ब्रॉडबँडचा वापर करुन आय पी फोन वापरता येईल का ?

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in तंत्रजगत
17 Oct 2017 - 7:23 pm

घरातील ब्रॉडबँडचा इंटरनेटचा वापर करुन आय पी फोन वापरता येईल का ?
माझ्या घरी मोबाईलच्या नेटवर्क अनेकदा खूप खराब असते. कॉल ड्रॉप होणे, नीट ऐकू न येणे ई ई चालूच असते [स्थळ : चिंचवड]
पण ब्रॉडबँड इंटरनेट सेवा (आयडिया) बर्‍यापैकी चांगली आहे.
तर या उपलब्ध ब्रॉडबँड सेवेचा वापर करुन मी घरी आय पी फोन वापरु शकतो का ? असल्यास कसे ?

मुख्य उद्देश घरात असताना सहज व नीटपणे कॉल व्हावेत इतकाच आहे म्हणून इतर काही पर्याय असल्यास सुचवू शकता. पण खालील पर्यांयाचा मी आधीच विचार केलाय.
--> दूसरी मोबाईल सर्विस वापरणे. पण या ठिकाणी सगळ्याच सर्विस (थोड्याफार फरकाने) खराब आहेत
--> मोबाईल नेटवर्क बुस्टर वगैरे नावाची साधनं ऑनलाईन बाजारात उपलब्ध आहेत, पण त्यांची विश्वासार्हता माहित नाही आणि नेटवर्कमध्ये उगाच किंचितशी सुधारणा करुन देणारा पर्याय नको आहे.
--> इंटरनेटचा वापरकरुन व्हॉटस अ‍ॅप कॉल केला जावू शकतो (आणि अनेकदा करतोही), पण लँडलाईनवर तसेच व्हॉटस अ‍ॅप न वापरणारे , नेहमी ऑनलाईन नसणारे ई ई यांना कॉल करता येत नाही. शिवाय व्हॉटस अ‍ॅपमधून कॉल करता यावा यासाठी तो क्रमांक आधी मोबाईलवर साठवावा लागतो, जे कंटाळवाणे काम आहे.
--> हँगआउटवरुन कॉल करता येतो, पण भारतातील मोबाईल / लँडलाईनला करता येत नाही
--> स्काईपनेही भारतातील मोबाईल / लँडलाईनला कॉल करता येत नाही

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

17 Oct 2017 - 7:46 pm | पगला गजोधर

ब्रॉडबॅण्ड राउटरवर घेता येईल का ? का फक्त डेस्कटॉपलाच कनेक्ट आहे (सिंगल पॉईंट ब्रॉडबँड कनेक्शन)
जर राउटर वर असेल तर मोबाईल वायफाय वरून राऊटरला कनेक्ट व्हा...
व्हाट्सअप मध्ये व्हॉइस कॉल फॅसिलिटी आहे ती वापरू शकता ...

मराठी कथालेखक's picture

17 Oct 2017 - 7:49 pm | मराठी कथालेखक

व्हाट्सअप मध्ये व्हॉइस कॉल फॅसिलिटी आहे आणि ती मी वापरु शकतो, वापरतोही (मी वर लिहिलेच आहे, तुम्ही पुर्ण लेख वाचलेला दिसत नाही, असो.)
पण व्हाट्सअप वरुन लँडलाईनला, व्हॉटस अप न वापरणार्‍यांना वा त्यावेळी ऑनलाईन नसणार्‍याला कॉल करता येत नाही.

अमर विश्वास's picture

17 Oct 2017 - 9:08 pm | अमर विश्वास

VOIP वापरून PSTN ला कॉल करणे हे भारतात बेकायदेशीर आहे...

मराठी कथालेखक's picture

18 Oct 2017 - 11:03 am | मराठी कथालेखक

असं कसं काय , मग तर जिओ वरुन पण कॉल बेकायदेशीर होईल ना.
कंपनीत पण voip phone असतात त्यांवरुन PSTN ला कॉल करता येतो.

त्यासाठी DOT दूरसंचार खात्याकडून विशेष परवाना घ्यावा लागतो.

लई भारी's picture

21 Oct 2017 - 10:30 am | लई भारी

Jio च नेटवर्क पूर्ण IP आहे, म्हणजे त्यांच्याकडे 2G वगैरे प्रकार नाही, थेट LTE (4G) आहे. त्यांचं लायसन VoLTE साठीच आहे. म्हणूनच त्यासाठी जुने फोन चालत नाहीत.

घराच्या आत रेंज नाही परंतू घराबाहेर रेंज चांगली आहे अशी परिस्थिती कोकणात( अलिबागजवळ) काही ठिकाणी पाहिली आहे. कारण नारळ पडून कौले फुटतात म्हणून पत्रे घातल्यावर रेंज गायब झाली.

चिकित्सक's picture

19 Oct 2017 - 9:11 pm | चिकित्सक

हे करता येईल पण आइडिया ब्रॉडबॅंड ही बेभरावश्या ची सेवा प्र्दाता आहे , मी सुद्धा ह्यांच्या दळभद्रि सेवा चा भोक्ता आहे आणि पी सी एम सीत पिंपळे सौदागर भागात तरी ह्यांची सेवा अशी तशीच आहे |

ह्यासाठी तुम्हाला लागेल वॉईप अडॅप्टर , गुगल वाय्स अकाउंट, बेसिक फोन आणि स्टेबल ब्रॉडबॅंड कनेक्षञ ( शक्यतो आइडिया टाळा) ह्याना कन्फिगर करण्याची विधी तुम्हाला ऑनलाइन मिळेळच पण जरा वेळ आणि ट्रायल एरर ची तयारी हवी , भारतात तरी मी हे कन्फिगर केलेले कुणाला बघितले नाही कारण बेसिक फोन सेवा वॉईप हून सवस्त पडते |

त्यापेक्षा स्वस्तातला उपाय आजकाल ऐरटेल चांगले कोम्बो प्लान्स देते फुकट लँड लाइन सोबत ६० जीबी ८ एमबीपीएस स्पीड चा अन् लिमीटेड प्लान सुमारे १२०० रुपयांत पडतो , शिवाय त्या लँड लाइन चा उपयोग तुम्ही सोसायटीत इंटरकॉम म्हणून पण उपयोग करू शकता , ह्या व्यतिरिक्त बरेच प्लान्स उपलब्ध आहेत , त्यांच्या साइट वर आणखी माहिती घेऊ शकता |

सर्कारी बीएसएनएल सेवा जर त्या भागात असेल तर हीच घ्या कारण बीएसएनएल चे वाइयर्ड नेटवर्क ला तोड नाही , त्यांच्ये सर्व बेसिक प्लान किमान ८ एमबीपीएस नि सुरू होतात , अन्लिमीटेड कोम्बो प्लान ८०० + टॅक्स ला पडतात |

जर आइडिया चीच सेवा घ्यायची असेल तर काही दिवस आइडिया आणि वॉडफ़ोन च मर्जर होई पर्यंत थांबा , नवी कंपनी लवकरच नवे प्लान आणतील , सध्या तरी आइडिया टाळाच |

लई भारी's picture

21 Oct 2017 - 10:38 am | लई भारी

वॉईप अडॅप्टर , गुगल वाय्स अकाउंट, बेसिक फोन आणि स्टेबल ब्रॉडबॅंड कनेक्षञ

हे नक्की कस करता? गुगल व्हॉइस अकाऊंट वरून भारतात लँडलाईन कॉल करता येतो का? अर्थातच ही सेवा फुकट नसेल.
तरीपण मला शंका आहे कि हे भारतात कायदेशीर आहे का? मी काही लोकांना अमेरिकेतले काही VoIP फोन इथल्या ब्रॉडबँड ला जोडलेले पाहिलेत; असे लोक शक्यतो अमेरिकेतल्या लोकांशी(नातेवाईक) बोलायला वापरायचे. ते पण कायदेशीर नसावे बहुधा.

चिकित्सक's picture

21 Oct 2017 - 7:03 pm | चिकित्सक

ह्या लिंक वर टिचकी मारा , ह्यात डीटेल्ड स्टेप्स दिल्या आहेत , तुमच्या अडॅप्टर च्या प्रमाणे दोन चार स्टेप्स इकडे तिकडे होतील , पण वॉईप कन्फिगर करण्यासाठी बेसिक गाइड्लाइन हीच |

https://www.wikihow.com/Set-Up-Voice-over-Internet-Protocol-(VoIP)-in-Your-Home

गुगल वाय्स ब्द्द्ल माहिती त्यांच्या साइट वर बघावी , तशी ही लिंक उपयोगी पडेल पण ही २०१३ साला ची आहे , तो वर गुगल वॉइस अमेरिकेतच सेवा द्यायची. पण भारतात चालवायला जरा जुगाड करावा लागेल

http://www.callingallgeeks.org/how-to-get-google-voice-account-india-cou...
http://trak.in/tags/business/2011/02/24/google-voice-activated-india/

आता वॉईप वरुन भारतातल्या लँड लाइन वर कॉल लागतात का ह्यांचे उत्तर तसे सरळ नाही , तुमची यूज़केस वेगळी आहे भारतात वॉईप वरुन पीएस्टीएन कॉल करता येतात का , ह्या प्रश्ना चे उत्तर तसे सरळ नाही , वर एका मिपा कराने सांगितले की वॉईप साठी डॉट ची पर्मिशन घ्यावी लागते ते बरोबर आहे पण ट्राय ने अश्या रेग्युलेशन्स लावलेत कि वॉईप वर सरसकट रेसिडेन्षियल यूज़र ना कॉल करता येणार नाही , अर्थात काही लोकानी तिकडम भिडवून ह्या वर उपाय काढला आहे पण ही सेवा फुकट नाही आणि वॉईप तर त्याहून नाहीच ते यूएमस वर कॉल रूट करतात |

ही लिंक तुमच्या बर्‍याच प्रश्नानाचे उत्तर देऊ शकेल

https://www.quora.com/Since-VoIP-is-pretty-much-illegal-in-India-how-do-...

टाटा वॉकी सारखी सेवा उपयोग तुम्ही करू शकता ही तुमच्या यूज़केस मध्ये फिट बसेल , ही लीगल सुद्धा आहे , वायरीची कटकट नाही आणि सगळी कडे कॉल्स सुद्धा लागतील , सिदीएमए वर चालणारी ह्या सर्विस च कवरेज आणि नेटवर्क जबरदस्त आहे , पण ही सेवा फुकट नाही|

मराठी कथालेखक's picture

21 Oct 2017 - 11:00 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद, तुम्ही दिलेल्या माहितीचा अभ्यास करतो.
बाकी टाटा वॉकी चा विचार केला असता पण टाटाचं टेलिकॉममधलं अस्तित्व बरच डळमळीत झालंय. टाटांपेक्षा एअरटेलवर जास्त भरवसा वाटतो, त्यांचा लँडलाईन मिळाला तरी बरे होईल. पण बहूतेक तरी तो मिळत नाही ... आता बी एस एन एल घ्यवा लागेल असं दिसतंय :)

मराठी कथालेखक's picture

21 Oct 2017 - 10:53 pm | मराठी कथालेखक

हो साधा लँडलाईन फोन घ्यायचाही विचार करतो आहे, पण एअरटेल चा माझ्या सोसायटीत मिळत नाही बहूधा. तरी पुन्हा एकदा बघेन.
आयडीया ब्रॉडबँड माझ्याकडे तरी बर्‍यापैकी ठीक चालते. आयडीया मोबाईल नीट चालत नाही.
एअरटेलचे ४जी मोबाईलमध्ये तितकेसे चांगले चालत नाही पण तेच सिम त्यांच्या राउटर मध्ये (हॉटस्पॉटमध्ये पण नाही , फक्त राउटर) टाकून , एका विशिष्ट ठिकाणी ठेवल्यास मस्त चालते. पण ते महाग पडते ब्रॉडबँडच्या तुलनेत.

मराठी कथालेखक's picture

22 Oct 2017 - 2:05 pm | मराठी कथालेखक

तुमच्याकडे आयडिया ब्रॉडबँड नीट चालत नसेल तर तुम्ही जॉईस्टर ब्रॉडबँडचा विचार करु शकता, हे स्थानिक सेवा पुरवठादार आहेत पण त्यांची सेवा तत्परता चांगली आहे आणि आयडियापेक्षा ब्रॉडबँडपेक्षा स्वस्त. मी वापरत होतो पुर्वी , बाकी इंटरनेट ठीक होते पण का कुणास ठावूक माझ्या ऑफिसचे व्ही पी एन नीट चालत नसे, आणि काही कारणाने मला महिनाभर घरुन काम करायचे होते. मग पुन्हा आयडिया ब्रॉडबँड घेतले.
चिंचवडमध्ये या ठिकाणी रहायला आल्यापासून माझा एअरटेल ४जी, आयडिया , तिकोना, जॉईस्टर आणि पुन्हा आयडिया असा प्रवास झाला.
पैकी एअरटेल ४जी - उत्तम पण महाग, .. त्यावेळी सुमारे ११०० ला १०जीबी मिळायचे, आता स्वस्त आहे , शिवाय प्रीपेडवर पण उपलब्ध आहे पण आधी सारखा अगदी १८-२० mbps चा speed मिळत नाही (२०१५ मध्ये मिळायचा) तरी चांगले आहे... पण चांगले स्पीड हवे असेल तर सिम राउटर मध्येच वापरावे लागते, मोबाईल वा हॉटस्पॉटमध्ये फारसा स्पीड मिळत नाही.
तिकोना - आयडिया पेक्षा स्वस्त म्हणून तिकोना घेण्याची चुक केली. ...अत्यंत वाईट सेवा, नेट सतत बंद पडणे, आणि नेट बंद पडलय हेदेखील ग्राहक सेवा विभाग लवकर मान्य करत नाही.
जॉईस्टर - वर म्हंटलेच आहे, सेवेतली तत्परता नक्कीच वाखाणण्याजोगी होती. २०१६ च्या ऑगस्टमध्ये हे बंद केले. जॉईस्टरचे कनेक्शनला PPPoE device लागत नाही, त्यामुळे बैठकीच्या खोलीतले दर्शनी भागातले एक अ‍ॅडप्टर , वायर ई जंजाळ कमी झाल्याने बायकोला हे कनेक्शन जास्त आवडत होते :)
आयडीया - २०१५ मध्ये काही महिने २ mbps चे कनेक्शन होते. एकदम मस्त चालायचे कनेक्शनमध्ये अतिशय सातत्य, नंतर मी बंद केले आणि ऑगस्ट २०१६ मध्ये पुन्हा चालू केले. त्यानंतर काही महिन्यांपुर्वी खूप खराब चालत होते. मी सातत्याने तक्रारी करत राहिलो, कनेक्शन बंद करायची धमकी , 'तुम्ही नक्की ब्रॉडबँडच चालवत आहात ना' वगैरे आशयाचे खोचक प्रश्न वगैरेनी भरलेल्या मेल्स लिहित रहायचो... आणि एक दोन महिन्यांनी सेवा सुधारली. आता upto 4 mbps चे कनेक्शन आहे. ३+ चा स्पीड असतो बहूतेककरुन.

नुमविय's picture

21 Oct 2017 - 12:37 am | नुमविय

माझ्या घरी देखील हाच प्रॉब्लेम आहे... मी वाय फाय कॉलिंग फीचर वापरतो ... तुमच्या मोबाइलला मध्ये ते असणं आवश्यक आहे... अजून एक मुद्दा म्हणजे मला माहित नाही कि ते भारतात चालत कि नाही...

लई भारी's picture

21 Oct 2017 - 10:34 am | लई भारी

म्हणजे नेमकं काय करता याबद्दल उत्सुकता आहे. तुम्ही भारतात आहेत कि बाहेर?
माझ्या माहितीप्रमाणे हे बहुधा VoLTE सेवा असली तरच चालू शकेल, जेणेकरून वाय-फाय उपलब्ध असताना तुमचा व्हॉइस कॉल वाय-फाय वरून कनेक्ट केला जातो(मोबाईल LTE नेटवर्क ऐवजी) .
मी जिओ वापरलं नाही, त्यामुळे भारतात हे शक्य आहे कि नाही माहीत नाही.

मी हे US मध्ये वापरात आहे... साधारण खालील प्रमाणे ते काम करता ...मला कल्पना नाही कि भारतात हे उपलब्ध आहे कि नाही ते... पण जर तुमच्याकडे चांगला वायफाय असेल तर हा अतिशय उत्तम पर्याय आहे..

With Wi-Fi Calling, you can call, text, and use Visual Voicemail as you do on the cellular network. While in the U.S., Wi-Fi Calling is used when a cellular signal is weak or unavailable. ... You need a smartphone that supports Wi-Fi Calling and a postpaid wireless account that is set up for AT&T HD Voice.

चामुंडराय's picture

21 Oct 2017 - 8:39 am | चामुंडराय

.

मराठी कथालेखक's picture

21 Oct 2017 - 11:00 pm | मराठी कथालेखक

मॅजिक जॅक काय असतं ?

मॅजिक जॅक हे छोटेसे VOIP फोनचे उपकरण आहे त्याच्यावरून फोन करता येतो.
सध्या संपूर्ण ऊसगावांत आणि कांदागावांत चकटफू फोन करता येतो.
याचे दर देखील माफक आहेत, जॅक ५० रुपयांना आणि वार्षिक फि फकस्त १० रुपये आहे.

भारताबद्दल चाल्तो का नाही कल्पना नाही परंतु चौकशी करून बघा.

मॅजिक जॅक हे छोटेसे VOIP फोनचे उपकरण आहे त्याच्यावरून फोन करता येतो.
सध्या संपूर्ण ऊसगावांत आणि कांदागावांत चकटफू फोन करता येतो.
याचे दर देखील माफक आहेत, जॅक ५० रुपयांना आणि वार्षिक फि फकस्त १० रुपये आहे.

भारताबद्दल चाल्तो का नाही कल्पना नाही परंतु चौकशी करून बघा.

मराठी कथालेखक's picture

22 Oct 2017 - 1:44 pm | मराठी कथालेखक

हा हा,, मला आता चिंचवड सोडून उसगावात किंवा कांदागावात (कॅनडा ना ?) रहायला जावे लागेल.

चामुंडराय's picture

21 Oct 2017 - 8:39 am | चामुंडराय

.

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Oct 2017 - 4:50 pm | अनिरुद्ध.वैद्य

आपण जे करू इच्छिता ते, माझ्या माहितीप्रमाणे भारतात कायदेशीर नाही. त्यामुळे जरा सांभाळूनच.

काही वर्षांअगोदर स्काईपवर फोन आउट नावाची सुविधा होती लँडलाईनवर कॉल करायला. ती आहे का बघा, अर्थात ही चार्जेबल आहे.

रिलायन्स जिओ हे 4G नेटवर्क आहे ते डेटा प्रोवाईड करते. अन त्यात फोन कॉल्सदेखील डेटावरच चालतात. पण हे सगळे लायसेन्सिंग आदी करून झालेलं असल्याने जीओचे फोन अन सामान्य व्हॉईप फोन ह्यांची तुलना होऊ शकत नाही.

मराठी कथालेखक's picture

21 Oct 2017 - 11:04 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद, मी कायदेशीर पर्याय शोधतो आहे. VOIP अधिकृतरीत्या देणारी एक कंपनी सापडली आहे. पण साधा फोन / लँडलाईनच्या तुलनेत महाग वाटतेय. तरी मोबाईल नेटवर्कचा खूपच त्रास असल्याने विचार करतो आहे. http://doorvaani.com/voip_rates

धर्मराजमुटके's picture

25 Oct 2017 - 11:15 am | धर्मराजमुटके

वाय-फायवरूनही फोन कॉल करता येणार

मोबाइल फोन करायचाय? नेटवर्क नाही?..आता चिंता करायची गरज नाही. कारण लवकरच तुम्हाला कोणत्याही मोबाइल, लँडलाइन क्रमांकावर ऑफिस किंवा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या वाय-फायवरून कॉल करता येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) इंटरनेट टेलिफोनीला मंजुरी दिली आहे.
ही बातमी वाचा !