adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

कोंबडी प्रेमी's picture
कोंबडी प्रेमी in काथ्याकूट
21 Jul 2017 - 5:47 pm
गाभा: 

https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU

हि एक लिंक पाहिली.

ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत

मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे

ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??

एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”

अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.

मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?

मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)

तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....

समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..

प्रतिक्रिया

कशाला बघता? उगाच डेटा वाया जातो. हे सोडून बरेच काही वाचनीय ,श्रवणीय ,प्रेक्षणीय आहे जगात!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2017 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जगात खुप घडामोडी आहेत, तिथेच कशाला अटकायचं. विषय संपवून टाकायचा. मला वाट्सपवर अनेकदा प्रवचन येत असतं. काहीही न म्हणता डिलीट करून मोकळा होता. लोक ते आपल्या गळी उतरवतात, काही बोलायला जावं तर हमरी तुमरी वर येतात. अवघड झालंय.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

21 Jul 2017 - 6:54 pm | पैसा

पांडुरंग पांडुरंग

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

21 Jul 2017 - 9:59 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

या मॅडम मुलींना म्हणतात ,चंद्रावर जा पण भाकरी करता आली पाहीजे.
एक बाई असून पुरुषसत्ताक व्यवस्थेला प्रोत्साहन देताना या बाईंना लाज वाटली पाहीजे.

एक बाई असून पुरुषसत्ताक व्यवस्थेला प्रोत्साहन देताना

काय हो, बायकांची पुरुषांशी अशी कोणती पुरानी दुश्मनी आहे जे त्यांनी पुरुषांच्या व्यवस्थेचा पाडाव करावा?
उद्या मुलांच्या संघाविरुद्ध मुलींचा अशा खेळात अपवाद म्हणून एक गडी म्हणून तुम्हाला मुलांच्या टिममधे टाकले तर ते हारावेत असे तुम्ही खेळणार का?

गामा पैलवान's picture

22 Jul 2017 - 2:18 am | गामा पैलवान

कोंबडीप्रेमी,

तुम्ही म्हणता तसं आईचं म्हणून ऐका असं काही दिसलं नाही या चलचित्रात. बहुधा दुसरीकडे असेल. मात्र ३ मिनिटं २० सेकंदांनी एक अत्याधुनिक क्रांतिकारी घोषणा करतात. त्या म्हणतात की माझ्या वयाच्या (=म्हाताऱ्या) एकही बाईने देवीकडे अहेवपणी मरण मागायची प्रार्थना करायची नाही. कारण हल्ली वृद्धाश्रमात पुरुषांची संख्या कमालीची वाढती आहे. घरचं करायला सासू चालते, पण सासरा चालंत नाही. काळानुसार मागणं बदलण्याचा लवचिकपणा रामतीर्थकर बाईंत आहे.

बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला वगैरे ठेवले गेले वगैरे सरळसरळ स्त्रीमुक्तीचं थोतांड आहे.

आ.न.,
-गा.पै.

बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला वगैरे ठेवले गेले वगैरे सरळसरळ स्त्रीमुक्तीचं थोतांड आहे.

"वंचित" हा शब्द पण लिहा हो.

कोंबडी प्रेमी's picture

22 Jul 2017 - 10:06 pm | कोंबडी प्रेमी

त्यांचा तो अहेवपणा चा मुद्दा पटला ...

अस बघा कि त्यांचे निरीक्षण कदाचित खरे असतीलही (माझ्या बघण्यात नाही म्हणून 'कदाचित' हा शब्द) तथापि त्या जे निष्कर्ष मांडत आहेत आणि जे उपाय सांगत आहेट ते, खाली पिलियन रायडर म्हणताहेत त्याप्रमाणे, प्रश्न सोडवणारे वाटत नाहीत.

स्त्रीला मुग गिळून, माजघरात परत पाठवण्याची त्यांची मानसिकता दिसते.

आपण समाजकार्य करतो म्हणजे आपल्याला काही विशेष अधिकार आहेत आणि मी म्हणेन तेच बरोबर ते विनातक्रार ऐका प्रश्न विचारू नका हा आग्रह चुकीचा आहे ..

बाय ड वे : मी त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप्स ऐकून धागा टाकलाय ..एक दीड तास त्यांना ऐकणे शक्य नाही

स्त्रीला मुग गिळून, माजघरात परत पाठवण्याची त्यांची मानसिकता दिसते.

मी किति गावचं पाणी प्यालेय, किती जणांना जाउन किती जणांना समजावते चे किस्से त्या सांगत होत्या तेव्हा तुमचा ऑडिओ म्यूट झाला होता का?

मी त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप्स ऐकून धागा टाकलाय ..एक दीड तास त्यांना ऐकणे शक्य नाही

त्यांचे १-७ व्हिडिओ आहेत. सगळे नीट ऐका नि मग धागा काढा. त्यांना काय म्हणायचं आहे किंवा त्या कशा आहेत याबद्दल तुम्ही अवास्तव घाई करून त्यांच्यावर अन्याय केला आहे.
त्यांचा अप्रोच तो टिपिकल आधुनिक पुरोगामी स्त्रीवादी इ इ नाही, मात्र धार्मिक, पारंपारिक आणि स्त्रीशक्तीवादि आहे. तुम्हाला त्यांचा अप्रोच मान्य नाही म्हणून त्यांच्या विधानांचा अनर्थ केला आहे.

बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला वगैरे ठेवले गेले वगैरे सरळसरळ स्त्रीमुक्तीचं थोतांड आहे.

खाली हे मी अक्षरक्षः सतरा (१७) प्रकारे सांगितलं आहे.

शाली's picture

16 May 2018 - 12:25 pm | शाली

+१

काही वास्तवि कता ---
१. पुर्वी काही प्रमाणात स्त्रियांवर अन्याय झालाही असेल पण आजच्या जमान्यात अन्याय सहन करणारी स्त्रि?
भारत सरकार ची आकडेवारी -- स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्या खुप जास्त आहेत कौटुंबिक कारणामुळे
चांगल्या कमावत्या नवर्याला व सासुला ( सासु सासर्याच्या कमाईने घेतलेल्या) घरातुन बाहेर काढणारी उच्च शिक्षीत स्त्रि मागच्याच महीन्यात बघितली कारण घरात काहीतरी कमी पडले ( त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ) . स्वतः चा अहंकार पोसण्यासाठी पोटच्या लहान मुलांनाही यात सामी ल करुन घेतले जाते इमोशनल ब्लकमेलींग करून. हे फारच दुखःद आहे. बापाविरुध्द भडकावले जाते,त्याच्या पासुन तोडले जाते. पण मुलांच्या बालसुलभ भावनां चे काय?
अजुन भरपुर प्रसंग लिहीता येतील सर्व सामाजिक थरातील - त्यामुळे " समझनेवाले को इशारा काफी है"

२.कोणताही नेता बघा, त्याला कणखर रहावेच लागते, मग नेता स्त्रि असो वा पुरुष. स्वतः घाबरणार्याला कोणीही नेता म्हणुन स्विकारीत नाही. निसर्गानेच पुरुषाला घराबाहेच्या बाबींमध्ये कणखर बनविले आहे. स्त्रि व पुरुषांमधील भावनिक, शारीरीक, मानसिक, रासायनिक फरक आपल्याला माहीत असेल अशी अपेक्षा.

३."काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया"
चला हे आपण पुर्वीच मान्य केले, फार बरे झाले.
जाणिवपुर्वक दुसर्याला त्रास द्यायचा व त्याला सामाजिक प्रतिक्रीया म्हणायचे, वा छान!!

४. प्रश्न अपर्णाताईच्या भाषेचा -- भाषाही रांगडी असते हे ही आपल्याला माहीत असेलच. आपल्या वातावरणावर हे अवलंबुन असते. पण ताईंचा उद्देश्,भावना, तळमळ व विचार यांच्याबद्द्ल त्यांच्या शत्रुलाही खात्री आहे. पुढे आपण डाटा जाळण्यापेक्षा अपर्णाताईंच्या सर्व विचारांचा व्यवस्थित अभ्यास करावा ही नम्र विनंती. (एकाच व्हिडीओ मध्ये सर्व विचार येत नाहीत.)
विचार समजुन घ्यावेत व अंमलात आणावे हे महत्वाचे.

धन्यवाद!

जेम्स वांड's picture

22 Jul 2017 - 12:19 pm | जेम्स वांड

भारत सरकार ची आकडेवारी -- स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्या खुप जास्त आहेत कौटुंबिक कारणामुळे
चांगल्या कमावत्या नवर्याला व सासुला ( सासु सासर्याच्या कमाईने घेतलेल्या) घरातुन बाहेर काढणारी उच्च शिक्षीत स्त्रि मागच्याच महीन्यात बघितली कारण घरात काहीतरी कमी पडले ( त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ) . स्वतः चा अहंकार पोसण्यासाठी पोटच्या लहान मुलांनाही यात सामी ल करुन घेतले जाते इमोशनल ब्लकमेलींग करून. हे फारच दुखःद आहे. बापाविरुध्द भडकावले जाते,त्याच्या पासुन तोडले जाते. पण मुलांच्या बालसुलभ भावनां चे काय?
अजुन भरपुर प्रसंग लिहीता येतील सर्व सामाजिक थरातील - त्यामुळे " समझनेवाले को इशारा काफी है"

आकडेवारी द्या, वैयक्तिक निरीक्षणं नकोयत. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही निरीक्षण वरती मांडले आहे, ते पाहून प्रश्न पडतो, भारत सरकार काय फक्त मध्यमवर्गीय सुखवस्तू लोकांचेच आकडे काढते का ?

थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)

===================

२.कोणताही नेता बघा, त्याला कणखर रहावेच लागते, मग नेता स्त्रि असो वा पुरुष. स्वतः घाबरणार्याला कोणीही नेता म्हणुन स्विकारीत नाही. निसर्गानेच पुरुषाला घराबाहेच्या बाबींमध्ये कणखर बनविले आहे. स्त्रि व पुरुषांमधील भावनिक, शारीरीक, मानसिक, रासायनिक फरक आपल्याला माहीत असेल अशी अपेक्षा.

इथं लष्कर स्त्रियांना लढाऊ पलटणी, लढाऊ वैमानिक , मेडिकल अश्या सगळ्या क्षेत्रांत एंट्री देतंय अन वरचे तुमचेच रीग्रेसीव विचार पहा. निसर्गानेच पुरुषाला 'घराबाहेरच्या' कामांत कणखर बनवल्याचे वैद्यानिक दृष्ट्या सिद्ध करायचं बघा. स्त्री पुरुषांतील शारीरिक मानसिक रासायनिक (?) फरक तुम्हाला तरी नीट माहिती आहेत का ? कारण ते परत एकदा नीट वाचायची गरज तुम्हालाच आहे असे प्रकर्षाने जाणवले.

थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)

==================

मुद्दा क्रमांक ३ लक्षात घ्यायच्याही लेवलचा वाटत नाहीये. अन मुद्दा क्रमांक चार अपर्णाताई ह्यांच्या संवैधानिक हक्कांशी संबंधित आहे, जोवर त्यांची भाषा संसदीय आहे तोवर त्यांना वाटेल त्या स्वरात, वाटेल ते (संसदीय कंटेंट) बोलायचं त्यांना स्वातंत्र्य आहे. कोणी कश्याचा कश्याला अभ्यास करावा हे सांगायची तुम्ही गरज नाही अन तुम्हाला तो हक्कही नाही इतकं (तूर्तास) लक्षात घेतलं तरी पुरे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Jul 2017 - 1:09 pm | हतोळकरांचा प्रसाद

हा

कोणी कश्याचा कश्याला अभ्यास करावा हे सांगायची तुम्ही गरज नाही अन तुम्हाला तो हक्कही नाही इतकं (तूर्तास) लक्षात घेतलं तरी पुरे.

आणि हा

थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)

जरा विरोधाभास होत नाहीये का?

जेम्स वांड's picture

22 Jul 2017 - 2:08 pm | जेम्स वांड

हे तुमचं सगळंच एकंदरीत वांझ शब्दप्रामाण्य होत नाहीये का?

तो डायलॉग पहिले मी कोण ह्यांनी वापरलाय , मी तोच रिपीट केलाय, हे तुम्हाला कळत नसावे का वळत नसावे हातोळकर?

बाकी अगदीच शब्द/कायदा प्रामाण्य पाळायचंच असलं तर वरच्यांनी केलेली पिरपिर कामी येणारी नाही, सरकारी आकडे म्हणून त्यांनी काहीही फेकावं अन आम्ही वाचावं इतकं भोळेपण तुमच्यात असेल आमच्यात नाही, क्षमस्व.

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Jul 2017 - 2:33 pm | हतोळकरांचा प्रसाद

गल्लत होतेय वांडसाहेब! मी वरच्या मतांशी सहमत आहे हा अर्थ तुमचं तुम्हीच काढत आहात! माझा मुद्दा एवढाच होता की एखादी गोष्ट तुम्ही दुसऱ्यांनी करू नये अशी तुमची अपेक्षा आहे ते तुम्हीच करत आहात. नसेल पटत तर सोडून द्या, आणि त्यावर आमची दिलगिरी घ्या!

बाकी त्यांनी त्यांची मते मांडली आहेत त्याला पिरपीर म्हणण्याचं वांझ शब्दप्रामाण्य माझ्यात नक्कीच नाहीये. तुम्ही त्यांना आकडे मागीतलेत, त्यांनी आकडे देईपर्यन्त तुमचाच काय कोणाचाही त्या वक्तव्यावर विश्वास बसणार नाही असे मला वाटते. पण त्यांच्याकडे आकडे असतील तर ते टाकण्याची वाट बघायला हरकत नसावी.

"बरेच बोधामृत पाजतांना दिसतात"
"अक्कल शिकवतात"
" ह्या बाई"

कोंबडी प्रेमी's picture

22 Jul 2017 - 9:49 pm | कोंबडी प्रेमी

ह्यात खटकणार काय आहे ??

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Jul 2017 - 11:44 am | हतोळकरांचा प्रसाद

अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांच्या भाषणांचे केलेले आकलन एवढंच या लेखाचं वर्णन करता येईल. त्यांच्या भाषेवर टीका करताना स्वतःच्या भाषेकडे दुर्लक्ष झालेले दिसते. समाजातील सरसकट स्त्रियांबद्दल त्यांची भाषणे नसतात एवढे समजून घेतले असते तर पटले असते. आज समाजातील एक मध्यमवर्ग साधारणपणे लग्न न जमणे, सासू सुनांचे भांडण, नवरा बायकोतील दुरावा या समस्यांनी ग्रस्त आहे. या समस्या ५० टक्के पुरुष आणि ५० टक्के स्त्रिया यांमुळे होत असतील असं गृहीत धरलं तरी त्या ५० टक्के प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करत असतील तर वाईट काय त्यात? त्यांच्या कार्याची माहिती घ्यायला हरकत नसावी, अनेक जोडप्यांचे संसार सुरळीत करण्याचे "पातक" आहे त्यांच्या नावावर. अनेक जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांना घटस्फोटापासून प्रवृत्त करण्याचे काम दुर्लक्ष करण्याजोगे आहे काय?

एक स्त्री असून त्या स्त्रियांवर बोट ठेवत ठेवतात म्हणून त्या टीकेच्या धनी ठरत असाव्यात पण स्त्री असून पुरुषावर टीका केली तरी स्त्रीवादी म्हणून टीका झालीच असती म्हणा! काही मते आत्यंतिक वाटली तरी मतितार्थ लक्षात घेऊन अशी मते दुर्लक्ष करणे मी वैयक्तिकरित्या पसंत करेन!

अभ्या..'s picture

22 Jul 2017 - 12:09 pm | अभ्या..

वेल सेड प्रसादराव,
तुमच्या तटस्थ, सुजाण भूमिकेचे अन मुद्देसूद प्रतिसादाचे कौतुक वाटते.
किपीटप.

नगरीनिरंजन's picture

22 Jul 2017 - 1:40 pm | नगरीनिरंजन

ह्या बाई तुमच्या टीकेला पात्र असतीलही कदाचित; पण समाजात आज ज्यांच्यावर भावनिक व कधीकधी शारीरिक अत्याचारही होतात असे मध्यमवर्गीय पुरुष आहेत हे आपण मान्य करणार की नाही हा खरा प्रश्न आहे. स्त्रियांबद्दलचे स्टिरिओटाईप दूर करताना पुरुषांबद्दलचेही पूर्वग्रह दूर करणार की नाही?
स्त्रियांवर पूर्वी अन्याय झाला व काहींवर अजूनही होतो हे मान्य; परंतु अन्याय झालेल्या स्त्रियाही वेगळ्या आणि अन्याय करणारे पुरुषही वेगळे. त्यांच्या नावाखाली स्वतःला कसलीही तोशीस न पडलेल्या भलत्याच स्त्रिया मिळालेल्या प्रिव्हिलेजेसचा गैरवापर करत आहेत हे सत्य आहे की नाही?

जेम्स वांड's picture

22 Jul 2017 - 2:12 pm | जेम्स वांड

त्यांच्या नावाखाली स्वतःला कसलीही तोशीस न पडलेल्या भलत्याच स्त्रिया मिळालेल्या प्रिव्हिलेजेसचा गैरवापर करत आहेत हे सत्य आहे की नाही?

चार दोन उदाहरणं द्या की हातासारशी, तुमचा मुद्दा समजायला सोपा पडेल इतकंच. पुरुषांकवर अत्याचार होणे ह्याला नाकारत नाही, पण पुरुषांना एक्सट्रा ज्युडिशयल/कांगारू मेथड उपलब्ध असतात, स्त्रियांना नसतात, म्हणूनच सिस्टिम ऑफ पोजिटीव्ह बायस नुसार त्यांना संस्थात्मक संरक्षण जास्त असावं काय?

नगरीनिरंजन's picture

22 Jul 2017 - 3:07 pm | नगरीनिरंजन

हे एक उदाहरण पुरेसं आहे. तेही संस्थात्मक संरक्षणाच्या दुरुपयोगाचं.
http://www.bbc.com/news/magazine-38796457

बाकी नाचक्कीच्या भीतीने सहन करत राहणार्‍या मध्यमवर्गीय पुरुषांची संख्या किती आहे त्याचे अधिकृत आकडे मिळणे अवघड आहे.

आता तुम्हीही मध्यमवर्गीय पुरुषास कोणत्या एक्स्ट्रा ज्युडिशियल/ कांगारु मेथड्स उपलब्ध असतात त्याची उदाहरणे द्याल का?

एक डाक्युमेंटरी आहे मार्टिर्स ऑफ मॅरेज नावाची. खोट्या कौटुंबिक हिंसाचार तक्रांरींचे बळी पुरुंषांबद्द्ल. ही डाक्युमेंटरी दीपिका भारद्वाज नावाच्या पुरुषांच्या हक्काबद्द्ल लढणार्‍या स्त्रीने बनवली आहे. यात अशा कायद्यांचा कसा दुरुपयोग होतो आणि अनेक पुरुषांच आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य कसं उध्वस्तं होतं याचा मागोवा घेतला आहे. हा ट्रेलर पहा.

जेम्स वांड's picture

22 Jul 2017 - 3:22 pm | जेम्स वांड

आर एक्ससेप्शनस बिंग कोटेड ऍझ एगझॅम्पल्स हियर?

अनुप ढेरे's picture

22 Jul 2017 - 3:33 pm | अनुप ढेरे

४९८ च्या सर्व केसेसमध्ये कंव्हिक्शन रेट १५% आहे फक्तं म्हणे.

nanaba's picture

24 Jul 2017 - 6:44 am | nanaba

आर एक्ससेप्शनस बिंग कोटेड ऍझ एगझॅम्पल्स हियर? >>
You nailed it!

एमी's picture

24 Jul 2017 - 6:57 am | एमी

+१

त्या बातमीतच लिहिलंय की
What she did not find was any cases like Yogesh Gupta's, where a woman had filed a case maliciously or to extort money.
"In some cases it would be the argument of the defence that the woman was trying to abstract money," she says. "But I cannot think of a case where this was proven."

नगरीनिरंजन's picture

24 Jul 2017 - 7:55 pm | नगरीनिरंजन

होय एक्सेप्शनच. ह्या बाईसुद्धा एक्सेप्शनच आहेत आजच्या काळात. मुद्दा असा आहे की एकीकडे अतिरेक झाला की त्याची प्रतिक्रिया म्हणून विरुद्ध बाजूने अतिरेक होणारच. ह्या बाईंना जो काही प्रतिसाद मिळतो ते देणारे लोक सरसकट मूर्ख आणि मागासलेले आहेत असे म्हणता येणार नाही.
टोकावरच्या समाजाचे वर्तमान ह्या लोकसत्तातल्या अग्रलेखातही कुबेरांनी तोच मुद्दा मांडायचा प्रयत्न केला आहे. लंबक मध्यावर न थांबता इकडे-तिकडे झुलत राहतो समाजाचा.
ह्या बाईंची किंवा फेमिनाझींची खिल्ली उडवून काहीही होणार नाही.

पिलीयन रायडर's picture

22 Jul 2017 - 5:56 pm | पिलीयन रायडर

ह्या बाईंचा विषय आला की बोलायचंच नाही हे माझं मीच ठरवलं होतं खरं तर, पण... असो..

बाईंच्या भाषणांमध्ये "मी आई आहे, माझं ऐकलंच पाहिजे" ही सुरूवात पाहिली आणि तर्कशास्त्राने तिथेच पहिली गटांगळी खाल्ली. इतक्या टोकाच्या एकांगी विचारांनी काहीही साध्य होऊ शकत नाही. मला आश्चर्य ह्याचं वाटतं की लोक सुद्धा ह्यांचे विचार अत्यंत मनोभावे पुढे पाठवत असतात. अर्थात ते कुणाला तरी "सुनवायचं" असतं म्हणुनही असतं बर्‍याचदा..

तर हे बघा, ह्या जगात केवळ स्त्रियाच व्यवस्थेचा बळी आहेत आणि पुरुष अत्यंत प्रिव्हिलेज्ड आहेत असं कुणीही म्हणत नाहीये. डोकं ताळ्यावर असणारे स्त्रीवादी सुद्धा असं म्हणत नाहीत. पुरुषांना अनेक प्रकारच्या मानसिक आणि कैकदा शाररिक त्रासालाही सामोरं जावं लागतंच. बायका प्रचंड स्वार्थी असु शकतात, त्या नवर्‍याला त्याच्या आई वडीलांपासुन तोडु शकतात, कायद्याचा दुरुपयोग करुन मनमानी करु शकतात.. करतातच. अनेक बाबतीत बायकांना बाई असल्याचाही फायदा मिळतोच. तिथे पुरुषांवर अन्याय होतो. सगळं खरंय आणि मान्य आहेच.

पण पण पण.....

म्हणुन कुणी हे म्हणत असेल की बायकांनी आपले डोके वापरु नये, चंद्रावर गेलात तरी घरात भाकर्‍या बडवाच, मुलीच्या घरच्यांनी ढवळा ढवळ करु नये वगैरे वगैरे.. तर सर, ही पुरुषांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. त्या मुदलात स्त्री काय पुरुष काय, कुणाचेच प्रश्न सोडवत नाहीयेत. त्यांच्या पद्धतीने वागायचं म्हणलं तर उलट प्रश्न वाढतील. संसारात एका जोडीदाराने गपगुमान दुसर्‍याचे ऐकुन घ्यावे हा फॉर्म्युला हिट होणारच ना? त्यात नवल ते काय? मागच्या काही शतकात नाही का मुलींना सतत सांगितलं जायचं की जे होईल ते मुकाट सहन कर, तुझं माहेर आता संपलं, बाईला कुंकवाचाच आधार.. तेच ह्या बाईसुद्धा सांगत आहेत. फक्त वेगळ्या शब्दात. आशय हाच.

बायकांना सुखी संसारासाठी इतके उपदेश करत असताना, दोन शब्द पुरुषांनाही सांगायला काय जातं? चला आपण असं म्हणु की ज्या बायका वैट्ट आहेत, नवर्‍याला छळतात, त्यांच्यासाठी ही भाषणं आहेत (हे असं सार्वजनिक भाषण, एकाच कॅटेगरीसाठी फिल्टर करुन कसं ऐकायचं देव जाणे!) तरीही स्वयांपाकाची तयारी नसलेल्या बायकांसाठी - "चंद्रावर गेलात तरी घरी येऊन भाकरी बडवायची" हे काही उत्तर नाहीये. मुलीच्या घराच्यांची ढवळाढवळ हा मुद्दा अ‍ॅड्रेस करताना सरळ मागच्या शतकात जाऊन वधुपित्याची अक्कल चव्हाट्यावर मांडणं ही काही पद्धत नाही.

एक स्त्री स्त्रीच्या विरोधात बोलतेय म्हणुन त्यांना विरोध आहे असं प्लिझ म्हणु नका, अशाने त्यांना उगाच एक ग्लोरी मिळतेय. त्या काहीही महान काम करत नाहीयेत की तत्कालीन समाजाचा विरोध तर होणारच वगैरे. त्यांच्या भाषणांमध्ये कुठेही स्वतंत्र मतांच्या, सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रियांचा विचारच नाहीये. २०व्या वर्षी मुली सुंदर दिसतात म्हणुन त्यांचं लग्न लावुन द्यावं असं म्हणणार्‍या व्यक्तिकडे तो नसतोच. त्या स्त्रियांना (चांगल्या असो वा वाईट) सरळ दुय्यम भुमिका घ्यायला सांगत आहेत आणि म्हणुन त्यांना विरोध आहे. त्यांच्या भाषणात संसार ह्या "दोघांनी" करण्याच्या गोष्टीचा सर्वांगिण विचार नाहीये म्हणुन हा विरोध आहे. नेहमीप्रमाणे स्त्रियांना उपदेश होतोय आणि पुरुष माना डोलावत आहेत हे काही फार दुर्मिळ दृष्य नाही. काल परवाच इरफान पठाणच्या बायकोचे हाताचे पंजे का उघडे आहेत आणि नखांना नेलपेंट का लावलं आहे ह्यावरुन लोकांनी त्याच्या एका फोटोवर धुमाकुळ घातला. बाईंचे विचार हे ह्या विचारसरणीहुन फार वेगळे नाहीत. इतके टोकाला अजुन पोहचले नसतील, पण वाटचाल तीच आहे.

एक गैरसमज हा ही आहे की ह्या भाषणांमधुन त्या पुरुषांचे प्रश्न सोडवताएत, तर नाही. त्या स्त्रियांना शरणागती पत्करुन गपगुमान नवर्‍याच्या चरणांशी वाहुन घ्यायला सांगत आहेत, जेणेकरुन कुणालाच प्रश्न पडु नयेत. आणि अगदी कुणाला शांततेचा नोबेल पुरस्कार जरी मिळालेला असला, तरीही त्या माणसाची अशी मतं चुकीचीच आहेत.

ग्रामिण भागात स्त्रियांचे प्रश्न फार जास्त गंभीर आहेत. तिथे आधीच स्त्रियांना चपलेखाली दाबुन ठेवण्याची वृत्ती असतेच. आता कुठे त्यांचं जग बदलत असताना अशा व्हिडीओंचा प्रसार ही गंभीर बाब आहे. जे विचार स्त्री आणि पुरुषाला समान वागवत नाहीत, स्टिरिओटाईप्सचाच उदो उदो करतात (स्त्रियांनी चुल आणि मुलच पहावे, घरासाठी कमावणे हे पुरुषाचेच काम इ.) ते स्त्री आणि पुरुषातले कोणतेही प्रश्न कधीही सोडवु शकत नाहीत.

चष्मेबद्दूर's picture

23 Jul 2017 - 8:36 pm | चष्मेबद्दूर

पि.रा. तुमचे दोन्ही प्रतिसाद अगदी माझ्या मनातलेच.

पडलो तरी माझीच शेंडी वर अशा वृत्ती ला काहीच करू शकत नाही...

सुचिता१'s picture

23 Jul 2017 - 10:17 pm | सुचिता१

१०० % सहमत.. पुरुषांचे प्रश्न हिच्या मार्गाने कधीही सुटु शकत नाही.

nanaba's picture

24 Jul 2017 - 6:48 am | nanaba

अगदी योग्य!

प्रीत-मोहर's picture

25 Jul 2017 - 12:12 pm | प्रीत-मोहर

पिरे अगदी योग्य शब्दात लिहिलय्स.


म्हणुन कुणी हे म्हणत असेल की बायकांनी आपले डोके वापरु नये, चंद्रावर गेलात तरी घरात भाकर्‍या बडवाच, मुलीच्या घरच्यांनी ढवळा ढवळ करु नये वगैरे वगैरे.. तर सर, ही पुरुषांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत. त्या मुदलात स्त्री काय पुरुष काय, कुणाचेच प्रश्न सोडवत नाहीयेत. त्यांच्या पद्धतीने वागायचं म्हणलं तर उलट प्रश्न वाढतील. संसारात एका जोडीदाराने गपगुमान दुसर्‍याचे ऐकुन घ्यावे हा फॉर्म्युला हिट होणारच ना? त्यात नवल ते काय? मागच्या काही शतकात नाही का मुलींना सतत सांगितलं जायचं की जे होईल ते मुकाट सहन कर, तुझं माहेर आता संपलं, बाईला कुंकवाचाच आधार.. तेच ह्या बाईसुद्धा सांगत आहेत. फक्त वेगळ्या शब्दात. आशय हाच

आपल्या प्रत्येक मुद्याशी शतश: सहमत .... वरचा परिच्छेदाशी तर फारच सहमत .

किंबहुना हाच धागा पुन्हा लिहायचा ठरवला तर फक्त तुमचा हा प्रतिसाद चोप्यपस्ते करीन एवढच म्हणेन !!

गामा पैलवान's picture

23 Jul 2017 - 3:10 am | गामा पैलवान

पिराताई,

तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

बाईंच्या भाषणांमध्ये "मी आई आहे, माझं ऐकलंच पाहिजे" ही सुरूवात पाहिली आणि तर्कशास्त्राने तिथेच पहिली गटांगळी खाल्ली.

हे सगळ्या बायकांच्या बाबतीत होतं. आईसमोर तर्क आणि युक्तिवाद चालंत नसतात. तिच्यावर जसा विश्वास टाकता तसा माझ्यावर टाका म्हणून अपर्णाबाई सांगताहेत.

२.

तर हे बघा, ह्या जगात केवळ स्त्रियाच व्यवस्थेचा बळी आहेत आणि पुरुष अत्यंत प्रिव्हिलेज्ड आहेत असं कुणीही म्हणत नाहीये.

मात्र तरीही विवाहांतर्गत पुरुष जास्त सुविध (=प्रिव्हिलेज्ड) असतात. स्त्रीपुरुषांच्या मनोरचनाच मुळी अशा असतात की लग्नाच्या बाजारात पुरुष वरचढ ठरतो. स्त्री ज्या कारणासाठी लग्न करते त्या कारणासाठी पुरुष लग्न करंत नसतो. त्यामुळे पुरुषाला नैसर्गिकरीत्या जास्त पर्याय उपलब्ध असतात.

३.

म्हणुन कुणी हे म्हणत असेल की बायकांनी आपले डोके वापरु नये, चंद्रावर गेलात तरी घरात भाकर्‍या बडवाच, मुलीच्या घरच्यांनी ढवळा ढवळ करु नये वगैरे वगैरे.. तर सर, ही पुरुषांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत.

नाहीच्चेत मुळी. चंद्रावर जाऊन भाकऱ्या बडवणं म्हणजे तुम्ही बाहेर कितीही कर्तृत्ववान असलात तरी तुमच्या घरी तुमची भूमिका स्पष्ट पाहिजे. जर घरी भाकऱ्या बडवायच्या नसतील तर लग्नंच करू नये हे उत्तम. अशा वेळेस करियरवर लक्ष केंद्रित केलेलं बरं पडेल. हा गर्भितार्थ आहे.

असं असलं तरीही नवरा जर सांभाळून घेणारा असेल तर चंद्रच काय मंगळावर खुशाल जायला हरकत नाही. पण नवऱ्यानं सांभाळून घ्यायला हवं ही अपेक्षा ठेवू नका.

४.

संसारात एका जोडीदाराने गपगुमान दुसर्‍याचे ऐकुन घ्यावे हा फॉर्म्युला हिट होणारच ना?

हो.

नेमकी हीच तर युक्ती आहे संसार टिकवून ठेवायची. ती वापरायची नसेल तर लग्न करू नये. खुल्या सहजीवनाचा (=लिव्ह इन) पर्याय खुला आहेच. पण त्याचेही तोटे आहेतंच.

५.

मागच्या काही शतकात नाही का मुलींना सतत सांगितलं जायचं की जे होईल ते मुकाट सहन कर, तुझं माहेर आता संपलं, बाईला कुंकवाचाच आधार.. तेच ह्या बाईसुद्धा सांगत आहेत. फक्त वेगळ्या शब्दात. आशय हाच.

अगदी बरोबर. फक्त लग्नावर बेतलं तरच काडीमोड घेऊन परत ये. जिवावर बेतेपर्यंत वाट पाहू नकोस. एव्हढं वगळता तुझं तू बघायला शिक.

हे जर मान्य नसेल तर लग्न न करणेच उत्तम.

६.

बायकांना सुखी संसारासाठी इतके उपदेश करत असताना, दोन शब्द पुरुषांनाही सांगायला काय जातं?

कारण की पुरुष त्यांच्या मनोरचनेमुळे अपर्णाबाईंचा उपदेश ऐकणार नाहीत. पुरुष फक्त त्यांच्या पत्न्यांचंच ऐकतात. पत्नीला आपलं नवऱ्याने ऐकावं असं वाटंत असेल तर अपर्णाबाईंचा सल्ला तिनं अंमलात आणायला हवा. आणि जर तो आवडला नाही तर स्वत:च्या मनाने प्रयत्न करून पाहायला हरकत नाही.

७.

तरीही स्वयांपाकाची तयारी नसलेल्या बायकांसाठी - "चंद्रावर गेलात तरी घरी येऊन भाकरी बडवायची" हे काही उत्तर नाहीये.

अगदी बरोबर. अशांसाठी खुल्या संबंधांचा (=लिव्ह इन) पर्याय उपलब्ध आहे. मात्र त्यातून घर उभं रहात नाही. फक्त लॉज निर्माण होतं.

८.

त्यांच्या भाषणांमध्ये कुठेही स्वतंत्र मतांच्या, सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रियांचा विचारच नाहीये.

तेच तर बरंय की. स्वतंत्र मतांच्या, सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रिया आपापला विचार करण्यास समर्थ आहेत. अपर्णाबाईंनी त्यांच्यासाठी विचार करण्यात काही अर्थ नाही.

९.

त्या स्त्रियांना (चांगल्या असो वा वाईट) सरळ दुय्यम भुमिका घ्यायला सांगत आहेत

यू सेड इट. लग्नाच्या बाजारात स्त्री तिच्या मनोरचनेपायी दुय्यम भूमिकेतंच असते. हा निसर्गाने तिच्यावर केलेला अन्याय आहे.

१०.

त्यांच्या भाषणात संसार ह्या "दोघांनी" करण्याच्या गोष्टीचा सर्वांगिण विचार नाहीये म्हणुन हा विरोध आहे. नेहमीप्रमाणे स्त्रियांना उपदेश होतोय आणि पुरुष माना डोलावत आहेत हे काही फार दुर्मिळ दृष्य नाही.

तुम्ही ज्याला दोघांनी करायचा संसार म्हणताहात, त्याला पुरुष लोकं वेगळंच काहीतरी म्हणतात. ते 'घर बाईचं असतं' असं काहीतरी म्हणतात.

मात्र तरीही तुमचा मूळ मुद्दा मान्य. घर दोघांचं हवं. नवराबायकोंनी एकमेकांचा आदर राखायला हवा. बायकोला उपदेश केला तर ती ऐकून घेते. पण नवरे लोकं ऐकून घेत नसतात. सवय नसते त्यांना.

बायकोने नवऱ्याचा आदर केलाच पाहिजे. मात्र या बदल्यात नवऱ्याकडून जो आदर मिळवायचा आहे, तो सर्व स्त्रीजातीसाठी असावा असा बायकोने प्रयत्न करायला हवा. मग पाहिजे तेव्हढा आदर तिच्यापर्यंत बरोब्बर पोहोचतो.

११.

इरफान पठाणच्या बायकोचे हाताचे पंजे का उघडे आहेत आणि नखांना नेलपेंट का लावलं आहे ह्यावरुन लोकांनी त्याच्या एका फोटोवर धुमाकुळ घातला.

इरफान पठाणला त्याचं सोयरसुतक आहे का? नसल्यास कोण विचारतो फालतू टीकेस!

१२.

बाईंचे विचार हे ह्या विचारसरणीहुन फार वेगळे नाहीत. इतके टोकाला अजुन पोहचले नसतील, पण वाटचाल तीच आहे.

असहमत. नवऱ्याकडून युक्तीने आपल्याला पाहिजे ते कसं काढून घ्यावं याची पूर्वतयारी अपर्णाबाई करून घेताहेत.

१३.

जे विचार स्त्री आणि पुरुषाला समान वागवत नाहीत, स्टिरिओटाईप्सचाच उदो उदो करतात (स्त्रियांनी चुल आणि मुलच पहावे, घरासाठी कमावणे हे पुरुषाचेच काम इ.) ते स्त्री आणि पुरुषातले कोणतेही प्रश्न कधीही सोडवु शकत नाहीत.

स्त्री आणि पुरुष समान नाहीत.

भूमिका (= स्टिरिओटाईप्स ) उपलब्ध असणे ही एक चैन आहे. ही नवराबायकोंची चैन नाही. तर त्यांच्या मुलाबाळांची चैन आहे. भूमिका स्पष्ट नसतील तर मुलं गोंधळतात.

असो.

माझ्या मते अपर्णाबाईंच्या भाषणांकडे नवऱ्यास कसं शहाणा/मूर्ख बनवावं, त्याच्याकडून हवं ते कसं काढून घ्यावं याची पूर्वतयारी म्हणून पाहणे इष्ट ठरावे.

आ.न.,
-गा.पै.

पिलीयन रायडर's picture

23 Jul 2017 - 5:02 am | पिलीयन रायडर

आपली मते कळाली. इतक्या पुरातन आणि एकांगी मतांचा प्रतिवाद सुद्धा करण्याची इच्छा नाही. स्त्रियांनी संसार जपावा, नसेल जमत तर लिव्ह इन मध्ये जावे आणि दुय्यम भुमिका घ्यावीच आणि पुरुषांना सवयच नसते ऐकण्याची वगैरे मतांना तर माझ्याकडे प्रतिवाद सुद्धा नाहीये.

बायको चंद्रावर जाणारी असेल तर नवर्‍याने अत्यानंदाने भाकर्‍या बडवाव्यात ह्या मताची मी आहे. मुदलात "भाकरी बडवणे" ही लग्नाची एकमेव इतिकर्व्यता नाही. सहजीवन ही एक बरीच अर्थपुर्ण आणि गंभीर गोष्ट असते. त्यात दुय्यम भुमिका घेऊन नातं जपत रहाण्याची वेळ येत असेल तर ते सहजीवन काय कामाचे?

असो.. मला खरंच ह्यावर अधिक काही बोलायचे नाही. आपली मते अत्यंत वेगवेगळी आहेत हे तर स्पष्ट आहे. स्वतःचे मन मारुन का होईना पण नवर्‍यास गोडीगुलाबीने कसे जपावे वगैरे गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटत असतील, मला बिनडोक वाटतात. तेव्हा उगाच कशाला एकमेकांचा वेळ घालवायचा?

धन्यवाद!

गामा पैलवान's picture

23 Jul 2017 - 6:34 pm | गामा पैलवान

पिराताई,

त्याचं काये की स्त्री जात्याच अन्यायाने सतत भरडली जात असते. फेमिनाझी तिला आमिष दाखवतात की तू 'पुरुषासारखं' वागलीस तर 'पुरुषासारखी सुखी' होशील. अपर्णाबाई हा बुरखा फाडून टाकतात.

विवाह न करणे हा एक स्तुत्य पर्याय आहे. शेवटी आपापली मर्जी.

आ.न.,
-गा.पै.

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Jul 2017 - 11:07 pm | हतोळकरांचा प्रसाद

फेमिनाझी तिला आमिष दाखवतात की तू 'पुरुषासारखं' वागलीस तर 'पुरुषासारखी सुखी' होशील.

याच्याशी बऱ्याच अंशी सहमत!

मुळात अपर्णाजींच्या भाषणातील मुद्दा हा स्त्री विरुद्ध पुरुष असा नाहीचाये मुळी! कुटुंब आणि त्यातील स्त्रीचा सहभाग यावर त्यांची भाषणे बेतलेली असली तरी टोकाला पोहोचलेल्या संबंधांना सुधारताना त्या याच गोष्टी सांगत असतील हे गृहीतक झाले. त्यांचा स्त्रियांनी चंद्रावर जाण्यास विरोध नाहीये, तर चंद्रावर गेलात तरी कुटुंबातला तुमचा सहभाग विसरू नका असा त्यांचा सल्ला आहे. बाकी "भाकऱ्या बडवण्याचा" जेवढा तिरस्कारजनक उल्लेख वरील प्रतिसादांमध्ये दिसतोय तेवढा त्यांच्या भाषणातील उल्लेख नाही वाटला. घरातील कामे किंवा "भाकऱ्या थापणे" कमी दर्जाचे काम आहे असा ग्रह पुरुषांपेक्षा स्त्रीमुक्तिवाद्यांनीच पसरवला नसेल काय?

थिटे मास्तर's picture

24 Jul 2017 - 2:15 am | थिटे मास्तर

"भाकऱ्या थापणे" कमी दर्जाचे काम आहे असा ग्रह पुरुषांपेक्षा स्त्रीमुक्तिवाद्यांनीच पसरवला नसेल काय?

स्वयंपाक (सैपाक नव्हे) करणे हि एक कला आहे त्याचप्रमाणे चपात्या पोळ्या नाहि होउ शकत.

स्त्रीमुक्ति म्हणजे काय ? 498 A ? बरेच प्रश्न आहेत, Depends on the reply. बैल तो बैल होता है.

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2017 - 5:30 am | पिलीयन रायडर

"भाकर्‍या बडवणे" थोडक्यात स्वयंपाकघर सांभाळणे हे कमी दर्जाचे काम आहे असा उल्लेख ना माझ्या प्रतिसादात आलाय ना अपर्णाबै असं म्हणताएत. तसं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे हे नमुद करु इच्छिते.

प्रश्न स्वयंपाक करण्याचा नसुन, तो "बायकांनीच" केला पाहिजे ह्या वृत्तीचा आहे. विरोध स्त्रीने बाहेर कोणतेही क्षेत्र गाजवले तरी तिची किंमत घरात स्वयंपाकघरात काय करते ह्यावरुन करण्याला आहे. चंद्रावर जाणार्‍या बाईला सुद्धा "तू घरातला सहभाग (तोही पारंपारिक पद्धतीनेच) ठेवलाच पाहिजेस" ह्या दुराग्रहाला आहे. आणि ह्या सगळ्यात चंद्रावर जाणार्‍या बाईच्या नवर्‍याला मात्र काहीच सल्ला नाही? त्याने काहीच तडजोड करु नये? अजुनही तुम्ही "स्त्रिया नैसर्गिकरित्याच दुय्यम असतात, पुरुषांचा बाई स्वभावच तसला, त्यांना बै समजुन घ्यावं" हेच डायलॉग मारणार? किती दुर्दैव आहे पहा, ती बाई सामाजिक समजुती, पद्धती, परंपरा आणि न जाणे काय काय स्टिरीओटाईप्स तोडुन चंद्रावर जाण्याइतकी प्रगती करतेय, आणि लोकांना चिंता तिच्या घरात स्वयंपाक होतोय ना ह्याची! आजतागायत यशस्वी पुरुषाला "कितीही मोठा झालास तरी कुटुंबातला सहभाग जप" हा सल्ला देताना कोणाला पाहिलेले नाही. बाई यशस्वी झाली की मात्र कुटुंबव्यवस्था शेवटच्या घटका मोजायला लागल्यासारखे सल्ले सुरु होतात. आई शप्पथ सांगते, आजघडीला "आपल्याहुन यशस्वी बायकोशी सुखाने संसार कसा करावा" ह्या भाषणाची समाजाला जास्त गरज आहे.

खरंतर जगात यशस्वी स्त्रिया आज घडीला कमी नाहीत. सी.ई.ओ किंवा एखाद्या देशाच्या प्रमुख पदावर असणार्‍या बायका आपापली घरे सांभाळत नसतील का? मुलांना वेळ देत नसतील का? आजुबाजुला नीट पाहिलेत तर करिअर आणि संसार ह्यात तारेवरची कसरत करणार्‍या असंख्य बायका तुम्हाला दिसतील. पण लग्न झाले म्हणुन, मुल झाले म्हणुन "आता माझे घर आणि करिअर एकत्र कसे सांभाळु" असा प्रश्न पडलेला पुरुष मला तरी अजुन भेटायचा आहे. बाळाचा जन्म ही एक घटना सोडली तर मुल बापाचेही तेवढेच असते जेवढे आईचे, संसार पुरुषाचाही तेवढाच असतो जेवढा स्त्रीचा. त्यामुळे सहभाग त्याचाही तेवढाच हवा जितका तिचा. त्याच प्रमाणात सल्ले त्यालाही द्यावेत जसे तिला.

हा प्रश्न फक्त अपर्णाबैं पुरता नाहीये. ही समाजाची वृत्ती आहे जी अगदी लहान मुलीच्या मनात बिंबवायला सुरु करते की चुल-मुल-संसार हे तुझ्या आयुष्यात अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. कधी कुणा घरात मुलाशी स्वयंपाक कसा करावा, बायकोशी कसे वागावे, सासरी कसे रहावे इ चर्चा करताना कुणी दिसत नाही. तुम्ही दुय्यम आहात हे सांगत सांगत तुम्ही पालकांनाही हेच सांगताय की स्त्री संतती दुय्यम आहे. कुणाला हवी मग ही मुलगी? वरकरणी साध्या वाटणार्‍या अपर्णाबैंच्या ह्या मतांचा परिपाक ही स्त्री आणि पुरुषातली सामाजिक दरी आहे. अपर्णाबै त्या ती वाढवायला छान हातभार लावत आहेत.

आणि हो.. पुरुषासारखं सुखी कुणाला व्हायचंय इथे? माणसासारखं राहु द्यात इतकी साधी मागणी आहे. स्त्री म्हणुन मी पुरुषाहुन फार वेगळी आहे हे कुणी मला सांगायची गरज नाही.. माझं स्त्रीत्व मला प्रिय आहे. माझ्यातलं स्त्रीत्व सोडून मला पुरुष होण्यात काही रस नाही. सुखी होण्याचा तो मापदंडही नाही. पण मी कुणाहुन कमी नाही, मी स्त्री म्हणुन समाजाने माझी कर्तव्ये ठरवयाची नाहीत, तुमच्या मापदंडांनी माझी किंमत करायची नाही.

ह्या अपेक्षांना फेमिनाझी होणे म्हणायचं असेल तर.....
..म्हणा बापडे..

सुबोध खरे's picture

24 Jul 2017 - 10:09 am | सुबोध खरे

पिरा ताई
स्त्री आणि पुरुष हे समान आहेत हे उच्चरवाने म्हणणाऱ्या किती "मुली" आपल्यापेक्षा कमी पगार ( आणि खालच्या हुद्द्यावर) असलेल्या मुलाशी लग्न करायला तयार होतात. कदाचित १ % सुद्धा नाही.
नवरा आपल्यापेक्षा हुद्द्याने किंवा पगाराने कमी चालत नाही हि वस्तुस्थिती आहे इतकेच नव्हे तर "गृहिणी" असणाऱ्या बायकोसुद्धा लग्न झाल्यावर मात्र नवरा आणि बायको समान याचा धोशा लावून नवऱ्याने घरात माझ्या बरोबरीने काम करायला पाहिजे असा आग्रह धरताना आढळतात. अनंत काणेकरांची एक सुंदर कथा आहे सावकाशीने टाकतो.
मीच काढलेल्या एका धाग्याची जाहिरात करतो समजा
http://www.misalpav.com/node/37185 पण यात अशी मनोवृत्ती दिसून येते.
जाता जाता -- अपर्णा रामतीर्थ बाईंची भाषणे किंवा वरील व्हिडीओ मी पाहिलेला नाही हे कबुल करतो त्यामुळे त्या "बरोबर कि चूक" यावर माझे ( सध्या तरी) काहीच म्हणणे नाही

आजघडीला "आपल्याहुन यशस्वी बायकोशी सुखाने संसार कसा करावा" ह्या भाषणाची समाजाला जास्त गरज आहे

पुन्हा एक्दा पी रा ताई ....१००% सहमत ....

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Jul 2017 - 12:19 pm | हतोळकरांचा प्रसाद

परत गल्लत होतेय! बायकांनी"च" केला पाहिजे असे मत आपण स्वतः मांडत आहात. बायकांनी केला पाहिजे असं अपर्णाजीचं मत दिसतंय याच अर्थ पुरुषांनी करू नये असं त्यांचं मत असेल हे गृहीतक कशाला? अपर्णाजींची मते स्त्रीची किंमत कशावरून केली जायला पाहिजे यावर नसून एक सुखी संसार करताना काय रोल असला पाहिजे याभोवती आहेत हे परत एकदा नमूद करू इच्छितो! त्या पुरुषांच्या बाजूने स्त्रियांबद्दल बोलत नसून कुटुंबातील एक घटक म्हणून दुसऱ्या घटकाबद्दल बोलताना दिसतात. म्हणूनच त्या सुरुवातीला मी तुमची आई बोलतेय असं समजा असं म्हणताना दिसतात. त्यांनी त्यांच्या वकील म्हणून आलेल्या अनुभवांतून कौटुंबिक कलहातील काही केसेसना तरी त्यांच्या पद्धतीने सल्ला द्यायचा प्रयत्न केला तर त्यात चुकीचं काय?

कुटुंब म्हणजे स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व आणि पुरुषांचं स्वतंत्र अस्तित्व (फक्त) हेच समजणाऱ्यानी पुढील प्रतिसाद दुर्लक्षित करण्यास हरकत नसावी.

इथे कुणीही घरात स्वैपाक होतोय कि नाही याची चिंता करण्यासाठी हा मुद्दा मांडत असतील असे अजिबात वाटत नाही. कितीही उत्तम शेफ जेवण देत असला तरी अजूनही आपल्यातील अनेक लोक " माके हाथ के खानेका जवाब नहीं" म्हणताना दिसतात ते आई भाकऱ्या बडवते ह्या भावनेतून नक्कीच नसेल. निसर्गानेच स्त्रीला दिलेले ममतेचे वरदान तिने केलेल्या प्रत्येक गोष्टीत उतरत असल्याने त्याची एक गोडी आहे. एका स्त्रीमध्ये कुटुंबव्यवस्था धरून ठेवण्याची जेवढी ताकद आहे तेवढी पुरुषामध्ये दुर्दैवाने नसते असे मला वाटते आणि म्हणूनच अपर्णाजींचे मुद्धे कुटुंब धरून ठेवण्यासाठी स्त्रीचा काय रोल याभोवती फिरताना दिसतात. उगाच स्त्रीमध्ये चंद्रावर पोहोचण्याची ताकद असताना तिला भाकरी बडवण्यात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न वगैरे मुद्दे तकलादू वाटतात. वरील एका प्रतिसादात त्यांच्या वाक्यांची तुलना इरफान पठाण फोटो प्रकरणाशी केलेली बघून तर आश्चर्यचकित झालो.

पुरुषाला सल्ले दिले जात नाहीत किंवा पुरुषांची उदाहरणे दिसत नाहीत वगैरे वैयक्तिक अनुभव असू शकतात. याउलट स्त्रीमुक्तीवाद्यांच्या प्रभावामुळे याघडीला पुरुषाला जेवढे सल्ले दिले जात असतील तेवढे स्त्रीलाही नसतील हो! मुलांना काही सांगितले जात नाही वगैरे गोड गैरसमज आहे आणि खरेतर याच गोष्टीला विरोध करायला हवा. पुरुषाला सांगत नाहीत म्हणून स्त्रीलाहि सांगू नका यापेक्षा स्त्रीलाही सांगा आणि पुरुषालाही सांगा जेणेकरून एक सुदृढ कुटुंबव्यवस्था टिकून राहील असे माझे मत आहे. अपर्णाताई त्यातील स्त्रीला सांगायचा भाग हाती घेत असतील तर पुरुषांना सांगायचा भागही कोणीतरी हाती घ्यावा (किंबहुना घेतही असतील). पण म्हणून अपर्णाताईचा भाग चुकीचा हे तत्व पटत नहीं.

शेवटी परत एकदा - त्यांची भाषणे हि कुटुंबव्यवस्थेतील स्त्रीचा सहभाग यावर आहेत स्त्री विरुद्ध पुरुष यावर नाही. जोपर्यंत त्या भाषणामधला मतितार्थ लक्षात घेता येणार नाही तोपर्यंत त्यांची भाषणे स्त्रीमुक्तीविरोधी समजण्यास हरकत नसावी. आपल्या घरात भाकऱ्या बडवणाऱ्या स्त्रियांना चंद्रावर पाठवल्यावर किंवा सीईओ झाल्यावर त्यांची किमंत कळण्याआधी त्यांच्या भाकऱ्या बडवण्याची किंमत कळायला लागणे म्हणजे खरी स्त्रीमुक्तीची सुरुवात नसावी का?

अप्पा जोगळेकर's picture

24 Jul 2017 - 1:15 pm | अप्पा जोगळेकर

निसर्गानेच स्त्रीला दिलेले ममतेचे वरदान तिने केलेल्या प्रत्येक गोष्टीत उतरत असल्याने त्याची एक गोडी आहे. एका स्त्रीमध्ये कुटुंबव्यवस्था धरून ठेवण्याची जेवढी ताकद आहे तेवढी पुरुषामध्ये दुर्दैवाने नसते असे मला वाटते
हे कोणी ठरवले. ममतेचे वरदान, आईचे माहात्म्य वगैरे गोष्टींचे अवडंबर माजवून बायांना उगाचच देवता समान बनवून ठेवले आहे. जणू कुटुंबे फक्त बायाच धरुन ठेवतात.

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Jul 2017 - 1:36 pm | हतोळकरांचा प्रसाद

कोणीतरी ठरवले आहे असे मी म्हणालोच नाही, असे मला वाटते असे मी लिहिले आहे. तसेही याला माझ्याकडे प्रतिवाद नाहीये, मी तरी लहानपणापासून हे बघत आलो आहे. आजकाल सहजसहजी उपलबध इंटरनेटमुळे माणूस तर माणूस प्राण्यांच्याबाबतीतही हि गोष्ट विडिओजमुळे बघायला मिळते. शिवाय "च" फार महत्वाचा आहे हो, मी बाया"च" असे म्हणालो नाही, जेवढी ताकद बायकांकडे आहे तेवढी पुरुषांकडे नाही हे माझे मत मी मांडले.

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2017 - 7:25 pm | पिलीयन रायडर

केवळ तुम्हाला उत्तर देताना नुसत्या स्मरणशक्तिवर अवलंबुन लिहायचे नाही म्हणून अपर्णाबैंचा "चला नाती जपुया" हा व्हिडीओ बघण्याचा प्रयत्न केला. चला एक आढावा घेऊया की त्या विषय कसा मांडतात.

सुरुवात स्वतःबद्दल बरेच गौरवोद्गार काढुन झाली. मी खूप फिरतेय (४५८ दिवस सलग) असा उल्लेख झाला. का फिरतेय? कारण एक आवाज ऐकु येतोय. कसला? कुटुंबव्यवस्था, संस्कार आणि संस्कृतीच्या मृत्युघंटांचा. मग त्या आजुबाजुला किती विदारक परिस्थिती आली आहे ह्याचे वर्णन करतात. का आली आहे? "बायकांसाठी केलेल्या कायद्यांनी". असे का? कारण बायका कायद्यांचा दुरुपयोग करतात.
(सरसकटीकरण टु बी नोटेड मिलॉर्ड! आणि नवर्‍याने मरुस्तोवर मारलेल्या बाईला नक्की ऐकवा हे वाक्य.खरं तर दरवेळेस दुरुपयोगच होत नसतो. पण जिथे होतो त्याने डायरेक्ट कुटुंबव्यवस्था मरायलाच टेकते?!! )

मग मी आता तुम्हाला सांगणारे आणि आई म्हणुन माझं ऐकुन घ्यायचंच ही धमकीवजा सूचना. आजकाल मुलींना मुलासारखं वागवत आहेत म्हणे. हे करणं कसं चुकीचं आहे हे ठासुन सांगितलं. तिला "दुसर्‍याच्या" घरी जायचंय हे ही.
(आम्ही ह्यांच्या भाषणात सिंबॉलिझम शोधायचा आणि ह्यांनी मात्र "मुलीला मुलासारखं वागवणे" ह्याला अगदी शब्दशः घ्यायचं. मुलगा मुलीत फरक न करणे. दोघांनाही शिक्षणाछ्या, करिअरच्या समान संधी देणे, प्रॉपर्टीत समान वाटा देणे वगैरे अध्याहृत अर्थ समजुन घ्यायचेच नाहीत.)

माझ्या आईने कसं मला प्रचंड बंधनात वाढवलं ह्याबद्दल भाष्य. "बायकांनी कसे वागावे" ह्यावर ४ ओळी. "आजकालच्या बायका कुठेही कंगवा काढतात आणि "पुरुषांसमोर" केस मोकळे सोडतात, विंचरतात, स्लिव्हलेस ब्लाउज काय घालतात, हात वर जातात, पुरूष बाजुला असतात " ही टिपण्णी. बसमध्ये बायका कशा अस्ताव्यस्त झोपलेल्या असतात ह्यावर भाष्य.
"भान पाहिजे ग भान पाहिजे. बलात्काराच्या खटल्यामध्ये काढताएत मग मुद्दे, पण आधी भान नको का?" हे त्यांचे वाक्य आहे.

(बलात्काराच्या केस मध्ये आधी स्त्रीयांनी भान ठेवले पाहिजे? सार्वजनिक ठिकाणी बायकांनी कसे कपडे घालावेत, पुरुषांसमोर कसे वागावे ह्यावरुन त्यांचे भान जात आहे असे म्हणणे आणि अलगद त्याचा संबंध बलात्काराशी जोडणे हे योग्य आहे?? कुठेच पुरुषांचा काही दोषच नाही. पुरुषांना बायका भाग पाडताएत हा एक हिडन सुर. आता असं म्हणु नका की ह्यात पुरुषांची चुक नाही असं कुठे म्हणलंय. पण सर, बायकांच्या कपड्याचा, वावराचा बलात्काराशी तर संबंध जोडलाय ना? ही कारणं असतात बलात्काराची? बस मध्ये हात वर करुन केस विंचरले हा मुद्दा बलात्काराशी जोडला जावा? असा?
तुमची मतं अशी असतील की बुवा हिर्‍याला नाही का लॉकरमध्ये ठेवावेच लागते तसे बायकांना कपड्यात गुंडाळुन ठेवावे, तर आपण इथेच बोलायचे थांबवुया. माझ्यामते रस्त्यावर काहीही कपडे न घालता जरी बाई फिरत असली तरी तिच्यावर बलात्कार करण्याचे जस्टीफिकेशन पुरुषाला मिळत नाही.)

मी व्हिडीओ पहाता पहाता लिहीतेय, १७ वे मिनिट सुरु आहे. बाई कुटूंबव्यवस्थेचा कणा आहे, ती प्रतिष्ठा आहे, श्वास आणि विश्वास आहे वगैरे सांगितलं. सध्या "हल्लीच्या मुली जरा काही कमी पडलं की वकिल घेऊन भांडायला तयार" असे एक विधान ठामपणे करत आहेत.

ही माझी लिमीट आहे. "चला नाती जपुया" नावाच्या व्हिडीओ मध्ये पहिले २० मिनिटे बायकांवर धुवांधार आरोप आणि उपदेशाचा मारा ह्याव्यतिरिक्त काहीही बोलल्या गेलेले नाही. मी हे भाषण आधीच ऐकलेले आहे. मला आठवते त्याप्रमाणे १-१.५ तास साधारण हेच बोलले जाते. बायका कुंकु लावत नाहीत, बांगड्या घालत नाहीत वगैरे मुद्देही आहेत. कुठेही पुरुषाने काय करावे ह्यावर एक वाक्यही बोलल्या गेलेले आठवत नाही. हो पण पुरुषांचे कसे हाल आहेत हे नक्की सांगितले जाते.

थोडक्यात बायकांचे भान सुटणे आणि मग व्हाया संस्कृती, धर्म बुडणे ह्यावर हे विवेचन आहे. ह्याला सुखी संसारासाठीचे सल्ले म्हणत नाहीत. हे सगळं संसारासाठी आहे, हाच तुम्हा सर्वांचा एक मोठ्ठा गैरसमज आहे.

ह्या व्हिडिओला ३ लाख व्ह्युज आहेत. अनेक लोक हा शेअर करतात. त्यांना हे कळत नाही हो की समाजातल्या सिलेक्टेड लोकांना नीट अर्थ काढुन तो पहायचा आहे. लोक काय शब्दश: अर्थ घेऊन बायकांनी घरी येउण स्वयंपाक करावा आणि सांजवेळेला केस विंचरु नयेत वगैरे लक्षात ठेवतात. ह्याने संसार सुरळीत होणारेत?

प्रीत-मोहर's picture

25 Jul 2017 - 12:18 pm | प्रीत-मोहर

__/\__
तु चक्क त्या बाईचा विडियो पुन्हा पाहिलास!!!

एक महिला या नात्याने एक सांगू इच्छिते की नैसर्गिकरित्या एखादी बाई जरा पुरुषी असली तर ठीक पण माझ्यासारख्या सर्वसामान्य बाईला हा सुखी होण्याचा मार्ग नाही हे लवकरच कळेल. मी तशीही सुखी होईनच पण बाई असताना, बाई म्हणून. तसं होता येतं हे प्रत्येक बाईला माहित असतं. संघर्ष सुरु होण्याची वेळ ती असते, जिथे तिला बाई म्हणून जाऊ दे, माणूस म्हणून जगू दिले जाण्यात अडचणी येतात.

अप्पा जोगळेकर's picture

24 Jul 2017 - 11:00 am | अप्पा जोगळेकर

बायको चंद्रावर जाणारी असेल तर नवर्‍याने अत्यानंदाने भाकर्‍या बडवाव्यात ह्या मताची मी आहे.
अहो, चंद्रावर जाणार्‍या बाईला किती पगार असेल. ठेवायचे चार- दोन नोकर. अगदीच सूड उगवायचा असेल तर पुरुष स्वयंपाकी ठेवा.
बायका चंद्रावर जायला लागल्या तर खरेच मौज होईल. घरात पैसे भरपूर आणि बायको २-४ महिने चंद्रावर.
वॉव.

दीपक११७७'s picture

24 Jul 2017 - 4:16 pm | दीपक११७७

पुरुष जसा पत्निवर पैसे उधळतो तसे पत्नि देणार आहेत का त्यांनी कमवलेला पैसा पुरुषांना ते ही त्या चंद्रावर असताना.

उलट पुरुष तसा चंद्रावर असला तर भरपुर पैसे देतो बायकोला

रेवती's picture

24 Jul 2017 - 1:43 am | रेवती

भूमिका (= स्टिरिओटाईप्स ) उपलब्ध असणे ही एक चैन आहे. ही नवराबायकोंची चैन नाही. तर त्यांच्या मुलाबाळांची चैन आहे.
अत्यंत सहमत पण हे करताना नवराबायकोंनी एकमेकास पूरक ठरले नाही तर मुलांची चैन आईवडिलांना मारक ठरण्याची शक्यता आहे.
सुदैवाने तुम्ही उल्लेखलेली चैन मी पुष्कळ केली. त्यावेळी आईवडिलांस काय तारेवरची कसरत करावी लागते ते लक्षात आले नव्हते. आज माझं मूल ही चैन करतय तेंव्हा कंबरमोडी झालिये कारण मी गोल भाकरी थापली नाही किंवा गोल पोळी नाही तरी नवरा त्याजागी उभा राहतो. दोघांना घरातील बाहेरील दोन्ही गोष्ती कराव्या लागतायत. नवर्‍याचे जास्त हाल आहेत.

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2017 - 5:37 am | पिलीयन रायडर

अगं ह्यालाच तर सहजीवन म्हणायचं ना! तू कमी पडतेस तिथे तुझा नवरा घट्ट उभाय, तुझा नवरा नाही तिथे तू ठाम आहेस.

मुदलात उपलब्ध भुमिकाच वापरायला हव्यात असं कोण म्हणलंय? स्त्री आणि पुरुषाची त्यांच्या संसारातली भुमिका काय असावी हे ते दोघं ठरवतीलच की. कुणी म्हणेल बाई घर सांभाळेल, पुरुष पैसा आणेल. कुणी म्हणेल बाई कमावेल, पुरुष घर बघेल. कुणी म्हणेल दोघं मिळुन कमवु - दोघं मिळुन भाकर्‍या बडवु!

हे कोण टिकोजीराव लागुन गेलेत लोक जे सांगणार की कुणाच्या भुमिका काय? मी माझं पाहिन की.

विशुमित's picture

24 Jul 2017 - 11:58 am | विशुमित

मला काही सैपाक वगैरे येत नाही. आईने काही शिकवलंच नाही (रोज हेच टोमणे ऐकतो). पण मी जर हाताखाली असेल तर आमची मंडळी २०-३० जणांचा सैपाक सहज बनवते. ऑपेरेशन करताना सर्जनला ते कात्र्या वगैरे देणारा असतो ना तसे काम माझ्याकडे असते. असलं काम माझ्या शिवाय कोणीच चांगले करू शकत नाही ही तिची ठाम धारणा आहे. घरात जेव्नाळीचा काही कार्यक्रम असेल तर सुट्टी काढून थांबवलं जाते. एवढं माझं डिमांड आहे. अशा लय यशस्वी पंगती उठवल्या आहेत.
मी हे काम उघड उघड करतो. पहिल्या पहिल्यांदा नातेवाईक/मित्रमंडळी माझ्याच घरी जेवून खाऊन जाताना खोचक बोलायचे पण नंतर समजायला लागले की हे सगळे बैलभाडे आहेत. बाहेर दाखवतात आम्ही किती मर्द मावळे आहोत पण घरात दार लावून केर काढतात आणि अंथरूण पण टाकतात. असो..

अपर्णाबाईंचा (सासूबाई म्हणू का?) ऑडिओ एकदा आमच्या मॅडमला ऐकायला दिला होता. ३-४ मिनिट ऐकल्यानंतर त्यांनी आमच्यापुढे कांदे आणि भाज्या ठेवल्या आणि म्हणाल्या "चिरून ठेवा तो पर्यंत ऑडिओ नीट ऐकते". पुढे काय झाले ते नाही सांगत.

अप्पा जोगळेकर's picture

24 Jul 2017 - 1:19 pm | अप्पा जोगळेकर

बाहेर दाखवतात आम्ही किती मर्द मावळे आहोत पण घरात दार लावून केर काढतात आणि अंथरूण पण टाकतात. असो..
केर काढल्याने, अंथरुणे टाकल्याने, स्वयंपाक केल्याने मर्द मावळे पणाला बाधा येते का. खरेतर या गोष्टी सगळ्यांनाच आल्या पाहिजेत.

शहरातलं मला जास्त माहित नाही पण गावाकडे मर्द असली कामे करत नाहीत, अशी वदंता (अफवा) आहे.

नंतर समजायला लागले की हे सगळे बैलभाडे आहेत.

बैलभाडे म्हणजे?

अभ्या..'s picture

24 Jul 2017 - 1:42 pm | अभ्या..

आमच्याकडे ह्या शब्दाची व्युत्पत्ती बाईलभाडे अशी आहे. बायकोच्या/बाईच्या आज्ञेत असणारा (भाड्या हे प्रेमाचे मित्रसंबोधन) असा.
त्याचा बैलगाडीच्या भाड्याशी किंवा बैलाच्या भाड्याशी संबध नाही.

आदूबाळ's picture

24 Jul 2017 - 1:51 pm | आदूबाळ

हां! हे जास्त लॉजिकल आहे. धन्यवाद.

टायपो मिस्टेक झाली. बाईल भाडे हाच शब्द बरोबर आहे.

ते जाऊद्या..पण हा शब्द लयच आवडल्या गेला आहे..

अप्पा जोगळेकर's picture

24 Jul 2017 - 4:15 pm | अप्पा जोगळेकर

जो बायको भाड्याने देतो तो भाड्या असे राजवाडेंच्या पुस्तकात वाचले. म्हणून बाईलभाड्याचा अर्थ मला वेगळाच वाटला. असो.

चष्मेबद्दूर's picture

24 Jul 2017 - 8:22 pm | चष्मेबद्दूर

+११११

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jul 2017 - 8:41 pm | अमरेंद्र बाहुबली

काहीही असो. हि बाई नेहमी सर्व स्त्रियांच्या हिटलिस्ट वर असते. जर स्त्रियांची अतिरेकी संघटना असती तर हीचं काय झाल असतं?? :-)

सगळ्या शस्त्रांच्या कंपन्या बंद पडल्या असत्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jul 2017 - 12:39 am | अमरेंद्र बाहुबली

ह्या बाईंच काही वेळा खर वाटत. त्यांचं म्हणन बरोब्बर आहे. मुली कितीही पुढे गेल्या तरी घर सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच असते. त्या साठी काही तडजोडी कराव्या लागतात. पण हे आजकालच्या मुलींना समजत नाही. माझ्या काँलेजच्या मुली पाहील्या तर ह्या बाईंच म्हणण मला 100% पटतं. सगळ्या "आर्च्याच" तयार झाल्या तर "परश्यां" नी काय करायचं???

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2017 - 5:04 am | पिलीयन रायडर

मुली कितीही पुढे गेल्या तरी घर सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच असते.

कोण म्हणलं?

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jul 2017 - 10:51 am | अमरेंद्र बाहुबली

प्रत्येक गोष्ट कोणीतरी म्हणायलाच पाहिजे का? हे सामाजिक संकेत आहेत.

का म्हणे स्त्रीयांची जबाबदारी आहे???? बायकोने कमावलेला पैसा जर गॉड लागतो तर करावं की थोडं संसारासाठी आपणही घरातलं काम. कराव्या की थोड्यातरी तडजोडी नवऱ्याने.आणि एकुणात ज्या पुरुषांना एवढाच इगो प्रॉब्लेम असेल त्यांनी करूनच नाही लग्न.
ज्या पुरुषांना बायकोला मदत करण्यात काही कमीपणा वाटत नाही ते करतील लग्न.
आणि हजार आरची तयार झाल्या तरी परशा का तयार व्हावा.आरची एक अक्कल नसेल पण परशा तर हवी ना.
आता बाकी चालू द्या माझा पहिला आणि शेवटचा प्रतिसाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Jul 2017 - 3:34 pm | अमरेंद्र बाहुबली

घर सांभाळन म्हणजे फक्त घरातली कामे करणं असं का गृहीत धतात तुम्ही. घर सांभाळन्याचा अर्थ नाती सांभाळण हा पण होतो. घरात सासू सासर्यांची अडगळ वाटणेे, वाट्टेल ते बोलणे, वेगळ रहायला जाण, हे काय स्त्रियांच्या सुधारणेचे लक्षण आहे का? आणि ह्याला ज्या स्त्रिया सुधारणा म्हणतात. त्या शिकलेल्या अडाणी म्हटल्या पाहिजेत.

त्रिवेणी's picture

24 Jul 2017 - 5:34 pm | त्रिवेणी

मला आजपर्यत वाटत होतं की सासुच फक्त बोलते.
मुळात काय आहे टाळी एका हाताने वाजत नसते.
घरात नवीन आलेल्या मुलीला मेरी सुनो पद्धतीने वागवलं की नंतर तीही सुनावेलच.
नाती सांभाळणे ही काय फक्त सुनेची मक्तेदारी नाही य.
मान दिला तर मान मिळतो. म्हणून प्रत्येकानेच मर्यादेत रहावं.

थिटे मास्तर's picture

24 Jul 2017 - 1:14 am | थिटे मास्तर

आईच घर आणि नवरा ज्यांच्च आवडत क्षेत्र किंबहुना अपेक्षित क्षेत्र असेल त्या लेडी अण्णा हजारे पासुण (ल.लसुण) काय अपेक्षा करू शकतो नाय ? बैल बिचारा काय सहन करत असनार.

थिटे मास्तर's picture

24 Jul 2017 - 1:15 am | थिटे मास्तर

आईच घर आणि नवरा ज्यांच्च आवडत क्षेत्र किंबहुना अपेक्षित क्षेत्र असेल त्या लेडी अण्णा हजारे पासुण (ल.लसुण) काय अपेक्षा करू शकतो नाय ? बैल बिचारा काय सहन करत असनार.

भाकर्या बडवणे हे cheap labour आहे.

मनिमौ's picture

24 Jul 2017 - 12:04 pm | मनिमौ

प्ररश्या आणी आर्ची च्या सिनेमात सुधा आर्ची वेळ पडेल तेव्हा पुढे होऊन परशाची जागा भरून काढतेय.शुन्यातून सुरूवात करून नायक नायिका पुढे नीटनेटका संसार करताना दाखवलेत. ह्यालाच सहजीवन म्हणतात ना? प्रियकराला मार खाण्यापासून वाचवणारी आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहणारी पण त्याच वेळी परिस्थिती सुधारण्यासाठी बरोबरीने राबणारी आरची दिसली नाही वाट्टे

या धाग्यावरचे पिराताईंचे एकूण एक प्रतिसाद पटले आहेत.

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 12:47 pm | कोंबडी प्रेमी

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट ...माझे म्हणणे धाग्या पेक्षा पिरा तैं च्या प्रतिसादात जास्त नेमके उतरलेत हे पुन्हा एकदा म्हणते

या निमीत्ताने पिरातैंनी स्वतःचा आयडी बदलावा आणि "फ्रंट रायडर" करावा अशी नम्र सुचवणूक. :D

सामान्य वाचक's picture

24 Jul 2017 - 1:04 pm | सामान्य वाचक

स्त्रियांवरच अन्याय, पुरुषांवरचा अन्याय हा अपर्णाताईंचा मुद्दा नाहीये, नसावा.
(खरे तर त्यांचा मुख्य मुद्दा ' मला परत परत बोलवा' हा आहे, असे वाटले ती क्लिप बघून. पण ते असो.)
त्यांचे म्हणणे असे असावे की बायकांची मुख्य आणि अनिवार्य जबाबदारी हि घर सांभाळणे हीच आहे. इथंपर्यंत सग्गळे बरोबरच आहे. पण हि लग्न करणाऱ्या प्रत्येकाची मुख्य आणि अनिवार्य जबादारी आहेच, स्त्री किंवा पुरुष दोघांची. फक्त बायकांची नव्हे.
आणि घर सांभाळणे म्हणजे भाकऱ्या करणे, नवरा चिडला कि पाणी पिणे , कायम दुय्यम भूमिका घेणे , हा जो अर्थ आहे , त्याबद्दल कोपरापासून नमस्कार.

याच न्यायाने गुलामगिरी ची पद्दत सुद्धा पुनरुज्जीवीत करायला हवी. हे सगळे गुलाम आपल्या हक्काबद्दल जागृत झाले आणि हामेरिका आणि मित्रमंडळी यांच्या कडील मधली शेकडो वर्षांची दैदिप्यमान संस्कृती लयाला गेली.

थोर्थोर कुटुंबव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जी फक्त बायकांची, आणि टू बी स्पेसिफिक, सुनांची , आहे, हे मत कुणाला वादग्रस्त आणि चुकिचे वाटत नाही का?
बायकांचा कोंडमारा आणि घुसमट करणारी , तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी हि कुटुंबव्यवस्था कशासाठी टिकवावी? ( हेच वाक्य 'बायका' या ठिकाणी ' पुरुष' असे लिहूनही वाचा.) नवरा बायको दोघांनीही सामंजस्याने जबाबदारी वाटून घेऊन संसार करावा, हे बरोबर नाही का?

नवऱ्याच्या आई वडिलांचा आदर करावा, जरूर करावा. पण एक माणूस म्हणून त्यांचे वागणे वावगे असेल, तरीही निव्वळ वय झाले म्हणून त्यांच्या वागण्यापुढे मान तुकवावी? ते सुनेला किमान एक माणूस म्हणून आदर देणार नसतील, तर तिने ही तो देण्याची आज्जीबातच गरज नाही.

दोघांच्याही आवडीप्रमाणे, कपॅसिटी प्रमाणे आणि इच्छे प्रमाणे कामे वाटून घ्यावीत आणि असल्या सेल्फ प्रोक्लेम्ड बै आणि बुवा ना इग्नोरावे.

आणि घर सांभाळणे म्हणजे भाकऱ्या करणे, नवरा चिडला कि पाणी पिणे , कायम दुय्यम भूमिका घेणे , हा जो अर्थ आहे , त्याबद्दल कोपरापासून नमस्कार.

घर सांभाळणे म्हणजे अन्न न बनवणे, नवरा चिडला कि त्याच्या डोक्यावर पाण्याचा माठ फोडणे आणि कायम आढ्यतापूर्ण भूमिका घेणे असे आहे का?

न्यायाने गुलामगिरी ची पद्दत सुद्धा पुनरुज्जीवीत करायला हवी.

गुलामगिरची पद्धत बदलली आहे, पण गुलामगिरी प्रचंड फोफावली आहे. हो, पण ते असो.

थोर्थोर कुटुंबव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जी फक्त बायकांची, आणि टू बी स्पेसिफिक, सुनांची , आहे, हे मत कुणाला वादग्रस्त आणि चुकिचे वाटत नाही का?

त्या ती बुडवत आहेत अग्रणीपणे, म्हणून त्यांना उद्देशून विधान आहे. त्या फक्तचा तसा अर्थ नाही कि पुरुषांनी बुडवत राहावी आणि बायकांनि वाचवत राहावी.

बायकांचा कोंडमारा आणि घुसमट करणारी , तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी हि कुटुंबव्यवस्था कशासाठी टिकवावी?

वरच्या विधानाप्रमाणे ती सर्वानी टिकवावी. इथे ती नकोच. काही तरी एक स्टँड घ्या.
आणि कोणत्या कोंडमारा आणि घुमसट व्हायची म्हणे? माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी? कुठुन उचलल्या ह्या फ्रेजेस? माणूस म्हणून जगायचा अधिकार नाकारणारी व्यवस्था असती एवढ्या ६५ कोटी बायका दिसल्या असत्या का आज?
कधि १९७० किंवा १९८० चे सिनेमे पाहिलेत? ते आईचं प्रस्थ (प्रेयसी पेक्षा जास्त) आठवतं?
साड्यांचे किती प्रकार आहेत? कांजीवरम, पैठणी, पटोला, कायनू , बायनू.... धोतरांचे किती प्रकार आहेत? लुंग्यांचे किति प्रकार आहेत? म्हणे जगण्याचा अधिकार नाकारणारी ...

नवरा बायको दोघांनीही सामंजस्याने जबाबदारी वाटून घेऊन संसार करावा, हे बरोबर नाही का?

मग ताई काय म्हणत आहेत? सामंजस्य नसावं? जब्बाबदारी फक्त बायकांनी घ्यावी?
त्या ज्या केसमधे सामंजस्य नाही तिथे "त्यांचे उपाय" सांगत आहेत. आणि ते किमान ५०% बरोबर आहेत.

पण एक माणूस म्हणून त्यांचे वागणे वावगे असेल, तरीही निव्वळ वय झाले म्हणून त्यांच्या वागण्यापुढे मान तुकवावी? ते सुनेला किमान एक माणूस म्हणून आदर देणार नसतील, तर तिने ही तो देण्याची आज्जीबातच गरज नाही.

पण हे वर्तन योग्य आहे असे आपल्या माय बापाशी भावनिक गुंतवणूक असणार्‍या मूर्ख सेंटिमेंटल नवर्‍याला कसे पटवणार यावरही मार्गदर्शन करा.

दोघांच्याही आवडीप्रमाणे, कपॅसिटी प्रमाणे आणि इच्छे प्रमाणे कामे वाटून घ्यावीत आणि असल्या सेल्फ प्रोक्लेम्ड बै आणि बुवा ना इग्नोरावे.

भावा (ऑर...) ती बाई ट्रबल्ड केसेस बद्दल बोलतेय. जे अलरडी सुखी आहेत त्यांना तिची गरज पडली नाही तर तिला आनंदच आहे. ती एक अत्यंत निस्वार्थ समाजसेविका आहे हे विसरत आहात.

घर सांभाळणे म्हणजे अन्न न बनवणे, नवरा चिडला कि त्याच्या डोक्यावर पाण्याचा माठ फोडणे आणि कायम आढ्यतापूर्ण भूमिका घेणे असे आहे का?
-----------------------------------------------------------------------------------------
असे कुठे दिसले माझ्या प्रतिसादात? एखादी गोष्ट काळी नाही, असे म्हटले याचा अर्थ ती पांढरी आहे असा होतो का?
उगीच वडाची साल पिंपळाला लावू नका.

गुलामगिरची पद्धत बदलली आहे, पण गुलामगिरी प्रचंड फोफावली आहे. हो, पण ते असो.
-----------------------------
इररेलेव्हन्ट आहे.

त्या ती बुडवत आहेत अग्रणीपणे, म्हणून त्यांना उद्देशून विधान आहे. त्या फक्तचा तसा अर्थ नाही कि पुरुषांनी बुडवत राहावी आणि बायकांनि वाचवत राहावी.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अर्रर्रर्र, परत तेच. स्त्रियांनी काय संस्कृती बुडवली? आणि संस्कृती म्हणजे नक्की कधीची? ५० वर्षे पूर्वीची, का १००? का २०० कारण या सगळ्या काळात वेगवेगळ्या चालीरीती ( ज्याला लोक संस्कृती म्हणतात) अस्तित्वात होत्या. माणूस म्हणून काही इच्छा आकांक्षा असणे आणि त्या धीटपणे मांडणे, याने संस्कृती बुडत असेल, तर बुडो बापडी. साडी, कुंकू, बांगड्या हि संस्कृती का? नक्की संस्कृती म्हणजे काय अभिप्रेत आहे ते आणि स्त्रिया ती कशी अग्रणीपणे बुडवत आहेत तेही, स्पष्ट लिहा.

वरच्या विधानाप्रमाणे ती सर्वानी टिकवावी. इथे ती नकोच. काही तरी एक स्टँड घ्या

ती टिकवायची असेल तर दोघांनी , सगळ्यांनी टिकवा. फक्त स्त्री ला चचचच टिकवण्याची गरज, समज आणि इच्छा नसावी.

आणि कोणत्या कोंडमारा आणि घुमसट व्हायची म्हणे? माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणारी? कुठुन उचलल्या ह्या फ्रेजेस? माणूस म्हणून जगायचा अधिकार नाकारणारी व्यवस्था असती एवढ्या ६५ कोटी बायका दिसल्या असत्या का आज?
-----------------------------------------------------------------------
उपरोधिक बोलायचे तर बोला. फार मागचा काळ नाही आहे जेंव्हा तुमच्या संस्कृतीमध्ये बायकांना शिकायचा, बाहेर पडायचा , नवऱ्याच्या माघारी धडके कपडे घालण्याचा, धडके खाण्याचा , केस ठेवण्याचा हक्क नव्हता. अजूनही परिस्थिती नॉर्मल ला आली आहे का हो?
या वरती काउंटर अटॅक म्हणून ४ केसेस फेकू नका बायकांनी अन्याय केल्याच्या. त्या केसेस मान्य आहेतच, पण याचा अर्थ बाकीच्या ९६ केसेस मध्ये पण दम नाही , असे म्हणू नका.

कधि १९७० किंवा १९८० चे सिनेमे पाहिलेत? ते आईचं प्रस्थ (प्रेयसी पेक्षा जास्त) आठवतं?
साड्यांचे किती प्रकार आहेत? कांजीवरम, पैठणी, पटोला, कायनू , बायनू.... धोतरांचे किती प्रकार आहेत? लुंग्यांचे किति प्रकार आहेत? म्हणे जगण्याचा अधिकार नाकारणारी ...

------------------------------------------------------------
या वर तर हसण्याशिवाय दुसरे काय करणार?

नवरा बायको दोघांनीही सामंजस्याने जबाबदारी वाटून घेऊन संसार करावा, हे बरोबर नाही का?
मग ताई काय म्हणत आहेत? सामंजस्य नसावं? जब्बाबदारी फक्त बायकांनी घ्यावी?
त्या ज्या केसमधे सामंजस्य नाही तिथे "त्यांचे उपाय" सांगत आहेत. आणि ते किमान ५०% बरोबर आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
असे दिसले नाही. पुरुषांनी सुद्धा जबाबदारी घ्यावी, असे मला एकही क्लिप मध्ये दिसले नाही. तुम्हाला कुठे सापडले, ते शेअर करा कृपया

पण हे वर्तन योग्य आहे असे आपल्या माय बापाशी भावनिक गुंतवणूक असणार्‍या मूर्ख सेंटिमेंटल नवर्‍याला कसे पटवणार यावरही मार्गदर्शन करा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
एखादी योग्य गोष्ट करायला जमत नाही, किंवा धाडस नाही,किंवा सध्या मार्ग दिसत नाही, याचा अर्थ अयोग्य गोष्ट सुरु ठेवणे हे योग्य आहे असा होतो का ?
आणि या बाईनी पण मूर्ख सेंटिमेंटल नवर्‍यासाठी चार मौक्तिके सांगितली तर बरे. माझा तेव्हडा अधिकार असता, तर मी पण भाषणे दिली असती कि,

भावा (ऑर...) ती बाई ट्रबल्ड केसेस बद्दल बोलतेय. जे अलरडी सुखी आहेत त्यांना तिची गरज पडली नाही तर तिला आनंदच आहे. ती एक अत्यंत निस्वार्थ समाजसेविका आहे हे विसरत आहात.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निस्वार्थी असू शकेल हि. पण ट्रबल्ड केसेस सोडवण्याचा हा मार्ग नाही.
सगळी निस्वार्थी माणसे पूजनीय नसतात. स्वतःचा स्वार्थ नसतानाही लोकांना नकळतपणे त्रासात टाकणारी माणसे असतात.
एका गालावर थोबाडीत दिली, तर दुसरा गाल पुढे करा. म्हणजे क्लॅशेस होणार नाहीत. असे सोल्युशन आहे हे.

मी ना विनोद करत आहे ना तर्कट लढवत आहे.

पैसा's picture

25 Jul 2017 - 9:02 am | पैसा

हुश्श! आली बै एकदाची संस्कृती! मी कधीपासून वाट बघत होते! =))

b

वरील आणि जालावरील रामतीर्थकर म्याडमच्या क्लिप एकूणच त्यातील अतार्किकता, अट्टाहास, अतिरेकीपणा , 'मी म्हणते...' इ. गोष्टींमुळे पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ पाहवेना हो !
आता क्लिप ऐकलीच नाही, तर त्यावर टिप्पणी करण्याचा नैतिक अधिकार नाही, म्हणून पाssस !

अभ्या..'s picture

24 Jul 2017 - 1:47 pm | अभ्या..

मी काय म्हणतो. "टाका केस तिज्यायला". एक पिढीच नव्हे तर पिढ्यानपिढ्या होलसेलमदे बिघडवयाची नुक्सानभरपाई मागावी रग्गड.
हुवुंदे धुरळा.

लॉल. या बाईंनी सनी लिओनवर पण केस टाकली आहे

https://m.facebook.com/258089797708735/photos/a.262219283962453.10737418...

आदूबाळ's picture

24 Jul 2017 - 4:14 pm | आदूबाळ

बहुतेक जुन्या संगीत नाटकांसारखं पॉर्नमध्येही पुरुषपार्टीने स्त्रीभूमिका कराव्यात अशी त्यांची मागणी असावी.

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 6:29 pm | कोंबडी प्रेमी

हे डोक्यावरून पाणी गेलंय LOL

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांची सनी लिओनच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंद अश्लीलतेच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे सर्वत्रच्या महिला प्रमुखांनी अनुकरण करावे !
सोलापूर, १८ मे ( वार्ता.) - येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अधिवक्त्या सौ. अपर्णा रामतीर्थकर यांनी अश्लील चित्रपटांतील अभिनेत्री सनी लिओन हिच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक श्री. साळुंखे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सायंकाळपर्यंत यावर निर्णय घेतो, असे आश्वाासन दिले. या वेळी माजी आमदार श्री. शिवशरण (आण्णा) पाटील, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी, हिरालाल तिवारी, बापू ढगे, यशपाल चितापुरे, रमेश आवार, सत्यनारायण कनकी, श्याम निमकंटी यासंह २५ जण उपस्थित होते.

arunjoshi123's picture

24 Jul 2017 - 2:01 pm | arunjoshi123

मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले.

हे विधान खालिल गोष्टींची समरी आहे:
१ . पारंपारिक भारतीय समाजाबद्दलचे अज्ञान
२. आधुनिक पुरोगामी स्त्रीवादी विचारांची हौस
३. जेनेरिक मोघम विधाने चिकित्सा न करता स्वीकारण्याची प्रवॄत्ती.
४. लिंग हा अन्याय करण्याचा आधार असू शकतो ही विचित्र धारणा
५. समाजरिती आणि गुन्हेगारिता आणि विकृती यांच्यातला भेद, त्यांची समाजातली प्रमाणं न पाहण्याची प्रवृत्ती.
६. काय बोलायची फॅशन आहे त्याचा अनंत सोस
७. पुरुषप्रधानता म्हणजे समतेच्या विरोधार्थी शब्द अशी धारणा
८. काम म्हणजे अन्याय नाही हे न कळणे
९. मूलतःच पुरुष जात पिढ्या न पिढ्या विकृत असताना, अचानक कोणत्या गुणसूत्रीय बदलामुळे सुधारली त्याबद्दलचे अज्ञान
१०. बायकांनी आत्तापर्यंतच्या पिढ्यांत केलेली जी ऐश आहे तिला एकदम राईट ऑफ करून टाकायचे इतिहासाचे अज्ञान
११. भाषेचे दौर्बल्य वापरुन ९०% वंचना इतर स्त्रीयांनी केली असल्याचे लपवणे, आणि ऑटोमॅटिक डोळ्यासमोर फक्त पुरुष येणे.
१२. आपल्या हजारो पिढ्यांच्या आज्ज्या महामूर्ख होत्या असा भ्रम
१३. मनुष्यात इतकी बुद्धिमत्ता विकसित झाली नाही कि त्याला आपल्यावर अन्याय होतो आहे हे हजारो वर्षे न कळावे.
१४. नक्की कशापासून वंचित ठेवले? लोकांकडे असं काय काय होतं जे त्यांनी लेकिंना आणि बायकांना दिलं नाही? आणि एवढं वंचित ठेऊन जगल्या वाचल्या कशा? अगदी मानवांत ज्या वंशांना वंचित ठेवले गेले ते सगळे नष्ट झाले, मग बायकाच बर्‍या उरल्या? असे संभ्रम सामान्यांत निर्माण करणे.
१५. बायकांना वंचित ठेवणे ही पुरुषांची जनुकीय प्रेरणा होती कि अनीश्वरीय द्रव्यवाद होता याची अस्पष्टता.
१६. बायकांना वंचित ठेवण्याचे नक्की फायदे पुरुषांना काय काय होतात याची माहीती नसणे.
१७. समाज म्हणजे चार बामनाच्या आणि आठ मराठ्याच्या बायका अशी लघुदृष्टी
बाकीच्या विधानांबद्दल काय बोलावं! म्हणे तर्काधिष्ठित मांडणि हवी.
===========================================
या विधांनाचा टोन माझी प्रेझेंटेशनची स्टाईल आहे. आपल्या व्यक्तित्वाचा आणि संवादातील सहभागाचा आदर आहेच.

विशुमित's picture

24 Jul 2017 - 2:14 pm | विशुमित

दोनदा वाचली तरी डोक्यावरून गेलं.

मान्य आहे, भयंकर क्लिष्ट मुद्दे आहेत ते.

कृपया थोडे सोपे करून सांगाल का?

८. काम म्हणजे अन्याय नाही हे न कळणे

हा मुद्दा घ्या. (सगळेच सांगणं असंभव आहे.)
=================
स्त्रीयांना पिढ्यान पिढ्या खूप काम करावे लागत असे (संक्षेप= चूल आणि मूल) आणि हा अन्याय होता असं म्हणलं जातं. पण अन्याय नाही. हे फक्त काम आहे. तुमच्या कडून काम करून घेऊन तुम्हाला पैसेच नाही दिले तर काम देखिल अन्याय ठरतं. पण पुरुषप्रधान एकत्र कुटुंब पद्धतीत ६०-७० पैकी प्रत्येकालाच काम करावे लागे आणि एक कर्ता सोडून कोणालाच पैसे मिळत नसत. म्हणून यात स्त्रीयांचा वेगळा उल्लेख करायची करायची नाही. स्त्रीयांना जशी ही कामे करावीलागतं, तशी पुरुषांना काही कामे करावी लागतच. शेती करणे, पोती उचलणे, बाजारात जाणे, पूजा करणे, इ इ. काम ही वाटून घेतली होती आणि सर्वसाधारणपणे ती सगळ्यांना समान होती.
मध्यंतरीच्या काळात लोकांनी शेती सोडून दिली (बर्‍याच) आणि आधुनिक जीवन अवलंबलं (मुलांना शाळेत घालणे, घरात खूप मशिन्स असणे, होम डेलिवरी). म्हणून पुरुषांची कामं संपली आणि बायकांची डबल झाली.
================
पण ह्याचा आणि पिढ्यान पिढ्यांचा काय संबंध? ज्या बाईचा नवरा मे महिन्यात उन्हातान्हात नांगर हानतो, हळदिचे पोतेच्या पोते दिवसभर उचलून पिवळाजर्द पडतो किंवा पावसात चिखलात पेरणी इ इ करतो तिच्या तोंडून "स्त्रीयांवर पिढ्यां पिढ्या अन्याय झाला." हे विधान आणून पहा (काम आणि अन्याय या संदर्भात फक्त).

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Jul 2017 - 3:42 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुमचा प्रतिसाद आवडला! सहज आणि सोपा!

arunjoshi123's picture

24 Jul 2017 - 3:53 pm | arunjoshi123

धन्यवाद.
त्या समरीतले सारे मुद्दे असेच आहेत. त्यांना दिलेली शीर्षकं सुचक आहेत.

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 3:56 pm | कोंबडी प्रेमी

एक कर्ता सोडून कोणालाच पैसे मिळत नसत ह्या कर्त्याचा वरचष्मा का ?
मला वाटत चर्चा थोडी भरकटली आहे

चर्चा अर्थातच मी प्रचंड भरकटावली आहे.
तुमच्या लेखातली जी "पिढ्यान पिढ्यांच्या अन्यायाची" जी गणेशवंदना आहे, केवळ तिच्याबद्दल तो प्रतिसाद आहे. विषयावर नाही.

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 3:22 pm | कोंबडी प्रेमी

कै म्हणजे कैच कळले नाही

यशवंत पाटील's picture

24 Jul 2017 - 2:18 pm | यशवंत पाटील

काय खर नाही राव हे.
व्हिडो पाहिला. बाजारात कायपण विकता येतं, विकणारा पाहिजे.
इकडं काही कमेंटा वाचल्यावर मंग अपर्णामॅडमना काय म्हणुन टाळ्या पडतात हे कळंत.

खर म्हणजे पुरुषाला पायजे तितक्या बायका करायची पर्वानगी द्यावी - एक चंद्रावर जायला, एक भाकरी थापायला अशा. रागवल्यावर पाणी प्यायला बी येक वेगळी असू दे लागली तर.
पण मंग असच बाईने म्हणलं तर पुरषाने रागेजू नये म्हंजे झालं.
जमणारे का ते बघाव ज्याच-त्यान.

पण मंग असच बाईने म्हणलं तर पुरषाने रागेजू नये म्हंजे झालं.
जमणारे का ते बघाव ज्याच-त्यान.

का म्हणे पुरुष रागवतील? असं तुमच्या मनात का आलं?

वेल, तुम्हाला वेळ नाही, रस नाही हा भाग वेगळा, पण याच विषयावर तिची मूल्य (असह्य) वेगळी आहेत म्हणून त्या क्लिप्स पाहूच शकत असणार्‍या बायका पाहून मनोरंजन झालं. डोळ्यासमोर एक क्लिप तरळलि.
=======================
आपल्या आजूबाजूचे लोक हे एका विशिष्ट प्रमाणाच्या पुढे तार्कीक, बुद्धिमान, सुशिक्षित, रॅशनल, अनालीटिकल, नैतिक, मॅनर्ड, शिष्ट, इ इ असावे हा काय दुराग्रह आहे? इतकं सगळं असलं तरच आम्ही तुम्हाला एंटरटेन करणार, नाहितर नाही. अरे काय प्रयोगशाळेत बसला आहात का जीवन जगत आहात? तुमची लेकरं पण तुम्हाला एखादं इल्लॉजिकल विधानं म्हणाली तर त्याला कल्प्नाविश्वात रमू न देता लगोलग करेक्ट करता कि काय? चिल्ड्रेन आरे सपोज्ड टू बी अबसर्ड टू सम एक्सटेंट. People are supposed to be illogical, irrational, absurd, idiosyncratic, clumsy, ill-mannered, illiterate, unethical, immoral, negative, etc. We should allow people to have these qualities and should still entertain them till a threshold. हि थ्रेशोल्ड अगदी खूप खाली आणणं चूक असावं.
================
व्यक्तिची तर्कशक्ती, बुद्धिमत्ता इ इ हे त्याला किती एंटरटेन करायचं याचे कसे निकष होऊ शकतात? माझ्या मते हे रेसिझम, जातियवाद यांच्यासारखंचं क्रूर आहे. कारण तर्कबुद्धी इ इ ईश्वरदत्त असतात ( किंवा नैसर्गिक, जे काय सोयिचं), हातात नसतात माणसाच्या. त्यामुळे या निकषांवर लोकांना कमी लेखणं, कमि सन्मान देणं, आदर न करणं, इ इ क्रूर असावं. त्यामुळे विचार न स्वीकारणं इ इ योग्यच आहे, पण नुसतं ऐकायचं म्हटलं तर शिसारी?
================
या प्रतिसादाशी कंसिस्टंट राहाण्यासाठी, तुमच्या अव्हर्जनची पण थोडीशीस्विकती.

एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत

सुरुवातीलाच बजावतात, एके ठीकाणी नाही.
=========================================
स्त्रीवाद्यांना मंचावर गोंधळ घालू नये, किंवा अगदी सभ्य प्रगल्भ वाद ही घालू नये अशी त्यांची इच्छा दिसते. ज्यांना पटेल त्यांना परंपरावादाचे, धर्माचे महत्त्व सांगायचा त्यांचा हेतू दिसतो.
स्त्रीवाद्यांसोबत वादाचे, संवादाचे, विवादाचे अनुभव कटू असावेत, कदाचित अयशस्वीही असावते.

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 3:30 pm | कोंबडी प्रेमी

एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात

हे त्यांच्या अनेक क्लिप्स किंवा क्लिप्सचे जे तुकडे फिरत आहेत त्यांच्या पैकी एका तुकड्याच्या सुरुवातीला आहे.

गामा पैलवान's picture

24 Jul 2017 - 2:47 pm | गामा पैलवान

पिराताई,

हे कोण टिकोजीराव लागुन गेलेत लोक जे सांगणार की कुणाच्या भुमिका काय? मी माझं पाहिन की.

माझं मी पाहीन की! यू सेड इट!!!

नेमकं हेच हल्लीच्या अनेक जोडप्यांना पाहता येत नाहीये. म्हणूनंच तर ते अपर्णाबाईंकडे जाताहेत. अशा वेळेस बाईंना शून्यातून सुरुवात करावी लागते.

एकदम मोठी आकडेमोड करता येत नाही. छोटेछोटे पाढे अगोदर घोटवून घ्यावे लागतात. पाढे म्हणतांना का हा प्रश्न विचारायचा नसतो. ते फक्त पाठ करायचे असतात. ते मन लावून केल्यास हळूहळू एकेक आकडा ओळखीचा होऊ लागतो. मग एकशेएकसष्ट म्हणजे तेवीसची सातपट हे आपोआप उमजू लागतं. क्यालक्युलेट्राची बटनं दाबंत बसायची वेळ येत नाही.

अपर्णाबाईंचा सल्ला स्वत:चं स्वत: पाहता येणाऱ्यांसाठी नाही.

आ.न.,
-गा.पै.

पाढे म्हणतांना का हा प्रश्न विचारायचा नसतो.

चूक. पाढे शिकताना 'का' हा प्रश्न विचारायचाच असतो.

अहो आबा ते पाढे ' म्हणताना ' म्हणतायत ..
तुम्ही ' शिकताना ' म्हणताय ...
मला तर दोन्ही बरोबर वाटतय ..

काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे.

फार भारी वाक्य वाटतं वाचायला, पण एकदम खोखलं आहे. म्हणजे, उद्या दलितांनी ब्राह्मणांना मारायला सुरुवात केली तर ती सामाजिक प्रतिक्रिया? अशी अतिरेकी प्रतिक्रीया दिसते का आजूबाजूला? स्त्रीयांपेक्षा दलितांवर जास्त तीव्र अन्याय झाले ना? मग ती प्रतिक्रिया तर अजून ठळक दिसायला पाहिजे! पण असं काही होताना दिसत नाही.
समाज मंजे काय न्यूटनच्या प्रयोगातली रिजीड वॉल आहे का मॅथेमॅटिकल रिअ‍ॅक्शन द्यायला? रिअ‍ॅक्शन द्यायला हजारो वर्षे का म्हणे लागली? आत्ता काय झालं म्हणे ज्यामुले एकदम रिअ‍ॅक्शन वैगेरे देणं चालू झालं? कशाचा नाईलाज, पापं झाकायला कुठलेही दाखले द्यायचे!

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 3:32 pm | कोंबडी प्रेमी

ह्या व्यमिश्रतेच्या उत्कलन बिंदू वर आहेत त्यामुळे आपण स्वत: किंवा इतर कुणी जरा इस्कटून सांगितल तर पुढे बोलता येईल ...

arunjoshi123's picture

24 Jul 2017 - 4:03 pm | arunjoshi123

व्यामिश्रतेच्या उत्कलनबिंदूवरून उतरून सरलतेच्या बाष्पीभवनबिंदूला येऊन सांगतो -
ऐतिहासिक सामाजिक अन्यायाची प्रतिक्रिया म्हणून लोक आता वाईट वागत नाहीत. वाईट वागायला आत्ता जिवंत असलेलं कारण असलं पाहिजे. म्हणून त्या प्रकारच्या इतिहासात अन्याय झालेल्या लोकांनी आत्ताची पापं झाकायला इतिहासातल्या अन्यायाचे दाखले देऊ नयेत.
उदा.
१. आरक्षण आपण "आज" दलितांची स्थिती सुधारावी म्हणून ठेवतो, मागच्या अन्यायाचा बदला म्हणून सवर्णांना नोकर्‍यांवरून काढत नाही.
२. मुसलमान राजांनी मागे अन्याय केले म्हणून मुसलमानांना आत्ता बघून घेतले पाहिजे असे आपण म्हणत नाही. "आज" त्यांचं वागणं १९४७ च्या पेक्षा रिस्कि आहे का इतकं पाहतो.

ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??

ज्यांनी क्लिप पाहिलि नाही ते मिसगाईड होतील. मुलाला शब्दही बोलल्या नाहीत असं यांनी का लिहिलं देवं जाणो!! पण समजा नाहीतही तरी फरक पडत नाही. मुलगी म्हणते गरोदरपणात माझी किती पगार बुडते आणि अपर्णाताई म्हणतात असल्या मशिनला मी मूल देणार नाही. या उदाहरणात तुम्ही त्या मशिनच्या विरोधात काहीच न बोलता अपर्णाताईच्या विरोधात बोलता हे देखिल एक नवल आहे.

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 3:37 pm | कोंबडी प्रेमी

ज्यांनी क्लिप पाहिलि नाही ते मिसगाईड होतील.
--त्यांनी क्लिप आधी बघावी
मुलाला शब्दही बोलल्या नाहीत असं यांनी का लिहिलं देवं जाणो!!
--त्यांनी क्लिप आधी बघावी
पण समजा नाहीतही तरी फरक पडत नाही.

मुलगी म्हणते गरोदरपणात माझी किती पगार बुडते आणि अपर्णाताई म्हणतात असल्या मशिनला मी मूल देणार नाही. या उदाहरणात तुम्ही त्या मशिनच्या विरोधात काहीच न बोलता अपर्णाताईच्या विरोधात बोलता हे देखिल एक नवल आहे.

--म्हणजे ह्यात मशीन ती मुलगी आहे का जोडपे ? माझ्या मते ते जोडपे! ..पण अपर्णाताई अक्कल शिकवतात ती त्या मुलीला ..मातृत्व हे वरदान आहे दिव्य आहे (किंवा ह्याच धर्तीवर चे काहीतरी)

arunjoshi123's picture

24 Jul 2017 - 4:30 pm | arunjoshi123

मुलगी का जोडपे? जोडपे?
जोडपे का कुटुंब? कुटुंब! माझ्यामते त्यांनी जोडप्यांच्या आईबापाला, भाऊ बहिणांना देखिल बोलायला पाहिजे. का नाही?
कुटुंब कि समाज? समाज! शेवटची मटेरियालिझम तिने समाजातूनच उचलला. अपर्णाताई, इतक्या लोकांना तिला एकटिला कशा बोलू शकतात! नै का?
=====================
काये, तिचं उत्पन्न मुल झाल्यानं बुडणार. असं व्हावं का नाही हा निर्णय नवर्‍याने घेतला असता तरी "निर्णय लादणारा नवरा" म्हणून बडवला गेला असताच. आता बाजूला उभा राहिला म्हणून बडवला जावा अशी अपेक्षा दिसतेय.
अपर्णाताईंचं स्पष्ट मत दिसतं कि जग खड्ड्यात जाओ, स्त्रीचं आई होणं सगळ्यात महान आहे. सबब मुलीच्या आई बनण्याच्या इच्छेला विरोध केला असता तरच अपर्णाताई त्याला "बोलल्या" असत्या. पण असं काही नाही ना?
=====================
बाय द वे, त्याला काय बोलायला हवं होतं? अरे कशाला मरायला दत्तक घेत आहेस "बायकोच्या गरोदरपणाच्या काळातले पैसे वाचवायला?" हेच ना? नै, म्हणजे यानं हे सिद्ध होईल कि आपण बायकांनी करियर सोडून मुल बघायला पाहिजे असं आपलं मत आहे. असं आहे का?

पिशी अबोली's picture

24 Jul 2017 - 2:56 pm | पिशी अबोली

५ मिनिटांवर ऐकवत नाही यांचं म्हणजे सात्विक ढिन्चॅक पूजा दिसतात या तर!

यांची काही मते पटत नसली तरी एंटरटेनमेंट बघून बघू शकतो. दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय पहिली बाजू समजावून सांगता येत नाही.

दुसरी बाजू समजून घेतल्याशिवाय पहिली बाजू समजावून सांगता येत नाही.

प्रतिक्रियांचे इतके बेसिक नियम माहित नसून हेच लोक त्या तथाकथित हजारो बर्षांच्या पिढ्यान पिढ्यांच्या अन्यायाबद्दल बोलतात.

पहिला भयंकर बोअर आहे. दुसरा ओके. तिसरा ते सातवा किमान एकदा तरी ऐकावेत. डायरेक्ट तिसरा चौथा चालू केला तरी फरक पडत नाही. मी अगोदर ४ ते ७ पाहिले, मग १ ते ३.
========================
बायकांनी अवश्य ऐकावेत. दोन स्त्रीयांमधे काय काय नाती असू शकतात आणि त्या प्रेत्यक नात्यात काय वर्तन असायला पाहिजेत हे असलं कंटेंट एकमेव इथे आहे. ऐकायला लई भारी आहे. तुम्ही या सगळ्या पलिकडचे असाल इ इ तर त्यांचे विनोदमूल्य देखिल चूकवू नये. शिवाय त्या "पुरुषांना अक्कल नसते. ते प्रत्येक गोस्ष्ट बायकांना विचारू करतात." इ इ सांगत होत्या तेव्हा मला तो "मातृ मोड" कामाचा वाटला. त्यांनी सांगितलेलं साला ते पर्स्सनल लाइफ मधे फिट्ट बसतं.

साला मिसळपाव म्हणजे ब्लॅकहोल आहे. एकदा प्रतिसाद आत गेला मंजे कायमचा गेला. त्यातला आकार उकार देखिल दुरुस्त करता येत नाही. लोकांना कळायचे वांदे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Jul 2017 - 3:46 pm | हतोळकरांचा प्रसाद

हाहाहा! त्या वरील प्रतिसादातील साला बद्दल का? समजून घेतले आम्ही ते सल्ला आहे :)

अप्पा जोगळेकर's picture

24 Jul 2017 - 4:21 pm | अप्पा जोगळेकर

काय ठरल मग ?

विशुमित's picture

24 Jul 2017 - 4:36 pm | विशुमित

इतक्या लवकर?

अजून लय किस (खिस) पडायचा बाकी आहे.

नीलमोहर's picture

24 Jul 2017 - 4:25 pm | नीलमोहर

या सगळ्यात कामाचा एकच शब्द दिसला 'भाकरी',
विषय निघालाच आहे तर कृपया कुणीतरी छान पापुद्रा सुटलेली पातळ भाकरी कशी करायची याचीही कृती द्या.
आणि भाकरी बडवण्याची नको, करण्याची कृति हवी हां प्लीज, धन्यवाद.

ती भाकरीच एक (बडवायला) जमत नाही, तीही बाकी कुणासाठी जाऊदे, स्वतःला आवडते म्हणून करायचीय,

त्रिवेणी's picture

24 Jul 2017 - 5:43 pm | त्रिवेणी

मलाही खूप आवडते भाकरी. मी रोजच बदडते भाकरी.
तर पापुद्रा सुटलेल्या भाकरीची कृती- पीठ कोमट पाण्यात भिजवावं आणि हाताच्या तळव्यांनी खूप रगडाव म्हणजे छान होते भाकरी आणि पापुद्राही सुटतो तिचा.
सॉरी ह कोंबडी धागा वर अवांतर गप्पा सुरु झाल्या.

समजा शेगडी (हॉब) नसेल तर कशी करायची याबद्दल काही टिप आहे का? ओव्हनमध्ये होईल का?

त्रिवेणी's picture

24 Jul 2017 - 6:08 pm | त्रिवेणी

नाही हो हॉब ची कल्पना नाय आम्हा गरिबांना, साधी शेगडी आहे आमच्याकडे आणि ओव्हन मध्ये पापड भाजण्यासारख्या कठीण रेसिपी करते मी फक्त.

आदूबाळ's picture

24 Jul 2017 - 6:19 pm | आदूबाळ

नाय हो - हॉब (म्हणजे शेगडी) नैये. हॉट प्लेट आहे. भाकरी भाजायला ज्वाळा लागतील. त्या कुठून आणायच्या याच्या विचारात आहे.

सामान्य वाचक's picture

24 Jul 2017 - 8:01 pm | सामान्य वाचक

म्हणजे पोळीसारखी . थेट ज्वाळांवर नाही भाजले तरी होते

पोळीसारखी म्हणजे तेवढी पातळ? नाही हो - भाकरी कशी सणसणीत जाड पायजे.

रुपी's picture

25 Jul 2017 - 1:29 am | रुपी

आदूबाळ,
तुम्ही हे वापरुन बघू शकता. फुलके करण्यासाठीही फार उपयुक्त आहे.
सा.वा.नी लिहिलंय तसं पोळीसारखी तव्यावरही भाजू शकता. पातळ करायची गरज नाही. जी बाजू शेगडीवर धरायची असते, ती तव्यावर टाकून सुती कापडाने एकेका भागावर थोडासा दाब देऊन देऊन भाजायची, छान पापुद्रा निघतो भाकरीचा.
शिवाय भाकरीचे पीठ दुकानातून आणलेले कधीकधी फार जुने असते, त्याच्या चांगल्या भाकरी होत नाहीत. त्यात थोडेसे गव्हाचे पीठ मिसळायचे आणि भिजवायला गरम पाणी वापरायचे.

पिलीयन रायडर's picture

25 Jul 2017 - 1:45 am | पिलीयन रायडर

ही चर्चा जास्त उपयुक्त आहे!

भाकरी कशी बनवावी ही चर्चा मराठी लोकांच्या संकेतस्थळावर व्हावी ही गोष्ट लज्जास्पद आहे. माझ्या कोअर अशा मराठी असण्याच्या ओळखींशि भाकरी हा शब्द अगदी केंद्रात येत असावा.
====================
सबब प्रतिसाद नियमित (९५%+) पोळी खाणार्‍या माझ्यासारख्या लोकांना डिवचण्यासाठी दिलेला आहे.

तुमचा चष्मा ज्या रंगाचा आहे तसं जग दिसतं, अजो.

वरची सगळी चर्चा 'भाकरी बनवणे थापणे 101' या प्रकारचं गाईड नाही. वरच्या सगळ्या माऊल्यांना भाकरी थापता येते याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही.

चर्चा आहे 'विशिष्ट constraints मध्ये भाकरी कशी थापावी' यावर.

सस्नेह's picture

25 Jul 2017 - 12:04 pm | सस्नेह

भाकरी 'थापणे' नव्हे हो आबा, भाकरी 'बडवणे' !

आदूबाळ's picture

25 Jul 2017 - 12:23 pm | आदूबाळ

बडवणे is derogatory.

सस्नेह's picture

25 Jul 2017 - 4:49 pm | सस्नेह

correct ! त्यांचा हेतू तसाच वाटतो आहे.

त्रिवेणी's picture

25 Jul 2017 - 11:17 am | त्रिवेणी

बघा किती मी अज्ञानी.

एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ?

उगंच आपलं काय बी. अपर्णाताईंनी सगळेच पर्न्यूटेशन्स काँबिनेशन्स सांगीतले नाहीत. एकुलता एक मुलगा हि केस कवर केली आहे. एकुलती एक मुलगी हि केस कवरच केली नाही. पण मंजे त्या केस मधे त्या काही "टेरिबल" करत आहेत असा उगंच काय म्हणायचं?
तुम्ही असं इंप्रेशन देताय की एकुलत्या एक मुलीच्या केसमधे त्या काहीतरी विचित्र सांगताहेत, जे काही खरं नाही. त्या फक्त त्यांची स्वतःचीच केस सांगत असतात असं लार्जली दिसतं.

ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”

इथे पण तुम्ही अर्धवट माहीती देऊन वाचकांना मिसलिड करत आहात. मुळात खोटे बोलणे हा उद्देश नाही, पण सासू मला फोन करते, खास माझ्याकरिता सवता फोन करते असे इंप्रेशन सुनांना द्यावे, असे त्या म्हणत आहेत. हे इंप्रेशन तिथेच लांब बोल्लून मुलगा घालवेल म्हणून त्याला ऑफिसातून बोलायला सांगतात.
हे खोटं बोलणं हार्मलेस आणि बेनेव्होलेंट आहे. घरातल्या सर्व बायकांचे परस्परसंबंध गोड असावेत याकरिता एक पायरी पुढे जावी असं त्या सांगताहेत.

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 6:14 pm | कोंबडी प्रेमी

हे खोटे बोलणे नाही ? कशासाठी इतके खोटे ??

रेवती's picture

24 Jul 2017 - 6:31 pm | रेवती

हे खरे की खोटे यात पडण्यापेक्षा मुदलातली गोष्ट ही आहे की नव्या सुनांना (जावयांबद्दल वेगळ्या धाग्यावर बोलू) पूर्वीच्या सुनांसारखा त्या घरात रुळायला वर्षानुवर्षाचा वेळ उपलब्ध नसतो. नव्या घरात रुळण्यासाठी हाडाची काडं करायला व स्वत:ला सिद्ध करायलाही वेळ नसतो. दिवस बदललेत. त्यांना रुळण्याची जशी गरज आहे तशी सासरच्या लोकांनाही नव्या सदस्यास रुळवून घेण्याची गरज आहे. याला हात पुढे करणे म्हणतात. पूर्वी नव्या सुनेस महत्व देण्याची गरज भासत नव्हती. सत्रा पोरे व त्यांच्या सत्रा बायका असत. आता एक नाही तर दोन मुलगे आणि त्यांच्या तेवढ्याच बायका! माझ्या वहिन्या नव्या असताना मी फक्त त्यांच्यासाठी त्यांच्या सेलफोनवर बोलत असे. त्यावेळी संभाषणात फक्त त्यांना मह्त्व दिले होते. मी असे करणार हे भावांच्या लग्नाआधीच आईवडिलांना सांगितल्याने त्यांना चुकवून काहीतरी करतिये हा प्रकार नव्हता. खात्रीने सांगते की त्या फार्फार खूष झाल्या. माहेरी एकुलत्या मुली असतात, फारतर आणखी एक बहिण पण त्यांनाही मुलाइतकेच महत्व देऊन वाढवलेले असते. सासरी त्यांना कोणी असे विचारले की बरे वाटते. माझ्या भावावरील प्रेम मला व्यक्त करायचे असल्यास त्याच्या बायको मुलांवर मी ते करू शकते. तीच गिफ्ट, आणखी कोणतीही नाही. आपल्या मुलावरील, मुलीवरील प्रेम त्यांच्या लग्नानंतर व्यक्त करताना आधी त्यांच्या जोडीदाराची दखल घेतल्यास चांगल्या अर्थी फरक पडतो.
रामतिर्थकरबाई त्याबद्दलच म्हणतायत. सगळे त्यांनी सांगितलेले फॉलो करायला नको. आपण आपल्याला पटेल असे वळवून घेऊ की! त्या बाईंनीही विचार करायला हवा की आज इतके लोक्स आपल्याला ऐकतायत तर प्रत्येक उदाहरण योग्य शब्दात द्यावे म्हणजे गैरसमज होऊ नये.

arunjoshi123's picture

24 Jul 2017 - 6:35 pm | arunjoshi123

नि:पक्ष प्रतिसाद.

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Jul 2017 - 7:15 pm | हतोळकरांचा प्रसाद

प्रतिसाद आवडला, बहुतांशी सहमत! साधारणपणे हेच सांगायचं प्रयत्न वर करून पहिला. त्यांच्या बोलण्यामागचा उद्देश बदलल्याने त्यांच्या वाक्याचा अर्थ बदलतोय!

काही मते आत्यंतिक वाटली तरी मतितार्थ लक्षात घेऊन अशी मते दुर्लक्ष करणे मी वैयक्तिकरित्या पसंत करेन!

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2017 - 7:36 pm | पिलीयन रायडर

जगातल्या प्रत्येक गोष्टीतुन एक चांगला अर्थ काढता येतो. हिटलरच्या वागण्यातुनही जाज्वल्य राष्ट्रभक्ती अशीच पाहिली जाऊ शकतेच की.

प्रश्न तुम्ही ओव्हरऑल काय सांगताय हा आहे. बाईंचे १००% म्हणणे टाकाऊ आहे असं कुठेय? जगात १००% टाकाऊ काहीच नसते. पण म्हणुन तुम्ही लोक त्या चार दोन मुद्द्यांखाली बाईंचे बाकीचे चुकीचे मुद्दे लपवु नकात ना.

अवांतर - जसे टोकाच्या स्त्रीवादाला फेमिनाझी म्हणले जाते, तसे स्त्रियांवर अन्याय झालाच नाही असे म्हणणे. किंवा स्त्रीयांच्या समस्यांबद्दल चर्चा चालु असताना "पण बायका सुद्धा चूक वागतात" असे म्हणुन समस्यांना नाकारण्याचा प्रयत्न करणे, कायद्याचा दुरुपयोग होतो ह्या आरड्या ओरड्याखाली मुदलात कायदा करण्याची वेळ आपल्या देशात आहेच आणि बहुतांश वेळा तो कायदा योग्य कारणासाठी वापरावा लागतोय ह्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणे हया प्रकाराला काय नाव द्यावे?

हिटलरच्या वागण्यातुनही जाज्वल्य राष्ट्रभक्ती अशीच पाहिली जाऊ शकतेच की.

तर्कशास्त्राचा प्रथमोल्लेख आपणच केलेलात. हिटलर राष्ट्रवादी होता म्हणून प्रत्येक राष्ट्रवादी हिटलर नसतो असा त्याचा एक नियम आहे. सबब तर्कशास्त्र असे वापरू नये.

यांच्या समस्यांबद्दल चर्चा चालु असताना "पण बायका सुद्धा चूक वागतात" असे म्हणुन समस्यांना नाकारण्याचा प्रयत्न करणे

सॉरी, त्या स्त्रीयांच्या समस्या या विषयाबद्दल बोलतच नाहीत. उलट त्या ज्या विषयावर बोलत आहेत (संस्कृती, कुटुंबव्यवस्था, गृहसौख्य, नाति, इ इ) मधे आपण फुकाच स्त्रीयांच्या समस्या घुसडत आहात.

कायद्याचा दुरुपयोग होतो ह्या आरड्या ओरड्याखाली मुदलात कायदा करण्याची वेळ आपल्या देशात आहेच आणि बहुतांश वेळा तो कायदा योग्य कारणासाठी वापरावा लागतोय

असं अजिबात नाही. कायदा आणि कायद्या दुरुपयोग हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. दोन्हीसाठी लोकांनी बोललं पाहिजे. कायदा निरुपयुक्त आहे असं त्या म्हणत नाहीत. त्यांनी पाहिलेल्या कायद्याच्या दुरुपयोगाच्या केसेस त्या मांडतात आणि अशी दुर्वर्तनं करणार्‍या स्त्रीयांनी ती करू नयेत असं म्हणतात.
====================
आय थिंक पिपल हेअर आर हायली बाय्स्ड इन जजींग हर.

कोंबडी प्रेमी's picture

24 Jul 2017 - 7:52 pm | कोंबडी प्रेमी

आय थिंक सम पिपल हेअर आर हायली बाय्स्ड इन सपोर्टिंग हर.

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2017 - 7:59 pm | पिलीयन रायडर

१. अपर्णाबाईंच्या काही मुद्द्यांमध्ये तथ्य असु शकते, पण म्हणुन त्यांच्या प्रत्येक मुद्द्यात तथ्य असेलच असे नाही. हे ही तर्कशास्त्रच सांगते.

२. तो मुद्दा अपर्णाबैंना लागु नव्हताच, आपणच अपर्णाबाईंना मध्येच घुसडत आहात. तस्मात घाई करु नकात. नीट वाचा.

३. पुन्हा एकदा, नीट वाचा. ही दोन्ही वाक्ये प्रतिवाद चालु असताना वारंवार दिसणार्‍या वृत्तीला आहेत. अपर्णाबाईंचा त्याच्याशी संबंध नाही. ह्या (किंवा अशा प्रकारच्या) चर्चेतल्या लोकांचा आहे.

आपणही नीट वाचा अशी विनंती, ही उपचर्चा थेट अपर्णाताईंच्या स्वतःच्या (मी ऐकलेल्या, इथे यांनी लेखात कोटलेल्या) विधानावरून झाली आहे. मधे अन्य कोणाचाही उल्लेख नाही.
============
मी इथे "सोशल मीडियावरील जनरल कंटेंटचा" डिफेन्स करत नाहीये. लेखिकेने १००% अपर्णाताईंना क्वोट केलेलं आहे. आणि मी फक्त त्याच विधानांबद्दल बोलतोय जि मी स्वतः ऐकली आहेत त्यांच्या भाषणात.

हातोळकरसाहेब, वाक्यातील मर्म जाणून घेऊन बाकीचे दुर्लक्षित करणे योग्य आहे पण त्या बाई जे धडाधड बोलत चालल्यात त्यातून अजूनही जास्त टक्के लोकांना जे समोर बोलतायत तेच खरे वाटायची शक्यता सर्वाधिक आहे. आपलं डोकं लावून त्यातून योग्य अर्थ काढणे, तो आपल्या परिस्थितीला जोडतानाचे बदल करणे वगैरे करत बसत नाहीत. "हां, आता अपर्णाबाई म्हणतायत ना, कर तू भाकरी गोल, नको विंचरूस तू तुझे केस, शिकू नकोस, किंवा शिकलीस तरी घरातच बैस" वगैरे. त्यामुळे वक्त्याने जबाबदारीचे भान ठेवायला हवे. आज आपण बोलतोय ते तसेच्या तसे अप्लाय झाले तर त्यातून त्या कुटुंबाला संघर्षाला सामोरे जावे लागू शकते. एखादे चुकिचे मत घेऊन महिला जर "मी आई आहे, माझे फक्त ऐकायचे" असे सारखे करायला लागली कसे व्हायचे? काही महिन्यांपूर्वी खफवर यांचा विषय निघाला होता. परदेशी राहणार्‍या मुलांवर यांनी असेच तोफगोळे डागले. त्या इतक्या अद्वातद्वा बोलत होत्या की यांच्या भाषणांवर आक्षेप का घेऊ नये? असा प्रश्न पडला.

arunjoshi123's picture

24 Jul 2017 - 8:02 pm | arunjoshi123

चला हे संभव आहे असं मानू.
=========================================
पण हे पुरोगाम्यांच्या भडक प्रसारामुळं देखिल होत नाही का? म्हणजे यांच्या प्रसाराचे जे संभाव्य दुस्पपरिणाम अविचारी लोकांत संभव आहेत, तेच कडक स्त्रीवाद्यांच्या विचारांचे अतिविचारी लोकांवर होतात. म्हणून स्त्रीवाद थांबवायचा?
१. ४० वर्शांपर्यंत लग्न न करणार्‍या करियर महर्षी बायका.
२. मला बंधनं नकोतच म्हणून मुक्त संबंध ठेवणार्‍या बायका.
३. मुलाला पाळणाघरातच सडवणार्‍या बायका
४. मला लग्नच नको, मुलेच नको म्हणणार्‍या बायका
५. समानतेच्या हक्कापोटी सगळे संबंध नासवून बसलेल्या बायका
६. जळि स्थळी काष्ठी पाषाणी पुरूषांचे अन्याय पाहणार्‍या बायका
७. नोकरी सोडावी लागेल म्हणून बदली झालेल्या पतिला डच्चू देणार्‍या किंवा कायमचेच दूर राहणार्‍या बायका
८. प्रॉपर्ती विभागायची म्हणून विकायला लावणार्‍या बायका
९. सासरा, सासू वृद्धाश्रमात पाठवणार्‍या बायका
१०. नवर्‍याकडून एक किमान सुखासिनता नाही मिळाली तर त्याचे जीवन त्राही करून सोडणार्‍या बायका

ही सगळी उत्पत्ती स्त्रीवादाच्या हिरिरिने केलेल्या प्रचाराची नाही का? ओवरड्राइव म्हणा. पण ज्यांचा सदुद्देश असेल त्यांना स्त्रीवादाच्या मूलभूत प्रसारापासून कसे परावृत्त करता येईल?

असे जर पुरोगाम्यांकडून होत असेल तर त्याही बाबतीत तोच उपाय लागू आहे. डोके चालवा व आपण कुठे थांबणे आवश्यक आहे हे ओळखा.
१. त्यांना चाळीस नै चारशे वर्षांपर्यंत लग्न करायचे नाही तर त्यांचा प्रश्न आहे.
२. स्त्रीने मुक्त संबंध ठेवताना पुरुष पार्टनर लागतो हे लक्षात घेणे (किंवा उलटही). आता तो अविवाहित व सज्ञान असेल, करियरमुळे आत्ताच लग्न नको असेल, करायचेच नसेल तर ती त्यांची गरज आहे म्हणून सोडून द्या. जर बाईने विवाहित (व त्या अर्थी सुखी) पुरुषाबरोबर गळेपडूपणा केला तर ते वाईटच की! त्या बुवानेही आपले लग्न वाचवण्यासाठी आटापिटा करायला हवा. आज महिला घराबाहेर पडताना रोज स्वसुरक्षेचा विचार करतात. अगदी रस्त्यावरील सुरक्षिततता ते सार्वजनिक वाहनव्यवस्था, हापिसातील सुरक्षितता. तसा पुरुषांना तितक्या टक्के प्रमाणात करावा लागत नाही म्हणून ते अजूनही बर्‍या अवस्थेत आहेत म्हणायला हवे. (वाईट तर आहेच पण तरी त्यातल्यात्यात)
३. आपल्याकडे वर्क फ्रॉम होमचा पर्याय जेंव्हा आणखी वाढेल तेंव्हा थोडेफार सुसह्य होईल पण एका मुलासाठी निदान ४ चर्षे दोन्हीकडील आजी आजोबा, व मुख्य आईवडील यांना काळजी घ्यावी लागते. तब्येतीच्या तक्रारी किंवा आणखी काही गंभीर कारण सोडता तो प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे.
जर आर्थिक गरज असेल तर नवरा बायकोला पाळणाघराशिवाय इलाज नाही. त्या चार वर्षांनंतर मात्र महिलांनी अर्थार्जनास इच्छा दाखवली तर तिची दखल घेणे याला उपाय नाही.
४. लग्न व मुले नको असणार्‍यांचा तुम्हाला काय त्रास आहे बुवा?
५. एरवी पंचविशीतल्या सुनेच्या एकखांबी आधारावर संसाराचा डोलारा उभे करू पाहणार्‍यांनी जरा काही वर्षे नातेवाईक सांभाळणे, आर्थिक कसरत, मुलेबाळे संगोपन, एवढेच करून पहावे मग जीव घुसमटेल. असे बोलण्यात कश्याला ठेवायचे. आजपासूनच जिज्ञासुंनी सुरुवात करण्यास हरकत नाही. एकट्यानं सगळं सांभाळायचं. बायको करेल की मदत, नाही कोण म्हणतय. यात तिच्याकडील नातेवाकांची मने साम्भाळणे वगैरे राहू द्या, नवर्‍याने आपल्या आईवडिलांची, भावा बहिणींची, काकाकू, मामा मामी अशांची मने सांभाळून पहावित.
६. तिन्हीत्रिकाळ बायकांना पुरुषांचे अन्याय का दिसतात याची प्रत्येकिची वेगळी कारणे असू शकतील व ती कुटुंबाप्रमाणे बदलतील. उदा. कोण म्हणेल नवरा दा रू पिऊन मारतो (त्यावर दुसरी म्हणेल, अगं मारतो तर मारतो, कुंकवाला धनी तरी आहे) तर कोण म्हणेल मला घरात बसवून दोन पोरे अंगावर टाकून हा नोकरीचा टेंभा मिरवतो (दुसरी म्हणेल मलाही असा नवरा मिळायला पाहिजे होता. हितं आम्हाला नोकरीशिवाय इलाज नाही) किंवा असेच काही.
माझेच उदाहरण द्यायचे झाले तर माझ्या नवर्‍याला स्वभावत:च कमी बोलायला आवडते. एकटीलाच बडबडत रहावे लागते हा माझ्यावर अन्याय आहे राव! मी म्हणते की! (त्यावर मैत्रिण म्हणते बरय बाबा तुझं, आमच्याकडे हा सारखा बडबडत असतो)
७. नवर्‍याला डच्चू मिळत असेल तर त्यांच्यात संसाराचे नाते तयार झाले नाही असे म्हणावे. मग जे झाले ते बरेच झाले.
बायको दूर राहते व त्यात तिला काही अडचण नसेल तर पुन्हा तेच! नवर्‍याची तक्रार आहे ना? त्याचा फायदा आहे बायको जवळ राहण्यात, बायकोलाही नवर्‍याचा फायदा आहे असे वाटले पाहिजे. (फायदा- शारिरिक, मानसिक, आर्थिक गरज याशिवाय सहजीवनातील आनंद, सपोर्ट वगैरे अनेक गोष्ती आहेत)तसे नसेल म्हणून ती रहात नसेल. मुलांच्या शाळांचे प्रश्न असतील. नातेवाईकांचा सपोर्ट लांब राहून पुरेसा मिळणार नसेल. असंख्य कारणे असतात. आपल्याला वरवर काहीतरी दिसते व आपण तेच मनात धरून बसतो.
९. हे हे हे. माझ्या आजेसाबा आहेत वृद्धाश्रमात.. मुलाने, सुनेने पाठवलेले नाही. आग्रहाने व आपणहोवून आनंदाने गेल्यात. तब्येत छान आहे व मनसोक्त जगतायत. संसाराचा एका पॉईंटला कंताळा येतो. अगदी सून गरम पोळी पानात वाढत असली तरी एकूणच संसार बघण्याचा कंताळा येतो. हे एक कारण पण आजकाल जागांचे प्रश्न, देखभाल करणार्‍या मनुष्याचे प्रश्न, विचित्र आजारपणे, आपला संसारावरील हक्क न सोडणे वगैरे कारणाने त्यांना जावे लागत असेल. माहित नाही नक्की कारण! कोणाचे काय तर कोणाचे काय........
८. प्रॉपर्टी का विभागतायत ते कायदेशीर कारण कोणते हे आपण कसे ठरवणार? जोवर सगळे कायदेशीर आहे, डोकी फोडत नाहीयेत तोवर बरेच आहे. एकदा एक घर बांधले, शेती घेतली अमूक खरेदी केली नि तमूक वाढवले असे असले की त्यात पुढच्या पिढीत, त्याच पिढीत बदल होणे हे निसर्गचक्र आहे. बदल हे होणारच!
१०. नवर्‍याकडून मिळणारी किमान सुखासिनता हा मोठा विषय आहे. प्रत्येक जोडप्याचा अत्यंत जवळचा व त्यांचाच असलेला. विश्वासू नातेवाईक असतील तर आणि काऊन्सेलर व आणाखी जबाब्दार व्यक्तिंनी सोडवण्याचा. तो व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने ज्याच्यात्याच्यावर सोडून द्यावा. सरसकटीकरण नकोच. ही आपली मर्यादा जर ओळखली तरी बरेच वाद कमी होतील. उदा. काल आम्ही नातेवाईकांना भेटलो. बोलण्याबोलण्यात, लहानसान चेष्टेतून समोरच्या नवराबायकोत (त्यांच्यातच, आमचा संबंध नाही) एकदम एक सिरियस वाक्य आल्यावर आम्ही दोघे (मी व नवरा) गप्प बसलो. ती अशी गोष्ट होती की यापुढे आमच्या ज्येष्ठतेच्या हक्कापेक्षा गप्प राहणे, आवश्यक होते. आम्ही मध्यस्थीही करायला गेलो नाही. दोन मिनिटात संभाषणाची गाडी पुन्हा रुळावर आली. यात लगेच बायकोला "किती तक्रारी करतेस? मोठी पोझीशन असलेला नवरा हवा मग तो प्रवासाला जाणारच, लांब राहणारच" वगैरे ऐकवण्यात अर्थ नाही. त्या दोघांना एकत्र टाईम स्पेंड करायला मिळत नाही हे सत्य आहे. उगीच त्यात पोझिशन वगैरे आणण्यात हाशील नाही. उलट त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे पण आजकालच्या ताण असलेल्या जीवनशैलीमुळे हे होते. काय करणार? आपली मर्यादा ओळखणे. गप्प बसणे.

असे जर पुरोगाम्यांकडून होत असेल तर त्याही बाबतीत तोच उपाय लागू आहे.

चला, या संतुलनाबद्दल प्राजंळपणाबद्दल धन्यवाद.
============================
तशी पुढे चर्चेची आवश्यकता नव्हती, पण आपण विस्तारभयापोटी (हा शब्द मी देखिल वापरतो.) एकच उदाहरण घेऊ.

१. त्यांना चाळीस नै चारशे वर्षांपर्यंत लग्न करायचे नाही तर त्यांचा प्रश्न आहे.

कसा काय म्हणे? समजा उद्या त्यांनी चारच वर्षाचे असताना लग्न करायचे ठरवले तर? चाळिस नि ४०० आकडे तितकेच अशास्त्रीय आहेत. मरणोत्तर तसबिरिंच्या (४०० वर्षे वयाच्या कोवळ्या वयात) लग्नाची प्रथा आली तर? भारतीय अर्थव्यवस्थेमधे कोणि ४ रु फक्त दर्वर्षी कमवो वा ४०० लाख कोटी कमवो हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो का? तुम्ही रोज १ मिनिट झोपा नाहीतर २४ तास, तुमच्या मर्जीचा प्रश्न?
=======================
ज्या कोण्या महामूर्खाने देशांच्या घटनांमधे महान तत्त्वांच्या यादीत स्वातंत्र्य नावाचे मूल्य सर्वप्रथम म्हणून घातले त्याला आज पश्चात्तापाची पाळी येत असेल. या शब्दाकडे नीट निरखून पाहिल्यास असे लक्षात येते कि, महान असोच, स्वातंत्र्य हे एक मानवी जीबनाचे मूल्य तरी आहे का?
========================
समाजातल्या प्रत्येक व्यक्तिच्या वर्तनाचं सम टोटल समाजवर्तन असतं. प्रत्येकाचंच वर्तन ढळू लागलं तर समाजाचा समतोल बिघडतो.