समांतर विश्व

ओरायन's picture
ओरायन in जनातलं, मनातलं
16 Sep 2017 - 12:16 am

समांतर विश्व : ऐक तर्क ( Parallel Universe)
आपल्याला जवळपास सर्वांनी मानलेला वा गृहित धरलेला ' महास्फोटातून विश्वनिर्मिती ' ( Big bang theory)हा सिद्धांत माहिती आहे. ऐका बिंदुवत जागेतून महा प्रचंड स्फोट होऊन , प्रचंड उर्जा निर्माण झाली व त्याचबरोबर विश्व( Universe) निर्माण झाले. म्हणजेच अवकाश (Space) व काळ ( Time ) हे आस्तित्वात आले. ही क्रिया संपली का हो ? नाही..विश्व ( Universe) अजूनही वृद्धिंगत होत आहे. Universe is expanding.म्हणजे नविन अवकाश व वेळ निर्मिती चालुच आहे..त्याचा वेग संशोधकांना माहित झाला असून तो Hubble Constant मध्ये मोजतात. आपल्याला हे काहीच जाणवत नाही , कारण हे आपल्यापासून कित्येक कोट्यावधी प्रकाशवर्ष (Light year ) दुर वर हे घडत असते. ( १ Light year = प्रकाशाने ऐका वर्षात कापलेले अंतर..प्रकाश १ सेकंदात ३ लाख kms जातो.).विश्वाचा वृद्धिंगत होण्याचा वेग (Expansion Rate ) अचाट व अफाटच आहे. ही तुमची ओळ वाचेपर्यंत विश्व ( पर्यायाने आकाश) लाखो प्रकाशवर्षाने विस्तारलेले असेल..हे विस्तारणे विश्व निर्मितीपासून अव्याहातपणे सुरू आहे. यामुळे विश्वातील कोणत्याही दोन खगोलीव गोष्टी (जसे, तेजोमेघ- Nabula , आकाश गंगा समूह -cluster of galaxies ) ह्या ऐकमेकांपासून दुर जात आहेत.
हे समजण्यासाठी ईथे नेहमी ऐक काही प्रमाणात साध्यर्म असलेले उदाहरण देतात. ( Analogy )
ऐक मोठा बलुन आहे. जसा हवामानबदल वा वातावरणाचा मगोवा घेण्यासाठी जो उंच आकाशात सोडतात तसाच. हा बलुन सुरवातीला हवा वा गॅस भरलेला नाही.ह्या बलुन मध्ये ४ मुंग्या ४ दिशांना त्यात (वलूनच्या आतून) चिकटवून ठेवल्या आहेत.सुरूवातीला मुंग्या ऐकमेकांना जवळ असल्यामुळे पाहू शकतात.आता बलूनमध्ये हवा / गॅस भरण्यास सुरवात करा. जसजसा बलून फुगत जाईल तसतसे मुंग्यांमधील अंतर वाढत जाईल. आता मुंग्याच्या जागी दिर्घिका समजा ( दिर्घिका म्हणजे अनेक आकाशगंगांचा समूह.....जसे आपली आकाशगंगा मंदाकिनी - Milky way Galaxy , शेजारील आकाशगंगा देवयानी-Andremoda Galaxy व ईतर अनेक आकाशगंगा मिळून ऐक दिर्घिका बनते. ऐक दिर्घिका कोट्याविधी प्रकाशवर्ष दुर पसरलेली असते. म्हणजे जो प्रकाश सुर्यापासुन पृथ्वी वर यायला केवळ ८ मिनिटे व प्लुटोवर पोहचायला ५ तास लागतात , त्याला आपली Milky Way Galaxy पार करण्यासाठी १ लाख वर्ष तर आपली दिर्घिका पार करण्यासाठी कोट्यावधी वर्ष लागतील....) अशा अनेक दर्घिका ऐकमेकांपासून दुर दुर जात आहेत. बलुन फुगत होता हवेत ...पण विश्व निर्माण होत. आहे वा वृद्धिंगत होत आहे...पण कशात ? .......
कशातच नाही कारण नविन आकाश निर्माण होत आहे.अगोदर काहीच नसते. अगदी पोकळी पण नाही.
आता दुसरा बलुन घ्या. त्यात नविन मुंग्या घ्या व तो पण फुगवा...आता पहिल्या बलुन मधील मुंग्यांना दुसरे बलून ( विश्व ) व आतील मुंग्यांची कधीच कल्पना येणार नाही....This is called Parallel Universe Concept. ..ह्यात असा तर्क करण्यात आलेला आहे की जसे आपले विश्व निर्माण झाले तसे अजून पण अनेक विश्व निर्माण झाले असतील पण ते आपण अनुभवू शकणार नाही कारण आपण ह्या विश्वामध्ये बद्ध झालेलो आहोत. (We all are bound to space- time of this universe. )..
अर्थात हा केवळ तर्क. आहे. अजून तरी असा काही पुरावा मिळालेला नाही. या संकल्पवनेवर आधारित चिञपट पण आहेत जसे...The big time , It's wonderful life.
माञ हा तर्क/ कल्पना खरोखर रोमांचकारी व रोचक आहे.

मांडणीप्रकटनविचारशुभेच्छा

प्रतिक्रिया

एस's picture

16 Sep 2017 - 12:54 am | एस

हा प्रश्न मलाही बऱ्याचदा शाळेत असताना पडत असे. त्यावर तुम्ही म्हणता तसे एकापेक्षा जास्त विश्वे समजा अस्तित्त्वात असू शकतीलही; पण त्यांचे अस्तित्त्व आपल्याला आपल्या विश्वात राहून कधीही समजू शकणार नाही. तेव्हा आपल्या विश्वाबाहेर काय आहे किंवा काही असेल का हा प्रश्न कधीही न सुटण्यासारखा आहे. तूर्तास उपलब्ध निरीक्षणांच्या आधारे आपण इतकेच म्हणू शकतो की आपले विश्व हे एकमेवाद्वितीय आहे.

नेत्रेश's picture

16 Sep 2017 - 2:20 am | नेत्रेश

प्रकाशापेक्षा जास्त वेगाने दुर जाणारी वस्तु खरेतर दीसायला नाही पाहीजे कारण तीच्याकडुन येणारा प्रकाश कधी आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही

चामुंडराय's picture

16 Sep 2017 - 7:06 am | चामुंडराय

असं कसं, असं कसं

समजा एका क्षणी तुम्ही अ बिंदू पाशी आहात आणि प्रकाशापेक्षा वेगाने जाणारी वस्तू ब बिंदू पाशी आहे.
त्या वस्तूपासून निघालेला प्रकाश तुमच्या डोळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागेल (अंतराप्रमाणे) परंतु ती वस्तू तुम्हाला दिसेलच. ती काही प्रकाशाला बरोबर घेऊन पळत नाहीये.

मात्र प्रत्यक्षात ती वस्तू जेव्हा तुम्हाला ज्या स्थानी दिसेल त्या स्थानापेक्षा खूप दूर निघून गेलेली असेल.

जाजा : मी काही पदार्थ विज्ञान / खगोल शात्र इत्यादींचा तज्ञ् नाही त्यामुळे जाणकार पिंकतीलच.

नेत्रेश's picture

17 Sep 2017 - 4:23 am | नेत्रेश

हे तुम्ही स्थीर असाल कींवा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी वेगाने प्रवास करत असाल तर शक्य आहे. पण जर युनिव्हर्स प्रकशाच्या वेगापेक्षा कैकपटीने जास्त वेगाने प्रसरण पावत असेल तर आपण सुद्धा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने 'अ' व 'ब' बिंदुंपासुन दुर जात असु, तर 'ब' बिंदुपासुन निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही.

ज्योति अळवणी's picture

16 Sep 2017 - 5:24 pm | ज्योति अळवणी

आवडला लेख. अस काहीतरी imagine करायला खूप आवडतं. अशा कथा आवडतात. आता ही माहिती देखील मस्त आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2017 - 6:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहुविश्व (मल्टिव्हर्स) संकल्पना अत्यंत रोमांचक आहे !

तुषार काळभोर's picture

17 Sep 2017 - 1:15 pm | तुषार काळभोर

मेन इन ब्लॅकचा शेवटचा सीन असाच आहे.

चष्मेबद्दूर's picture

17 Sep 2017 - 2:03 pm | चष्मेबद्दूर

एखाद्या वेळेला माझ्या अवतीभोवती जे घडत असता ते आधी पण कधीतरी घडून गेलंय असं वाटत असता. म्हणजे उदा. हा लेख मी वाचलाय आणि त्यावर मी प्रतिक्रिया देतेय, त्या वेळेला मी कुठे बसले आहे, काय कपडे घातलेत, आजूबाजूला काय वातावरण आहे , माझ्या मनात काय भावना आहेत इ.इ. सगळ्या गोष्टींचा अनुभव मला आधी कधीतरी येऊन गेला आहे. आणि मी हा पुनरप्रत्ययाचा अनुभव घेत आहे.
हे वर वर्णन केलेलं कोणी कधी अनुभवलं आहे का?
असंही माझ्या वाचनात आलं आहे की हे सगळं त्या दुसऱ्या जगात घडलंय आधी. आणि आपल्याला कधी तरी ते जाणवतं.

गामा पैलवान's picture

17 Sep 2017 - 2:27 pm | गामा पैलवान

चष्मेबद्दूर,

यांस फ्रेंच भाषेत देया वू म्हणतात. इंग्रजीतही हाच शब्द वापरतात, पण उच्चार देजा वू असा करतात.

खूपदा चालू घटना आपण पूर्वी स्वप्नात पाहिलेली असते. बहुधा अशी घटना याच जगात घडलेली असते. गतजन्मीच्या स्मृती काही बालकांना अवगत असतात. वस्तुत: पूर्वजन्म आणि उत्तरजन्म दोन्ही वर्तमानजन्मापासून सारखेच विलग आहेत. त्यामुळे चालू घटना ही उत्तरजन्मीचीही असू शकते.

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2017 - 2:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

या अनुभवाला "Déjà vu" म्हणतात. बहुसंख्य लोकांना कधी ना कधी असा आभास होतो. पूर्वी अनुभवलेल्या पण नीट लक्षात न राहण्याइतक्या तीव्रतेच्या असलेल्या घटनेची मेंदूत साठवलेली अस्पष्ट आठवण, हे एक कारण यामागे असू शकते.

मराठी कथालेखक's picture

17 Sep 2017 - 8:31 pm | मराठी कथालेखक

मी काही या विषयातला तज्ञ नाही, पण याबाबत मी काही विचार केला आहे तो मांडावासा वाटतो.
Déjà vu हा एक आभास पण असू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट नसताना मेंदूला झालेली तिची जाणीव , थोडक्यात खोटी अनुभूती वा आभास.
नरजरेच्या बाबतीत असा आभास अनेकदा होतो आणि त्यामुळे आपण तो खूप सहज मान्य करतो. जसे एखादी गोष्ट समोर नसताना अचानक कधीतरी दिसणे, न झालेली हालचाल नजरेने (बहूधा डोळ्यांच्या कोपर्‍यातून) टिपणे. यामुळे आपण दचकतो मग नीट बघतो पुन्हा तसे काही दिसत नाही आणि मग स्वतःशी मान्य करतो "मी विचारात/कामात असल्याने भास झाला असावा"...याचा अर्थ डोळ्यांनी एखादी गोष्ट वा हालचाल पाहिली असता मेंदूत जे तरंग उठतात किंवा ज्या संवेदना निर्माण होतात त्या संवेदना डोळ्यांसमोर तसे काही नसतानाही निर्माण झाले तर तो 'आभास'
पण हीच गोष्ट ऐकण्याच्या बाबत , स्पर्शाच्या बाबत घडली तर आपण तितकेसे सहज 'भास झाला' म्हणून मान्य करत नाही कारण असे घडण्याचे प्रमाण कमी असते. (म्हणजे खरेच स्पर्श न होता तो झाल्याचे तरंग मेंदूत निर्माण होणे वा एखादा आवाज कानावर न पडताही मेंदूने तो ऐकणे). खरे तर आपण झोपेत स्वप्न बघतो तेव्हा दृश्याच्या , आवाजाच्या , क्वचित स्पर्शाच्या , इतकचं काय तर हालचालीच्या/वेगाच्या अनेक खोट्या संवेदना आपला मेंदू निर्माण करतो आणि जागे झाल्यावर 'ते स्वप्न होते' म्हणून सहज मान्य करतो आणि बहूधा विसरुनही जातो (जास्त अस्वस्थ न होता...)
स्मृतींच्या बाबतही मेंदू कधी घोळ घालत असावा. म्हणजे समजा मी चहाच्या टपरीवर चहा पीत असताना क्ष नामक सहकार्‍याशी , एका विशिष्ट विषयावर बोलत होतो आणि पुन्हा अनेक दिवसानी त्याच टपरीपाशी, त्याच सहकार्‍यासोबत बोलताना पुन्हा त्याच विषयावर आम्ही आलो तर माझा मेंदू मला जाणीव करुन देतो की हेच सगळे असे या आधी पण घडले आहे आणि आज त्याची पुनरुक्ती होत आहे... मग मला ते स्वच्छपणे आठवते. पण जर असे काही घडलेले नसतानाही जर मेंदूने मला पुनरुक्ती असल्याचे सांगितले , तसा संदेश विनाकारण/चुकीने पाठवला तर मी गोंधळून जाईन. माझ्या मते देजावू हा यातला प्रकार असू शकतो.

लाल गेंडा's picture

18 Sep 2017 - 11:32 am | लाल गेंडा

खरंच हि कल्पना रोमांचक आहे.
आपल्याकडे या बाबतीत खूप सिद्धांत आहेत. भौतिक शास्त्रात आणि quantum theory मध्ये याबाबत खूपच चरचा होते.
कोण याला फक्त सिद्धांत म्हणतात कोण याला खरं आहे असं म्हणतात.
पण आपल्याला कळणार कस ना? आपण एका जगात राहतो त्याला इतर जगांचा आभास होणे कस शक्य आहे?

Schrödinger's cat म्हणून एक thought experiement आहे, जर कोणाला इच्छा असेल तर wikipedia वर ते बरच detail मध्ये दिलाय.
(https://en.wikipedia.org/wiki/Schr%C3%B6dinger%27s_cat)
या वैचारिक प्रयोगानुसार प्रत्येक निर्णय एक नवं जग निर्माण करत असतो. हि नवीन जग म्हणजे समांतर विश्वे.

कॉमिक्समध्ये तर हे सतत वापरले जाते लेखकांकडून.
ओरायन नि जशी चित्रपटांची नाव दिली आहेत तश्या काही मालिकापण आहेत, त्यातल्या काही खाली देतोय.
१. the man in the high castle -- जर नाझी आणि जपान दुसरे महायुद्ध जिंकले तर?
2. into the badlands -- आण्विक युद्धांनंतर काय झाले?
3. handmaidens tale ---- जर अमेरिकेत धार्मिक वेडे सत्तेवर आले?

अर्थात या सगळ्या मालिका "जर आणि तर" च्या catagory मध्ये असल्या तरी त्या समांतर विश्वात घडतात.

असो, जसच्या तसा सिद्धांत वापरणाऱ्याही काही मालिका आहेत.

आपल्या सर्वांचे प्रतिसाद माहितीपूर्वक आहेत. त्यामुळे नवीन माहिती मिळत आहे.

मी कॉलेज मध्ये असतांना , ' A BRIEF HISTORY OF TIME ' हे स्टिफन हॉकिंग यांचे पुस्तक वाचण्यात आले. जरी त्यात तांत्रिक बाबी बऱ्याच असल्या तरी, त्यावेळी माझ्या सारख्या नवख्याला पण सहज समजतील अश्या गोष्टी त्यात होत्या व आहेत. त्यामुळे मला या विषयात मला रस वाटू लागला. स्पेस व टाईम च्या गोष्टी , ग्रॅव्हिटी चा त्यावर होणारा परिणाम , वोर्महोल ची कल्पना हे सर्व त्यात आहे. हा तो दुवा :
https://en.wikipedia.org/wiki/A_Brief_History_of_Time

'Quantum Mechanics' (मराठी नाव ?) हा थोडा समजायला / पचायला जड आहे असे मला वाटते. किंवा मराठीत याविषयी फारशी माहिती उपलब्ध नसावी.
'Schrödinger's cat' जरा निवांत वेळी वाचायला पाहिजे. दुव्या बद्दल आभारी आहे.
Déjà vu (देजा वू ) याबद्दल आपली मते वाचत आहे.

लाल गेंडा's picture

18 Sep 2017 - 3:08 pm | लाल गेंडा

"Quantum Mechanics" ला मराठी नाव शोधणे अवघड आहे. पण खरं तर ते खूप जटिल आहे कारण त्यामध्ये इतके सिद्धांत एकमेकांना काटतात कि शेवटी कळतच नाही.
साधंच घ्यायचं तर, मूलकण आपल्याला ३ माहिती पण यात त्यांची संख्या ~३६ च्या आसपास जाते.
त्यात त्यांचे वर्गीकरण, fermion, boson, up, down and with color आणि बरेच काही. शेवटी मती गुंग होते.
पण समांतर विश्व याच सगळ्या घोटाळ्यातून घडत.

चष्मेबद्दूर's picture

19 Sep 2017 - 12:38 pm | चष्मेबद्दूर

अशाच कल्पनेवर होता बहुतेक. नायक,नायिकेच्या कल्पनेतली आणि कल्पनांनी बनवलेली समांतर विश्वे .

लाल गेंडा's picture

19 Sep 2017 - 2:04 pm | लाल गेंडा

नाही. हा चित्रपट dream state वर भाष्य करतो.
एखादी कल्पना आपल्याला सुचते तेव्हा तिच्या बद्दल आपले मन (आणि मेंदू) किती स्तरांवर विचार करतात.
आणि सगळ्याचा शेवट म्हणजे पूर्ण सुचलेली कल्पना.
हे समांतर विश्व नाही.

आदिजोशी's picture

19 Sep 2017 - 5:36 pm | आदिजोशी

कशातच नाही कारण नविन आकाश निर्माण होत आहे.अगोदर काहीच नसते. अगदी पोकळी पण नाही.

फुग्याचे उदाहरण अनेक लोक देतात. ते चुकीचे आहे आणि बरोबरही आहे. सांगायचा प्रयत्न करतो.

१) मुंग्यांसाठी फुगा कशात फुगतोय हे सांगणे शक्य नसले तरी आपल्याला माहिती आहे की तो स्पेस मधील जागा व्यापतोय. तसेच फुगतोय म्हणजे फुग्याबाहेरची हवा आत येतेय. अवकाशाचे तसे नाही.
२) अवकाशातली पोकळी वाढत नाहीये. ती खेचली जातेय. अख्खेच्या अख्खे अवकाश फुग्यासारखे प्रसरण पावत आहे. फक्त त्यातले मॅटर एकमेकांपासून लांब जातंय असं नाही. कारण प्रकाश ताणला जातोय (रेड शिफ्ट).
३) आपण मात्र मुंग्यांसारखे आहोत. ऑब्झर्वेबल युनिव्हर्स पलिकडे काय आहे हे माहिती नसल्याने आपण म्हणतो नवीन आकाश निर्माण होत आहे. तसं नाहीये.
४) एक थिअरी अशी आहे की आपलं युनिव्हर्स दुसर्‍या युनिव्हर्स मधे एक्सपांड होते आहे. काही अब्ज वर्षानंतर आपली गॅलक्सी आणि अँड्रोमीडा गॅलक्सी एकमेकांमधे मिसळल्या जाणार आहेत. पण दोघांमधे असलेल्या वस्तूंमधलं (ग्रह, तारे, इ.) अंतर इतकं प्रचंड आहे एकाही ग्रह/तार्‍याची आप आपसात टक्कर होणार नाही.
५) अवकाशाचंही असंच आहे. पण ह्या सगळ्यात इतका अतिप्रचंड वेळ जातो की नक्की काय होतंय हे कळेपर्यंत मनुष्य नाहीसा झाला असेल.

ओरायन's picture

20 Sep 2017 - 10:36 am | ओरायन

आदिजोशी, आपण म्हणताय , त्यात अजून थोडी भर.
बलुन किंवा मोठा फुगा हा केवळ साधर्म्य (analogy) दाखविण्यासाठी वापरला आहे. आपण म्हणताय त्या प्रमाणे तो तुलना करण्यासाठी सेन्ट परसेन्ट योग्य नाहीच. परंतु वानगीदाखल दुसरी तुलनेत कोणती गोष्ट सांगता येत नाही.
आपल्या विश्वाचे प्रसरण / वृद्धिंगत होण्याची क्षमता ( जसे सध्या आपण समजतो एका सिद्धांतानुसार समजतो ) ही त्यात असणाऱ्या 'डार्क मॅटर' वर अवलंबुन असते . एका बहुमान्य अंदाजानुसार हे लपलेले 'मॅटर ' आपल्याला दृश्य 'मॅटर' पेक्षा कितीतरी अधिक आहे व 'विश्वाचे वाढणे' त्याच्यामुळेच होते. अर्थात हे विश्वाचे 'वृद्धिंगत होणे' (expansion) कायमस्वरूपी नाही. कधीतरी ( आपल्या भाषेत 'अनेक अब्जावधी वर्षांनी') अशी वेळ येईल कि विश्वातील हे 'अदृश्य मॅटर ' संपेल .. नंतर विश्वाचे प्रसरण थांबेल व पूर्ण विश्वाच्या स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने विश्वाचे ' आकुंचन' चालु होईल.
आकाशगंगांचे एकत्रीकरण हि खगोलीय घटना घडणे हे सर्वमान्य आहे. आपण म्हणता, तसे खरोखर , आपली आकाशगंगा (मिल्कीवे किंवा मंदाकिनी) व शेजारील आकाशगंगा (अँड्रोमेडा किंवा देवयानी ) यांची धडक होणार आहेच. देवयानी आकाशगंगेने या पूर्वी दुसऱ्या आकाशगंगेशी अगोदर धडक दिलेली आहे इथे धडक म्हणजे फार मोठी काहीतरी विचित्र गोष्ट आहे असे मुळीच नाही. उलट दोन्ही आकाशगंगा या एकत्र होणार. वे हे एकत्रीकरण खूप हळूहळू होणार. म्हणजे एकत्र ( धडक सुरु झाल्यापासुन ) यायला सुरवात झाल्यापासुन ते पूर्ण एकत्र येईपर्यंतचा काळ हाच मुळी लाखो,अब्जावधींचा आहे. तारे एकमेकांपासून फार दूर असल्यामुळे फार आदळआपट होण्याची शक्यता कमी आहे. मात्र काही तारे 'ब्लॅक होल' मध्ये लुप्त होण्याची शक्यता आहे.
'विश्वाचे प्रसरण' व 'आकाशगंगेची टक्कर' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
विश्वाचे प्रसरण हे त्यातील ' डार्क मॅटर ' ने होते.
आकाशगंगेची टक्कर हि त्यांच्यातील गुरुत्वाकर्षणामुळे होते.

आदिजोशी's picture

21 Sep 2017 - 4:21 pm | आदिजोशी

आकुंचन होण्यासाठी जितका ग्रॅविटेशनल पुल आणि मास डेंसिटी हवी तितकी नसल्याने विश्व आकुंचन पावणे शक्य नाही असं बरेच शास्त्रज्ञ म्हणतात. तसंच अ‍ॅव्हरेज डेंसिटी आणि क्रिटिकल डेंसिटी ऑलमोस्ट सेम असल्याने युनिव्हर्स फ्लॅट आहे. त्यामुळे विश्वाचा प्रसरणारा रेटही इन्फ्लेशन नंतर तसा एकच आहे. तो जर कमी होत असता तरच आकुंचन होण्याची शक्यता होती.
पण विश्वाचा अंत मोस्टली एनर्जी संपल्याने होणार असे शास्त्रज्ञ म्हणतात. आता विश्वाचा अंत म्हणजे का? ते नष्ट होणार नाही पण एनर्जी संपल्याने 'बीग बँग' पासून सुरू झालेले विश्व 'बीग फ्रीझ' पाशी येऊन थांबेल.

कपिलमुनी's picture

27 Sep 2017 - 6:36 pm | कपिलमुनी

जोशीबुवांची विज्ञानातील गती पहूम कौतुक वाटले हो !
( प्रत्यक्षात एवढा हुषार वाटत नै :) )

आदिजोशी , आपण केलेले विधान आताच्या संशोधनाला धरून आहे ( मात्र अजून हे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे का हे अजून मला तरी समजलेले नाही. ) पण आपण केलेल्या दुरुस्तीबद्दल धन्यवाद.
विश्वाचे आगामी किंवा भविष्यकाळीं काय होईल? हे समजणे ,फार क्लिष्ट गोष्ट आहे. त्यासाठी बऱ्याच बाबी आहेत. वेगवेगळ्या विज्ञान शाखांतून ,त्यातील बारकाव्यांतून जावे लागेल.
आता माझ्यासारख्याला जर सारखे 'शास्त्रीय परिशब्द ' वारंवार कानी पडले वा वाचनात आले तर मला ते वाचन 'वाचनीय' व लेखन 'रोचक' राहणार नाही. मला फक्त मला समजेल /उमजेल अशी भाषा पाहिजे.
तसा मी प्रयत्न करत आहे.
सूर्याचे गुरुत्वाकर्षण योग्य ( बरेच) असल्याकारणाने थेट नेपच्युन -प्लुटोपर्यंत तो सगळ्यांना पकडून ठेवतो व स्वतः भोवती फिरण्यास भाग पाडतो. ही एवढी ओढून धरण्याची शक्ती (गुरुत्वाकर्षण) सूर्याकडे का आहे ? .. तुम्ही म्हणाल , काही हं , सूर्य केवढा मोठा आहे. ..त्यामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण जास्त असणारच. बरोबर आहे. सूर्य मोठा आहे म्हणून त्याचे वस्तुमान जास्त आहे. जेवढे वस्तुमान जास्त तेवढे गुरुत्वाकर्षण जास्त..
आता असे समजा कि तुम्ही अवकाशात अश्या ठिकाणी आला आहात कि जिथून तुम्ही आपली पूर्ण सौरमाला दिसत आहे. सूर्याभोवती पृथ्वी व बाकी सर्व ग्रह परीभ्रमण करत आहेत. अजून तुम्ही दूर जावे .. आपली सौरमाला छोटी दिसेल.आसपास आता आपल्या आकाशगंगेच्या बाह्य कडा (आर्म्स) दिसतील तुम्ही अजून दूर जात आहात ... आता आपली आकाशगंगा पूर्ण दिसेल त्यात आपली सौरमाला छोटी ,छोटी दिसत शेवटी एखाद्या प्रखर बिंदूगत दिसेल, अजून दूर गेलात तर सौरमाला ओळखु येणार नाही कुठे आहे ते कळणार नाही..
तर आपली सौरमाला, आपल्या विश्वात केवळ अल्पसा भाग व्यापते. आपल्यासारख्या अनेक आकाशगंगा मिळून दीर्घिका ( Cluster of Galaxies) तयार होते. अश्या अनेक दीर्घिका मिळून अनंत विश्व बनते. आता विश्वातील ह्या सर्व दृश्य पसाऱ्याला वस्तुमान आहे. व ते प्रचंड आहेच. त्यामुळे विश्वाचे एकत्रित गुरुत्वाकर्षण अफाटच आहे.
आता आपल्या या विश्वाचे प्रसारण होत आहे. त्याला त्वरण आहे. म्हणजे आता जो विश्व् वृद्धिंगत दर आहे तो नंतर तेवढाच नसेल तर वाढलेला असेल. तर असा हा वाढीव दर नियमित आहे. विश्वाच्या वृद्धिंगत होण्याला एकत्रित गुरुत्वाकर्षण रोखु शकते. पण ते तसे होतांना दिसत नाही. कारण विश्व् वृद्धिंगत दर हा 'गुरुत्वाकर्षण दरापेक्षा' वरचढ आहे.

सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार 'विश्वाची रचना' या पैकी एक असेल.

१. बंदिस्त विश्व / अंतर्भूत विश्व (क्लोज्ड युनिव्हर्स) :- ह्या नुसार विश्वातील वस्तुमान प्रचंड होऊन एक वेळ अशी येईल कि त्याचे एकत्रित गुरुत्वाकर्षण दर हा विश्व् वृद्धिंगत दरापेक्षा जास्त होईल व तो विश्वाचे प्रसरण थांबवेल व उलट आकुंचन सुरु होईल. ( ह्याच्यापुढे 'Big Crunch' व आदिजोशी यांनी सांगितलेले 'Big Freeze' या संकल्पना आहेत. )

२. खुले विश्व (ओपन युनिव्हर्स ):- ह्या नुसार' विश्व् वृद्धिंगत दर' हा नेहमीच जास्त राहणार (गुरुत्वाकर्षण ते रोखू शकणार नाही.) व विश्व् सतत अमर्याद वाढतच जाणार.

वरील दोन रचनांपैकी सध्या खालील रचनेला बळकटी मिळू लागली आहे.

३. सपाट विश्व (फ्लॅट युनिव्हर्स) :- ह्या नुसार विश्व् वृद्धिंगत दर व गुरुत्वाकर्षण जवळपास सारखे असतील. कधीतरी विश्व प्रसरण थांबेल , मात्र पुढे आकुंचन होणार नाही. कारण वस्तुमान व पर्यायाने घनता ( This is called critical density) पुरेशी असेल.

शब्दबम्बाळ's picture

9 Oct 2017 - 11:47 am | शब्दबम्बाळ

समांतर विश्वाचा विचार करताना मला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या विश्वाविषयी कुतूहल वाटते
सस्तन प्राण्यांचा विचार केला तर हे देखील अंडाशयातून अगदी microscopic जगापासून त्यांच्या मूळ रुपयापर्यंत विशाल होण्याचा प्रवास करतात.
पण तरीही माणसाचे अर्भक हे त्याच्या microscopic अवस्थेत जरी असले तरी ते जिराफा इतके उंच होणार नाही हि माहिती त्यातच सामावलेली असते. त्याचे प्रसरण(वाढ) होत असताना त्याच्या आतले विश्व(पेशी) वाढत असतात आणि शेवटी एका ठराविक आकाराला येऊन हि वाढ थांबते. त्या पुढे ती का होत नसावी? आणि लहानपणीच, मोठा झाल्यावर मुलाची उंची/आकार किती होऊ शकेल हे अजूनही आपण सांगू शकत नाही...जर आपल्याला जनुकीय अभ्यासाची दिशा सापडली नसती तर याचे नक्की शास्त्रीय उत्तर देता आले नसते. फक्त निरीक्षणावरून आपण काहीतरी निष्कर्ष काढू शकलो असतो.

आता ग्रह तार्यांविषयी देखील आपण असे निष्कर्ष काढू शकतो. एखादा तारा रेड जायंट होईल का कि व्हाईट डवार्फ होईल याचे अनुमान आपण काढू शकतो. तसेच या विश्वाचे देखील असू शकते...

फार उशिरा आपणांस प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
जनुकीय विचार हा नविन मुद्दा देखील विचार करण्यासारखा आहे. पण मला वाटते की सजीवांसाठी तो जास्त उपयोगी आहे.