विषाणूजन्य(viral)स्थुलपणा ,अर्थात virus ad36 आणि स्थुलपणा!!?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
10 Aug 2017 - 2:11 pm

जगभरात १९८० च्या दशकानंतर स्थुलपणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.विशेषतः प्रगत युरोप अमेरीकेत स्थुलपणाची साथ पसरली आहे(epidemics).याला कारण म्हणजे यांत्रिकीकरणाने केलेली प्रगती,त्यामुळे बैठ्या जीवनशैलीचा स्विकार,जंक फूड ,बाहेरचे खाणे वाढले आहे.अमेरीकन वर्क कल्चर जगाने स्विकारल्याने विकेंडला बाहेर फिरायला जाणे व बाहेरचे खाणे असा चंगळवादही स्थुलपणासाठी कारणीभूत ठरत आहे.पण या स्थुलपणासाठी आणखी एक कारण पुढे आलेले आहे.जे तितकेसे माहीत नाही पण खूप महत्वाचे आहे.
काही वर्षांपुर्वी भारतीय वंशाचे अमेरीकन संशोधक निखिल धुरंधर व त्यांच्या टीमने adenovirus 36 अर्थात ad36 हा विषाणु(virus)स्थुलपणासाठी कारणीभुत असल्याचे संशोधनातून सिद्ध केले आहे.
https://www.wikipedia.org/wiki/Adenovirus_serotype_36

हा व्हायरस प्रथम कोंबड्यांमधील स्थुलपणासाठी कारणीभुत असल्याचे समजले.इन्फेक्टेड कोंबड्यांच्या वजनात प्रचंड वाढ झाल्याचे लक्षात आले.१९७८ साली हा व्हायरस प्रथम शोधण्यात आला.त्यानंतर माणसाचा चुलत भाऊ ,अर्थात माकडांना या व्हायरसने इन्फेक्ट केल्यावर त्यांच्या वजनात ,विशेषतः चरबीमध्ये ५० ते १५०% वाढ झाल्याचे लक्षात आले.जेव्हा धुरंधर आणि त्यांच्या टीमने स्थुल व्यक्तींचे स्क्रीनींग केले तेव्हा स्थुल व्यक्ती पैकी ३० ते ४० टक्के अतिस्थुल व्यक्ती या ad36 व्हायरस ने इन्फेक्ट असल्याचा निष्कर्ष समोर आला.
व्हायरस स्थुलपणा कसा वाढवतो.???
या व्हायरस मधील ठराविक DNA स्निग्ध पेशींमध्ये(fat cells) प्रवेश करतो व या फॅट सेल्सचे चरबी साठवण्याचे प्रमाण वाढवतो,या पेशी आकाराने वाढतात व व्यक्तीचे वजन झपाट्याने वाढू लागते.तसेच हा व्हायरस नॉर्मल stem cells चे रुपांतर फॅट सेल्समध्ये म्हणजे स्निग्ध पेशींमध्ये करतो.त्यामुळे इन्फेक्टेड व्यक्तीमध्ये मोठ्या आकाराच्या व अधिक प्रमाणात फॅट सेल्स तयार होतात व ति व्यक्ती फुग्यासारखी फुगते .विशेष म्हणजे अश्या व्हायरल स्थुलपणा आलेल्या व्यक्तींचा आहार तपासल्यानंतर त्यांचा आहार सामन्यच असल्याचे लक्षात आले.अशा व्यक्तींनी कीतीही प्रयत्न केले तरी त्यांचे वजन उतरत नाही उलट या व्हायरस मुळे चयापचय क्रीयाही मंदावते व व्यक्ती स्थुलपणात कायमची अडकून पडते.

उपाय काय???

सध्यातरी या व्हायरस वर कोणताही उपाय नाही.सध्या एक लस(vaccine) तयार केले गेले आहे ,पण ते आधीच इन्फेक्ट झालेल्या व्यक्तींसाठी नाही.या व्हायरस पासून वाचायचे असेल तर स्थुल ,अतिस्थुल व्यक्तींशी शक्यतो क्लोज कॉन्टॅक्ट येणार नाही याची काळजी घ्यावी.अश्या व्यक्तींशी शरीरसंबंध वा शाररीक संपर्क घातक ठरु शकतो.कारण हा व्हायरस मनुष्याला लगेच इन्फेक्ट करतो.
आंतरजालावर डाएट ,वजन कमी करण्याविषयी अनेक धागे आहेत.यात एक माहीतीपुर्ण भर म्हणून हा प्रपंच .धन्यवाद!!

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

II श्रीमंत पेशवे II's picture

10 Aug 2017 - 2:33 pm | II श्रीमंत पेशवे II

अरे बापरे ........हा भलताच उपद्व्यापी व्हायरस आहे .........ad36
अजून तरी भारतात आलेला दिसत नाहीये ...........पण अमेरिकन जंक फूड खात राहिलो तर नक्कीच येईल .......

लक्षणं - श्वसन संबधी तक्रार आणि नेहमी डोळ्याचे संक्रमण / डोळा येणे एक कारण म्हणून ओळखले

स्थुल ,अतिस्थुल व्यक्तींशी शक्यतो क्लोज कॉन्टॅक्ट येणार नाही याची काळजी घ्यावी.

कशी?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

10 Aug 2017 - 3:48 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

वर दिलेले वाचलेले दिसत नाही.लेख निट वाचत जावा आणि मगच तुमचे वादात्मक मत देत जा ,फुकटचा सल्ला आहे.

विदेशी वचाळ's picture

11 Aug 2017 - 4:37 am | विदेशी वचाळ

मध्यंतरी मिपा वर उठ सुठ पुणेरी लोक्कांवर टीकास्त्र सोडल्याशिवाय रात्रीचे जेवण जात नसणारे लोक जमा झाले, असे वाटत असायचे. त्या नंतर "भक्त" आणि सत्ता गेल्यापासून झालेले "विमुक्त" यांच्यावर टीका सोडणारे बोकाळले.

पण या सगळ्या काळात "अमेरिकेच्या लोकांच्या खाण्यावर उठणे" हा जन्म सिद्ध हक्क आहे असे सांगणारे, अगदी सदैव दिसत आले आहेत.

लेखकाचे आणि माझे काही वैर नाही, मात्र अमेरिकन लोकांच्या पोटावर का पाय दिला हे कळत नाही. वास्तविकता कोथलाचा अमेरिकन माणूस हा भारतीयाला "बाबारे रोज एकदा चिकन खात जा" असे सांगायला आला नव्हता. आपले लोक सुद्धा दिवस रात्र, कुक्कुट नवमी आणि बोकड पंचमी साजरी करत होतेच. ते पाहायचे नाही. आणि न ऐकणाऱ्या अमेरिकन लोकांना, आपल्या सुटलेल्या पोटा करीत जबाबदार धरायचे. वा रे तुमची फिलॉसॉफी.

मला अमेरिकन वरची टीका बोचत नाही, पण आपलेही काही तारतम्य असावे कि नाही ?

विदेशी वाचाळ

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

11 Aug 2017 - 11:51 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

वाचाळकाका,लवकर बरे व्हा ,असे सुचवतो.

Ram ram's picture

17 Aug 2017 - 11:21 am | Ram ram

काहीही हं टफि