डीएसके दिवाळखोरी प्रकरण नक्की काय आहे????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
20 Aug 2017 - 4:40 pm
गाभा: 

डीएसके हे बांधकाम क्षेत्रातील एक मोठे मराठी नाव.पण सध्या वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आहे.
डीएसके यांनी त्यांच्या अनेक कंपणीज मध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला जातोय.मुद्दल तर सोडाच व्याजही परत न केल्याचा आरोप आहे.
हे नक्कि काय प्रकरण आहे?
गुंतवणुकदारांनी गुंतवणुक करताना काय काळजी घ्यावी?
प्रा.लि. कंपणीमध्ये गुंतवणुक करावी का?
एक मायबोलीकराला ईडलीवाल्या कामतने कसा चूना लावला हे आपण पाहीलेच .
तरी जाणकारांनी डीएसके प्रकरणावर प्रकाश टाकावा व इतर प्रश्नावर मार्गदर्शन करावे.धन्यवाद.

प्रतिक्रिया

अभिजित - १'s picture

20 Aug 2017 - 8:05 pm | अभिजित - १

पद्धतशीर रित्या बुडवली आहे कंपनी. २५/३० फर्म स्थापन करून. इकडचा पैसे तिकडे .. पद्धतीने. एक मराठी ब्लॉग वाचला यावर. मिळाला तर लिंक टाकेन. कसा याचा मुलगा ट्रम्प tower मध्ये राहतोय. हा कसा पुण्यातल्या पुण्यात हेलिकॉप्टर ने फिरतो. कसा ब्राह्मण लोकांना आवाहन करून लोकवर्गणी मागतोय. इ इ ..
याला भीक मागायची लाज कशी वाटत नाही ?

सुखीमाणूस's picture

21 Aug 2017 - 2:27 pm | सुखीमाणूस

पण कायप्पावर असेही वाचायला मिळाले की हे कुंभार साहेब ब्राम्हण विरोधी राजकीय पक्षाच्या कळपातले आहेत म्हणे
आपल्याला बुवा सगळेच खर्रे खर्रे वाटतात!!

सुमा, माणूस कुठल्या अक्ळपातला आहे हे महत्वाचे की तो सांगतोय ती तथ्ये? कोणीही सांगितलेल्या, लिहिलेल्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास न ठेवणे योग्यच पण माणूस जे मांडतोय त्याची शहानिशा व्हावी की नको?

पगला गजोधर's picture

26 Dec 2017 - 8:28 am | पगला गजोधर

कुंभार साहेब ब्राम्हण विरोधी राजकीय पक्षाच्या कळपातले आहेत म्हणे

हो का ? डीएसकेचें मनुवादी चहाते, प्रकरणाला जातीय रंग देऊ पाहत आहे, त्यांनी बातम्या नीट वाचाव्यात.....

"प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर त्यांचे जावई केदार वांजपे यांनी तब्बल १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. 
वांजपे हे डी. एस. कुलकर्णी यांची पुतणी सई यांचे पती आहेत. वांजपे हे डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीमध्ये विविध जबाबदाऱ्यांवर कार्यरत होते. 
कंपनीवर सातत्याने आरोप करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनाही वांजपेच माहिती पुरवत आहेत,' असे कुलकर्णी यांना म्हटले होते. त्यामुळे बदनामी झाल्याचे सांगत वांजपे यांनी त्यांना अॅड. प्रसाद विजय कुलकर्णी यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे."

खालील पोस्ट अजुन प्रकाश टाकू शकेल

https://vijaykumbhar.blogspot.in/2017/08/DSKDL-Criminal-Enterprise-Inves...

शब्दबम्बाळ's picture

20 Aug 2017 - 9:30 pm | शब्दबम्बाळ

यांनी बराच अभ्यास करून माहिती काढलेली दिसतेय!
जातीचा वापर करून वर्गण्या काढणे तर कहर आहे!

यावरून सहारा परिवार ने सेबी ला कसे गंडवले होते हे आठवले.
या व्हिडीओमध्ये मजेशीर रित्या विस्ताराने सांगितले आहे. जरा क्वालिटी ठीक ठाक आहे पण माहिती चांगली दिलीये...

हे लोक स्वतःचा फायदा बघणारे आहेत वेळप्रसंगी सामान्यांना गंडा घालून!

अभिजीत अवलिया's picture

20 Aug 2017 - 9:44 pm | अभिजीत अवलिया

वाचले. अत्यंत संतापजनक आहे सगळे.

पगला गजोधर's picture

21 Aug 2017 - 9:49 pm | पगला गजोधर

नोबडी किल्ड जेसिका

या खुनाच्या केसमधे, बचाव पक्षाने, असे म्हणणे मांडले,
तिचा खून झाला त्या रात्री उशिरा ती तिथे उपस्थित का होती.
(म्हणजे सभ्य घरातल्या स्त्रियां रात्री अश्या ठिकाणी नसतात)
जेठमलानी यांना अस, जानवून द्यायचे होते, की खून झाला, यामधे जेसिकाचा दोष आहे.

आता सिमलरली डी एस के चे चहाते, कदाचित अस भासवतील, की लोकांचे पैसे अडकले, यात त्या लोकांचाच दोश आहे.
मला वाटते लोकांनी वैधपने भांडवली बाजारात पैसा एका कॉन्ट्रेक्ट अंतर्गत गुंतवाला, हा करार लोक व डी एस के प्रवर्तक यांच्यामधे असावा. जर कराराप्रमाने होत नसेल, तर हा सरळ सरळ ब्रीच ऑफ कॉन्ट्रैक्ट आहे, त्याप्रमाणे करवाई का होउ नये ?
कार्रवाई टाळून
जर डी एस के ना बाजू मांडली देउ जात असेल, तर विजय माल्या, ललित मोदी, सुब्रतो रॉय यांना वेगळा न्याय का ? असे त्यांचा बचाव पक्ष विचारणार नाही का ?

सुबोध खरे's picture

21 Aug 2017 - 11:13 pm | सुबोध खरे

डी एस के यांनी जर घोटाळा किंवा अफरातफर केली असेल तर ते मराठी आहेत किंवा ब्राम्हण आहेत हे बाजूला ठेवून कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण जर धंद्यात खरंच मंदीमुळे खोट अली असेल तर कायद्या प्रमाणे त्यांना कर्जाचे सुसूत्रीकरण( कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग) करून द्यावे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Aug 2017 - 2:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

पण जर धंद्यात खरंच मंदीमुळे खोट अली असेल तर...

हेच म्हणायचे होते. वनसाईडेड बॅशिंग करण्यापेक्षा त्यांच्या या गुंतवणूक योजनेतून कुणाला आधी लाभ झाला आहे का हे पाहायला हवे. हि स्कीम नुकतीच सुरु झाली आणि पहिल्याच फटक्यात कुठलाही परतावा न देता ती (घोटाळ्यामुळे) बंद पडली आहे का?

बाकी ते ब्राह्मण वगैरे जाणीवपूर्वक या प्रकरणात आणले जात असावे का? डिएसकेंनी जातीच्या आधारावर काही केले असेल तर ते चुकीचेच आहे पण त्यांनी तसे केले आहे हे खात्रीशीर दुव्यांनी/पुराव्यांनी सिद्ध व्हावे, उगाच कुणाच्या ब्लॉगच्या आधारावर नव्हे.

अप्पा जोगळेकर's picture

21 Aug 2017 - 11:14 am | अप्पा जोगळेकर

विजय कुंभार ब्लॉग वर लिहिण्यापेक्षा पोलिसात तक्रार का करत नाहीत.
जातीच्या नावाने डीएसकेने लोकवर्गणी मागितल्याची कोणती मोहीम आहे. काही पुरावा आहे का ?
एखादी आवहन पर लिंक वगैरे आहे का.
१. डीएस के हेलिकॉप्टर ने फिरतो याचा उल्लेख
२. त्याच्या २ बायकांचा उल्लेख
३. त्याच्या विलासी जीवनशैलीचा उल्लेख
४. त्याच्या जातीचा उल्लेख
५. मधेच कोणत्यातरी फडणीस नावाच्या इसमाचा आणि त्याच्या जातीचा उल्लेख
हे सगळे काय आहे. मला तर हा स्कोअर सेटलिंग चा आणि बदनामीचा प्रकार वाटतो.
म्हणजे डीएसके ने पैसे बुडवले असतील तर पोलिसात तक्रार व्हावी आणि कारवाई व्हावी.
बाकी खाजगी गोष्टी वगैरे वाचून कुंभारच्या हेतूबद्दलच शंका आली.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

21 Aug 2017 - 11:50 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

भाजपच्या किरीट सोमय्या यांनी तक्रार केली आहे म्हणे.

अप्पा जोगळेकर's picture

21 Aug 2017 - 11:53 am | अप्पा जोगळेकर

म्हणजे ?
किरिट सोमैय्या यांनी रीतसर तक्रार दाखल केली आहे. हे बरोबरच आहे.
ब्लॉगवर खोडसाळ पणा करुन लिहिण्यापेक्षा हे चांगलेच आहे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

21 Aug 2017 - 12:11 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

ब्लॉगवर खोडसाळ पणा करुन लिहिण्यापेक्षा हे चांगलेच आहे.
>>>>खोडसाळपणा??? या डिएसकेने केलेले झोलझाल पुराव्यानिशी मांडले आहेत.नीट वाचता येत नाही का?
फक्त कुलकर्णी आहे आणि ब्राह्मण आहे म्हणून या व्यक्तीचे कुणी समर्थन करु नये .

अप्पा जोगळेकर's picture

21 Aug 2017 - 12:31 pm | अप्पा जोगळेकर

खोडसाळपणा??? या डिएसकेने केलेले झोलझाल पुराव्यानिशी मांडले आहेत.नीट वाचता येत नाही का?
तुम्हाला वाचता येत नाही सर नीट. मी आक्षेप व्यवस्थित पणे नोंदवले वर.

रिअल इस्टेट बूम होती तोपर्यंत झोल झाल बिनदिक्कत चालू होते असं दिसतय. रिअल इस्टेट झोपल्यावर अंगाशी आले हे प्रकार.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

20 Aug 2017 - 10:22 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

कुंभार यांनी लिहीलेले खरे असेल तर डिएसकेला पहीला विजय माल्या पुरस्कार द्यायला हरकत नाही.जातीवर पैसे मागतोय म्हणजे पुन्हा भिकारी झाला की काय हा?

अमितदादा's picture

20 Aug 2017 - 10:27 pm | अमितदादा

अवघड आहे सगळं, सरकारी यंत्रणा, सेबी यांना फाट्यावर मारून हे उद्योजग असे कसे करू शकतात हा प्रश्न पडतो. गेल्या काही दिवस वाचतोय dsk बद्दल, ज्यांचे पैशे अडकलेत त्यांचं दुःख समजू शकतो कारण बहुतांश लोकांचा कष्टाचा पैसा आहे.

विजय कुंभार यांना तुम्ही फोन किंवा ई-मेल करून एखाद्या प्रोजेक्ट बद्दल माहिती विचारू शकता. मी जेंव्हा पिंपरी चिंचवड मध्ये फ्लॅट घेण्याचा विचार केलेला त्यावेळी त्यांचा ब्लॉग वाचलेला. त्यावेळी पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डर ने इंटरेस्ट फ्री लोन ची योजना काढलेली (जालावर शोधा बिल्डर च नाव सापडेल) आणि मला ती प्रथमदर्शनी छान वाटलेली. म्हणून मी अधिक माहितीसाठी जालावर शोधलं असता विजय कुंभार यांचा ब्लॉग सापडलेला त्यावर योगायोगाने त्यांनी इंटरेस्ट फ्री होम योजनेची काळी बाजू दाखवून दिलेली आणि फसवणूक कशी होऊ शकते हे सांगितलेलं. मी हे वाचून त्या स्पेसिफिक बिल्डर च्या स्पेसिफिक स्कीम मध्ये फ्लॅट बुक केला नाही, काही महिन्यापूर्वी म्हेवण्या तर्फे चौकशी केली असता असे कळले होते कि दोन वर्षे झाली तरी त्या जागेवर बांधकाम सुरु नाही झालेलं.
आता हि इंटरेस्ट फ्री घराची योजना किती खरी किती खोटी हे ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे तीच लोक सांगू शकतील.

उपाशी बोका's picture

21 Aug 2017 - 9:58 am | उपाशी बोका

मी जेंव्हा पिंपरी चिंचवड मध्ये फ्लॅट घेण्याचा विचार केलेला त्यावेळी त्यांचा ब्लॉग वाचलेला. त्यावेळी पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डर ने इंटरेस्ट फ्री लोन ची योजना काढलेली (जालावर शोधा बिल्डर च नाव सापडेल) आणि मला ती प्रथमदर्शनी छान वाटलेली. म्हणून मी अधिक माहितीसाठी जालावर शोधलं असता .....

गार्डियन डेवलपर्स का? सरळ स्पष्ट का लिहित नाही? माहिती असूनपण सांगायचे नाही आणि इतरांना कामाला लावायचे असे कशाला?

माहितगार's picture

21 Aug 2017 - 10:06 am | माहितगार

अधिक सुस्प्ष्ट माहितीची अपेक्षा एकाबाजूने रास्त असली तरीही; नाण्याला दुसरी बाजू असू शकते तिही समजून घेतली पाहिजे; पूर्ण माहितीची खात्री नसताना आत्मविश्वास नसताना नावे घेणे, आरोप करणे बदनामी कायद्यांच्या अंतर्गतही येऊ शकते. किंवा सुरक्षेच्या दृष्टीनेनेही गोपनीयता पाळण्याची गरज असू शकते. त्यामुळे नावे घेण्यासाठी आरोप नमुद करण्यासाठी दबाव टाकणे यथोचित वाटत नाही.

उपाशी बोका's picture

21 Aug 2017 - 10:20 am | उपाशी बोका

विजय कुंभार यांना तुम्ही फोन किंवा ई-मेल करून एखाद्या प्रोजेक्ट बद्दल माहिती विचारू शकता. मी जेंव्हा पिंपरी चिंचवड मध्ये फ्लॅट घेण्याचा विचार केलेला त्यावेळी त्यांचा ब्लॉग वाचलेला. त्यावेळी पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डर "xyz developers" ने इंटरेस्ट फ्री लोन ची योजना काढलेली आणि मला ती प्रथमदर्शनी छान वाटलेली. म्हणून मी अधिक माहितीसाठी जालावर शोधलं असता विजय कुंभार यांचा ब्लॉग सापडलेला त्यावर योगायोगाने त्यांनी इंटरेस्ट फ्री होम योजनेची काळी बाजू दाखवून दिलेली आणि फसवणूक कशी होऊ शकते हे सांगितलेलं. मी हे वाचून त्या बिल्डर च्या स्पेसिफिक स्कीम मध्ये फ्लॅट बुक केला नाही, काही महिन्यापूर्वी म्हेवण्या तर्फे चौकशी केली असता असे कळले होते कि दोन वर्षे झाली तरी त्या जागेवर बांधकाम सुरु नाही झालेलं.
आता हि इंटरेस्ट फ्री घराची योजना किती खरी किती खोटी हे ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे तीच लोक सांगू शकतील.

असा मजकूर लिहिला, तर यात xyz developers ची काय बदनामी होते? वरती लेखकाने फक्त स्वतःचे मत आणि स्वतःचा अनुभव लिहिला आहे, xyz developers वर काहीही टीका-टिप्पणी किंवा बदनामी केलेली नाही. उगीचच बदनामी कायदा दाखवून भिती दाखवू नका.

काही महिन्यापूर्वी म्हेवण्या तर्फे चौकशी केली असता असे कळले होते कि दोन वर्षे झाली तरी त्या जागेवर बांधकाम सुरु नाही झालेलं.

हा भाग कानोकानी माहितीचा आहे प्रत्यक्ष पडताळलेला नसावा. अशा माहितीवर किती विसंबायचे आणि किती नाही किती माहिती द्यायची आणि किती नाही हे प्रत्येकाने ठरवावयास हवे. अधिकतम माहिती शेअर करण्याने एक महत्वाचे सामाजिक दायित्व पार पडते पण माहिती बद्दल शंका असेल अथ्वा ज्यांच्यात माहिती देण्याचा आत्मविश्वास नाही त्यांच्याकडून दबाव टाकून आलेल्या माहितीनेही फारसे काही हशिल होत नसावे

उपाशी बोका's picture

21 Aug 2017 - 10:59 am | उपाशी बोका

माहिती म्हेवण्याकडून कळली, हे स्पष्ट लिहिले आहे. तरी त्यातून डेवलपरची बदनामी होते असे काही वाटले नाही. असो, लेखकाने स्वतःचे मत दिले आहे, त्यामुळे अजून बोलायचे नाही. मी फक्त माझे मत सांगितले.

अधिकतम माहिती शेअर करण्याने एक महत्वाचे सामाजिक दायित्व पार पडते पण माहिती बद्दल शंका असेल अथ्वा ज्यांच्यात माहिती देण्याचा आत्मविश्वास नाही त्यांच्याकडून दबाव टाकून आलेल्या माहितीनेही फारसे काही हशिल होत नसावे.

एक विनंती: असे काही तरी क्लिष्ट लिहिण्यापेक्षा किंवा इंग्रजीचे शब्दशः भाषांतर करण्यापेक्षा, साध्या-सरळ-सोप्या भाषेत लिहावे, जे सहज कळेल. योग्य ठिकाणी पूर्णविराम, स्वल्पविराम वापरावेत. छोटी वाक्ये लिहिली, सोपे शब्द वापरले आणि जसे बोलतो, तसे लिहिले तर समजायला सोपे पडते.

माहितगार's picture

21 Aug 2017 - 10:34 am | माहितगार

शिवाय एकटी दुकटी व्यक्ति व्यवसाय घटना या पेक्षा एकुण व्यवस्थे/अवस्थेबद्दल चर्चा करण्याची इच्छा असलेले लोक देखील व्यक्ति व्यवसाय घटना याचे प्रत्यक्ष उल्लेख टाळू शकतात हेही लक्षात घ्यावयास हवे

लोकांना माहिती व्हावी म्हणूनच प्रतिसाद लिहला आहे, त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी म्हणूनच नाहीतर माहिती लपवून ठेवली असती. माहितीगार धन्यवाद तुम्ही अत्यंत योग्य प्रतिसाद दिलाय तो अत्यंत योग्य असून लोकांनी परत एकदा वाचवा. माझ्या मूळ प्रतिसादातील हे वाक्य वाचा, मग कळेल नाव का घेतलं नाही ते.

आता हि इंटरेस्ट फ्री घराची योजना किती खरी किती खोटी हे ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे तीच लोक सांगू शकतील.

इथे प्रतिसाद देणं म्हणजे योग्य जबाबदारी घेऊन बोलावं लागत, उगाच सकाळ पेपर खाली प्रतिसाद देऊन नाम निराळे होता येत नाही।
आता तुम्हाला तुमचं कसं बरोबर हे लिहीत बसायचं असेल तर लिहा अजून चार पाच उप प्रतिसाद माझी काही हरकत नाही।

एस's picture

20 Aug 2017 - 10:57 pm | एस

अवघड आहे सगळं!

मार्मिक गोडसे's picture

20 Aug 2017 - 11:44 pm | मार्मिक गोडसे

रेडिओवर ह्यांचे विविध क्षेत्रातील अनुभव, माहितीचे कार्यक्रम ऐकताना कधी शंकाही आली नव्हती की ही व्यक्ती अशी वागू शकेल. तीन एक महिन्यांपूर्वी व्हा. अॅपवर त्यांच्या ऑफिसमधील आर्थिक वादाचा व्हिडीओ बघितला होता तेव्हा धक्का बसला होता. आता ही बातमी खरी असेल तर काही खरं नाही.

आधीच मराठी माणूस धंद्यात उभा राहणे मुश्किल त्यात अश्या बातम्या कानी आल्या तर त्याच्यावर आणखी विपरीत परिणाम होणार.

या संकटातून बाहेर पडण्यासाठी डीएसके ना शुभेच्छा आणि त्यांच्या सर्व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळो हीच जगन्नियंत्याकडे प्रार्थना.

जाजा : मानेबाई या डीएसकेंच्या बोर्डावर आहेत (किंवा होत्या) त्यांच्या कडे गुंतवणूकदारांना दाद मागता येईल काय?

ब्राह्मण एक आहे, एकटा नाही असे काहीतरी लिहिलेय.
लबाडपणा आहे सगळा! अरे बाबा, श्रीमंत तर तू एकटाच आहेस.

'घराला घरपण देणारी माणसं' ऐवजी 'लोकांना बेघर करणारी माणसं(?)' हे स्लोगन जास्त योग्य आहे ह्यांना

आदूबाळ's picture

21 Aug 2017 - 2:19 pm | आदूबाळ

घराला सरपण लावणारी माणसं.

डिएसकेंच्या भांडवली अडचणींचे विश्लेषणाचा प्रयत्न या लेखात झालेला दिसतो आहे. (फारच वरवरचा आहे पण व्यवसायातील भांडवली अडचंणी बाबतचा उहापोह होतो)

डिएसकेंचे http://dskdl.com वेबसाईट आत्ता थातूरमातुर कारण देऊन सध्याची माहिती वापरली जाऊ नये अशा अर्थाची सुचना देणारे डिस्क्लेमर दाखवत होते त्यामुळे त्यातील माहितीवर विसंबून विश्लेषण करणे कठीण होते.

मी इतर बातम्या पाहिल्या वाचलेल्या नाहीत. तो ब्लॉग आणि ते भांडवली विश्लेषण पूर्ण मत मांडण्यास पुरेसे निश्चित नाही, पण डिएसकेंचा पाय खोलात असल्यासी शक्यता असल्याचे वाटते आहे. प्रथम दर्शनी वाटणारी शक्यता म्हणजे मागणी अभावी SEZ चा निर्णय चुकला तो वाचवण्यासाठी घर बांधणी प्रकल्प केला तर त्यालाही पुरेशी मागणी आली नसावी.

एकदा भांडवल घेतले ते वाचवण्यासाठी अधिक भांडवल उभारण्याचा प्रयत्नात मागणी अभावी अतिरीक्त भांडवलाचे दडपणात व्यवसाय धोक्यात आला असण्याची शक्यता तयार होतात. मुलतः भांडवलाचे जोखीम व्यवस्थापन चुकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्यवसाय संकटात असताना व्यक्तिगत खर्चांवर आळा घालावा हि त्या ब्लॉग लेखकाची अपेक्षा चुकीची दिसत नाही. पण एकुणच
कोणत्याही व्यवसायात; व्यवसाय भरभराटीस असताना बढाईखोरीतून होणारी ओव्हरऑल उधळपट्टीची सवय अशावेळी अंगाशी आल्या शिवाय रहात नाहीत. आणि व्यक्तिगत सवयी बदलणे आणि सभोवती गोळा झालेले बढाईखोर उधळपट्टे यांचा प्रभाव कमी होणे प्रत्यक्षात बर्‍याचदा कठीण जात असावे.

डिएसकेंच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अशी उधळपट्टी टाळण्याच्यादृष्टीने प्रशासकीय व्यवस्थापनाच्या बाबतीत क्रॉसचेक कितपत मजबूत होते याचा डिएसके व्यवस्थापनाने विचार करण्याची गरज असावी. आधीच मूळ व्यवसायातले प्रशासन मजबूत नसताना घरातील माणसांचे वेगळ्या व्यवसायात लक्ष घालणे भांडवल आणि वेळ यांच्या गैरव्यवस्थापनास जोड देऊ शकते का .

भारतातील बहुतांश कंपन्यांचे व्यवस्थापन कंपनी सेक्रेटरी इंडीपेंडंट डायरेक्टर या रोल्सना पुरेसे महत्व देणे टाळत असावे. बर्‍याच प्रशासकीय गोष्टी त्यांचे क्रॉसचेकींग मधले महत्व लक्षात न घेता सरकारी नियमांची कागदोपत्री विल्हेवाट लावण्याने भविष्यात समस्या उद्भवू शकतात हे बर्‍याच जणांच्या लेखी नसते. भारतीय कंपन्यांचे फायनान्स आधिकारी आणि विशेषतः सिए सर्व स्टेक होल्डरचे इंटरेस्ट जपण्याची नैतीक जबाबदारी कितपत जबाबदारीने पार पाडत असतात या बद्दल फारसा उहापोह आपल्या देशात होताना दिसत नाही.

इन एनी केस डिएसकेंनी त्यांची वेबसाईट स्टेक होल्डर्सना विश्वासात घेण्याच्या दृष्टीने वेबसाईट अधिक वेगाने अद्ययावत करावयास हवे होते ते झालेले दिसत नाही. स्टेक होल्डर्सना विश्वासात न घेण्याने संकटे वाढतात कमी होत नसतात.

स्टेकहोल्डर्ससाठी प्रार्थनेपलिकडे त्रयस्थांना फारसे करता येत नाही प्रार्थना नक्कीच करू.

एक मायबोलीकराला ईडलीवाल्या कामतने कसा चूना लावला हे आपण पाहीलेच .

ह्याबद्दल वाचायला आवडेल.. कामत लफंगा, झोलर, बदमाश आहे असे माझे मत आहे. त्याला पुष्टी मिळेल असे वाचायला आवडेल.
बाकी, डिएस्के बद्दल: कायद्याचा बडगा दाखवून हा प्रॉब्लेम सुटायला हवाय. कुठल्याही दबावाला तपासयंत्रणांनी बळी पडु नये. लोकांनी देखिल शहाणे व्हावे कायदा मोडणार्‍या ४२० माणसाला निव्वळ जातीच्या नावाखाली सपोर्ट करू नये.(अर्थात ब्राह्मण असे करणार नाहीत असेच वाटते.)

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

21 Aug 2017 - 1:09 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

https://www.maayboli.com/node/47097
इडलीवाल्या कामतची करामत.

अप्पा जोगळेकर's picture

21 Aug 2017 - 1:39 pm | अप्पा जोगळेकर

हे प्रकरण रंजक दिसते आहे.
पी. एन. गाडगीळ या ज्वेलरीवाल्यां कडे पण अशीच कसलीतरी फसवी भिशी स्कीम होती / आहे.
उदा. ५००० रुपये महिन्याला भरले तर तेवढ्या रकमेचे सोने तुमच्या नावे जमा होईल. असे १२ महिन्यांनी जितक्या किमतीचे सोने जमा होईल त्या किमतीच्या ८ % व्याज सोन्याच्याच स्वरुपात अधिक जमा झालेले सोने अशी योजना. या सोन्यावर भरावा लागणारा इन्कम टॅक्स ते सोन्याच्याच स्वरुपात कापून घेतात.
यावर मी तुम्ही सोने देणार की पैसे असे विचारल्यास सोने असे उत्तर मिळाले. जर पैसे मिळाले तरच ते इन्कम असेल मग तुम्ही टॅक्स कसला कापता असे विचारल्या उडवाउडवीची उत्तरे मिळाली. मग मी तो नादच सोडला.

arunjoshi123's picture

21 Aug 2017 - 1:53 pm | arunjoshi123

जर पैसे मिळाले तरच ते इन्कम असेल

असं नसतं. कंपनीनं पगार म्हणून (हायब्रीड) जवारीचे पोते जरी घरी आणून टाकले, आणि मोदीने दर आठवड्याला नोटबंदी, नाणेबंदी करून नोटा, नाणी बघायला मोताज केलं तरी आयकर कटणारच.
=======================
उत्पन्न मंजे तुमच्या संपत्तीत (तिच्या नॉमिनल मूल्यात) झालेली वाढ. या पूर्ण "वाढिवर" उत्पन्नकर लागेल.
आणि पूर्ण मूल्यावरच, काही विशीष्ट प्रकारच्या संपत्तींसाठी, संपत्तीकर लागेल.
आणि विकायला काढली तर महागाई अ‍ॅडजस्ट करून (मंजे रियल व्हॅल्यूवर) काही विषीष्ट प्रकारच्या संपत्तींवर संपत्तीवृद्धीकर लागेल.

अप्पा जोगळेकर's picture

21 Aug 2017 - 4:06 pm | अप्पा जोगळेकर

साहेब,
सरकारी मान्यताप्राप्त चलनावर कर आकारणी होते. सोने हे मान्यताप्राप्त चलन नाही.
एका कारखानदाराने १० खेळणी तयार केली तर ती विकून जो नफा मिळतो त्यावर कर लागतो. खेळण्यांवर नाही.
हे मी आय कराबद्द्दल बोलत आहे.

अप्पाजी, तुम्ही, मी आणि टफींनी इतरांचा कधिही , काहिहि संबंध येऊ न देता, एक पॅरलल बार्टर इकॉनॉमी चालवली तरीही भारत सरकार आयकर घेईल हो.

अप्पा जोगळेकर's picture

21 Aug 2017 - 4:08 pm | अप्पा जोगळेकर

उत्पन्न मंजे तुमच्या संपत्तीत (तिच्या नॉमिनल मूल्यात) झालेली वाढ. या पूर्ण "वाढिवर" उत्पन्नकर लागेल.
हे काहीच्या काहीच आहे. म्हणजे माझ्या घराची किंमत २४ लाख ते ३० लाख अशी झाली तर मला त्या ६ लाखावर कर लागणार नाही.
जर मी ते घर विकले आणि ३० लाख रुपये मिळाले तरच कर लागेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Aug 2017 - 4:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

अशीच कसलीतरी फसवी भिशी स्कीम होती / आहे.
उदा. ५००० रुपये महिन्याला भरले तर तेवढ्या रकमेचे सोने तुमच्या नावे जमा होईल. असे १२ महिन्यांनी जितक्या किमतीचे सोने जमा होईल त्या किमतीच्या ८ % व्याज सोन्याच्याच स्वरुपात अधिक जमा झालेले सोने अशी योजना. या सोन्यावर भरावा लागणारा इन्कम टॅक्स ते सोन्याच्याच स्वरुपात कापून घेतात.

अस्वीकरण (disclaimer) : खालील मजकूर केवळ वरच्या स्किमसाठी नसून सर्वसाधारण माहितीसाठी आहे.

वरची स्कीम नावाने भिशी असली तरी आयकराच्या दृष्टीने एक प्रकारे "८% व्याज देणारी रिकरिंग डिपॉझिट स्कीम" दिसते आहे.

१. कोणत्याही गुंतवणूकीतून मिळणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष* (पेड/रिसिव्ह्ड अँड अक्र्युड(accrued)) या दोन्ही प्रकारचे उत्पन्न "दर वर्षीच्या आयकर विवरणात दाखवणे जरूर असते. त्यानंतर, प्रत्येक गुंतवणूकीच्या स्वरूपाप्रमाणे त्या त्या दर उत्पन्नावरील कर अथवा करमाफी मोजली जाते.

२. वरच्या मजकूरात या स्कीमचे पूर्ण कायदेशीर तपशील नाहीत. पण, ते कापून घेतलेले पैसे "इन्कम टॅक्स" नसून "टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स (टीडीएस)" असू शकतो.

===========================

* : अप्रत्यक्ष* (अक्र्युव्ह्ड) उत्पन्न म्हणजे आर्थिक वर्षात मिळालेले; पण प्रत्यक्ष हातात न मिळालेले किंवा बँकेच्या खात्यात जमा न झालेले उत्पन्न. हे उत्पन्न, देणगीदाराच्या हिशेबांत, तुमच्या नावाच्या अकाउंटमध्ये जमा होत असते.

उदा: बँकेतील क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट : यावर मिळणारे उत्पन्न बँक तुमच्या हाती / तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये जमा न करता एफडीच्या मुद्दलात मिळवते. पण, तरीही, ते तुमचे त्या वर्षाचे उत्पन्नच असते. त्याचमुळे, बँक त्यावरचा टीडीएस कापू शकते/कापते व ते उत्पन्न तुम्हाला वार्षिक करविवरणात दाखवणे जरूरीचे असते.

अनुप ढेरे's picture

21 Aug 2017 - 5:06 pm | अनुप ढेरे

टीडीएस कापला असेल तर तो आपल्या पॅनच्या अगेन्स्ट २६ एएस का कुठ्ल्या फॉर्ममध्ये दिसायला हवा बहुधा. तिथे दिसत असेल तर गंडवा गंडवी नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Aug 2017 - 5:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

१. कापलेला टिडीएस सरकारी भरणा झाला की तो करसंकलनविभागाच्या "TRACES (https://www.tdscpc.gov.in)" या संस्थळावर करदात्याच्या खात्यावर दिसू लागतो.
अ) या संस्थळावरून करदाता त्याचा "Form 26AS" डाऊनलोड करू शकतो.
आ) बर्‍याच बँकाच्या संस्थळांवर खातेदाराला "Form 26AS" डाऊनलोड करायचा पर्याय आहे.
इ) करभरणा संस्थळावर (incometaxindiaefiling.gov.in) "Form 26AS" डाऊनलोड करायचा पर्याय आहे.

२. यापैकी कोठूनही मिळवलेल्या "Form 26AS"वर "करदात्याच्या त्या वर्षीच्या सर्व टीडीएस"ची नोंद असते. कारण वरचे सर्व दुवे TRACES कडेच जातात !

२. करविवरणात केवळ Form 26AS मध्ये नोंद झालेल्या टीडीएस चा क्लेम ग्राह्य धरला जातो... नोंद नसलेला क्लेम अग्राह्य घरला जातो. त्यामुळे, कोणताही कापलेला टीडीएस जर योग्य मुदतीत (शेवटची वार्षिक मुदत बहुतेक अकाऊंटींग वर्षाचा १५ जून आहे) Form 26AS मध्ये दिसला नाही तर करविभागाकडे तक्रार करता येते. (आठवा : मल्ल्याफेम किंगफिशरने कर्मचार्‍यांचा कापलेला पण सरकारी जमा न केलेला टीडीएस !)

३. स्वानुभव असा आहे की Form 26AS मधली एखादी एंट्री करविवरणात राहिली तर करविभाग ती रक्कम स्वतः मिळवून मग करमोजणी करतो. हा करविभागाने दिलेला स्वागतार्ह धक्का होता !

हे काहीच्या काहीच आहे.

पुढची वाक्यरचना कळली नाही. कृपया रिवर्ड करा.

अप्पा जोगळेकर's picture

22 Aug 2017 - 10:41 am | अप्पा जोगळेकर

माझी माहिती अपूर्ण होती. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Aug 2017 - 5:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हणजे माझ्या घराची किंमत २४ लाख ते ३० लाख अशी झाली तर मला त्या ६ लाखावर कर लागणार नाही.
जर मी ते घर विकले आणि ३० लाख रुपये मिळाले तरच कर लागेल.

हे उदाहरण इथे अस्थायी आहे. कारण घर आणि वरची स्कीम यांच्या तुलना होऊ शकत नाही.

१. बाजारभावाप्रमाणे घराची किंमत कमी-जास्त झाल्याचे दिसत असले तरी घराच्या किंमतीतला फरक मालकाला फायदा अथवा तोट्याच्या रुपात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मिळत नाही. मात्र, जेव्हा ते घर विकले जाईल तेव्हा तो फरक मालकाला मिळेल आणि प्रचलित कायद्यांप्रमाणे करपात्र होईल.

२. हेच लॉजिक वापरून, तुमच्या मालकीच्या पण गुंतवणूकीत नसलेल्या (घरात ठेवलेले सोने, दागीने, इ) सोन्याची किंमत बाजारभावाप्रमाणे कितीही वाढली तरी; त्याच्या "खरेदीची किंमत आणि आजचा बाजारभाव" यातील फरक आयकरविवरणाच्या कक्षेत येत नाही. मात्र, ते सोने विकून / गुंतवून मिळालेले प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष उत्पन्न आयकरविवरणाच्या कक्षेत येते.

अप्पा जोगळेकर's picture

22 Aug 2017 - 10:40 am | अप्पा जोगळेकर

मात्र, ते सोने विकून / गुंतवून मिळालेले प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष उत्पन्न आयकरविवरणाच्या कक्षेत येते.
या आणि आधीच्या प्रतिसादां करता धन्यवाद. बरीच नविन माहिती मिळाली.
सोने किंवा इतर असेट यांचे ट्राऩ्अ‍ॅक्शन होते तेंव्हा ते उत्पन्नात (अप्रत्यक्ष) धरले जातात हे माहिती नव्हते. धन्यवाद. अरुण जोशी सर याचबद्दल म्हणत असावेत.
हेच लॉजिक पुढे वाढवून जर मी एखादा अ‍ॅसेट नुकसानीत विकला किंवा नुकसानीत त्याचे ट्रान्जॅक्शन केले तर ते उत्पन्न हे ऋण उत्पन्न धरले जाऊन त्यावर कर वजावट मिळते का ? मिळत असावी असे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Aug 2017 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

हेच लॉजिक पुढे वाढवून जर मी एखादा अ‍ॅसेट नुकसानीत विकला किंवा नुकसानीत त्याचे ट्रान्जॅक्शन केले तर ते उत्पन्न हे ऋण उत्पन्न धरले जाऊन त्यावर कर वजावट मिळते का ? मिळत असावी असे वाटते.

हा जरा जास्त तांत्रिक मुद्दा झाला. त्यामुळे, अशा ट्रँझॅक्शनबद्दल अधिकृत सल्लागाराचे मत घेणे योग्य होईल. पण सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे असे म्हणता येईल :

१) कंपन्या आपल्या नोंदणीकृत उद्योगधंद्यात असे करू शकतात. घर (किंवा इतर वस्तू) खरेदी करणे-विकणे हा व्यवसाय नसलेल्या व्यक्ती/कंपनीला असे करता येणार नाही. उदाहरणार्थ, व्यक्तीगतरित्या विकत घेतलेला टीव्ही शेजार्‍याला/मित्राला कमी किमतीत विकला म्हणून तो तोटा तुमच्या करपात्र उत्पन्नातून वजा करता येणार नाही.

२) मात्र, व्यक्तीगतरित्या खरेदी-विक्री केल्या जाणार्‍या काही गोष्टी फायदा-तोटा ऑफसेट करण्यासाठी पात्र असतात. उदाहरणार्थः

म्युचुअल फंड :

अ) "शॉर्ट-टर्म कॅपिटल लॉस (एक्विटी व डेट म्युचुअल फंड)"; हा "शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन (एक्विटी व डेट म्युचुअल फंड)" आणि "लाँग टर्म कॅपिटल गेन (डेट म्युचुअल फंड)"; यांच्याबरोबर सेट ऑफ करता येतो.

आ) "लाँग-टर्म कॅपिटल लॉस (एक्विटी व डेट म्युचुअल फंड)" : केवळ "लाँग-टर्म कॅपिटल गेन (डेट म्युचुअल फंड)" बरोबरच सेट ऑफ करता येतो.

इ) "लाँग-टर्म कॅपिटल गेन (एक्विटी म्युचुअल फंड)" मुळातूनच करमुक्त असल्याने "लाँग-टर्म कॅपिटल लॉस (एक्विटी म्युचुअल फंड)" कुठल्याही प्रकारे सेट ऑफ करता येत नाही.

इक्विटी (शेअर्स) :

अ) "शॉर्ट-टर्म कॅपिटल लॉस", "शॉर्ट/लाँग-टर्म कॅपिटल गेन" बरोबर सेट ऑफ करता येतो व बाकी पुढील आठ वर्षे कॅरी फॉरवर्ड करून तशीच सेट ऑफ करता येते.

करांचे हे व इतर बारकावे बहुतेक लोकांना जरासे किचकट वाटतात. याशिवाय, या करांचे नियम दर बजेटबरोबर (किंवा मध्यभागीही) बदलू शकतात. त्यामुळे, खात्री नसल्यास आयकरतज्ञांचा सल्ला घेणेच योग्य असते.

पगला गजोधर's picture

21 Aug 2017 - 1:40 pm | पगला गजोधर

कृपया जातीचे उल्लेख टाळा,
अतिरेकी / दहशदवादी / आर्थिक हेराफेरी करणारे/ गुन्हेगार यांना जात धर्म नसतो.

सदर बिल्डर ने सर्वजातीय लोकांना फसलेले आहे, जात बघून नाही.

अप्पा जोगळेकर's picture

21 Aug 2017 - 1:51 pm | अप्पा जोगळेकर

रॉजर दॅट

जात नाही समजू शकतो.. धर्म पण नसतो का..?

पगला गजोधर's picture

21 Aug 2017 - 1:53 pm | पगला गजोधर

जात धर्म सगळं अफूच्या गोळ्या आहेत. (माझं वैयक्तिक मत)

अतिरेकी / दहशदवादी / आर्थिक हेराफेरी करणारे/ गुन्हेगार यांना जात धर्म नसतो.

प्रचंड टाळ्या.
=====================
लोक नमकं उलटं म्हणतात.

अतिरेकी / दहशदवादी / आर्थिक हेराफेरी करणारे/ गुन्हेगार यांना जात धर्म नसतो.

प्रचंड टाळ्या.
=====================
लोक नमकं उलटं म्हणतात.

पगला गजोधर's picture

21 Aug 2017 - 1:59 pm | पगला गजोधर

वरील कॅटॅगरीतील लोकं , जात धर्म याचा खुबीने वापर करून, आपली उद्दिष्ठे साध्य करतात.

म्हणून सामान्य लोकांना वाटते की त्यांचे (गुन्हा करणाऱ्यांचे) मोटिव्हेशन जात धर्म हे आहे.

arunjoshi123's picture

21 Aug 2017 - 1:42 pm | arunjoshi123

म्हणून मी जातीव्यवस्थेचं समर्थन करतो.
१. कंपन्या चालवायला प्रचंड दर्जाची बुद्धिमत्ता लागते. जेवढ्या कंपन्या आहेत तेवढे बुद्धीमान लोक (एकीला एकच म्हटला तरी) समाजात नसतात.
२. कंपन्या नितिमत्तेने चालवाव्यात हे देखिल अभिप्रेत आहे. इतके सगळे उच्चकोटीची नितिमत्ता असणारे लोक आणणार कुठून?
=====================================
मूळात कंपनीप्रणित समाजव्यवस्था हाच एक बेकार प्रकार आहे. वर भर म्हणून "कायदेशीर रित्या" अनैतिक वागणं मान्य आहे. म्हणजे कंपनीने खून केला तर कंपनीच्या मालकांना सजा होत नाही. सजा काय खटलाही होत नाही त्यांच्यावर. खटलाही जौ द्या, त्यांनी त्या घटनेचं संज्ञान नाही घेतलं तरी चालतं.

१. कंपन्या चालवायला प्रचंड दर्जाची बुद्धिमत्ता लागते. जेवढ्या कंपन्या आहेत तेवढे बुद्धीमान लोक (एकीला एकच म्हटला तरी) समाजात नसतात.
२. कंपन्या नितिमत्तेने चालवाव्यात हे देखिल अभिप्रेत आहे. इतके सगळे उच्चकोटीची नितिमत्ता असणारे लोक आणणार कुठून?

हे दोन्हीही प्रश्न जातीव्यवस्थेने कसे सुटणार?

धक धक गर्ल माधुरी दिक्षीत ही म्हणे एकेकाळी डी.एस.कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर होती. किमान या कंपनीच्या १९९७ -९८ च्या अहवालात तसा उल्लेख आहे.
शासकीय कागदपत्रांध्ये मात्र माधुरी डायरेक्टर असल्याचा उल्लेख आढळून येत नाही . कदाचित गुंतवणुकरांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी ती पुडी सोडली असावी.

कुंभार साहेब, अजून अभ्यास करून नक्की काय ते सांगा.

या आवाहनात त्यांनी मराठीपेक्षा आपल्या ब्राम्हण असण्यावर जास्त भर दिलेला दिसतो.

अगदी तो कंपनीचा अधिकृत संदेसा मानला तरी असं काही मला दिसत नाही.

आपली जेवढी देणी आहेत त्याच्या दहापट जास्त आपली संपत्ती आहे असे ठणकावून सांगणा-या डीएसकेंवर लोकवर्गणी मागण्याची वेळ का आली असावी?

हे विधान ज्यांना फायनान्स कळतं त्यांच्याकरिता एक जोक आहे. इतरांकरिता - हे विधान ठणकावणारांवर हीच पाळी येते.

या कंपन्यांना ठेवी स्विकारण्याची परवानगी नव्हती.
तरीही त्या स्विकारल्या आणि बुडवल्याही !

ज्या डिबेंचर इश्श्यूंना एस बी आय कॅप्स लीड मॅनेजर असेल त्यांबद्दल असं म्हणत असाल तर देशाचं बाँड मार्केटच घरी पाठवलं पाहिजे.

अशी परवानगी मिळालेली असतानाही या जमिनी डीएसकेडीएलने थेट शेतक-यांकडून खरेदी केल्या नाहीत.

कोणतीही कंपनी स्वतः मोठी लँडबँक खरिदत नाही.

एकट्या ड्रीम सीटी प्रकल्पात एवढी रक्कम पळवली

अजिबात चिंता नको. रिलेटेड पार्टी ट्रँझॅक्शनची चौकशी होइल आणि जेलमधे जातील.

नंतर एसईझेड प्रकल्पाऐवजी टाउनशिप करण्यात आली. परंतू स्टॅम्प ड्युटीचे काय ?

२००६ मधे एस इ झेडची स्टँप ड्यूटी एक्झेंप्शन संपले होते. नेमके तेव्हाच यानी जमिन खरेदी केली आहे का? असेल तर ड्यूटी भरून केली असणार.

एकट्या ड्रीम सीटी प्रकल्पात एवढी रक्कम पळवली असेल तर इतर सर्व प्रकल्प लक्षात घेता किती रक्कम अशा रितीने पळवली असेल याचा विचार करा.

यासाठी कुलकर्णींची कंपनीतली मालकि वाढत आहे का (आणि किति फास्ट) हे बघायला पाहिजे.

इतकेच नव्हे तर त्यांनी एकाच वेळी दोन्ही नांवांनी शेअर्स खरेदी केल्याचेही दिसते

प्रचंड धांदली. असं इतकं उघड? दुसरी होल्डिंग ५% पेक्सा कमी असल्याने हे "मॅनेज" झालं असावं. पॅन नंबर इ इ डूप्लिकेट काढले कि काय?

डीएसकेंच्या दुस-या पत्नी ज्योती २०१२ मध्ये कालवश झाल्यांनंतर हेमंती कुलकर्णींचा मुलगा ज्योतींचा मुलगा म्हणून अधिकृतरित्या दाखवण्यात आले.

यात काय घोळ घालायचे काय लॉजिक असू शकते? सावत्र आई, जिवंत वा मृत, आईच ना?

आता सुमारे आठ हजार ठेविदार हवालदिल झाले आहेत.त्यांना मागील अनेक महिने मुद्दल सोडा साधे व्याजदेखील मिळालेले नाही.

व्याजच द्यायचं असतं, लोन मॅच्यूअर झालं तर मुद्द्ल द्यायचं असतं. कि इ एम आय टाईप प्रकार होता डीबेंचर मधे?

आश्चर्य म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये या ठेवी आहेत . त्यांना ठेवी स्विकारण्याची परवानगी रिझर्व बँकेने कधी दिलीच नव्हती.

मंजे नाकारली होति?

डीसके हे एखाद्या नटसम्राटालाही लाजवतील असे अभिनेते आहे, त्यांचं वक्तृत्व कौशल्य उत्तम आहेत आणि ते उत्तम इव्हेंट मॅनेजर आहेत.

व्यवसायासाठी हे आवश्यक कौशल्य आहे.

मात्र त्या कार्यक्रमांमूळे आकर्षित झालेल्या गुंतवणुकदारांना बेमालूमपणाने आपल्या कुंटुंबियांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला भाग पाडले.

बिझनेस ग्रुपच्चं रेप्यूटेशन वापरणं कायदेशीर आहे.

डीसकेंनी आता पर्यंत किती मराठी माणसांना मदत केली ?

त्यांनी केली असती तरी, अशी भीक मागणं म्हणजे कॉर्पोरेट हद्द्च आहे.

आता प्रश्न असाही आहे की जागेवर दहा टक्के कामही झालेले नसताना वित्तिय संस्थांनी एकूण कर्जाच्या ८०% रक्कम डी.एस. कुलकर्णी अँड कंपनीला वितरीत तरी कशी केली?

बँकांना फसवल्याशिवाय हे अशक्य आहे.
१० आणि ८० अतिच फरक आहे.

या तरुणांची अवस्था घर ताब्यात नाही, आताच्या घराचे भाडे भरावे लागत आहे, बँका वसूलीसाठी मागे लागल्या आहेत आणि हप्ते थकल्याने सिबिल रेटींगही खराब झाले आहे.

त्यांना हे सगळं उलटं पाहिजे होतं, त्याची रिस्क भोवली.

डीएसकेंनी आता मराठी माणसाला आवाहन केले असले तरी त्यांच्या अलिशान रहाणीमानात मात्र तसूभरही फरक पडलेला नाही.

व्यक्तिगत संपत्तीवरचा अधिकार मान्य केला तरी मदतीचे आवाहान आणि अलिशान राहणि ये कुछ हजम नही होता.

हा लेख (कुंभारांचा बरं) फार तर फार अत्यंत कळकळीच्या भावनेने (त्या गुंतवणूकदारांबद्दल, आणि ग्राहकांबद्दल) प्रामाणिकपणे लिहिलेला आहे. पण कागदपत्रांचा अभ्यास, संदर्भ, वापरलेली तत्त्वे इ इ च्या आधारांवर अत्यंत अत्यंत सुमार दर्जाचा आहे. किमान इथे मांडला नाही काही अभ्यास.

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2017 - 3:35 pm | श्रीगुरुजी

पुणे भांडवली बाजारात संचालक असणार्‍या एकाने मला २००६ मध्येच सांगितले होते की डीएसके ची कंपनी विश्वासार्ह नाही. त्यामुळे त्या कंपनीत ठेवी ठेवू नका. मी कोणत्याच कंपनीत मुदतठेवी ठेवत नसल्याने मला या माहितीमुळे काहीच फरक पडला नाही. परंतु माझा एक सहकारी (त्याचे नाव सुद्धा कुलकर्णी आहे) नियमितपणे डीसके कंपनीत मुदतठेवींमध्ये गुंतवणूक करीत होता. मी त्याला भांडवली बाजारातील संचालकाने दिलेल्या माहितीबद्दल सांगूनसुद्धा त्याचा डीएसकेवरील विश्वास कमी झाला नाही. आता हे प्रकरण बाहेर आल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी त्याचा संदेश आला. "डीएसके वर विश्वास ठेवून मी चूक केली" असे त्याने लिहिले होते. बहुतेक त्याचे बरेच पैसे डीएसकेमध्ये अडकले आहेत.

डीएसकेने संचालक मंडळावर माधुरी दिक्षीतला केवळ प्रसिद्धीसाठी घेतले होते. अनेक कंपन्या सेलेब्रिटीजना किंवा प्रभावी राजकीय व्यक्तिंना आपल्या संचालक मंडळावर नेमतात. सहाराच्या सुब्रतो रॉयने अमरसिंग, कपिलदेव, अमिताभ बच्चन इ. संचालक मंडळावर घेतले होते. इन्फोसिसने अमेरिकेतील प्रभावी राजकीय व्यक्ती लॅरी प्रेस्लरला संचालक मंडळावर घेतले आहे (१९९० च्या दशकात गाजलेल्या प्रेस्लर अ‍ॅमेंडमेंट मधील प्रेस्लर तो हाच. या अ‍ॅमेंडमेंटमुळे क्लिंटनच्या काळात पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध आणले गेले होते.). पुण्यात बिबवेवाडी भागातील महेश सोसायटीतील बरेचसे भूगाग सेंटॉर लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या बिल्डरने विकसनासाठी घेतल्यावर भूमीपूजन नुकताच खासदार झालेल्या अमिताभ बच्चनच्या हस्ते केले होते. बहुतेक सुरवातीला अमिताभ या कंपनीच्या संचालक मंडळावर होता.

सरनौबत's picture

21 Aug 2017 - 5:09 pm | सरनौबत

फार पूर्वी जेव्हा सिमेंट चा शोध लागला नव्हता तेव्हा बांधकामात चुना वापरायचे असं म्हणतात. DSK नीं ठेवीधारकांना 'चुना लावण्याऐवजी' बांधकामात वापरला असता तर निदान construction cost तरी कमी झाली असती.

हर्मायनी's picture

21 Aug 2017 - 5:20 pm | हर्मायनी

या लिंक वर ही बरीच डिटेल माहिती आहे :

http://mr.beingmarathi.in/maharashtra/dsk-बिल्डरची-वाट-कशी-लागली-ते/

सुबोध खरे's picture

21 Aug 2017 - 8:48 pm | सुबोध खरे

डी एस के प्रकरणात जात आणण्याचे काहीच कारण दिसत नाही. मूळ डी एस कुलकर्णीनी ब्राम्हण म्हणून आपल्या जातीकडून काही आर्थिक अपेक्षा ठेवणे चूक आहे. उद्या एखादा मराठा( किंवा कोणत्याही जातीचा बिल्डर) तुम्हाला जातीचा हवाला देऊन गंडवणार असेल तर ती तुमची चूक आहे. सर्रास सगळेच राजकारणी जाती/ धर्माच्या नावावर तरुणांना फसवत आहेत त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही.
आणि ज्या ठेवीदारांनी शहानिशा न करता त्यांच्या कडे ठेवी ठेवल्या आहेत( त्यांच्या भूलथापांना बळी पडून) ती त्यांची चूक आहे किंवा हि त्यांच्या लोभापायी( अतिरिक्त व्याजाचे आमिष) द्यावी लागणारी किंमत आहे.
डी एस के स्वतः उत्तम नटसम्राट असतील हि पण त्यांच्या साखरेत घोळवलेल्या बोलण्याला फशी पडणे हि ठेवीदारांची चूक आहे( त्यांच्या घामाचे पैसे बुडाले याबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगून) असेच म्हणावे लागेल.
व्यक्तिशः एखादा माणूस माझ्या जातीचा आहे म्हणून मी (त्याच्या बद्दल माहिती नसताना) त्याच्याशी आंधळेपणाने व्यवहार करणार असें तर ते चूक आहे.
डी एस के यांनी जर फसवा फसवी केली असेल तर आपल्या जातीचे म्हणून कोणाही ब्राम्हणाने ( किंवा कोणत्याही जातीच्या माणसाने) मदत करू नये.
एखादा माणूस खरंच आर्थिक अडचणीत असेल आणि प्रामाणिकपणे सर्व गोष्टी उघड करुन दाखवत असेल तर त्याला मदत करणे वेगळी गोष्ट आहे.

अप्पा जोगळेकर's picture

22 Aug 2017 - 10:53 am | अप्पा जोगळेकर

एखादा माणूस खरंच आर्थिक अडचणीत असेल आणि प्रामाणिकपणे सर्व गोष्टी उघड करुन दाखवत असेल तर त्याला मदत करणे वेगळी गोष्ट आहे.
डीएसके खरोखर प्रामाणिक असेल (तसे वाटत तरी नाही) तरीसुद्धा त्याने भाषेच्या किंवा जातीच्या आधारावर मदत मागणे आक्षेपार्हच आहे.
पण खरोखरच जातीच्या नावावर मदत मागितली गेली आहे का हा मुद्दा आहे.
विजय कुंभार यांनी एका साध्या कागदाचा स्क्रीनशॉट टाकला आहे. ते डीएसकेचे लेटर हेड सुद्धा नाही. मग त्याने जातीच्या आधारावर मदत मागितली हे कुंभार कशाच्या आधारावर म्हणत आहेत ? शिवाय कोणत्यातरी फडणीस नावाच्या माणसाच्या जातीचा अकारण उल्लेख आणि तो तुरुंगात आहे हे लिहिणे या प्रकरणाचा डीएसके च्या आर्थिक गडबडीशी काय संबंध आहे तेसुद्धा कळले नाही.

वाल्मिकी's picture

23 Aug 2017 - 12:51 pm | वाल्मिकी

डी स के सध्या कंपनी चालू आहे कि बंद पडलीये ?

चौकटराजा's picture

23 Aug 2017 - 2:29 pm | चौकटराजा

माझ्या माहितीतील एक महिला आजही त्या कंपनीत नोकरीला आहे. त्याअर्थी कंपनी चालू असावी.

वाल्मिकी's picture

23 Aug 2017 - 4:19 pm | वाल्मिकी

धन्यवाद
आमचे नातेवाईक अकाऊंटिंग मध्ये आहेत तिकडे

पगला गजोधर's picture

23 Aug 2017 - 7:29 pm | पगला गजोधर

तुमचे जे कोणी नातेवाईक अकाऊंटिंगमध्ये आहेत न सध्या तिकडे, त्यांच्याकडूनच तुम्हाला कळलं असतं ना ? D S K चालू आहे का बंद .....

वाल्मिकी's picture

24 Aug 2017 - 12:08 am | वाल्मिकी

अहो ते नातेवाईक आहेत
नुसता विचारायला गेले तरी.... असो

वाल्मिकी,

त्यांचं संकेतस्थळ तरी चालू आहे. मात्र संकेतस्थळावरून आस्थापनाने ग्राहकांशी व्यवहार करणे थांबवले आहे.

आ.न.,
-गा.पै.

वाल्मिकी's picture

24 Aug 2017 - 12:14 am | वाल्मिकी

DISCLAIMER

Thank you for visiting our website. We are currently updating our website towards compliance of the newly introduced housing law for the State of Maharashtra i.e. the Real Estate (Regulation and Development) Act, 2016 and the rules and regulations notified there under.

In the interim, no information, images or material which is currently available / displayed on the website shall be deemed to constitute any advertisement, invitation, solicitation, offer or sale of any of our product offerings and we shall not accept any such bookings based on reliance of such currently available information, images and material on the website and further shall not be responsible for any consequences of any action taken by any person or authority relying on material/information or otherwise.

We shall be back shortly with an updated website. Thank you for your patience.

6899
I Agree to Visit

वाल्मिकी's picture

24 Aug 2017 - 12:16 am | वाल्मिकी

Workers have not paid for the last three months and now, with the service centre closed, any hope of retrieving their arrears is gone.

http://punemirror.indiatimes.com/pune/civic/dsk-service-centre-downs-shu...

वाल्मिकी's picture

6 Nov 2017 - 2:05 pm | वाल्मिकी

चालू आहे कि बंद मग ?

चौथा कोनाडा's picture

26 Dec 2017 - 6:19 pm | चौथा कोनाडा

डीएसके कोसळा-कोसळी संदर्भात रवि करंदीकर यांनी केदार वांजपे (माजी संचालक, डीएसके गृप) यांच्याशी केलेली चर्चा!

मुलाखत २८ मिनिटांची आहे, त्यातले शेवटीची ७ मिनिटे तर जरूर बघा.

केदार वांजपे

हिच मुलाखत कायप्पावर देखील फिरत आहे.

मारवा's picture

27 Dec 2017 - 7:39 am | मारवा

ही संपुर्ण मुलाखत बघितल्यावर माझी निरीक्षणे अशी
१- मुलाखत घेणारे करंदीकर हे इन्टरेस्टेड पार्टी आहेत व डिएसके विरोधात आहे काय कसा ते माहीत नाही.
२- वांजपे चा आत्मविश्वास साहीत्यीक शैली उदाहरणे बघुन ते डीएसकेंचे जावई शोभतात. सासरे से जावई सवाई असे म्हणावेसे वाटते.
३- वांजपे च्या मुलाखतीतली गर्भित धमकी मी ब्लॅक बॉक्स आहे व ती धमकी देण्याची शैली मनोहर आहे तसेच एके ठीकाणी ते म्हणतात मी सरकार दरबारात त्यांच्या मुला व इतरांच्या ओळखी करुन दिल्या ( चार्ज देतांना ) त्यावरुन म्हणजे या दोन गोष्टींवरुन वांजपे हे तात्वीक साहीत्यीक या द्वैताला भेदुन अधिक खोलवरही काहीतरी आहेत.
४-करंदीकराचे हसणे अनुमोदन एकंदर मुलाखत घेण्याची शैली फारच डोक्यात जाते. करंदीकर हे हनुमान आहेत व रामाचा इंटरव्यु घेताय असे ही काही क्षण वाटुन गेले.किंवा कोणी जोकर कोणा फिलॉसॉफर चा इंटरव्ह्यु घेतोय असेही वाटले.
५-वांजपे चा शर्ट व त्यावरील डिझाइन यावर मी फिदा झालो.
६-वांजपे हे व्यासंगी व्यावसायिक आहेत. मारवाडी व्यावसायिक इतका वेळ घालवत नाहीत ही किमया केवळ मराठी व्यावसायिकच करु शकतो म्हणजे पर्सनल ट्रॅजॅडी मागील एकुण कारणे व त्यांची सखोल मांडणी करणे त्या व्यवसायावरही एकुण मार्मिक भाष्य करणे, उदाहरणे , उपमा वा वा हे सिंधी व्यावसायिक करुच शकत नाही.'
७- एकुण भलेही आकड्यात वाढला नाही तरी पण मराठी माणुस धंद्यात पडला तरी आपल्या सारख्या मराठी बांधवांची चर्चा विश्लेषणाची सोय करुन जांतो
८- टंकाळा

एमी's picture

6 Jan 2018 - 8:34 am | एमी

*DSK Flat Buyers, Approach MahaRERA to get compensation for delayed possession.......Good news for those who booked flats under "Aadhi Ghar Paise Nantar" Offer: - DSK is legally responsible to pay Pre-EMI till possession! - Bank can not harass you!!*

By blogging MahaRERA's order about compensation for delayed possession of flat in DSK Mayurban at Pirangut, Vijay Kumbhar has given good news to all flat buyers in all DSK Group's stalled projects - DSK Dream City, DSK Anandghan, DSK Nabhangan, DSK Sadaphuli, DSK Mayurban, DSK Nandanvan, DSK Pushpaban, DSK Chaitraban, DSK Gold Leaf, DSK Vedant, DSK Madhukosh etc.

1) Now, every month - everyone of you can get interest - at the rate of 10.05% - on your own contribution - from the date of possession mentioned in the agreement - till the actual possession of flat.

Yes! From the date of possession mentioned in the agreement!!
MahaRERA has refused to consider the 6 months grace period for possession mentioned in the agreement.

2) This MahaRERA order gives a big relief to those who have booked flats under "Aadhi Ghar Paise Nantar" & "DSK Master Plan". Now, banks can not harass you for Pre-EMI. By referring to this order you can tell your bank to go and collect Pre-EMI from DSK. Till you get the flat possession - it is DSK's legal responsibility to pay the Pre-EMI. DSK can not avoid it. Banks can not force you to pay.

3) Don't worry about expenses to file the complaint! As per this order - DSK will pay you Rs. 20,000 as the cost of complaint!!

4) Don't worry about that clause about 'Arbitrator' - according to the order - RERA Act overrides it.

It means that - DSK can not stop you from getting justice.

All crooked tactics of DSK have completely failed with MahaRERA.

So, don't waste time.

Visit MahaRERA website today. File complaint. Get compensation for delayed possession.

If you need any help, call Vijay Kumbhar on 91 99232 99199 to fix an appointment.

Pay him Rs. 1,000 per flat and file foolproof complaint with MahaRERA!

*Please, share this message & help to reach thousands of flat buyers who have become victims of DSK & other builders in Pune - Ravi Karandeekar, 919860044110*

एकुलता एक डॉन's picture

19 Feb 2018 - 7:07 pm | एकुलता एक डॉन

डीएसकेंच्या अधोगतीस नोटाबंदीच कारणीभूत : शिवसेना
https://www.majhapaper.com/2018/02/19/shiv-sena-samna-statement-on-dsk-c...

शिवसेना अत्यंत थिल्लर लोकांचा सुमार पक्ष आहे हे पुनःपुन्हा अधोरेखित होत असते.

एकुलता एक डॉन's picture

22 Feb 2018 - 9:48 pm | एकुलता एक डॉन

मी शिव सेनेचा समर्थक नाहीये
पण ह्यात थिल्लर पणा काय