पेंट बाप्पा मोरया २०१७

अभ्या..'s picture
अभ्या.. in मिपा कलादालन
4 Aug 2017 - 8:08 pm

नमस्कार मंडळी.
गणेशलेखमालेचे सूतोवाच झालेले आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणेशोत्सवातल्या या उत्सवी वातावरणाला अजून एक सोनेरी झालर असते ती म्हणजे आपल्या मिपाचा वर्धापनदिन गणेशचतुर्थीचाच. प्रत्येक वर्धापन दिनासोबतच प्रगतीचे नवनवे टप्पे पार करणारे मिपा आगामी वर्षात खूप काही घेउन येणारे. गणेश हा जसा विद्यांचा स्वामी तसाच तो कलांचाही. नानाविध कला गणेशस्तुतीत अत्यंत कलात्मक रित्या प्रकट होतात.
गतसाली आयोजित गणेशचित्रमालेला मिळालेल्या ऊत्स्फुर्त प्रतिसादानंतर यंदाची गणेशचित्रमाला सादर करण्यास अत्यंत आनंद होत आहे.
मिपाकरांच्या अंगात किती कला आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. त्या निरनिराळे लेख, काव्ये, भटकंत्या, पाककृती आणि जोरदार काथ्याकूटातून रोजच प्रकट होत असतात. आता मात्र जरा आपल्या मिपाबाप्पाचा विचार करुयात. यंदाच्या मिपागणेशोत्सवास आपणास नेहमीप्रमाणेच रंगदार आणि ढंगदार बनवायचे आहे आणि तेही सर्वांच्या सहकार्याने. चला तर मग. भरपूर वेळ आहे आपल्याला.
हे पाहा इतकेसे काम आहे फक्तः
आपण सर्वच जण एमएस पेंट हे सोपे अ‍ॅप्लिकेशन बर्‍याच कामांसाठी वापरतो. तर यंदा ह्या अ‍ॅप्लिकेशनात रेखाटायचाय आपला मनातला बाप्पा. पेंटमधील कोणतेही टूल वापरा. कसाही रंगवा. फक्त फोटोशॉप वगैरे अ‍ॅडव्हान्स प्रकार नकोत. ह्या चित्रमालेत फक्त एमएस पेंटमधीलच बाप्पा स्वीकारले जातील. तुमच्या घरातील छोट्या कलाकारांनी हे रेखाटले असतील तरीही तसे त्यांच्या नावा अन वयासहित नोंदवून पाठवा. ही चिमुकली मंडळीही एकप्रकारे मिपापरिवाराचे सदस्यच आहेत. त्यांच्या कलाकृतींचे कौतुक आपण करणार आहोत.

आता हे कशासाठी?
तर गणेशोत्सव रंगदार करण्यासाठी रंगभुषा मंडळ सज्ज झालेले आहे. गणेशोत्सवात मिपाची बॅनर्स ही सार्‍या मिपाकरांकडून सांगून सवरुन, त्यांच्या कलाकृतींची बनवून लावायची आहेत. इथून बर्‍याच नवीन उपक्रमांचा श्रीगणेशा होणार आहे, तेंव्हा ह्या स्पर्धेत म्हणा की आपल्या घरच्या कामात म्हणा, सार्‍याच सदस्यांचे भरीव योगदान आवश्यक आहे.
तर मग चला. लागा कामाला. बच्चे कंपनी असेल तर त्यांनाही हे सांगून करुन घ्या अन पाठवा आम्हाला खूप सारे बाप्पा.
काही अडचणी असतील तर मी आहे सांगायला, बाकी इतरही बरीच तज्ञ मंडळी असतील.
आपण पाठवणार असलेली गणेशचित्रे, जेपीइजी फाइल्स, बिटमॅप फाइल्स दि. २० ऑगस्ट २०१७ पर्यंत कृपया rangbhusha.mipa@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवाव्यात. त्यानंतर पाठवलेल्या चित्रांचा ह्या चित्रमालेत सहभाग असणार नाहीये.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

4 Aug 2017 - 8:59 pm | पिलीयन रायडर

उत्तम! नुकतीच पेंट बंद होणार अशी बातमी होती. बहुदा लोकाग्रहामुळे होणार नाही बंद म्हणे. त्या अनुषंगाने चांगला उपक्रम! करायलाही सोप्पा!

आमचा पण सहभाग नक्की असेल!!!
मोरया!

पद्मावति's picture

4 Aug 2017 - 11:01 pm | पद्मावति

वाह! मस्तच.

प्रयत्न करतंय नि जमला नीट तं धाडतंय.

अभ्या..'s picture

5 Aug 2017 - 3:47 pm | अभ्या..

तुका जमतां रे. धाड.
.
.
वशाड मेलो.
(धन्यवाद, हे म्हणायची संधी दिल्याबद्दल ;) )

दोन तीन पाठवायचे त्यातून एक निवडणार असं काही आहे का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Aug 2017 - 11:00 am | ज्ञानोबाचे पैजार

अभेंद्रजी,
आपले निवेदन वचून एम एस पेंट मधे हात चालवायचा प्रयत्न केला. पण इकडे चित्र काढणे भलतेच अवघड आहे असे वाटले. (अर्थात मी पहिल्यांदाच असे चित्र काढायचा प्रयत्न केला होता) पण आमच्या गणपतीचा मारुती झाला.
आमच्या सारख्या नवशिकाउंसाठी जर आपण एम एस पेंट वापरण्यासाठी काही सोप्या युक्त्या सांगितल्या तर पुन्हा एकदा प्रयत्न करेन म्हणतो.
पैजारबुवा,

जेनी...'s picture

5 Aug 2017 - 3:06 pm | जेनी...

अगदिच सहमत ...
एखादं चित्र एक्षम्प्ले म्हणुन पैन्त मध्ये द्रव करुन दाखवायला हवं ..
होय कि नै पैबु काका ??

अभ्या..'s picture

5 Aug 2017 - 3:41 pm | अभ्या..

पैन्त मध्ये द्रव

अवघडे.

राजे ..... आपली काहितरी गफलत होतेय ..
आम्हास द्वीअर्थी असे काहिही लिहावयाचे नव्हते ...
तरिही आपण आमच्या प्रतिसादातुन मोजकेच शब्द निवडुन.. आम्हास
हास्यविनोदाचे क्षण बहाल केल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे ... =))

अभ्या..'s picture

5 Aug 2017 - 3:40 pm | अभ्या..

सांगतो माऊली, सांगतो.
चार युक्तीच्या, चार भक्तीच्या अन चार मुक्तीच्या गोष्टी सांगितल्याशिवाय मोरया म्हणायचंच नै आपण. ;)
जरा सवड मिळाली की टंकेन.
आता आलोच आहे तर एक टीप घ्या जाताजाता,
प्रायमरी ड्रॉईंग पेन्शीलीने नै ओढायचे. लै थिन आणि विचित्र लाईन येते. बेस्ट ऑप्शन म्हणजे ब्रश घ्यायचा. त्यातले राउंड टिप मधले मिडल साईज टिप निवडायचे. काळाभोर कलर घ्यायचा आन फिरवायचा माउस कॉन्फीडन्टली. मस्त ग्राफेक झाले की त्यात व्हायब्रंट कलर भरायचे एकेक बकेटीने. लगेच तुम्ही पिकासोला पण इकून येताल. हैकानैका.

लगेच तुम्ही पिकासोला पण इकून येताल

ठठो!!

Sandy

निव्वळ एमएस पेंट वापरून संगणकावर केलेले 'मोनालिसा' चे चित्र असा एक व्हिडिओ यूट्यूबवर बऱ्याच दिवसांपूर्वी पाहिला होता. अशक्य भारी प्रकार होता.

पेंट बाप्पांची वाट पाहतो आहे.

अंतु बर्वा's picture

7 Aug 2017 - 8:51 pm | अंतु बर्वा

कालच बँकचोर नावाचा चित्रपट पाहण्यात आला.. त्यात म्हटल्याप्रमाणे, GBMLR!! (गणपती बाप्पा मोरया, लेट्स रॉक!) :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2017 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपक्रमाला शुभेच्छा रे...!

-दिलीप बिरुटे

जुइ's picture

15 Aug 2017 - 2:10 am | जुइ

या वेळेस अगदी अनोख्या उपक्रमाचे नियोजन केले आहे . शुभेच्छा!!

सूड's picture

21 Aug 2017 - 12:01 pm | सूड

पाठवला आहे.

मीता's picture

21 Aug 2017 - 3:37 pm | मीता

पाठवला

II श्रीमंत पेशवे II's picture

21 Aug 2017 - 4:29 pm | II श्रीमंत पेशवे II

गणेश

II श्रीमंत पेशवे II's picture

21 Aug 2017 - 5:49 pm | II श्रीमंत पेशवे II

II श्रीमंत पेशवे II's picture

21 Aug 2017 - 5:51 pm | II श्रीमंत पेशवे II
तुषार काळभोर's picture

22 Aug 2017 - 8:18 pm | तुषार काळभोर

मस्स्त चित्र काढलंय!

दोन उभ्या रेषा श्रीमंत पेशवे दोन उभा रेषा
श्रीमंतांची इच्छा असेल तर हे स्वामीनिर्मीत श्रीगजानानाचे चित्र मिपाच्या स्पर्धेसाठी वापरले तर चालेल काय?

आणि आता प्लीज दुसर्‍या कोणी चित्रे पाठवू नका प्लीज.
पुरेसी म्हणण्यापेक्षा जास्त चित्रे आलीत.
धन्यवाद मिपाकरांनो..

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Aug 2017 - 5:10 pm | माम्लेदारचा पन्खा

इतकी अजिजी सोलापूरकरांकडून . . . . पटत नाही !

ते मरो, तिसर्‍या दिवशी पण एकच एक ब्यानर दिसतोय, क्या गडबड हय दया क्षमा शांति?

सतिश गावडे's picture

27 Aug 2017 - 6:43 pm | सतिश गावडे

आम्हालाही बघू द्या की पेंट बाप्पा.

प्रीत-मोहर's picture

28 Aug 2017 - 2:51 pm | प्रीत-मोहर

अरे ह्या पेंट बाप्पा मोरयाचं काय झाल?

क्षमस्व मंडळी. मी जरा गणपतीची कामे जास्तच केल्याने आजारपण अनुभवतो आहे. ३ दिवस झाले काम्पुटरलाच हात लावलेला नाहीये. त्यामुळे होते ते प्लानिंग शिस्तीत बोंबलले गेले आहे. बप्पा पण म्हणले २ दिवस एक्स्ट्रा राहतो. मग लवकरच करु मॅनेज म्हणे.

तुषार काळभोर's picture

2 Sep 2017 - 9:38 am | तुषार काळभोर

कालचं बॅनर दिसत नव्हतं. आजचं बॅनर खूप छान आहे. हे पेंट बाप्पाचं बॅनर रोज गायब होईल. ते सर्व बॅनर्स या धाग्यात ठेवता येतील का? म्हणजे रोज बॅनर प्रकाशित करायचं आणि या धाग्यात (मूळ धाग्यात किंवा प्रतिसादात) ठेवायचं.

"या वर्षीच्या सगळ्या बॅनर साठी एक नवीन धागा काढा" असे आमच्या सवंगड्याला सुचवले आहे. सायकलीतून फुरसत मिळाली की तो काढेल किंवा अभ्याला सांगेल. :)

तुषार काळभोर's picture

2 Sep 2017 - 9:39 am | तुषार काळभोर

020917

पद्मावति's picture

2 Sep 2017 - 1:27 pm | पद्मावति

फारच सुंदर आहे.
कालचे सूड यांचे चित्रपण मस्तं होते.

पिलीयन रायडर's picture

2 Sep 2017 - 1:41 pm | पिलीयन रायडर

सूड चे चित्र कधी आले? एक संपूर्ण दिवस तिथे चित्र दिसत नव्हते खरं तर.

इथे टाका परत प्लिज.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2017 - 3:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

आतापर्यंतचे "मिपा गणेशोत्सव २०१७" बॅनर्स...

या प्रकल्पाने मिपाकरांमधले अनेक कलाकार प्रकाशात येत आहेत ! केवळ 'एमएस पेंट' वापरून ते इतकी किमया साधू शकतात तर प्रगत पारंपारिक व आधुनिक साधने हाती घेऊन ते काय करू शकतील !!

यशोधरा's picture

3 Sep 2017 - 12:21 pm | यशोधरा

वा, वा, आता सगळी बॅनर्स इथे येऊदेत. मस्त आहेत!

तुषार काळभोर's picture

3 Sep 2017 - 4:19 pm | तुषार काळभोर

वरच्या प्रतिसादात दिसतोय. पण पानाच्या वरती दिसत नाहीये.
परवा सूड चा बॅनर सुद्धा दिसत नव्हता

सतिश गावडे's picture

3 Sep 2017 - 5:53 pm | सतिश गावडे

खुप सुंदर गणपती आहेत पेंटमधील. एका साध्या टूलमधून इतकी सुंदर चित्रे केवळ कलाकार लोकच काढू शकतात.

(आम्ही हे टूल फक्त एरर स्क्रिनशॉट पेस्ट करण्यासाठी वापरतो ;) )

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2017 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

एमएस विंडोमधले स्क्रिनशॉट्स घ्यायला विंडोतलेच "स्निपिंग टूल" ब्येष्ट. मात्र, स्क्रिनशॉट्समध्ये एडिटिंग व टेक्स्टिंग करायचे असल्यास पेंट उत्तम.

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2017 - 3:58 am | पिलीयन रायडर

छानच रेखाटले आहेत सगळ्यांनी बाप्पा! आवडला यंदाचाही उपक्रम!

पण बाकीचेही येऊ द्यात ना. अगदी बॅनर नसले तरी ज्या काही रफ इमेजेस असतील त्याही बघायला आवडतील. इतका उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय तर बघण्याची फार उत्सुकता आहे.