टर्म इन्शुरन्स कुठला घ्यावा ?

डोके.डी.डी.'s picture
डोके.डी.डी. in काथ्याकूट
18 Sep 2017 - 2:37 pm
गाभा: 

नमस्ते मिसळपाव वर मी दुसऱ्यांदा मार्गदर्शन मागतोय. यापूर्वी देखीप आपण योग्य सल्ला दिलात त्याबद्दल आभार.
मी डोके दादासाहेब,वय 29, रा फलटण, जी सातारा.
व्यवसाय- नोकरी (प्राथ.शिक्षक) आहे. मी 2013 साली lic चा टर्म इन्शुरन्स घेतलेला आहे. वार्षिक जवळपास 5800 रु 30 लाखांचा इन्शुरन्स आहे. आणि हा एजेंट मार्फत घेतलेला आहे.
सध्या ऑनलाईन जर बघितले तर कमी पैशात जास्त रकमेचा विमा घेता येईल . ऑनलाईन बऱ्याच कंपन्या विमा विकत आहेत. त्यातली त्यात icici व hdfc या दोन्ही कंपन्या विश्वसनिय वाटत आहेत. तरी कृपया मला 60 लाखांचा विमा काढायचा आहे. तर तो कसा आणि कोणत्या कंपनीचा घ्यावा. पूर्वीची बंद करावी काय? आणि दुसरी घ्यावी का… कृपया जाणत्यांनी मार्गदर्शन द्यावे. डिसेंम्बर पूर्वी विमा काढण्याचा विचार आहे कारण या महिन्यात 29 पूर्ण होऊन तिसाव वर्ष चालू होईल.

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

18 Sep 2017 - 2:47 pm | अनुप ढेरे

जो कुठला घ्याल तो ऑन्लाइनच घ्या. भरपूर स्वस्त पडतो. माझा एलायसीचा ऑन्लाईन टर्म आहे.
(या विम्याचा क्लेम तुम्ही नाही तुमच्या घरचे करणार आहेत हे लक्षात ठेऊन, विमा घेताना सर्व माहिती, दारु, शिगारेट, असलेले आजार याची खरी माहिती द्यावी हे.वे.सां.न.ल. )

माझ्यामते एलआयसी चा टर्म इन्श्युरन्स फारच महाग आहे. त्याऐवजी साधारणतः इतक्याच हप्त्यात तुमच्या वयाच्या माणसाला एक कोटीपर्यंतचा टर्म इन्श्युरन्स मिळायला हवा. थोडी शोधाशोध करून बघायला हवा.

गावडे सरांच्या माहीतीपूर्ण प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
गावडे सर इशुरन्सचे ओशो आहेत.

डोके.डी.डी.'s picture

18 Sep 2017 - 3:02 pm | डोके.डी.डी.

पपरंतु विश्वसनिय आणि आपल्या मागे घरच्यांना कमीत कमी पळवता पैसे मिळावे ही अपेक्षा

सतिश पाटील's picture

18 Sep 2017 - 3:53 pm | सतिश पाटील
डोके.डी.डी.'s picture

18 Sep 2017 - 3:53 pm | डोके.डी.डी.

Lic 18400
Aegon life ७२५०
Edelwise tokio ७१६०
Maxlife ८१००
Pnb metlife ८६२१
Hdfc life ९३९८
Icici १०५३२
Bharti axa ७५५२
Futur general ७४६७
Canara hsbc ७०३०
या रकमा 29 वर्षे वय 60 वर्षापर्यंत कव्हर आणि 1 कोटीचा कव्हर असा आहे

असे खूप आहे आणि क्लेम सेटलमेंट रेशो 92 पेक्षा अधिक आहे. जाणकारांनी वाट दाखवावी

तसेच जुनी चालू ठेऊन दुसरी नवीन काढावी की
पहिली बनद करून नवीन मोठ्या रकमेची एकच काढावी

नाखु's picture

18 Sep 2017 - 10:01 pm | नाखु

एस्बीआय का नाही?
ई शिल्ड म्हणून आहे दर पाच वर्षांनी १० टक्के विमा संरक्षण मुळ रक्कम वृद्धिंगत करण्याचा पर्याय आहे.वैदकीय तपासणी करून घेतली जाते, विडिकाडी असेल तर तसा स्पष्ट उल्लेख करणे श्रेयस्कर.

ऑन लाईन SBI विमा धारक नाखु
एल आयसी ने कुणीही ऑनलाईन घेऊ नये अशीच तजवीज अनुभव घेतलेला नाखु

डोके.डी.डी.'s picture

19 Sep 2017 - 10:01 pm | डोके.डी.डी.

मी पोलिसी बाजार आणि coverfox या दोन वेबसाईटवर चेक केले त्यात sbi आलं नाही बघतो

थ्रीडी साहेब तुमच्या त्या उस्मानाबाद बँकेचे प्रकरण लागले काय मार्गी?
पुढे काय कळलेच नाही.

डोके.डी.डी.'s picture

19 Sep 2017 - 10:11 pm | डोके.डी.डी.

मी आपले सरकार या अँप वर तक्रार केली होती उपनिबंधक कार्यालयाने चांगला पाठ पुरावा केला. 19000 हजार खात्यावर होते आणि बाकीची fd होती आणि मुदत संपवून देखील मोडली नव्हती. कारण पैसे तर मिळत नव्हते. त्यावर dcc बँकेचे आलेले पत्र सोबत जोडतोच आणि सध्या हेलपाटे चालू आहेत बँकेत ।।पीकविमा वाटप झाल्यावर बोलावलं आहे बघू 5 हजार तरीDcc मिळतील.

लिंक

लिंक

सुबोध खरे's picture

19 Sep 2017 - 9:47 am | सुबोध खरे

साठ लाखाचा विमा घ्यायचा असेल तर ३० लाखाचे दोन वेगळ्या कंपन्यांचे विमे घ्या कारण काही कारणाने एका कंपनीने विम्याचे पैसे द्यायचे नाकारले तर दुसरीकडून तरी पैसे मिळतात. शिवाय कमी किमतीचा विमा असेल तर वैद्यकीय तपासणी बऱ्याच वेळेस लागत नाही. क्लेम सेटलमेंट रेशो हा किती रकमेचे पैसे दिले हे गृहीत धरत नाहीत तर किती विम्याचे पैसे दिले हे गणतात. त्यामुळे कंपन्या क्लेम नाकारताना मोठ्या रकमेचा क्लेम नाकारण्याची शक्यता जास्त असते. हि विमा कंपनीत काम करणाऱ्या एका डॉक्टरने (माझा विद्यार्थी होता) दिलेली माहिती आहे.

चिर्कुट's picture

19 Sep 2017 - 11:50 am | चिर्कुट

या इन्शुरन्सच्या बाबतीत माझे अज्ञान जरा जास्तच आहे.

एक शंका विचारुन घेतो - समजा आपल्याकडे २ कंपन्यांचा टर्म इन्शुरन्स आहे आणि तो क्लेम करायची वेळ आली, तर दोन्ही कंपन्यांकडे करता येतो की कुठल्याही एकाच कंपनीकडे करता येतो?

सुबोध खरे's picture

19 Sep 2017 - 11:55 am | सुबोध खरे

फक्त जीवन विमा (आयुर्विमा) कितीही रकमेचा आणि कितीही कंपन्यांचा करता येतो कारण मानवी जीवन हे "अमूल्य" आहे हि कायद्याने मान्य केलेली गोष्ट आहे.
बाकी आपल्या घराचा, कारचा, धंद्याचा त्याच्या वाजवी मूल्यापेक्षा बराच जास्त विमा उतरवला असेल तरी वाटेल तेवढ्या रकमेचा ( वाजवी मूल्यापेक्षा अधिक) हक्क आपल्याला सांगता येत नाही.

प्रिमिअमला दुपटीचा फरक कसा? एजंटला बरेच कमिशन जाते का?

डोके.डी.डी.'s picture

19 Sep 2017 - 10:15 pm | डोके.डी.डी.

Lic चा प्रीमियम खूपच महाग आहे. आणि तरी तो eterm म्हणजे lic ची ऑनलाईन agent विरहित पोलिसी चा आहे ऑफलाईन तर यापेक्षा जास्त येईल प्रीमियम