बकरी ईद आणि हैदराबाद (अर्थात हैदराबाद डायरी)

सचिन कुलकर्णी's picture
सचिन कुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Sep 2017 - 12:14 pm

मी हैद्राबादमध्ये गेली ६ वर्षं राहतोय. बकरी ईद जवळ आली की इथल्या काही इलाक्यांमध्ये (जसं की मेहंदीपटनम) बकऱ्यांचे बाजार लागायला सुरुवात होते. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या कडेला मंडप टाकून तिथे बकऱ्यांचे जथेच्या जथे साऱ्या भारतभरातून विक्रीसाठी आणले जातात. यामध्ये तगडे बोकड, पुष्ट बकऱ्या, मध्यम बकऱ्या आणि अगदी कोवळी पिल्लं पण असतात. ज्याला जसा परवडेल तसा प्राणी विकत घेता येतो. कुर्बानीसाठी भाविक (?) लोक, मोठ्या कुटुंबातील लोक, मशिदींचे प्रतिनिधी तसेच छोटे मोठे कसाई देखील इथून 'माल' घेऊन जातात. त्यामुळे कोणी स्कूटरवरून एक बकरी नेतोय तर काही जण टेम्पोच्या टेम्पो भरून बकऱ्या नेतोय हे दृश्य इथे हमखास दिसते. त्या बकऱ्यांचे मात्र हाल बघवत नाहीत अश्या वेळेस. घेऊन जातांना त्यांचे पाय बांधले जातात. काही तरुण बकरे हे तोडायचा प्रयत्न करतात पण तेही थोड्या प्रयत्नानंतर कळून चुकतात की काही उपयोग नाही. अश्या वेळेस बकऱ्यांचे दीनवाणे चेहरे बघवत नाहीत. काल तर मला टेम्पोमध्ये २ तगडे बैल देखील घेऊन जातांना दिसले. (इथे गोवंश हत्या बंदी नाही).

खुद्द बकरी ईदच्या दिवशी तर रस्त्यांवर अत्यंत ओंगळवाणे दृश्य असते. इथे हलाल मटणच लागते. त्यामुळे बकऱ्यांच्या मानेला चीर देऊन सारे रक्त वाहून गेल्यावर मग बकरी सोलली जाते आणि मग कापली जाते. त्यामुळे रक्ताचे पाटच्या पाट रस्त्यांवरून वाहत असतात. तिथेच मांस विक्री होते आणि कातडी जाळली जाते त्यामुळे रस्त्यांवर दुर्गंधीचे साम्राज्य असते. कोणीही सेन्सीबल माणूस तिथून ह्ळह्ळ व्यक्त न करता आणि नाकाला रुमाल न लावता जाऊ शकत नाही आणि हायजीनच्या साऱ्या संकल्पना तर वेशीवर टांगलेल्या असतात.

मुस्लिम समाज प्रथेप्रमाणे कुर्बानी करतोच (हा आणखी वेगळा विषय आहे ऍकच्युअली) आणि समाजातल्या मोठ्या वर्गाचे हे अन्न आहे त्यामुळे बकऱ्या मारण्यावर आक्षेप नाही घेता येणार पण यातला किळसवाणा प्रकार टाळून हा सण साजरा करता येणार नाही का ?

-- (खिन्न) सचिन

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2017 - 12:48 am | डॉ सुहास म्हात्रे

गरीब बिचार्‍या प्राण्यांची हत्या करणारे सगळे खाटीक तर नक्कीच नरकात जातील नाही का ? मग तर, मटण आवडणार्‍याला नरकापेक्षा स्वर्गातच जास्त प्रॉब्लेम असेल ! =))

***********

अवांतर :

एका गुत्त्याच्या बाहेर एक धर्मगुरू पिताड लोकांचे मतपरिवर्तन करण्याच्या प्रयत्नात असतो.

धर्मगुरू (धगु) : बेटा, अती दारू पिऊन तू नरकात जाशील ना.
पिताड (पि) : बरं. मग हा दारू विकणारा कोठे जाईल ?
धगु : नरकात.
पि : आणि गुत्त्यात दारू सर्व करणारा ?
धगु : नरकात.
पि : आणि तो पलिकडचा चखणा देणारा.
धगु : अर्थातच, नरकात !
पि : मग, चालतंय की :)

जेम्स वांड's picture

5 Sep 2017 - 7:37 am | जेम्स वांड

म्हात्रे सर तुम्ही व्हेज का नॉनव्हेज?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2017 - 11:57 am | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम चवीचे दोन्ही प्रकार आवडीने खाणारे ;) :)

जेम्स वांड's picture

7 Sep 2017 - 10:14 am | जेम्स वांड

एकदम आम्हा मटणखायांचा मॉरल कंपास हाय वर गेल्याची भावना आली

तुम्हाला कायम उत्तम कलेजी फ्राय अन पाया मिळो, तुमचा खाटीक तुम्हाला ताजं मटण देओ, तुम्हाला आयुष्यात कधीही फ्रोजन मटण न खायला लागो, ह्या शुभेच्छा.

:D:D:D:D:D

वरुण मोहिते's picture

4 Sep 2017 - 12:48 pm | वरुण मोहिते

अरे मटण खाके तो देखो . ते शाकाहार पूर्व पुण्याई वैग्रे फालतू कमेंट उत्तर न दिलेलेच बरे . कोण कोणाच्या खाण्यात ढवळाढवळ करत नाही . शाकाहारी का बरे आमचे बेष्ट असे टाहो फोडून सांगतात . वास्तविक जगात अल्पसंख्यांक आहेत हे शाकाहारी . त्यामुळे बोलूच नका . सोज्वळ आणि ऑल .

वास्तविक जगात अल्पसंख्यांक आहेत हे शाकाहारी . त्यामुळे बोलूच नका

असहिष्णुता असहिष्णुता बोलते वो येईच्च हय..

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2017 - 2:36 pm | श्रीगुरुजी

वास्तविक जगात अल्पसंख्यांक आहेत हे शाकाहारी .

हे वाचून "बेंबट्या, जगात कुंभार कमी आणि गाढवे फार. तस्मात् कुंभार हो, गाढवांस तोटा नाही." हे वाक्य आठवलं.

खाण्यासाठी प्राण्यांची हत्या करणे हा एक भाग आहे आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता असणे हा दुसरा भाग आहे.
१९९३-९४ च्या सुमारास पुण्याच्या कॅम्पात शिवाजी मंडईत मध्ये असणाऱ्या असह्य अस्वच्छतेमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रमुख अधिकारी ब्रिगेडियर अप्पाचू यांनी तेथील सर्व मांस मटणाच्या दुकानांवर स्वच्छतेचे निकष पूर्ण होईपर्यंत बंदी आणली होती. यावर राजकारणी लोकानी मोठा आरडा ओरडा केला. निधर्मांध लोकांनी धर्मावर घाला झाल्याची कोल्हेकुई केली. हे प्रकरण न्यायालयात गेले असताना मुंबई उच्च न्यायालयाने निःसंदिग्ध शब्दात ब्रिगेडियर अप्पाचूंची बाजू उचलून धरली आणि जोवर स्वच्छतेचे सर्व नियम कसोशीने पाळले जात नाहीत तोवर सर्वच्या सर्व खाटिकांच्या दुकानावर बंदी घातली . शेवटी नाईलाजाने सर्व खाटीक लोकांनी आपल्या दुकानांमध्ये टाईल्स लावून घेतल्या व सिमेंट काँक्रीटची दुरुस्ती केली रक्त आणि मांस धुण्यासाठी भरपूर पाण्याची सोय केली मांस कापण्यासाठी लाकडाचा ओंडका आणून त्यावर रोजच्या रोज मीठ पसरणे माशा होऊ नयेत म्हणून खिडक्यांना जाळ्या आणि तसेच कीटक नाशक द्रव्यांचा रोजच्या रोज वापर.उरलेले मटण टांगून ठेवण्याच्या जागेवर कीटक येऊ नयेत म्हणून मोठे पंखे किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी आणि मोठी कोल्ड स्टोरेजची यंत्रे असे अत्यावश्यक उपचार चालू केले आणि पुणे शहराला स्वच्छ मांसाचा पुरवठा सुरु झाला. काही दिवसांनी याच खाटीक लोकांनी( यात एक माझा रुग्ण होता) जे झाले ते चांगल्यासाठी हे मान्य केले.
अशाच तर्हेने जसे गणपती विसर्जनासाठी तलाव बांधतात तशाच तर्हेचे जनावरांच्या कुर्बानी साठी स्वच्छ खाटीकखाने शहरात काही ठिकाणी बांधून द्यावेत तेथे स्वच्छतेचे सर्व नियम पाळले जातील आणि जनतेला उपद्रव होणार नाही हि काळजी घेतली जाईल यावर करडी नजर ठेवली गेली पाहिजे. अशा ठिकाण व्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी जनावरांच्या कत्तलीला पूर्ण बंदी घातली पाहिजे आणि तिची करड्या शिस्तीने अंमलबजावणी केली पाहिजे.
प्राणिजन्य पदार्थांवर जिवाणू फार लवकर वाढतात आणि रक्त हा तर जिवाणू वाढीसाठी सर्वात चांगला पदार्थ आहे. प्राणिजन्य पदार्थामुळे होणारी अन्नविषबाधा हि फारच गंभीर स्वरूपाची असते त्याबद्दल हयगय अजिबात कामाची नाही.
अशा ठिकाणहून केस कातडी हाडे सारखे टाकाऊ पदार्थ साठवणे आणि वाहून नेण्यासाठी बंद झाकणाच्या डबे इ ची सोय झाली पाहिजे.
असे स्वच्छ खाटीकखाने सोडून इतर कुठेही कत्तलीस परवानगी देऊ नये.

बाजीप्रभू's picture

6 Sep 2017 - 2:07 pm | बाजीप्रभू

+1111

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2017 - 4:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टांगून ठेवलेले बोकड्याचे मटन खराब होते का ? खाटीक त्यावर कपडे गुंडाळून ठेवतात.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2017 - 5:20 pm | श्रीगुरुजी

शाकाहारींंची नजर लागू नये म्हणून कापड गुंडाळत असतील.

गामा पैलवान's picture

4 Sep 2017 - 5:38 pm | गामा पैलवान

प्राडॉ,

माझ्या अंदाजाप्रमाणे बाष्पीभवन कमी करण्यासाठी कापड गुंडाळत असावेत. कलेवरातलं पाणी कमी झालं की वजन कमी भरतं. सारखं पाणी मारण्यापेक्षा कापड गुंडाळलेलं बरं.

आ.न.,
-गा.पै.

समाधान राऊत's picture

6 Sep 2017 - 10:20 am | समाधान राऊत

वाघ सिंह लांडगे कसे प्राणी मारतात , खटका कि हलाल की अजुन तिसरेच काय बेशुद्ध वैगेरे

गामा पैलवान's picture

6 Sep 2017 - 12:41 pm | गामा पैलवान

समाधान राऊत,

वाघ सिंह वगैरे मांसाहारी प्राणी म्हातारे झाल्यावर त्यांना भक्ष्य पकडता येत नाही. या प्राण्यांचा नैसर्गिक मृत्यू भुकेने तडफडून किंवा न तडफडता म्हणजे बेशुद्ध होऊन होतो.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

6 Sep 2017 - 12:56 pm | श्रीगुरुजी

मुसलमान मंडळी मासे, खेकडे, कासव, साप, बेडूक, वाघ सिंह, अस्वल इ. सजीव मारून खातात का? खायच्या आधी त्यांना हलाल पद्धतीने सुरी मानेवर फिरवून तडफडत ठेवून मारतात का?

वरुण मोहिते's picture

6 Sep 2017 - 1:53 pm | वरुण मोहिते

खाऊन पहा एकदा ...

श्रीगुरुजी's picture

6 Sep 2017 - 2:02 pm | श्रीगुरुजी

मुस्लिम खेकडे कसे मारतात ते सांगा.

सूरी फिरवण्यासाठी खेकड्याला मान नसते.

साधारणतः नांग्या तोडून त्याचे पेकाट फोडले जाते. भाजी उशिरा करायची असेल तर नांग्या तोडून तसेच ठेवले जातात.

मुस्लिमांची पद्धत या पेक्षा काही वेगळी असावी असे वाटत नाही.

श्रीगुरुजी's picture

6 Sep 2017 - 3:09 pm | श्रीगुरुजी

पण हलाल नसलेले मांस अपवित्र असते. मग ते मुसलमानांना कसे चालेल?

भंकस बाबा's picture

6 Sep 2017 - 6:22 pm | भंकस बाबा

मुस्लिम खेकडे कसे मारतात ते माहीत नाही , पण माशाबद्दल एका मुस्लिम स्कॉलरकडून गमतीदार माहिती मिळाली होती, ती अशी, माशाना कल्ले असतात, ते कल्ले म्हणजेच अल्हाहने केलेली व्यवस्था आहे, त्याची गळफडे चिरलेली दिसतात म्हणजे ते हलाल आहे. खेकड्याच्या बाबतीत मात्र स्कॉलरकडे उत्तर नव्हते , त्यामुळं दुसरा स्कॉलर भेटला की विचारीन
पण पुष्कळदा इस्लामी ज्ञान असलेला काही प्रश्नावर सपशेल उताणी पडतो

स्थितप्रज्ञ's picture

19 Sep 2017 - 3:00 pm | स्थितप्रज्ञ

खेकड्याची नांगी तोडून तसाच जिवंत मिक्सरमधून बारीक करून त्याची चटणी करतात.

पुंबा's picture

18 Sep 2017 - 2:33 pm | पुंबा

भरपूर माहिती मिळाली या धाग्यावर..
प्राण्यांना वेदना होत रहावी अशी काळजी घ्या ही धर्माज्ञा अन ती पाळणारे लोक विचित्र वाटले.
अवांतरः लवकरात लवकर प्रयोगशाळेत तयार होऊ शकेल असे कृत्रीम मांस स्वस्तात उपलब्ध होवो अशी इच्छा आहे. खाण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सर्व प्राण्यांचे आता केवळ मशिन्समध्ये रूपांतर झाले आहे. त्यांचा सर्वांचा अवतार कायमचा संपावा असे वाटते.

स्थितप्रज्ञ's picture

19 Sep 2017 - 2:57 pm | स्थितप्रज्ञ

एकदा Farm to Fridge असा शोध घेऊन समोर येणारा विडिओ नक्की बघावा. हैदराबादेत काय धुडगूस असेल इतका किळसवाणा प्रकार समोर येईल (तो सुद्धा अत्यंत सुसंस्कृत(?) आणि पुढारलेल्या (कशात?) समजल्या जाणाऱ्या पाश्चात्य देशांतून)!