पुराणातल्या विमान शास्र वैगेरे वांग्याच चमचमीत भरीत !

डँबिस००७'s picture
डँबिस००७ in काथ्याकूट
18 Aug 2017 - 7:06 pm
गाभा: 

भारताच्या ग्रंथ संपदेत ब्रम्हास्त्र, वेगवेगळी अस्त्रे , शस्त्रे , शास्त्रे जसे विमान शास्त्र वैगेरेचे विस्मयकारक उल्लेख आलेले आहेत. भारतीय समाजातील काही लोक अश्या विस्मयकारक उल्लेखाचा दाखला देत भुत काळातील भारत टेक्नॉलॉजीत खुप पुढे होता असा दावा करत असतात . पण त्याच वेळेला समाजातील काही सुशिक्षीत लोक हा दावा खोडताना ह्या सर्व मात्र कवि कल्पनाच आहेत असा दावा करतात.

भारताने जगाला अंक मोजायला शिकवल. शुन्य, दशांश पद्धती ही भारताची जगाला भेट आहे. पण ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत. शाळेत विदेशी लोकांनी काय शोधुन काढल त्यावर जोर दिला जातो.

विमान शास्त्र, ब्रम्हास्त्र, वेगवेगळी अस्त्रे , शस्त्रे वैगेरे उदाहरणाच्या जोरावर कोणतेही संशोधन न करता, भारत फार पुर्वी प्रगत होता असा दावा करण चुकीच आहे. पण त्याच बरोबर कोणते ही संशोधन ही न करण हे ही तितकेच चुकीचे आहे.

भारतीय म्हणुन असे बरेच भाग आहेत ज्यावर सरकारी खर्चाने संशोधन होणे गरजेच आहे. हरप्पा, मोहेंजोदाडो च्या समकालिन भारतात असलेल्या संस्कृती तसेच खुतुबमिनार जवळचा लोहस्तंभ, कोणार्क मंदिर मधील विस्मयकारक मंदिर उभारणीतील टेक्निक , होयशाळा मंदीरातले चकाकीत स्तंभ व आजही चकाकणारा नंदी !!

स्वातंत्र्यानंतर भारतीय संस्कृतीक ठेव्यावर संशोधन व संवर्धन सोडाच पण त्याची उपेक्षाच झालेली आहे. ही अक्षम्य उपेक्षा जाणुन बुजुन केली आहे अस राहुन राहुन वाटत .

कोणार्क मंदीरावर एका परदेशी माणसाने विस्तृत फिल्म बनवली जी डीस्कव्हरी सारख्या चॅनेल वर दाखवली गेली. ह्या फिल्म मध्ये अश्या काही बाबी दाखवलेल्या होत्या की मला स्वतःला विश्वास बसला नाही.

अजिंठा वेरुळ सारख्या लेणी बनवल्या त्या वेळेला त्या कश्या बनवल्या असतील, कैलाश मंदीर बनवण्यासाठी लाखो टन खडकाचा भाग कोरुन काढावा लागला होता अस सांगीतल जात पण तो कचरा कुठे टाकला गेला ह्याचा कोणता ही पुरावा नजिकच्या परिसरात उपलब्ध नाही. ह्याचा अर्थ असा होतो की हे मंदीर कोरुन काढण्या ऐवजी दुसर्या कोणत्या तरी पद्धतीने बनवले गेले असले पाहीजे. जसे की दगड मऊ करुन त्या मऊ दगडातुन मंदीर कोरुन काढणे. जी मऊ झालेली ती माती सहज काढलेली असेल.

भारतीय नौका बनवण्यात माहीर होते अस म्हणतात पण अश्या नौका बनवण्याचे कारखाने कोठे होते, कोणते फायदे अश्या नौकेत असायचे हे आपल्याला आता कळणे कठिण आहे. ह्यावर संशोधन होणे महत्वाचे आहे.

भारतीय गाय ही भारतीय संस्कृतीच्या मध्य भागात विराजमान आहे. " गौ माता " ह्या नावाने मिरवणार्या ह्या प्राण्याला ईतक महत्व का दिल गेल असल पाहीजे ? ह्या वर संशोधन करण्या ऐवजी भारतीय समाजाला नाव ठेवण्यात लोकांनी धन्यता मानलेली आहे. जर संशोधन केल तर गायी बद्दलची भ्रांती दुर होईल व खरी माहीती बाहेर येईल. सरकार आता भारतीय गायी वर संशोधन करण्यावर जोर देत आहे.

भारतात स्वबळावर संशोधन करणे हे सोप्पे नाही ह्याची कल्पना आहे. ह्याच कारण आपली शिक्षण व्यवस्था आहे. आज आपण
रोबॉटस शिक्षण संस्थेतुन काढत आहोत. ज्या पेशात पैसा नाही त्यात कोणालाही आपल करीयर करायची ईच्छा असत नाही. आपली आवड , कल वैगेरेला ईथे स्थान नाही.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2017 - 8:51 pm | अमरेंद्र बाहुबली

खरयं!!! " घरातली कोंबडी दाळी समान." ही आपली मानसिकता आहे.

फुलपाखराच्या चार अवस्था असतात एवढं जरी कुठे कुणाला कळलं असतं तरी ते प्रकरण आत्मा परमात्मा चिंतनावरच खपवलं असतं.

सकाळी सकाळी देशभक्तीपर लेख वाचून डोळे भरून आले.

डँबिस००७'s picture

19 Aug 2017 - 6:15 pm | डँबिस००७

अत्रे साहेब, डोळे पुसत पुसत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न तर करा !!

प्रश्न नीट, कुतुहलपूर्वक विचारले तर उत्तर द्यायला लोकांना बरे जाते. प्रश्न विचारताना "हेच बरोबरे" असा आवेश असला तर उगाच वाद होतो. तुम्ही एकच प्रश्न नीट निवडा आणि हायलाईट करा, उत्तरे द्यायचा प्रयत्न केला जाईल.

भरमसाठ हायपोथेसिस ची जंत्री नको. मुद्देसूद लिहा.

अजिंठा वेरुळ सारख्या लेणी बनवल्या त्या वेळेला त्या कश्या बनवल्या असतील, कैलाश मंदीर बनवण्यासाठी लाखो टन खडकाचा भाग कोरुन काढावा लागला होता अस सांगीतल जात पण तो कचरा कुठे टाकला गेला ह्याचा कोणता ही पुरावा नजिकच्या परिसरात उपलब्ध नाही. ह्याचा अर्थ असा होतो की हे मंदीर कोरुन काढण्या ऐवजी दुसर्या कोणत्या तरी पद्धतीने बनवले गेले असले पाहीजे. जसे की दगड मऊ करुन त्या मऊ दगडातुन मंदीर कोरुन काढणे. जी मऊ झालेली ती माती सहज काढलेली असेल.

हे लैच खतरनाक आहे. असले निष्कर्ष काढून व्हिज्युअलाईज करणे अ‍ॅक्चुअल मंदीर बांधण्यापेक्षा क्रियेटिव्ह काम आहे राव.

पैसा's picture

19 Aug 2017 - 6:43 pm | पैसा

भारतात स्वबळावर संशोधन करणे हे सोप्पे नाही ह्याची कल्पना आहे. ह्याच कारण आपली शिक्षण व्यवस्था आहे. आज आपण रोबॉटस शिक्षण संस्थेतुन काढत आहोत. ज्या पेशात पैसा नाही त्यात कोणालाही आपल करीयर करायची ईच्छा असत नाही. आपली आवड , कल वैगेरेला ईथे स्थान नाही.

सोळा अणे पटलं बघा!

डँबिस००७'s picture

19 Aug 2017 - 8:50 pm | डँबिस००७

अभ्या..

तुम्ही अजिंठा वेरुळ सारख्या ठिकाणी गेले आहात का ?

गेले नसण्याची शक्यताच जास्त, म्हणुनच छातीठोकपणे म्हणु शकता !!

अभ्या..'s picture

19 Aug 2017 - 10:43 pm | अभ्या..

"मी गेलो नसल्याची शक्यताच जास्त" असे तुम्ही छातीठोक पणे कसे म्हणू शकता?

डँबिस००७'s picture

19 Aug 2017 - 8:54 pm | डँबिस००७

अत्रे,

खुतुबमिनार जवळचा लोहस्तंभ ! तो गेली कित्येक वर्षे उन्हापावसात ऊभा आहे व त्याला अजुनही गंज लागलेला नाही !!

त्याच्या मॅटलर्जी बद्दल सांगा ! ह्या स्तंभातील मेटल बद्दल काय माहीती आहे ते सांगा !!

पद्मावति's picture

19 Aug 2017 - 9:36 pm | पद्मावति

लेखाचा आशय पटला. आवडला.

अभ्या..'s picture

19 Aug 2017 - 10:43 pm | अभ्या..

"मी गेलो नसल्याची शक्यताच जास्त" असे तुम्ही छातीठोक पणे कसे म्हणू शकता?

डँबिस००७'s picture

20 Aug 2017 - 1:38 am | डँबिस००७

"मी "अजिंठा वेरुळला" गेलो आहे तिथले "कैलाश मंदिर " बघितले आहे अस तुम्ही अजुनही पण ठामपणे म्हणत नाही आहात "

माझ्या दाव्यावरच भाष्यतर दुरची गोष्ट !

धन्यवाद. आता मी तुम्हाला अशा प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे हे सांगतो.

हीच पद्धत वापरून तुम्ही तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू शकता.

तुमचा प्रश्न -

"खुतुबमिनार जवळचा लोहस्तंभ ! तो गेली कित्येक वर्षे उन्हापावसात ऊभा आहे व त्याला अजुनही गंज लागलेला नाही !! त्याच्या मॅटलर्जी बद्दल सांगा ! ह्या स्तंभातील मेटल बद्दल काय माहीती आहे ते सांगा !!"

उत्तर कसे शोधाल -

सर्वप्रथम qutub minar असे गुगल करा. रिझल्ट मध्ये "iron pillar" अशी एक विकिपीडिया ची लिंक दिसून येते. त्यावर क्लीक करा.

https://en.wikipedia.org/wiki/Iron_pillar_of_Delhi

त्यातले दुसऱ्या परिच्छेदातले हे वाक्य बघा

The pillar has attracted the attention of archaeologists and materials scientists because of its high resistance to corrosion and has been called a "testimony to the high level of skill achieved by the ancient Indian iron smiths in the extraction and processing of iron."[1][2]

यात जे [१] आणि [२] असे आकडे दिसतात त्यांना सायटेशन असे म्हणतात. त्यावर क्लिक करा.

तुम्हाला खालील संदर्भ दिसतील

[१] On the Corrosion Resistance of the Delhi Iron Pillar, R. Balasubramaniam, Corrosion Science, Volume 42 (2000) pp. 2103–2129. "Corrosion Science" is a publication specialized in corrosion science and engineering.

[२] Yoshio Waseda; Shigeru Suzuki (2006). Characterization of corrosion products on steel surfaces. Springer. p. vii. ISBN 978-3-540-35177-1.

यातल्या पहिल्या पेपरचे नाव scholar.google.com या वेबसाईटवर टाका. रिझल्ट पेज वर उजवीकडे pdf लिंक दिसेल, त्यावर क्लीक करून pdf उघडा. (तुमच्या सोयीसाठी http://home.iitk.ac.in/~bala/journalpaper/journal/journalpaper_17.pdf)

या पेपर चे conclusion वाचलं तर खालची माहिती मिळेल.

The critical factor aiding the superior corrosion resistance of the DIP is the formation of crystalline iron hydrogen
phosphate hydrate, as a thin layer next to the metal±metaloxide interface, which drastically lowers the rate of corrosion due to its low porosity content. The process of protective crystalline phosphate formation is aided by alternate wetting
and drying cycles, which is an important contribution of the atmosphere to the DIP's corrosion resistance. Therefore, the corrosion resistance of the Delhi Iron Pillar is due to both Delhi (the environment providing alternate wetting and
drying conditions) and iron (with its high P content conferring protection by the formation of the crystalline iron hydrogen phosphate).

यातुन तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळते का?

नसेल मिळाले तर केवळ याच विषयावर नवीन धागा सुरु करावा - मिपावर कोणी मेटॅलर्जी चे विद्यार्थी असतील तर जास्त डिटेलवारी सांगू शकतील.

सध्या हे असले म्हणजे आम्ही फार ग्रेट होतो आमच्या कडे सगळे होते हे सांगण्याची जोरदार चढाओढ लागली आहे किंवा जाणीवपूर्वक लावली जात आहे. अशा प्रकारचे विचार ही एक दिशाभूल आहे त्यातून साध्य काहीच होणार नाही पुरण काळात सोडा महाभारतात राजवाड्यात किंवा लोकांच्या घरात पाने पोहोचवायला नळ होते धरणे होती कालवे काढलेले होते असे उल्लेख आहेत का , सांद पाण्याचा निचरा करायची जी पद्धती सिंधू संस्कृतीत होती तशा प्रकारचा उल्लेख तरी सापडतो का? तर नाही सापडत ....
मागे एकदा कुठेतरी ज्ञानेश्वरी तले विज्ञान किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला. मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा...एक पुण्यात राहणारे लेखक(?) जे चांगले mbbs डॉक्टर आहेत त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. माणूस डॉ आहे म्हणून आमच्या वडलांनी ती घेतली आणि भयंकर निराशा झाली. रामायणात जम्बो जेट काय, महाभारतात अण्वस्त्र काय, सूक्ष्मदर्शक आणि टेस्ट ट्यूब बेबी काय.राम राम राम ....हे म्हणे स्वतः योग सामर्थ्याने मंगळावरगेले होते आणि त्यांची निरीक्षणं चक्क नासाने खरी मानली आहेत.(नासाला कामधंदे नाहीत) ...असो
माझा एक मित्र आहे-देवधर म्हणून ... त्याची बायको भांडारकर संस्थेत जुन्या संस्कृत ग्रंथांचे भाषांतर करायचे काम करते. माझी तिची नुकतीच चर्चा झाली कि बुवा हे जे वेदकाली विमान ,अंतराळ यान , ब्रह्मास्त्र म्हणजे atom bomb अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो, वाचतो त्यात काही तथ्य आहे का? यावर तिने सांगितलेली माहिती उद्बोधक ठरेल.
एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते. आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते अशी खातरजमा करता नाही आली तरी ह्या गोष्टी निखालस खोट्या आहेत असंही काही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे हे ग्रंथ जरी जुने असले तरी ते अस्सल असतात असे नाही म्हणजे त्यात प्रक्षेप असतात उदा महाभारत या ग्रंथाचे घेतले तर महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे की जी अनेक थोर इतिहास संशोधकांनी ( सुखटणकर, कोसंबी, मिश्र वगैरे )अनेक वर्षांच्या अनंत परिश्रमांन्द्वारे सिद्ध केली आहे तिच्या मध्ये सुद्धा प्रक्षेप आहेत पण ते साधारणतः २ रया किंवा ३ रया शतकातले. म्हणजे आपण असे म्हणू शकतो कि हि महाभारताची चिकित्सक आवृत्ती आपल्याला साधारण ई स १५० च्या सुमारास प्रचलित असलेल्या महाभारतकथे कडे घेऊन जाते. आता तुम्ही विचार करा इतक्या महान इतिहास संशोधकांना इतक्या प्रचंड मेहनती नंतर जर सर्वांना माहित असलेल्या महाभारत कथेच्या त्यातल्या त्यात अस्सल प्रती पर्यंत पोहोचायला एवढा त्रास होत असेल तर आजकाल उठ सुट कोणीही लुंगासुंगा प्राचीन भारतात विमाने , अंतराळ याने, अण्वस्त्रे आणि काय काय शोधून काढतात त्यांच्या विश्वासार्हते बद्दल आपण काय बोलावे.
आता रामायणात येणारा पुष्पक विमानाचा उल्लेख घ्या, एक तर हा एक प्रक्षेप आहे. तो नंतर कुणीतरी घुसडला आहे पण चला घटकाभर पुष्पक विमान होते असे गृहीत धरले तर ते कोणत्या इंधनावर चालायचे ते इंधन कुठून मिळायचे ? ते शुद्ध कुठे आणि कसे करायचे ? जिथे बनवले तिथून विमानापर्यंत कसे आणायचे? रथातून कि गाढवावर लादून?कि आजच्या सारख्या रेल्वे गाड्या , मोटारी डांबरी सडका होत्या तेव्हा? असतील त्याचे उल्लेख कसे कुठे नाहीत? कसे असतील कुणा शहाण्या माणसाने आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाला अनुअसरुन एक छान गोष्ट रचून दिले घुसडून झाले, अन काय? आणि एकच विमान बनवले विमानांचा ताफा नाही? कमाल आहे
तीच गोष्ट अण्वस्त्रांची, अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? ती अण्वस्त्र काय घोडागाडी(रथ) किंवा बैल गाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे, एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा टाकायचा, तर काही क्षेपणास्त्र वगैरे नाही ? कमाल आहे? अण्वस्त्र बनवायला लागणारे तंत्रज्ञान होते मग क्षेपणास्त्र बनवायचे नव्हते ते सोडा सध्या तोफा सुद्धा नव्हत्या तेव्हा.
आता मूळ मुद्दा, त्याचं असं आहे कोणी ऋषी मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादे विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (तसच ते बनवत असतील असं कुणाच म्हणण असेल तर मग प्रश्नच मिटला)विमान सोडा एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा . १) विजेचा शोध, उत्पादन आणि खात्रीशीर असा पुरवठा / वितरण करणारी यंत्रणा(नुसता दिवा पेटवायला नव्हे तर बनवायला सुद्धा) २) अत्यंत पातळ आणि स्वच्छ पारदर्शक काच बनवण्याची परिष्कृत पद्धती. ३) Tungston सारख्या धातूंचा शोध उत्पादन तसेच त्यांच्या गुणधर्माची छाननी करणारी सुसज्ज प्रयोग शाळा आणि metallurgy सारख्या शास्त्राचा पुरेसा विकास.शिवाय त्याचे अत्यंत पातळ तंतू (फिलामेंट) बनवण्याची पद्धत. ते सोडा, दिवा बनवण्याच्या निरनिराळ्या विभागात द्यायला drawings च्या असंख्य प्रती काढण्यासाठी छपाईचे तंत्र.ते लागेल कि नाही? (वेदामध्ये काचेचा उल्लेख नाही तसाच लोखंडाचा हि नाही, कोळशाचा हि नाही . वेदाइतक्याच जुन्या आणि कदाचित त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषात काच, लोखंड, कोळसे सापडत नाहीत. आपल्या पुराणांमध्ये विमानाचे विविध अस्त्रांचे उल्लेख आहेत पण तुम्ही अनेक आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या सुद्धा तशाच खऱ्या वाटतील पण त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत, खऱ्याखुऱ्या नाही.) आणि या सगळ्या पेक्षा महत्वाच म्हणजे प्रयोजन आणि बाजारपेठ. जर साधे तेलाचे दिवे पेटत असतील तर विजेच्या दिव्याच्या साह्याने उजेड पाडायचा कशाला? एव्हढे उपद्व्याप करून विजेचे दिवे बनवून जर घ्यायला खात्रीची बाजारपेठ नसेल तर कोण हा धंदा करेल. रामायण महाभारत या चांगल्या, मनोरंजक कथा आहेत असच नाही तर तो आपला इतिहास सुद्धा आहे हे खर पण इतिहास इतिहास म्हणून शिवाजी महाराजांना भवानी माता खरोखर प्रसन्न झाली आणि भवानी तलवार दिली यावर विश्वास ठेवण वेडेपणाच नाही का? ( खरच भवानी प्रसन्न झाली असती तर तिला महाराजांना एखादी AK47 द्यायला काय हरकत होती? भवानी मातेला काय अशक्य आहे?)
एक नीट समजून घ्या, तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजात सर्वदूर त्याचा प्रसार सरंजामशाही कधीच करत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी त्यांना अज्ञानात आणि मागास ठेवण भाग असतं. भांडवल शाही जरी सरंजामशाहीशी हातमिळवणी करून मजूर गुलाम वर्गाला सुरुवातीला वेठीला धरते, त्यांचे शोषण करते असे दिसले तरी त्यांच्या स्वतःच्या फायद्या साठी तरी त्यांना एका मर्यादे नंतर लोकांचे राहणी मान उंचावण्यासाठी/ त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनिर्बंध शोषणाला आळा घालावा लागतो. लोकांची क्रयशक्ती अचानक घटली तर कसा हाहाकार उडतो ते मी काय वेगळ सांगायला हवं का ? समजा एक शाम्पू विकत घ्यायची लोकांची ऐपत नसेल तर कुणी धंदा करावा कसा? आणि खायची प्यायची भ्रांत असलेला गरीब गुलाम माणूस शाम्पू का विकत घेईल? त्याची, त्याच्या बायकोची चार लोकात उठ बस आणि किमान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असेल तर तो हा खर्च करून स्वतःला/ स्वतःच्या बायकोला सुंदर दाखवायचा प्रयत्न करेल.त्याची दोन वेळची खायची प्यायची सोय झाली तर तो पुढे पुढे काही जास्त खरेदी करू लागेल आणि उद्योग धंद्या शिवाय हे शक्य आहे का? सरंजामशाहीत मोठ मोठे शोध लागून त्याची उपयुक्तता पटल्यावर सरंजामशाही सरकार त्यांना स्वीकारते आधी संशोधकांना पदरमोड करून शोध लावावे लागतात. भांडवलशाहीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी संशोधकांना उद्योग प्रोत्साहन देतात. आपले वेद , रामायण, महाभारत, हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच पण तेव्हा उद्योग आणि औद्योगीकरण हा प्रकारच नव्हता.तो काळ एकवेळ, सोडा आपल्या पेशवाईच्या शेवटी शेवटी म्हणजे १९व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचे तंत्र , होकायंत्र , दुर्बिणी नव्हत्या आपण त्या इंग्रज, पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो. साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले. अन सुरुवातीला लोकांनी आगगाडी मध्ये बसावे म्हणून ब्रिटीश सरकार पैसे देत असे. आपल्याकडे औद्योगीकरण सुरु झालं तेच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि ते सुद्धा जुजबी.
तेव्हा आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असावा पण असं उगाच कुणी सुबुद्ध माणूस टर उडवेल असे काही करू नये त्याने या वारशाचाच अपमान होतो. असं नाही वाटत तुम्हाला .
हा प्रश्न नास्तिक, आस्तिक, पुरोगामी, मूलतत्ववादी असा नाही. साधा बुद्धी आणि तर्काचा आहे.
आदित्य---

दशानन's picture

20 Aug 2017 - 7:53 am | दशानन

लाखमोलाचा प्रतिसाद!!!
एक वेगळा धागा म्हणून देखील शोभून दिसेल हा.

आदित्य कोरडे's picture

20 Aug 2017 - 6:21 pm | आदित्य कोरडे

होय केला ... वेगळा धागा केलाय .

चांदणे संदीप's picture

20 Aug 2017 - 12:43 pm | चांदणे संदीप

टाळ्या!!

Sandy

टवाळ कार्टा's picture

20 Aug 2017 - 4:32 pm | टवाळ कार्टा

बर्याच दिवसांनी चांगला प्रतिसाद वाचायला मिळाला

पुंबा's picture

21 Aug 2017 - 11:31 am | पुंबा

अप्रतिम प्रतिसाद..

मराठी_माणूस's picture

21 Aug 2017 - 12:35 pm | मराठी_माणूस

एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते.

एक शंका, कुतुहल म्हणून . वेद जे अपौरुषेय म्हटले जातात ते कशा स्वरुपात आणि कुठे मिळाले ?

मस्त प्रश्न! मला सापडलेले उत्तर - अकराव्या शतकातल्या मॅन्यूस्क्रिप्ट्स या सगळ्यात जुन्या मानल्या जातात.


Due to the ephemeral nature of the manuscript material (birch bark or palm leaves), surviving manuscripts rarely surpass an age of a few hundred years.[41] The Sampurnanand Sanskrit University has a Rigveda manuscript from the 14th century;[42] however, there are a number of older Veda manuscripts in Nepal that are dated from the 11th century onwards.[43]

पण मग वेदांचा कालखंड कसा ठरवला असेल?

https://en.wikipedia.org/wiki/Rigveda#Dating_and_historical_context आणि हे पहा
https://www.reddit.com/r/AskHistorians/comments/3lfmsu/how_old_are_the_v...

मला जितकं समजलं - वेदात वापरलेल्या भाषेवरून, भौगोलिक वर्णनावरून त्यांचा काळ ठरवला. अजून डिटेलमध्ये कोणी सांगू शकेल तर उत्तमच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2017 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंबर एक प्रतिसाद. कोणत्याही पारंपरिक दळण दळणार्‍या आणि त्याचा थयथयाट करणार्‍या धाग्यावर प्रतिसाद चालू शकेल.
पण कितीही डोकेफोड करुन सांगा, लोकांचे विचार बदलत नाही. आपण थकून जातो, हा माझा अनुभव आहे.

आभार.

-दिलीप बिरुटे

डँबिस००७'s picture

20 Aug 2017 - 8:52 pm | डँबिस००७

अत्रे साहेब,

धन्यवाद,

दादा ईतक लिहीलत पण तुम्हीच कॉपी पेस्ट केलेल तुम्हालाच दिसल नाही अरेरे , .....

The pillar has attracted the attention of archaeologists and materials scientists because of its high resistance to corrosion and has been called a "testimony to the high level of skill achieved by the ancient Indian iron smiths in the extraction and processing of iron."

जरा विचार करा ! 402 CE ईतक्या अगोदर कोणीतरी ईतक हाय लेव्हलच स्किल तयार केलेल होत हे विस्मयकारक नाही का ?

अत्रे's picture

21 Aug 2017 - 4:54 am | अत्रे

विस्मयकारक आहे.

पण याचा संबंध ऋषी मुनींशी किंवा कोणत्या मन्त्र -तंत्राशी लावू नका.

तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे मी उत्तर शोधून दिले - मग आता वाद घालण्याचे काही कारण दिसत नाही. तुम्ही तुमच्या इतर प्रश्नाचे उत्तर पण असेच शोधा . त्यासाठी शुभेच्छा.

डँबिस००७'s picture

20 Aug 2017 - 8:58 pm | डँबिस००७

आदित्य कोरडे,

छान प्रतिसाद,

डँबिस००७'s picture

20 Aug 2017 - 9:07 pm | डँबिस००७

आदित्य कोरडे,

साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले.

पण 402 CE पासुन उन्हा पावसात न गंजता उभा असलेला लोहस्तंभ मात्र तुम्हाला दिसत नाही. ज्या लोकांना 402 CE मध्ये ईतक्या हाय लेव्ह्लच मेटल तयार करता येत असेल त्याला नांगराचे फाळ करता येणार नाहीत ?

मग कुठे आहेत ते फाळ? त्याचे काही अवशेष, पुरावे सापडले आहेत का? किंवा लोखंडी नांगरांचा कुठल्या ग्रंथात उल्लेख वगैरे?

इष्टुर फाकडा's picture

23 Aug 2017 - 10:06 pm | इष्टुर फाकडा

दादा, तो स्तंभ आहे का नाही? का तो फाळच हवाय तुला? जुन्या तालवारीही टिकून आहेत. म्हणजेच तंत्र होतं ना? कुठे गेलं विचारशील तर मला नाही माहित हेच उत्तर आहे सध्यातरी. मंगळावर पण एकेकाळी जीवसृष्टी असायचा तर्क आहे; कुठाय आता ती ;) लोकं स्वतःला हुच्च ठरवून घ्यायच्या नादात अडाणीपणा करतात.

प्राचिन भारतातले सर्व ज्ञान विज्ञान इस्लामी आक्रमणाला तोंड देत देत सुद्धा सन 1800 ते 1825 पर्यंत संपूर्ण जगात आपले श्रेष्ठत्व टिकवून होते. सुलतानाने दिलेल्या शिक्षेत नाक व कान कापले गेलेले युद्धबंदी प्लास्टीक सर्जरी (या विषयावर मोदींची खील्ली उडवली होती) द्वारा परत नवीन व आपल्या आवडीनुसार बसवून घेत. भारतातील कृषी विज्ञान हे अव्वल दर्जाचे होते आणि हो हे सर्व भारतात पोस्टींग असणार्या ब्रिटीश अधिकार्यानी तारीखवार नोंदणी करून ठेवलेल आहे. विस्तृत माहितीसाठी खाली लिंक दिलेली आहे.

https://1drv.ms/b/s!AuFt4YPB-CeYhVkhoRtWHejBwMrP

बृहद् विमान शास्त्र नावाने ग्रंथ आहे असे लोकप्रभाच्या जुन्या अंकात छापून आलेले होते. मी तो अंकही शोधतोय.

नुसते विमानच नाही, त्याकरीता लागणारे धातू, त्यांची सिध्दता असे बरेच काही त्या लेखात होते.

शब्दबम्बाळ's picture

20 Aug 2017 - 9:23 pm | शब्दबम्बाळ

भारतीय संशोधनाचं जाऊ द्या पण हा लेख लिहिण्यापूर्वी आपण किती संशोधन केलंत या विषयांवर?
गूगल बाबा कडे यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आहेत...
काही वर्षांपूर्वी मी विमानशास्त्र या विषयावर IISC च्या प्रोफेसर लोकांनी केलेला पेपर वाचला होता.
इथे टिचकी मारलीत तर संपूर्ण pdf मिळेल वाचायला तुम्हाला! बघा त्यात दिलेली "शास्त्रीय" कारण कि पुराण शास्त्रात वर्णन केलेली विमाने का उडू शकत नाहीत!

जास्तीत जास्त त्या वेळेच्या लोकांच्या विचारशक्तीला आदर देता येईल पण म्हणून खरोखर त्यांनी लिहिलेल्या सगळ्या गोष्टी सत्य असल्याचं पाहिजेत असे नाही ना...
कारण मग हल्ली येणाऱ्या विज्ञानपटांमध्ये दाखवलेल्या गोष्टी आत्ताच्या काळात "असायलाच" हव्यात नाही का?

डँबिस००७'s picture

20 Aug 2017 - 9:32 pm | डँबिस००७

सध्या डॉक्टराम्नी एक नविनच टुम काढलेली आहे. व्हिटामिन डी टेस्ट करण्याची !!

नविन संशोधनानुसार म्हणे शरीरातील कॉलेस्ट्रॉल पासुन कॅल्शियम पर्यंत सर्व कार्यकारणात व्हिटामिन डी महत्वाची भुमि का बजावत आहे.
नविन शोध लागला म्हणजे त्यावर लगेच उतारा आला पाहीजेच !! शास्र्त्रज्ञांनी तोंडावाटे घेण्याजोग व्हिटामिन डी चा शोध लावला व लोकांसाठी उपलब्धही केला. आता पर्यंत शाळेत " व्हिटामिन डी हे सुर्यप्रकाशात स्वतः च्या स्किनच्या खाली तयार होणारे व्हिटामिन आहे" हे शिकलेल्या ह्याच लोकांनी ह्याच व्हिटामिन डी साठी आपापली पैश्याची पर्सची तोंड व व्हिटामिन डी घेण्यासाठी स्वतःची तोंड उघडली.

आता व्हिटामिन डी जर केमिस्टकडे उपलब्ध झाल तर त्याला विरोध करणारे , तोंडावाटे व्हिटामिन डी घेण्याचा , व्हिटामिन डीच्या
अतिरेकी सेवनाने होणार्या व्हिटामिन डी पॉईझनचा संबंध लावणारच, त्याशिवाय शरीर स्वतःला लागणारे व्हिटामिन डी स्वत:च दहा मिनीटाच्या सुर्य प्रकाशात फिरण्याने बनवु शकते ते सुद्धा कोणत्याही व्हिटामिन डी पॉईझन शिवाय !!

जर सकाळच्या कोवळ्या सुर्य प्रकाशात बाहेर फिरुन व्हिटामिन डी मिळत असेल तर काय वाईट आहे ?

पण ह्याच कारणासाठी सुर्य नमस्काराची योजना होती हे मान्यच होणार नाही. "सुर्य नमस्कार " सुर्या समोर करायला नको ?
घरी, बंद रुम म ध्ये फॅन लावुन सुर्य नमस्कार करता येईल का ? मग सुर्याच्या आशिर्वादाच सोडा पण तुम्हाला लागणार व्हिटामिन डी तुम्हाला कोठुन मिळणार ?

नदिच्या, तलावाच्या , समुद्राच्या पाण्यात राहुन सुर्याला अर्घ ओतणार्या लोकांचा राग येण स्वाभाविक आहे. म्हणे सुर्याला अर्घ ओततात ! सुर्याला तुमच्या अर्घाची काय जरुरी आहे ? तो तुमच्या अगोदर होता, नंतरही असणार !! पण अर्घ ओतताना दहा मिंनीट होऊन जातात !!

भारताने जगाला अंक मोजायला शिकवल. शुन्य, दशांश पद्धती ही भारताची जगाला भेट आहे. पण ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत.

हे शाळेत शिकवले गेले आहे आम्हाला. मी महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रम पूर्ण केला. एनसीआर्टीच्या पुस्तकात देखिल हे सांगितले आहे. तुम्ही कुठली पुस्तके चाळलीत?

अत्रे's picture

22 Aug 2017 - 8:01 am | अत्रे

+1

आम्हाला पण शिकवले होते. लेखक कोणत्या शाळेत शिकले?

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Aug 2017 - 9:24 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुमच्या शिक्षकांनी सांगितले कि हे अभ्यासक्रमात होते? मीही महाराष्ट्रात शाळा शिकलो पण हे ज्ञान बऱ्याच उशिराने माझ्या इतर वाचनातूनच मिळाले. कितीची बॅच म्हणायची आपली?

इष्टुर फाकडा's picture

23 Aug 2017 - 10:16 pm | इष्टुर फाकडा

शास्त्र आणि तंत्र यात फरक असतो. विमान'शास्त्राचा' दावा आहे 'तंत्राचा' नाही. निदान इतकं तरी फुरोगामी हुच्च लोकांनी लक्षात घेतलं तरी फार होईल. काही आपलं म्हटलं कि उचलून आपटायचं आणि आपली आधुनिकतेची अहंमन्यता कुरवाळून घ्यायची यातच काही लोकांना धन्यता असते. पण जर यातल्याच काही गोष्टी पश्चिम टोकावरून आपटून परत आल्या कि मग असे लोक त्याच गोष्टी डोळे झाकून मान्य करतात असं आपलं माझं निरीक्षण आहे. अंधपणाने गोष्टी डोक्यावर घेणारे जसे बावळट असतात त्याच्यापेक्षा जास्त हे असले नवफुरोगामी कट्टर असतात.

डँबिस००७'s picture

24 Aug 2017 - 8:41 pm | डँबिस००७

इष्टुर फाकडा

अगदी सहमत !!

इथे विचारलेल्या प्रश्नावर गुगल मधुन उत्तर शोधुन देण्याची चढा ओढ लागलेली आहे !! ;-)

अमितदादा's picture

25 Aug 2017 - 2:11 pm | अमितदादा

http://www.misalpav.com/comment/956089#comment-956089
तुमच्या ह्या प्रतिक्रियेवरच उत्तर इथे देतो .
मुळात तुमचे आणि माझे विचार वेगवेगळे आहेत, तुम्ही तुमचे विचार मांडलेत मी माझे मांडलेत त्यामुळे पुढे काथ्याकूट करण्यात अर्थ नाही.

कमाल ह्याची आहे की आपण फक्त एका जपानी शास्त्रज्ञांने संशोधन मांडे पर्यंत वाट बघायची पण एकाही भारतीय सरकारी आरकियोलॉजीकल सर्वे ऑफ ईंडीयाच्या लोकांना हे का जमल नाही अस विचारायच नाही.

सरकार, भारतीय लोक, शास्त्रज्ञ सगळे दोषी आहेत जे खरे काय आणि खोटे काय याचा उलघडा करू शकत नसतील तर, एखाद्या उपयुक्त प्राचीन गोष्टीवर संशोधन होत नसेल तर.

शुश्रुताच्या प्लॅस्टीक सर्जरीविषयी गुगल व विकी पिडीयावर भरपुर वाचयला मिळेल !

याबाबत फक्त ऐकून माहित आहे जास्त वाचाल नाही , तुम्ही मुद्देसूद आणि संदर्भसाहित लिहा वाचाय आणि प्रतिसाद द्यायला आवडेल.

शेवटी प्रत्येक गोष्ट तोलून मापून accept केली पाहिजे हेच तर मी पहील्या पासुन म्हणतोय !!

चांगली गोष्ट आहे याबाबत तरी सहमती आहे आपली

डँबिस००७'s picture

25 Aug 2017 - 6:10 pm | डँबिस००७

युट्युब वर मिळालेला ऐक व्हीडीयो ,!

https://youtu.be/zvN8FVg7ZYw

डँबिस००७'s picture

25 Aug 2017 - 6:17 pm | डँबिस००७

शाळेत सर्व काही शिकलेल्यांसाठी ,

१) जगातील मेटलर्जीच्या विकासात प्राचिन भारताचा किती हातभार लागलेला होता ?
२) कोणत्या धातुच्या शोधाच श्रेय विदेशी शास्रज्ञांना दिल जात, जे धातु प्राचिन काळापासुन भारतात शुद्ध करुन वापरले जातात ?
३)आचार्य शुश्रुत यांना प्लॅस्टिक सर्जरीच जनक (भारतातच) समजल जात !! ह्या आचार्य शुश्रुत यांनी निर्माण केलेल्या १५० शस्त्रक्रिया आयुधांच्या संख्येत आजच्या आधुनिक विज्ञानाने किती भर घातली ?

वरचे प्रश्न प्राचीन भारतातील विज्ञानावरचे प्रश्न व ऊत्तरांच संकलन करणार्या धाग्यावर विचारले तर काहीही ऊत्तर आल नाही !! तिथे प्रश्न विचारल की भराभर गुगल व विकीपिडीया वर ऊत्तर शोधुन दिली जातात !!