हॅलोवीन...

झपाटलेला फिलॉसॉफर's picture
झपाटलेला फिलॉसॉफर in काथ्याकूट
5 Nov 2017 - 11:04 am
गाभा: 

कालपरवा हॅलोवीन बद्दल बरीच सगळीकडे चर्चा सुरु होती .आजकाल मुंबई पुण्यात काही कॉन्व्हेन्ट आणि इन्टरनॅशनल स्कूल्स मध्ये हालोवीन साजरा होवू लागला आहे...घोर कलयुग!

सकाळीच पोरांना विचारलं ( यंग जनरेशन ला इंग्रजी नावं असलेल्या रुढी जास्त छान आणि मॉडर्न वाटतात)
"अरे भुतं / पितरं यांच्याबाबत असतो तो " असं मोघम उत्तर आलं.. सोबत काय या जुन्या लोकांना का sssss ही माहीत नसतं असे भाव सुद्धा...

मलाही या हॅलोवीन बद्दल फार काही माहीत नाही, पण मी त्याची खिल्लीही उडवत नाही... कुठल्याही प्रकारे का असेना ते पुर्वजांचं या निमित्ताने स्मरण करतात एवढंच मी ग्रास्प केलं.

संताप येतो जेव्हा आमच्याकडे तथाकथीत विज्ञाननिष्ठ लोक्स, पितृपंधरवडा, श्राद्ध, पिंडदान, तर्पण... या आमच्या विधिंची खिल्ली उडवत हे थोतांड आहे वगैरे बकतात तेव्हा. जणु वैज्ञानिकतेचा ठेका हा फक्त इंग्रजी भाषीकांनीच घेतलाय. आपल्याकडचे लोक डोक्यात याच कारणांमुळे जातात. ते लोक पहा जे गेली अनेक वर्षं करतायत ते तस्संच कंटीन्यु करतात.

प्रभू येशू हा आभाळातल्या देवापासून, एका स्त्रीला कुठल्याही पुरुषाशी समागम न होता झाला.

चेहेरा लपवून गुन्हा फादर ला सांगीतला की माफी.

यावर ते श्रद्धेने विश्वास ठेवतात आणि शास्त्राच्या आभ्यासावर सुद्धा. आपल्याकडे मात्र कसं बसं बी ए मराठी झालेला,

कशावरुन रामाचा जन्म आयोध्येत झाला ?
अमेरीकेत का आमावस्या अशुभ नसते ?
वेस्टर्न कंट्रीज मध्ये का भुतं नसतात ?
ते लोक का करत नाही श्राद्ध ? त्रिपिंडी / कालसर्प वगैरे .... ??

असले तारे तोडत असतात.... संताप या गोष्टीचा येतो. जे मला पटत नाही ते मी न करण्यापर्यंत ठीक .. पण करणारे मुर्ख / बावळट / अंधश्रद्धा असलेले असं सिद्ध करु पाहतात त्यांची मात्र थोबाडं फोडावीशी वाटतात...

असो...

हॅपी बिलेटेड हॅलोवीन...

*** संपादित

प्रतिक्रिया

हरवलेला's picture

5 Nov 2017 - 11:15 am | हरवलेला

बरोबर आहे.

भक्त प्रल्हाद's picture

5 Nov 2017 - 7:08 pm | भक्त प्रल्हाद

लोक शेण खातात म्हणुन आपण खायचं का?
खरेतर लोक तिकडे सुद्धा अन्ध्श्रद्धांना विरोध करत आहेत.
समाज म्हणुन आपण ठरवायचे आहे कि आपण मुर्खपणाला कवटाळायचे का ते.

झफि, ओ झफि, शांत व्हा बरं.
कोणत्याही देशात श्रद्धा, अंधश्रद्धा असतातच.
त्याला मानणारे, न मानणारे ओघाने आलेच!
काळजी करू नका.
आता भारतात हॅलोविन साजरा होऊ लागलाय तर आमच्या इथल्या टाऊन सेंटरला नगरपालिकेने आवाहन करून यावेळी होळी (म्हणजे रंगपंचमी) साजरी केली. त्या लोकांनाही वाटले असेलच की हे भारतीय धुळफेकीचे खेळ इथे कश्याला? बदल हे एका बाजूने कधी होतील असे वाटत नाही. शिवाय आमच्या टाऊनमध्ये लक्षुमीपुजनाच्या दिवशी सण साजरे करणार्‍या मुलांना शाळेतूनच होमवर्क नव्हते. दर वर्षाच्या सुरुवातीला रिलिजस ऑबझरव्हन्सचे दिवस जाहीर केले जातात त्यात एक भारतीय सण, दुसरा ईद, तिसरा आणखी काहीतरी असतोच! आपण कश्याला उगीच चिडचिड करायची?

सतिश गावडे's picture

5 Nov 2017 - 8:18 pm | सतिश गावडे

मलाही संताप येतो या गोष्टीचा.

या सुधारक लोकांना आपलेच देशबांधव खुळचट प्रथा पाळताना दिसतात. त्यांना हे पाश्चिमात्य खुळ दिसत नाही. मी म्हणतो तुम्हाला जर त्यांचा मुर्खपणा दिसत नसेल तर तुम्ही आमच्याही मुर्खपणाला नाव ठेवायचे कारण नाही.

अहो साहेब, पण नावं ठेवायला जर काही शिल्लक राहिलं नाही तर आयुष्य कसं चालावं म्हणते मी?
मला संताप आला नव्हता पण पहिल्यांदा भारतात हॅलोविनचा सण साजरा होतानाचे फोटू पाहिले होते तेंव्हा आश्चर्य वाटले होते.
मनुष्यप्राण्याला एकच एक प्रकारचे सण साजरे करून कंटाळा येत असेल बहुतेक!
शिवाय बदल म्हटला की नावे ठेवणे आलेच!

सतिश गावडे's picture

6 Nov 2017 - 8:36 am | सतिश गावडे

नावं ठेवायला आपल्या एकशे तीस कोटींच्या देशात कमी का विषय आहेत तै :)

ते ही बरोबरच आहे म्हणा! गल्ली लेव्हल, दिल्ली लेव्हल पुरेसं पडत नाहिये बहुतेक...........

डाम्बिस बोका's picture

6 Nov 2017 - 7:00 am | डाम्बिस बोका

असले तारे तोडत असतात.... संताप या गोष्टीचा येतो. जे मला पटत नाही ते मी न करण्यापर्यंत ठीक .. पण करणारे मुर्ख / बावळट / अंधश्रद्धा असलेले असं सिद्ध करु पाहतात त्यांची मात्र थोबाडं फोडावीशी वाटतात...

तुम्ही नाव बदला आणि ढोंगी फिलॉसॉफर ठेवा.अंधश्रद्धा मग त्या जगाच्या पाठीवर कुठेही असोत त्या बावळट माणसेच पाळतात.
कोणताही विज्ञाननिष्ठ आणि समजूतदार माणूस असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. हा लेख संपादित करण्यात आला आहे त्यातून त्याची लायकी कळते.

सतिश म्हेत्रे's picture

6 Nov 2017 - 8:42 pm | सतिश म्हेत्रे

कोणताही विज्ञाननिष्ठ आणि समजूतदार माणूस असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत ++1

गोंधळी's picture

6 Nov 2017 - 9:49 pm | गोंधळी

हूच्च संस्कृति

थॉर माणूस's picture

7 Nov 2017 - 12:27 am | थॉर माणूस

कॉन्व्हेंट स्कूल्स मधे ख्रिस्शन सण साजरे केले जात असल्याची बातमी आश्चर्यकारक मला तरी वाटत नाही. इंटरनॅशन स्कूल्स मधे असे कार्यक्रम करणे योग्य ठरते का ते मात्र पडताळून पहावे लागेल.

अरेरे दाभोलकरांचा जन्म वाया गेला म्हणायचा.....झफी साहेब आपल्या पूर्वजांची आठवण ही काढलीच पाहिजे. फक्त त्या सोबत येणाऱ्या अंधश्रद्धा टाळायला हव्यात. एखाद्या प्रगत राष्ट्राचं इतकीही अनुकरण नको की त्यांच्या अंधश्रद्धाही चालतील. ते करतात ना मग आपण केलं तर काय वाईट. पण ते सुद्धा कधी कधी चुकू शकतात. अंधश्रद्धेत सुख असावे, म्हणून त्या फोफावतात. विज्ञान सकारण सगळं दाखवून देत आणि ते मनाला पटत सुद्धा, तस अंधश्रद्धेचं नाही ना. तुम्हाला या गोष्टीचा इतका संताप येत असेल तर तुम्ही विज्ञानाला तोंडावर पाडा ना. आम्ही सगळे तुमचे 'अंध'भक्त होऊ.. वयक्तिक टिपणी नाही....जास्त मनावर घेऊ नका....:)

- बुद्धीला जी गोष्ट पटेल ते करणारा "गुल्लू दादा".

गोंधळी's picture

9 Nov 2017 - 3:00 pm | गोंधळी

हॅलोवीन डे साजरा कर् ण्या मागे (शास्त्रिय) कारण असु शकते. ह्या दिवशी भुतांचि वेशभुषा करतात व ईतरांना घाबरण्याचा प्रयत्न करतात पण हि भुत मंडळि ख री नसुन फक्त त्यांनी वेशभुषा केली आहे हे लोकांना माहित असते त्यामुळे जरी खरी भुत आली तरी ते त्यांना घाबरणार नाहित . अशा प्रकारे खर्या भुतांचा भ्रम निरास होतो व निराश होउन तिथुन निघुन जातात. आपल्या क डे हॅलोवीन डे साजरा केल्यास खुप फायदा होउ शकतो. भुत न रहिल्यास भुटातकी पण राहणार नाहि त्यामुळे बाबा,महाराज राहणार नाहित आणि त्यामुळे भारतातल्या कितितरी श्रद्धा अंध होण्यापासुन थांबतील व त्याचे पुढील जीवन समाधानाने जगतील.

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2017 - 9:07 am | टवाळ कार्टा

आवरा