दौलत की चाट

जुइ's picture
जुइ in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

कोणे एके काळी दिल्ली नावाचे एक महानगर होते. तेथे दौलत नावाचा एक व्यापारी राहत होता. हिवाळ्यात त्याचा एक नेम होता. नेमाला तो काय करी? तर म्हशीचे घट्ट दूध घेई. त्याबरोबर मलई घेऊन ते एका मोठ्या मातीच्या भांड्यात एकत्र करी. मग ते भांडे झाकून रात्री बाहेर ठेवी. त्यावर बर्फाची लादी ठेवी.


(अर्धा लीटर होल मिल्क(तुम्ही म्हशीचे दूध वापरू शकता), अर्धा ते पाऊण कप हेवी क्रीम. हे दूध तापवू नये)


दूध व मलईचे मिश्रण घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवी.

तो डबा बाहेर रात्री चंद्रप्रकाशात ठेवी.

दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे तो उठी. दूध आणि मलईचे भांडे घरात घेऊन येई. त्यात साखर आणि केशर घाली. मग ते मिश्रण रवीने घुसळायला सुरुवात करी. जसे जसे ते मिश्रण घुसळले जाई तसे तसे त्यावर फेस जमा होई. जमा झालेला फेस तो एका स्वच्छ गाळणीने गोळा करून एका ताटलीत जमा करी. फेस जमा केलेली ताटली थोडी कलती ठेवी. जेणेकरून दूध एका बाजूला जमा होई. मग ते दूध परत तो दुधाच्या मिश्रणाच्या पातेल्यात जमा करी.


(थोडे केशर आणि ४ टीस्पून साखर. आपल्या आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी अधिक करावे)

अशा प्रकारे फेस येऊ लागेल.

अशा प्रकारे ताटलीत स्वच्छ गाळणीने फेस गोळा करी. ताटली खाली सांडशी ठेवावी म्हणजे ती एका बाजूने कलती राही. जेणेकरून दूध एका बाजूला गोळा होई.

असे करीत ताटलीत पुरेसा फेस जमा झाला की तो मातीच्या कपांमध्ये तो फेस भरायला सुरुवात करी. तसे करताना तो एक चमचा फेस कपात भरल्यावर त्यावर तो अगदी बारीक साखर(पिठी साखर) भुरभुरी. त्यावर परत फेस भरी. असे करत करत ऐका वर एक फेस आणि साखरेचा थर रची.

बारीक कुटलेले पिस्ते, थोडी वेलची आणि थोडा खवा सजावटीसाठी.

शेवटी सजावट म्हणून त्यावर अगदी चिमूटभर वेलचीची पावडर भुरभुरी. मग त्यावर खवा पसरवून घाली आणि शेवटी पिस्ता अगदी बारीक कुटून पसरवी.

झाले, हा अनोखा चाट तो हिवाळ्यात दर दिवशी दिल्लीकरांस विकावयास सज्ज होई.


मंडळी सर्वप्रथम ही पाकृ नेटफ्लिक्सवरील "राजा रसोई और अन्य कहानियां" या माहितीपट मालिकेमध्ये दिल्लीवरच्या भागात पाहिली. तेव्हापासून आपण दिल्लीला कधी जाऊन हा चाट खाणार याची ओढ लागली. मात्र तोपर्यंत काय? अनायासे मिपा दिवाळी अंकाची घोषणा झाली आणि आयती संधी मिळाली. मग मिपावरील सर्व सुग्रास पाकृ देणार्‍या भाऊ आणि भगिनींना नमन करून रवी हाती घेतली ;-) . भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी दिल्लीत एक दौलत नावाचा व्यक्ती हा चाट प्रकार विकायचा. म्हणून मग या पाककृतीला दिल्लीकरांनी नाव दिले "दौलत की चाट". हा चाट प्रकार फक्त हिवाळ्यात मिळतो. साधारपणे दिवाळी ते होळीच्या सुमारास. आजही हा चाट प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. चाट विक्रेते आजही हा चाट पारंपरिक पद्धतीने करतात. जसे की दूध आणि मलई एकत्र करून रात्रभर बाहेर झाकून ठेवतात. त्यावर बर्फही लावतात. मग भल्या पहाटे उठून ते मिश्रण घुसळतात आणि विक्रीसाठी सज्ज होतात. हिवाळ्यात आणि दूध मलईचे मिश्रण अशासाठी बाहेर ठेवतात की बाहेर पडणार्‍या दवामुळे हे मिश्रण अधिक हलके होण्यास मदत होते. जिभेवर ठेवल्याबरोबर हा चाटचा प्रकार विरघळून जातो इतके ते हलके असते. अर्थात एक गोष्ट विसरू नये ती म्हणजे हा पदार्थ लाकडी चमच्याने खावा!!

या चाटच्या उगमाचा थोडासा वेध घेऊयात. कुणी म्हणतात की मुघल राजवटीच्या काळात हा प्रकार अफगाणांबरोबर आला. कुणी म्हणतात की हा प्रकार "सिल्क रूट" मार्गे भारतात आला. पण आपल्याला काय चांगले ते खाण्याशी मतलब ;-) . असेही म्हणतात की पौर्णिमेला हा चाट केल्यास आणखींना बहारदार होतो. त्यामुळे या दिवाळीच्या गुलाबी थंडीत आपणही खा आणि आपल्या मित्रपरिवारालाही खाऊ घाला तोंडात विरघळणार दौलत की चाट. मी वर केलेली पाकृ पारंपरिक पद्धतीने केली आहे. मात्र तुमच्यासाठी सोप्या पद्धतीने सांगते. वर सांगितलेले साहित्य घ्यावे. दूध आणि मलई(क्रीम)चे मिश्रण रात्रभर फ्रीज मध्ये ठेवावे. सकाळी ते ब्लेंडर ने घुसळावे. बाकी सजावट वर सांगितल्याप्रमाणेच करावी.

लगेच खायचे नसल्यास हा चाट फ्रीज मध्ये ठेवावा आणि मग त्वरित खावे. इति दौलत की चाट नामे कथा सुफळ संपूर्ण!!


ता. क. - सर्व मिपाकरांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
माहितीचा स्रोत - राजा रसोई और अन्य कहानियां, बावर्ची.कॉम

प्रतिक्रिया

अरे वा! अगदीच अनोखा प्रकार आहे!
आता दिल्लीला कधी जाणे व्हावे? तुमच्याकडे आधी येणे व्हायची शक्यता जास्त ;)

जुइ's picture

26 Oct 2017 - 10:03 am | जुइ

नक्की ये. तसंही आम्ही डेरिलॅन्ड ऑफ अमेरिका म्हणजे विस्कॉन्सिनच्या शेजारीच राहतो. दूधदुभत्याची काही कमी नाही अन हिवाळाही सुरू होतोय :-) .

पद्मावति's picture

18 Oct 2017 - 12:52 am | पद्मावति

ठहरीये होश में आ लूँ................................ओके, आता प्रतिक्रिया देते :)

थक्क करणारी रेसेपी. इतकी अलवार, नाजूक....फार फार सुरेख.
पाककृती, लिहिण्याची स्टाइल आणि फोटो, क्या बात हैं.

सूड's picture

18 Oct 2017 - 12:55 am | सूड

भारीच की!!

रेवती's picture

18 Oct 2017 - 1:49 am | रेवती

अरे वा! मस्त! टीव्हीवर याबद्दल पाहिले होते पण घरी करता येऊ शकेल असे वाटले नव्हते. पाकृ छान दिसतिये.

सही रे सई's picture

18 Oct 2017 - 2:08 am | सही रे सई

नवीनच प्रकार आहे हा .. आणि पद्मावती म्हणाली त्याप्रमाणे अलवार आणि नाजूक.
जुई तू मस्तच सादर केली आहेस हि आणि सगळ्या स्टेप्स चे फोटो पण लय भारी .

एकच प्रश्न छळतो आहे .. याला चाट का म्हणत असतील.. कारण चाट म्हणल कि मला आंबट गोड चटणी घातलेले चटपटीत असेच चाट माहित आहेत.. पण यात काहीही चटपटीत नाहीये (चव मस्तच असेल यात शंका नाही)

जुइ's picture

26 Oct 2017 - 10:03 am | जुइ

चाट या प्रकारात बहुतांश रोडसाइडला झटपट खाता येणारे पदार्थ मोडत असल्याने या पदार्थालाही त्यातच धरले जात असावे असा अंदाज आहे.

निशाचर's picture

18 Oct 2017 - 3:09 am | निशाचर

अहाहा! सुरेख पाककृती!!

नंदन's picture

18 Oct 2017 - 3:35 am | नंदन

अगदीच अनोखी पाककृती. एक नंबर!

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2017 - 3:40 am | प्रभाकर पेठकर

अशीच एक लखनवी पाककृती आहे. त्याचं नांव आहे 'निमिश'.
दिड लिटर दुधात १७५ ग्रॅम साखर, दिड ग्रॅम कटलबोन पावडार करून घालायचं, एक टेबलस्पून गुलाबजल घालायचं. हे सर्व नीट घुसळून फ्रिजमध्ये ठेवायचं. नन्तर एग बिटरने भरपूर घुसळुन फेस येऊ द्यायचा. तो फेस वेगळा काढायचा. पुन्हा दुध फेसायचं. जो पर्यंत फेस येतो आहे तो पर्यंत तो काढत राहायचं.
त्या फेसावर केशर घालून, पिस्त्याचा चुरा घालायचा आणि सर्व करायचं.

अभिजीत अवलिया's picture

18 Oct 2017 - 6:01 am | अभिजीत अवलिया

प्रेझेंंटेशन आवडले.

नूतन सावंत's picture

18 Oct 2017 - 9:34 am | नूतन सावंत

सुरेख सादरीकरण,! सुरेख प्रकाशचिट्रे!

सविता००१'s picture

18 Oct 2017 - 10:08 am | सविता००१

अग, किती सुरेख प्रकार आहे.. याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
आणि लिहिलं आहेस इतकं छान की क्या कहने!!!
फोटोही अप्रतिम

मोदक's picture

18 Oct 2017 - 10:27 am | मोदक

सुरेख प्रकार...

ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद..!

स्वाती दिनेश's picture

18 Oct 2017 - 11:32 am | स्वाती दिनेश

सुंदर सादरीकरण, प्र.चित्रेही फार सुंदर.. अगदी आत्ताच खावेसे वाटणारी ही दौलत की 'दौलत'च आहे ग..
मस्त,मस्त.. दिवालीका माहौल और भी रंगीन हो गया...
स्वाती

राघवेंद्र's picture

18 Oct 2017 - 11:26 pm | राघवेंद्र

जुइ, मस्त आहे पाककृती !!!

थॉर माणूस's picture

18 Oct 2017 - 11:51 pm | थॉर माणूस

अगागा! कहर आहे हे. पण बरीच कष्टाची/वेळखाऊ पाककृती दिसतेय. अर्थात इतकी रीच आणि मस्त दिसणारी पाककृती म्हणजे कष्ट पडणारच. पण डाएटवाल्यांनी किमान मैलभर अंतरावरच रहायला हवं यापासून. :)

एकदम अनोखी आणि सुरेख पाकृ.

कौशिकी०२५'s picture

19 Oct 2017 - 9:33 am | कौशिकी०२५

वाह, क्या बात है. चविष्ट एकदम.

चांदणे संदीप's picture

19 Oct 2017 - 10:43 am | चांदणे संदीप

अतिसुंदर पाकृ.

Sandy

मनिमौ's picture

20 Oct 2017 - 11:49 am | मनिमौ

लयच भारी आहे. पण दुध आणी मलई दोन्ही अजिबात आवडत नसल्याने जळजळ झाली नाही.
बाकी केवळ जीभेने खायचा पदार्थ आहे हा

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2017 - 8:52 pm | श्रीरंग_जोशी

प्रतिसाद वाचल्यावर सदस्यनाम पुन्हा पुन्हा वाचले ;-) .

अभ्या..'s picture

21 Oct 2017 - 9:31 pm | अभ्या..

हेहेहेहेहेहेहे, परफेक्ट.
बादवे श्रीरंगा, तू का इतके लक्ष ठेवून आहेस? ;)
बादवे जुईवैनी इतक्या पेशन्सची रेसिपी म्हणजे दंडवतच हो. अप्रतिम लेखन आणि फटू.

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2017 - 10:36 pm | श्रीरंग_जोशी

लक्ष गेलं रे.
बाकी माझं मिपावय झालं असलं तरी मिपाहृदयाने मी अजुनही तरुण आहे.

सस्नेह's picture

23 Oct 2017 - 12:16 pm | सस्नेह

=)) =))

एस's picture

22 Oct 2017 - 8:14 pm | एस

अहाहा!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2017 - 9:04 pm | अत्रुप्त आत्मा

य्याह ब्बात!

ह्यो मामला पुण्यात कुटं खायला मिळल?

जुइ's picture

26 Oct 2017 - 10:05 am | जुइ

पुण्यात कुठे मिळेल ते ठावूक नाही पण हिवाळा सुरू होतच आहे तर दौलत की चाट खाण्यासाठी एक दिल्लीवारी करू शकताच :-) .

सस्नेह's picture

23 Oct 2017 - 12:17 pm | सस्नेह

रसाळ पाकृ आणि तसलेच वर्णन !

वॉव पाकृ देण्याची पद्धत आवडलीच. पाककृतीही हटके आहे. खुप छान.

जुइ's picture

26 Oct 2017 - 10:07 am | जुइ

पाककृती प्रकाशित करण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. तसेच 'दौलत की चाट' हा पदार्थही या निमित्ताने प्रथमच बनवून पाहिला.
दिवाळी अंकासाठी या पाककृतीची निवड केल्याबद्दल साहित्य संपादकांचे आभार मानते.
प्रोत्साहनासाठी सर्व वाचकांना व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.

अनिंद्य's picture

1 Nov 2017 - 4:14 pm | अनिंद्य

@ जुइ,

प्रचंड खटाटोपाचा आणि पेशन्सचा प्रकार आहे हो - तुम्ही स्वतः केला, गजब !

सुंदर - क्रमवार - बहारदार - सचित्र पाककृती पण आळशी लोकांना करून पाहता येईल असे वाटत नाही :-)

जुन्या दिल्लीतील चांदनी चौक भागात जे काही खाण्यापिण्याचे खास अड्डे आहेत त्यातील दौलत की चाट आणि हजारीलालकडे मिळणारा 'खुरचन' नावाचा प्रकार ह्या प्राणप्रिय आठवणी तुमच्या ह्या रेसेपीमुळे जाग्या झाल्या. वर कुणीतरी लिहिल्याप्रमाणे आता ते लखनवी निमिष पण कधी खायला मिळेल याचे वेध लागले आहेत :-)

जेम्स वांड's picture

2 Nov 2017 - 10:42 am | जेम्स वांड

हा सेम प्रकार वाराणसीत पण मिळतो , आणि त्याला तिथे 'मलाईयो' असं एक लोभस नाव आहे, विश्वेश्वर मंदिराजवळ अन अस्सल "खाटी" (विशुद्ध) दूधदुभत्याची बनारसी मंडी उर्फ गोदौलिया ह्या एरियात अक्षरशः शेकडो मलाईयो विकणारे आहेत. आधी कपात मलाईयो देतात, आईसक्रीम खायच्या लाकडी चमच्यासोबत शेजारीच त्याच्या दुधाचे भांडे असते, चवीचवीने मलाईचा आस्वाद घेतला की ती ज्यात सर्व केली ते कुल्हड दुकानदाराकडे परत द्यायचं मग तो त्यात ते उरलेलं दूध डच्च भरून देतो, ते चमच्याने हलवून उरलेला फेस-मलाई त्यात घोळून कुल्हड स्वच्छ करून पिऊन टाकायचं अन मग निवांत बाबा की हर हर म्हणत अस्सी घाटावर संध्याकाळची गंगा अनुभवत बसून राहायचं, असं हे एकंदरीत कर्मकांड असे

तुमच्या खटाटोपाला दंडवत

(बनारस प्रेमी) वांडो

पियुशा's picture

17 Nov 2017 - 3:24 pm | पियुशा

____/\_____ घ्या अस काय करायचा विचार स्वप्नात पन नाय येनार !