जगाचा अंत १५ ऑक्टोबरला?? सिरिअसली ??

हर्मायनी's picture
हर्मायनी in काथ्याकूट
11 Oct 2017 - 10:35 am
गाभा: 

आम्ही मॅच व्यतिरिक्त संध्याकाळचा tv लावणं केव्हाच बंद केलंय . काल जेवण झाल्यावर कोणीतरी tv लावला तो बातम्या बघण्यासाठी.. एकीकडे दिवाळीच्या फटाक्यांवर लोकं खडे फोडत होते, तर दुसरीकडे वीज पडूनही टोपली खाली असलेली मुलगी जिवंत राहिली आणि हा एक वैद्यकीय(dude, really?) चमत्कार आहे असा एक डॉक्टर सांगत होता.आणि तिसऱ्या चॅनेल वर न्यूज रिपोर्टर बाई आपल्या नाटकी धीर-गंभीर आवाजात जगाचा अंत अगदी ५ दिवसांवर येऊन ठेपलाय हे सांगत होती. तिचा म्हणणं परीणामकारक करायला २०१२, डीप इम्पॅक्ट वगैरे चित्रपटांमधील दृश्य दाखवली जात होती. हे जवळजवळ १५ ते २० मिन चालू होतंआणि यानंतर त्यांनी एक चर्चा सत्र आयोजित केलं होतं. यात ब-ऱ्याच प्रसिद्ध आणि सर्व धर्माच्या व्यक्तींना बोलावलं होतं.

तर , तिच्या म्हणण्याप्रमाणे 'डेविड मीडे'(आम्ही आधी चुकून भिडे ऐकलं! :D) या शास्त्रज्ञाने पृथ्वीचा अंत १५ ऑक्टोबरला होईल असा प्रेडिक्ट केलं आहे. मेक्सिको आणि उत्तर भारतातील मधील भूकंप, अमेरिकेतील चक्रीवादळे हा याचाच परिपाक आहे. अधिक माहितीनुसार, प्लॅनेट X निबीरू हा ग्रह पृथ्वीवर आदळणार किंवा पृथ्वीला घासून जाणार आहे आणि यामुळे भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळे इत्यादी होऊन पृथ्वीचा नाश होणार आहे. आणि याची तारीख आहे १५ ऑक्टोबर. Such a short notice!

यासंदर्भात आंतरजालावर अनेक किस्से उपलब्ध आहेत. आणि नासाच्या म्हणण्यानुसार हा फक्त एक ऑनलाईन hoax आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं शेअर करा. We have survived 2012. ;) Let's hope for 2017.. :D

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

11 Oct 2017 - 1:02 pm | मराठी कथालेखक

हं... उगाच आलो ऑफिसला .. चला घरी जावून आराम करतो..

अरे पण हे काय ? जगाचा अंत होणार म्हणून सगळेच जण घरी चाललेत आराम करायला.. वाण्याने दुकान उघडलं नाहीये.. दूध, भाजी, फळे मिळणं शक्य नाहीये... तिकडे वीजनिर्मिती केंद्रातही ही बातमी पोचली म्हणे आणि तिकडचे कर्मचारीपण घरी चाललेत ४ दिवस आराम करायला.. म्हणजे वीज पण खंडीत होणार असं दिसतंय.. अग्निशामक , पोलीस सगळेच घरी गेलेत... आता ४ दिवस आराम करु म्हणतात.. नाही आलो कामावर तर कारवाई होईल.. होवू देत.. कुणाला पडलीये.. नाहीतरी ४ दिवसांनी मरायचेच आहे. .. ते बघा तिकडे रुग्णालयातले कर्मचारी , डॉक्टर पण चाललेत .. तो पेशंट बोंबलतोय.. "बोंबलूदेत.. नाहीतर ४ दिवसांनी मरणारच आहे, आज मरेल.. काय फरक पडतो"
पोलीस वगैरे नाहीयेत तर गुंड काय म्हणतायत ..."च्यायला आता कुठेही सहज हात मारता येईल रे.. पण काय करु चोर्‍या करुन तरी.. मग त्यापेक्षा मस्त कोणाच्याही घरात घुसतो, आवडेल ती मुलगी /बाई धरतो आणि..."

तर चला चार दिवस मस्त मजा करु ..
दोन दिवसांनी : हे काय घरातल्या बर्‍याच जिन्न्स, भाजी, दूध संपलंय.. आता फक्त वरण भात खावून रहावं लागेल.. पण ज्यांच्याकडे ते ही नाहीये ते आधीच मरत आहेत भुकेने.. कुणी रुग्णालयात मरत आहेत. बरेच खून आणि बलात्कार पण झालेत.. पण न्यूज चॅनेलही बंद आहेत त्यामुळे नेमकी खबर नाही.

मार्मिक गोडसे's picture

11 Oct 2017 - 7:48 pm | मार्मिक गोडसे

पण न्यूज चॅनेलही बंद आहेत त्यामुळे नेमकी खबर नाही.
अंगावर काटाच आला.

मराठी कथालेखक's picture

11 Oct 2017 - 8:28 pm | मराठी कथालेखक

अरे हो.. पालिकेचं पाणी पण बंद होईल..
म्हणजे जगाचा अंत होईल पण तो धुमकेतू वा एखादा ग्रह आदळल्याने नाही तर जगाचा अंत होईल यावर जगाने विश्वास ठेवल्याने.

भंकस बाबा's picture

11 Oct 2017 - 7:07 pm | भंकस बाबा
तिमा's picture

11 Oct 2017 - 8:16 pm | तिमा

कोर्टातली केस आणि अशी भाकिते यांत साम्य हे की, कायम पुढची तारीख पडत रहाते पण निकाल(निक्काल) कधीच लागत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Oct 2017 - 10:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

भूतकाळात असे हाकारे असंख्य वेळेला केले गेले आहेत आणि जोपर्यंत माणूसजमात आस्तित्वात आहे तोपर्यंत होत राहतील. लोकांचे मनोरंजन करण्याव्यतिरिक्त त्यांचा फारसा उपयोग नाही... झाडाचे पान पडल्यावर आकाश कोसळले असे समजणाइतके सशाचे काळीज असणार्‍या लोकांचा अपवाद वगळता ! :)

अवकाशात (आणि म्हणून सूर्यमालेतही) दगडमातीबर्फाचे असंख्य लहानमोठे तुकडे (अ‍ॅस्टेरॉईड्स) फिरत आहेत. त्यातले काही पृथ्वीच्या जवळून जाताना वातावरणात शिरून उल्केच्या (तुटलेला तारा) स्वरूपात दिसतात. त्यातले बहुतेक सर्व वातावरणाशी घर्षण होऊन तयार होणार्‍या उष्णतेने वायूरूप होऊन विरून जातात. जमीनीपर्यंत पोचून खड्डा पडेल इतकी मोठी उल्का अनेक शतकात एखादीच असते. पृथ्वीवर हाहा:कार माजवणारी उल्का सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी पडली असावी असा अंदाज आहे... हीच ती उल्का जिच्यामुळे सुमारे २३.१ कोटी वर्षांपूर्वी आस्तित्वात येऊन सुमारे १५ कोटी वर्षे पृथ्वीवर राज्य गाजवणार्‍या डायनॉसॉर्सचा नाश झाला, असा अंदाज आहे.

2012 TC4 नावाची १३ मीटर व्यासाची एक उल्का ११-१२ (१५ नाही) ऑक्टोबर रोजी पृथ्वीपासून ४३,००० किमी दूरून जाणार आहे व अर्थातच, पृथ्वीवर आदळणार नाही... तेव्हा चिंता नसावी :)

या उल्केचा मार्ग खालील संगणकीय सिम्युलेशन चलत्चित्रात पाहता येईल...

(निळा ठिपका = पृथ्वी; जांभळा ठिपका = पृथ्वीसभोवती जिओसिन्क्रोनस कक्षेतून फिरणारा उपग्रह; पांढरा ठिपका = चंद्र; पृथ्वीजवळून काहीश्या वक्राकार आडव्या मार्गाने जाणारा ठिपका = 2012 TC4 उल्का. हे चलत्चित्र जालावरून साभार.)

अभिजीत अवलिया's picture

12 Oct 2017 - 10:25 am | अभिजीत अवलिया

पृथ्वीजवळून काहीश्या वक्राकार आडव्या मार्गाने जाणारा ठिपका = 2012 TC4 उल्का.

स्लिपच्या बाजूने कॅच निघून गेल्यासारखी वाटतेय ही उल्का पाहून. :)

असो. १३ मीटर व्यासाची उल्का असल्याने तसे पण पृथीवर येईपर्यंतच तिची राख झाली असती.

आपले जगप्रसिद्ध लोणारचे सरोवर हे उल्कापात होऊनच तयार झाले आहे. हा अपवाद वगळता एवढे मोठे सरोवर तयार होण्यासारख्या उल्का पडल्याचे मी तरी कधी ऐकलेले वाचलेले नाही.

फक्त गेल्या वर्षी भारतात एका व्यक्तीचा डोक्यात उल्का पडून मृत्यू झाल्याची बातमी होती.
http://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/india/12146928/Indian-bus...

मार्मिक गोडसे's picture

12 Oct 2017 - 5:47 pm | मार्मिक गोडसे

2012 TC4 नावाची १३ मीटर व्यासाची एक उल्का ११-१२ (१५ नाही) ऑक्टोबर रोजी पृथ्वीपासून ६,८०० किमी दूरून जाणार आहे

एक शंका.
६'८०० किमी हे अंतर पृथ्वीपासून असेल तर चित्रात उल्का जिओसिन्क्रोनस कक्षेतून फिरणाऱ्या उपग्रहाच्या बाहेरून जाताना दिसत आहे. हा उपग्रह पृथ्वीपासून अंदाजे ३६,००० किमी उंचीवरून फिरत असतो. म्हणजे उल्का पृथ्वीपासून ३६,००० किमी पेक्षा जास्त दूरून जाईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Oct 2017 - 2:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

बरोबर. ते अंतर ४३,००० किमी होते. टंकनचूक ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद !

मी पाहिलेल्या एका दुव्यात (http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-4779600/What-happen-aster...) ते अंतर चुकीने 4,200 miles (6,800 kilometers) असे दिलेले होते.

ओरायन's picture

16 Oct 2017 - 11:35 pm | ओरायन

वा..याेग्य शास्ञीय माहिती.

दीपक११७७'s picture

12 Oct 2017 - 12:46 pm | दीपक११७७

जसा या संगणकीय सिम्युलेशन चल-चित्रात उल्केने पृथ्वी जवळुन जातांना दिशा बदलली , त्याप्रमाणे एखाद्या दुस-या ग्रहा जवळुन जाणा-या उल्केने दिशा बदलली तर ती सरळ पृथ्वी वर सुध्दा येऊ शकते.......................

एक छायाचित्रकार's picture

12 Oct 2017 - 6:30 pm | एक छायाचित्रकार

१५ ऑक्टोबर ते ठिक. वर्ष कोणते ?

सुखीमाणूस's picture

12 Oct 2017 - 11:53 pm | सुखीमाणूस

आप मेला जग बुडाले मग आख्खे जग बुडाले, तर काय बिघडले
तसेही कोणासाठी काळ थाम्बत नाही

तसाही काळ हा एक भास आहे, असे एक सर म्हणाले होते इथेच.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Oct 2017 - 11:27 am | माईसाहेब कुरसूंदीकर

पूर्वी दोन तीन दिवस कोकणात संततधार पाउस पडला की 'आता जगबुडी होणार' अशी चर्चा व्हायची. आता तशीच चर्चा चॅनेल्सवर होते.

चिगो's picture

13 Oct 2017 - 5:05 pm | चिगो

चला, ठिकच आहे.. ह्यावर्षीच्या दिवाळीचा खर्च वाचवणार ही उल्का..

यीप्पी पार्टी टाइम \(◎o◎)/

स्थितप्रज्ञ's picture

15 Oct 2017 - 3:33 am | स्थितप्रज्ञ

त्यांना त्यांचा पाणी प्यायचा "जग" म्हणायचं असेल :D

मराठी कथालेखक's picture

15 Oct 2017 - 6:56 pm | मराठी कथालेखक

प्यायचा नाही हो , वाढायचा :)

चौकटराजा's picture

15 Oct 2017 - 6:14 am | चौकटराजा

पृथ्वी नष्ट होणार नाही बहुदा . पर्यावरण काहीसे नष्ट होईल , माणूस नष्ट झाला तर आनंद॑च होईल. हा प्राणी प्रबुद्ध आहे की भ्रमिष्ट हे एक मोठे कोडेच आहे.

गामा पैलवान's picture

15 Oct 2017 - 11:20 pm | गामा पैलवान

बांगलादेशाचा १५ ऑक्टोबर संपला. तो अजूनतरी जिवंत आहे. येत्या चाळीसेक मिनिटांत भारत देखील या पीडेपासून मुक्त होईल.

-गा.पै.

गामा पैलवान's picture

15 Oct 2017 - 11:22 pm | गामा पैलवान

चुकलो, ब्रह्मदेश म्हणायचं होतं. बांगलादेशास आजून ८ मिनिटे आहेत.
-गा.पै.

चामुंडराय's picture

16 Oct 2017 - 12:42 am | चामुंडराय

जगाचा अंत झाला.

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार थोर शात्रज्ञ दाऊद भिडे यांचा काचेचा जग खाली पडून फुटला आणि त्याचा अंत झाला.
अश्या रीतीने या थो(चो)र शात्रज्ञांचे जगाच्या अंताचे भविष्य खरे ठरले आहे.

जगाचा अंत झाला? च्यामारी आम्हांला गाढ झोप लागल्याने कळलंच नै. हॅत तेरी की!

बाजीप्रभू's picture

16 Oct 2017 - 12:02 pm | बाजीप्रभू

जगाचा अंत झाला तरी चालेल.. पण स्वर्गात मिपा वाचायला मिळूदेत म्हणून प्रार्थना केली होती दसऱ्यात.
रच्याकने,
ऑफिसमधल्या सगळ्या बाया रंभा-उर्वशी भासताहेत.

बाजीप्रभू's picture

16 Oct 2017 - 12:03 pm | बाजीप्रभू

जगाचा अंत झाला तरी चालेल.. पण स्वर्गात मिपा वाचायला मिळूदेत म्हणून प्रार्थना केली होती दसऱ्यात.
रच्याकने,
ऑफिसमधल्या सगळ्या बाया रंभा-उर्वशी भासताहेत.

ओरायन's picture

16 Oct 2017 - 11:29 pm | ओरायन

जर उल्का पडून पृथ्वी संपणार अशी शक्यता जर कधी भविष्यात निर्माण झाली तरी प्रगत तंञाने कदाचित आपण टाळू पण शकतो.

'आर्मागेडॉन' सारख्या हॉलिवूडपटांमध्ये दाखवलंय तसे जर महाकाय अशनीवर यान उतरवून किंवा क्षेपणास्त्र सोडून वगैरे अणुस्फोटाने त्या अशनीच्या ठिकऱ्या उडवणे ही खरेतर अतिशय घातक गोष्ट ठरेल. प्रत्यक्षात अशा अशनीचा मार्ग योग्य अंतर आधीच थोड्याश्या स्फोटकाने बदलणे हा जास्त शास्त्रीय उपाय आहे. अगदी काही अंश इतका दिशाबदलदेखील पृथ्वीशी संभाव्य टक्कर टाळण्यासाठी पुरेसा ठरेल.

चौकटराजा's picture

19 Oct 2017 - 9:04 am | चौकटराजा

उल्केला टॅनजानशल धक्का लावून तिला न फोडता तिचा मार्ग बदलणे असा काही सिनेमा पाहिल्याचे आठवत आहे.पण नक्की कोणता हे आठवत नाही.

अनन्त्_यात्री's picture

17 Oct 2017 - 4:12 pm | अनन्त्_यात्री

मरणात खरोखर जग जगते
अधि मरण अमरपण ये मग ते ॥
-- भा.रा.तांबे

धर्मराजमुटके's picture

20 Oct 2017 - 1:53 pm | धर्मराजमुटके

च्यामारी ! जगाचा अंत होणार म्हणून मोबाईलची बिले वगैरे भरली नव्हती, किराणा सामान आणले नव्हते. आता हे सगळे करावे लागणार ! मायची कटकट :)

उल्केला टॅनजानशल धक्का लावून तिला न फोडता तिचा मार्ग बदलणे असा काही सिनेमा पाहिल्याचे आठवत आहे.पण नक्की कोणता हे आठवत नाही. --

द कोअर -- the core