बकरी ईद आणि हैदराबाद (अर्थात हैदराबाद डायरी)

सचिन कुलकर्णी's picture
सचिन कुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Sep 2017 - 12:14 pm

मी हैद्राबादमध्ये गेली ६ वर्षं राहतोय. बकरी ईद जवळ आली की इथल्या काही इलाक्यांमध्ये (जसं की मेहंदीपटनम) बकऱ्यांचे बाजार लागायला सुरुवात होते. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या कडेला मंडप टाकून तिथे बकऱ्यांचे जथेच्या जथे साऱ्या भारतभरातून विक्रीसाठी आणले जातात. यामध्ये तगडे बोकड, पुष्ट बकऱ्या, मध्यम बकऱ्या आणि अगदी कोवळी पिल्लं पण असतात. ज्याला जसा परवडेल तसा प्राणी विकत घेता येतो. कुर्बानीसाठी भाविक (?) लोक, मोठ्या कुटुंबातील लोक, मशिदींचे प्रतिनिधी तसेच छोटे मोठे कसाई देखील इथून 'माल' घेऊन जातात. त्यामुळे कोणी स्कूटरवरून एक बकरी नेतोय तर काही जण टेम्पोच्या टेम्पो भरून बकऱ्या नेतोय हे दृश्य इथे हमखास दिसते. त्या बकऱ्यांचे मात्र हाल बघवत नाहीत अश्या वेळेस. घेऊन जातांना त्यांचे पाय बांधले जातात. काही तरुण बकरे हे तोडायचा प्रयत्न करतात पण तेही थोड्या प्रयत्नानंतर कळून चुकतात की काही उपयोग नाही. अश्या वेळेस बकऱ्यांचे दीनवाणे चेहरे बघवत नाहीत. काल तर मला टेम्पोमध्ये २ तगडे बैल देखील घेऊन जातांना दिसले. (इथे गोवंश हत्या बंदी नाही).

खुद्द बकरी ईदच्या दिवशी तर रस्त्यांवर अत्यंत ओंगळवाणे दृश्य असते. इथे हलाल मटणच लागते. त्यामुळे बकऱ्यांच्या मानेला चीर देऊन सारे रक्त वाहून गेल्यावर मग बकरी सोलली जाते आणि मग कापली जाते. त्यामुळे रक्ताचे पाटच्या पाट रस्त्यांवरून वाहत असतात. तिथेच मांस विक्री होते आणि कातडी जाळली जाते त्यामुळे रस्त्यांवर दुर्गंधीचे साम्राज्य असते. कोणीही सेन्सीबल माणूस तिथून ह्ळह्ळ व्यक्त न करता आणि नाकाला रुमाल न लावता जाऊ शकत नाही आणि हायजीनच्या साऱ्या संकल्पना तर वेशीवर टांगलेल्या असतात.

मुस्लिम समाज प्रथेप्रमाणे कुर्बानी करतोच (हा आणखी वेगळा विषय आहे ऍकच्युअली) आणि समाजातल्या मोठ्या वर्गाचे हे अन्न आहे त्यामुळे बकऱ्या मारण्यावर आक्षेप नाही घेता येणार पण यातला किळसवाणा प्रकार टाळून हा सण साजरा करता येणार नाही का ?

-- (खिन्न) सचिन

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

ज्यांना जे करायचे आहे ते करुन मोकळे होतात . . . . . . आपला कायदा हतबल आहे . . .

सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 5:55 pm | सचिन कुलकर्णी

माझ्या एका मित्राच्या मते, मोदी सरकार हे सगळे बदलणार आहे. ☺

जेम्स वांड's picture

2 Sep 2017 - 12:38 pm | जेम्स वांड

कातडी जाळतात हे नवीनच कळले, असतील हैद्राबादी कुळाचार वेगळे बुआ. आजवरचा अनुभव अन निरीक्षण म्हणजे कातडी जमा करून कमावून विकली जाते अन तो पैसा धर्मदाय कामे, वेगवेगळ्या मशिदी-मदरसे ह्यांना देणग्या अन अश्याच इतर धार्मिक कामात वापरला जातो.

हैदराबाद सारख्या ठिकाणी तुम्हाला हे जाणवणे साहजिक आहेच. अर्थात हलाल बद्दल मत खराब नाही माझं, कारण खटक्याचं मटण अन हलालचं मटण ह्यांच्या चवीत फरक जाणवण्याइतपत असतो. मी ही पोपटपंची अर्थात चवीवर आधारित करतोय, खटका असो वा हलाल मी स्वतः बोकड कापलेला नाही अन कापताना बघितलेलाही नाही, उलटं टांगलेला बघितलंय अन विकत घेतलाय, इतकंच.

संजय पाटिल's picture

2 Sep 2017 - 3:48 pm | संजय पाटिल

हलाल आणी खटका म्हणजे काय? धन्यवाद.

खटपट्या's picture

2 Sep 2017 - 5:31 pm | खटपट्या

खटका म्हणजे एका वारात शीर धडावेगळे केले जाते यात जनावर लगेच मरते आणि यातना कमी होतात.
हलाल मधे मानेला एक चीर देऊन जनावर तड़फडत ठेवतात. यात सर्व रक्त वाहून जाते असे म्हणतात.
जाणकारानी प्रकाश टाकावा

सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 5:59 pm | सचिन कुलकर्णी

हिंदूंना खटका मटण लागते तर मुस्लिमांना त्याच्या विरुद्ध हलाल लागते.

सालदार's picture

18 Sep 2017 - 6:59 pm | सालदार

चुक, हिन्दुची अशी काही मान्यता नाही. ज्याला जे (हलाल किंवा खटका) आवडतं तो ते खातो.

सालदार's picture

18 Sep 2017 - 7:01 pm | सालदार

*हिंदुंची

भंकस बाबा's picture

2 Sep 2017 - 6:27 pm | भंकस बाबा

भूगोलाशी आहे . जेथून ही परंपरा आली आहे म्हणजे आखात तेथे आत्यंतिक उष्णतेमुळे जर मटणात रक्त राहिले तर मटण खराब होते, तसे पण एक अक्ख जनावर एकाच वेळी खाऊ जाऊ शकत नाही , त्यामुळे ही प्रथा सुरू झाली असावी . अल्लाहच्या नावाखाली सायन्स या अडाण्याच्या माथी मारले जाते, नाहीतर विज्ञान म्हणते म्हणून हे लोक्स ऐकणार नाही, त्यामुळे झटका मटणाला हराम म्हटले की मुस्लिम तोबा करून बाजूला होतात, आणि हे रक्ताचे पाट आणि लोबंणार्या आतड्या बघायला हैदराबादला कशाला जायला पाहिजे , मुंबईत बेहरामपाडा, मालवणी इथे बक्कळ पहायला मिळेल

सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 8:02 pm | सचिन कुलकर्णी

मी हैदराबादमध्ये राहतोय सध्या. तस्मात मी हैद्राबादेत बघितले आहे. मुंबईतल्या लोकांनी ते बघायला हैद्राबादला यायची गरज नाही. ;)

सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 5:57 pm | सचिन कुलकर्णी

हैद्राबादमध्ये रस्त्यावर इतके बकरे कापले जातात की त्यांची कातडी गोळा करणं क्लिष्ट होत असावं बहुधा. परीसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असते ती जाळण्याची. :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2017 - 3:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सचिनसेठ, जवळ जवळ ब-याच कत्तलखान्याजवळ असे चित्र दिसते. नाल्यातून रक्त वाहतांना दिसते. माझ्या कॉलेजच्या वाटेवर शीलेखाना म्हणून भाग आहे. त्या परिसरातुन जाणे म्हणजे दिव्यच होतं. बड़े का काटते हे. लै बेक्कार. भयंकर वास.

आपण म्हणता तसे बकरी बोकड्याना कापतांना पाहिलं आहे. पण कातड़ी जाळतांना पाहिलेले नाही. आम्हाला वडील लहानपणापासून या बोकड्याच्या मटनाच्या दुकानात घेऊन गेलेले त्यामुळे ते कापणे तितके ओंगळवाने वाटले नाही. आपल्या समोर कापलेले आणि बोकुड़च असले पाहिजे म्हणून दूकान उघडायच्या आत आम्ही दुकानासमोर हजर असायचो. कसाई रुमाल डोक्यावर ठेवायचा अल्लाला बहुतेक जी कृति करतोय त्या बद्दल क्षमा मागाइचा आणि बोकड्याच्या गळ्याला सूरी लावायचा. पारधी लोक ते रक्त जमा करून घेऊन जायचं हेही आठवतं. मग ते सोलने, ते लेंडया वाली आतडी स्वच्छ करणे, पोटातील गबाळे काढतांना अतिशय तन्मयतेने पाहिले आहे. आणि मग गर्दन का, कूट का, टांग का, कलिजे का असं मागुन मागून खरेदी केलं आहे.

मला गाय, बैल, म्हैस,असे कापतांनाचे व्हीडियोही पहतांना कसे तरी होते. काल फेसबुकच्या व्हीडियो लिंक वरुन एक सौदी वाला उभ्या उंटांना मानेजवळ सूरी मारून अशा क्रूर पद्धतीने मारतांना भयंकर वाटत होते.

आता वय अशा अवस्थेतून जात आहे की दया भाव वगैरे दाटुन येतो. आपल्या डोळ्यासमोर जेव्हा अशी चिकन,बोकुड आणि इतर प्राण्यांची कापाकापी होते तेव्हा नॉनव्हेज खाण्याची इच्छा मरून जाते.

मूळ मुद्यावर येतो की या सर्व परंपरा आहेत आणि त्यांना आपण थोपवु शकत नाही. आणि पाहण्याशिवाय, सहन करण्याशिवाय आपल्या काही हातात नाही.

अवांतर: बाकी हैदराबादला आहात तर ज़रा तपशीलवार लेख येऊ द्या. मार्केट, खानाखजाना असं काही.

-दिलीप बिरुटे

सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 6:04 pm | सचिन कुलकर्णी

प्रयत्न करतो लिहिण्याचा हैदराबादबद्दल. बाकी तुम्ही ते रक्त गोळा करण्याबद्दल म्हणताय ते इतर काही पुस्तकांमध्ये पण वाचलं आहे. पूर्वी आत्यंतिक गरिबीमुळे काही जमातीतील लोक हे रक्त गोळा करून, ते आटवून रक्ती नावाचा खाद्यपदार्थ बनवायचे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 6:10 pm | अमरेंद्र बाहुबली

आताही करतात. ते रक्त गोळा करून ऊन्हात सुकवलं जातं. सुकल्यानंतर त्याला बर्फी सारखा आकार देऊन खातात. ई.....

जेम्स वांड's picture

3 Sep 2017 - 11:45 am | जेम्स वांड

रक्त नुसते नाही त्यात मीठ मसाले घालून वाळवतात अन मग त्याच्या वड्या पाडतात, जेवताना साईड डिश म्हणून पापड कुरडई प्रमाणे तळून ते वाढले जाते. अतिशय चविष्ट प्रकार.

पगला गजोधर's picture

3 Sep 2017 - 8:34 pm | पगला गजोधर

रस्त्याने कमी उत्पन गटातिल दारू पिणाऱ्या लोकांसाठी, १ खम्बा घेतला तर एक रगती फ्री फ्री फ्री , अश्या जाहिराती दिसतील....

दुर्गविहारी's picture

2 Sep 2017 - 4:32 pm | दुर्गविहारी

अत्यंत घाणेरडे सण आहेत या तथाकथित शांतताप्रेमी धर्माचे. या असल्या प्रथांच्या वेळीच हे अनिसवाले कुठल्या बिळात जाउन बसतात काय माहिती ? केवळ चीड आणणारा हा सगळाच प्रकार आहे.
बाकी बिरुटे सरांनी लिहीले आहे तसेच म्हणतो, हैद्राबादेत आहात तर बरच काही लिहीण्यासारखे असणार तुमच्या कडे. नक्की लिहा, पु.ले.शु.

सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 6:00 pm | सचिन कुलकर्णी

.

अनिस वाले बिळात बसलेत, तर तुम्ही घ्या ना पुढाकार.

जेम्स वांड's picture

2 Sep 2017 - 10:00 pm | जेम्स वांड

रोजच्या जेवणाचे नियम दिलेत खाली ते वाचा, अजूनच वाईट ते तर...

आमच्या शेजारच्या घरात परवा एक बकरं आणून ठेवलंय. ते इतकं असह्य ओरडत होतं की आम्ही काल दुपारी दुसरीकडे जाऊन राहिलोय....,..,,,,,,,,;;;;;;,, आता घरी जायला हरकत नसावी बहुतेक.

सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 5:53 pm | सचिन कुलकर्णी

ते बकरं कापून त्याचा प्रसाद वाटून, खाऊन पण झालं असेल. :(
सबब तुम्ही घरात जाऊ शकता.

तुमचे शेजारी शांतिप्रिय आहेत...

उपयोजक's picture

2 Sep 2017 - 5:21 pm | उपयोजक

परदेशात विशेषत:अमेरिका किंवा युरोपातले पुढारलेले देश या ठिकाणीही अशीच पध्दत आहे का? हे देश इतक्या क्रूरपणे जनावरे मारू देतात का?

सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 5:52 pm | सचिन कुलकर्णी

परंतु slaughter मध्ये मशीनवर निर्दियीपणे प्राणी कापले जातात. यात प्राण्यांचे चिकार हाल होतात कारण थेट जीव जात नाही.

लहान तोंडी मोठा घास घेतोय पण इच्छा असेल तर हे टाळण्यासारखे आहे. ज्याना कुर्बानी द्यायची आहे त्यानी आपापली जनावरे घेऊन एका ठरलेल्या ठिकाणी यावे जिथे स्वच्छतेची सर्व व्यवस्था केलेली असेल. जनावर कापून झाल्यावर तिथेच त्याची स्वछता करून मटण घरी नेता येईल. उरलेले अवशेष एकाच ठिकाणी गोळा होतील. शहरभर घाण होणार नाही. अन्य धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत. ज्याना सूरी चालवण्यात इंटरेस्ट नसेल त्याना मटण द्यावे.
आखाती देशात रस्त्यावर जनावरे कापली जात नासावित. उटसूट अरबांशी सबंध जोडू पहाणाऱ्यानी तिथे हा सण कसा साजरा होतो ते पहावे.

सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 5:49 pm | सचिन कुलकर्णी

आखाती देशांत मुख्यतः मशिदीतच हा कुर्बानीचा प्रकार चालतो. मात्र तिथे मुख्यत्वाने मोठ्या प्राण्यांचा बळी दिला जातो. जसं की गाय, बैल आणि उंट. प्रसंगी घोड्याची देखील कुर्बानी दिली जाते.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 5:46 pm | अमरेंद्र बाहुबली

हलाल मध्ये अर्धा गळा चिरतात तर खटक्यात लगेच धडावेगळे करतात. हलाल मध्ये जनावरांचे जास्त "हालहाल" होतात.

सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 5:49 pm | सचिन कुलकर्णी

.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 5:56 pm | अमरेंद्र बाहुबली

.
पाण्याविना होळी, वाद्यांविना गणपती, फटाक्यांविना दिवाळी तशी रक्ता विना उद होऊ शकत नाही का?
( निसर्गप्रेमींनो)

सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 8:04 pm | सचिन कुलकर्णी
सचिन कुलकर्णी's picture

2 Sep 2017 - 8:04 pm | सचिन कुलकर्णी
अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 5:58 pm | अमरेंद्र बाहुबली

ईद*

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2017 - 6:47 pm | श्रीगुरुजी

स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी देवाचे/धर्माचे नाव पुढे करून जिवंत प्राण्याला यातना भोगायला लावून, हालहाल करून मारून टाकणे या प्रकाराची अत्यंत चीड व तिरस्कार आहे. पूर्वपुण्याईमुळेच मी एका शाकाहारी कुटुंबात जन्माला आलो, परदेशात काही वर्षे राहूनसुद्धा शाकाहारीच राहिलो आणि मरेपर्यंत शाकाहारीच राहीन. कितीही वाईट परिस्थिती आली तरी मांसाला स्पर्श करणार नाही.

वरती दुर्गविहारींनी लिहिल्याप्रमाणे हे ढोंगी अंनिसवाले जत्रेत बळी दिल्या जाण्याच्या प्रकाराविरूद्ध अंधश्रद्धा म्हणून आंदोलने करतात, परंतु कुर्बानीच्या नावाखाली लक्षावधी कोंबड्या, बकर्‍यांना हालहाल करून मारण्याच्या 'श्रद्धे'विरूद्ध (!) चकार शब्दाने विरोध करीत नाहीत. मागील वर्षी हमीद दाभोळकरला याविषयी विचारले असताना त्याने सांगितले होते की मुस्लिमांच्या कुर्बानी देण्यामागच्या भावनेचा विचार केला पाहिजे. असे सांगून त्याने या प्रकाराला विरोध करायला नकार दिला होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 7:06 pm | अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरूजी "हमीद" कडून कशी अपेक्षा ठेवण??

... "ते" मूर्खपणा करतात म्हणून "आम्ही" पण करणार असा दिसतो.

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2017 - 9:06 pm | श्रीगुरुजी

असं मी कधीच म्हटलेलं नाही. कोणत्याही धर्माच्या नावाखाली हत्या करणे चुकीचेच आहे. अंनिसचा विरोध selective आहे हे मला सांगायचे होते.

mayu4u's picture

2 Sep 2017 - 9:37 pm | mayu4u

आपण सुरुवात करूया, सर्व धर्मांमधल्या हत्यांना विरोध करायला... काय म्हणता?

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2017 - 10:05 pm | श्रीगुरुजी

नक्कीच

श्रीगुरुजी's picture

3 Sep 2017 - 7:35 pm | श्रीगुरुजी

वरती दुर्गविहारींनी लिहिल्याप्रमाणे हे ढोंगी अंनिसवाले जत्रेत बळी दिल्या जाण्याच्या प्रकाराविरूद्ध अंधश्रद्धा म्हणून आंदोलने करतात, परंतु कुर्बानीच्या नावाखाली लक्षावधी कोंबड्या, बकर्‍यांना हालहाल करून मारण्याच्या 'श्रद्धे'विरूद्ध (!) चकार शब्दाने विरोध करीत नाहीत. मागील वर्षी हमीद दाभोळकरला याविषयी विचारले असताना त्याने सांगितले होते की मुस्लिमांच्या कुर्बानी देण्यामागच्या भावनेचा विचार केला पाहिजे. असे सांगून त्याने या प्रकाराला विरोध करायला नकार दिला होता.

खालील धाग्यात यासंबंधी बातमी दिलेली आहे.

http://www.misalpav.com/node/37392

एस's picture

2 Sep 2017 - 8:25 pm | एस

अनेकदा प्रयत्न करूनही या धाग्यावर प्रतिसाद प्रकाशित होत नाहीये.

बकरीईद प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका ही तीच आहे जी नवस वगैरेंच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या प्राणिहत्त्येबद्दल आहे. या प्रथा चुकीच्याच आहेत आणि त्यांच्या ऐवजी प्राणिहत्त्या, बळी वा कुर्बानी ही प्रतीकात्मक असावी. असे आवाहन अंनिसने वेळोवेळी केलेले आहे. मुस्लिम सत्यशोधक मंचाने बकरीईदच्या प्राणिहत्त्येविरोधात प्रथम विचार मांडले आणि त्याला अंनिसने पाठिंबा दिला.

अंधश्रद्धा ही धर्मातीत असते आणि सर्व प्रकारच्या अंधश्रद्धेचा बीमोड व्हायला हवा.

इतर धर्मातल्या मूर्खपणाचे निमित्त पुढे करून आपण "आपल्या" धर्मातल्या अनिष्ट प्रथा पुढे चालू ठेवणे जेव्हा बंद करू तो सुदिन!

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 8:50 pm | अमरेंद्र बाहुबली

मला तर बुवा कधी दिसला नाही कुणी ह्या विरूध्द अंनिस वाला. बाकी हिंदु सणांच्या वेळेस कीती चित्रफीती, लेख येतात. पण शांतीप्रीय समाजांच्या सणांच्या वेळेस ्मात्र चडीचूप. शाळेत असतांना मला ही अंनीस बद्दल फार आदर होता. ह्यांचे लोक शाळेत येऊन काहीबाही सांगून जायचे ( अर्थात फक्त हिंदूंच्या सणांबद्दल) पण जसा मोठा होत गेलो. तसतसं ह्यांचे ढोंग लक्षात यायला लागले. मानलं हिंदू धर्मात असतील चुकीच्या चालीरीती पण बाकी धर्मात नाहीत का? अंनिस चा ऊद्देश अंधश्रद्धा मिटवणे नसून ह्यांना आणखी दुसरंच काहीतरी मिटवायचयं. (संपादित)

अंनिस चा ऊद्देश अंधश्रद्धा मिटवणे नसून ह्यांना आणखी दुसरंच काहीतरी मिटवायचयं.

म्हणजे नक्की काय?

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2017 - 9:18 pm | श्रीगुरुजी

बकरीईद प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका ही तीच आहे जी नवस वगैरेंच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या प्राणिहत्त्येबद्दल आहे. या प्रथा चुकीच्याच आहेत आणि त्यांच्या ऐवजी प्राणिहत्त्या, बळी वा कुर्बानी ही प्रतीकात्मक असावी. असे आवाहन अंनिसने वेळोवेळी केलेले आहे. मुस्लिम सत्यशोधक मंचाने बकरीईदच्या प्राणिहत्त्येविरोधात प्रथम विचार मांडले आणि त्याला अंनिसने पाठिंबा दिला.

मागील वर्षी हमीद दाभोलकरने ईदच्या दिवशी मारल्या जाणाऱ्या प्राणीहत्येला विरोध न करता त्यामागच्या मुस्लिमांच्या भावनेचा विचार करा अशा अर्थाचे काहीतरी सांगितले होते.

हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्यापेक्षा अविनाश पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना अंनिसचा विचार जास्त चांगला समजला आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. या बहीणभावांनी काही वादग्रस्त विधाने केली आहेत जी मला अजिबात पटलेली नाहीत. अंनिसचे मूळ कार्य हे धर्मातीत आहे. ते तसेच असायला हवे. हिंदू असो वा मुस्लिम, कुठल्याही धर्माच्या चुकीच्या गोष्टींचे समर्थन अजिबात होऊ शकत नाही. आणि जगातला कुठलाही धर्म, प्रेषित, महामानव हा चिकित्सेपासून मुक्त नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Sep 2017 - 9:05 am | प्रकाश घाटपांडे

त्यावर स्वतंत्र धागा आहेच की! त्याबाबत वेगवेगळी मते आपल्याला तिथे पहायला मिळतात. http://www.misalpav.com/node/37392

प्रकाश घाटपांडे's picture

4 Sep 2017 - 9:11 am | प्रकाश घाटपांडे

देवाच्या नावाने केलेल्या प्राणीहत्येला विरोध आहेच. त्यावेळी मुद्दा मातीच्या बकरीचा होता. http://www.misalpav.com/node/37392

पैसा's picture

4 Sep 2017 - 5:58 pm | पैसा

आपला आवडता अभिनेता इर्फान खान हा इतर खानावळीपैकी नाही. त्याचे स्वतःचे विचार आहेत आणि ते मांडायला तोअजिबात भीत नाही.

http://indianexpress.com/article/entertainment/bollywood/slaughtering-of...

http://zeenews.india.com/news/india/finally-irrfan-khan-reacts-to-contro...

http://zeenews.india.com/news/india/controversy-erupts-as-actor-irrfan-k...

जेम्स वांड's picture

2 Sep 2017 - 9:49 pm | जेम्स वांड

हलालचा वाळवंटी संदर्भ प्राण्यांच्या शरीरात रक्त उरल्याने मटण खराब होण्याशी असेल असे कधी वाटले नव्हते, कोणी वैद्यकीय/पशुवैद्यकीय तज्ञ मिपाकर ह्यावर काही सांगू शकेल का?

दुसरं म्हणजे हल्ली इस्लाम स्वतःच्या कर्मामुळे मोक्कार शिव्या खातोय हे जरी खरं असलं तरी अन त्यांचे सडकेवर कुर्बानी करणे हे अक्षरशः हिडीस असले तरी 'हलाल' करता एकट्या इस्लामला कोपऱ्यात घेऊन बडवणे चूक वाटते, अर्थात आपण आजूबाजूला इस्लामच पाहतो म्हणून त्यांना शिव्या देतो हे ही खरंय, पण हलालचे नियम सगळ्याच वाळवंटी सेमिटीक धर्मांत पक्के असतात थोड्याफार फरकाने, ज्यांच्यासाठी ज्यांच्या धर्मप्रेमासाठी अन राष्ट्रभक्तीसाठी आपण दाखले देतो त्या ज्यू धर्मात सुद्धा कोशर म्हणजेच हलाल पाळले जाते कडक, कोशर म्हणजे खायला उपयुक्त घोषित अन्न , त्यातही प्राणी मारायचे खास नियम असलेला भाग म्हणजे शेचिता होय, खाली देतोय त्या शेचिता विधी अन मुस्लिम हलाल मध्ये काही फरक मला तरी दिसला नाही,

The procedure, which must be performed by a shochet (Hebrew: שוחט‎‎), involves severing the trachea and esophagus [4] in a swift action using a special knife (see below) with an extremely sharp blade.[5] This is done with the intention of causing a rapid drop in blood pressure in the brain and loss of consciousness, to render the animal insensitive to pain and to exsanguinate in a prompt and precise action.[6][7] The procedure may be performed with the animal either lying on its back (שחיטה מוונחת, shechita munachat) or standing (שחיטה מעומדת, shechita me'umedet).[8]

आता हिंदुत्वाबद्दल बोलता, हिंदू धर्मात प्राणी कसा मारावा ह्यासंबंधी काही खास नियम असल्यास मला ठाऊक नाहीत, पण पुराणे वगैरे वाचता एकंदरीत मृगया, यज्ञकर्मातले बळी वगैरे पाहता काही नियम नक्की असावेत असे वाटते. प्राथमिक माहितीनुसार
खटका - शीख समाजात कंपलसरी
हलाल /कोशर - मुस्लिम/ ज्यू समाजात कंपलसरी

बाकी अजून काही नवे शिकायला मिळाल्यास शिकायला उत्सुक :)

खाद्यान्न (मांसासाहित) पॅक वर मारायची ही सील्स

.

हलाल

.

कोशर

आपल्यापैकी कोणी मिपाकर परदेशस्थ असले तर त्यांना ज्यू कोशर कडवेपणाची कल्पना असायची शक्यता आहे. कारण भारतात राहून आपल्याला कोशर किंवा इतर जुडाईक कट्टरपणाशी रोज संबंध येत नाही.

कंजूस's picture

2 Sep 2017 - 10:34 pm | कंजूस

ज्युंचे पण खटकाच असावे. फॅाक्सलाइफ चानेलवरच्या रेसपी कार्यक्रमातून कळले. त्यांचे विक्रेते वेगळे असतात. मरताना प्राण्याला कमितकमी यातना झाल्या पाहिजेत , नंतर खूप धुऊन घेतात. शिवाय ती भांडी दूध व इतर शाकाहारी पदार्थांसाठी वापरत नाहीत.

जेम्स वांड's picture

3 Sep 2017 - 6:13 am | जेम्स वांड

कन्फर्म आहे कंजूसजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2017 - 11:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>हिंदू धर्मात प्राणी कसा मारावा ह्यासंबंधी काही खास नियम असल्यास मला ठाऊक नाहीत...!

मला वाटते, हिंदू धर्मात असे काही नाही,नसावे. हलाल काय आणि खटाक काय. हिंदू धर्मात खाण्याशी मतलब आहे असे वाटते. कापले कोणी ? त्याला पाप लागेल. खाणा-याला काही नाही. असे मस्त धोरण असावे.

तरीही धर्मशास्त्राचा इतिहास चाळुन सांगतो. काही उल्लेख आहेत का ? तो पर्यन्त पॉज.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 11:31 pm | अमरेंद्र बाहुबली

आपल्या ईथे गोंधळ सारख्या कार्यक्रमात बकरा झटक्यानेच कापतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2017 - 11:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमची आजी आजोबांनी पिरांना (मुस्लिम फकीर संत) नवस केले आणि त्या निमित्ताने बोकडे कापले ते हलाल पद्धतीने. गोंधळाचे कसायावर अवलंबून असावे असे वाटते. आमच्याकडे गोंधळाच्या कार्यक्रमाला दाळ बट्टी असते.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 11:58 pm | अमरेंद्र बाहुबली

संत मुस्लिम म्हणून हलाल ने केलं असेल. बाकी मी अनेक ठिकाणी हिंदूंच्या कार्यक्रमात बघितलंय पध्दत झटक्याचीच असते.

नाही तसं नाहीये. आमच्याकडेही गोंधळाला हलाल पद्धतच वापरतात.

इरसाल's picture

5 Sep 2017 - 11:51 am | इरसाल

ह्या हलाल आणी कोशर पायी मला दरवेळी गल्फमधे जाणार्‍या शिपमेंटसाठी हे सर्टिफिकेट द्यावे लागते.

क्वालिटी कंट्रोल आणी अ‍ॅश्युरन्सवाला इरसाल.

ते कातडी जाळण्याचा वास नसावा भाऊ. मुंडी आणी पाय भाजत आसतील साफ करायला. त्यावरचे केस जळल्यावर तसा वास पसरतय.
लय दिवस झाले आमच्या घरी तसा वास न्हाई निंगला.
उद्या पाया सूप वर शरावण सोडावा आसा वाटतय :-p

स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकार ह्यांनी निर्णय घ्यावा . बाकी जगातल्या बहुसंख्य लोकांचे अन्न आहे . कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . शाकाहारी खाणे वैग्रे पुण्याई आणि ग्रेट आहे हे बिलकुल नाही . अतिशय निराधार मत आहे हे . प्रश्न स्वच्छतेचा असेल तर त्यासाठी ठोस उपाय करणे गरजेचे आहे . ते इस्लाम धर्मात असेच वैग्रे मध्ये आणायची गरज नाही . कित्येकदा मच्छी बाजारात पण अस्वच्छता असते . कित्येक देवस्थानी बळी देतात . ओरिसा ,पश्चिम बंगाल ला तर मंदिरात मच्छी कापतात . त्यामुळे धर्म ह्याचा असा त्याचा तसा ( संस्कृतीच्या बाबतीत) मध्ये आणला कि अधोगती ठरलेली आहे . ह्या पेक्षा अधिक सोयीसुविधा पुरवून कशी स्वच्छता राखली जाईल हे पहिले पाहावे . अस्वच्छता तर भाजी मार्केट मध्ये पण असते . होते काय म्हणजे एक उदाहरण दाखल ह्या विषयीच एक चर्चेचे सार सांगतो . आपण म्हटले कि बकरी ईद ला किती घाण होते तुमच्या भागात तर समोरचा त्या धर्मातला म्हणणार तुमचे देव दुसऱ्या दिवशी कचऱ्यासोबत बाहेर येतात समुद्राच्या पाण्यातून तेव्हा कुठे जातो धर्म . त्यामुळे हि न संपणारी चर्च आहे . स्वच्छतेचे भान राखणे प्रत्येकाच्या हातात आहे .

>>>>स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकार ह्यांनी निर्णय घ्यावा . बाकी जगातल्या बहुसंख्य लोकांचे अन्न आहे .~~~~>>

बरोबरे. सर्वांनीच सुधारणा कराव्या. माया संस्कृतीत तर भगत लोक मुलं खायचे. पुरावे आहेत तिथे.

वरुण मोहिते's picture

2 Sep 2017 - 10:20 pm | वरुण मोहिते

एक नंबर लागते खाऊन पहा नक्की .आता हलाल कि खटका तुमचा चॉईस :)))

गामा पैलवान's picture

2 Sep 2017 - 10:33 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

खाली देतोय त्या शेचिता विधी अन मुस्लिम हलाल मध्ये काही फरक मला तरी दिसला नाही,

मजकुरावरून शेचित प्राण्याचा जीव लवकर जावा व यातना कमी व्हाव्यात असा हेतू दिसतो आहे. त्यामुलेहा विधी हिंदूंच्या झटका वा खटका पद्धतीचा दिसतो आहे. शेचित हा शब्द शोचित म्हणजे शुद्ध अशा काहीश्या अर्थाचा दिसतोय.

आ.न.,
-गा.पै.

तुमची तळमळ अन चौकस वृत्ती कौतुकास्पद वाटते गापै.

मात्र, ज्यूईश आणि मुस्लिम कसाईकर्मविधीत कावडीचाही फरक नाहीये, हे मात्र नक्की आहे, जवळपास सगळेच स्त्रोत तेच सुचवतात. उदाहरणार्थ खालील वाक्य

Ritual slaughter as a mandatory method of slaughter for food production is practiced by Muslim and Jewish communities totaling nearly 25% of the world population. Both communities have similar religious philosophies in this regard.[1]

हा त्याचा दुवा

मुळात, हिंदू धर्मात जनावर कापायचे नियम आहेत का नाहीत, हे मला माहिती नाही पण शीख धर्मात असलेला खटका हा प्रकार वेगळा त्यात आणि ज्यूईश-इस्लामिक वाळवंटी रीती ह्यात समानता नाही हे मात्र नक्की होय.

ज्यूईश कोशर सर्टिफिकेट मिळवणे खूप कठीण असते, जनावर उभं किंवा पाठीवर निजवूनच एका अत्यंत धारदार सुरीने त्याच्या अन्ननलिका अन कॅरोटीड धमनीवर एक छेद देऊन पूर्ण रक्त वाहू द्यायचं असतं. हे सगळे एका रब्बीच्या देखरेखीखाली करावं लागतं, त्याच्या निरीक्षणावर जेव्हा कापण्याची विधी शेचिताचे तंतोतंत पालन असेल तेव्हाच ते कोशर सील मारले जाते, मासखंडावर. कोशर सर्टिफिकेशन करणे हा कितीतरी रब्बायचा चरितार्थ चालवायचा पेशा असतो, कितीतरी मोठी मीट प्रोसेसिंग हाऊसेस त्यांना रोजगार देतात (ऑस्ट्रेलिया मध्ये तरी हेच पाहिलं होतं)

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2017 - 10:47 pm | अमरेंद्र बाहुबली

हलाल पध्दतीबद्द्ल कुठेतरी वाचलय....अरबी देशात अर्धा गळा चिरून रक्त वाहू देतात. कारण रक्त वाहत राहील्याने व जनावराच्या तडफडी मुळे मांस गरम होते व त्याची चव चांगली लागते......खरं खोटं ते अरबी खाटीकच जानोत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2017 - 11:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या भारतातही बहुतेक गळा चिरुन रक्त वाहु देतात, बोकुड़ आणि कोंबड़याना पाहिलंय.

बाकी, चव त्यावर डिपेंड असेल असे वाटत नाही.

-दिलीप बिरुटे

भंकस बाबा's picture

3 Sep 2017 - 2:44 am | भंकस बाबा

गळ्याची मुख्य रक्तवाहिनी कापली जाते व प्राणी पूर्णपणे मरत नाही, त्यामुळे हृदय रक्त सतत पंप करत रहाते व शरीरातील सर्व रक्त बाहेर पडते. अशाप्रकारे मारलेले जनावराचे मांस साठवणुकीस चांगले असते

चामुंडराय's picture

3 Sep 2017 - 4:49 am | चामुंडराय

हा शब्द "चांगलं" या अर्थाने वापरलेला देखील ऐकला आहे.

उदाहरणार्थ: Is everything Kosher ? म्हणजे Is everything good?

दुर्गविहारी's picture

3 Sep 2017 - 11:14 am | दुर्गविहारी

धाग्याने अर्धशतक केल्यानिमीत्त सचिन कुलकर्णी यांचा चौकड्याची लुंगी, लाल टि शर्ट, डोक्यावर ठेवण्यासाठी रुमाल आणि सत्तुर देउन सत्कार करण्यात येत आहे.
हलकेच घ्या हो, नाहीतर माझा खटका पाडाल. ;-)

भंकस बाबा's picture

3 Sep 2017 - 11:49 am | भंकस बाबा

सध्या हैदराबादला आहेत ते!

थिटे मास्तर's picture

3 Sep 2017 - 10:48 pm | थिटे मास्तर

ह्याच बरोबर जाळी असलेल बनियन आणि १२० राजरत्न किवाम पान ;)

धागाकार्त्याचा मूळ मुद्दा स्वच्छतेचा असावा. हलाल कि खटका यांच्या योग्यायोग्यतेचा नसावा.
त्यांनी हैद्राबाद मधली जी परिस्थिती वर्णन केली आहे तशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्यामध्ये असे. काही वर्षांपूर्वी म्हणण्याचे कारण, मला डोंबिवली सोडून अनेक वर्षे झाली. लोकल ट्रेन मधून मुंब्रा पार करतांना देखील असह्य दुर्गंधी येत असे.... (वर्षाचे बाराही महिने... केवळ ईदच्या दिवसांमध्ये नव्हे).

उपयोजक's picture

3 Sep 2017 - 1:45 pm | उपयोजक

हे सगळं वाचल्यावर वाटतं की जनावरांना माणसासारखा बुध्दीमान मेंदू असता आणि त्यांना हत्यारं चालवता येत असती तर त्यांनी काय काय केलं असतं!

मोदक's picture

4 Sep 2017 - 12:34 pm | मोदक

जनावरांना माणसासारखा बुध्दीमान मेंदू असता आणि त्यांना हत्यारं चालवता येत असती तर त्यांनी काय काय केलं असतं!

त्यांनी पण अंतर्जाल तयार करून इतर प्राण्यांबद्दल असेच मत मांडले असते. ;)

Nitin Palkar's picture

5 Sep 2017 - 12:59 pm | Nitin Palkar

..... आणि 'मटण पाव', 'खिमा पाव' अशी संस्थळे काढली असती.

गामा पैलवान's picture

3 Sep 2017 - 2:09 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

मात्र, ज्यूईश आणि मुस्लिम कसाईकर्मविधीत कावडीचाही फरक नाहीये, हे मात्र नक्की आहे, जवळपास सगळेच स्त्रोत तेच सुचवतात. उदाहरणार्थ खालील वाक्य
Ritual slaughter as a mandatory method of slaughter for food production is practiced by Muslim and Jewish communities totaling nearly 25% of the world population. Both communities have similar religious philosophies in this regard.[1]

यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लामी पंथांचं मूळ अरबस्थानात आहे. त्यामुळे त्यांच्या परंपरा व हेतू साधारणत: एकसारख्या अरबी पार्श्वभूमीच्या असणं साहजिकच आहे. परंतु प्रत्येक पंथाने आपलं वेगळेपण जपण्यासाठी वेगळी कृती अवलंबलेली असू शकते.

इथे उपरोल्लेखित ठिकाणी similar religious philosophies असं म्हंटलं आहे. म्हणजे प्राणीहत्येमागील हेतू सारखेच असावेत. ते मारण्याची पद्धत वेगळी असू शकते, एव्हढंच मला सुचवायचं आहे. मी या विषयातला तत्ज्ञ नसल्यामुळे ठाम मत प्रदर्शित करू शकंत नाही.

आ.न.,
-गा.पै.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

3 Sep 2017 - 2:36 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मी स्वतः प्राणीप्रेमी आहे आणि मांसाहारीसुद्धा.विरोधाभास आहे खरा.
मुस्लिम धर्म क्रुरपणे प्राण्यांच्या हत्येला संमती देतो याचा निषेध करावा तितका कमीच आहे.हलाल करणे गैर आहे आणि झटकापण.ज्यांना शक्य आहे त्यांनी शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करावा.

गामा पैलवान's picture

3 Sep 2017 - 9:52 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

रक्त नुसते नाही त्यात मीठ मसाले घालून वाळवतात अन मग त्याच्या वड्या पाडतात, जेवताना साईड डिश म्हणून पापड कुरडई प्रमाणे तळून ते वाढले जाते. अतिशय चविष्ट प्रकार.

सहमत आहे. रक्ती अतिशय चवदार असते असं ऐकून आहे. मी खाल्लेली तेव्हा ताजी होती आणि त्यात व्यवस्थित मसाले घातलेले नव्हते. त्यामुळे की काय चव फारशी आकर्षक वाटली नाही.

इथे इंग्लंडमध्ये कापलेल्या डुकराच्या रक्तीपासून पूड बनवतात. ती ख्रिसमस केकमध्ये घालतात. त्यास ब्लॅक पुडिंग म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

इर्शाद's picture

3 Sep 2017 - 9:53 pm | इर्शाद

झटका मध्ये प्राण्याला वेदना होत नाहीत कशावरुन?
हलाल मध्ये रक्त संपूर्ण शरीरातुन वेगात बाहेर फेकले जाते व मेंदू बधिर होउन वेदना होण्याची संभावना नसते
असं अस मी एके ठिकणी वाचलं आहे..

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Sep 2017 - 10:18 pm | अमरेंद्र बाहुबली

चूक! तूनळी वर हलाल च्या चित्रफीती पहा. जनावरांची वेदनेने होणारी तडफड स्पष्ट दिसते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2017 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. शास्त्रिय पद्धतीने चालविल्या जाणार्‍या खाटिकखान्यांत सर्वसामान्यपणे,
(अ) इलेक्ट्रिकल स्टनिंग उर्फ विजेचा झटका देऊन तत्क्षणी बेशुद्ध करून
किंवा
(आ) CO2 स्टनिंग म्हणजे प्राण्यांना विजेचा श्वसनातले CO2चे प्रमाण वाढवून त्यांना बेशुद्ध केले जाते
आणि, नंतर त्यांना मारणे व इतर कापाकापी होते.

अर्थातच या पद्धतीत प्राण्याच्या शरिरावर शस्त्र चालताना तो शुद्धीत नसल्याने त्याला वेदना होण्याचा प्रश्नच नसतो. किंबहुना, मरताना वेदना होऊ नये हाच मुख्य विचार कोणत्याही आधुनिक शास्त्रिय पद्धतीमागे असतो.

२. इस्लामिक हलाल पद्धतीत खालील गोष्टी अपरिवर्तनिय आहेत,
(अ) इस्लामला खाण्यासाठी मान्य असलेला प्राणी (उदा. डुक्कर निषिद्ध आहे, इतर बरीच उदाहरणे आहेत) हवा.
(आ) प्राणी पूर्णपणे शुद्धीवर असणे अत्यावश्यक आहे (कोणत्याही प्रकारचे स्टनिंग निषिद्ध आहे).
(इ) मारताना किबला (मक्का शहरातील काबा) च्या दिशेने प्राण्याचे तोंड असायला हवे.
(ई) मारणार्‍याने मारताना "बिसमिल्ला (अल्लाच्या/देवाच्या नावे), अल्लाहू अकबर (अल्ला सर्वश्रेष्ठ आहे)" असे म्हणायचे असते.
(उ) मारण्याचे हत्त्यार धारदार असावे व त्याने गळ्यावर एकच वार करून, शस्त्र मधेच न उचलता, श्वासनलिका, कॅरॉटिड आर्टरी, ज्युगुलर व्हेन आणि अन्ननलिका एकत्रपणे कापल्या गेल्या पाहिजेत. मात्र हे करताना डोके धडावेगळे होता कामा नये, हे फार महत्वाचे.
(ऊ) गळा कापल्यावर प्राण्याला मोकळे सोडून त्याचे रक्त मोकळेपणे बाहेर उडाले पाहिजे, अर्थातच प्राण्याची तडफड होणे महत्वाचे आहे. किंबहुना, प्राण्याच्या तडफडीने स्नायू आकुंचन पाऊन शरिरातील जास्तित जास्त रक्त बाहेर पडेल, असा विचार यामागे आहे.
(ए) अश्या रितीने जास्तित जास्त रक्त वाहून, प्राण्याची तडफड थांबून तो मृत झाल्यावरच इतर कापाकाप करायची असते.

या पद्धतिचे धार्मिक समर्थन होऊ शकले तरी, प्राण्याला वेदना न होता इस्लामिक हलाल शक्य नाही. तसा दावा इस्लामिक स्कॉलर्सही करत नाहीत.

या विषयांच्या चर्चेत, केवळ स्वत:च्या (गैर)समजूतींवर आधारीत काही अंदाजपंचे विधाने केली जातात. त्यामुळे, इतरांचा गैरसमज होऊ नये यासाठीच केवळ ही माहिती दिली आहे.

बाकी चालू द्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Sep 2017 - 11:35 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत! माझ्या एका मुस्लिम मित्राने वेगळीच गोष्ट सांगितली. तो म्हणाला की जनावराने आयुष्य भर देवाचे नाव घेतले नाही. म्हणून त्याला ही शिक्षा दिली जाते.

जेम्स वांड's picture

4 Sep 2017 - 7:23 am | जेम्स वांड

तुम्ही म्हणाले तसे स्टनिंग फक्त युरोपातल्या काही देशात करणे बंधनकारक असते, सगळीकडे नाही.

शिवाय, इस्लामीक हलाल मध्ये ज्यूईश कोशर मध्ये साम्य असल्यामुळे जवळपास सगळ्याच अपरिवर्तनीय बाबी सारख्या आहेत,

त्यांची (ज्यूईश लोकांची) पण एक खाण्यालायक प्राणी वगैरे लिस्ट आहेच, वराह, ससा वगैरे त्यात बऱ्याच प्राण्यांची जंत्री आहे.

मुसलमान जसं किबल्याकडे तोंड करून कुर्बान करतात तसं ज्यू लोकांत पण कोशर नुसारच म्हणजे उभे जनावर किंवा पाठीवर निजवलेले जनावर विशिष्ट कोनातूनच मानेवर सूरी फिरवणे वगैरे असते.

तुमचे बरोबर आहे, प्राण्याला वेदना न होऊ देता हलाल/कोशर शक्यच नाही. ज्यूईश पद्धत सुद्धा समानच आहे, इतकेच म्हणणे होते, जनावराला वेदना वगैरे तर होतातच. आपण हिंदू माणूस त्या बोकडाच्या पूर्वजन्मीच्या पापांची फळं म्हणावी ती तडफड अन आत्मीयतेने मटण चेपावे म्हणतो, अन तुम्हाला समर्थन जाहीर करतो मी :) .

श्रीगुरुजी's picture

3 Sep 2017 - 11:50 pm | श्रीगुरुजी

शमीम - भाईजान बकरीद आने वाली है और आपको हमारे घर पर होने वाली दावत में शरीक होना ही पड़ेगा कोई बहाना नहीं चलेगा।

योगी - वो सब तो ठीक है मियां पर यह तो बताओ कि बकरीद मनाते क्यों हैं ?

शमीम - भाईजान बहुत पहले एक हजरत ईब्राहिम हुए थे जिनका अल्लाह पर ईमान बहुत पुख्ता था और जिन्होंने अल्लाह के कहने पर अपनी सबसे प्यारी चीज़ यानि अपने बेटे की कुर्बानी दी थी और अल्लाह ने खुश होके उनके बेटे को फिर ज़िंदा कर दिया था। तो उसी की याद में हम भी अपनी सबसे प्यारी चीज़ की कुर्बानी देते हैं।

योगी - अच्छा मतलब आप भीअपने बेटे या किसी और करीबी की कुर्बानी देते हो इस दिन?

शमीम - लाहौल विला कुव्वत कैसी बातें करते हो भाईजान बेटे की कुर्बानी कैसे दे दें हम ? हम तो किसी जानवर की कुर्बानी देते हैं इस दिन।

योगी - क्यों समस्या क्या है इसमें? अगर आपका ईमान पुख्ता है तो अल्लाह आपके बेटे को फिर ज़िंदा कर देगा।

शमीम - अरे ऐसा कोई होता है भाईजान।

योगी - क्यों आपका ईमान पुख्ता नहीं है क्या?

शमीम - अरे नहीं भाईजान हमारा ईमान तो एकदम पुख्ता है।

योगी - तो फिर क्या अल्लाह के इंसाफ पर शुबहा है कि वो बाद में मुकर जाएगा और बेटे को ज़िंदा नहीं करेगा?

शमीम - तौबा तौबा हम अल्लाह पर शुबहा कैसे कर सकते हैं ?

योगी - अल्लाह पर भी भरोसा है। ईमान भी पुख्ता है। फिर बेटे की कुर्बानी क्यों नहीं देते ? या फिर आपको सबसे प्यारा वो जानवर है जिसकी कुर्बानी देते हो ?

शमीम - नहीं नहीं भाईजान हमें सबसे प्यारा हमारा बेटा ही है। भला बकरीद से कुछ दिन पहले बाजार से खरीदा कोई जानवर कैसे हमें हमारे बेटे से ज्यादा प्यारा हो जाएगा आप ही बताओ ?

योगी -तो मतलब आप अल्लाह से भी फरेब कर रहे हो। पैसे देकर खरीदे जानवर को औलाद से भी प्यारा बताकर अल्लाह को उसकी कुर्बानी दे रहे हो। यह तो बड़ी शर्म की बात है ।

शमीम - छोड़ें जनाब यह आपकी समझ में नहीं आएगा क्योंकि आप काफिर हो। चलते हैं हमारी नमाज़ का वक्त हो गया।
__________________________________

कायाप्पा ढकलपत्र

थिटे मास्तर's picture

3 Sep 2017 - 11:59 pm | थिटे मास्तर

;)

मालोजीराव's picture

4 Sep 2017 - 11:14 am | मालोजीराव

च्यायला पोस्ट च टायटल वाचून हलीम ,दालचा ,फिरनी ,रान गोश्त ,बिर्याणी चे फोटो बघायला मिळतील या आशेने आलो होतो...असो अशी दृश्ये मांढरदेवी येथेही दिसत असत किंवा अनेक तत्सम हिंदू ठिकाणी अजून दिसतात,जत्रेला सुद्धा असाच सीन असतो ... बाकी जत्रेच्या मटणाची चवच झकास.

पूर्वपुण्याईमुळेच मी एका मांसाहारी कुटुंबात जन्माला आलो !

जेम्स वांड's picture

4 Sep 2017 - 12:12 pm | जेम्स वांड

कंदुरीत वाढल्यालं पालातलं मटण! सोबत भाकरी. आरारा लैच झक्कास!!!!

किंवा चुलीवरचं मटण अन सोबत मटण लोणचे/सुक्क मटण/वजडी फ्राय अन मटण पुलाव मगा भरून रस्सा!!

खरंच आमची पूर्वपुण्याई.... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2017 - 4:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मटन सुक्क, (उक्कड) रस्सा चवीने खाणारे त्या सोबत ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी खाणारे, रसा चुरुन खाणारे नीट नर्कात जातात.
करिता माहितीस्तव....! ;)

-दिलीप बिरुटे

मालोजीराव's picture

4 Sep 2017 - 4:20 pm | मालोजीराव

रसा चुरुन खाणारे नीट नर्कात जातात

असू देत ... हिंदू धर्मात नर्कामध्ये ७२ सुंदरी असतात