रामदेव व पतंजलीच्या प्रोडक्ट्स आपले मत काय आहे?

बार्नी's picture
बार्नी in काथ्याकूट
8 Aug 2017 - 11:59 am
गाभा: 

नुकतेच प्रियांका पाठक – नारायण ह्यांचे “Godman to tycoon –The untold story of Baba Ramdev” नावाचे पुस्तक प्रकाशित झाले.तसेच आंतरजालावर हा पुस्तक परिचय वाचनात आला म्हणून उत्सुकता वाढलेली आहे.

मी पतंजली चे प्रोडक्ट्स कधी वापरले नाहीत. परंतु आंतरजालावर थोडा अभ्यास केल्यानंतर , पतंजलीच्या उत्पादनांच्या मागील काही चिंताजनक गोष्टी आढळून आल्या. उदाहरणार्थ , पतंजली चे गायीचे तूप हे गायीचे नसल्याचा दावा एस. के . पात्रा ह्या त्यांच्या EX-CEO ने केला आहे. “कारवान “ मासिकाने त्याबाबत एक लेख प्रकाशित केला आहे. तसेच त्यांची काही उत्पादने FSSAI च्या टेस्ट्स मध्ये नापास झाल्याचे समजले. तसेच त्यांच्या जाहीराती ह्या फसव्या असल्याचा दावा इतर कंपन्यांनी केल्याचे वाचनात आले.

रामदेव हे कमालीचे हुशार व्यापारी आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या उत्पादनांबाबत मी आधीपासूनच साशंक होतो. जर आपण त्यांची उत्पादने वापरली असल्यास आपला काय अनुभव होता हे जाणण्यास उत्सुक.

प्रतिक्रिया

बार्नी's picture

8 Aug 2017 - 12:07 pm | बार्नी

वर दिलेल्या लिंक्स अचानक गायब झाल्याने खाली देत आहे.
Godman to tycoon –The untold story of Baba Ramdev
Is Patanjali’s Desi Cow Ghee Even Cow Ghee?

इतकी फसवेगिरी करणार नाही बाबा. इतरांचा खप अचानक कमी झाल्याने त्यांचा धंधा बुडायला लागला असेल हे निश्चित.

( गंमत अशी आहे की तूप अन गायीची चरबि यांची केमिकल टेस्ट एकच येते म्हणतात!!)

धर्मराजमुटके's picture

8 Aug 2017 - 12:53 pm | धर्मराजमुटके

मी पतंजली चे प्रोडक्ट्स कधी वापरले नाहीत
रामदेव हे कमालीचे हुशार व्यापारी आहेत हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या उत्पादनांबाबत मी आधीपासूनच साशंक होतो.

तुमची ही मते तुम्ही अगोदरच ठरवली असल्यामुळे तुम्हाला तुमच्या दाव्याला पुष्टीकारक मते आली तरच जास्त आनंद होईल. विरुद्ध मते आली तर तुम्ही काय पतंजलीची उत्पादने टेस्ट करायला जाणार नाही. बरोबर ना ?

बार्नी's picture

8 Aug 2017 - 1:00 pm | बार्नी

विरूद्ध मते आली तरी आनंदच होईल .

पतंजलिला तथाकथित शुद्ध देशी गायीच्या तुपाचा पुरवठा हा वेगवेगळ्या ठिकाणांवरून होतो असे ऐकले आहे. त्याच ठिकाणांहून इतर डेअऱ्यांनाही पुरवठा होत असल्याने त्यात किती आणि कशी भेसळ होत असावी ह्याची कल्पना आहे. तस्मात् पतंजलिच्या उत्पादनांवर डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी परिस्थिती मुळीच नाही.

चिगो's picture

8 Aug 2017 - 1:54 pm | चिगो

रामदेव बाबा हा माणुस अत्यंत धुर्त व्यापारी आहे. त्यांनी 'योग'ला काहीतरी असाध्य, कठीण अशी सिद्धी न ठेवता 'कधीही, कुठेही करता येईल असा सहज सोपा व्यायाम' म्हणून भारतातील घराघरात पोहचवलं, हे त्यांचं निश्चित आणि प्रशंसनीय यश.. मी लोकांना रेल्वेच्या बर्थ्सवर 'अनुलोम-विलोम', 'कपालभाती', 'भ्रामरी प्राणायाम' करतांना बघितलं आहे. 'नखांवर नखं घासून केस परत येतात' सारख्या उपायांनी त्यांना लोकांना आपल्याकडे ओढलं, . 'बाबा सांगतील आणि करतील, ते आपल्या भल्याचंच आहे' हा विश्वास जनतेकडून संपादन केल्यावर त्यांनी 'पतंजली', 'दिव्य फार्मसी'वगैरे कंपन्या सुरु केल्या, आणि त्या भरमसाठ चालत देखील आहेत. गंमत म्हणजे, पतंजलीमधे कागदोपत्री त्यांचा फारसा स्टेक नाहीये.

'पतंजली'च्या उत्पादनांबद्दल बरेचदा जनतेचा अ‍ॅटीट्युड 'बाबाजी का प्रसाद हैं. अच्छाही होगा..' टायपातला असतो. त्यांच्याबद्दल फारशी चिकीत्सा करायला, गुणवत्ता तपासायला वगैरे जनतेला आवडत नाही. त्या बाजूने कुणी काही बोललं किंवा काही सिद्ध जरी केलं तरी 'विदेशी कंपनीयों की साजिश' आहेच. त्यामुळेच, सद्यस्थितीत तरी पतंजली भारतात काहीही खपवू शकते, हे सत्य आहे. रामदेव एक व्यापारी आहेत, ते स्वतःच ब्रॅन्ड आणि ब्रॅन्ड एम्बॅसिडरही आहेत. व्यक्तीगतरित्या बोलायचं झाल्यास, मी पतंजलीची उत्पादनं 'विथ अ पिंच ऑफ सॉल्ट'टायपात वापरतो. खाण्यापिण्याच्या वस्तू सहसा घेत नाही, आणि बाकीच्या वस्तुंबद्दलही 'अटॅच्ड' अजिबात नाही.

अनुप ढेरे's picture

8 Aug 2017 - 2:11 pm | अनुप ढेरे

कणिक, मध शुद्ध फसवणुक आहे. बिस्किटं/कॉर्न्फ्लेक्स साठी पतंजलीवर विश्वास नाही. इतर कंपन्यांवर आहे. पेस्ट वापरली नाही. हँड वॉश साबण बरा आहे

कणिक, मध शुद्ध फसवणुक आहे.

++११

फसवणूकः
बिस्किटे
कपडे धुण्याची पावडर
हॅन्डवॉश
चांगली उत्पादने:
टूथपेस्ट
शाम्पू
डोक्याचे तेल
आवळा सिरप

arunjoshi123's picture

8 Aug 2017 - 5:51 pm | arunjoshi123

काय फसवणूक आह??

अनुप ढेरे's picture

8 Aug 2017 - 6:00 pm | अनुप ढेरे

वापरुन बघा. समजेल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

8 Aug 2017 - 11:41 pm | हतोळकरांचा प्रसाद

पीठ वापरून बघितले, आवडले नाही. पण यात फसवणूक काय ते कळले नाही. मी पैसे देऊन घेतलेली बरीच उत्पादने मला आवडत नाहीत, पैसा वसूल नाहीत असे म्हणणे जास्त योग्य ठरणार नाही का?

जयंत कुलकर्णी's picture

8 Aug 2017 - 2:12 pm | जयंत कुलकर्णी

मी खालील मेल त्यांना पाठवला होता पण अर्थातच त्याचा उपयोग झाला नाही. शिवाय त्यांचा मध चांगला नाही हे मी अनुभवाने सांगू शकतो.

Honey Batch No. CN 231

11/19/15

to feedback
Dear Sir,

I bought Honey which mentions the cited Batch No.

Unfortunately when i weighed it was less by 50 gms. Add the weight of the bottle and I am sure we are receiving in 200 gms less Honey in each bottle.

Regards,
Jayant Kulkarni

पतंजलीचे फेस वॉश वापरत आहे, हिमालया पेक्षा सरस वाटलं. पण आयुर्वेदिक वगैरे असेल या बद्दल साशंक आहे.

पुंबा's picture

8 Aug 2017 - 2:48 pm | पुंबा

हो फेसवॉश चांगले आहेत.. विशेषतः तेलकट त्वचेसाठीचा चांगला आहे. एकदम इफेक्टिव्ह.

पतंजलीचा शाम्पू, टूथपेस्ट, भांडी घासायचा साबण वापरला आहे.
पेस्ट ठीक आहे. वीको वज्रदंतीसारखी लागते चवीला :D
शाम्पू आत्ताच वापरायला घेतला. पहिल्यांदा चांगला वाटला पण पुढचे दोन वेळा केस फार कोरडे/राठ झाले.

मी परत कोणतेच पतंजली उत्पादन आणेल असे वाटत नाही.

सविता००१'s picture

13 Aug 2017 - 10:17 pm | सविता००१

आणून पाहिली वेगवेगळी उत्पादने.
एकही नाही आवडलं.
शाम्पू, फेस वॉश सूट नाही झाले. शाम्पू तर बहुतेक फक्त तेलकट केसांसाठी असावा. माझे अती कोरडे झाले आणि प्रचंड गुंतले.
कणीक, दलिया, मध , तूप काहीही आवडलं नाही.
टूथपेस्ट ही ठीकच.

शाम्पू तर बहुतेक फक्त तेलकट केसांसाठी असावा. माझे अती कोरडे झाले आणि प्रचंड गुंतले. >> +1. माझेपण केस फार कोरडे झाले :-(
मी Natural Hair Cleanser आणलेला. संत्र्याच्या सालीसारखा वास येतो त्याचा. आणि त्यावर 'बालों का टूटना, झडना व रुखेपन को दूर करे ' असे लिहीले आहे =))
सॅशे मिळत असते तर इतर प्रकार ट्राय करून पहिले असते. बाटली आणणे परवडत नाही प्रयोगासाठी.

मार्चला येणार्‍या जीन्स कश्या आहेत बघूयात.
बाबांनी पराक्रम सेक्युरिटीज नावाची कंपनी काढलीय.
त्यातून आता वॉचमन पुरवणार आहेत. :)
त्यांचा गणवेष बाबांसारखाच असेल की काय अशी शंका आहे...!

कोरावर बाबा रामदेवच्या (म्हणजे फक्त बाबा रामदेवच्याच) उत्पादनांवर भारतीयांना शंका का येते याचं मी उत्तर दिलेलं आहे. ते बर्‍याच लोकांना आवडलेलं आहे. असं प्रश्न करायची मानसिकता काय आहे हे कळलं तर प्रश्नात काय किती तथ्य आहे हे कळेल.
https://www.quora.com/Is-Baba-Ramdev-a-fraud/answer/Arun-Joshi-33?srid=CtTy
================
१. रामदेवाची पेस्ट दिसायला फार कुरुप आहे. पण माझा मागे, दुसरि पेस्ट वापरताना, एक किडलेला दात काढावा लागला. दंतकांती वापरल्यापासून दुसरा किडलेला दात चक्क भरून आला. हे चक्क बियाँड बिलिफ आहे. शिवाय खरोखर्च श्वास २४ तास शुद्ध राहतो.
२. त्याचं तेल वापरल्यावर केस गळणं बंद होतं. पण टॉवेल फार घाण होतो इतकी द्रव्य तो त्यात टाकतो.
३. त्याचा मोगरा फ्लेवरचा साबण माझा फेवरेट आहे. (तो दिसतो सुंदर. त्याचा वास सुरेख . म्हणून.)

चिगो's picture

8 Aug 2017 - 6:24 pm | चिगो

एक अ‍ॅनालिसीस म्हणून आपलं उत्तर आवडलं. हिंदू किंवा भारतीय विज्ञानाचे स्टँडर्डायजेशन करुन त्याच्या कसोटीवर पतंजलीची उत्पादने काय रिझल्ट देतात, हे बघणे रोचक ठरेल. तोपर्यंत तरी 'बाबाजी का प्रसाद' ह्या निकषावर पतंजलीची उत्पादने विकणे किंवा विकत घेणे, ह्यावर आक्षेप आहेच.

पाश्चिमात्य किंवा पौर्वार्त्य कुठल्याही विज्ञानाचे स्टँडर्डायजेशन (मराठी प्रतिशब्द?) करणे फार गरजेचे आहे, असे मला वाटते. आमच्या जिल्ह्यात आम्ही आयुष मंत्रालयातर्फे एक वर्कशॉप ठेवलं होतं. त्यात आलेल्या आयुर्वेदीक डॉक्टरांनी केवळ दोन मिनीटं माझी नाडी तपासून मला खाण्यात काही बदल सुचवले, जे मला फायदेशीर ठरलेत. इथेही काही पारंपारीक औषधी वापरतात. मी आलेल्या चमुला हेच सांगितले कि 'श्रेष्ठत्वावर' वाद करत बसण्यापेक्षा भारतीय विज्ञानाच्या विकासावर भर दिला पाहीजे.

बाकी तुमच्या 'इन्फेरीऑरीटी कॉम्प्लेक्स'वाल्या विवेचनाशी सहमत आहे. तो सिस्टेमॅटीकली आपल्यात मुरवण्यात आला आहे.

पुंबा's picture

8 Aug 2017 - 6:27 pm | पुंबा

'श्रेष्ठत्वावर' वाद करत बसण्यापेक्षा भारतीय विज्ञानाच्या विकासावर भर दिला पाहीजे.

+११११

स्टँडर्डायजेशन (मराठी प्रतिशब्द?)

प्रमाणीकरण.

अजो, तिनही वस्तूंबाबत तुमच्या परिक्षणाशी सहमत.
पण खाण्याच्या वस्तूंबाबत वैयक्तिक वापरातून दर्जाबाबत अक्षम्य दिरंगाई केल्याचे आढळून आले आहे. मध तर भिकार आहे.
पतंजलीच्या वस्तूबाबत माझे मतः खायच्या वस्तू शक्यतो घेऊ नयेत. टॉयलेटरीज वापरून बघायला हरकत नाही. किफायतशीर दरात चांगला दर्जा देतात.

>>>टॉयलेटरीज वापरून बघायला हरकत नाही. किफायतशीर दरात चांगला दर्जा देतात.

+१

बाकी त्यांचे एनर्जी बार चांगले आहेत.

मी बरेच पतंजलीचे प्रॉडक्ट वापरतो, काही चांगले, तर काही बरे वाटले. पण संशय घेण्या सारखे काही नाही. आयुर्वेदिक औषधे तर चांगलीच आहेत, खाजगी कंपनी पेक्षा स्वस्त आहेत.

रामदेवबाबांबाबत माझी मते खालीलप्रमाणे आहेत;
१) साधारणत: १५ बर्षांपासुन दररोज सकाळी प्राणायाम व योगासनांचा प्रचार करतांना त्यांना बघितले आहे. त्यांच्या कार्यक्रमित नेहेमी देशभक्तिपर गीते असतात व ईतर अनेक बाबांप्रमाणे त्यांनी कधीहि आपली स्वतःची किंवा स्वतःच्या प्रतिमांची पुजा करण्यास कोणालाही उद्युक्त केले नाही..
२) त्यांची लोकप्रियता वाढली तसे तसे त्यांनी विदेशात प्राणायाम व योगासनांचे कार्यक्रम केलेत, भारतातील कार्यक्रमांना तिकिटे लावलीत, हरिद्वारला आश्रम काढलेत. एकंदरीत पतांजली ब्रँड तयार होत होता व पैसा खुप जमत होता पण तरीही व्यक्तिपुजा कोठेही सुरु केली गेली नाही,, तसेच पैशांचा संशयास्पद विनियोग / अपाहार /फसवेगिरी सुध्धा कोठेही वाटली नाही.
३) खुप नाव झाल्यावर रामदेवबाबांनी राजकारण / समाजकारण करण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही. त्यानंतर त्यांनी कोठलाही आक्रास्तळेपणा केला नाही. गांधी कूटुंबीय व काँग्रेसच्या विरोधात ते जाहीर सभांमध्ये बोलतात, पण मर्यादेतच.
आता पतंजली उत्पादनांबाबत,
१) बहुतांष FMCG उत्पादने मार्केटिंगवरच चालतात. ही प्राॅडक्टस बनवणे म्हणजे राॅकेट सायन्स नाहीच व म्हणुन विदेशी तंत्रज्ञानाची वगैरे काहीच गरज नाही. मग बाकी कंपन्या हिरो - हिरविणींच्या मदतीने ब्रँडींग करुन विकतात किंवा फाॅरीनचे (म्हणुन चांगले??) म्हणुन खच्चुन नफा कमवुन विकतात तर पतंजलीने रामदेवबाबांचा ब्रँड व स्वदेशीची साद घालुन विकले तर काय बिघडले?
२) खाण्याच्या वस्तुंचे FSSI certification म्हणजे आनंदी आनंदच आहे. जर भिंग घेउनच बघायचे ठरवले तर कित्यैक विदेशी कंपन्यांचेही धाबे दणाणेल.
३) माझा स्वतःचा अनुभव बहुतांष पतंजली उत्पादनांबद्दल चांगलाच आहे. मी आटा नाही वापरला पण मध, पाॅवरव्हिटा, बिस्किटे, तेलं, रसं ई उत्पादने कोठेही कमी नाही वाटली. वैयक्तिक चवींमध्ये फरक असु शकतो पण फ्राॅड नक्किच नाही.

विशुमित's picture

8 Aug 2017 - 8:20 pm | विशुमित

<<<फ्राॅड वगैरे काही नाहीय, लोकांना आपल्याच माणसाचे यश बघवत नाही. >>>

==>> मला तर रामदेव बाबांचे बिसिनेस मॉडेलच खूप कौतुक वाटते. व्यक्ती पूजे बाबत अगदी सहमत.

गावोगावी लोक सकाळी उठून चालू लागली आणि मोडका तोडका का होईना योग करायला लागली, ही खूप मोठी उपलब्धी आहे बाबांची.

बाकी प्रतिसादाशी बऱ्यापैकी सहमत..!!

मोहन's picture

8 Aug 2017 - 9:32 pm | मोहन

+१११

एकविरा's picture

10 Aug 2017 - 2:47 pm | एकविरा

मी तर नेहमीच पतंजली उत्पादने वापरते . मध बिस्किटे आवला ज्यूस इत्यादि ख़रच खूप छान आहेत

जाहिरातीतला तो बाबाच्या मागचा विरळ दातवाला साधक आयुर्वेदाची माहिती असणारा आहे. कोणी नवीन शोध लावत नाही फक्त जुन्या संहितातल्या मिश्रणातले प्रमाण कमी अधिक करतात आणि वेगळ्या नावाने विकतात.

आचार्य बाळकृष्ण ह्यांच्यावर खोटी शैक्षणिक कागदपत्रे व पासपोर्ट मिळवल्याबद्दल कोर्टात सी.बी.आय ने केसेस दाखल केल्या आहेत , त्यामुळे त्यांचे आयुर्वेदाचे ज्ञान हा वादाचा मुद्दा आहे .

आयुर्वेदाचे ज्ञान पुस्तके ,ग्रंथ वाचून मिळत नाही का?
एखाद्या रसशाळेतला कामाचा अनुभवही उपयोगी पडत असेल.
रीतसर महाविद्यालयातल्या शिक्षणाचे प्रमाणपत्र नसेल आणि नोंदणी केलेली नसेल तर तो वैद्य व्यवसाय करू शकत नाही. बाकी माहिती असायला काय हरकत आहे?
शिवाय ही उत्पादने सौंदर्यप्रसाधने असल्यास त्या खात्याचे जे काही नोंदणी/तपासणी/प्रमाण वापरले नसेल तर जनता /सरकार खटला दाखल करू शकेल.

दहा हजार कोटींचं मार्केट जातंय म्हटल्यावर बहुराष्ट्रीय कंपन्या शक्य त्या मार्गाने त्यांच्या मागे लागल्या.
दुसरीकडे त्यांनीच मिळून हर्बल बिझनेसवर लक्ष्य केंद्रित केले. आता सगळ्यांच्या पेस्टमधे नमक, लवंगा, कोळसा आला!

प्रसाद_१९८२'s picture

9 Aug 2017 - 4:41 pm | प्रसाद_१९८२

दातांना किती हानीकारक आहे हे दाखवणारी कोलगेटची एक जाहिरात,
फार पुर्वी दुरदर्शनवर येत असे. त्यात समुद्री शिंपल्यावर कोळसा किंव्हा मिठ घासून, त्या खडबडीत कोळसा व मिठाने दातांवर कसा विपरित परिणाम होतो हे त्यात असत. व आता त्याच कोलगेटच्या "क्या आपके टुथपेस्ट में नमक है" व "कोलगेट चारकोल" सारख्या जाहिराती येत आहेत.

सुबोध खरे's picture

8 Aug 2017 - 8:45 pm | सुबोध खरे

पतंजली चे गायीचे तूप हे गायीचे नसल्याचा दावा एस. के . पात्रा ह्या त्यांच्या EX-CEO ने केला आहे.
हे तूप तयार करण्यासाठी नंदिनी या सरकारी कंपनीचे लोणी वापरले जाते. हे गायीचे आहे कि म्हशीचे आहे याबद्दल सरकारी कंपनीच्या लेबल वर काहीच लिहिलेले नाही. यामुळे ते गायीचे आणि म्हशीचे असे दोन्ही असण्याची शक्यता आहे. परंतु म्हशीचे लोणी जास्त महाग आहे त्यामुळे त्यात म्हशीच्या लोण्याची मात्रा (असली तर कमी असेल). बाकी पात्रा साहेबांचा इतर आरोप हा पूर्वग्रह दूषित असल्याचे आढळते
The distinction of the source of milk is important and has far-reaching ramifications on health.According to Keith Woodford, professor of farm management and agribusiness at Lincoln University in New Zealand and author of Devil in the Milk: Illness, Health and Politics of A1 and A2 Milk, there is a clear link between the milk we drink and a range of serious illnesses such as diabetes, heart disease, autism and schizophrenia. Woodford asserts that mixed breed cows, such as jersey cows, contain the A1 beta-casein, which triggers an adverse reaction in the human body when digested. On the other hand, the milk of many herds of Asia (including local Indian pure breed cows such as the Bos indicus) contain A2 protein—which is safer for human consumption.
यात प्रथिन कोणते आहे याचा उहापोह आहे परंतु मुळात तुपामध्ये प्रथिन हे नसतेच त्यामुळे या मुद्द्याला तसा काहीच अर्थ नाही
बाकी पतंजलीची काही उत्पादने चांगली आहेत काही ठीक ठाक.
मूळ सुरुवातीला त्यांनी विपणन( जाहिरातींवर) होणार अव्वाच्या सव्वा खर्च (उलाढालीच्या ३० %) टाळून बाजारात आपले बस्तान बसवले आणि आता लोकांना उत्पादने चांगली आहेत म्हणून साघेत आहेत तर खप वाढवायला त्यांनी जाहिराती करणे चालू केले आहे

राबांची टूथपेस्ट आवडली. खरंतर फारच आवडली.
त्यांचा शांपू एकदाच वापरलाय पण खास काही वाटला नाही.
ग्राहकपेठेत राबांच्या उत्पादनांसाठी वेगळा विभाग आहे.
त्यातील कणिक नेहमी संपलेली असते.
ज्यूसेसपैकी दोन प्रकार अवडले पण कोणते ते आता आठवत नाही.
दोनच ट्राय केल्याने बाकीच्यांबद्दल मत नाही.

II श्रीमंत पेशवे II's picture

9 Aug 2017 - 12:20 pm | II श्रीमंत पेशवे II

सर्वात अगोदर पतंजली ची उत्पादने आणि त्यांची लोकप्रियता लक्षात घेता त्यांनी राबवलेली वितरण प्रणाली आणि मोक्याची बाजारपेठ याचं कौतुक कराव तेवढ कमी आहे.
आयुर्वेदिक औषधांमध्ये बरेच वेळेस कालबाह्य तारीख हि जास्त असते पण , वितरणाच्या वेळी होणारी हेळसांड ( हंड्लिंग) मुळे काहीवेळेस हवाबंद असणारे डबे हे खराब होतात , त्यातूनच उत्पादन खराब व्हायला सुरुवात होते.

शांत पणे विचार केला तर वितरण या एकच विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे कि त्याचच आश्चर्य वाटत , खूप कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना उत्पादन कस पोचेल असा विचार करता , एकट्या उत्तराखंड मध्ये असणाऱ्या कारखान्यातून देशभर सर्व उत्पादने वितरीत करणे केवळ अशक्य आहे

म्हणून कहि नाशिवंत ( लवकर खराब होणारी ) उत्पादनासाठी , सहकार्य पद्धत - करार कार्य केले जाते आणि पतंजली ला जे उद्योजक सहमत आहेत ते उद्योजक हे करार कार्य करतात ( अर्थात ५० टक्के हेतू साध्य होतो आणि शेवटी मेरा क्या ? ) मुळे आपली पोळी त्यातच भाजता यावी या हेतूने उत्पादनाचे गुणवत्ता धोरण धाब्यावर बसवून , ग्राहकाना कमी गुणवत्तेचा माल विकला जातो , देशाच्या एका कोपर्यात बसून गुणवत्ते वर मेहर नजर ठेवणे अतिशय कठीण काम आहे.

तरीही फक्त आणि फक्त बाबा रामदेव , त्यांची उद्दिष्टे , हेतू ,त्याचं आतापर्यंत कार्य आणि देशभक्ती काही टक्के का होईना देशातील लोकांनी देशातील उत्पादनास प्रधान्य देऊन देशाला मोठ कराव हि भावना या मुळेच त्यांनी सुरु केलेल्या छोट्या प्रयत्नांना यश मिळत गेलं आणि तेही कल्पने पलीकडे .
वरती नमूद केलेल्या उत्पादनात काही उत्पादने कि खरोकर खूप चांगली आहेत , परंतु आपली एक पिढी कोलगेट , लक्स ,पोमोलीव, डव्ह , फेअर & लवली , अशा अनेक उत्पादनांची जाहिरात जन्माला आल्या पासून पाहत आलोय म्हणून ति उत्पादने चांगली नसून चांगली भासवली गेली आणि ति मुकाट्याने वापरून आपण ते आपल्या आनग्व्ल्नी पाडून घेतली.
आता अचानक गुळाचा चहा प्या अस सांगितल तर आपले हावभाव कसे होतील ? पण पूर्वी जेव्हा कधी आपल्या घरात पहिल्यांदा चहा पूड आणून चहा करायला सुरुवात झाली तेव्हा त्यात गुळच वापरत होते , नंतर वापरण्यास सोपी ( महा घातक ) साखर आली आणि चित्र बदललं

तसच आहे आतापर्यंत वापरत असलेली एखाद्या ब्रान्ड ची वस्तू अचानक बदलली तर ति आपलीशी व्हायला वेळ तर लागणारच

वरती गायीच्या तुपाचा मुद्दा आला ?

किती गायी आहेत भारतात ? किती लिटर दुध देतात ? त्यापासून किती ( पारंपारिक पद्धतीने - दही , ताक , लोणी मिळते ? ) फुल क्रीम काढून किती तूप बनेल ते वेगळ ! यांची आकडेवारी पाहिली तर आज भारतात दर १०० माणसा मागे एक गाय आहे
त्यापासून तयार होणारे तूप , विकत घेणारे ग्राहक याची आकडेवारी काढली x याच्या विरुद्ध किती ब्रांड पहिला मिळतात , महाराष्ट्रात / गुजरात मध्ये अमूल ,सागर, चितळे , वारणा, कृष्णा , कान्हा , गोवर्धन , वगैरे २०० च्या वर डेअऱ्या तूप विक्री साठी चढाओढ करीत आहेत देश भरात तर असंख्य लोकं तूप विकत आहेत.

देशी गाय - तीच दुध - ( सरासरी ४-६ लिटर दिवसाला ) त्यापासून तूप बनवायचं म्हटल तर जेमतेम १ किलो ते दीड किलो तूप बनू शकते

मग एवढ तूप आलं कुठून ???/ कि गायी अचानक दुधा ऐवजी तूप द्यायला लागल्यायत ??

भेसळ ,,,,,,,,,,,,,, भेसळ .........भेसळ या शिवाय इतक तूप बाजारात दिसूच शकत नाही.

त्यामुळे बाबा रामदेव नि तूप बाजारात आणलं तरी पतंजली साठी काम करणारी सहकारी डेअरी ते किती शुद्ध बनवेल ?? हा प्रश्न आहेच

हीच गोष्ट मधाची ......... खर मध कोणत ? डाबर देतो ते कि पतंजली देतो ते .......?

दुधा तुपाच ठीक आहे ते लिटर मध्ये मिळत ? पण मधाच काय ??
माश्या पोळी तयार करतात त्यातून काय एका वेळेस ५ लिटर मध मिळत नाही , आणि माश्या जिथे जंगल आहे , फुलझाडे आहेत अशाच ठिकाणी मध साठवतात
मग शहरातल्या प्रत्येक केमिस्ट वाल्या पासून ते गल्लीतल्या छोट्यात छोट्या किराणा माल वाल्याकडे मधाची बाटली सापडते ........ एवढ मध तयार करायला काय जादू आहे का यांच्या कडे ?

अशा अनेक गोष्टी आहेत कि लोकसंख्या आणि त्यांना पुरेल इतके विशिष्ट अन्न पदार्थ हे हे संख्येचा तफावतीचा विचार न करता , केवळ उपलब्ध आहेत म्हणून आपण घेतो वापरतो आणि त्यालाच प्रमाण मानून चालत असतो. त्यामागचा उत्पादनाचे खटाटोप , वेळ ,अवधी याचा आपण विचा करत नाही.

मी ओघात बरेच लिहून टाकले आणि मूळ मुद्दा बाजूला राहिला

रामदेव व पतंजलीच्या प्रोडक्ट्स आपले मत काय आहे?

पतंजली ने कर लो दुनिया मुठ्ठी मे ची प्रतिज्ञा केली आहे , जमतील ते सगळे उद्योग करायचा विडा उचलला आहे.
पण सहकार पद्धतीने ब्रांड चा वापर करून एखादी गोष्ट दुसर्याला बनवायला सांगून ति त्या भागात उपलब्ध करून देणे या मुळे काही उत्पादने हि गुणवत्ते पासून लांब राहत आहेत

काही उत्पादने खरच छान आहेत , पण ओरीजनल कोणते आणि मिळावट वाले कोणते हे सर्व सामान्यांना ओळखता येत नाहीत त्यामुळे सुक्याबरोबर ओले पण जळते आहे. त्यातून अनेक कुशंका / प्रश्न उत्पन्न होत आहेत.

वर्षोनुवर्षे भेसळ युक्त प्रसाधने वापरल्या मुळे चांगली कोणती यात गफलत होते आणि चांगली घाण वाटतात ,

योगेश बोरोले ने छान लिहिले आहे

सौरा - यांनी लिहिल्या प्रमाणे खायच्या वस्तू टाळल्या तर बाकी प्रसाधने छान आहेत

अंगाचे साबण , औषधे जे मदर प्लांट मध्ये तयार होते , ति उत्पादने उत्कृष्ट आहेत.

नितिन थत्ते's picture

10 Aug 2017 - 1:28 pm | नितिन थत्ते

>>देशी गाय - तीच दुध - ( सरासरी ४-६ लिटर दिवसाला ) त्यापासून तूप बनवायचं म्हटल तर जेमतेम १ किलो ते दीड किलो तूप बनू शकते

गायीच्या दुधात ३.५ टक्के फॅट असते.

त्या हिशोबाने ४ ते ६ लीटर दुधातून १४० ते २१० ग्रॅम तूप मिळू शकते. (म्हशीच्या १० लिटर दुधातून ६०० ग्रॅम तूप मिळू शकते.

बाकी धागा रोचक आहे.

वरुण मोहिते's picture

9 Aug 2017 - 12:27 pm | वरुण मोहिते

आणि स्टॅंडर्ड राखणाऱ्या बाहेरच्या कंपन्या ह्याचे पहा . मग पुढे बोलू .सगळ्या गोष्टी आउटसोर्स आहेत . त्यात पतंजली चा संबंध नाही आहे . ब्रँड नेम महत्वाचे .

@ कंजूस

( गंमत अशी आहे की तूप अन गायीची चरबि यांची केमिकल टेस्ट एकच येते म्हणतात!!)

हे आपण कोठे वाचले ? याबद्द्ल थोडे सविस्तर लिहा. वाचायला आवडेल.

तूप अन गायीची चरबि यांची केमिकल टेस्ट एकच येते या विधानावरून असे वाटते कि तथाकथित शाकाहारीचे कट्टर पुरस्कर्ते शाकाहार व मांसाहारातील तफावत पुर्णपणे नाहीशी करण्यासाठी झटत आहे कि काय ??? सामिष शाकाहारी माणुस यावर काय म्हणेल ???? जेव्हा गायमांस भक्षणाच्या संशयावरुन एका भारतीय वायुसेनेतील जवानाच्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्या झाली आहे, तेव्हां गायीची चरबि व गायीचे तुप यावर सरकाने स्पष्टीकरण द्यावे असे मला वाटते.

तूप अन गायीची चरबि एकाच पातळीवर आणुन ठेवणे फार किळसवाणे वाटते.

*********************************************************************************

मग एवढ तूप आलं कुठून ???/ कि गायी अचानक दुधा ऐवजी तूप द्यायला लागल्यायत ??

पुर्णपणे सहमत

आयुर्वेद तुप व साजुक तुप याला एकाच प्रकारचे मानते काय ?

आयुर्वेद गायीचे तुप व इतर तुप याला एकाच प्रकारचे मानते काय ?

पतंजली दोन प्रकारचे तुप विकते.
१. COW'S GHEE व २. COW'S DESI GHEE
COW'S DESI GHEE व DESI COW'S GHEE यात फरक काय ?

कोणत्या प्रकारे तुप निर्माण केले गेले फुल क्रीम कि परंपरागत पध्दत यावर उत्पादक काहिच बोलत नाहि, उत्पादक फक्त गायीचे तुप / म्हशीचे तुप या प्रकारचे तुप महाराष्ट्रात विकले जाते.

दुधाची उपलब्धता जर विपुल प्रमाणात असती तर भेसळिचे दुध बेमालुमपणे विकले गेले नसते, तुपाबद्द्ल काय बोलायचे ???

बाजारातले तूप गोलमाल वाटते- म्हणून मी गायीच्या दुधाचे लोणी आणून घरी तूप बनवणे पसंत करतो!

II श्रीमंत पेशवे II's picture

9 Aug 2017 - 4:30 pm | II श्रीमंत पेशवे II

हे सर्वात बेश्ट ............
जे काय होईल ते आपल्या समोर .......

@ II श्रीमंत पेशवे II सविस्तर प्रतिसाद आवडला.

"तूप /चरबीची तपासणी अथवा अन्या खाद्यपदार्थाची तपासणी"

एक उदा० समुद्राच्या पाण्याचे मीठ, काही खाणींमधले मीठ,काळे मीठ,लवण वगैरे यामध्ये सोडिअम क्लोराइडचे प्रमाण वेगळे आढळते. खाणीतल्या मिठात मंग्नेसिअम कमी असते. एकूण मीठ हे सोडिअम क्लोराइडसह इतर क्षारांचे मिश्रण असते.

२)तूप तेले ही अशीच मिश्रणे आहेत. म्हशीच्या दुधात सहा ते आठ कार्बन साखळीची संयुगे अधिक असतात तर चारवाली कमी असतात. गायीच्या दुधात उलट असते. लहान साखळीची संयुगे लगेच पचतात. हेच गुणोत्तर तुपात परावर्तीत होते. नक्की काय मिश्रण म्हणजे अमुकच वस्तू असे नाही.
३) केमिकल टेस्ट दोन्हित एकच उत्तर देत असेल तर कसा निर्णय देणार हा प्रश्न राहतो.
४)अजून एक उदाहरण - नैसर्गिक लॅटेक्स रबरातले ९८% संयुग कृत्रिम रबरात असतात तरीही ते उरलेले दोन टक्के फार मोठा फरक करतात गुणधर्मात. आता ९८ -१०० मध्ये फारसा फरक नाही पण विमानाचे टायरला फरक पडतो. लॅटेक्सचा तापला जलद तरी फाटत नाही. किंमत मोजावी लागते

जेम्स वांड's picture

10 Aug 2017 - 4:05 pm | जेम्स वांड

पतंजलीच्या प्रॉडक्ट्स संबंधी निर्णय अन सगळे मिठाच्या चिमटी सोबत घ्यावे, ह्याला सहमत आहे, पण 'कारवान मासिक' परातभर मिठासोबतच घ्यावं, कारवान सुद्धा डाव्या विचारांचेच मासिक आहे असे वाटते.

योगेश लक्ष्मण बोरोले यांची प्रतिक्रिया एकदम पटली . मलापण त्यांची प्रोडक्ट्स फ्राॅड वगैरे वाटत नाहीत जी काही उत्पादन वापरली आहेत ती चांगली आहेत

विवेकपटाईत's picture

12 Aug 2017 - 1:32 pm | विवेकपटाईत

स्पष्ट आहे लेखकाला पतंजली बाबत काही हि माहिती नाही. बहुतेक पतंजली म्हणजे बाबाजी या पलीकडची उडी नाही. पतंजली फूड पार्क इथली प्रयोगशाळा उत्तर भारतातील सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. वस्तू नव्हे तर पेकिंग साठी वापरणाऱ्या वस्तू हि इथे टेस्ट. होतात. कुठल्याही खाद्य क्षेत्रात कार्यरत कुठल्याही संस्थे जवळ एवढी मोठी प्रयोगशाळा नाही. सरकारी संस्थान्जवल ही नहीं.
१. पतंजलीचा कुठलाही प्रोडक्ट गुणवत्तेच्या आधारावर बाद झालेला नाही आणि बाजारातून कधीच परत केला गेला नाही. तकनिकी आधारावर काही आक्षेप राजकीय दबावमुळे आले पण पदार्थावर कधीच टिप्पणी झाली नाही आहे. अधिकांश आक्षेप misleading प्रचारावर आहे. (आयुर्वेदिक पदार्थांना अजून औषधी दर्जा नाही). ( विको वर हि असेच आरोप झाले होते. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी शेवटी केस जिंकली. त्यांच्या प्रगती वर ब्रेक मारण्यात त्यावेळी mncच्या इशार्यावर आणि भ्रष्ट नौकरशाही यशस्वी झाली होती. बहुतेक 'अभिजित' दिवाळी अंकात विकोच्या मालकाचा या विषयावर लेख वाचला होता )

५०० कोटी खर्च करून आयुर्वेदिक रिसर्च केंद्र बांधण्यात आले आहे. आज ३०० scientist तिथे कार्य करत आहे. १५० कोटीहून जास्त प्रतिवर्ष खर्च आहे.
२. पतंजलीचे गायीचे तूप १०० टक्के शुद्ध आहे. कुठलेही कार्य सुरु करण्याआधी पूर्ण सर्वे केल्या जातो. गाईच्या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी पूर्ण देशातून ५००० हून जास्त नमुने घेतले. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळ नाडू आणि केरला इथले ८५ ते ९५ टक्के नमुने शुद्ध होते. पतंजली साठी मख्खन कर्णाटक मिल्क को. आणि महाराष्ट्र तामिळनाडू आणि केरला येथील संस्था पाठवितात.
३. पतंजलीचे मध १०० टक्के शुद्ध आहे, आता लोकांना भेसळ खायची सवय आहे तर त्याला कुणी काही करू शकत नाही.

४. बाकी कुठल्याही खाद्य प्रसंस्करण मध्ये कार्यरत अधिकार्याला विचारा, तोच तुम्हाला सांगेल समान गुणवत्तेची वस्तू पतंजली १००रुपयात देत असेल तर दुसरी १३०च्या खाली देऊ शकत नाही. कारण मालकाला किमान २० टक्के नफा पाहिजे, प्रचारावर २० टक्के आणखीन. पतन्जलीचा प्रचारावर खर्च अडीच टक्के गेल्यावर्षी होता आणि लाभांश फक्त ५ टक्के आणि १०० एक उत्पादने बिना लाभ हानीचे.

५. आजच घरी डोक्याला लावणारे तेल तपासून बघा. बहुतेक आपण पामोलीन आणि पेट्रोलियम पदार्थ महागात विकत घेऊन डोक्यावर लावत असल.

६. बाकी हरिद्वार फूड प्रोसिसिंग प्लांटची क्षमता २५००० टन आहे जी देशात सर्वात जास्त आहे. आसामची १५००० हजार टन ( फ़क्त ३ महिन्यात जंगला पासून एक प्लांट तिथे सुरु झाला, त्याचा आकार पाहिल्यावर अमेरिकेत ही हे संभव झाले नसते, ते भारतीय आणि असामी ठेकेदार आणि मजूरानी करून दाखविले). नागपुर, नॉएडा , विशाखापत्तनम, इंदौर, इत्यादी पुढील २ वर्षांत १ लाख टन फ़ूड प्रोसेस पतंजलि करेल. (टीवी वर उदघाटनचे चित्र बघितले होते. नोव. मध्ये शिल्यान्यास आणि मार्च शेवटी उत्पादन सुरु).

७. पतंजलीचा कुठलाही पदार्थ बाहेर बनत नाही. फक्त पतंजली ग्रामोद्योगचे (पापड इत्यादी सोडून).
८. बाकी mncच्या कुठल्याही कंपनी जवळ एवठे मोठे प्लांट आहेच नाही.

शेवटी पतंजलिचे रसायन विहिरीत डबल फ़िल्टर तेल रिफाईन्द तेल पेक्षा निश्चित चांगले. गेल्या ३ महिन्यांपासून वापरतो आहे. मी स्वत: उपभोक्ता मंत्रालयात १६ वर्षे कार्य केले आहे. कुठला ही पदार्थ आत काय आहे हे वाचल्याशिवाय घेत नहीं.

शेवटी भारताचा पैसा भारतात राहणार आणि समाजाच्या विकासाच्या साठी खर्च होणार. प्रत्यक्ष होतो आहे स्वत: खात्री करू शकतात.

आसाममध्ये जंगल तोडून बनवलेला अवाढव्य प्लांट (तसा असेल तर) हा चिंताजनक भाग सोडून उरलेला प्रचंड हास्यास्पद आणि भाभडा प्रतिसाद. अशा प्रतिसादातून दिसणार्‍या भक्तीतच बाबांचे व्यावसायीक यश दडलेले आहे.

arunjoshi123's picture

12 Aug 2017 - 5:56 pm | arunjoshi123

का म्हणे?

विवेकपटाईत's picture

15 Aug 2017 - 10:00 am | विवेकपटाईत

प्रिय अभ्या तुमच्या ज्ञानाची कीव येते. मुद्देसूद प्रतिसादाला उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यास प्रतिसादाला बगल देणे आणि दुसर्याची खिल्ली उडविण्याचा प्रकार करणार्याला काय म्हणावे. बाकी प्रतिसाद देण्याआधी माहिती मिळवली पाहिजे तसे न करता बिना माहितीचा प्रतिसाद देतात. "आसाममध्ये जंगल तोडून बनवलेला अवाढव्य प्लांट (तसा असेल तर)" तुमचे अज्ञान प्रगट करते.

व्हाटसाप्प वर शोभेल असा प्रतिसाद . असो.

“भारतातील पैसा भारतात राहील” ह्या बिन डोक जाहिरातीवर विश्वास ठेवणे सोडा. अर्थशास्त्राची माहिती नसणार्या जनतेला फसवण्यासाठी अशा युक्त्या वापरल्या जातात.
“प्रोटेक्शनिस्म” चा अर्थव्यवस्थेला फायदा होत नसून उलट तोटाच होत असतो . सर्वात जास्त तोटा हा “डोमेस्टिक” उपभोक्त्यांना होत असतो.

वाचा "Comparative advantage".
ह्यामुळे संशोधनास खीळ बसते आणि “Consumer Surplus” घटतो.

Overall, economics tells us that the benefits of trade are greater than the costs for economies as a whole, so that the winners could conceivably compensate the losers and still be better off.

अधिक वाचनासाठी.
What’s so bad about protectionism?

If Free Trade Is Bad, Protectionism Is Far Worse!

अजून , बाबा रामदेव ज्या उत्पादनावर टीका करतात त्यातील बरीच उत्पादने भारतात तयार होतात, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फायदाच होतो.

गामा पैलवान's picture

14 Aug 2017 - 12:28 pm | गामा पैलवान

बार्नी,

कंप्यारेटिव्ह आडव्हांटेज थियरी च्या दुव्याविषयी धन्यवाद. वरवर चाळला तेव्हा हे सापडलं :

David Ricardo developed the classical theory of comparative advantage in 1817 to explain why countries engage in international trade even when one country's workers are more efficient at producing every single good than workers in other countries. He demonstrated that if two countries capable of producing two commodities engage in the free market, then each country will increase its overall consumption by exporting the good for which it has a comparative advantage while importing the other good, provided that there exist differences in labor productivity between both countries.

हाच न्याय पतंजलीच्या उत्पादनांना लावूया. जेव्हा ही उत्पादने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या देशांत निर्यात होऊ लागतील, तेव्हा आणि फक्त तेव्हाच बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात उत्पादने विकायची परवानगी देण्यात यावी. आधीपासून नको. आगोदर भारतातल्या भारतात पतंजलीची उत्पादने जोर धरू द्यावीत.

आ.न.,
-गा.पै.

पतंजलीचे मध १०० टक्के शुद्ध आहे, आता लोकांना भेसळ खायची सवय आहे तर त्याला कुणी काही करू शकत नाही.

काका काय वाट्टेल ते बोलताय आता मात्र तुम्ही..
पतंजलीचा मध भिकार आहे हे आमचे इतर कंपन्यांचे तसेच प्रत्यक्ष रानातून काढून आणलेला मध वापरून मग पतंजलीचा मध वापरल्यानंतर झालेले मत आहे. भेसळ खायची सवय वगैरे फालतू मुद्दे सोडा. इथेच बघा किती लोकांना मध आवडलाय ते.

विनिता००२'s picture

12 Aug 2017 - 1:52 pm | विनिता००२

पतंजलीची बरीच उत्पादने वापरतेय. मस्त आहेत. मला तरी आवडतात.

चमचाभर मध पाण्यात घालुन बघावा. विरघ़ळला तर फ्रॉड मध आहे समजावे. पतंजलीचा अगदी व्यवस्थित विरघळतो. डाबरचा थोडा विरघळतो बराचसा तसाच रहातो. एका मित्राबरोबर न्युझीलंडवरून मागवला होता. अगदी जसाच्या तसा राहतो तो मध पाण्यात टाकल्यास. सो जर कोणी सगा सोयरा येणार असेल फारीनहून तर त्याच्याबरोबर मागवावा मध. चांगला मिळण्याचा चांस वाढतो.

मीच एकटा बाहेर पडलेला,

ढेरे साहेब, भारतीय काही असलं ऑप्शन तर सुचवा की हो.

आम्ही लहान असताना आजोबा उत्तर प्रदेश ग्रामोद्योग महामंडळ का खादी मंडळाचे मध आणत असत,

'कैलाश ग्लोरी' का काय नाव मधाचं, आजकाल मिळतो का नाही कोणास ठाऊक, अन तेव्हा तरी शुद्ध होता की नाही देव जाणे

अनुप ढेरे's picture

14 Aug 2017 - 11:20 am | अनुप ढेरे

मिपाकरांच्या वार्‍या होत असतात की! मागवा की!

जेम्स वांड's picture

14 Aug 2017 - 2:28 pm | जेम्स वांड

मिपाकरांपैकी कोणी मित्र नाहीत, भविष्यात होतील असे वाटतही नाही. त्यामुळं शुद्ध मधाला ह्या पर्यायाने तरी आम्ही मोतादच राहू, असो, दुसरे काही मार्ग असल्यास तपासूच, तुमचे आभार.

अनुप ढेरे's picture

14 Aug 2017 - 2:56 pm | अनुप ढेरे

खाली मुनिवर्य म्हणतात तो पर्याय ट्राय करा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Aug 2017 - 2:16 pm | हतोळकरांचा प्रसाद

सातमहाचा वापरून बघा, बहुतेक सगळ्या मेडिकल्स मध्ये मिळतो.

महाराष्ट्र शासनाचाही मिळतो ना?
ग्रामोद्योगाच्या दुकानात मिळतो तो आम्ही आणायचो.

कपिलमुनी's picture

13 Aug 2017 - 6:37 pm | कपिलमुनी

महाबळेश्वर च्या केंद्रामधून किंवा शिवाजीनगर सरकारी केंद्रामधून घ्यावा

अनुप ढेरे's picture

14 Aug 2017 - 10:37 am | अनुप ढेरे

हे केंद्र पाहिलं आहे. ट्राय करायचय अजून.

मधाबद्दल अंधश्रद्द्धा पसरवणे बंद करा अनुपजी.

मनिमौ's picture

14 Aug 2017 - 10:07 am | मनिमौ

आले होते

सतिश गावडे's picture

14 Aug 2017 - 12:06 pm | सतिश गावडे

पतंजली हा FMCG क्षेत्रातील इतर उद्योगाप्रमाणे एक उद्योग आहे. त्यात स्वदेशी आणि देशप्रेम वगैरे पाहणे हा भाबडेपणा आहे.

ज्यांना पतंजलीची उत्पादने आवडतात ते ती घेतील. ज्यांना नाही आवडत किंवा उत्पादनांमध्ये भेसळ असते असे वाटते त्यानी ती घेऊ नयेत. हाकानाका.

पैसा's picture

15 Aug 2017 - 11:02 am | पैसा

सहमत आहे. शिवाय ते मार्केटमधे स्पर्धा करत आहेत. मोनोपॉली होईल असे संरक्षण वगैरे सरकारकडे थेट मागितल्याचे कुठे वाचले नाही. लोकांच्या भावनांना हात घालून जाहिरात करणे हे नियमबाह्य समजले जात नसावे. निव्वळ भावनांवर आधारित ग्राहक एकदा मिळतील पण ते दीर्घ मुदतीत टिकवायचे असतील तर भारतात तरी सतत विनाव्यत्यय पुरवठा, चांगला दर्जा आणि स्पर्धकांपेक्षा कमी किंमती हे सातत्याने देत रहावे लागेल.

निव्वळ भावनांवर आधारित ग्राहक एकदा मिळतील पण ते दीर्घ मुदतीत टिकवायचे असतील तर भारतात तरी सतत विनाव्यत्यय पुरवठा, चांगला दर्जा आणि स्पर्धकांपेक्षा कमी किंमती हे सातत्याने देत रहावे लागेल.

किती योग्य शब्दात मांडलसं पैसा ताई..

डँबिस००७'s picture

14 Aug 2017 - 12:41 pm | डँबिस००७

रामदेव बाबाची दंतकांती टुथपेस्ट वापरण्या ऐवजी कोलगेट वेदशक्ती टुथपेस्ट वापरा !

५००० वर्षांच्या संशोधनाने बनवलेली आहे १

एस's picture

14 Aug 2017 - 1:25 pm | एस

पुण्यातला 'सातमहा' ब्रँडचा मध अतिशय उत्तम आहे. मिक्स फुलांचा मिळतोच, शिवाय फक्त शेवग्याच्या फुलांचा, कारवीचा, जांभूळ फुलांचा, हिरड्याचा इत्यादी प्रकारचा मधही मिळतो. खूप छान चव असते वेगवेगळ्या प्रकारांची.

रामदेव बाबांचे मीठ म्हणे 'प्राचीन हिमालयन रॉक बेड्स मधून काढलेले आहे' अन त्या पाकिटावर एक्सपायरी डेट आहे, म्हणजे एकंदरीत बाबांनी बरोबर अब्जावधी वर्षांनंतर एकदम एक्सपायर व्हायच्या आधीच, ते मीठ खोदून काढले आहे बहुतेक

असा काहीसा आशय होता त्या मॅसेजचा :D