सामाजिक कार्य करायचे आहे,सामाजिक संस्था/NGO सूचवा!!

सिंथेटिक जिनियस's picture
सिंथेटिक जिनियस in जनातलं, मनातलं
17 Sep 2017 - 10:04 pm

मी याआधीच्या अनेक लेखात माझी पार्श्वभुमी लिहीली आहे.नविन लोकांसाठी परत लिहीतो.मी शेतकरी आहे .सातार्यात राहतो.मी अल्पभूधारक शेतकरी आहे.माझ्यापुरतं मी कमावतो.आठवड्यातील पाच दिवस मी रिकामा असतो.एखादी नोकरी व कामधंदा केल्यास वेळ जाईल असे वाटल्याने एक धागा काढला होता.त्यात मी लीहील्याप्रमाणे मला सोशल फोबिया आहे.त्यामुळे सोशली इंटेंन्सीव्ह काम मला जमेल असे वाटत नाही.त्यामुळे रिकामा वेळ जावा व सत्कारणी लागावा यासाठी मी सध्या एखाद्या सामाजिक संस्थेत काम करावे असा विचार करत आहे.जेणेकरुन माझा वेळही जाईल आणि समाजाला काहीतरी मदत होईल.आणि माझा सोशल फोबिया कमी होईल हा आणिक फायदा.
तर मला अश्या NGO मध्ये काम करायचे आहे जी धार्मिक नसेल(कारण मी नास्तिक निधर्मी आहे).आठवड्यातले चार दिवस मी असे काम करु शकतो.मधेअधे स्वखर्चाने काम करायची तयारी आहे.
मला प्राण्यांसाठी काम करणार्या,जल, पर्यावरणविषयक काम करणार्या NGO's मध्ये काम करायला विशेष आवडेल.त्याच बरोबर मानसिक स्वास्थ,विज्ञान,महीला सबलिकरण,बालविकास या क्षेत्रात काम करणर्या संस्था सूचवल्या तरी चालेल.
अपेक्षा
१.सामाजिक संस्था सातारा,पुणे या भागात असावी
२.सोशल फोबिया असल्याने एकदम पब्लिक रिलेशनमध्ये काम करणे जमेल असे वाटत नाही .एकदम मोठा डोस नकोय .थोडं ॲडज्स्ट होता येईल अश्या NGO सूचवा.
धन्यवाद.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

चामुंडराय's picture

17 Sep 2017 - 10:29 pm | चामुंडराय

देजा वू

आत्ताच एका धाग्यावर देजा वू बद्दल वाचलं आणि हा धागा वाचायला घेतला.

वाचताना लिहिण्याच्या स्टाईल वरून सारखं देजा वू वाटायला लागलं, काय कारण असावे बरें, काही कळेना जावू दे, झालं.

श्रीगुरुजी's picture

17 Sep 2017 - 10:54 pm | श्रीगुरुजी

http://www.misalpav.com/node/40720

हे वाचा. अजून एक नवीन सदस्यनाम वापरून टफिंची नव्या बाटलीत जुनीच दारू.

रुस्तम's picture

18 Sep 2017 - 8:09 am | रुस्तम

सही पकडे है।

कदाचित आपल्याला माणदेशी महिला बँक आणि संस्थेबाबत माहिती असावी. महिला आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे. साताऱ्याजवळील माणदेश येथे मुख्यालय आहे. www.manndeshifoundation.org/
पुण्यात अनेक संस्था आहेत. त्यापैकी भटक्या-विमुक्त महिलांसाठी आणि युवकांसाठी "निर्माण" संस्था कार्यरत आहे. https://nomadsgroup.wordpress.com/contact-us-2/
महिलांना कायदा मार्गदर्शन आणि स्त्रीभृण हत्या प्रतिबंध यासाठी अॅड. वर्षा देशपांडे आणि अॅड. शैला जाधव यांची संस्था आहे... नाव सध्या स्मरत नाही. सातारा शहरात कोर्टाजवळ कार्यालय आहे.

भाई अपुन मिलते है अवूर अपनी खुद की ngo निकालते हैं। कायकू दुसरोंके झमेले में पडना?

साताय्रातल्या फडके डॅाक्टर आहेत त्यांना भेटा. सगळे दरवाजे उघडतील.
साताय्रात 'नकोशी' या समाजातील नकोशा मुलीबद्दल बरेच समाजशिक्षण, नकोशिंचे पुनर्वसन हे खास साताय्रा जिल्ह्यातलेच प्रश्न आहेत ते सोडवता येतील.

रानरेडा's picture

18 Sep 2017 - 1:44 pm | रानरेडा

तुमचा जुना आयडी उडवलेला दिसतोय .
तसेही तुमच्या जुन्या धाग्यावरून तुमचा हेतू चामडी गिरी हाच दिसतोय .
तुम्ही स्वतः बुवा का बनत नाही ?

अभिदेश's picture

19 Sep 2017 - 12:53 am | अभिदेश

कमीत कमी धागे काढा आणि लोकांचा अमूल्य वेळ वाचवा , ही पण एक प्रकारची समाजसेवाच होईल.

कपिलमुनी's picture

20 Sep 2017 - 9:38 am | कपिलमुनी

हागणदारीमुक्त अभियान यामधे काम करा

धडपड्या's picture

20 Sep 2017 - 1:25 pm | धडपड्या

पंक्चर काढायला शिकून घ्या...

जेवढा वेळ काम करायची हौस आहे, तेवढ्या वेळात लोकांना फुकट पंक्चर काढून द्या...

जनसेवा होईल, आणि तुमची तब्येतही उत्तम राहिल...

मोदक's picture

20 Sep 2017 - 1:58 pm | मोदक

खड्डे खोदून झाडे लावा.