गेम थेअरी : खोटे पणाने नुकसान कसे होते ?

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
21 Aug 2017 - 12:47 am

नितीश कुमार हे आधी भाजपचे चांगले मित्र होते. अचानक भाजप त्यांना कम्युनल वाटू लागला आणि त्यांनी तिसरी चूल मांडली. काही वर्षांनी भाजप त्यांना जवळचा वाटू लागला आणि ती चूल मोडून ते पुन्हा भाजपात आले. अश्या प्रकारची शेकडो उदाहरणे आपणाला राजकारणात सापडतील. सामान्य माणसाला अश्या व्यवहाराचे आश्चर्य वाटेल पण राजकारणातील अश्या प्रकारच्या तडजोडी आणि "पास्ट इस पास्ट" अश्या प्रकारचे वागणे त्यांना बहुतेक वेळा फायदेशीर ठरते. पण खोटेपणा नक्की किती करावा ? दुसर्याने तुम्हाला गंडवल्यास तुम्ही त्याच्याशी कसे वागावे ? ह्या प्रश्नाची उत्तरे ह्या पोस्ट मधून मिळतील.

सोपे उदाहरण

समजा आपल्याकडे लक्षावधी बकऱ्या आहेत. दुसऱ्या गावांतील एका व्यक्तीकडे लक्षावधी सोन्याच्या मोहोरा आहेत. तुम्ही दोघे एकदिवस बसून करार करता कि दररोज तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ एक बकरी बांधून ठेवाल. त्याच वेळी दुसरी व्यक्ती गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या हनुमान मंदिरात एक सोन्याची मोहोर ठेवून जाईल. बकरी बांधून झाल्यावर तुम्ही मंदिरात जाऊन मोहोर घ्याल तर दुसरी व्यक्ती मोहोर ठेवल्यानंतर पिंपळाच्या झाडाकडे जाऊन बकरी घेऊन घरी जाईल.

पण दुसऱ्या व्यक्तीने मोहोर नाही ठेवली तर ? तरी तुमची बकरी हकनाक फुकटांत जाईल. त्याच प्रमाणे बकरी ना बांधता तुम्ही मोहोर घेऊन पोबारा करू शकता.

तुम्ही कुठल्याही क्षणी ह्या व्यवहारातून माघार घेऊ शकता. जास्तीत जास्त मोहोरा प्राप्त करणे हे तुमचे उद्धिष्ट आहे. दुसरी व्यक्ती तुम्हाला काडीही गंडवू शकते. अश्यां तुमची स्ट्रॅटेजी काय असेल ?

हे कोडे खूप वर्षा मागे एक स्पर्धा म्हणून प्रकाशित केले गेले. शेकडो लोकांनी अनेक प्रकाचे algorithms पाठवले. शेवटी एक फक्त तीन ओळींचा अल्गोरिथम विजयी झाला.

तुम्ही स्वतः हि गेम इथे खेळू शकता : http://ncase.me/trust/

ह्या गेम मधून असे लक्षांत येते कि जेंव्हा सर्व लोक "प्रामाणिक पणा" दाखवतात तेंव्हा सर्वांचाच फार फायदा होतो. पण प्रामाणिकपणा नियम म्हणून काटेकोरपणे पाळला तर एकदा दुसरा खोटा माणूस आहे त्याचा प्रचंड फायदा होतो. वारंवार खोटेपणा करणारा माणूस शेवटी नेहमीच कमी पैसे कमावतो.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

21 Aug 2017 - 1:17 am | पिलीयन रायडर

अत्यंत इंटरेस्टींग प्रकार आहे!!

मी सध्या तो गेम खेळतेय पण विचार करुन खेळावा लागेल. आणि परत दुसर्‍यांदा खेळतान ती मजा येणार नाही असं वाटतंय. खेळुन कळवेन इथे.

पिलीयन रायडर's picture

21 Aug 2017 - 1:44 am | पिलीयन रायडर

ब्रिलियंट!!!!

अनेक अनेक धन्यवाद!

अगदी बरोबर : गेम फक्त एकदाच खेळावी

कंजूस's picture

21 Aug 2017 - 7:13 am | कंजूस

नितिश कुमार अथवा इतर नेत्यांचा पक्षबदल आणि गेम थिअरीचा काय संबंध?
दोन वेगळे लेख होतील.

अनुप ढेरे's picture

21 Aug 2017 - 10:25 am | अनुप ढेरे

जबरदस्त!