जोडीदार निवडताना बायका कशावर भाळतात?? सौंदर्यावर की पैश्यांवर???

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
27 Aug 2017 - 8:12 pm
गाभा: 

विवाहसंस्थेचा विचार केल्यास अनेक गोष्टी अनाकलनीय आहेत.यातील मला नेहमी आश्चर्य वाटत आले आहे ते स्त्रीयांच्या जोडीदार निवडण्याच्या चॉईसचे.एक पुरुष म्हणून मी हे नक्की सांगू शकतो की जोडीदार निवडताना पुरुष नेहमी स्त्रीचे सौंदर्यच बघतात.मग ते शाररीक असेल वा संपुर्ण व्यक्तिमत्व .स्त्रीची सांपतिक स्थीती काय आहे,तिला पगार कीती याचा फारसा विचार पुरुष करत नाहीत.श्रीमंत बापाची मुलगी पटवने वगैरे फक्त चित्रपटात असते.काही अपवाद असतील पण अपवादानेच नियम सिद्ध होतो.
काही दिवसांपुर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो.समाजातील अनेक प्रतिष्ठीत तिथे सहपत्निक आले होते.माझ्यासारखा सामाजिक भान असलेल्या माणसाला अशी संधी समाजमनाच्या अभ्यासाची असते.मला सोशल फोबिया असल्याने मी अशा ठीकाणी एका कोपर्यात बसणे पसंत करतो.तर,कार्यक्रमात अनेक स्त्रीया आपल्या नवरोबांबरोबर आल्या होत्या.खोटं बोलत नाही, अशावेळी पुरुष स्त्रीयांना न्याहाळत असतात तसा मीही न्याहाळत होतो.एक अत्यंत रेखीव ,आरसपाणी सौंदर्य असलेली स्त्री काही स्त्रीयांबरोबर गप्पा मारत उभी होती.पाहताच त्या बाला(?)कलेजा खल्लास झाला टाईपची.देखणेपणाची साक्षात ब्रॅण्ड ॲम्बॅसीटर.अर्थात लग्न झाले होते तिचे कारण सौभाग्याची सगळी आभुषणे होती.
मी विचार करत होतो की कोण असेल तो भाग्यवान पुरुष ज्याला अशी पत्नी मिळावी.या प्रश्नाचे उत्तर मिळायला फारसा वेळ लागला नाही.एक काळा,बेढब ,ढेरपोट्या तरुण हातात एका चिमुकल्याला घेऊन तिच्याजवळ आल्यावर तिने बारक्याला कडेवर घेतले व ते दोघे जरा बाजुला जाउन बोलू लागले.तो तिचा नवरा असल्याची खात्री पटली.जोडा अगदीच विजोड होता.ती रंभा तर तो जांबुवंत होता.एकमेकांना शोभेल असे काहीच न्हवते दोघांमध्ये.
कार्यक्रम संपल्यावर मी पार्किंगमध्ये गाडी काढत असताना मला एक सफेद रंगाची अतिशय पॉश महागडी कार जवळूण जाताना दिसली.मघाचेच जोडपे कारमध्ये होते.विजोड जोड्याचं कारण कळलं .......पैसा!!!!!!
किमान विस बावीस लाखाची ती कार होती.घरी येताना वाटेत मित्र भेटले.त्यांना हा किस्सा सांगितल्यावर त्यांनी एकच उत्तर दिले.की म्हणे बायका पैसेवाला पुरुष जोडीदार म्हणून निवडतात.काही प्रमाणात आर्थिक सुबत्ता म्हणून मान्य केले तरी फक्त पैसेवाला आहे म्हणून कावळ्याच्या तोंडात पुरी हा प्रकार फारसा रुचत नाही.निदान काहीतरी व्यक्तीमत्वात साम्य असायला हवं असं वाटतं
कॉलेजमध्येही जो श्रीमंत त्याला जास्त मैत्रीणी हे गणित होते ते आठवले.आमच्यासारखे मध्यमवर्गीय फक्त अश्या मुलींशी मैत्री करण्याचे स्वप्नच बघु शकायचे.अश्या अमिरजादे असलेल्या मुलांच्या बाईकवर मागे बसलेल्या ललना बघितल्या की आम्ही फक्त काळेठिक्कर पडायचेच बाकी असायचो.
असो ,मला या धाग्यवर स्त्री पुरुष दोघांकडून इन्साईट्स हवेत.माझे वैयक्तीक मत स्त्रीया जोडीदार निवडताना सौदर्यापेक्षा पैशाला जास्त महत्व देताना दिसतात.आपले काय मत आहे?????

प्रतिक्रिया

Ranapratap's picture

27 Aug 2017 - 8:31 pm | Ranapratap

आजही जोडीदार निवडताना पालकांच्या इच्छेला मुलींच्या कडून जास्त मान दिला जातो, आपण दिलेले उदाहरण हे पालकांच्या जबरदस्तीने किंवा इच्छेने झालेले लग्न असेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Aug 2017 - 8:28 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मुली पैसाच बघतात रे टर्बोचार्ज्या . बाकी 'स्वतःच्या हिंमतीवर फ्लॅट घेणारा, व्यसन नसणारा मुलगा हवा' ह्या फक्त वधु-वर सूचक मंडळात लिहायच्या गोष्टी.

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2017 - 2:59 pm | श्रीगुरुजी

माई,

तुम्ही नानासाहेबांंमध्ये काय बघितलं होतं?

माई नाक पुसत होती आणि तिचे अहो शेंडीला गाठ मारत होते तेव्हा दोघांच्या तीर्थरूपानी त्यांना धरून बोहोल्यावर उभे केले होते. माळ घालताना माईने त्यांना पहिल्यांदा बघितले. आधी काय बघणार कपाळ! माईला सुईत दोरा ओवता येतो का आणि तिच्या ह्यांना बाराखडी लिहिता येते का इतकीच परीक्षा झालेली म्हणे!

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2017 - 3:59 pm | श्रीगुरुजी

तू भारीच चहाटळ हं पैसे. आमच्या वेळच्या मुली अशा फाजिलपणे नाही बोलायच्या. माईंचे 'हे' बाराखडी कुठुन लिहिणार? ते काय शेंडीवाले वाटले का? शेताची मशागत करता येते का नाही, धार काढता येते का नाही हे मुलीकडच्यांनी पाहिलं असेल.

आम्ही घर बघायला गेलो तेव्हा नवरामुलागा बरीक बाहेरून आला तसा म्हशींवरून उतरला होता खरा!

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2017 - 5:46 pm | श्रीगुरुजी

ख्यँ ख्यँ ख्यँ . . .

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 Aug 2017 - 10:45 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

धन्यवाद माई.

ती रंभा तर तो जांबुवंत होता.

हे वाचून लय हसायला आलं भाऊ..

bittu's picture

28 Aug 2017 - 11:57 am | bittu

Ha Ha Ha..nice topic..

agadi barobar bolale........jodi samaan havi.............mhanje disane pan mahatwache ahe.....khup muli paisa ch baghtat.....pan sarwach nahi

स्थितप्रज्ञ's picture

28 Aug 2017 - 4:10 pm | स्थितप्रज्ञ

बिट्टूसाहेब, जरा आपल्या मराठमोळ्या लिपीत लिहा की. मराठी भाषेतलं वाक्य इंग्रजीत वाचायला लैच कसतरी होतंय.

आमच्या काळात म्हणजे साधारण १९१९-१९२०मध्ये मुलीचे रुप आणि मुलाचे कर्तृत्व बघत असत बुवा. आता उगा बरोबरीचा फालतुपणा सुरु झालाय खरा :-/

नितीन पाठक's picture

29 Aug 2017 - 12:43 pm | नितीन पाठक

एक शंका .................

आमचा काळात म्हणजे साधारण १९१९-१९२० ....
आता २०१७ चालू आहे
म्हणजे साधारण तुमचा काळ ९८-९९ वर्षापूर्वीचा ??
(कृपया हलके घ्या )

शंभरी भरतच आलीये माझी..

सुचिता१'s picture

28 Aug 2017 - 2:27 pm | सुचिता१

कर्तुतवान, स्थीर स्थावर , चांगले आयुष्य देउ शकणारा पुरुष मुलींना आवडतो. त्यात चुकीचे काय आहे ?

अभ्या..'s picture

28 Aug 2017 - 3:08 pm | अभ्या..

कशावर भाळले हे खरं खरं सांगणारी स्त्री भेटली असेल तर अभिनंदन.
म्हणजे आमच्या भाषेत "काय कळत नसतंय ओ ते, soDaa mhane"

स्थितप्रज्ञ's picture

28 Aug 2017 - 4:13 pm | स्थितप्रज्ञ

ये दुनिया और शादी सिर्फ ३ चीजोंपे चालती है
१. पैसा
२. पैसा
३. पैसा

(यातील "पैसा" म्हणजे पैसाताई नव्हेत बरका)

बायका सुंदर पुरुषांऐवजी पैसेवाल्या पुरुषांशी लग्न करतात आणी त्यामुळे आपल्यावर अन्याय होतोय असे वाटणार्‍या पुरुषांसाठी आता स्त्री बरोबर लग्न करण्याव्यतिरिक्त अजुनही काही पर्याय आहेत म्हणे काही देशांत ! :)

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

28 Aug 2017 - 7:29 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

काय सांगताय?? फर्स्ट हँड अनुभव दिसतोय तुम्हाला!!! .

धर्मराजमुटके's picture

28 Aug 2017 - 7:35 pm | धर्मराजमुटके

होय ! होय ! :)

मराठी कथालेखक's picture

28 Aug 2017 - 10:22 pm | मराठी कथालेखक

अहो गणेशोत्सवात आला धागा.. लोकांना अंताक्षरी खेळायलाही वेळ नाही ..नाहीतर १००-२०० झाले असतील..

अभिदेश's picture

28 Aug 2017 - 10:38 pm | अभिदेश

तुम्ही इथे लिहिलंय मला सोशल फोबिया असल्याने मी अशा ठीकाणी एका कोपर्यात बसणे पसंत करतो आणि तिकडे दुसर्या साडीवाल्या धाग्यावर तर तुम्ही आपणहून त्या स्त्रीकडे स्वत:हुन जाऊन बोललो असा म्हणता , नक्की खरं काय? का इथे तुम्हाला ह्या रूपवान स्त्रीशी बोलायचा चान्स मिळाला नाही ? तुम्ही तिच्या नवर्याला बघून घाबरला का ?

बुद्धीवर आणि कधीकधी धनसंपदा इत्यादींवर!

हल्ली मुलगा व्हेजिटेरियन आहे म्हणून रेजेक्ट करतात. =))

हल्ली मुलगा व्हेजिटेरियन आहे म्हणून रेजेक्ट करतात. =))

दशानन's picture

28 Aug 2017 - 11:30 pm | दशानन

व्हेजिटेरियन मुलगा =))

त्यात हसण्यासारखं काय आहे कळलं नाही.

अतूल २०१५'s picture

29 Aug 2017 - 3:03 am | अतूल २०१५

कारण कळलं .......पैसा!!!!!!

थिटे मास्तर's picture

29 Aug 2017 - 3:33 am | थिटे मास्तर

साम्य ओळखा.
Hitesh, Dadadarekar , ramram , ranapratap, bittu , bobade (?) अँड सो ऑन. मच मोर.

सतिश गावडे's picture

29 Aug 2017 - 11:19 am | सतिश गावडे

तुम्ही एव्हढे खात्रीने ही नावे कशी देऊ शकता?
ranapratap परवाच्या कट्ट्याला होते. तुम्ही केव्हा येणार कट्ट्याला?

II श्रीमंत पेशवे II's picture

29 Aug 2017 - 12:02 pm | II श्रीमंत पेशवे II

बरेच वेळेस अस लक्षात आलं आहे , कि जनरेशन ग्याप मुळे जुनि पिढी आणि नवीन पिढी यामध्ये संवाद होत नाहीत आणि नक्की काय मनात आहे हे मुलीना सांगायला खूप उशीर होतो , तो पर्यंत सार काही मर्यादे पलीकडे गेल्यामुळे , व्दिलधार्याना हि ते थांबवता येत नाही.
कर्तव्य म्हणून वडील एकदा विचारतात हि पण त्या वेळेस जे काही मुली बोलतात ......ते कोणाच्याच पल्ले पडत नाही , उदा. ... मला आताच नाही करायचं लग्न , माझ कोलेज पूर्ण होऊदे , मला चांगली नोकरी लागू दे ......त्यातूनच एखादी विचार करून बोललीच तर निर्व्यसनी हवा , शिकलेला हवा , नोकरी असेल तर चांगलच इतकच बोलतात
खरा प्रश्न पडतो तो मुलीच्या बापाला ....कारण पहिल्या लॉट मध्ये अतिशय छान स्थळे येतात हि पण काही वेळेस धांदरट पणामुळे , भीती मुळे , कोलेज पूर्ण झालेलं नाही ते झाल्यावर लग्न करणार आहे पण बाबा घाई करतायत वगैरे भरकन त्या बघायला आलेल्या मुलाशी बोलून टाकतात त्याने खूप संभ्रम होतो
मुलीना हि मुलाखती ची सवय नसल्याने मी बोलून गेले याची जाणीव तो मुलगा निघून गेल्यावर होते .

नंतर च्या लॉट मध्ये वडील मंडळी थोडी बिथरलेल्या घोड्या सारखी वागतात मधेच एकदम उधळतात नाहीतर एक हि पाउल पुढे मागे टाकत नाहीत , अर्थात त्या फेज मध्ये त्यांना वाटू लागत कि आता लिस्ट संपत आलीये काय होणार हीच
शिवाय अगोदर जे लोग मुलगी बघून गेले आहेत ते काही अपप्रचार तर नाहीना करणार याच च टेन्शन असत

या सगळ्या मध्ये प्रत्येक ओळखीच्या माणसाला सांगितल जात , आमची मुलगी लग्नाची आहे चांगल स्थळ असेल तर सुचवा , बर्याच दा मुलीची आई तिच्या माहेर च / गावाकडच कोणी आहे का याच्याच मागे असते
जिला लग्न करायचं आहे तिला सुरुवातीलाच आवडी निवडी विचारलेल्या असतात आणि एक लॉट पाहून गेल्यावर त्या मध्ये कैक बदल हि झालेले अस====, हळू हळू ओरीजनल आवडी , इच्छा ,अपेक्षा याची धार कमी होते

या मध्ये जर ६ महिन्या पेक्षा जास्त कालावधी गेला असेल तर मग बापाचे केस उभे रहायला सुरुवात होते . पत्रव्यवहार ( आता डायरेक्ट मोबाईल वर कॉल ) निरोप वैगेरे रोजचं चालूच असत यात एखादा महिना जातो , मग या वर्षीचे मुहूर्त , कॅलेंडर वर आई बापाच्या नजर फिरायला लागतात आणि टेन्शन अधिक येत

बर मुलीचा बाप नात्याने , पहिला किंवा दुसर्या लॉट मधल्या मुलांना आपणहून फोन करून ..... ठरलं का तुमच्या मुलाच ? हे विचारायला बापाची हिंमत च होत नाही .

आणि मग स्वतःच्या मुलीसाठी स्थळ बघणारा बाप थोडा डिप्रेशन मध्ये येतो , त्याला सारख , आपण कुठे चुकतो तर नाही ना , आपल्या खूप जास्त अपेक्षा तर नाहीना अशा नाना प्रश्नांनी सैरभैर होतो
आणि मधले काही दिवस इतका कुल होतो येईल जाईल त्याला सांगतो "पाहतोय आम्ही नाही अस नाही " बघू जमेल तेव्हा जमेल
मधल्या कळत मुलीची पण हि फेज येऊन जाते आणि ति पण थोडी डिप्रेस होते , बापाचे वागणे बोलणे बदललेलं पाहते आणि स्वतःच्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करीत एकेदिवशी बापाला एकटा गाठून सांगते कि बाबा तुम्ही नका काळजी करू आता येईल त्या स्थळाला मी नाही नकार देणार

त्यातच एखाद ढेबर काळ बेन्द्र स्थळ येत आणि अपघात होतो

हि झाली एक सर्व सामान्य बापाची गोष्ट ,
आता मूळ विषयाला धरून .........

आताच्या मुलीना पाचवी सहावी पासून मित्र असतात .....वेगवेगळ्या प्रकारचे मित्र .म्हणजे क्लास मधला ..... कोचिंग क्लास मधला .....१० वि १२वि च्या ब्याच मधला .नंतर कोलेज मधला ......मग जोब मध्ये पहिल्या कंपनीतला ...........मग आताच्या कंपनीतला ...ई .....
अर्थात कोलेज संपता संपता विवाह - अपेक्षित जोडीदार - क्लोज फ्रेंड - अपेक्षा - लाइफस्टाइल - करिअर - रिलेशनशिप या सगळ्या मुद्यावर खूप चर्नींग होऊन चर्चा झालेली असते. पण हि चर्चा फक्त एका विशिष्ट सर्कल मध्ये झालेली असते त्याचा थांग पत्ता घरच्यांना नसतो.

दोनचार वेळा घरात विचारल जात तेव्हा या मुली काहीबाही उत्तर देऊन घरच्यांना चूप करतात
जेव्हा सिरिअस ली मुलीसाठी स्थळे बघणे चालू होते त्या वेळेस या मुली कुणकुण लागताच आईकडून त्यामुलाची डीटेल्स घेऊन त्याचा आंतरजालावर शोध घेऊन पूर्ण समाचार घेतात आणि लगेचच एक मत बनवून घरच्यांना सांगितल जात

यांच्या अपेक्षा एवढ्या भयंक असतात कि घरच्यांच्या आवाक्या बाहेरच काम असत ते .......

यांच्या लाइफस्टाइल बद्दल न बोलणच बर .....
लग्न झालं कि लगेच यांना गाडी ,स्वतःचा बंगला ...हवा असतो ....आणि कॉमन म्यान हे सगळ स्वप्नातच पाहत असतो

काही वेळेस पैसा
राहणीमान
स्टेट्स
बिज्नेस् हे मुद्दे हि आताच्या मुलींचे विशेष आकर्षणाचे मुद्दे आहेत

ज्या पोराच्या ..खाली कोलेज पासून गाडी असते .....स्टायलिश राहणीमान असते त्याला टार्गेट करतात मुली , अक्षरशः चाधावढ असते त्यांच्यात
रोजचं झकपक , हॉटेलिंग ,शोप्पिंग,, पब असं असेल तर त्यांना असा मुलगा हवा हवा सा वाटू लागतो .
जेव्हा कोलेज पूर्ण होत आणि याच मुलाचा बाप त्याला पोकीट मनी देण बंद करतो तेव्हा त्यावेळेस खर कळत या मुलीना कि आपण तर याला सगळ देऊन बसलोय आणि ह्याला जर बापाने रस्त्यावर आणलं तर आपलं काय होईल याचा विचार सुधा शिवत नाही.
आणि त्या पोकिट मनी देणाऱ्या बापाला आपला पोरगा काय करतोय याचं काही देण घेण हि नसत. याच काळात जर का प्रपोज होऊन जमल असेल तर ते मुलाच्या बापाला पटलेलं नसत अशातच काहीजण पळून जाऊन लग्न करतात ...............आणि मग वाजायचा तो बेंजो वाजतो

आताची पिढी हि संभ्रमित आहे त्यांना .....सगळ्याच मूळ हे पैसा आहे हे समजलंय त्यामुळे तो जिथे , ज्या मार्गाने आणि जसा मिळेल तो मिळवायचा प्रयत्न आताची पिढी करतेय
जोडीदार विजोड ,अकार्यक्षम, विलासी ,बेधुंद असला तरी चालेल .पैसा आहेना एकदा का लग्न झालं कि मला हव ते मिळवेन मग त्यासाठी काहीही करायला लागलं तरी चालेल अशी विचारसरणी आताच्या मुलीमध्ये आहे

आणि त्यामुळेच जोडीदार निवडताना या बायका पैश्यांवर , ऐश आरामात जगता येईल या गोष्टींवर भाळत आहेत.

वकील साहेब's picture

29 Aug 2017 - 12:09 pm | वकील साहेब

प्राण्यांमध्ये काय होत बहुतेक वेळा की दोन नरांना एकच मादी आवडली आणि तिलाही त्या दोघांपैकी एकाचीच निवड करायची असेल तर ती शरीराने धष्टपुष्ट असा जो असेल त्याला निवडते. किंवा त्या दोघात युद्ध होऊन जो जिंकेल तो तिला प्राप्त करतो. यातही पुन्हा तीच गोष्ट आली की जो धष्टपुष्ट असेल धडधाकट असेल तोच जिंकणार. आणि तोच तिचा भ्रतार होणार.
पण ती असाच (धडधाकट) जोडीदार का निवडते ? तर ज्याच्या पासून मला संतती होणार आहे तो नर जर धडधाकट असेल तर संतती पण तशीच धडधाकट अन जगण्याला लायक राहील ही त्यामागची भावना असेल.
माणसाच्या बाबतीत होत काय की आपल सध्याच जिवमान जगण्या साठी एक वेळ शरीर अगदीच पहिलवाना सारखं मजबूत नसल तरी चालेल पण जगण्या साठी पैसा आवर्जून पाहिजे अस झालेल असल्याने जोडीदार निवडतांना वधू असा विचार करत असेल की तिचे आणि त्याच्या पासून तिला झालेल्या संततीचे जगणे सुखकर होण्यासाठी त्याचे बाहू एकवेळ फुगलेले नसले तरी चालेल पण त्याचा बँक बॅलेन्स फुगलेला पाहिजे. म्हणून ती पैसा हाच निकष लावत असेल. मानवी उत्क्रांतीने बदललेल्या गरजांचा स्विकार करून तिने स्वतःमध्ये तसा बदल केला असेल तर त्यात तिचे काय चुकले ?

माणसाच्या बाबतीत होत काय की आपल सध्याच जिवमान जगण्या साठी एक वेळ शरीर अगदीच पहिलवाना सारखं मजबूत नसल तरी चालेल पण जगण्या साठी पैसा आवर्जून पाहिजे अस झालेल असल्याने >> मग शरीर आणि पैसा दोन्ही नसलेल्या पुरुषांना कशाला माद्या मिळत राहिल्या पाहिजेत?

किंवा शरीर &/ पैसा फारच आकर्षक असलेल्या पुरुषाला जास्त माद्या का मिळू नयेत?

उत्क्रांतीचा फंडा फक्त उच्च/मध्यम वर्गातल्या ट्रॉफी बायकांना डिफेंड करायला का वापरला जातोय?

II श्रीमंत पेशवे II's picture

31 Aug 2017 - 10:10 am | II श्रीमंत पेशवे II

वकील साहेब ..........
मनापासून आवडलं ..........
मनुष्य हि एक प्राणीच आहे ........आपण धर्म ,कुळ ,,, जात यात अडकलोय म्हणून हि घुसमट आहे समाजात
अन्यथा एक प्राणी आहे अस गृहीत धरलं तर स्त्री ला पूर्ण स्वातंत्र्य आहे जोडीदार निवडण्याच ..........मग ति कशावर भाळेल हे सांगता येत नाही तिनेच ठरवायचं असत.
आपण स्वैर वक्तव्य करतो कारण आपल्या मना ला पटत नाही , आपण एका धार्मिक रचने ला आपल्या कैक पिढ्यांपासून अनुकरण करत आलो आहे कदाचित म्हणूनच एखाद्या मुलीने असे काही केले कि आपल्याला राग येतो

अप्पा जोगळेकर's picture

29 Aug 2017 - 12:57 pm | अप्पा जोगळेकर

ढेबर काळ बेन्द्र स्थळ
काळा,बेढब ,ढेरपोट्या तरुण
एखाद्याची शारिरीक ठेवण, रंग याचा हिणकस उल्लेख कशासाठी चालू आहे ?

टफिमामाला एक जिम आणि एक मेन्स पार्लर काढायचेय, सर्व्हे चालुय.

एमी's picture

29 Aug 2017 - 2:50 pm | एमी

हा हा हा =))

मराठी कथालेखक's picture

29 Aug 2017 - 5:38 pm | मराठी कथालेखक

कुणी कशावर भाळायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न . ..पैशावर भाळणं म्हणजे लोभीपणा आणि सौंदर्यावर भाळणं हा मुर्खपणा असेल (कुणाच्या मते) तर गुणांवर्/स्वभावावर भाळणं हा तर एक भ्रम आहे :)

क्या बात है!! ह्या वाक्यासाठी टोप्या बंद!!

मराठी कथालेखक's picture

31 Aug 2017 - 7:14 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

जेम्स वांड's picture

29 Aug 2017 - 5:56 pm | जेम्स वांड

पण ते 'डस्टबीन' वगैरे प्रकार खरंच असतात का उगाच सांगोवांगी म्हणे मी.........?

सुबोध खरे's picture

31 Aug 2017 - 10:17 am | सुबोध खरे

कावळ्याच्या तोंडात पुरी यात मत्सराचा वास येतो आहे.
"सर्वानाम गुणानाम कांचनम आश्रयते " या उक्ती नुसार मुलीनीं श्रीमंत मुलाची अभिलाषा धारावी यात काहीही वावगे नाही. पैसे हे सहावे इंद्रिय आहे आणि तो असेल तर आपली पंचेंद्रिये सुद्धा चांगली काम करतात अशी म्हण आहे.
गुण हे दिसत नाहीत आणि ते प्रत्यक्ष राहायला लागल्यावर जाणवू लागतात. पैसे असतील तर बऱ्याच गोष्टी सुसह्य होऊ शकतात हि वस्तुस्थिती.
पुरुष स्त्रियांचे सौंदर्य पाहतात तसेच स्त्रिया पुरुषाचे पैसे( किंवा ती मिळवण्याची धमक) पाहूनच लग्न करतात हे नैसर्गिक आहे यात गुपित असे काय?

चौकटराजा's picture

31 Aug 2017 - 1:04 pm | चौकटराजा

स्त्रिया जवळ जवळ ९९ टक्के महत्व पैशालाच देतात. कारण त्यांच्या गरजाच मुळी पैशात मिळणार्‍या असतात. उदा. वस्त्रप्रावरणे, सौंदर्य साधने, दागिने , मोटार, मस्त प्रशस्त घर ई. सबब जेमतेम दिसायला पण पैसा असलेला मुलगा सुंदर मुलीना चालतो असे माझे पक्के मत निरिक्षणाअंति झाले आहे. वाचन, गप्पा, प्रवास, काव्य संगीत ,शास्त्र विनोद याना फारसा पैसा लागत नाही. पण या स्त्रियांच्या पुरूषाइतक्या तीव्रतेने या गरजा असतात का तर उत्तर नाही असेच आहे. सगळं आहे पण नवर्‍याचे प्रेम लाभले नाही सबब मी लग्न मोडले असा युक्तीवाद किती स्त्रिया करतील शंका आहे. ही थीम कथांमधे शोभून दिसते.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

31 Aug 2017 - 2:41 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

स्त्रिया जवळ जवळ ९९ टक्के महत्व पैशालाच देतात
>>>
पोस्ट पटली आहे.बायका पैशालाच महत्व देतात हे माझे निरीक्षण लेखातच मांडले आहे.

प्रसाद_१९८२'s picture

31 Aug 2017 - 6:45 pm | प्रसाद_१९८२

सगळं आहे पण नवर्‍याचे प्रेम लाभले नाही सबब मी लग्न मोडले असा युक्तीवाद किती स्त्रिया करतील शंका आहे.

--
तुमचा वरिल दावा खोडणारा एक लेख, मायबोलीवर आज पाहीला.

Need help very urgent
https://www.maayboli.com/node/63670#new

सुबोध खरे's picture

31 Aug 2017 - 7:04 pm | सुबोध खरे

हि स्त्री फक्त अतीव नैराश्यातून/ वैफल्यातून बोलत आहे असेच वाटते. शिवाय ती कुठे राहते आहे ते लिहिलेले नाही. कारण भारतात एकट्या स्त्रीने मूल वाढवणे याला अमेरिकेसारख्या देशाइतकी समाजमान्यता नाही.
हा वरील दावा खोडतो असे वाटत नाही.

चौकटराजा's picture

31 Aug 2017 - 9:07 pm | चौकटराजा

नीट वाचून पहा तिची कैफियत . तिने तक्रारीची यादीच दिली आहे. त्यात प्रेम नसणे ही एक आहे. आमचा वरचा दावा "सर्व काही आहे पण नवर्‍याचे प्रेम नाही असे असेल तर "असा आहे.

त्यातल्या बाईंनी स्वत:चं वय ३२ सांगितलं आहे, लग्नाला १२ वर्षं झाली म्हणतात. म्हणजे विसाव्या वर्षी लग्न केलं? मला वाटतं तोच कदाचित प्रॉब्लेम आहे. स्वप्नाळलेल्या वयात आकर्षणाला प्रेम समजून बसल्या असतील आणि आता जमिनीवर आल्यागत वाटत असेल.

>>जोडीदार निवडताना बायका कशावर भाळतात?? सौंदर्यावर की पैश्यांवर???>>
हया प्रश्नाचं उत्तर व्यक्तीसापेक्ष असावं. आणि तसं नसलं असतं तर सगळ्यांची लग्ने झालीच नसती.

"कावळ्याच्या तोंडात पुरी", वाईट काय आहे त्यात? कुणाला काळा रंग आवडत असेल तर तुमची हरकत का? आणि बेढब कुणाला म्हणायच याचे प्रमाण काय?

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2017 - 3:25 pm | श्रीगुरुजी

त्यांचं खरं दु:ख वेगळंच आहे. ते अजून तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही.

संजय पाटिल's picture

1 Sep 2017 - 4:26 pm | संजय पाटिल

हिहि हिहि

म्हणजे तुमच्या मते जो दिसायला सुमार आहे, त्याचे लग्न कुरूप मुलीशीच व्हायला हवं. तरच तो नैसर्गिक न्याय असेल का? दिसायला भले तो माणूस चांगला नसेल.. पण कर्तृत्ववान असेल. मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर "20-22 लाखांची गाडी" वगैरे घेतली असेल. तुम्हाला काय माहित?
अतिशय घाणेरडी विचारसरणी आहे ही. माझं ऎका प्लीज. जरा सोशल फोबिया वगरे बाजूला ठेवून लोकांमध्ये मोकळ्या मनाने मिसळायला लागा. चांगले मित्र बनवा. असली निगेटिव्हीटी निघून जाईल आयुष्यातून

टवाळ कार्टा's picture

2 Sep 2017 - 5:01 am | टवाळ कार्टा

गोड गोड बोलता येत असेल तर बहुतांश पोरी पटतात मग पैसा बाडी रूप अश्या गोष्टी कमी असतील तरी चालून जाते

mayu4u's picture

2 Sep 2017 - 9:50 am | mayu4u

;)

आदूबाळ's picture

2 Sep 2017 - 10:08 am | आदूबाळ

अरे टकासाब आप हो किधर?

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2017 - 3:28 am | टवाळ कार्टा

सध्ध्या कामामुळे घोडे लागलेत :(

साधा मुलगा's picture

10 Sep 2017 - 12:34 am | साधा मुलगा

+१०००००००

पी महेश००७'s picture

2 Sep 2017 - 5:11 pm | पी महेश००७

पैसाच राम पैसाच रहीम...
तरच होते हनी ‘प्रीत’

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 6:25 pm | अमरेंद्र बाहुबली

पण लव्ह मॅरेज मध्ये अनेक चांगल्या सुस्वरूप मुली काळ्याकुट्ट मुलांबरोबर पळून जातात. आणि त्यांच्या पुर्ण घराची कमाईही यथातथा च असते. मग अश्या मुली नेमक्या कोणता गुण पाहतातं?? तिथे ना रूप ना पैसा.

उपयोजक's picture

7 Sep 2017 - 11:42 am | उपयोजक

सोशल मीडियावर खिल्ली उडवलेल्या या सोशिक जोडप्याविषयी जाणून घ्या!
http://www.loksatta.com/trending-news/all-you-know-about-couple-atlee-ku...

पैसा's picture

7 Sep 2017 - 12:56 pm | पैसा

छान आहेत की ती दोघे!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

7 Sep 2017 - 1:04 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

दोघे नाही हो! तू छान आहे फक्त.तो डांबरच आहे. तो धनदांडगा असेल ,त्याशिवाय का भाळली.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

7 Sep 2017 - 1:06 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

तू छान आहे ऐवजी ती छान आहे असे वाचावे.टायपो.मिस्टेक.

राजाभाउ's picture

7 Sep 2017 - 1:24 pm | राजाभाउ

तो काळा आहे म्हणुन वाईट ? कै च्या कै ते गोरे जाउन ईतकी वर्षे झाली सोडा आता गुलामगीरी

मराठी कथालेखक's picture

7 Sep 2017 - 3:50 pm | मराठी कथालेखक

तो धनदांडगा असेल ,त्याशिवाय का भाळली.

अहो ती स्वतःही एक अभिनेत्री आहे, म्हणजे पैशाची काय कमी असेल तिला असे नाही वाटत

मराठी कथालेखक's picture

7 Sep 2017 - 3:52 pm | मराठी कथालेखक

झालंच तर ते आठ वर्षे लिव इन रिलेशनशिपमध्ये होते.. म्हणजे त्याचा योग्य त्या वेळचा परफॉरमन्स तिला चांगलाच माहितीये.
नुसत्या चेहर्‍याचा रंग काय करायचाय... !!

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2017 - 3:30 am | टवाळ कार्टा

अहो ती स्वतःही एक अभिनेत्री आहे, म्हणजे पैशाची काय कमी असेल तिला असे नाही वाटत

तर तर...आजपर्यंत कित्तीतरी अभिनेत्रींनी स्वतःपेक्शा कमी पैसेवाल्याशी लग्न केलेय :)

धर्मराजमुटके's picture

7 Sep 2017 - 8:37 pm | धर्मराजमुटके

'कृष्णा प्रिया' या आपल्या नावाला जागलीय ती ! किती लोकांना आपले नाव सार्थक करण्याची संधी मिळते ?

मराठी कथालेखक's picture

7 Sep 2017 - 4:05 pm | मराठी कथालेखक

मला वाटतंय ज्याच्याकडे (स्वतःकडे वा आसपास ) जे नसतं त्याचं त्याला अप्रुप वाटतं.
एखादी श्रीमंत बापाची सामान्य रुपाची मुलगी नवरा देखणा हवा म्हणून हट्ट धरते आणि बाप मध्यमवर्गीय देखणा मुलगा बघून , हुंडा देवून मुलीचा आनंद आणि सुख या दोघांची तरतूद करतो अशी उदाहरणं देखील पाहण्यात आहेत.
तर अतिशय सुंदर मुलीला मुलाच्या दिसण्याचे अप्रुप असेलच असे नाही. हीच गोष्ट मुलांनाही लागू पडते.

सामान्यत: जर मुलगा/मुलगी दिसायला फारसा चांगला/ली नसेल तर भिन्नलिंगी व्यक्तीला प्रथमदर्शनी प्रेम वाटण्याची शक्यता कमी. पण सहवासाने एखादी व्यक्ती आवडू शकते. शिवाय फक्त चेहर्‍याचा रंगच सर्वकाही नसते, शरीराची ठेवण (फिगर), चेहर्‍यावरील स्मित, देहबोली ई गोष्टी आकर्षकतेत फरक आणू शकतात. मला स्वतःला सुंदर चेहर्‍याची मुलगी जर पाठीतून वाकणारी असेल तर अजिबात आवडत नाही.

साहेब..'s picture

19 Sep 2017 - 5:56 pm | साहेब..

शीर्षक पाहून एकदम स्टॅटिस्टिकस मराठे आठवला.