बघतो जिकडे तिकडे दिसती ...

विदेश's picture
विदेश in दिवाळी अंक
19 Oct 2017 - 12:00 am

Header2
बघतो जिकडे तिकडे दिसती मनातले ना कळणारे
कळता सुखात असतो हल्ली नशिबावर जळफळणारे ..

संधी साधत जगती येथे त्यांच्या पदरी यश पडते
अचूक वेळी संधीचा ते वारा बघुनी वळणारे ..

शब्द मधुरही कानी पडता टपके लाळ तोंडातुनी
पिकल्या पानी मनात हिरवळ आढळती पाघळणारे ..

प्रामाणिक राहून ते जरी करती काम इमानाने
पाठी लागत असती त्यांच्या काही काही छळणारे ..

ताव मारती टाळूवरच्या लोण्यावर मेलेल्याच्या
मिरवत असती सभेस दावत नक्राश्रू घळघळणारे ..

द्वेष असो वा कौतुक अपुले स्थितप्रज्ञ असती काही
व्यथा मांडता समोर त्यांच्या क्षणात ते विरघळणारे ..

कौतुक त्यांच्या नसते नशिबी असती जोवर जिवंत ते
जगती त्यांच्या अवतीभवती जगण्यावर त्या जळणारे ..

प्रयत्न केले किती जरी पण पाणी उलट्या घड्यावरी
सुखात भिजले किती जरी ते दु:ख सदा उगाळणारे ..
......

Footer

प्रतिक्रिया

विचार करायला लावणारं काव्य ! समाजातील परिस्तितीचा धागा अचूक पकडलाय !

सुखात भिजले किती जरी ते दु:ख सदा उगाळणारे ..

वा! छान!

पद्मावति's picture

29 Oct 2017 - 2:09 pm | पद्मावति

मस्तच!

पैसा's picture

30 Oct 2017 - 6:22 pm | पैसा

आवडली

विदेश's picture

2 Nov 2017 - 6:03 pm | विदेश

महेश, एस, पद्मावति , पैसा -

अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !