नवीन गाडी घ्यावी कि फिरायला जावे??

हेमंत८२'s picture
हेमंत८२ in काथ्याकूट
11 Sep 2017 - 10:52 am
गाभा: 

माझ्याकडे मारुती वॅगन r आहे जी मी २००८ साली घेतली होती. ती सध्या ७२००० किमी चालली आहे. घरात असे चालू आहे कि मी ती गाडी विकून दुसरी घ्यावी. गाडीचं उपयोग खालील प्रमाणे.
वर्षयाकाठी साधारणतः १० हजार किमी धावते. सध्याचे फ्युएल पेट्रोल आहे. गाडीचा सध्या थोडा फार त्रास चालू झाला आहे पण running जास्त नसल्यामुळे जाणवत नाही.
पण मला वाटते कि ती गाडी तशीच ठेवून कुठे तरी फिरायला जावे ८-१० दिवस.
पैश्याचा प्रश्न नाही ती विकून दुसरी गाडी desire वा amaze घेण्याचा विचार आहे. पण कर्ज काढून हफ्ते भरण्यापेक्षा हि आहे ती गाडी तशीच वापरावी का?
त्या शिल्लक राहिलेल्या पैशातून फिरायला जावे का?
या प्रसंगी आपण काय केले असते..

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

11 Sep 2017 - 11:02 am | धर्मराजमुटके

मी आहे तीच गाडी वापरुन पैसे दुसर्‍या कामासाठी वापरले असते. बाजारात रोजच नवीन गोष्टी येत असतात. प्रत्येकाला नवीन मॉडेलचा मोबाईल, कार घ्यावी वाटते पण त्यात काही अर्थ नाही. कारण मोह शेवटपर्यंत सुटत नाही. आताची कार अगदीच त्रास देत असेल तर गोष्ट वेगळी.

इरसाल's picture

11 Sep 2017 - 11:17 am | इरसाल

नवीन गाडी घेवुन फिरायला जाणे. ;)

सुबोध खरे's picture

11 Sep 2017 - 11:40 am | सुबोध खरे

आपल्याला नवीन गाडी desire वा amaze साधारण सहा लाखाला पडेल म्हणजे त्याचा हप्ता महिना १२ हजार रुपये पडेल.
आपली पहिली गाडी स्वतःचीच आहे त्यामुळे त्यात असा काही फार बिघाड झालेला नाही हे आपल्याला माहिती आहे. मग वर्षाला हेच १ लाख ४४ हजार वापरून आपल्याला आहे त्याच गाडीचा संपूर्ण उपभोग घेता येईल. आपण मारुतीच्या कार्यशाळेत जाऊन त्यांना सांगा मला हि गाडी विकायची आहे त्यासाठी गाडी एकदम अद्ययावत करून हवी आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित तपासून जे काही काम आहे ते करून हवे आहे. १५-२० हजार रुपयात गाडीचे सर्व काम करुन मिळेल. यानंतर हीच गाडी तुम्हाला निःशंक पणे पुढची पाच सात वर्षे वापरता येईल.
उरलेल्या पैशात दर महिना १२ हजार रुपये पेट्रोलचा खर्च (१५चे ऍव्हरेज) गृहीत धरून २४०० किमी गाडी पुढची सात वर्षे चालवता येईल.
(दुसऱ्या तर्हेने विचार केल्यास-- वर्षाला १०,००० किमी चालवता त्याचा पेट्रोलचा खर्च ५०००० हजार आणि अधिक १०,००० गाडीच्या देखभालीचा धरला तरी आपल्या हप्त्यापेक्षा निम्मा राहील) किंवा त्याच पैशात आपल्याला मोठ्या प्रमाणावर इतर मजा करता येईल.
मी माझी २००७ साली घेतलेली पेट्रोल इंडिका अजूनही विकण्याच्या विचारात नाही.
जमाने को दिखाना है या वृत्तीतून बाहेर पडलात तर बऱ्याच ठिकाणी फायदा होऊ शकतो.
तिसऱ्या तर्हेने विचार केला तर दर वर्षी दहा हजार किमी गाडी चालवता. जर सरासरी ४० किमी या वेगाने गाडी चालवता तर हे एकूण २५० तास होतात. दर वर्षाचा हप्ता एकूण १ लाख ४४ हजार म्हणजे दर तासाला पाचशे पंचाहत्तर रुपये खर्च होतात. मारवाडी हिशेब करून पहा.
आपल्याकडे WAGON R आहे म्हणजे आपण मध्यमवर्गीय आहेत हे गृहीत धरून लिहीत आहे. ही आपली दुसरी किंवा तिसरी गाडी असेल (आपण धनवान असला) तर वरील हिशेब व्यर्थ आहे.

रघुनाथ.केरकर's picture

11 Sep 2017 - 12:26 pm | रघुनाथ.केरकर

सुबोध जी अगदी खरे बोललात

छान मांडलात...

असे प्रतीसाद वाचले की मिपावर आल्याचे सार्थक झाले असे वाटते.

मानले साहेब तुम्हाला. आता हा हिशोब घरच्यांना सांगतो.
पण एक शंका आहे.. गाडी विकण्यासाठी काय पाहावे. पण माझ्या दृष्टीने गाडी हे अशी गोस्ट आहे कि तिथे मी पैश्याश्शी बरोबरी करू शकत नाही. कारण ती जर नसती तर मला किती तरी वेळा प्रॉब्लेम मध्य खूप उपयोगी पडली आहे.. आणि तिची मूल्य मी पैश्यात करू शकत नाही.
जमाने को दिखाना है या वृत्तीतून बाहेर पडलात तर बऱ्याच ठिकाणी फायदा होऊ शकतो.>>> असे काही नाही पण सध्या कुठे फिरण्यास जाताना सामानाचा प्रॉब्लेम होतो.. आता २+२ बाहेर जाताना खूप भरल्यासारखे वाटते.

>>गाडी विकण्यासाठी काय पाहावे

https://www.cars24.com/

सुबोध खरे's picture

11 Sep 2017 - 8:03 pm | सुबोध खरे

गाडी हि माणसाच्या आर्थिक परिस्थितीनुसार आवश्यकता (NECESSITY ), उपयुक्तता(UTILITY) आणि चैन (LUXURY) या तीन श्रेणीत मोडतात
वॅगन R सारखी गाडी हि जर तुम्ही धंद्याला वापरत असलात किंवा नोकरी करत असलात आणि तुम्हाला दुसरी सार्वजनिक वाहतुकीची सोयच नसेल किंवा असून अडचण आणी नसून खोळंबा(उदा PMPML) अशी असेल तर आवश्यक या श्रेणीत येईल.
अन्यथा ती एक उपयुक्त वस्तू म्हणता येईल.
होंडा सिटी, फोक्सवॅगन व्हेंटो किंवा सुझुकी सियाझ सारख्या( आणि त्यापेक्षा महाग) गाड्या उपयुक्ततेपेक्षा चैन या श्रेणीत मोडतात.
जर आपल्याला गाडी हौस म्हणून हवी असेल तर किफायतशीरपणा हा मुद्दा बाद ठरतो. कारण हौसेला मोल नसते.
उदा. आपल्या बायका १० हजार रुपयांची पैठणी विकत घेतात ती आयुष्यात फारतर तीन वेळेस वापरली जाते. म्हणजेच एका वेळेची किंमत रुपये ३३००/- पण माझ्याकडे पैठणी( किंवा तत्सम साडी) आहे या जाणिवेचे सुख हे अनमोल आहे. पैठणी हि हौस आहे आणि हौसेला मोल नसते
बाकी आपण कुठे बसता ते आपणच ठरवायचे असते.
एवढे टंकन करण्याचं कारण एकच -- आपण गाडी आवश्यकता म्हणून घेतो असे सांगत असलो आणि वर दिल्याप्रमाणे हिशेब आला कि मनाला चुटपुट लागून राहते. या ऐवजी मला गाडीची "हौस" आहे असे मान्य केले कि मग त्यासाठी पैसे किती खर्च झाले याचे वाईट वाटत नाही.
बाकी वपुंच्या भाषेत--
पैसे खर्च झाल्याचे दुःख नसते
हिशेब न लागल्याचे असते

दशानन's picture

11 Sep 2017 - 8:11 pm | दशानन

100% योग्य प्रतिसाद!

पगला गजोधर's picture

11 Sep 2017 - 1:56 pm | पगला गजोधर

वॅगन आर, भारतातील रिलाएबल/ लोकप्रिय गाडीमधील एक आहे, रिसेल व्हॅल्यू मिळेल,
७० ह + कि मी, पूर्ण झाल्याने मेजर ओव्हरहॉल खर्च येण्याची शक्यता वाढली असावी,
जर गाडी वापरून ७+ वर्ष झाली असतील तर विकण्यास प्राधान्य द्या....

नोकरी आणखी १०+ वर्ष शिल्लक असेल किंवा व्यवसाय सुस्थापित व स्टेबल असेल तर,
आकर्षक व्याजदरवर नवीन सुझुकी कार घेऊ शकता , घेताना लॉयल्टी बोनस + एक्सचेंज बोनस मिळू शकतो मारुती डीलर कडून
.....

पगला गजोधर's picture

11 Sep 2017 - 1:58 pm | पगला गजोधर

नवीन कार बरोबर ... नवीन फीचर्स जसे की ऑटो गिअर शिफ्ट, सेफटी फिचर, पोल्युशन कंट्रोल फिचर, फ्युएल इकॉनॉमी फिचर वैगरे अद्ययावत मिळावेत ......

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

11 Sep 2017 - 4:34 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

गाडी विकू नका.फिरायला जा मस्तपैकी,युरोप टूर करुन या.

अतरंगी's picture

12 Sep 2017 - 12:49 am | अतरंगी

जर गाडीचा वापर रोजचा आणि गरजेचा नसेल तर महिन्याला दहा ते बारा हजार हप्त्याला घालवून गाडीचा मेंटेनन्स आणि बाकी खर्च डोक्यावर घेण्यापेक्षा पाहिजे तेव्हा एक कार रेंट करा आणि फिरा !!!

त्या कारच्या हप्ते आणि बाकीच्या खर्चात दर महिन्याला वेगवेगळ्या गाडीतून एक ट्रिप निघेल.
वर्षातून एकदा वगैरे ट्रिपला गेलात तर Merc, BMW, XUV500 वगैरे पण नेता येतील कदाचित.

जास्त वापर नसेल तर गाडी विकत घेण्यापेक्षा रेंटने वापरण्यात किंवा सरळ ओला/उबरचा वापर करण्यात जास्त फायदा आहे.

वेल्लाभट's picture

12 Sep 2017 - 1:15 pm | वेल्लाभट

मी फिरायला गेलो असतो. जग बघण्यासारखा दुसरा अनुभव नाही.

मराठी कथालेखक's picture

13 Sep 2017 - 4:09 pm | मराठी कथालेखक

तुम्ही कार कंपनीच्या सर्विस सेंटरला नियमित सर्विस केली असेल आणि तुमचे चालवणेही व्यवस्थित असेल तर इतक्यात जास्त खर्च काढणार नाही.
७२००० किमी चालवून झाले म्हणता म्हणजे एकदा टायर्स आणि बॅटरी बदलून झाली असणार असा माझा अंदाज. साधारण एक -दिड वर्षांनी बहूधा पुन्हा एकदा टायर्स व बॅटरी बदलण्याची वेळ येईल. तोपर्यंत ८२-८५००० चालवून झालेले असतील. तोवर वापरा ......
............अणि मग पुढच्या वर्षी पुन्हा धागा काढा.

सुबोधजी जे सांगतात ते बोध घेण्यासारखं व खरं असते. धन्यवाद सुबोधजी!

हेमंत८२'s picture

15 Sep 2017 - 11:07 am | हेमंत८२

सध्या सर्व विचारांती नवीन गाडी घेण्याचा पर्याय बाद केला आहे. जोपर्यंत होईल तोपर्यंत तीच गाडी फिरवायचा विचार आहे.
आणि सध्या हिस्टरी tv वर एक कॉऊंटिंग कार्स नावाचा शो चालू असतो तो बघून आणखी काही वर्षांनी हीच गाडी रेस्टोरेशन करण्याचा विचार मनात घोळत आहे..बघू..

पगला गजोधर's picture

15 Sep 2017 - 11:35 am | पगला गजोधर

जुनी गाडी, मेंटेन ठेवण्यासाठी येणाऱ्या संभाव्य खर्चाचा अंदाज विश्वासातील एखाद्या फिटर कडून घ्या,
टायरची झालेली झीज, इंजिनाची झीज लायनर / पिस्टन /क्राँन्कशाफ्ट /इंजेक्टरची हालत चेक करवून घ्या...

गाडी रेस्टोरेशन

या साठी काही लोक आहेत उदा मनू छाब्रिया इ इ
परंतु रेस्टोरेशन करताना फेरफार करायला RTO ची परवानगी इ सोपस्कार
रेस्टोर झालेल्या गाडीची देखभाल, कस्टमाइज्ड स्पेन पार्टची उपलब्धता / किंमत लक्षात घ्या.
भविष्यात या गाडीचे स्पेअर्स किती सुलभतेने उपलब्ध असतील काय किंमत लागेल कानोसा घ्या.
रेस्टोर केलेली गाडीची रिसेल किंमतीवर पण नजर फेरा ....

बाकी माझ्या शुभेच्छा ....

मनू छाब्रिया नाही हो, ते फार मोठे आणि वेगळे धंदे करतात. हे दिलीप छाब्रिया. डीसी वाले.
त्यांच्या रिस्टोरेशन किमतीत नवीन कार येते. खर्चिक मामला आहे तो. अशा रिस्टोअर्ड कार्सना फार लाईफ नसते. नंतर तर फार घाण दिसतात त्या. त्यापेक्षा लोकल माणसाकडून स्पेअर्स आणि छोटे अडोन करून छान कार बनऊ शकतो.

पगला गजोधर's picture

15 Sep 2017 - 12:33 pm | पगला गजोधर

आय माय स्वारि

कपिलमुनी's picture

15 Sep 2017 - 5:51 pm | कपिलमुनी

मारुती वॅगन आर रेस्टोरेशन + कॉऊंटिंग कार्स == दन्डवत !

रेस्टोरेशन झाली की मला व्यनि करा !

सुबोध खरे's picture

15 Sep 2017 - 8:45 pm | सुबोध खरे

आपल्याकडे कार डिलरनी आणि मोटार फायनान्स कंपन्यांनी (स्वतः फायद्यासाठी) चुकीची संकल्पना रुजवली आहे ती म्हणजे ५ वर्षे किंवा ६०,०००/- किमी झाले कि कार बदलून टाकायची.
साधारण टॅक्सीवाले कमीत कमी ३-४ लाख किमी गाडी चालवतात ते काय मूर्ख आहेत का? आपण गाडी ठोकाठोकी केली नाही तर आजकालच्या मोटारी न गंजता १० वर्षे सहज टिकतात. पूर्वीच्या फियाट किंवा अँबेसेडर चा जमाना गेला आता गाड्या ऍनोडईज्ड असल्यामुळे तितक्या सहज त्याचा रंग उतरत नाही किंवा गंजत नाहीत. बाकी ६०-७० हजार किमी नंतर गाडी बदलण्यापेक्षा नव्या गाडीच्या एक दशांश किमतीत गाडीची संपूर्ण अपहोल्स्टरी बदलून मिळते.( ५०हजार फार तर फार) शिवाय गाडीचे टायर ब्रेक लायनर इ बदलले तर हा खर्च कधीही ६०००० च्या वर जात नाही.

सतिश पाटील's picture

18 Sep 2017 - 5:25 pm | सतिश पाटील

खरे साहेब आपले म्हणने पटले.
माझी दुचाकी बजाज डिस्कवर 125 ST, ५ वर्षात दिड लाखापेक्षा जास्त वापरली आहे. सध्याची कंडीशन बघता अजुन १.५ लाख चालू शकते.
राजमाची ५-६ वेळा, माथेरान ८-१० वेळा, महाबलेश्वर , हरिहरेश्वर ५ वेळा, अमृतसर लदाख जम्मू १ वेळा.
रेगुलर सर्विसिंग १००० रुपयाची सोडली तर गाड़ी काहीच काम देत नाही. ३००० किमीला ऑइल बदलावे लागते.
१ वेळा दोन्ही टायर बदलून झालेत. आजही ६५ किमीचा मायलेज देते.

७०००० हजाराची दुचाकी जर २.५ ते ३ लाख विनाखार्च चालू शकते तर ५- ६ लाखाची कार एवढ आरामात सहन करू शकते असे मला वाटते.

खप वाढून उत्पन्न वाढावे यासाठी हे कार कंपन्या गिर्हयिकाच्या डोक्यात हे असले काहीतरी घालत असतात.

वरुण मोहिते's picture

15 Sep 2017 - 11:44 am | वरुण मोहिते

गाडीची हौस असेल तर पूर्ण करा बिनधास्त . घ्या नवीन काही होत नाही इतका विचार करून . मनात जी कल्पना प्रथम चमकते ती गोष्ट त्वरित करावी . त्याने आनंद मिळतो . तुमचे बजेट आहे म्हणता तर दोन्ही गोष्टी अड्जस्ट करा . बघा जमतंय का .

अभिजीत अवलिया's picture

15 Sep 2017 - 2:50 pm | अभिजीत अवलिया

सहमत. नवीन गाडी घेताना एअरबॅॅग, ABS वगैरे असलेली घेणार असाल तर त्यातून अत्यंंत महत्त्वाची अशी सुरक्षितता पण मिळेल. त्यामुळे नवीन गाडीचा खर्च म्हणजे एक पाॅॅझिटिव्ह खर्च असेल. तुमच्या जुन्या गाडीत या गोष्टी नसतील बहुतेक.

II श्रीमंत पेशवे II's picture

18 Sep 2017 - 4:46 pm | II श्रीमंत पेशवे II

सुबोध जी आपले म्हणणे १०० % पटले

गाडी १५ वर्ष वयोमाना पर्यंत वापरायलाच हवी ......मग किमी कितीही झाले तरीही काही बिघडत नाही
आणि १० हजार प्रतिवर्ष रनिंग असेल तर १५०००० किमी च होतील , त्यांनी गाडीला काहीही होत नाही

मस्त ४ टायर बदलून घ्या , कार कंपनीच्या सर्विस सेंटरला भेट देऊन इतर काही गोष्टी
सगळे बेल्ट , टायमिंग बेल्ट , इलेक्ट्रिकल वायरिंग बदला , हेद्लाम्प , टेल लंप , टच अप बीच अप करा एकूण गोळा बेरीज करून ४५ -५० हजार खर्च होईल पण गाडी पुढचे ७ वर्ष तुमच्या कडे फक्त वेळेत हवा आही पेट्रोल एव्हडेच मागेल

आल दि बेश्ट ........

अभिदेश's picture

19 Sep 2017 - 12:49 am | अभिदेश

१० + वर्ष्याच्या डिझेल गाड्यांवर बंदी येणार आहे. मला तरी हा वेडेपणा वाटतोय , गाडी जर व्यवस्थित मेंटेन असेल तर कितीही वर्ष वापरता येऊ शकते.

सुबोध खरे's picture

19 Sep 2017 - 10:08 am | सुबोध खरे

http://www.hindustantimes.com/delhi-news/ngt-refuses-to-lift-ban-on-10-y...
सध्या हि बंदी फक्त दिल्ली परिसरातच आहे. पण ती उद्या भारतभर लागू होणार नाही असे नाही.
कारण
एक डीझेलची गाडी २४ पेट्रोल गाड्यांइतके प्रदूषण करते.

Dinesh Mittal's picture

6 Oct 2017 - 12:52 pm | Dinesh Mittal

I believe that if you are going to buy a new car then you will definitely go for a better car than your current one, which will result in the bigger size of investment and higher maintenance cost. So I would recommend you to buy/renew some insurance plans and add-ons according to your car's requirement. It shall significantly reduce the cost per year on your car.

Even after reading this if you make the decision to buy a new one then always select the best insurance plans for your car, because it is compulsory to buy an insurance plan with four wheelers in India then why not to buy the best.

I have listed some good resources which are going to help you to buy new cars and insurances: