तीखी पुरी

पद्मावति's picture
पद्मावति in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2

मिपाकरहो, आपल्या सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

दिवाळी म्हणजे घरोघरी फराळ, फटाके आणि पाहुणे या बिग थ्रीचे आगमन झाले असेलच. तर घरी येणार्‍या पाहुण्यांना फराळाबरोबर वाढायला आणि बच्चेकंपनीला येता जाता तोंडात टाकायला एक झटपट पाककृती आपण बघणार आहोत.

साहित्य -

  • कणीक २ वाट्या
  • मीठ,
  • हळद
  • लाल तिखट
  • तीळ
  • किंचित ओवा
  • १ लहान चमचा साखर विरघळलेले पाणी
  • तेल - साधारण अर्धी वाटी किंवा किंचित कमी

कृती -
कणकेत मीठ, हळद, लाल तिखट, तीळ, ओवा आणि तेल घालून कणीक नीट मिक्स करावी. मिक्स केलेले पीठ जरासे भरड दिसू लागेल इतपत तेल टाकावे.मग साखरेचे पाणी घालावे. मग साधे पाणी टाकून सगळे एकत्र करून छान मळून काढावे.


या पिठाच्या अगदी पातळ पुर्‍या लाटून घ्याव्या. लाटलेल्या पुर्‍या थोडा वेळ तशाच राहू द्याव्या. लगेच तळू नयेत.

लाटल्यानंतर एक दहा-पंधरा मिनिटांनी त्या पुर्‍या तेलात मंद आचेवर तळून घ्याव्यात. पुर्‍या फुलता कामा नये.


थंड झाल्या की डब्यात भरून ठेवाव्यात.


अगदी दहा- बारा दिवसही पुर्‍यांना काहीही होत नाही. छान राहतात. साखरेच्या पाण्यामुळे पुर्‍या क्रिस्पी होतात. टेक्श्चरही छान येते. गुजराती घरांमध्ये तर हा पदार्थ दिवाळीत हमखास बनवला जातो.
दिवाळीतच नाही, तर इतर वेळीही या पुर्‍या कधीही करून ठेवण्यासारख्या आहेत. चहाच्या वेळी खायला आणि प्रवासाला नेण्यासाठी उत्तम. दिवाळीच्या गोडाधोडाच्या जेवणावर उतारा म्हणून आणि दगदगीचा श्रमपरिहार म्हणूनसुद्धा या पुर्‍या आयत्या वेळी मस्त कामाला येतात. कुठलीही चटकन होणारी रस्साभाजी किंवा घट्ट दाल फ्राय बनवा आणि त्याबरोबर या खुसखुशीत पुर्‍यांचा आस्वाद घ्या.

Footer

प्रतिक्रिया

झकास! मस्त दिसत आहेत पुर्‍या.
करुन बघाव्याच लागणार..

पमीचान सुगरणपण आहे हे माहीतच नव्हतं ;)
भटकंती, लेख, कविता, अभिवाचन.. आता पाकृपण! ग्रेटच!

पगला गजोधर's picture

17 Oct 2017 - 12:25 am | पगला गजोधर

मस्तच

जुइ's picture

17 Oct 2017 - 2:10 am | जुइ

झटपट होणारी पाकृ आवडली. शिवाय कधीही करता येऊ शकते. फटु आवडले!

सविता००१'s picture

17 Oct 2017 - 6:23 am | सविता००१

मस्तच दिसताहेत पुर्‍या

बाजीप्रभू's picture

17 Oct 2017 - 7:11 am | बाजीप्रभू

फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं. किचन मधली स्वच्छता पाहून भारावलो.

विनिता००२'s picture

23 Oct 2017 - 3:23 pm | विनिता००२

किचन मधली स्वच्छता पाहून भारावलो. >> किती बारीक लक्ष बाई :)

राघव's picture

17 Oct 2017 - 1:57 pm | राघव

तोंपासु............!! मस्त आहेत.

मला स्वतःला मात्र कडक पुर्‍यांपेक्षा थोड्या नरम पुर्‍याच आवडतात.
दुपारच्या चहाबरोबर रोल करून खातांना तर त्यांची चवच भारी.. चहाची चव घेण्यापेक्षा त्यावेळेस पुर्‍यांची चव प्रायॉरिटीवर असते! :-)

पद्मावति's picture

17 Oct 2017 - 2:13 pm | पद्मावति

धन्यवाद राघव. मऊ पुर्‍या हव्या असतील तर यात साखरेचे पाणी हा घटक फक्त वगळावा. बाकी कृती तीच. आणि हो, ओवा पण टाकु शकता मऊ किंवा या कडक पुर्‍यांमधे सुद्धा. अशा मऊ पुर्या सुद्धा मस्तं टिकतात.

पगला गजोधर's picture

17 Oct 2017 - 4:00 pm | पगला गजोधर

कडकपणासाठी रवा थोडा टाकला तर चालेल का ?

रायनची आई's picture

17 Oct 2017 - 3:55 pm | रायनची आई

एक विचारायच होत..ह्या पुर्‍यांमधे थोडे बेसन नाही का घालत?

गजोधर आणि रायनची आई- अनुक्रमे रवा किंवा बेसन टाकले तरी हरकत नसावी. मी करून पाहयले नाही तसे. पण चांगलेच लागेल. ही पाककृती तशी फ्लेक्सिबल आहे.

पगला गजोधर's picture

17 Oct 2017 - 4:24 pm | पगला गजोधर

नै नै चवीसाठी नाही विचारलं .... समजा साखर वापरायची नसेल तर रवा टाकून अपेक्षित कडकपणा आला असता का पुरीला ??

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2017 - 4:27 pm | स्वाती दिनेश

पुर्‍या मस्त दिसत आहेत. आवडल्या.
स्वाती

नूतन सावंत's picture

17 Oct 2017 - 10:43 pm | नूतन सावंत

झकास दिसताहेत पुऱ्या.

रेवती's picture

18 Oct 2017 - 1:52 am | रेवती

फोटू व पाकृ मस्त.

रमेश आठवले's picture

20 Oct 2017 - 7:49 pm | रमेश आठवले

माझे लहानपण गुजरात मध्ये गेले. तेथे हा पदार्थ आमच्या मराठी घरी खाऱ्या पुऱ्या या नावाने बरेच वेळा बनवला जात असे.

इशा१२३'s picture

20 Oct 2017 - 10:51 pm | इशा१२३

मस्तच दिसताहेत पुर्या!छान पाकृ!

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2017 - 2:43 am | प्रभाकर पेठकर

माझ्या वडिलांचे बालपण गुजराथ मध्ये गेले त्यामुळे आमच्या घरातही गुजराथी पदार्थांचे प्राबल्य होते. खार्‍या पुर्‍या हा त्या पैकीच एक माझा आवडता पदार्थ. माझ्या लहानपणी अनेकदा व्हायचा. विशेषतः शाळेच्या सहलीच्या वेळी ह्या पुर्‍या आणि बटाट्याची पिवळी भाजी हा ठरावीक मेन्यू असायचा.
पद्मावतीचीही ही पाककृती करून पाहीनच. पण मलाही साखर वर्ज्य आहे आणि मीही मऊ पुर्‍यांचा भोक्ता आहे.

मस्तच, मला आवडतात ह्या पुऱ्या नरम.

सिरुसेरि's picture

21 Oct 2017 - 10:32 am | सिरुसेरि

फोटू व पाकृ मस्त.

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2017 - 11:22 am | श्रीरंग_जोशी

एका रुचकर पदार्थाची तपशीलवार पाककृती आवडली.
फोटो पाहून लगेच या पुर्‍यांचा आस्वाद घ्यायची इच्छा झाली.

सस्नेह's picture

21 Oct 2017 - 1:02 pm | सस्नेह

झकास फराळ !
याला मठरी असे म्हणतात बहुधा.

प्रभाकर पेठकर's picture

22 Oct 2017 - 4:46 pm | प्रभाकर पेठकर

नाही 'मठरी' वेगळी. ती मैद्यापासून बनवितात. मैद्याच्या पावपट घी किंवा तेल, ओवा, जीरं, मीठ वगैरे घालून पीठ घट्टसर मळायचं आणि जरा जाडसर लाटून काट्याने (चमचा-काटा मधला काटा) त्याला भोकं पाडून (फुगू नये म्हणून) मंद आंचेवर तळायचं. ही बिस्कीटा सारखी खुसखुशीत होतात. मधल्या वेळेस चहा बरोबर छान लागतात.

विशाखा राऊत's picture

23 Oct 2017 - 4:26 pm | विशाखा राऊत

पुरी करुन बघितली.. आवडली. मस्त चव आहे

स्मिता चौगुले's picture

26 Oct 2017 - 3:09 pm | स्मिता चौगुले

आहा... मस्तच

पियुशा's picture

17 Nov 2017 - 2:56 pm | पियुशा

अग काय भारी आहे हि पुरि यम यम :)