लोक स्वतःला सुंदर का समजतात?????

सिंथेटिक जिनियस's picture
सिंथेटिक जिनियस in काथ्याकूट
14 Nov 2017 - 4:55 pm
गाभा: 

लोक स्वतःला सुंदर का समजतात हा प्रश्न मला अनेक दिवसापासून पडला आहे. अग्दी कालपरवापर्यंत मी ही स्वतःला फार छान समजत होतो ,पण प्रत्यक्षात आपण दिसायला ॲवरेजही नाही हे लक्षात आले.इंटरनेटवर एक ॲप आहे ,त्यावर मी माझा फोटो अपलोड करुन ॲनालीसिस केल्यावर मी सुंदर तर सोडाच पण अगली (कुरुप) आहे असा त्या ॲपचा रिझल्ट होता जो मला आधीच माहीत होता.
स्वतःला सुंदर समजण्यात महीला आघाडीवर असतात .प्रत्येकीला वाटत असतं की आपण बर्फी आहोत.प्रत्यक्षात अशा मुली व महीला दिसायला ॲवरेजच असतात.पण नखरा असा असतो की साला दिपिका करीनाला कॉम्प्लेक्स देतील.
पुरुषही यात मागे नाहीत शीट कलर्ड स्कीन,सुटलेले पोट,केसांनी पुकारलेला असहकार असे असुनही वावर मात्र मिलिंद सोमन किंवा जॉन अब्राहम सारखा असतो.
खरच,का समजत असावेत लोक स्वतःला सुंदर??????

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

14 Nov 2017 - 5:26 pm | मराठी कथालेखक

लोक स्वतःला लेखक का समजतात हा प्रश्न मला अनेक दिवसापासून पडला आहे. अग्दी कालपरवापर्यंत मी ही स्वतःला फार चांगला लेखक समजत होतो ,पण प्रत्यक्षात आपण लिहायला ॲवरेजही नाही हे लक्षात आले.इंटरनेटवर एक ॲप आहे ,त्यावर मी माझा लेख अपलोड करुन ॲनालीसिस केल्यावर मी चांगले तर सोडाच पण जंक(बकवास) लिहितो आहे असा त्या ॲपचा रिझल्ट होता जो मला आधीच माहीत होता.
स्वतःला लेखक समजण्यात मिपाकर आघाडीवर असतात .प्रत्येकाला वाटत असतं की आपण फाडू लेखक आहोत.प्रत्यक्षात असे लेखक व कवी लिहायला ॲवरेजच असतात.पण जिलब्या अशा टाकतात की साला पुलं , वपूना कॉम्प्लेक्स देतील.
काथ्याकूट वाले यात मागे नाहीत.. पांचट जिलब्या ,फसलेले विडंबन ,कल्पनाशक्तीने पुकारलेला असहकार असे असुनही वावर मात्र रामदास किंवा रातराणी सारखा असतो.
खरच,का समजत असावेत लोक स्वतःला लेखक??????

जाऊ द्यात ना! ते synthetic genius अहेत, original genius नव्हे!

जाऊ द्यात ना! ते synthetic genius अहेत, original genius नव्हे!

वरच्या लिस्टमध्ये एक सुटलेलं पोट वगळता मला नाही वाटत बाकीच्या गोष्टींसाठी व्यक्ती स्वत: जबाबदार असतील.

इरसाल's picture

15 Nov 2017 - 10:19 am | इरसाल

अस कसं अस कसं,
ते म्हणताय ना मग ते असेल

निरंजन._.'s picture

16 Nov 2017 - 11:10 am | निरंजन._.

लोकं सतत तुमची टर उडवतात, घालून पाडून बोलतात, तरीही तुम्हाला असलं लिखाण करण्याचा उत्साह कसा राहतो??

mayu4u's picture

16 Nov 2017 - 1:19 pm | mayu4u

हा आयडी का बॅन झाला असावा?

नाखु's picture

16 Nov 2017 - 2:00 pm | नाखु

माहित नाही, आम्ही स्वतःला सुंदर समजतोच पण लेकिला,लेकाला, मित्राला सर्वांना जे जे निर्व्याज प्रेमळ आणि मनाने निष्कपट आहेत त्या सगळ्यांना सुंदर समजतोय

गोस्वामी तुलसीदास ने रामचरित मानस में लिखा है: ' मन मलीन तन सुंदर कैसे। विष रस भरे कनक घट जैसे।। ' बहुत गहरी बात है। यदि मन में मलिनता हो तो भला तन की सुंदरता किस काम की ? क्योंकि वह शरीर तो विष भरे स्वर्ण कलश के समान होगा

यावर विश्वास असलेला अंधश्रध्दाळू नाखु

सुबोध खरे's picture

16 Nov 2017 - 3:07 pm | सुबोध खरे

लोक स्वतःला सुंदर का समजतात-- अंधविश्वास.

सुबोध खरे's picture

16 Nov 2017 - 3:08 pm | सुबोध खरे

लोक स्वतःला सुंदर का समजतात-- अंधविश्वास.
आता हेच पहा ना. तुम्ही स्वतःला जिनियस समजता.

धर्मराजमुटके's picture

16 Nov 2017 - 3:21 pm | धर्मराजमुटके

चालायचचं. आपणच आपली लाल नाही केली तर दुसर्‍यांना काय पडलय ?