्हणून विमान छोटे ४ सीटचे आहे. ह्या विमानात तुम्हाला घेतले तर आम्हाला फातिमाऐवजी कोणी कमी वजनाची अटेंडंट घ्यावी लागेल. बघते मी, प्लिज वेट.

(मी - !!)

* * *

अरे आज नळाला पाणी नाही, काय चाललंय काय? लेट मी टॉक टू द गव्हर्मेंट. थांब, तुझ्या समोरच सरकारची खरडपट्टी काढतो. .... अगं आथिया, तुझं ते डिपार्टमेंट काय करतंय, झोपा काढताय काय तुम्ही मालेची लोकं ?

(मी - !!! )

* * *

अरे ये ना माझ्या साईट ला, अलीची बोट पाठवतो तुझ्यासाठी. मस्त मोठे बेट बनवतोय आम्ही समुद्रात. माझे ३ ड्रेझर आणि इंडोनेशियातली पूर्ण टीम आली आहे. रात्री तिथेच मुक्कामी राहू आणि पार्टी करू कामगारांसोबत.

(मी - ?)

* * *

ही माझी नॉर्वेजियन बायको, माझ्या ७ मुलांची प्रेमळ आई. पण हिचं अन माझ्या आईचं काही पटत नाही रे...एकमेकींची भाषा अजिबात येत नाही तरी रोज भांडतात. वैताग नुसता.

(मी - ??)

* * *

ओळख करून देतो सर - हे माझे ७ भाऊ माझ्यापेक्षा मोठे आहेत. आणि हे ६ माझ्यापेक्षा लहान. ही आम्हा ‘सर्वांची’ आई. हे ‘या सर्वांचे’ बाबा. माझ्या ‘एकट्याचे’ बाबा वेगळे आहेत पण ते दुसऱ्या बेटावर राहतात......

(मी - बापरे !)

* * *

हॅलो हॅलो ... खासदारसाहेब, माझ्या सुनेच्या डेलिव्हरीची वेळ जवळ आली. लवकर तुमची बोट पाठवा, हॉस्पिटलला न्यायचेय. मागच्या वेळी केला तसा उशीर करू नका नाहीतर बोटीतच बाळाचा जन्म होईल. आता पहाटेचे २ वाजलेत, ३च्या आधी बोट पोहचेल असे बघा.

(मी - ….. )

* * *

तुम्ही विदेशी टुरिस्ट लोकं, तुम्ही मजा करणार. सिंगल माल्ट काय, वाईन काय, बिअर काय... आम्ही पडलो अल्लाह के बंदे. पण काय करू, रसूल पाक बघतोय रे वरून, नको मला वाईन...... बरं दे थोडी - पण चहाच्या मोठ्या कपात दे, उगाच कोणी बघितले तर मला त्रास आणि तुलाही.

(मी - वा ! )

* * *

नाही, माझी गन काही तुझ्या हाती देता येणार नाही. कोणी पाहिले तर नोकरी जाईल माझी. मालदीवमध्ये आता सरकारी नोकऱ्या मिळणे किती कठीण आहे ते तुला माहित आहे ना ?

(मी - ….. )

* * *

दगडांचा हा ढीग म्हणतोस? अरे माझे आजोबा लहान असल्यापासून तो तसाच आहे. त्याच्याखाली बुद्धमंदिर आहे बहुतेक. जेंव्हा आमच्या ह्या लामू बेटावरच्या सर्व लोकांनी धर्म बदलला तेंव्हा ते मंदिर न तोडता त्यावर दगड रचण्याची आज्ञा आमच्या राधूननी दिली होती असे जुने लोक सांगतात ....

(मी :- !!!! तुमचा राधून म्हणजे राजा ना ?)

* * *

आमच्या देशाच्या प्रेसिडेंट नाशिदनी खोल समुद्रात पाण्याखाली कॅबिनेट मिटिंग घेतली गेल्या महिन्यात. सगळ्या जगातून पत्रकार आले होते कव्हर करायला. तुम्ही बघितला का तो सोहळा टी व्ही वर ?

(मी :- !!!!!)

* * *

हो, गेल्या सुनामीच्या वेळी हे नवे बेट तयार झाले समुद्रात. आता त्यावर आम्ही मत्स्योत्पादने निर्यात करण्यासाठी एक सेंटर बांधणार आहोत. पैसे बहुतेक ब्रिटिश सरकार देईल...

(मी:- वा !)

* * *

सुखातला जीव दुःखात घातला मी हे मंत्रिपद स्वीकारून, किती कटकट. बाहेरदेशी प्राध्यापकी करत होतो तेच बरे होते. तरी बरं मला राजकारणात काही इंटरेस्ट नाही ते.

(मी:- क्काय ?)

* * *

मी शक्य तेंव्हा येते ह्या गान बेटावर. माझे बाबा ब्रिटिश नेव्हीत असतांना इथे काही वर्षे होते. १९५७ मध्ये रॉयल नेव्हीने हा एयरबेस आमच्या ब्रिटिश रॉयल एरफोर्सला दिला तेंव्हा ते बेस कमांडिंग ऑफिसर होते इथे. लास्ट नेव्ही मॅन टू कमांड धिस स्मॉल ब्रिटिश बेस. माय होल फॅमिली फील्स सो कनेक्टेड टू मालदिव्स.

(मी :- कॅन अंडरस्टॅंड यंग ओल्ड लेडी ! )

* * *

आता कोणीच बोलत नाही त्याबद्दल, पण आमची एक पिढी बरबाद झाली हो ड्रगच्या व्यसनामुळे. मी त्यातून पूर्णपणे बाहेर पडलोय. आता ड्रगविरुद्धचे कायदे फार म्हणजे फारच कडक आहेत. तेच बरं आहे. आता खरे आव्हान म्हणजे धार्मिक कट्टरतेचे, पण त्याबद्दल जास्त बोलायची सोय नाही.

(मी :- काय बोलू ?)

* * *

तुमचे ते इंडियन दीडशहाणे लोक, आमच्या लोकांना सारखी अक्कल शिकवायला बघतात. अरे मी सुद्धा जग फिरलोय. माझ्यासारखी अशी राजेशाही बोट तुमच्या इंडियात काय स्वीडनमध्येही कोणाकडे नसेल.

(मी - ….. )

* * *

हे बघा, हे सुंदर ऑडिटोरियम आम्हाला चीनच्या सरकारने फुकट बांधून दिले, तेही फक्त ३ महिन्यात. आता ही कॉन्फरन्स संपली की फार कमी वापर होईल याचा. पण चिनी मॅनेजर राहील इथे, आजन्म.

(मी - ….. )

* * *

आई खूप आजारी आहे हो. इथल्या इंदिरा हॉस्पिटलचे डॉक्टर करून झाले. आता भारतात नेत आहे, शेवटी आम्हा मालदीवच्या लोकांना खरी मदत तुमच्याच देशात मिळते.

(मी - ….. )

* * *

टेंडरसाठीची सर्व कागदपत्रे तयार आहेत, आकडे रुफिया आणि डॉलर्समध्ये बरोबर भरले आहेत. आता तुम्ही मला चांगला मुहूर्त सुचवा, म्हणजे लतीफ हे बिड डॉक्युमेंट मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करायला घेईल. चांगल्या मुहूर्तावर सुरवात झाली तर काम माझ्या कंपनीला मिळेलच.

(मी :- अरे देवा ! )

* * *

चहा तर संपवा हो, थांबेल ते विमान तुमच्यासाठी, फोन केला आहे मी कंट्रोलरूमला.....

(मी - !!!!! )

* * *

हो, मलाच मालदीवचा शाहरुख खान म्हणतात. माझे सगळे सिनेमे सुपरहिट असतात. आजही 'धी' वर दाखवतील माझा हिट सिनेमा, त्यातली गाणी तुला पटकन ओळखता येतील. सेम टू सेम शाहरुख सारखी बसवली आहेत - सीन बाय सीन.

(मी - ….. क क क .....क्या बात है ! )

* * *

संसदेत आज थोडी मारामारी झाली म्हणून फाटला हा शर्ट. फार काही लागले नाही. चला आता आपल्या प्रोजेक्टच्या चर्चेला सुरवात करू या.

(मी - घरोघरी मातीच्या चुली )

* * *
क्रमश:

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

सुरवात तर रोचक झालीय, लवकर येऊ द्या..

अनिंद्य's picture

13 Nov 2017 - 1:01 pm | अनिंद्य

@ गंम्बा,
आभार.

जव्हेरगंज's picture

2 Oct 2019 - 12:32 am | जव्हेरगंज
अनिंद्य's picture

2 Oct 2019 - 9:44 am | अनिंद्य

@ जव्हेरगंज,
जय हो ! हे भारी काम केलं तुम्ही :-)

धर्मराजमुटके's picture

9 Nov 2017 - 5:04 pm | धर्मराजमुटके

पटापट आने दो बरं ! अफुची गोळी आणि हेरॉईनच्या धाग्यांनी पार डोके भंजाळून गेलेय. :)

टीप : धर्म म्हणजे अफूची गोळी असेल तर राजकारण म्हणजे हेरॉईन आहे.

अनिंद्य's picture

13 Nov 2017 - 2:47 pm | अनिंद्य

आभार.

अफूची गोळी.. हेरॉईन ..... बापरे !

मैत्रीपूर्ण सल्ला : - ट्राय स्टेइंग अवे फ्रॉम सबस्टन्स अब्यूझ :-)

कुमार१'s picture

9 Nov 2017 - 5:38 pm | कुमार१

छान सुरवात.
पु भा प्र .

अतिरोचक सुरूवात.
पुभाप्र.

आनन्दा's picture

9 Nov 2017 - 9:11 pm | आनन्दा

पुभाप्र

एस's picture

9 Nov 2017 - 9:28 pm | एस

वाव!

अनिंद्य's picture

13 Nov 2017 - 2:55 pm | अनिंद्य

एस,

नेपाळबद्दलच्या मालिकेत मी तुम्हाला खूपदा त्रास दिला - सारखे सारखे त्या फोटो प्रकरणात लिंक्स चुकवून :-)

ह्या भागात जेंव्हा चार-पाच पैकी दोन चित्रे डकवता आली तेंव्हा खूप आनंद झाला आणि तुमची आठवण सुद्धा. तुम्हाला उचक्या लागल्या असतील :-)

आभार.

अनन्त अवधुत's picture

9 Nov 2017 - 10:28 pm | अनन्त अवधुत

अजून एका शेजाऱ्याबद्दल नवीन काही कळणार तर.
नेपाळ प्रमाणे हि पण मालिका रंजकदार होऊ देत.

अनिंद्य's picture

13 Nov 2017 - 3:19 pm | अनिंद्य

@ अनन्त अवधुत,

आभार!

नेपाळ मालिकेस वेळोवेळी तुमचे प्रोत्साहन लाभले. मालदीवची कहाणी त्यापेक्षा बरीच वेगळी असली तरी बोर होणार नाही असे वाटते.

- अनिंद्य

अनिंद्य's picture

13 Nov 2017 - 3:19 pm | अनिंद्य

@ अनन्त अवधुत,

आभार!

नेपाळ मालिकेस वेळोवेळी तुमचे प्रोत्साहन लाभले. मालदीवची कहाणी त्यापेक्षा बरीच वेगळी असली तरी बोर होणार नाही असे वाटते.

- अनिंद्य

राघवेंद्र's picture

9 Nov 2017 - 11:11 pm | राघवेंद्र

इंटरेस्टिंग
पु भा प्र

तुषार काळभोर's picture

10 Nov 2017 - 8:13 am | तुषार काळभोर

मालदीवबद्दल जवळजवळ काहीच माहिती नाहीये, मालदीवचा इतिहास, जडणघडण, संस्कृती, भारताशी असलेले संबंध या सर्वांविषयी वाचायला आवडेल.

अनिंद्य's picture

14 Nov 2017 - 2:27 pm | अनिंद्य

@पैलवान,

इतिहास, जडणघडण,संस्कृती, एकमेकांशी संबंध ...

We are looking at the same stars in the wider sky ☺
ह्या सर्व विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न असेल.

अनेक आभार.

प्रचेतस's picture

10 Nov 2017 - 9:17 am | प्रचेतस

मस्त सुरुवात

अनिरुद्ध.वैद्य's picture

10 Nov 2017 - 10:54 am | अनिरुद्ध.वैद्य

सुरेख मालिका!! इतका संपर्क म्हणजे तुम्ही मालदीवमध्ये बराच काळ वास्तव्य केलंत का?

अनिंद्य's picture

14 Nov 2017 - 2:50 pm | अनिंद्य

आभार !

होय, मालदीवला अल्प-दीर्घ वास्तव्याच्या भरपूर भेटी झाल्या. एकवेळ अशी होती की तीन वर्षात १३ दा.

उपेक्षित's picture

10 Nov 2017 - 1:29 pm | उपेक्षित

वाचतोय

रुपी's picture

10 Nov 2017 - 11:38 pm | रुपी

मस्तच! छान सुरुवात.
याही देशाबद्दल छान माहिती वाचायला मिळणार!

अनिंद्य's picture

14 Nov 2017 - 3:04 pm | अनिंद्य

@ रूपी,

आभार.
तुमच्या अभिप्रायांचे, प्रश्नांचे आणि सूचनांचे स्वागत असेल.

तुमच्यासाठी म्हणून
- ह्यावेळी सर्वांचे योग्य त्या पानावर'' आभार व्यक्त करीन, चुकवणार नाही :-)

- अनिंद्य

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2017 - 2:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं रोचक सुरुवात ! या लेखनावरून मालदिवची आतल्या गोटासकट पूर्ण खबर मिळेल असे वाटते आहे... मागच्या मालिकेवरून तर तशी खात्रीच झाली आहेच म्हणा ! :)

अनिंद्य's picture

14 Nov 2017 - 3:18 pm | अनिंद्य

@ डॉ सुहास म्हात्रे,

तुमचे दिलखुलास प्रोत्साहन मिळाले की खूप बरे वाटते.
जालीय लेखनाच्या मर्यादेत आणि परिचितांची प्रायव्हसी जपून जे लिहिता येईल तेव्हढे लिहीनच.
लोभ असावा ही विनंती,

- अनिंद्य

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Nov 2017 - 12:23 am | डॉ सुहास म्हात्रे

पुढच्या भागाची प्रतिक्षा आहे. तुमच्या दृष्टीने शक्य असेल तेवढे सगळे तपशील द्या. जास्तीत जास्त फोटो टाका.

अनिंद्य's picture

13 Nov 2017 - 3:25 pm | अनिंद्य

@ कुमार१,
@ पुंबा
@ आनन्दा
@ राघवेंद्र
@ प्रचेतस
@ उपेक्षित

उत्साहवर्धनासाठी सर्वांचे आभार _/\_

आदूबाळ's picture

13 Nov 2017 - 4:14 pm | आदूबाळ

भारी! मालदीव्जबद्दल फार आत्मीयता वाटते. वाचतोय!

अनिंद्य's picture

14 Nov 2017 - 3:38 pm | अनिंद्य

@ आदूबाळ,

मालदीवबद्दल फार आत्मीयता वाटते.

- मलाही :-)

आभार.

राही's picture

13 Nov 2017 - 7:06 pm | राही

सुंदर सुरुवात. पुढील लेखनाच्या उत्कंठेत.
काही वर्षांपूर्वी ज्नानेश्वर मुळे मालदीवच्या भारतीय वकिलातीत मुख्याधिकारी होते तेव्हा मालदीववरची त्यांची लेखमाला वाचली होती. त्याच सुमारास मालदीवमध्ये सत्ताक्रांती होऊन भारतास थोडेसे अननुकूल असे नवे सरकार सत्तास्थानी आले. सध्या मालदीवशी आपले राजकीय, आर्थिक, लष्करी संबंध कश्या प्रकारचे आहेत हे जाणण्याची उत्सुकता आहे. ती पुढच्या लेखांतून पुरी होईलच. पुढील लिखाण लवकर येऊ दे.

विचित्रा's picture

15 Nov 2017 - 5:58 pm | विचित्रा

पुढचा भाग कधी? उत्सुकता वाढलीय.

पैसा's picture

15 Nov 2017 - 10:03 pm | पैसा

मस्त सुरुवात!

शलभ's picture

15 Nov 2017 - 10:09 pm | शलभ

मस्त सुरुवात..

निमिष ध.'s picture

17 Nov 2017 - 9:39 pm | निमिष ध.

मालदीव बद्दल खुप उत्सुकता आहे. तुमची नेपाळ ची लेखमाला मस्त झाली होती. ही पण लवकर लवकर टाका :)

अनिंद्य's picture

25 Nov 2017 - 2:27 pm | अनिंद्य

@ निमिष ध.,
आभार !

पुढचा भाग प्रकाशित करत होतो ३-४ दिवसापूर्वी पण प्रकाशित होण्यापूर्वी काहीतरी बिनसले. नंतर मिपा सुप्तावस्थेत गेले. :-(

अनिंद्य's picture

25 Nov 2017 - 2:32 pm | अनिंद्य

@ राही,
@ विचित्रा
@ पैसा
@ शलभ

उत्साहवर्धनासाठी तुम्हा सर्वांचे आभार !

अनिंद्य's picture

25 Nov 2017 - 2:35 pm | अनिंद्य

ज्यांनी माझी नेपाळ मालिका वाचली नसेल त्यांनी ह्या लेखाच्या प्रारंभी दिलेला दुवा उघडून अवश्य वाचावी असा आग्रह,

अनिंद्य

चौकस२१२'s picture

2 Oct 2019 - 4:38 am | चौकस२१२

मी तुमचा नेपाळ वरील लेख वाचला नाही, नक्की वाचीन, या लेखाची शैली आवडली.. वेगळी आहे

अनिंद्य's picture

2 Oct 2019 - 9:29 am | अनिंद्य

@ चौकस२१२,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
बरोबर. नेपाळची लेखमाला आणि मालदीवच्या ह्या लेखमालेतले लेखन वेगवेगळ्या 'फॉरमॅट'मध्ये आहे.

चौकस२१२'s picture

2 Oct 2019 - 9:40 am | चौकस२१२

२ गोष्टी सुचवावयास वाटतात
१) जर फार खाजगी नसेल तर आपण आय देशात कसे पोहोचलात काय कारणाने या संबंधी लिहा ( आपण बहुतेक तेथे काही कामानिमित्त गेलेल दिसतंय ) आखाती देशात आणि पाश्चिमात्य देशात तर अनेक भारतीय कामाला जातात आता त्यात काही विशेषसा नाही पण य देशात जरा क्वचितच म्हणून
२) स्वतःची (म्हणजे स्वतः काढलेली ) काही छायाचित्रे असतील तर जरूर टाका

ही मालिका ८ भागात २०१७ साली लिहिलेली आहे, आता बदल करता येत नाही.

जालीय लिखाणाच्या मर्यादेत राहून शक्य ते सर्व तपशील मी दिलेले आहेतच.