मोदी बरे ,अमित शहा वाईट ?

खाबुडकांदा's picture
खाबुडकांदा in राजकारण
21 Aug 2017 - 2:41 pm

पूर्वी वाजपेयीं जेव्हा कॉंग्रेसविरोधी राजकारणाच्या केंद्रस्थानी असत तेव्हा त्याना टिकेचे लक्ष्य केले जाई. तरी जनतेत त्यांची प्रतिमा मलिन होत नाहीसे पाहुन मग टीका करताना धोरण किंचीत बदलण्यात आले. त्यानुसार वाजपेयी सज्जन वा उदारमतवादी होते पण अडवाणी वाईट व असहिष्णू आहेत असा ओरडा केला जाऊ लागला. अडवाणींची उंची वाढतच राहिली. नंतर मोदींचा उदय झाला आणि अडवाणी हे सभ्य व समजूतदार असून मोदी हे समाजात फूट पाडणारे आणि हुकुमशहा असल्याचा शोध लावण्यात आला. त्यानेही मोदींचे काही बिघडले तर नाहीच पण त्यांची उंची वाढत राहिली असे लक्षात आल्यावर कालपरवापर्यंत मोदीना तीव्र विरोध करणाऱ्या ममता दीदी म्हणू लागल्या आहेत कि मोदी बरे आहेत पण अमित शहा वाईट आहेत म्हणुन !
जनता आता पूर्वीप्रमाणे भोळी राहिलेली नाही आणि
असे बदलते पवित्रे फारसे यशस्वी होत नाहीत हे यांच्या कधी लक्षात येणार ?

प्रतिक्रिया

मोदीकाका आपल्याला आवडतात. शहांबद्दल विशेष काई माहीत नाही बा. तुमच्या लिखाणातील साखळी बघता मोदीकाका पंतप्रधानपद सोडतील त्यानंतर शहा पंतप्रधान होतील असा काहीसा अर्थ काढता येईल का?

तुम्ही पूर्वी एकदा म्हणाला होतात की मनोहर जोशी पंप्र होतील म्हणून..

पैसा's picture

21 Aug 2017 - 6:56 pm | पैसा

कब्बी नई!! एखादा वाया गेलेला जोक असेल कदाचित! =))

इरसाल's picture

24 Aug 2017 - 4:32 pm | इरसाल

गटणे स्टाईल झालं, "मागे तु, ते आणी साने गुरुजी तुझे आदर्श आहेत असं म्हणाला होतास??"

गॅरी ट्रुमन's picture

21 Aug 2017 - 6:05 pm | गॅरी ट्रुमन

तुमच्या लिखाणातील साखळी बघता मोदीकाका पंतप्रधानपद सोडतील त्यानंतर शहा पंतप्रधान होतील असा काहीसा अर्थ काढता येईल का?

अमित शहा की आदित्यनाथ हा प्रश्न आहे.

शाम भागवत's picture

3 Nov 2017 - 12:20 pm | शाम भागवत

त्यावेळेस नरेंद्र नंतर देवेंद्र अशीही आरोळी ऐकू येण्याची शक्यता आहे म्हणतात.
:)

खाबुडकांदा's picture

21 Aug 2017 - 5:53 pm | खाबुडकांदा

कॉंग्रेस व तत्सम पक्षाना त्या त्या काळी जो अधिक उपद्रव देतो वा त्यांच्या स्थानाला उपजिवीकेच्या साधनेला जो धक्का देइल असे त्याना वाटते तो अधिक वाईट असतो व त्याला वाईट ठरवणे सोपे जावे म्हणुन जनतेला जो प्रिय आहे त्याला बरा म्हणुन जनतेला पटवण्याचा प्रयत्न केला जातो एवढाच याचा अर्थ. तुमचा अंदाजही काही चुकीचा वाटत नाही.

खाबुडकांदा's picture

21 Aug 2017 - 6:02 pm | खाबुडकांदा

कॉंग्रेस व तत्सम पक्षाना त्या त्या काळी जो अधिक उपद्रव देतो वा त्यांच्या स्थानाला उपजिवीकेच्या साधनेला जो धक्का देइल असे त्याना वाटते तो अधिक वाईट असतो व त्याला वाईट ठरवणे सोपे जावे म्हणुन जनतेला जो प्रिय आहे त्याला बरा म्हणुन जनतेला पटवण्याचा प्रयत्न केला जातो एवढाच याचा अर्थ. तुमचा अंदाजही काही चुकीचा वाटत नाही.

प्रसाद_१९८२'s picture

21 Aug 2017 - 6:06 pm | प्रसाद_१९८२

एकच प्रतिसाद, तीन किंव्हा दोन वेळा द्यायचा आहे का ?

खाबुडकांदा's picture

21 Aug 2017 - 6:06 pm | खाबुडकांदा

सॉरी फॉर रिपीटेड पोस्टींग. स्लो डाटा प्रॉब्लेम.

सारिका होगाडे's picture

6 Sep 2017 - 1:20 am | सारिका होगाडे

मोदी काका जिंदाबाद! मोदी जगभरात भारताचं नेतृत्व करतात, आज देशाची प्रतिमा जगात फारच उंच झाली आहे आणि आमची मानही! आणि अमित शहा देशाच्या आतमधील राजनीती बघतात!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Sep 2017 - 12:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे रे कांद्या.
जनता आता पूर्वीप्रमाणे भोळी राहिलेली नाही
म्हणूनच जी.एस.टी.ला कडाडून विरोध करणार्या भाजपावाल्यानी सत्तेवर आल्यावर पलटी मारली, पाकिस्तानला 'धडा शिकवायची'भाषा करणारे हास्तांदोलन करू लागले हेही मतदारांच्या ल़क्षात आहे.

खाबुडकांदा's picture

23 Sep 2017 - 10:25 pm | खाबुडकांदा

धागा व विषय खुप जुना झाला होता. पण तुम्ही कांद्याला नविन फोडणी दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
GST पूर्वीचा व आताचा यात खुप फरक आहे खुप सुधारीत आवृत्ती आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज पडु नये. तो वाद जुना झालाय. GST प्रथम ममो सरकारने आणला होता पण त्याला विरोध झाल्यावर ते सरकार थंड बसले. मोदी सरकारने मात्र अनेक विरोधी पक्षांशी चर्चा करून मुळ विधेयकात सुधारणा करुन वेळेस सोनिया यांच्या घरी मंत्री जावून सर्वाना आवश्यक त्या विश्वासात घेवून अंतिम मसुदा सम्मत करुन घेतला. तीव्र इचछाशक्ती दाखवली धडपड केली हे कृपया नाकारु नका.
दुसरा मुद्दा पाक बाबतच्या धोरणाचा. होय हस्तांदोलन केले हे खरे आहे पण तो सांकेतिक व शिष्टाचाराचा प्रकार आहे. मोदीनी काय बंदूक घेवून पाकिस्तानात जावून लढावे कि अणूबॉंब टाकावा अशी अपेक्षा आहे ?
आज मोदी स्वराज डोवाल आणि कंपनीच्या मुत्सद्दीपणामुळे पाक आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडलाय. कालच त्यांचा मित्र चीन ने सुद्धा काश्मीर प्रश्नातून अंग काढुन घेतले आहे.
मला फरक पडलेला स्पष्ट दिसतोय.
आणि ममो सरकारच्या काळात असे होणे शक्य नव्हते हे ही समजत आहे.
बाकि पसंद अपनी अपनी.

सचिन's picture

4 Nov 2017 - 1:47 pm | सचिन

कुठल्याही सोशल साईट वर जा ... सगळेच मोदी मोदी खेळत असतात ... !!