चार कोटी रुपये .......

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
7 Nov 2017 - 10:52 pm
गाभा: 

गाभा:

चार कोटी रुपये .......
"शेअर मर्केटमधून पैशांचा पाऊस ! भोंदू ब्रोकरने व्यावसायिकाना चार कोटी रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी कोल्हापूर म.टा.(०१-११-२०१७) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:-
कोल्हापुरात अनेक डॉक्टर आहेत. ते डॉ. असणार म्हणजे त्यांच्याकडे किमान बुद्धी आणि पैसा असणारच. त्यांच्याकडे गुन्तवणुकदारांचे, बँकवाल्यांचे येणे- जाणे असते. क्षक्षक्ष नावाचा शेअर ब्रोकर त्या डोक्टरांकडे आला. "तुम्हांला धंद्यात चांगली प्राप्ती आहे, मी शेअर मार्केट नावाचा अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने प्रत्येकाडे काही लाख रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "नफा होत आहे, पण अजून पैसे गुंतवल्याशिवाय अधिक धन येणार नाही. इन्वेस्टमेंट करावी. " अशी बतावणी करूवीआणखी पैसे घेतले.

त्यानंतर ब्रोकर कुंभ घेऊन आला. त्यातून काही हजाराचा पाडून दाखविल्या. अधिक पैसे पडेनात. "तुम्हाला अधिक रिस्क घ्यायला हवी.. आता फ्युचर मध्ये जाउन मोठा विधी करायला हवा. आणखीन रु.लागतील. मग नोटांचा पाऊसच पडेल." अशी आशा दाखवली. "पैसे न दिल्यास आहेत ते पण संपतील" .अशी भीतीही घातली. वैद्यांनी मुदत ठेवी मोडून आणखीन पैसे दिले. त्यानंतर ब्रोकरने आणखीन क्षक्ष लाख रु.मागितले. वैद्यांनी तीही रक्कम सुपूर्द केली.
नंतर मंदार वैद्यांना सागरनाथच्या मुलाचा फोन आला. "थोडा लॉस झाला आहे. ती परत उलटविण्यासाठी १० लाख रु.पाठवावे. नाहीतर अकाउंटचा मृत्यू होईल. मग त्यांचे प्रेत आणून मी ते तुमच्या दारासमोर टाकीन. " वैद्य घाबरले. त्यांनी दहा लाख रु.पाठविले.

कांही दिवसांनी आणखी पैशांची मागणी आली. इतके पैसे गेल्यावर आतां मंदार वैद्यांना शंका आली की हा ब्रोकर कदाचित् आपल्याला फसवित असावा. मग त्यांनी ब्रोकरविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पुढे काय झाले माहीत नाही बातमी नवीन आहे.
....या प्रकरणावरून काय दिसते ?
सदर डॉक्टर हे व्यावसायिक आहेत. त्यांनी भोंदू बाबाला काहीलाख रु. दिले. त्याअर्थी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. म्हणजे ते आपला व्यवसाय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळत होते. यावरून ते व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, होते. व्यवस्थापन चांगले असणार. म्हणजे हे बुद्धिमान आहेत. ते अनुभवी देखील आहेत. अशा या व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, सक्षम, बुद्धिमान, अनुभवी व्यावसायिकाचे काही लक्ष रुपये एक शेअरब्रोकर लुबाडतो याचे महदाश्चर्य वाटते. या ब्रोकरने चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. डोक्टरांनी जवळजवळ त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि हातावर लाखो रु. ठेवले. कोणताही लेखी व्यवहार करूनदेखील काही उपयोग झालेला नाही हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडले हे सत्य आहे.

असे घडण्याचे कारण काय ? यावर विचार करता एकच कारण संभवते. ते म्हणजे शेअरबाजारावरआणि त्याच्याशी संबंधित विषयांवर डोक्टरांची असलेलीश्रद्धा. अपरंपार श्रद्धेविना असे घडणे असंभवनीय आहे. श्रद्धा ही एक मनोभावना आहे. मन आणि बुद्धी यांचे उत्पत्तीस्थान मेंदूच आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, श्रद्धा, मद, मत्सर, काम अशा अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे मन. माणसाचे मन श्रद्धा भावनेने लिप्त झाले की त्याची बुद्धी लुळी पडते. बुद्धीपेक्षा मन प्रबळ बनते. बुद्धी निष्प्रभ होते. बुद्धीची विचारक्षमता नष्ट होते. मेंदूवर श्रद्धेचे नियंत्रण येते. त्यामुळे सर्व निर्णय श्रद्धे अनुसार होतात. विवेक, चिकित्सा हे बुद्धीचे घटक मागे पडतात. मग व्यवहारज्ञान, क्षमता, बुद्धिमत्ता, अनुभव यांचा कांही उपयोग होत नाही.
श्रद्धेचे चार प्रकार आहेत. ते सोदाहरण असे:-
१) पारंपरिक श्रद्धा. (उदा. शेअर खाली पडला की घ्यावा.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.माझा शेजारी घेतो म्हणजे तो चांगलाच असणार.)
३)आशावती श्रद्धा. ( उदा.आज मार्केट पडले तरी उद्या वर जाइल.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.आज जर घेतला नाही तर परत कधीच घेता येणार नाही.)
प्रस्तुत प्रकरणात डॉक्टरांची आशावती श्रद्धा दिसते. आपण इतकी वर्षे, पैसा निष्ठापूर्वक गुंतवलेला आहे. आता बाजार माझ्यावर कृपा करणार. तो कुणाच्या रूपाने, कसा -कधी येईल हे सांगता येणार नाही. पण तो येईल हे निश्चित. तो येणार. मला कृपाप्रसाद देणार. असे त्यांना मनोमन वाटत होते. ते बाजाराची प्रतीक्षा करीत होते. डोक्टर्स अनेक इन्व्हेस्टमेंटवाल्यांना भेटत होते. शेवटी हा ब्रोकर न बोलावता, त्यांच्या घरी आला. कांही न विचारता , "तुम्हाला शेअरबाजाराचा अक्षय धनाचा कुंभ देतो." असे आपण होऊन म्हणाला. डॉक्टरांना क्षणैक साक्षात्कार झाला असावा की या बाबाला बाजारानेच पाठविले आहे. त्याने पैसे मागितले. यांनी आनंदाने दिले. पुढे तो वारंवार पैसे मागू लागला. यांना वाटले बाजार आपल्या श्रद्धेची परीक्षा पाहतो आहे. आपण कमी पडता नये. बाजाराच्या कसोटीला उतरलेच पाहिजे. या विचाराने ते पैसे देत राहिले. त्यांना वाटले "मी कुणाला कधी फसवले नाही. कुणाचे कधी वाईट केले नाही. वाईट चिंतिलेसुद्धा नाही. मग माझे कशाला काही वाईट होईल ? बाजार आहे. देवाला डोळे असतात ना ? तो पहातो आहे ना ? माझे भलेच होणार. बाजाराने पाठविलेला हा ब्रोकर मला फसवणे शक्य नाही. अंतीं तो माझे कल्याणच करील." असे त्यांना सारखे वाटत राहिले असणार.
शेवटी काही लाख रुपये गेले तरी काहीच चांगले घडले नाही. हे ध्यानी आल्यावर ते श्रद्धेच्या ग्लानीतून थोडे बाहेर आले. "म्हणजे शेअर ब्रोकर श्रद्धाळू लोकांना लुबाडतात असे मोठे लोक सांगतात ते खरे असते की काय ? " अशी पुसटशी शंका त्यांच्या मनात तरळली असावी. मग त्यांनी ब्रोकर विरुद्ध वि्रुद्ध पोलीसांत तक्रार दिली.. पुढे काय झाले याची बातमी अद्याप वाचली नाही. नेहमीप्रमाणे पोलीसतपास चालू असेल.
व्यवसाय-धंद्यात प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करून योग्य निर्णय घेणारी बुद्धी श्रद्धा-क्षेत्रात चालेनाशी झाली. कारण मन श्रद्धेने ओतप्रोत भरले होते. त्यामुळे बुद्धीने कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली नाही. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बुद्धी बाजूला पडली. किंबहुना श्रद्धेने तिला बाजूला सारले. आणि सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. श्रद्धा भावनेमुळे प्रबळ झालेल्या मनाने मेंदुद्वारे निर्णय घेतले. कर्मेंद्रियाने (हातांनी) ते कार्यवाहीत आणले. भोंदूबाबाने मागितले तेवढे पैसे त्या्ला दिले. शेवटी माणूस म्हणजे त्याचा मेंदू. तो मेंदू श्रद्धाभावनेच्या आहारी गेला म्हणजे अशी फसवणूक होणारच. याची अनेक उदाहरणे आहेत. श्रद्धाळू लोकांचा निरुपाय असतो. श्रद्धेपुढे त्यांचा मेंदू हतबल होतो. श्रद्धेच्या गुंगीतून बाहेर आल्यावर "मी त्या बाबाला इतके पैसे दिले तरी कसे? " याचे आश्चर्य स्वत: वैद्यांनाच वाटले असेल. श्रद्धेची झिंग ही अशी असते. श्रद्धाळूंची फसवणूक होणे अपरिहार्य असते. त्यावर एकच उपाय तो म्हणजे श्रद्धेचे
प्रयत्‍नपूर्वक विसर्जन करणे.
श्रद्धा ठेवणे हे दास्य (गुलामगिरी) पत्करल्याचे लक्षण आहे. डॉक्टरांनी शेअरब्रोकरकडे श्रद्धा ठेवली म्हणजे त्यांनी आपली बुद्धी त्याच्याकडे गहाण टाकली. म्हणजे त्यांच्या बुद्धीचे नियंत्रण ब्रोकरकडे गेले. त्यामुळे तो ब्रोकर सांगेल ते सत्य मानून डॉक्टर त्याच्या आज्ञा पाळत गेले. महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रतिष्ठित दैनिकात छापून आलेली ही सत्य घटना आहे. श्रद्धावंतांनी यावर स्वबुद्धीने विचार करावा. "आमचा ब्रोकर अशी बुवाबाजी करणारा नव्हेच." अशा भ्रमात राहू नये.
******************************************************************************

असो -
प्रेरणा अर्थात आहेच.. परवा मटा चाळताना सहज ही बातमी वाचली होती. मग मिपावरचा एक लेख वाचला आणि हे किती कोरिलेट होते ते क्लिक झाले, म्हटले लिहुया. पण त्या धाग्यावर इतकी राळ उठली, की तिथे चर्चा होणे अशक्य होते. म्हणून धागा काढला.
मुद्दा असा आहे, की इथे जे काही झाले ते तर सरळ सरळ कायदेशीर होते. डो़टरांनी कितीही ठरवले तरी ते त्या ब्रोकरचे शष्प वाकडे करू शकणार नाहीत.
या श्रद्धांचे आपण काय करणार?

वरील ठिकाणी झालेला फ्रॉड हा तर कायदेशीर आहे, लोक दिवसाउजेडी कागदोपत्री फसले आहेत. मग यासाठी कोनात्या देवाला जबाबदार धरणार?

टीप - मी श्रद्धाळू आहे, पण त्याप्रकारे काही ठिकाणी बादरायण संबंध जोडून सुबुद्ध लोकांच्या श्रद्धांची टिंगल उडवली जाते, हे बघून वाईट वाटावे, राग यावा की कीव यावी काही कळत नाही. स्वतःला बुद्धीवादी म्हणवणार्‍या लोकांकडून तरी अश्या ठिसूळ लेखनाची अपेक्षा नाही. अधिक काय लिहिणे, वाचक सूज्ञ आहेतच.

काही तपशीलाचा चुका राहून गेल्या असल्यास क्षमस्व. रेफरन्ससाठी ही बातमी https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-mah...

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

7 Nov 2017 - 11:01 pm | श्रीगुरुजी

भारी!

मार्मिक गोडसे's picture

7 Nov 2017 - 11:18 pm | मार्मिक गोडसे

बुध्दी गहाण टाकून लेख लिहिल्यामुळे जबरदस्त गंडलाय. बाबा का ब्रोकर ह्यात गोंधळ झालाय लेखकाचा.

असंका's picture

7 Nov 2017 - 11:28 pm | असंका

नाही. लेख जमलाय. त्यांचा मुद्दा स्पष्ट झालेला आहे. तपशील महत्त्वाचा नाही.

मूकवाचक's picture

8 Nov 2017 - 9:03 am | मूकवाचक

लेख आवडला.
(अधिक बनेल माणसे कमी बनेल माणसांना मोरू बनवतात. त्यात देवाधर्माविषयी मोरूछाप श्रद्धा असणार्‍यांचेही शोषण होउ शकते/ फसवणूक संभवते इतकेच. प्रबोधनाचा भर श्रद्धांची चिकीत्सा करण्यापेक्षा आपला मोरू तर होत नाही ना याची चिकीत्सा करण्याकडे ठेवला तर जास्त उपयुक्त होउ शकेल. असो.)

नाखु's picture

8 Nov 2017 - 10:14 pm | नाखु

समजण्यासाठी काही "मुद्दा" आहे यावर अंधश्रद्धा का ठेवावी त्यांनी?

नामु परिट
आमचे ईथे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन मिळेल
तसेच घाऊक धुलाई च्या किरकोळ आर्डर स्विकारली जाईल

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Nov 2017 - 11:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे पूर्वज ते रामराज्यामधलेच ना ? का ही आमची अंधश्रद्धाच आहे ? =)) =))

तपशीलाच्या चूक आहेतच. म्हणून तळटीप पण आहे.
तुम्हाला मुख्य मुद्दा समजला का? बाकीच्याकडे दुर्लक्ष करा. मी दिलेली बातमी खरी आहे, आणि असे फसलेले किमान 2 लोक माझ्या पाहण्यात आहेत

आणि याव्यतिरिक्त मार्केटमध्ये चालणारी अन्य बुवाबाजी मी घेतलीच नाहीये. तो विषय ज्ञानव आणि भागवत हाताळतातच

मार्मिक गोडसे's picture

8 Nov 2017 - 12:24 am | मार्मिक गोडसे

ज्यांना हे व्यवहार नक्की कसे होतात हे माहीत नाही अशांना तुम्ही ज्या लेखावरून प्रेरणा घेतली त्या लेखात व तुमच्या लेखात फरक जानवणार नाही. थोडा तरी तपशील तुम्ही द्यायला हवा होता. ह्या प्रकरणात एकाही CA ला संशय आला नाही ह्याचे आश्चर्य वाटते.

यालाच तर अंधश्रद्धा म्हणतात. :) बघा साम्य आहे की नाही.

आणि मी माझ्या मनाचे लिहत नाहीये, बातमी आहे तशी. सत्य घटना

तर्राट जोकर's picture

8 Nov 2017 - 9:41 pm | तर्राट जोकर

शेअरमार्केट, म्युच्युअल फंडांतून लाखो, कोटी कमवलेले लोक प्रत्यक्ष दिसतात. वॉरन बफेपासून झुनझुनवाला, ते कोणा आडबाजूचा शेठ-लाला, रमेसभाइ, जिग्नेसभाई. त्यामुळे लोक त्यात जर विश्वास ठेवतात तेव्हा कुठेतरी त्यांना सत्य दिसते म्हणून. अशा शेअरमार्केटच्या व्यवहारांत लोक फसतात त्याचे कारण अंधलोभ, अंधश्रद्धा हे नसून पुरेशी काळजी न घेणे, अभ्यास न करणे हे आहे. दुसर्‍यांना देण्याऐवजी कोणीही व्यक्ती स्वतः अभ्यास करुन गुंतवणूक करुन फायदा कमवू शकते, बरं शेवटी धंदा असल्याने नुकसान-लाभ चालतंच. जशी शेती प्रत्यक्ष दिसते व उत्पन्न देते पण बुडतेही. म्हणून शेतीवर कोणी अंधश्रद्धा ठेवत नाही.

बुवाबाजीत मात्र पैशाचा पाऊस पाडल्याने कोणी श्रीमंत झाल्याचे, प्रसिद्ध झाल्याचे काही उदाहरण आहे का? नाही. ती केवळ एक अंधश्रद्धा आहे, कुठूनतरी ऐकलेलं असतं, काहीतरी भरवलेलं असतं. पुरावा काहीच नसतो. समोरचा भोंदू काहीतरी हातचलाखी आणि संमोहन करुन नादी लावतो.

बुवाबाजीफसवणूक व म्युच्युअल फंडातली फसवणूक यात मूलभूत फरक आहे. कितीही ओढून ताणून दोन्ही सारख्याच आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर तो फार हास्यास्पद व केविलवाणा होईल इतकंच.

सत्य सापेक्ष असते.. तसा विचार केलात तर ईश्वराची उपासना करून संत झालेले देखील कितीतरी पुरुष आहेत. अगदी सद्यकालीन नको तर ज्ञनेश्वर, तुकारामांसारखे, किंवा विवेकानंदांसारखे आहेत.
मुख्य मुद्दा आपण आपली बुद्धी गहाण टाकणार आहोत का हा आहे. मी चमत्कार करून पैशाचा पाउस पाडतो असे सांगणे, आणि मी शेअर बाजारात तुमचे पैसे गुंतवून तुम्हाला ईझी मनी मिळवून देतो म्हणून सांगणे या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. फरक असलाच, तर पाकिट मारणे आणि लाच घेणे यात जो असेल तो आहे.

ईझी मनीच्या मागे लागून कोणावरही विश्वास टाकला तर असेच होते.

बाकी आस्तिकता हा सार्वकालीन वादाचा विषय आहे, त्यामुळे तुम्हाला या उदाहरणासाठी तुकारामांनी देव पाहिला होता हे मान्य करावे लागेल (वादासाठी). हे तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही या विषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही, तुमचा मार्ग वेगळा आहे.

मार्मिक गोडसे's picture

9 Nov 2017 - 3:20 pm | मार्मिक गोडसे

तजो, छान प्रतिसाद.
बुवाबाजीफसवणूक व म्युच्युअल फंडातली फसवणूक यात मूलभूत फरक आहे. कितीही ओढून ताणून दोन्ही सारख्याच आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर तो फार हास्यास्पद व केविलवाणा होईल इतकंच.
झालाच आहे आणि ते अद्यापही त्यावर ठाम आहेत.असो.
फ्युचर ट्रेडिंग व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी नफ्याचे आणि तोट्याचे प्रमाण सारखेच असते.
फिफ्टी फिफ्टी.
ह्या बाजारात रोज एक जण पैसे घेऊन,तर दुसरा अनुभव घेवून येतो व जाताना पैसा आणि अनुभवाची अदलाबदल करून जातात असं गमतीने म्हटलं जातं.

तर्राट जोकर's picture

8 Nov 2017 - 11:35 pm | तर्राट जोकर

मी चमत्कार करून पैशाचा पाउस पाडतो असे सांगणे, आणि मी शेअर बाजारात तुमचे पैसे गुंतवून तुम्हाला ईझी मनी मिळवून देतो म्हणून सांगणे या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत.
>> अजिबात नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करुन पैसे मिळवून देता येतात व त्याची हजारो उदाहरणे तुम्हाला प्रत्यक्ष जीवंत मिळतील. पैशाचा पाऊस पाडून श्रीमंत झालेले फक्त ऐकिव असते. प्रत्यक्षातही असे लाभ झालेले कोणी उभे करु शकत असाल तरच तुमचे उदाहरण मान्य करता येईल.

आजारपणावर इलाजासाठी गावठी वैदूकडे जाणे आज प्रचंड प्रचंड कमी झाले आहे, तर तिथे आधुनिक वैद्यकाकडे अगदी आदिवासीपाड्यातल्या अनाड्याचाही पहिला पर्याय असतो. हे का झाले? कारण आधुनिक वैद्यकाने रिजल्ट दिले. त्या रिजल्टवर विश्वास ठेवून डॉक्टर हे बिरुद लावणार्‍या व्यक्तीला देव समजले जाते. डॉक्टरात बघितला जाणारा देव त्या एकूण समुहाने आजवर सातत्याने दिलेल्या रिजल्टमुळे आहे. ह्यात कोणी एखादा बोगस डॉक्टर फसवत असेल तर तो ह्या सातत्याने रिजल्ट देऊन मिळवलेल्या विश्वासाचा वापर करुन फसवत आहे. असेच म्युचुअल फंडाच्या फसवणूक करणार्‍याचेही आहे.

पण हे कोणी बुवाबाबा सातत्याने आलेल्या कोणत्या रिजल्टच्या आधारे फसवणूक करत आहेत? बुवाबाजीच्या फसवणूकीच्या केंद्रस्थानी देवाधर्म->दैवी शक्ती असतात->चमत्कार घडतात असे मानल्यामुळे आलेली अंधश्रद्धा आहे. त्यामागे कोणतेही दृष्य व तपासण्यास उपलब्ध असे रिजल्ट्स नव्हे.

तुम्ही ज्या गोष्टीवर झिरो-इन करण्याचा प्रयत्न करत आहात ती म्हणजे लोभ. लोभ केंद्रस्थानी ठेवला तर जगातली अशी कोणतीच गोष्ट नाही जी त्यापासून अलिप्त राहू शकेन. यनावाला लोभ या गोष्टीला नाही तर अंधश्रद्धेला केंद्रस्थानी ठेवून मांडणी करतात. फरक असलाच तर तो इथे आहे. त्या धाग्यावर जे सगळे यनावालांच्या विरोधात आघाडी उघडून बसलेत ते गोल शिफ्ट करुन खेळत आहेत. कारण ते त्यांना सोयीचे आहे. इथेही तुम्ही त्याचेच भव्यदिव्य उदाहरण पेश केलेत.

मला इथे आस्तिक-नास्तिक सारख्या पांचट वादावर चर्चा करायचीच नहीये. तुमच्या दृष्टीकोनात विसंगती दिसली, आपला मुद्दा पटवण्याच्या नादात तुम्ही चुकीची उदाहरणे दिली म्हणून नमूद केले.

अभिजीत अवलिया's picture

9 Nov 2017 - 6:55 am | अभिजीत अवलिया

प्रतिसादाशी सहमत तजो.

ओके, म्हणजे बाजारात कोणीतरी पैसे कमावतो, म्हणून आपला पैसा चिकित्सा ना करता एखाद्या माणसाला बाजारात "लावायला" देणे म्हणजे अंधश्रद्धा नव्हे असे तुमचे म्हणणे आहे तर..

यावर आम्ही अज्ञानी काय बोलणार? एकतर तुम्ही बाजारात कधी उतरलेलेच नाहीयेत किंवा तुमचे बाजाराचे ज्ञान अफाट आहे.
मी माझा लेख तुमच्यापुरता मागे घेतो. जाताजाता एकाच प्रश्नाचे उत्तर द्या, तुमच्या मतानुसार अंधश्रद्धा फक्त अध्यात्मातच असते का?

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2017 - 8:42 am | श्रीगुरुजी

तुमच्या मतानुसार अंधश्रद्धा फक्त अध्यात्मातच असते का?

मटा सारख्या वर्तमानपत्रात छापली गेलेली घटना सत्यच असणार यावर अंधविश्वास ठेवणे हीसुद्धा तथाकथित बुद्धिवाद्यांची अंधश्रद्धाच आहे.

सांरा's picture

8 Nov 2017 - 11:37 pm | सांरा

दोन्ही धागे वाचलेत. एक आस्तिक म्हणून काही भावना व्यक्त कराव्या वाटल्या.
बुवाबाजी आणि आपली व्रते, परंपरा या वेगळ्या गोष्टी आहेत. उदा. वडाला फेरी मारणे आणि एखाद्या बुवाला पैसे देणे. यात बुवाबाजीवर टीका केली तर ती आपल्या परंपरेचा अपमान आहे असे अनेक आस्तिकांना वाटते आणि ते फार पर्सनली घेतात. आता मी परमेश्वराला मानतो आणि मोक्ष मिळण्याची किमान दुसरा चांगला जन्म मिळण्याची इच्छा ठेवतो. मी बिमार पडलोय, व्यवसायात अडचणी येत आहेत, कोणी करणी केली आहे इत्यादी गोष्टी ईश्वर दूर करू शकत नाही काय ? आणि जर तो करू शकत नसेल तर एखादा बुवा कसा करेल? उपासनी बाबा आणि मेहेर बाबा यांचे अनेक जण भक्त असतील, पण त्यांची भोंदूगिरी शंकरराव किर्लोस्कर आणि पॉल ब्रॅंटन यांनी कशी उघडकीस आणली ते इतिहासप्रसिद्ध आहे. तरीही त्यांची मंदिरे ट्रस्ट आहेत याला काय म्हणावे.

दुसरी गोष्ट आपल्या परंपरा, कधी तरी सत्यवान वडाखाली मरता मरता वाचला असेल, आणि गोष्ट पसरली असेल. आता आपल्याला वडाचे कितीही गुणधर्म माहित असले तरी नव्वदीच्या दशकात अनिस ने काय गोंधळ माजवला होता हे विसरता येणार नाही. तसेच नास्तिक लोक, इतर वेळी आस्तिकांची खिल्ली उडवतील पण महत्वाच्या प्रसंगी लकी शर्ट, पॅन्ट, रुमाल, पेन हटकून वापरतील. एखादी प्रथा चुकीची आहे असे म्हणण्यापूर्वी जराही पडताळणी करणार नाहीत, नंतर उघडे पडल्यावरही चूक मान्य करणार नाहीत. एक तर फक्त हिंदूंवरच टीका करतील आणि एखादा हमीद दलवाईंसारखा पुढे आलाही तर त्याला एकटे पाडतील.

खरे म्हणजे एका दिवसात/ महिन्यात/ वर्षात पैसे डबल, अमृत कुंभ यावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत, त्यांना फसायला ब्रोकर, दलाल, बाबा, सीए काहीही चालते. यावर नास्तिक, श्रद्धा, आस्तिक असा वाद अनाठायी आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Nov 2017 - 11:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

तजो,

यनावाला लोभ या गोष्टीला नाही तर अंधश्रद्धेला केंद्रस्थानी ठेवून मांडणी करतात. फरक असलाच तर तो इथे आहे.

एकंदरीत अंधश्रद्धेस केंद्रभागी ठेवून विषयाची मांडणी करणं कमालीचं विवादास्पद आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात फरक करायची कोणतीही सोय नाही. अगदी जरी कोण्या देवाने कोण्या माणसास सोन्याने नखशिखांत मढवून काढला, तरी सोनं देणं हे देवाचं काम नाही. ते माणसाने आपल्या प्रयत्नाने मिळवावं अशी अपेक्षा आहे. देवाचं काम माणसाला आत्मज्ञान मिळवण्यात सहाय्य करणं हे आहे. मग देवाच्या नावाखाली बुवाबाजी करायची बातच कशाला?

बुवाबाजी थांबवण्यासाठी उपासनेस अंधश्रद्धा म्हणून घोषित करून ती थांबवणं हा उपाय नव्हे. भोंदू ओळखायला शिकणं हा उपाय आहे.

आ.न.,
-गा.पै.

तर्राट जोकर's picture

9 Nov 2017 - 1:58 am | तर्राट जोकर

भोंदू ओळखायला शिकणं हा उपाय आहे.

>>
भोंदू ओळखायला शिकवून बघा.
आमचा बाबा, दादा, स्वामी सोडून बाकी सगळे भोंदू असतात हो.
आमचे स्वामी, दादा, गुर्जी, बाबा आज्याबात असे नसतात.
श्रद्धा म्हणा की अंधश्रद्धा ती हीच.

सौन्दर्य's picture

9 Nov 2017 - 2:22 am | सौन्दर्य

मला तर ह्यात कुठेही श्रद्धा वगैरे दिसत नाही दिसते ती एकच गोष्ट आणि ती म्हणजे 'लोभ'. गुंतवलेले पैसे वाढणार ह्या एकाच इच्छेने ह्या डॉक्टरांनी त्या ब्रोकरच्या हाती आपले पैसे दिले, ह्यात ब्रोकरवर श्रद्धा वगैरे नसून, फार फार तर त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणावे लागेल. डॉक्टरांचा व्यवसाय तसा पूर्णवेळ असल्यामुळे, शेअर बाजाराची चढ-उतार सतत मॉनिटर समोर बसून बघत राहणे त्यांना शक्य नसते. अश्यावेळी जर कोणी आपले पैसे शेअर बाजारात गुंतवून चांगला परतावा मिळून देऊ शकत असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे ? ह्या विचारांनी अश्या डॉक्टरांनी पैसे दिले असावेत.

"You can never buy share at the lowest price and sell it at highest price" असे शेअर बाजाराविषयी म्हंटले जाते. कित्येक वेळा चढ्या भावाने घेतलेले शेअर्स, भाव कमी होत चालला आहे तरी विकले जात नाहीत कारण 'उद्या पुन्हा भाव वाढतील' अशी एक भोळी आशा असते. शेवटी मार्केट गडगडल्यावर हातात उरतात ते फक्त कागदाचे कपटे. माझ्या मते आपण स्वत: जर रोज लक्ष देऊ शकत नसू तर शेअर मार्केटमध्ये न पडलेलच बरं, नाहीतर कधी बारा वाजतील ते सांगता येत नाही.

राकेश झुनझुनवाला, वोरन बफे इत्यादी अनेक जण घसा फोडुन सांगत असतात, की अनालसीस आणि दीर्घकालीन गुंतवणूक हाच यशाचा मार्ग आहे.
पण लोकांना इझी आणि झटपट पैसा हवा असतो. मग अडकतात अश्या सापळ्यात.

आता operator आणि ब्रोकर यांचे अर्थकारण हा अजून एक पूर्ण वेगळा विषय आहे, ज्यांना तो माहितेय ते लोक मी दिलेल्या उदाहरणाशी पटकन रिलेट होतील, बाकीच्यांना हा विषय समजायला जरा कठीण आहे. असो. मार्केट खूप गहन आहे.
====≠=======
ब्रोकर कम ऑपरेटर कडे लाखाचे बारा हजार झालेला
आनंदा

तर्राट जोकर's picture

9 Nov 2017 - 10:54 am | तर्राट जोकर

राकेश झुनझुनवाला, वोरन बफे इत्यादी अनेक जण घसा फोडुन सांगत असतात, की अनालसीस आणि दीर्घकालीन गुंतवणूक हाच यशाचा मार्ग आहे

>>> ओके. चला ही माणसे अस्तित्वात तरी आहेत आणि सांगत तरी आहेत. अशीच माणसे पैशाचा पाऊस पाडून श्रीमंत झालेली आहेत का कोणी? आनंदा, तुम्हाला मुद्दा लक्षात येत नाहीये. फार साधा आहे. पण तुम्ही प्रचंड दुखावले गेल्याने तिकडे दुर्लक्ष करत आहात. तुम्ही माझे प्रतिसाद पूर्वग्रह दूर ठेवून तटस्थ मनाने वाचा. खोडण्यासाठी वाचू नका.

पैशाचा पाऊस पाडून दाखवणारी एक व्यक्ती जरी अस्तित्वात असेल तर तुमचं म्हणणं बरोबर ठरेल. नाहीतर फक्त आरोप प्रत्यारोप, अक्कल आणि अनुभव काढणे या लाथाडीत काही पडलेले नाही.

आनन्दा's picture

9 Nov 2017 - 11:58 am | आनन्दा

पैशाचा पाऊस पडणे ही अंधश्रद्धा आहे याबाबत कधीच कोणाचे दुमत नाहीये.
त्याचा संबंध सरसकट आस्तिकतेशी जोडण्यावरून वाद आहे.
मी परत परत तेच सांगतोय, अंधश्रद्धांच्या वाट्याला जाऊ नका असे सर्वप्रथम सांगणारे संतच होते, ज्यांनी देव पहिला होता असे आपण मानतो.
पण तरीदेखील लोक अंधश्रद्धांकडे जातातच. जसे की या मोठ्या इन्व्हेस्टर्स नी सांगून सुद्धा पैश्याच्या लोभाने लोक ऑपरेटर ला बळी पडतात.

अजून मुद्दा समाजात नसेल तर वाद थांबवूया. आपण दोघे वेगवेगळ्या प्रतालावर आहोत.

शब्दबम्बाळ's picture

9 Nov 2017 - 10:56 am | शब्दबम्बाळ

हेच म्हणायचंय... काहीही संबंध लावलाय!
आता पैसे गुंतवणारे कोण होते हे सोडून देऊ आणि विचार करू कि त्यांना पैशांचे "आमिष" दाखवणारी व्यक्ती ब्रोकर होती.
म्हणजे ती व्यक्ती गुंतवणूक विषयी सल्ला देण्यास पात्र आहे किंवा तज्ज्ञ आहे असे गुंतवणूक करणार्यांना वाटले.
हा विश्वास त्या प्रोफेशन वर टाकलेला होता.

आता शस्त्रक्रिया करायला कोणीही डॉक्टर कडेच जाणार ना? याचा अर्थ त्यांच्यावर श्रद्धा अथवा विश्वास आहे असा नाही तर, त्या क्षेत्राचे ज्ञान त्यांनी आधी घेतलेले आहे आणि त्यांना पदवी मिळालेली आहे म्हणून त्या पदवीवर असलेला विश्वास आहे.
डॉक्टरांना म्हणूनच त्यांचे प्रमाणपत्र भिंतीवर लावावे लागते ना? की लोकांना कळावे कि हा खरोखर डॉक्टर आहे! पण तरीही काही भोंदू निघतातच, कारण प्रत्येक वेळी माणूस ते प्रमाणपत्र तपासात नाही.

तीच गोष्ट या लोकांच्या बाबतीत झालेली दिसते! सादर व्यक्ती ब्रोकर असल्याने त्याला क्षेत्राची पूर्ण जाण असणार आहे आणि तो आपले पैसे व्यवस्थित हाताळू शकतो या समजुतीवरून पैसे गुंतवले गेले. आणि रोजच्या व्यस्त वेळापत्रकातून पुरेशी शहानिशा त्यांना करता आली नाही. जर डिमॅट खाते त्यांनी आधी पहिले असते तर त्यांना वेळेपूर्वीच घोटाळा कळू हि शकला असता.
पण व्यवसायावर भरवसा आणि व्यस्त वेळापत्रक यामुळे हि घटना झालेली दिसते!

त्यात श्रद्धेचा काहीही भाग दिसत नाही!

आनन्दा's picture

9 Nov 2017 - 12:01 pm | आनन्दा

ब्रोकर, ऑपरेटर आणि ते करत असलेली बुवाबाजी एकदा तपासून पहा म्हणजे मी अंधश्रद्धा का म्हणतो ते कळेल.
असो, ते अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही, आणि मी या सगळ्यातून गेलोय.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Nov 2017 - 9:08 am | प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धेची कारणे अज्ञान अगतिकता संस्कार ही जशी आहेत तशी ती जैविक देखील आहेत. जिज्ञासूंनी या विषयावरील मेंदुच्या मनात या पुस्तकातील वरील शीर्षकाचे प्रकरण वाचावे लिंक
https://drive.google.com/open?id=0B2X6bSru0D7IelpEbU5RcTRGQTA

प्रकाश घाटपांडे's picture

9 Nov 2017 - 9:11 am | प्रकाश घाटपांडे

आनंदा लेख आवडला. केवळ सश्रद्ध माणसांची नव्हे तर अश्रद्ध माणसांची बुद्धी देखील गहाण पडते. केमिकल लोच्या :)

आनन्दा's picture

9 Nov 2017 - 10:38 am | आनन्दा

धन्यवाद..
अंधश्रद्धा जीवनाच्या सर्व क्षेत्रात असतात, आपण डोळसपणे वावरणे हाच पर्याय आहे.
सरसकटीकरण वाईटच.

श्री. ऑरोबिंदो यांच्या आयुष्यातील एक प्रसंग. त्यांना एका व्यक्तीने प्रश्न केला "तुमची देवावर श्रद्धा आहे का?"
ते म्हणाले,"नाही"
त्या व्यक्तीला आश्चर्य वाटले. त्याला काही समजले नाही. तो काही कल्पना करू शकला नाही की ऑरोबिंदो 'नाही' म्हणतील. त्या व्यक्तीने आश्चर्यचकित होऊन क्षणार्धात विचारले," काय म्हणताय? तुम्ही नास्तिक आहात?"

ऑरोबिंदो पुन्हा म्हणाले,"नाही"

तो व्यक्ती अधिकच गोंधळला. त्याने विचारले," तुम्ही मला गोंधळात का टाकताय? तुमचे स्वत:चेच मत विरोधाभासी नाही का?"

ऑरोबिंदो म्हणाले," एक मिनिट थांबा! तुम्ही मला 'नाही' म्हणण्यापलीकडे काही बोलण्याची संधी देत नाहीत. काही पुढे बोलण्याआधीच तुमचा पुढचा प्रश्न विचारात आहात. मी ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही कारण ईश्वराला जाणतो. जिथे जाणणे आहे जिथे ज्ञानप्राप्ती आहे; तिथे श्रद्धा नसते. ज्ञान हे दृष्टीने येते आणि श्रद्धा ही डोळे बंद करून म्हणजेच अंधपणाने! अंधश्रद्धा असा शब्द वापरणेही चूक आहे कारण श्रद्धा ही मुळात अंध असते."

ओम शतानन्द's picture

9 Nov 2017 - 6:20 pm | ओम शतानन्द

मंदार वैद्य नावाच्या पुण्यातील उद्योजकाला एका बाबाने फसवल्याची बातमी पेपर मध्ये आली होती , हे Dr चे प्रकरण नवीनच आहे

गामा पैलवान's picture

9 Nov 2017 - 7:20 pm | गामा पैलवान

तजो,

भोंदू ओळखायला शिकवून बघा.
आमचा बाबा, दादा, स्वामी सोडून बाकी सगळे भोंदू असतात हो.
आमचे स्वामी, दादा, गुर्जी, बाबा आज्याबात असे नसतात.
श्रद्धा म्हणा की अंधश्रद्धा ती हीच.

शिकवायची आजिबात गरज नाही. रामदासस्वामींनी अगोदरच म्हंटलंय :

न करविती इंद्रियदमन
न करविती साधनभजन
ऐसे गुरू अडक्याचे तीन
मिळाले तरी त्यजावे

आ.न.,
-गा.पै.

तर्राट जोकर's picture

9 Nov 2017 - 7:38 pm | तर्राट जोकर

मंडली रामदासांचं बी ऐकंना दिसतंय.... आता काय करा?
रामदासांच्या नावानेच बाजार मांडलेली बुजगावणी कमी आहेत का?

गामा पैलवान's picture

9 Nov 2017 - 8:01 pm | गामा पैलवान

तजो,

मंडळी सांगूनदेखील ऐकत नाहीत. तर मग स्वत:च्या वर्तनाने आदर्श घालून द्यायला हवा ना? सदैव लोकांच्या श्रद्धेस सरसकट नाकं मुरडणं हे यनावालांचं वर्तन अनुकरणीय आहे का?

आ.न.,
-गा.पै.

नवीन प्रश्न : उपाय करायचे पण खात्री देता येत नाही

यांस अंधश्रद्धा म्हणावं का?

-गा.पै.

पगला गजोधर's picture

9 Nov 2017 - 9:40 pm | पगला गजोधर

आणि अश्या रीतीने तजोनीं मुद्देसूदपणे धाग्यातली सगळी हवा काढून टाकलीये !

आनन्दा's picture

9 Nov 2017 - 10:39 pm | आनन्दा

स्वागत आहे.. तुमची अंधश्रद्धेची व्याख्या जर स्पष्ट करा, मग बोलू