महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

शिवांबू कल्प विधी

Primary tabs

mantarang's picture
mantarang in जनातलं, मनातलं
14 Nov 2017 - 8:05 pm

=================================================

अस्वीकरण (डिस्क्लेमर) :

या लेखातील मजकूरासंबंधात मिसळपाव कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. खुद्द लेखकानेही मजकूरात "अनेक अतिशयोक्त गोष्टी आहेत" असे लिहिले आहे. लेखात असलेली कोणतीही कृती करण्यापूर्वी, योग्य त्या तज्ज्ञाकरवी तिची खात्री करून घेण्याची, पूर्ण जबाबदारी ती कृती करणार्‍यावर असेल.

: संपादक मंडळ

=================================================

सूचना : हा ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेला असल्यामुळे त्यामध्ये अनेक अतिशयोक्त गोष्टी आहेत त्यामुळे वाचकाने त्यातील अतिशयोक्तिंकडे दुर्लक्ष करून विषयाच्या गाभ्याकडे लक्ष दिले पाहिजे.
चरण 1 ते 4
हे पार्वती ! (भगवान शिव त्यांची पत्नी पार्वतीशी बोलतात.) जे ह्या पद्धतीचा अवलंब करतात ते त्यांची ध्यानधारणा व ह्या पद्धतीचे परिणाम यांचा आनंद मिळवू शकतात. त्यासाठी , काही विशिष्ट कृती करण्याचा व त्याचबरोबर काही विशिष्ट भांडी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवांबु हे सोने, चांदी, तांबे, पितळ, लोखंड, कथील, काच, माती, बांबू, हाडे, चामडे, किंवा केळीच्या पानांचा बनवलेला प्याला यांपासून बनवलेल्या भांड्यातून प्यायचे असते. स्वमूत्र वरील उल्लेख केलेल्या भांड्यांपैकी कोणत्याही एका भांड्यात गोळा करायला हवे आणि मग प्यायला हवे. मात्र, मातीची भांडी ही वापरासाठी सर्वोत्तम आहेत.
चरण 5
ह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने त्याच्या आहारातून खारट, तिखट पदार्थ टाळायला हवेत. त्याने अतिश्रम केले नाही पाहिजेत. त्याने संतुलित व हलका आहार घ्यायला हवा. त्याने जमिनीवर झोपले पाहिजे व स्वतःच्या इंद्रियांवर संयम ठेवला पाहिजे.
चरण 6
अशी प्रशिक्षित व्यक्ती, जेव्हा रात्रीचा तीन चतुर्थांश भाग पूर्ण झाला आहे (साधारण पहाटे तीन ते सहा दरम्यान) तेव्हा, सकाळी लवकर उठते व पूर्व दिशेला तोंड करून उभी राहते व मुत्र विसर्जन करते.
चरण 7
मुत्राच्या प्रवाहातील पहिला व शेवटचा भाग सोडून द्यायला हवा व मधला भाग गोळा करायला हवा. ही सर्वोत्तम पद्धत आहे.
चरण 8
ह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने फक्त स्वतःचे मुत्र वापरायला हवे; यालाच शिवांबुधारा असे म्हणतात. तसेच, ज्याप्रमाणे सापाच्या तोंडामध्ये व शेपटीमध्ये विष असते त्याचप्रमाणे मुत्राच्या प्रवाहातील पहिला व शेवटचा भाग हा हितकर नसतो.
चरण 9
शिवांबु हे एक दैवी अमृत आहे ! ते म्हातारपण व अनेक प्रकारचे रोग व आजार बरे करण्यास सक्षम आहे. ह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने प्रथम स्वतःचे मुत्र प्यायला हवे आणि मग ध्यान करायला सुरुवात करावी.
चरण 10
सकाळी उठल्यावर, चेहरा व तोंड पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःचे मुत्र स्वेच्छेने व आनंदाने प्यायला पाहिजे. सर्व प्रकारच्या जन्मापासून असणाऱ्या व्याधी पूर्णपणे बऱ्या होतील.
चरण 11
जर ही पद्धती सलग एक महिना अवलंबली, तर त्या व्यक्तीचे शरीर आतून पूर्णपणे स्वच्छ होईल. दोन महिन्यांनंतर सर्व इंद्रीयांमध्ये शक्ती व उत्साह निर्माण होईल.
चरण 12
जर ही पद्धती सलग तीन महिने अवलंबली, तर सर्व प्रकारचे आजार बरे होतील व सर्व दुःखे नाहीशी होतील. सलग पाच महिन्यांनंतर ती व्यक्ती पूर्णपणे निरोगी होईल व तिला दैवी दृष्टी प्राप्त होईल.
चरण 13
जर ही पद्धती सलग सहा महिने अवलंबली, तर ती व्यक्ती अतिशय हुशार होईल. सात महिन्यानंतर ती अतिशय बलवान होईल.
चरण 14
आठ महिन्यानंतर तीच शरीर सोन्यासारख तेजस्वी होईल व ते तेज कायमस्वरुपी असेल. सलग नऊ महिन्यानंतर क्षयरोग व कुष्ठरोगाचे निवारण होईल.
चरण 15
जर ही पद्धती सलग दहा महिने अवलंबली, तर ती व्यक्ती खरोखरच अतिशय तेजस्वी होईल व तिच्या शरीरावर एक प्रकारची चमक येईल. अकरा महिन्यानंतर ती व्यक्ती आतून व बाहेरून पूर्णपणे शुद्ध होईल.
चरण 16
जर ही पद्धती सलग एक वर्ष अवलंबली, तर ती व्यक्ती सूर्यासारखे तेज मिळवेल. दोन वर्षांनंतर, ती व्यक्ती पृथ्वी तत्वावर विजय मिळवू शकेल.
चरण 17
जर ही पद्धती सलग तीन वर्ष अवलंबली, तर ती व्यक्ती जल तत्वावर विजय मिळवू शकेल. चार वर्षांनंतर ती व्यक्ती अग्नी तत्वावर विजय मिळवू शकेल.
चरण 18
पाच वर्षांनंतर ती व्यक्ती वायू तत्वावर विजय मिळवू शकेल. सलग सात वर्षांनंतर ती व्यक्ती तिच्या अहंकारावर विजय मिळवू शकेल.
चरण 19
सलग आठ वर्षांनतर, ती व्यक्ती ब्रह्मांडातील पंचतत्वांवर विजय मिळवू शकेल. नऊ वर्षांनंतर ती व्यक्ती मृत्यूवरदेखील विजय मिळवू शकेल.
चरण 20
दहा वर्षांनतर, ती व्यक्ती हवेत तरंगू शकेल. अकरा वर्षांनंतर ती व्यक्ती तिच्या शरीरातील अंतर्गत अवयवांच्या हालचाली ऐकू शकेल.
चरण 21
सलग बारा वर्षांनंतर, ती व्यक्ती चंद्र व ग्रह आहेत तोपर्यंत जगू शकेल. धोकादायक प्राणी उदा. साप, तिला काहीही अपाय करू शकणार नाहीत; सापाच विष तिला मारू शकणार नाही. ती व्यक्ती पाण्यावर लाकडाप्रमाणे तरंगू शकेल व ती कधीही बुडणार नाही.
चरण 22, 23
हे देवी ! मी तुला ह्या पद्धतीचे काही इतर पैलू सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐक. जर शिवांबु व गुळवेल (गुडूची) (Tinospora condifalia) ची पूड एकत्र करून सलग सहा महिने घेतली तर ती व्यक्ती सर्व आजारांपासून मुक्त होईल व ती पूर्णपणे आनंदी होईल.
चरण 24
हरीतकी (हिरडा) (Terminalia chebula) ची पूड व शिवांबु एकत्र करून सलग एक वर्ष घेण्यामुळे आजार व म्हातारपण येत नाही व जर सलग एक वर्ष घेतली तर ती व्यक्ती अतिशय बलवान आणि निरोगी होईल.
चरण 25
शिवांबु एक ग्रॅम गंधकाबरोबर घ्यायला हवे. असं जर सलग तीन वर्षे केलं तर ती व्यक्ती चंद्र व ग्रह आहेत तोपर्यंत जगू शकेल. तिचे मल व मुत्र पांढरे व सोनेरी होईल.
चरण 26
शिवांबु कोष्ठ चुर्णाबरोबर सलग बारा वर्षे घ्यायला हवे. त्यामुळे म्हातारपणाच्या खुणा जस की त्वचेवरील सुरकुत्या व पांढरे केस इ. नाहीशा होतील. त्या व्यक्तीकडे दहा हजार हत्तींचे बळ येईल व ती चंद्र व ग्रह आहेत तोपर्यंत जगू शकेल.
चरण 27
जर काळी मिरी, हरीतकी (Terminalia chebula )व बिभितकी (बेहडा) (Terminalia bellerica) यांचे मिश्रण शीवांबु सोबत घेतले तर त्या व्यक्तीच्या शरीरावर दैवी तेज व चकाकी येईल.
चरण 28, 29
गंधक व अभ्रक यांचा अर्क शीवांबु मध्ये एकत्र करून नियमितणे घ्यायला हवा. त्यामुळे जलोदर व संधिवातासंदर्भातील सर्व आजार बरे होतील. ती व्यक्ती तेजस्वी व बलवान होईल.
चरण 30
जी व्यक्ती शीवांबूचं सेवन नियमितणे करते व आहारातून तिखट, खारट आणि आंबट पदार्थ टाळते, ती निश्चितपणे तिची ध्यानधारणा व ह्या पद्धतीचे चांगले परिणाम मिळवू शकते.
चरण 31
ती व्यक्ती सर्व आजारांपासून मुक्त होते. तिला भगवान शंकरासारखी शरीरयष्टी मिळेल.
चरण 32
जी व्यक्ती नियमितणे शीवांबू पिऊन मग ध्यान करते व कडुनिंबाच्या पानांचा रस पिते, ती निश्चितपणे एका योगीचा दर्जा मिळवेल व आनंदी जीवन जगेल.
चरण 33
कडुनिंबाच्या सालीची पूड व भोपळ्याची पूड शिवांबुमध्ये एकत्र करून सलग एक वर्ष घेतली तर सर्व प्रकारचे आजार दूर होतील.
चरण 34
कमळाची मुळे, मोहरी व मध यांचे मिश्रण शिवाबूं सोबत घ्यायला हवे. त्यामुळे त्या व्यक्तीचे शरीर अतिशय हलके व उर्जावान बनेल.
चरण 35
मोहाच्या झाडाची फळे व चरण 27 मधील औषधी पदार्थांचे मिश्रण सम प्रमाणात घेऊन शीवांबु सोबत घ्यायला हवे. त्यामुळे म्हातारपण व सर्व प्रकारचे रोग बरे होतील.
चरण 36
सैंधव मीठ व मध सम प्रमाणात घेऊन सकाळी लवकर खायला हवे व मग शीवांबु प्यायला हवे. त्यामुळे ती व्यक्ती तेजस्वी होईल व तिचे शरीर दैवी गुणांनी युक्त होईल.
चरण 37
गंधक, आवळ्याची पूड व जायफळ पूड एकत्र करून दररोज खावी व नंतर शीवांबु प्यावे. सर्व वेदना व दुःखे नाहीशी होतील.
चरण 38
ह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने नियमितपणे गाईचे दूध व शीवांबु प्यायला हवे. जर असे सलग सात वर्षे करण्यात आले तर सर्व आजार दूर होतील व ती व्यक्ती सुदृढ होईल.
चरण 39
जी व्यक्ती प्रथम गुळवेल (गुडूची) (Tinospora condifalia) ची पूड खाते व नंतर शीवांबु पिते, ती मृत्यूला हरवू शकेल.
चरण 40
जी व्यक्ती सलग सहा महिने शीवांबु आणि मध किंवा साखर यांचे मिश्रण पिते, तिचे सर्व प्रकारचे आजार दूर होतील. तिची बुध्दीमत्ता वाढेल व आवाज मधुर होईल.
चरण 41
सुंठ पूड प्रथम खावी व नंतर शीवाबूं प्यावे, त्यामुळे निश्चितपणे कोणताही आजार बरा होईल.
चरण 42
जी व्यक्ती प्रथम निर्गुडी (Vitex Nirgundi) ची पाने चावून खाते व नंतर शीवांबु पिते, तिला दैवी दृष्टी प्राप्त होईल.
चरण 43
मनशीळची पूड व शीवांबु नीट एकत्र करायला हवे व हे द्रावण शरीराला लावायला हवे, त्यामुळे सर्व आजार दूर होतील व त्या व्यक्तीचे केस पुन्हा काळे होतील.
चरण 44
हे पार्वती ! आता, मी तुला शीवांबूने करायच्या मालिश बद्दल सांगणार आहे. जर अश्या प्रकारे मालिश केली गेली तर ती व्यक्ती तिच्या ध्यानधारणेचे व जीवनशैलीचे चांगले परिणाम मिळवू शकेल.
चरण 45
शीवांबु हे एका मातीच्या भांड्यात घेऊन त्याच्या एकूण प्रमाणाच्या एक चतुर्थांश भाग होई पर्यंत उकळून आटवायला हवे. व ते थंड होऊ द्यावे. हा अर्क मालिशसाठी वापरता येऊ शकतो.
चरण 46
शीवांबुचा वापर करताना पुढील मंत्रांच उच्चारण केलं पाहिजे. मातीच्या मडक्यात मुत्र गोळा करताना पुढील मंत्राच उच्चारण केलं पाहिजे : "ओम ह्रीम क्लिम भैरवाय नमः" ( भैरवाला नमस्कार ). शीवांबूने भरलेलं ते भांड नंतर हातात घ्यायला पाहिजे. स्वमुत्र पिताना पुढील मंत्राच उच्चारण केलं पाहिजे : "ओम श्रीम क्लीम उड्डमनेश्वराय नमः" (उड्डमनेश्वराला नमस्कार ). ती व्यक्ती सर्व कमतरता व पापांपासून मुक्त होईल.
चरण 47
मुत्र विसर्जित करताना पुढील मंत्राच उच्चारण केलं पाहिजे : "ओम सर्वम सृष्टी प्रभावे रुद्राय नमः" (रुद्र देवाला नमस्कार ).
चरण 48
शीवांबु सर्वांगाला लावायला हवे. ते अत्यंत पोषक आहे व सर्व आजार बरे करू शकते.
चरण 49
ह्या प्रक्रियेदवारे ती व्यक्ती दैवी शक्ती मिळवू शकते. योगी व्यक्ती देवांचा राजा होऊ शकेल. त्याच्या हालचालींना कोणीही प्रतिबंध करू शकणार नाही. त्याच्याकडे दहा हजार हत्तींचे बळ येईल. ती काहीही खाऊन पचवू शकेल.
चरण 50
जे मुत्र त्याच्या एकूण प्रमाणाच्या एक चतूर्थांश भाग उकळून आटवलेले नाही असे मुत्र कधीही शरीराला लावले नाही पाहिजे; आणि जर लावले तर शरीर कमजोर होते व आजार होऊ शकतात.
चरण 51
बिन उकळलेले मुत्र कधीही शरीराला मालिश करण्यासाठी लावले नाही पाहिजे. जर शीवांबुचा अर्क मालिश करण्यासाठी वापरला तर ते शरीरासाठी खूप आरोग्यकारक असते. ती व्यक्ती अनेक गोष्टी मिळवू शकते.
चरण 52
दररोज शीवांबुच्या अर्काने मालिश करून व शीवांबु पिऊन ती व्यक्ती मृत्यूवर विजय मिळवू शकेल.
चरण 53
त्याच्या मल व मुत्राचा रंग सोनेरी होईल. जर शिरो-अमृत व दव शीवांबुच्या अर्कामध्ये एकत्र केले व ते मिश्रण शरीराला लावले तर ती व्यक्ती अतिशय बलवान होईल व सर्व आजार बरे होतील.
चरण 54
ह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने सलग तीन वर्षे नियमितपणे दररोज सकाळी उठल्यावर शीवांबु प्यायला हवे. असे केल्यामुळे व आहारातून कडू, तिखट व खारट पदार्थ टाळल्यामुळे ती व्यक्ती सर्व तीव्र भावनांवर विजय मिळवू शकेल.
चरण 55, 56
हरभरे भाजायला हवेत व unrefined साखरे सोबत खायला हवेत व नंतर शीवांबु प्यायला हवे. शीवांबुचा अर्क देखील शरीराला लावायला हवा. सहा महिन्यांनंतर त्या व्यक्तीचे शरीर हलके व ऊर्जावान होईल.
चरण 57
हे पार्वती ! पान पिंपरीची मुळे व एक ग्रॅम काळी मिरी प्रथम खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. एका महिन्यात त्या व्यक्तीचा आवाज मधुर होईल व सर्व आजार बरे होतील.
चरण 58
ह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने प्रथम सुंठ पूड खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. त्यामुळे ती व्यक्ती खूप बलवान होईल. त्या व्यक्तीच तारुण्य सर्वांना आकर्षित करेल.
चरण 59
हरितकी (Terminalia chebula) भाजायला हवा व मग त्याची पूड करायला हवी. ही पूड प्रथम खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. त्या व्यक्तीच शरीर शुध्द होईल, त्याचं मन नेहमी आनंदी राहील.
चरण 60
जी व्यक्ती गुळवेल (गुडूची), त्रिफळा, कडू , सुंठ पूड, जिरे व पान पिंपरिची मुळे या सर्व वस्तूंची पूड एकत्र करून प्रथम खाते व नंतर शीवांबु पिते त्याचप्रमाणे भात व गाईचे दूध असा आहार घेते तिला एक वर्षात सर्व ग्रंथाचं ज्ञान प्राप्त होईल.
चरण 61
जर हा प्रयोग सलग एक वर्ष केला तर ती व्यक्ती खूप बलवान व शुर होईल. ती तिच्या ध्यानधारणेचे चांगले परिणाम मिळवू शकेल व ती एक चांगला वक्ता होईल. ती संपूर्ण ब्रह्मांड तिच्या डोळ्यांनी पाहू शकेल.
चरण 62
जी व्यक्ती शीवांबू व शरपुंख (देवनळ) वृक्षाच्या पाच भागांची पूड एकत्र करून ते मिश्रण पिते, ती व्यक्ती ध्यानधारणेमध्ये प्राविण्य मिळवेल व तज्ज्ञ होईल. ती व्यक्ती आयुष्यात जास्तीत जास्त आनंद मिळवेल.
चरण 63, 64
हे देवी ! शीवांबू हे सुंठ पूड, साखर, तूप, मध व निर्गुडीच्या पानांचा रस यासोबत प्यायला हव.एक महिन्यानंतर त्या व्यक्तीच शरीर निरोगी व बलवान होईल व एक वर्षानंतर ती व्यक्ती ध्यानधारणा व या पद्धतीचे चांगले परिणाम मिळवू शकेल. (तूप व मध कधीही सम प्रमाणात घेऊ नये कारण ते विषासमान असते. तूप व मधाचे प्रमाण नेहमी 2:1 असे असावे. त्याचप्रमाणे मध कधीही गरम करू नये कारण गरम मध विषसमान असते.)
चरण 65
काळे व पांढरे तीळ सम प्रमाणात घ्यावे, त्यामध्ये करंज बिया व कडुनिंबाच्या पानांचा रस एकत्र करावा. हे सर्व मिश्रण आधी खावे व नंतर शीवांबु प्यावे. असे केल्याने
ती व्यक्ती ध्यानधारणा व या पद्धतीचे चांगले परिणाम मिळवू शकेल.
चरण 66, 67
अफू आगीवर भाजायला हवे ; व ते शीवांबुच्या 1/32 या प्रमाणात घ्यायला हवे. ती व्यक्ती वीर्यपातावर ताबा मिळवू शकेल. ती व्यक्ती तिचा श्वास, तीव्र इच्छा, राग व इतर भावनांवर संयम मिळवू शकेल. ती व्यक्ती दीर्घायुषी होईल.
चरण 68
हे देवी ! त्रिफळा चुर्ण, निर्गुडीची पाने व हळद एकत्र करून खायला हवे व नंतर शीवांबू प्यायला हवे. तीन महिन्याच्या आत त्या व्यक्तीची दृष्टी सुधारेल. ती तेजस्वी होईल.
चरण 69
भृंगराज व मध एकत्र करून खायला हवे व नंतर शीवांबु प्यायला हवे. सहा महिन्यांनंतर ती व्यक्ती म्हातारपणापासून मुक्त होईल व तिची दृष्टी सुधारेल.
चरण 70
कडुनिंबाची साल, चित्रकाची (Plumbago Zeylancia) मुळे व पान पिंपरीची मुळे यांची पूड एकत्र करून ती पूड शीवांबु बरोबर घ्यावी. सहा महिन्यांनंतर त्या व्यक्तीला दैवी शक्ती मिळतील.
चरण 71
अपामार्गची (आघाडा) (Achyranthus Aspara)मुळे, चक्रमर्द (टाकळा) व कडुनिंबाच्या पानांचा रस एकत्र करून प्रथम खायला हवा व नंतर शीवांबु प्यायला हवे.
चरण 72
त्या व्यक्तीचे सर्व आजार बरे होतील. त्याची दृष्टी सुधारेल, ती अनेक मैल अंतरावर असलेल्या गोष्टी पाहू शकेल.
चरण 73
त्याला खूप लांब अंतरावरील आवाज ऐकू येतील. त्याला दुसऱ्यांच्या मनात काय आहे हे ओळखता येईल. सर्व व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित होतील.
चरण 74
खूप कमी प्रमाणात (एक ग्रॅम) कण्हेर शीवांबु बरोबर घ्यावी. एक वर्षात अपस्मार (epilepsy) व इतर मानसिक आजार बरे होतील.
चरण 75
पांढऱ्या गुंजाचा(Abrus Precatorius) रस, शरपुंखाची (देवनळ) पाने, चक्रमर्दच्या (टाकळा) बिया व महालुंगची मुळे हे सर्व सम प्रमाणात घ्यावे व त्याची बारीक पूड करावी.
चरण 76, 77
ही पूड शीवांबु मध्ये मिसळावी व ह्या मिश्रणाच्या बारीक गोळ्या बनवाव्यात. दररोज एक गोळी खावी व नंतर शीवांबु प्यावे. एक महिन्यात ती व्यक्ती सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्त होईल.
चरण 78
वडाच्या झाडाचा डिंक व करंजाच्या बियांची पूड एकत्र करावी. अगदी थोड्या प्रमाणात अफू त्यामध्ये मिसळावे. हे सर्व मिश्रण सकाळी उठल्यावर लवकर खावे व नंतर शीवांबु प्यावे.
चरण 79
सहा महिन्यांत ती व्यक्ती सोळा वर्षांच्या मुलाइतकी तरुण होईल.
चरण 80
कावळीच्या पानांचा रस, मध, साखर व तूप एकत्र करावे. हे मिश्रण सकाळी लवकर खावे व नंतर शीवांबु प्यावे. म्हातारपणाच्या सर्व खुणा नाहीशा होतील.
चरण 81
जिरे, हळद व पांढरी मोहरी एकत्र करून त्याची पूड करायला हवी व हे मिश्रण दररोज खावे. यामुळे देखील म्हातारपण लवकर येत नाही.
चरण 82
शेवगा, जटामांसी व मोहरी, मध व तुपाबरोबर एकत्र करावे व रोज खावे. त्यामुळे दैवी चेहरेपट्टी मिळेल.
चरण 83
गुग्गुळ व भर्गिका (भरंगी)(Clerodendron Serrotum)ची मुळे लोण्यामध्ये एकत्र करून शीवांबु सोबत घ्यायला हवी. त्यामुळे नक्कीच चमकदार चेहरेपट्टी मिळेल.
चरण 84
जलकेशर शेवाळ व रिठाच्या बिया शीवांबुमध्ये मिसळावे व नियमितपणे घ्यावे. एक वर्षात म्हातारपण कमी होईल व त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होईल.
चरण 85
हे देवी! जी व्यक्ती रोज सकाळी शीवांबूने नेती करेल त्या व्यक्तीला कफ, पित्त व वाताने होणारा कोणताही आजार होणार नाही. तिचे त्रिदोष संतुलित होतील.
चरण 86
जर त्या व्यक्तीने रोज शीवांबूने तीनदा मालिश केली तर ती व्यक्ती नक्कीच दीर्घायुषी होईल.
चरण 87
हे देवी ! रोज तीन वेळा मालिश केल्याने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चमक येईल व तिचे हृदय निरोगी राहील. तिचे शरीर व स्नायू बलवान होतील.
चरण 88
हे पार्वती ! जी व्यक्ती शीवांबूने रोज कमीत कमी एकदा मालिश करेल ती बलवान व शुर होईल.
चरण 89
तीन वर्षात त्या व्यक्तीच शरीर तेजस्वी होईल. ती व्यक्ती कला व शास्त्रामध्ये निपुण होईल. त्या व्यक्तीचा आवाज मधुर होईल व वकृत्व कलेमध्ये निपुण होईल.
चरण 90
हे देवी ! आता, मी तुला ऋतु प्रमाणे कसे वर्तन करावे ते सांगणार आहे, जेणे करुन आजार होणार नाहीत.
चरण 91
हे पार्वती ! वसंत ऋतू मध्ये हरितकीची पूड मधासोबत घ्यायला हवी; सुंठ पूड व मध देखील घ्यायला हव व नंतर शीवांबु प्यायला हवे.
चरण 92
कफामुळे होणारे वीस प्रकारचे आजार, पित्तामुळे होणारे चोवीस प्रकारचे आजार व वातामुळे होणारे ऐंशी प्रकारचे आजार ह्या पद्धतीमुळे बरे होतील.
चरण 93
हे देवी ! वसंत ऋतू मध्ये तिखट व मसालेदार पदार्थ टाळायला हवेत जेणेकरून आरोग्य चांगले राहील.
चरण 94, 95
हे देवी ! ग्रीष्म ऋतूत हरीतकी व काळी मिरी पूड सम प्रमाणात घेऊन unrefined साखरे सोबत खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. त्यामुळे सर्व रोग बरे होतील; शरीर हलके होईल, दृष्टी तीक्ष्ण होईल व ती व्यक्ती ह्या पद्धतीचे फायदे मिळवू शकेल.
चरण 96, 97
वर्षा ऋतूत ( जुलै व ऑगस्ट) हरितकी, सैंधव मीठ व काळीमिरीची मुळे या सर्वांची पूड एकत्र करून खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. त्यामुळे त्या व्यक्तीचे शरीर निरोगी होईल. जर त्या व्यक्तीने वरील मिश्रण दुधासोबत घेतले तर आग देखील तिला हानी पोहोचवू शकणार नाही.
चरण 98, 99
शरद ऋतूत (सप्टेंबर व ऑक्टोबर) हरितकी, खडीसाखर व
बिभितकीची पूड एकत्र करून खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. यामुळे शरीर शुद्ध होईल व आजार होणार नाहीत. हे पार्वती ! ती व्यक्ती यौगिक क्रियांमध्ये सहजतेने प्राविण्य मिळवू शकेल.
चरण 100, 101
हेमंत ऋतूत (नोव्हेंबर व डिसेंबर) सुंठ पूड, आवळ्याची पूड व हरितकीची पूड एकत्र करून खायला हवी व नंतर शिवांबु प्यायला हवे. जर हे मिश्रण नियमितपणे घेतले तर शरिरातील
खनिजांची कमतरता भरून निघेल, दृष्टी तीक्ष्ण होईल, वक्तृत्व कला व ज्ञान वाढेल.
चरण 102, 103
शिशिर ऋतूत (जानेवारी व फेब्रुवारी) काळी मिरी पूड, हरितकीची पूड व सुंठ पूड एकत्र करून खायला हवी व नंतर शिवांबु प्यायला हवे. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार बरे होतील व ती व्यक्ती सर्व सजीवांना आकर्षित करेल.
चरण 104, 105, 106
हे देवी ! ह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्या व्यक्तीने पुढील पदार्थ टाळायला हवे: शेंगा, पोटातील वात वाढवणारे अन्न, पिष्टमय पदार्थ, तिखट, आंबट, खारट पदार्थ. त्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करायला हवे. त्यामुळे ह्या पद्धतीचे सर्व फायदे मिळतील. ह्या नियमांच्या विरुद्ध वागण्याने त्या व्यक्तीला अनपेक्षित त्रास सहन करावे लागतील.
( लग्न न करणे म्हणजे ब्रह्मचर्य नव्हे, तर मनाला वाटेल तसे लहरीपणे न वागणे व इंद्रियांवर संयम ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य होय.)
चरण 107
हे पार्वती ! मी तुला शिवांबू कल्प विधीचे सर्व तपशील सांगितले आहेत. ही पद्धती गुप्त ठेवण्याचे प्रयत्न केले गेेले पाहिजे. कोणालाही सांगू नकोस.

आरोग्यआरोग्य

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

14 Nov 2017 - 8:18 pm | कपिलमुनी

ही पद्धती गुप्त ठेवण्याचे प्रयत्न केले गेेले पाहिजे. कोणालाही सांगू नकोस.

गुप्त माहिती अशी सार्वजनिक केलीत !
कसे व्हायचे आता ??

बाकी काय होईल ते सांगितलं आहे . का होईल ? ते सांगितले नाही त्यामुळे पास

बाकी काय होईल ते सांगितलं आहे . का होईल ? ते सांगितले नाही

हाच प्रॉब्लेम आहे. "बहुगुणी शिवांबू" आणि अशीच एक दोन पुस्तके वाचली आहेत. मुख्य औषधासोबतच शिवांबू चिकित्सा सुरू केली मात्र शिवांबू मुळे सगळा गुण आला असे लिहिले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2017 - 9:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

सद्यकाळात, केवळ एखाद्या जुन्या-नव्या ग्रंथात काहीबाही लिहिले आहे इतक्याच भांडवलावर, केलेले दावे... विशेषतः शास्त्रिय विषयातले दावे (जसे इथे या विधीपासून होणार्‍या वैद्यकीय/शारिरीक परिणामांचे दावे केलेले आहेत)... खरे मानले जाणार नाहीत, खरे मानले जाऊ नयेत..

ते दावे आधुनिक शास्त्रिय नियमांना अनुसरून संशोधन करून सिद्ध झाले तरच स्विकारणे योग्य होईल... अन्यथा, ते केवळ चूक असू शकतात इतकेच नव्हे तर त्यांच्यावर आधारीत केलेली कृती धोकादायक ठरू शकते.

म्हणुन, अशा विषयासंबधीचे लेखन योग्य त्या धोक्याच्या सूचनेसह करणे योग्य होईल.

ज्योति अलवनि's picture

15 Nov 2017 - 1:43 pm | ज्योति अलवनि

+1

हजारो वर्शान्पुर्वी ग्रन्थ कसे लिहीत असत?

कंजूस's picture

15 Nov 2017 - 5:51 am | कंजूस

बरीच माहिती दिली आहे.

जे अतिशयोक्तिपूर्ण परिणाम आहेत त्यातून फक्त शरीर निरोगी होईल इतकाच अर्थ घ्यायचा.
मुख्य म्हणजे शिवांबु नसले तरी दिलेली औषधे ही 'संशोधन करून सिद्ध झालेली' आहेत ती घेतली जातातच.
१) त्रिकटु चूर्ण
२) त्रिफळा चूर्ण

प्राची अश्विनी's picture

15 Nov 2017 - 7:49 am | प्राची अश्विनी

यातले सारी अतिशयोक्ती जाऊ द्या. पण माझ्या आजोबांचा अनुभव सांगते. ब्रिटीश कालात ते फौजदारी वकिली करत. तेव्हा क्रांतीकारक किंवा इतर गुन्हेगारांना माहिती काढून घेण्यासाठी थर्ड डिग्री देत असत. त्यात कपडे काढून मिरच्यांची धुरी देत. भयंकर प्रकार होता तो. पण ते सहन व्हावं किंवा नंतर त्याचा त्रास होऊ नये म्हणून हे सर्व लोक शिवांबु घेत. त्याने होणारी आग थांबत असे. आणि ते माहिती देत नसत.
कधीतरी हे पोलिसांना समजले तेव्हा त्यांनी यांचे हात बांधायला सुरवात केली. शिवांबु घेता येऊ नये म्हणून. मग मात्र तो त्रास असह्य होऊन कैदी माहिती देत.

आनन्दा's picture

15 Nov 2017 - 8:03 am | आनन्दा

मध्यंतरी ऑटो युरिन थेरपी म्हणून एक प्रकार वाचला होता..
त्यांचे म्हणणे असे होते की आजारी माणसांच्या आजारांचे antigen त्या माणसाच्या मूत्रात सापडतात, त्यामुळे ते मूत्र consume केल्यास antibody च्या निर्मितीस चालना मिळते.. यावर डॉक्टरांनी थोडा प्रकाश टाकावा

चामुंडराय's picture

15 Nov 2017 - 8:38 am | चामुंडराय

सोयाम्बू (soya-bamboo) पिलो ची जाहिरात लागली कि मला सोयाम्बू ऐवजी शिवाम्बू च ऐकू येतं आणि मग मी तातडीने पुढच्या चॅनेलवर सर्फुडी मारतो.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Nov 2017 - 12:36 pm | अत्रुप्त आत्मा

@(soya-bamboo) http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

अनन्त्_यात्री's picture

15 Nov 2017 - 9:22 am | अनन्त्_यात्री

..... with a pinch of salt.

नावातकायआहे's picture

15 Nov 2017 - 9:30 am | नावातकायआहे

and dash of lime...

एवढं केल्यानंतर एव्हरेस्टची जलजीरा पावडर पण टाकून द्या त्यात, हाकानाका. होऊ दे खर्च!! ;)

रामपुरी's picture

15 Nov 2017 - 10:29 pm | रामपुरी

and some flavored ice cubes....

कपिलमुनी's picture

16 Nov 2017 - 12:21 pm | कपिलमुनी

add a tequila shot !!