दृकश्राव्य विभाग :- स्मरणरंजन - माज्या आज्याचा दारूचा धंदा

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in दिवाळी अंक
17 Oct 2017 - 12:00 am

Header2
लेखक :- ब्रिटिश
अभिवाचन :- अंशुमन विचारे
विशेष आभार :- किरण माने, अमोल उदगिरकर आणि छोटा डॉन

'कोणती तरी गोष्ट करायचीच म्हटलं की सगळी कायनात तुमच्या मदतीला येते' असं शाहरुख म्हणून गेलाय. ते खोटं नाहीये!

दिवाळी अंकात अभिवाचन करताना "ते एक कॅरेक्टर नाही का? मिपावर फार भारी कथा असतात बघ त्याच्या.. ती कथा घ्यायचीच" इतक्या सॉल्लीड माहितीवर ह्या धाग्याचा मुहूर्त केला गेला. अनेकांना हे अत्यंत मुद्देसूद वर्णन देऊन "आठवतेय का कोणाच्या कथा होत्या ह्या?" असे प्रश्न विचारले गेले. एका रम्य क्षणी मिपा उचकत फिरताना अचानक कायनात प्रसन्न झाली आणि "मिथून काशीनाथ भोईर" हे नावं लख्खं आठवलं! ही आगरी कथा घ्यायची ह्यात डौट नव्हताच, पण लेखकूची परवानगी? त्याचं काय? मग पुन्हा जुन्या मिपाकरांना साकडं घालून ब्रिटिश म्हणजे नक्की कोण हे शोधलं, त्यांना गाठून परवानगी सुद्धा मिळवली. पण पुन्हा पुढचा प्रश्न.. वाचणार कोण?

आता हा सर्वात कळीचा प्रश्न होता. आगरी भाषेत विनोदी कथा वाचणारा माणूस सापडता सापडेना. अमोल उदगीरकरांना सहज विचारलं, तर म्हणाले, "किरण मानेंना विचारा. मराठीतले मोठे कलाकार आहेत. नक्कीच रेफरन्स देतील." मिपावरच्या कुणालाही काहीही विचारायला हरकत नसते पण तारांकित लोकांना बोलायला नाही म्हणलं तरी जरा बिचकायलाच होतं. घाबरत घाबरत त्यांना विचारलं, तर त्यांनी अगदी आनंदाने अंशुमन विचारेंचा नंबर दिला. भीड जरा चेपली! मग अंशुमनला मेसेज केला. हाच तो क्षण जेव्हा आख्खी कायनात सोबत होती, तिने बरोब्बर माणसापाशी आणून सोडलं होतं. अंशुमनने ह्या कथेचं अक्षरशः सोनं केलंय!

anshuman

टीव्हीवर दिसणारा हा प्रसन्न माणूस प्रत्यक्षातही अगदी मृदू आणि शांत आहे. मिसळपावच्या विनंतीला त्याने अक्षरशः २ मिनिटांत मान्य केलं आणि तापाने फणफणलेला असतानाही आपला खोळंबा होऊ नये म्हणून इतकं अप्रतिम वाचन केवळ ४ दिवसांत करूनही दिलं. "मला जरा उशीरच झाला द्यायला. मी खरं तर अजून चांगलं काम करू शकतो ह्या कथेवर. पण सर्दीने आवाज खराब आहे.. सॉरी हं.. आणि मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद!" हेही वर सांगितलं!

मी म्हटलं ना.. कायनात फार हुशार असते! बरोब्बर अशी सोन्यासारख्या माणसांना भेटवते.

अंशुमनला मिसळपाव परिवाराकडून मनःपूर्वक धन्यवाद!

किरण माने, अमोल उदगीरकर आणि छोटा डॉन ह्यांचे मनापासून आभार. त्यांच्यामुळेच हे अभिवाचन शक्य झालं!

ज्यांना ऑडीओ ऐकण्यास काही अडचण येत आहे त्यांनी युट्युबची ही लिंक वापरावी.

Footer

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

17 Oct 2017 - 8:10 am | आनंदयात्री

एकदम मजा आली हे अभिवाचन ऐकायला. अभिनंदन!

जुइ's picture

17 Oct 2017 - 9:26 am | जुइ

झक्कास अभिवाचन. मजा आली ऐकताना ;-) .

जेम्स वांड's picture

17 Oct 2017 - 10:37 am | जेम्स वांड

जबरी!!!

किसन शिंदे's picture

17 Oct 2017 - 12:22 pm | किसन शिंदे

वाचताना जेवढी मजा आली होती, तेवढीच मजा ऐकताना येतेय.

बाजीप्रभू's picture

17 Oct 2017 - 1:58 pm | बाजीप्रभू

हा हा हा... मस्त ...

झक्कास..धमाल आली वाचताना..

मित्रहो's picture

17 Oct 2017 - 2:16 pm | मित्रहो

अरे काय लिहलय आणि काय मस्त वाचलय. मजा आली ऐकतांना

आदूबाळ's picture

17 Oct 2017 - 3:49 pm | आदूबाळ

बाला, कं आवाज लागराय रं...

+१११

जेम्स वांड's picture

17 Oct 2017 - 4:16 pm | जेम्स वांड

अंशुमान विचारे ह्यांचे कॉमिक टायमिंग खूपच सुंदर असते. एरवी ह्या गुणी अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर पाहिलेच जाते, पण श्राव्य माध्यमात पण ते तितकेच सशक्त आहेत हे जाणवले. जमल्यास त्यांना आमच्या शुभेच्छा कळवाल ही टीम गोष्टला विनंती.

बोका-ए-आझम's picture

17 Oct 2017 - 5:08 pm | बोका-ए-आझम

जबरी! ब्रिटिशभौंच्या सगळ्याच कथा अंशुमनकडून वाचून घ्या!

सूड's picture

17 Oct 2017 - 5:45 pm | सूड

एकच नंबर!!

अभिजीत अवलिया's picture

17 Oct 2017 - 6:01 pm | अभिजीत अवलिया

ऑडिओ कुठल्याही ब्राउझरवर प्ले किंवा डाउनलोड होईना ...

पिलीयन रायडर's picture

17 Oct 2017 - 6:14 pm | पिलीयन रायडर

आयफोन का? क्रोमवर व्हायला पाहिजे खरं तर.. साधी गुगल ड्राइव्हची फाईल आहे. वर्क अराऊंड काढते. उलीसाक टाईम द्या!

अभिजीत अवलिया's picture

17 Oct 2017 - 6:33 pm | अभिजीत अवलिया

आयफोन नाही, नोट ४ आहे. लॅपटॉप वर देखील प्ले होत नाहीये. :(
वर्क अराउंडच्या प्रतीक्षेत.

पिलीयन रायडर's picture

17 Oct 2017 - 6:35 pm | पिलीयन रायडर

मी युट्युबवर ऑडीओ टाकला आहे. धाग्यात आता सर्वात खाली युट्युब दिसेल. तो नक्कीच ऐकता येईल. :)

अभिजीत अवलिया's picture

17 Oct 2017 - 6:58 pm | अभिजीत अवलिया

धन्यवाद. मजा आली ऐकताना.

पिवळा डांबिस's picture

18 Oct 2017 - 12:20 am | पिवळा डांबिस

आमच्या बाल्याचा लिखान म्हंजे आधीच जबरा, त्यातून तां आयकायला पन मज्जा आली!!
:)
हापी दिवाली!!

कं लिवलंय अन कं मनलंय! _/\_

पाषाणभेद's picture

19 Oct 2017 - 8:03 am | पाषाणभेद

सुंदर झालीय कथा!

सुनील's picture

19 Oct 2017 - 6:58 pm | सुनील

पुनःप्रत्ययाचा आनंद की काय म्हणतात तो झाला!

प्रमाणभाषेव्यतिरिक्त अन्यबोलींतील साहित्य हे वाचण्यापेक्षा ऐकायला जास्त बरे वाटते. त्यात त्या बोलीचे नादमाधुर्य समजून येते, जे निव्वळ वाचताना समजत नाही.