बदाम केशर कतली

रुपी's picture
रुपी in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am


बदाम केशर कतली

साहित्य :

  • १ वाटी बदाम,
  • १/२ वाटी साखर,
  • केशराच्या १०-१२ काड्या,
  • १ टे. स्पून दूध,
  • १ टी स्पून तूप,
  • पाणी

कृती :
१. एका वाटीत चमचाभर कोमट दूध घेऊन त्यात केशराच्या काड्या चुरून घाला.
२. एका भांड्यात एक वाटी बदाम साधारण दुप्पट पाण्यात भिजवा आणि आचेवर ठेवा.
३. पाणी उकळले की आच बंद करा आणि बदाम एका चाळणीवर टाका. त्यावर लगेच थोडेसे गार पाणी सोडा. यामुळे बदामाची साले सहज निघतील. सर्व बदामांची साले काढून घ्या.
४. एका सुती कापडावर सर्व सोललेले बदाम पसरवा आणि थोडा वेळ वाळू द्या.
५. बदाम कोरडे झाले की, मिक्सरमध्ये फिरवून त्याची पूड करून घ्या. मिक्सरमध्ये फार वेळ फिरवू नका नाहीतर तेल सुटेल. ही पूड एका ताटलीत काढून घ्या.
६. एका भांड्यात किंवा कढईत १ वाटी पाणी आणि १/२ वाटी साखर घ्या. मध्यम आचेवर ठेवा आणि अधूनमधून ढवळत राहा.
७. सर्व साखर विरघळून पाण्याला उकळी आली की त्यात बदाम पूड घाला.
८. मिश्रण जळणार नाही याची काळजी घेत हलवत राहा. हे मिश्रण सुरुवातीला ओलसर असेल.
९. साधारण ८-१० मिनिटांनी ते एकत्र यायला लागेल. यात दुधात एकत्र केलेले केशर घालून आणखी २-३ मिनिटे हलवत राहा. मिश्रण भांड्यापासून सुटून एकत्र गोळा झाले की आच बंद करा.
१०. थोडेसे मिश्रण घेऊन त्याची गोळी करता आली, तर ते हवे तसे कोरडे झाले आहे.
११. ताटाच्या मागच्या बाजूला तुपाचा हात लावून त्यावर किंवा एका बटरपेपरवर हे मिश्रण जरासे थंड होण्यासाठी काढून ठेवा.
१२. ५ मिनिटांनी लाटण्याने सर्व बाजूंनी एकसारखे लाटा.
१३. वड्या जितक्या जाड-पातळ हव्यात तेवढे लाटून झाले की वड्या पाडून घ्या.

केशर घातल्याने या कतलीला वेगळाच स्वाद आणि सुरेख पिवळसर रंग येतो. अगदीच झटपट आणि घरात आहे त्या साहित्यात होणार्‍या या मिठाईचा दिवाळीत आनंद लुटा!

प्रतिक्रिया

जुइ's picture

21 Oct 2017 - 12:07 am | जुइ

सोपी वाटत आहे पाकृ करायला. नक्की करेन. बाकी फटु हवे होते.

केशराचा रंग सुंदर आलाय. आवडली सोपी पाककृती. बदामाची तयार पूड वापरूनही करता येईल. एक वाटी बदामांची अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त पूड झाली का? म्हणजे त्या प्रमाणात साखर घेता येईल.

पाकृ आवडली. काजूकतलीच्या धर्तीवर बदामाची करता येईल का हा विचार चालला होता कारण आमच्याकडील बदाम! "ही आजकालची मुले" या चालीवर "हे आजकालचे बदाम" असे म्हटल्यास चालेल अशी परिस्थिती आहे. पूर्वी बदामाची मोठी पाकिटे आणल्यास चालत असे पण आजकाल लहान, मोठी पाकिटे आणून महिना होईतो कडसर होतात.
फ्रिजमध्ये ठेवण्याचा उपाय सोडता सर्व केले. मग बदामाची कतली करता आली तर बरे होईल असे वाटले होते. पाकृ आल्याने माझी सोय झाली.

धन्यवाद.. नक्की करुन पाहा.
पण नाहीच वेळ मिळाला करायला तर बदाम खरंच फ्रिजमध्ये ठेवायलाच हवेत.
मलाही काजूकतलीच्या धर्तीवर करावीच लागली. कारण जिथेतिथे काजूकतली मिळते, पण आमच्याकडे त्याची ऍलर्जी.

इशा१२३'s picture

21 Oct 2017 - 9:29 am | इशा१२३

मस्त!करुन बघते.

सविता००१'s picture

21 Oct 2017 - 10:23 am | सविता००१

मस्त पाककृती आहे

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2017 - 11:27 am | श्रीरंग_जोशी

बदाम केशर कतली हे नाव वाचताच थोडी तरी क्लिष्ट पाककृती असेल असे वाटले होते. पण पाकृ वाचून झाल्यावर बर्‍यापैकी सुटसुटीत आहे असे वाटते. पाककृती आवडली.

सस्नेह's picture

21 Oct 2017 - 12:20 pm | सस्नेह

छान सोपी आणि कसदार पाकृ !

पद्मावति's picture

21 Oct 2017 - 1:35 pm | पद्मावति

आहाहा..कातील कतली :)
मस्तच!

गोडाशी थोडं वाकडं आहे, पण साखर कमी घालून बनवून खाता येईल मला. सोपी पाककृती. मस्त! फोटोही आवडले. थोडे स्टेप बाय स्टेप फोटो अजून असते तर असं वाटलं.

रुपी's picture

24 Oct 2017 - 4:39 am | रुपी

हो.. कमी साखर घालून बघा. भिजवलेले बदाम असेही जरा गोडसर लागतात चवीला, त्यामुळे चालेले बहुतेक.

स्टेप बाय स्टेप फोटो - पुढच्या वेळी प्रयत्न करेन.. सध्या वेळ फार कमी मिळतो आणि पाकबिक करुन बनवायच्या गोष्टींत जरा वेळ चुकली की पाकृ बिघडलीच, त्यात आमच्यासारख्यांना पदार्थ बनवण्यापेक्षा जास्त वेळ फोटो काढायलाच लागतो =)

नूतन सावंत's picture

21 Oct 2017 - 4:30 pm | नूतन सावंत

झकास पककृतु

नूतन सावंत's picture

21 Oct 2017 - 4:30 pm | नूतन सावंत

झकास पककृतु

नूतन सावंत's picture

21 Oct 2017 - 4:31 pm | नूतन सावंत

झकास पाककृती

फ्रेनी's picture

22 Oct 2017 - 1:54 pm | फ्रेनी

छान आहे पाकृ

स्वाती दिनेश's picture

22 Oct 2017 - 3:25 pm | स्वाती दिनेश

सुंदर दिसते आहे बदाम कतली! केशराचा रंगही सुंदर आलाय.. मस्तच!
स्वाती

दीपा माने's picture

22 Oct 2017 - 8:21 pm | दीपा माने

करायला इतकी साधी सोपी पाकृ दिल्याबद्दल आभार.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2017 - 9:08 pm | अत्रुप्त आत्मा

क्रूण बघनेत यील!

जुइ's picture

23 Oct 2017 - 10:15 am | जुइ

दिवाळी अंकात ही पाककृती वाचून भाऊबीजेनिमित्त मी बदाम केशर कतली करुन पाहिली :-) .

या पाककृतीसाठी रुपीचे धन्यवाद

बदाम केशर कतली करून पाहिली. मिश्रण आळायला जास्त वेळ लागला. पाण्याचं प्रमाण थोडं कमी हवंय असं वाटलं. रंग आणि चव मात्र खूप छान. कृती इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

.

रुपी's picture

24 Oct 2017 - 4:00 am | रुपी

अरे वा! पाकृ प्रकाशित झाल्यापासून मी लॉग-इन करेपर्यंत दोनजणांनी करुन पाहिली आणि फोटोसुद्धा टाकले! धन्यवाद जुइ आणि निशाचर. दोन्हीही फोटोंत कतलीचा रंग खूप सुंदर आलाय. आवर्जून इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

रुपी's picture

24 Oct 2017 - 4:40 am | रुपी

सर्वांना धन्यवाद! :)

II श्रीमंत पेशवे II's picture

26 Oct 2017 - 3:11 pm | II श्रीमंत पेशवे II

मस्त रेसिपी

पायरेक्स मधून काय मागवलय ??

अनिंद्य's picture

1 Nov 2017 - 3:46 pm | अनिंद्य

@ रुपी,

सोपी पाककृती आणि सुंदर फोटो :-)

गरम पाण्यात न भिजवता बदाम २ तास साध्याच पाण्यात भिजवले आणि एकदम पूड न करता जरा रवाळ केले तर जास्त चांगले टेक्शर येईल असा माझा अनाहूत सल्ला.

काजूकतलीपेक्षा मला नेहेमीच बदाम कतली जास्त आवडते - त्यातल्या त्यात 'हेल्दीयर' :-) दिल्लीचा नत्थू, हैद्राबादचा पुल्लारेड्डी (तो साखर थोडी जास्तच घालतो), तिथलाच दादू आणि इंदोरचा अजून एक हलवाई ह्या एका मिठाईसाठी माझ्या 'मस्ट व्हिझिट' श्रेणीत आहेत. तुमच्या ह्या पाककृतीमुळे मनानी सगळीकडे फिरून आलो, अनेक आभार !

काजूकतली पेक्षा बदाम कतली बरीच जाड ठेवतात हे सर्व प्रसिद्ध हलवाई - कारण काय माहित नाही.

धन्यवाद अनिंद्य. खरंय.. असाही मिक्सर फार वेळ फिरवला नाही की जरा रवाळच होते बदाम. मी बदाम कतली दुकानात पाहिली नाही फारशी. इथे तर कमी मिठाईचे प्रकार असतात, त्यात काजू कतली मात्र कंटाळा यावा इतकी दिसते. पुढच्या वेळी मीही जरा जाड ठेवून बघेन कतली.

श्रीमंत पेशवे, धन्यवाद. तुमचा प्रश्न मला समजला नाही.

ही पाकृ दिवाळी अंकात घेतल्याबद्दल सा.सं.चे आभार मानायचे राहिले होते. शिवाय, वर केशरी रंगात 'केशर' लिहिलंय, याबद्दलही खास धन्यवाद :)

श्रीरंग_जोशी's picture

2 Nov 2017 - 10:54 am | श्रीरंग_जोशी

पायरेक्सच्या प्लास्टिकच्या डब्यांचा संदर्भ असेल. परंतु पाकृच्या फोटोत पायरेक्सचे उत्पादन वापरल्याचे दिसत नाही.

जागु's picture

2 Nov 2017 - 10:56 am | जागु

मस्तच पाककृती

पियुशा's picture

17 Nov 2017 - 3:04 pm | पियुशा

वा जाम भारिय कातील क ..त ..लि.. :)

छान पाकक्रूती. श्रीमंत पेशवे यानी तो प्रश्न जुइ याना विचारलाय बहुतेक.

धनुडी's picture

30 Nov 2017 - 2:33 pm | धनुडी

पायरेक्स वाला प्रश्न