दृकश्राव्य विभाग :- मार्टिन पुणेकर पाटील

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

Header2

कधी कधी मिपासाठी काम करताना "याच साठी केला होता अट्टाहास" असं वाटतं. मार्टिनशी ओळख ही त्याच प्रवासाची सुरूवात. मार्टीन हा आपल्या कौशिक लेलेंचा शिष्य. वेल्लाने त्याचा युट्युबवर एक व्हिडीओ पाहुन आपल्या अंकासाठी काही बोलण्याची गळ घातली. तो सुद्धा उत्साही माणूस निघाला आणि त्याने लगेच होकारही दिला. होकार तर दिला पण पहिले आठ पंधरा दिवस काहीच हालचाल नाही. आम्ही आपले मध्येच त्याला हलवून यायचो. देतोय देतोय.. काही तरी काम करतोय.. असं म्हणत म्हणत अंक आठवड्यावर आला. अजून काहीच हाती आले नव्हते.

अखेर एक दिवस महाशय म्हणाले की आपण स्काईप करुया का? आम्ही तर एका पायावर तयार होतोच! स्काईपवर पहिला बॉम्ब फुटला जेव्हा मार्टीन म्हणे मी चाललोय परवा विपश्यनेसाठी पोलंडला! मला खरं तर तुम्हाला सरप्राईज द्यायचंय म्हणे. पण आता वेळ नाही पुरत तर सांगावच लागेल. म्हणलं भाऊ, आक्खं मिसळपाव.कॉम आहे सरप्राईज व्हायला, तू आम्हाला तर दे ना फाईल! म्हणला माझं एक आवडतं मराठी गाणं आहे, त्याच्या बीट्स वर सगळं बसवताना माझा वेळ गेलाय. तरी मी जाईपर्यंत हे काम करणारच. अत्यंत जड मनानी फार तर स्क्रिन प्ले देतो म्हणाला. त्याचं सरप्राईज हजारो लोकांपैकी २ लोकांसमोर फुटलं ह्याचं काय ते अतोनात दु:ख!

आणि महाराज, तो स्क्रिन प्ले पाहिला तोच क्षण जेव्हा वाटलं याच साठी केला होता अट्टाहास!

martin

एका अभारतीय माणसाच्या नजरेतून भारत पहाणं किती मनोहर असू शकतं हे पहिल्यांदा जाणवलं. इतक्या आत्मीयतेने कुणी आपल्या देशाबद्दल बोलतंय ही भावनाच फार सुंदर होती. मार्टीन जाण्याच्या आदल्या पहाटे ४ पर्यंत काम करत राहिला आणि शक्य तितक्या गोष्टी देऊन गेला. पुढे त्याच्या तब्बल ९१ ऑडीओ फाईल्स आणि खूप सारे फोटो घेऊन हा व्हिडीओ मी पूर्ण केला. आता मार्टीनच्या कन्सेप्टला धक्का न लागू द्यायची काळजी घेतली तरी थोड्या तडजोडी कराव्या लागल्यात. त्या सार्‍या चुका पिराच्या खात्यात टाका, दाद मात्र मार्टिनला द्या!

Footer

प्रतिक्रिया

सही रे सई's picture

18 Oct 2017 - 1:46 am | सही रे सई

मस्तच जमलयं.. मार्टीन च विशेष कौतुक. नवीन भाषा या वयात शिकण , ती आत्मसात करण एव्हढंच नव्हे त्या भाषेतील लोकांच चपखल निरीक्षण करून ते मांडण .. खरच खूप खूप कौतुकास्पद.

कौशिक लेले's picture

18 Oct 2017 - 6:54 am | कौशिक लेले

खूपच छान , मजेशीर आणि आत्मविश्वासाने बोलला आहे. मी त्याला शिकण्यात मदत करू शकलो याचा आनंद आहे.
यातले काही फोटो आम्ही भेटलेलो तेव्हा काढल्याचं आठवतंय .

लाल टोपी's picture

18 Oct 2017 - 8:15 am | लाल टोपी

असे उपक्रम पहिले की मिपा कुटुंबाचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो.
या माणसाचे निरीक्षण जबरदस्त आहे. मराठी किती उत्तम बोलतो. अप्रतिम...

सविता००१'s picture

18 Oct 2017 - 10:47 am | सविता००१

काय मस्त बोललाय हा मार्टिन... भारीच.

गुल्लू दादा's picture

18 Oct 2017 - 12:58 pm | गुल्लू दादा

सुंदर उपक्रम...मार्टिन भाऊ लय भारी.

भारी व्हिडीओ.. लै लै आभार्स..!!!

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

18 Oct 2017 - 7:35 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

मार्टिनभाऊंंचा १० महन्यात भाषा शिकुन संस्कृृती जाणून घ्यायचा प्रयास खुप कौतुकास्पद आहे. मिपा चे विशेष धन्यवाद. तुमच्या प्रयत्नांंनी एका चांगल्या व्यक्तिची व अनुकरणीय गुणांंची ओळख झाली.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

18 Oct 2017 - 7:35 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

मार्टिनभाऊंंचा १० महन्यात भाषा शिकुन संस्कृृती जाणून घ्यायचा प्रयास खुप कौतुकास्पद आहे. मिपा चे विशेष धन्यवाद. तुमच्या प्रयत्नांंनी एका चांगल्या व्यक्तिची व अनुकरणीय गुणांंची ओळख झाली.

राघवेंद्र's picture

18 Oct 2017 - 11:16 pm | राघवेंद्र

पिरा छान झाली आहे मुलाखत.
मस्त बोलला आहे मार्टिन भाऊ

पाषाणभेद's picture

19 Oct 2017 - 8:26 am | पाषाणभेद

मार्टीन भावा तोडलंस बाबा. एक लंबर.
आणि मला काय माहीत की मिपावाले असलेही लेखाचे व्हिडीओ बनवतील!
तसे माहीत असते तर माझ्यावाली अ‍ॅलीना रोमरची बी एक मुलाखत तोंड न दाखवता घेता आली असती की राव. लय मजा आली असती. जावूंद्या. पुढल्या येळंला करू!!!

http://www.misalpav.com/node/31121

तुमच्या मैत्रिणीला माझ्या मराठी शिकवणाऱ्या ब्लॉगची ओळख करून द्या. ती आधीच मराठी शिकली आहे त्यामुळे हे वराती मागून घोडे आहेत. तरीही तिने न शिकलेलं काही तिला सापडलं तरी ठीक. काहीनाहीतर किमान मला एका शिकणाऱ्याच्या नजरेतून अभिप्राय मिळेल.
माझ्या ब्लॉगची लिंक : http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in

धन्यवाद ,
कौशिक लेले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2017 - 11:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मार्टीनचं मराठी भाषा प्रेम आवडलं. संशोधनाचा विषय विज्ञान शाखेचा असला तरी व्यवहार उपयोगासाठी त्याने शिकलेल्या मराठी भाषेचं खरंच कौतुक आहे. एक नव्हे तर बारा भाषा येतात हे ऐकून तर, बाप रे.... असे सहजोद्गार तोंडून बाहेर पडले. शिकण्याची अपार इच्छेचं एक उत्तम उदाहरण मार्टीन वाटला. मुलाखत छान झाली आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या विषयाच्या संशोधनाबद्दल ऐकायला अजून आवडलं असतं. धन्स.

पिराच्या संयोजनाचं कौतुक करावं लागतंय (काय करता आता ) पण, मस्त उपक्रम. लगे रहो.... !

-दिलीप बिरुटे

कौशिक लेले's picture

19 Oct 2017 - 1:06 pm | कौशिक लेले

या चित्रफितीत तो छान बोलला आहेच पण तो कुठल्याही संहितेशिवाय उत्स्फूर्तही छान बोलतो.
या वर्षी एप्रिल मध्ये मी आणि मार्टिन त्याच्या पुण्याच्या घरी/हॉस्टेल मध्ये भेटलेलो . तेव्हा माझ्या आग्रहाखातर आम्ही एक चित्रफीत बनवलेली. ती पण तुम्हाला बघायला आवडेल. https://www.youtube.com/watch?v=कुओवुजो१इ३म
MartinSpeakingMarathiWithKaushik

शलभ's picture

20 Oct 2017 - 4:16 pm | शलभ

हा विडीओ पण मस्त..

अभ्या..'s picture

19 Oct 2017 - 1:20 pm | अभ्या..

वा

एस's picture

20 Oct 2017 - 6:01 pm | एस

एकच नंबर!

कौशिक लेले's picture

20 Oct 2017 - 6:31 pm | कौशिक लेले

प्रत्येकवेळी प्रतिसाद देताना किंवा लेख लिहिताना लिप्यंतराचा गोंधळ होतोय. मी एखादा दुवा टाकतो आणि त्याचं मराठीकरण झाल्याचं लक्षातच येत नाही.
वर माझ्या आणि मार्टिनाच्या संवादाबद्दल लिहिलं आहे त्याचा योग्य दुवा हा आहे
https://www.youtube.com/watch?v=KuovUJo1I3M

धन्यवाद.

अभिजीत अवलिया's picture

25 Oct 2017 - 6:15 pm | अभिजीत अवलिया

मस्त जमलयं ...

क्या बात है मार्टीनभाऊ. मस्तच!

निशाचर's picture

25 Oct 2017 - 9:01 pm | निशाचर

मस्त झालाय व्हिडिओ!

मिहिर's picture

26 Oct 2017 - 10:50 pm | मिहिर

छान.

व्हिडीओत 'लल्लाटी भंडार' गाण्याचा ऑडिओ का वापरलाय ते समजले नाही, मार्टिनच्या बाकीच्या बोलण्याशी तितके संबंधित वाटले नाही.

सस्नेह's picture

27 Oct 2017 - 3:09 pm | सस्नेह

सलाम मार्टिन भाऊंना !