#अनुभव#

भित्रा ससा's picture
भित्रा ससा in जनातलं, मनातलं
14 Aug 2017 - 12:13 am

नमस्कार ;
माझे हे पहिलेच लेखन सूचनांचे स्वागत
अवाजवी टीका खपवून घेतली जाणार नाही नोंद घेणे.
गेल्या वर्षीच्या जानेवारीची गोष्ट. वाडवडिलांची पुण्याई जमिनीच्या रूपात भेटलेली त्यामुळे आमचा शेती हा बाजूउद्योग सुरू असतो . दिवसा संगणक दुरुस्ती व रात्री भिजवणी असा रुटीन ठरलेला होता .
हरभरा जोमात आलेला पण पावसाने थोडा दगा दिला त्यावर उपाय म्हणून तुषार सिंचन सयंत्र जोडण्याचा निर्णय एकट्याच्या बहुमताने मंजूर केला. आता खरी पंचायत अशी होती की मायबाप
महावितरण रात्री 12 वाजता "थ्ररी फ़ेज" लाइट सूरू करते , म्हणून मी व आमचे मित्र संभाजी राव दोघे 11 वाजता रानात हजर झालो.
आता तुमच्या पासून काय लपवायच ,खर म्हणजे मी पहिल्यापासून हलक्या काळजाचा त्यात रात्रीची वेळ आणि वरून लाइट नाही त्यामुळे जीव मुठीत धरून शेकोटी शेजारी 12 वाजण्याची वाट पाहत बसलो होतो.
लाइट आल्यावर संभा मोटार चालू करायला विहिरीकडे गेला व मी तुषार जोडणी करायला म्हणून हरभऱ्याच्या उभा राहिलो. अचानक मला खालच्या बांधावर हालचाल जाणवली भीतीने अंगावर काटा उभा राहिला बघतो तर एक मानवी आकृती जवळ येत होती अंधारात चेहरा दिसत नव्हता पण कोणीतरी शेजारचा शेतकरी असेल अस वाटल.संभा आला का म्हणून मागे वळून बघितले तर संभाच्या विजेरीचा उजेड दिसला आणि माघून धाड असा आवाज आला वळून बगतो तर आकृती गायब. जिवाच्या आकांतानी मी पळत पळत संभाजीला जवळ गेलो व तिथेच माजी बेशुद्ध पडलो
सकाळी जाग आली तेव्हा घरी होतो आज वर्ष झालं तरी शेतात रात्री पाय ठेवत नाही
मनाचे भास म्हणा किंवा भ्रम पण
घडल ते असच घडलं

कथाअनुभव

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

14 Aug 2017 - 2:10 am | ज्योति अळवणी

अहो पण सकाळी विचारलंत की नाही कोण आलं होतं ते?

जर समोर कोणीच नसेल तर अनुभव फक्कड म्हणायला हवा.

सतिश गावडे's picture

14 Aug 2017 - 11:13 am | सतिश गावडे

अप्रतिम लिहीलं आहे. अगदी खोलवर आत जाऊन काळजाला भिडलं.

माम्लेदारचा पन्खा's picture

14 Aug 2017 - 1:42 pm | माम्लेदारचा पन्खा

तुम्ही सुद्धा असं करायला लागलात आता ?

सतिश गावडे's picture

14 Aug 2017 - 9:08 pm | सतिश गावडे

अवाजवी टीका खपवून घेतली जाणार नाही नोंद घेणे.

याला घाबरुन गोग्गोड प्रतिसाद दिला :)

भित्रा ससा's picture

14 Aug 2017 - 12:49 pm | भित्रा ससा

मंडळ आपलं आभारी आहे

मंडळाचे पण आम्ही आभारी आहोत.

मार्मिक गोडसे's picture

14 Aug 2017 - 3:15 pm | मार्मिक गोडसे

नशिबवान आहात. घरगुती वापराच्या विजेचे लोड शेडींग असते तर रात्री शेतात संगणक दुरुस्तीचे काम करावे लागले असते. विंडोतून अजून भयानक प्रकार बाहेर आले असते. आभार माना वीज मंडळाचे.

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Aug 2017 - 5:55 pm | अमरेंद्र बाहुबली

मी पवनचक्कयांवर इंजिनिअर म्हणून काम करतो. महिन्यातून एकदा रात्रपाळी असतेच. कधी कधी रात्री एखादी पवनचक्की बंद झाली तर ड्रायवर बरोबर जंगलात जिथे पवनचक्की आहे तिथे जाऊन एकट्यानेच अंधारात काम करावं
लागतं कधी वर चढून तर कधी खाली. मला नेहमी आश्चर्य वाटतं सर्वांना भूत, सावली,आकृती दिसते. मलाच का कधी काहीच दिसत नाही......मी नाँर्मल नाही का???

पैसा's picture

14 Aug 2017 - 6:06 pm | पैसा

अवाजवी टीका खपवून घेतली जाणार नाही नोंद घेणे.

मी यालाच सर्वात जास्त घाबरले!

तेच तर.. एवढं स्पष्ट लिहिताय आणि म्हणे भित्रा ससा..

@ससा पण अजून जरा डिटेल मध्ये येऊ द्या.. ती सावली पण तुम्हाला भूत समजून पळाली असेल.. ;)

सुबोध खरे's picture

14 Aug 2017 - 6:14 pm | सुबोध खरे

??

योगी९००'s picture

14 Aug 2017 - 11:49 pm | योगी९००

अनुभव आवडला....

पण एकदा असेच कोठेतरी संभ्याची डायरी हाताला लागली. त्या डायरीत एक पान असे होते... (हलकेच घ्यावे ही विनंती)

"आमचे एक दोस्त हल्ली लई पिडतंय आम्हाला.. त्याचं नाव काय लिहीत नाही पण एकदम हलक्या काळजाचं..भित्रा ससा म्हणतंय आख्खं गाव त्याला. रातच्याला १२ ये म्हणतंय शेतावर. ते पण त्याचे कायतरी तुषार सिंचन यंत्र चालू करायचं होतं. आयला आता ही वेळ माझी कमळीकडं जाण्याची. आता हे काम काय एकदा करून होण्यासारखं नायं ना.. हे बेणं रोज घेऊन जाणार रातच्याला पंप चालू करायला..म्हणजे कमळी बोंबलीलच म्हणायची.

एकदम झ्याक ट्युब पेटली. गण्याला पटवला. दोनदा कोंबडी खाण्याच्या बोलीवर गण्या तय्यार झाला. पहिल्याच दिवशी सशाला हिसका दाखवायचे ठरले. रात्री शेतावर जातानाच भय वाटतंय असं बोललो. दोन-चार भुताचे अनूभव सांगितले. सश्याची जाम फाटली होती. शेतावर मुद्दामहून शेकोटी थोडी छोटी लावली. त्यामूळे अंधार जास्त भयाण वाटत होता. १२ ला वीज आल्यावर मोटार चालू करायच्या निमित्ताने थोडा दूर गेलो. दुरूनच सश्याची गंमत पहात बसलो. ठरल्याप्रमाणे गण्या अंगावर काळे कपडे घालून आला होता. त्याने जाम टरकवले सश्याला. उगाच प्रकरण वाढायला नको म्हणून सश्याच्या जवळ गेलो तर गडी ठार आडवा...आता मात्र माझी फाटली. पण गण्या म्हणाला बेशुद्ध पडला असेल रे..मग मी आणि गण्याने रात्री अंधारातच या भित्र्या सश्याला त्याच्या घरी पोचवले. सकाळी जागा झाला तर त्याला बोलवतच नव्हते. म्या बी मग - काय झाले याला ते कळलं नाहं, एकदम बेशुद्ध होऊन पडला असे सांगायला सुरूवात केली. दोन-चार दिवसांनी ठीक झाल्यावर हा भित्रट भूत बघितले म्हणून सगळ्यांना सांगत होता. संभ्यामुळे वाचलो असे पण म्हणाला. चार-चारदा पाया पडला. आणि त्यानंतर पुन्हा कधी शेतावर रातच्याला गेला नाही आणि मलाही रातच्याला कधी बोलावले नाही."

शलभ's picture

14 Aug 2017 - 11:51 pm | शलभ

खतरनाक :)

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Aug 2017 - 12:33 am | अमरेंद्र बाहुबली

हा! हा! हा! ह.ह.पु.वा.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Aug 2017 - 12:34 am | अमरेंद्र बाहुबली

हा! हा! हा! ह.ह.पु.वा.

एस's picture

15 Aug 2017 - 3:14 pm | एस

अगगगगा!

परा-टाऱ्या वगैरे महान प्रभूतींची आठवण झाली हा प्रतिसाद वाचून. दंडवत स्वीकारा योगीश्वर!

चांदणे संदीप's picture

17 Aug 2017 - 3:37 pm | चांदणे संदीप

याला म्हणतात जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा! =))

Sandy

जेम्स वांड's picture

15 Aug 2017 - 3:27 pm | जेम्स वांड

ऑ! ह्या लेखनात टीका करण्यासारखं काहीच नाही की हो ;)

उपयोजक's picture

15 Aug 2017 - 9:35 pm | उपयोजक

नाव भित्रा ससा!
आणि खाली वॉर्निंग!
अवाजवी टीका खपवून घेतली जाणार नाही नोंद घेणे.
गंमतच आहे!

बाकी शुभेच्छा!

लिहित रहा.