पतीची आरती

शीतल डोळस's picture
शीतल डोळस in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

Header2

गणपतीबाप्पा गेले आणि सकाळ-संध्याकाळच्या पूजा, आरत्या, घंटानाद, सगळे बंद झाले. घर एकदम शांत शांत झाले. मी गमतीने बायकोला म्हणालो, "अगं, गणपती वर्षातून फक्त १० दिवस येतो, तरी तू इतक्या मनोभावे सकाळ-संध्याकाळ त्याची आरती करतेस. मी तुझा गणपती नसलो, तरी'पण'पती आहे, पण तू कधी माझी आरती केली नाहीस." त्यावर बायकोने तिरस्कारिक नजरेने बघून "आरती? अन तुमची? तोंड बघा आरशात!" असे खेकसून वर "झोपा आता गुपचूप" असा आदेश दिला.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून येऊन बघतो, तर बायको ताम्हण, निरांजन आणि घंटा घेऊन दारात उभी. तिने चक्क माझ्यावर आरती केली होती, ती अशी :

।। पतीची आरती ।।
खूप चरता, झक मारता, घोरता नुस्तेची।
एरवी तेरवी पेग रिता होईची।
सर्वांगी लोंबते लटी चरबीची।
तोंडी तळके माल, मज्जा भेळेची।।१।।

सदैव निद्रैव, लै चंगळ करशी।
रेकिती चंगळ करशी।
दणकून खाशी पण कामं ना करशी।
सदैव निद्रैव।।धृ।।

रत्न क्वचित जरा मज देई भ्रमरा।
दागिन्यांची पेटी भरू दे ना जरा।
का रे बजेट बघत बसतो पोरा।
जन म्हणती कद्रू रे चेंगट सावरिया।।२।।

तोंडावर पावडर कधीतरी लाव ना।
टकलं, व्हंडं, वक्रतोंडबघवेना।
वासमदिरेचा सुटलाहेवदना।
चकाटी पिटावे, बिर्याणी भक्षावे, ढेकरदेपुन्हा।।३।।

Footer

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

18 Oct 2017 - 8:11 am | गुल्लू दादा

लय भारी बनवली हो..;)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2017 - 5:46 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ही ह्ही ही. आता पत्निची आरती लिहिणे आले! ;)

जव्हेरगंज's picture

18 Oct 2017 - 7:25 pm | जव्हेरगंज

=)))))

अगदी तालासुरात म्हणून बघितली!!!

जमलीय एक नंबर!!!

एस's picture

18 Oct 2017 - 11:50 pm | एस

=)))))))))

गामा पैलवान's picture

19 Oct 2017 - 5:23 pm | गामा पैलवान

गणपतीच्या आरतीचं विडंबन आवडलं नाही. दुसरं एखादं गाणं विडंबबायला हवं होतं.
-गा.पै.

पद्मावति's picture

20 Oct 2017 - 11:37 am | पद्मावति

=)) मस्तंय.

चौथा कोनाडा's picture

10 Nov 2017 - 1:18 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

10 Nov 2017 - 1:19 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

10 Nov 2017 - 1:19 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

10 Nov 2017 - 1:19 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

10 Nov 2017 - 1:20 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

10 Nov 2017 - 1:27 pm | चौथा कोनाडा