‘लॉक बॉक्स’

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in तंत्रजगत
20 Jul 2017 - 2:28 am

https://photos.google.com/photo/AF1QipMhwWT_cIKlJmXrv-zVdm08FWsdSYf-f4Zyp7QBhttps://photos.google.com/photo/AF1QipOZ1xFUEsTDlMPPpBVuwIuEdGTGpgn_vyUCxIYo
‘लॉक बॉक्स’

इथे अमेरिकेत एक नाविन्यपूर्ण गोष्ट पाहायला मिळाली आणि ती म्हणजे ‘लॉक बॉक्स’. ह्यात दरवाज्याची चावी ही त्याच दरवाज्याच्या हँडलला अडकवलेल्या एका मेटल बॉक्समध्ये ठेवलेली असते. हा मेटल बॉक्स देखील एका कॉम्बिनेशन नंबरने बंद केलेला असतो. ज्याला तो कॉम्बिनेशन नंबर माहित असतो तोच फक्त तो मेटल बॉक्स उघडून त्यातली चावी घेऊन दरवाजा उघडू शकतो.

आता ह्याचे फायदे बघुया. समजा घरी चारजण राहत असतील, नवरा, बायको, मुलगा आणि मुलगी. घराबाहेर पडताना कोणालाही चावी बरोबर घेऊन जावे लागत नाही. दरवाजा लॉक करून, चावी त्या पेटीत ठेवून, त्या पेटीवरचे कॉम्बीनेशन नंबर फिरवून ती पेटी लॉक करून निर्धास्त बाहेर पडू शकतात. ना चावी सांभाळायची कटकट ना प्रत्येकासाठी वेगळी चावी बनविण्याची जिकीर. घरी परतल्यावर कॉम्बिनेशन नंबर फिरवून चावी काढायची आणि घर उघडायचे.

ह्याचा दुसरा उपयोग घरी काम करायला येणाऱ्या कामगारांसाठी होतो. इथे कित्येक वेळा घरातील मंडळी ऑफिस किंवा शाळेत गेली असताना, घराची साफसफाई करणारी, पेस्ट कंट्रोल वगैरे करणारी मंडळी येतात. पूर्वी घराची चावी दाराबाहेरील कार्पेटखाली, दिव्याच्या स्वीचवर वगैरे ठराविक ठिकाणी ठेवली जायची. कामगार मंडळी येत, त्या विविक्षित ठिकाणाहून चावी घेत, घर उघडून काम करून, निघताना पुन्हा त्याच जागी चावी ठेऊन निघून जात. अशा लोकांसाठी देखील हे लॉक बॉक्स उपयुक्त ठरू लागले आहे.

ह्याचा तिसरा उपयोग म्हणजे, कित्येक वेळा हे लॉक बॉक्स, भाड्याने देण्यासाठी उपलब्ध असलेल्या घरांना लावलेले असते. कॉम्बीनेशन लॉकचा नंबर, इस्टेट एजंटला माहित असतो. ज्यावेळी ते घर ग्राहकांना दाखवायचे असते त्यावेळी ते लॉक उघडून एजंट ते घर दाखवू शकतो. एकाच एजंटकडे एकाच वेळी अनेक घरे भाड्याने देण्यासाठी अथवा विकण्यासाठी असतात. अशा वेळी त्या एजंटला प्रत्येक घराची चावी बरोबर घेऊन फिरण्याची, सांभाळण्याची गरज भासत नाही व त्याचे काम खूपच सुकर होते. हो, त्याला त्या कॉम्बीनेशन लॉकचा नंबर माहित असणे गरजेचे असते.

हे लॉक बॉक्स, अंडर कंस्ट्रक्शन घरासाठी देखील फार उपयोगी ठरते. ज्यावेळी अशा घरात एकाच वेळी सुतार, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशियन वगैरे मंडळी काम करत असतात, त्या प्रत्येकाला कॉम्बीनेशन लॉकचा नंबर दिला जातो. ही सर्व मंडळी आपापल्या सवडीनुसार येऊन, घर उघडून काम करतात व काम आटोपल्यावर चावी त्या बॉक्समध्ये ठेवून निघून जातात. आपल्या नेहेमीच्या लॉक पद्धतीत जवळ चावी नसल्यामुळे, घरात प्रवेश करायला जो खोळंबा होतो तो ह्या सिस्टीममधे होत नाही व चावी हरवायची देखील भीती राहत नाही.

आणि हो, एकदा का काम आटोपले की त्या कॉम्बीनेशन लॉकचा नंबर पुन्हा बदलता येतोच त्यामुळे घरात कोणी अनधिकृतरीत्या प्रवेश करायची भीती पण राहत नाही.

सोबत फोटो जोडले आहेत.

प्रतिक्रिया

एक प्रश्न - फक्त कॉम्बिनेशन लॉकच का नाही ठेवत दरवाज्याला? किल्लीची गरज काय?

कानडाऊ योगेशु's picture

20 Jul 2017 - 8:12 am | कानडाऊ योगेशु

कदाचित लॉक बॉक्स मध्ये चावीशिवाय इतरही गोष्टी ठेवता येत असाव्यात. म्हणजे घर उघड्ण्याआधीच्या सूचना वगैरे.

गामा पैलवान's picture

20 Jul 2017 - 12:15 pm | गामा पैलवान

अत्रे,

मला वाटतं की दाराला थेट क्रमसंयोग कुलूप (कॉम्बिनेशन लॉक) बसवलं आणि काही कारणाने जर क्रमसंकेत उघडकीस आला तर भलतीच पंचाईत होईल. याउलट जर स्वतंत्र खोक्याचा क्रमसंकेत फुटला तर तुलनेने कमी डोकेदुखी असेल.

आ.न.,
-गा.पै.

स्वतंत्र खोक्याचा क्रमसंकेत फुटला तर तुलनेने कमी डोकेदुखी असेल.

सारखाच धोका असेल असे वाटते. कारण लॉक बॉक्स चा संकेतक्रम कळाला की किल्ली लगेच मिळेल. वेगळा फायदा काहीच दिसत नाही (एक्स्ट्रा गोष्टीत त्यात ठेवण्याशिवाय).

संजय पाटिल's picture

20 Jul 2017 - 1:45 pm | संजय पाटिल

संकेतक्रम तुम्हाला हवा तेव्हा बदलता येतो!

संकेतक्रम तुम्हाला हवा तेव्हा बदलता येतो!

कॉम्बिनेशन लॉक च्या तुलनेत जास्त फायदा दिसत नाही असे म्हणायचे होते. (किल्लीच्या तुलनेत नाही)

रामपुरी's picture

20 Jul 2017 - 11:09 pm | रामपुरी

हि लॉकबॉक्स पद्धत दहापट स्वस्त असते हाच फक्त त्याचा फायदा. असे लॉक कुणी वापरात असलेल्या घरात वापरलेले बघितले नाही. ते फक्त विकायच्या किंवा बांधत असलेल्या घरालाच वापरतात.

सौन्दर्य's picture

20 Jul 2017 - 11:25 pm | सौन्दर्य

विकायच्या किंवा बांधत असलेल्या घरासाठी ही पद्धत उत्तमच आहे. माझ्या माहितीतल्या एका घरात काही विद्यार्थी शेअरिंग बेसिसवर राहतात, ते असले लॉकबॉक्स वापरतात.

सौन्दर्य's picture

20 Jul 2017 - 11:22 pm | सौन्दर्य

दाराच्या लॉकचा नंबर किंवा बॉक्सच्या लॉकचा नंबर ह्यातील कोणताही नंबर उघडकीस आला तरी त्याने नुकसान सारखेच होणार.

सौन्दर्य's picture

20 Jul 2017 - 11:17 pm | सौन्दर्य

मला वाटते एकच लॉकबॉक्स विविध प्रॉपर्टीसाठी वापरात येण्यासाठी ते असे घराच्या दरवाज्यापासून सुटे असावे असे मला वाटते.

धर्मराजमुटके's picture

20 Jul 2017 - 12:56 pm | धर्मराजमुटके

कल्पना चांगली आहे पण ती भारतात अंमलात आणणे धोक्याचे होईल. इथे आपण घरात असतांना लोक डोळ्यासमोर घर साफ करतात तर आपण नसतांना काय करतील ? दुसर्‍याची वस्तू कितीही चांगली असली तरी तिला आपण हात लावू नये एवढा सुक्ष्म विचार आपण करु शकू तेव्हाच हा लॉक बॉक्स भारतात वापरता येईल.

धर्मराजमुटके's picture

20 Jul 2017 - 6:10 pm | धर्मराजमुटके

परदेशी लोक्स एकंदरीतच सुरक्षेच्या बाबतीत निष्काळजी दिसतात. बेल / दरवाजा वाजला की डायरेक्ट दार उघडतात. मग बाहेरचा डायरेक्ट गोळीबार करतो.

आमच्या भारतात बघा, पहिले की होल मधून बघणार, नंतर साखळी लावलेला दरवाजा किलकिला करणार नंतर सेफ्टी डोअर न उघडता बोलणार, साहेब घरात नाहीत नंतर या असे म्हणून दाण्णकण तोंडावर दरवाजा आपटणार. काहीतरी शिका म्हणावं :) :)

सौन्दर्य's picture

20 Jul 2017 - 11:19 pm | सौन्दर्य

हे कुलूप वापरण्यामागे खुपसा प्रामाणिकपणा आणि शिस्त (चावी परत बॉक्समध्ये ठेऊन बॉक्स बंद करणे वगैरे) अपेक्षित आहे.

यशवंत पाटील's picture

20 Jul 2017 - 2:04 pm | यशवंत पाटील

म्हणुन त्यांच्या सिनेमात कुणीबी बाहेरचा माणुस घरात येत असलं की काय अस वाटल ह्ये वाचुन.

कंजूस's picture

20 Jul 2017 - 3:35 pm | कंजूस

हे चौकटराजांच्या चालू युरोपवारीत दिलं आहे.
काही फायदा नक्कीच असणार.

खोलीची सफाइ करणारी महिला नंतर चावी खोक्यात न ठेवता गेली होती!

सौन्दर्य's picture

20 Jul 2017 - 11:27 pm | सौन्दर्य

मी ह्या लॉकबॉक्सचा फोटो जोडण्याचा प्रयत्न केला होता, पण मला तो दिसत नाही. वाचकांना तो दिसतोय का ?

त्याचे कॉम्बिनेशन सांगा ना.
त्याशिवाय कसे दिसणार?

सौन्दर्य's picture

20 Jul 2017 - 11:45 pm | सौन्दर्य

मी, मदत पानावर दिलेल्या सूचनांप्रमाणे फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न केला, पण मला काही केल्या प्रॉपर्टीज किंवा url लिंक दिसत नाही. मी पिकासा गुगलद्वारे फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय. कोणी मदत करू शकेल काय ?

तुम्हाला गूगल फोटोज म्हणायचंय का? पिकासा आता बंदच झालंय.
गूगल फोटोज जरा गोंधळात टाकणारं आहे. मला वाटतं एखादा फोटो शेअर करण्यासाठी तो तुम्हाला एखाद्या 'शेअर्ड' अल्बममध्ये टाकावा लागतो. ते केल्यावर फोटो उघडून राइट क्लिक करुन 'कॉपी इमेज अ‍ॅड्रेस' करा आणि ती लिंक आधी तुम्हाला गूगलमध्ये लॉग-इन न करता दिसते का ते बघा. त्यासाठी तुमच्या ब्राउजरची प्रायव्हेट विंडो उघडा आणि त्यात ती लिंक टाकून बघा. शिवाय, कधी कधी एखादा फोटो क्रोम मधून दिसतो पण इतर ब्राउजर्समधून नाही, त्यामुळे दुसर्‍या एका ब्राउजरमध्येही लिंक टाकून फोटो दिसत आहे की नाही याची खात्री करा.

हे सर्व माझ्या अनुभवांवरुन. इतर कुणाला सोपी पद्धत माहीत असेल तर लिहा.

सौन्दर्य's picture

21 Jul 2017 - 12:48 am | सौन्दर्य

रुपी जी, मदतीबद्दल खूप खूप आभार. मी हे फोटो शेअर करीत होतो, पण शेअर्ड आल्बम बनवत नव्हतो. तुम्ही सुचविल्याप्रमाणे हे फोटो आधी शेअर्ड आल्बममध्ये लोड केले आणि मग 'कॉपी इमेज अ‍ॅड्रेस' करून ते इथे पोस्ट केले. मदत पानावर ज्या काही स्टेप्स सुचवल्या आहेत त्याप्रमाणे फोटो आधी लोड केले होते पण ते दिसत नव्हते. तुम्ही सुचवलेली पद्धत एकदम सोपी आणि उपयुक्त आहे. अजून एक प्रश्न आहे - Alternative Text ह्या जागी काय लिहायचे ? मी तेथे फक्त एक टिंब टाकले कारण त्याशिवाय ओके बटन चालत नव्हते.

मदतीबद्दल पुन्हा धन्यवाद.

मीही टेक्स्टच्या जागी एखादे कॅरॅक्टर टाकते.
मदतपानावर लिहिलेल्या स्टेप्स आधी चालायच्या, पण मधल्या काळात गूगल फोटोजमध्ये बरेच बदल झालेत.
मी हे सर्व करुनही एक-दोन वेळा माझ्या फोटोजचा घोटाळा झालाच आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Jul 2017 - 8:36 pm | अमरेंद्र बाहुबली

सर्वात सोप्पी पध्दत!!! postimage ला जाऊन फोटो अपलोड करायचा. तिथे direct link काँपी करायची नी इकडे येऊन पेस्ट करायची. कसलीच झंझट नाही width 680 ठेवायची. height रिकामी. alternative text ला . ठेवायचा. सोप्प. (आभार~ कंजूस नी मोदक)

सौन्दर्य's picture

21 Jul 2017 - 12:40 am | सौन्दर्य

.

.

गामा पैलवान's picture

21 Jul 2017 - 3:03 am | गामा पैलवान

अत्रे,

सारखाच धोका असेल असे वाटते.

बरोबर. धोका सारखाच आहे. मला म्हणायचं होतं की जर क्रमसंकेत ढापायची युक्ती मिळाली तर दरवाजाचं कुलूप बदलण्यापेक्षा पेटी वापरणं थांबवलेलं बरं पडावं. क्रमसंकेत ढापण्यासाठी स्वनातीत (अल्ट्रासाऊंड) उपकरणे मिळतात असं ऐकून आहे.

आ.न.,
-गा.पै.

इरसाल's picture

21 Jul 2017 - 12:32 pm | इरसाल

तो बॉक्सच कोणी कापुन नेला तं ???????

सौन्दर्य's picture

21 Jul 2017 - 8:13 pm | सौन्दर्य

बॉक्सच कापून नेला तर त्याचा फायदा काय होणार ? चोरणारा तो बॉक्स आपल्या दरवाज्याला लावणार कसा ? दुसरे म्हणजे ह्या बॉक्सची किमत साधारणपणे ३० ते ५० डॉलर एव्हढीच असते. तेव्हढ्यासाठी कोणी हा उपद्व्याप करील असे वाटत नाही.

तसं पहायला गेलं तर इथे दोन अगदी परस्पराविरोधी विचारसरणी बघायला मिळतात. अगदी दहा डॉलरसाठी देखील खून पडतात तर कित्येक वेळा कुरियर कंपन्या ग्राहकाचे पार्सल त्याच्या घराबाहेर ठेऊन निघून जातात. त्या पार्सलला कोणी हात देखील लावत नाही.

शेवटी दरवाज्याचीकड्या-कुलुपे ही फक्त आपल्या मानसिक समाधानासाठीच असतात. एखाद्याने चोरी करायचीच ठरवली तर त्यात फारसे अवघड असे काही नाही. इथे टेक्सासमध्ये संपूर्ण घरंच लाकडाचे आणि शिटरॉकचे असते. एका धक्क्याने दरवाजा उघडू शकतो, आणि घरातील अलार्म वाजून पोलीस येईपर्यंत दहा-पंधरा मिनिटे सहज लागतात. तेव्हढा अवधी चोरासाठी पुरेसा असतो.

इथे टेक्सासमध्ये संपूर्ण घरंच लाकडाचे आणि शिटरॉकचे असते. एका धक्क्याने दरवाजा उघडू शकतो, आणि घरातील अलार्म वाजून पोलीस येईपर्यंत दहा-पंधरा मिनिटे सहज लागतात. तेव्हढा अवधी चोरासाठी पुरेसा असतो.

हे वाटतं तितकं सोपं नाहीये. टेक्सासमध्ये Stand-your-ground law आहे. कुणाच्या घरात शिरायचा प्रयत्न केला तर घरमालक प्राणघातक हल्ला करू शकतो आणि त्यामुळे तुमचा जीव पण जाऊ शकतो, हे चोराने लक्षात ठेवावे.

इथे टेक्सासमध्ये संपूर्ण घरंच लाकडाचे आणि शिटरॉकचे असते. एका धक्क्याने दरवाजा उघडू शकतो, आणि घरातील अलार्म वाजून पोलीस येईपर्यंत दहा-पंधरा मिनिटे सहज लागतात. तेव्हढा अवधी चोरासाठी पुरेसा असतो.

हे वाटतं तितकं सोपं नाहीये. टेक्सासमध्ये Stand-your-ground law आहे. कुणाच्या घरात शिरायचा प्रयत्न केला तर घरमालक प्राणघातक हल्ला करू शकतो आणि त्यामुळे तुमचा जीव पण जाऊ शकतो, हे चोराने लक्षात ठेवावे.

सौन्दर्य's picture

24 Jul 2017 - 9:06 pm | सौन्दर्य

एकदम मान्य. पण हे चोर जीवावर उदार झालेले असतात हो. आणि दुसरं म्हणजे चोरी, घरफोडी वगैरे सारख्या 'मामुली' गुन्ह्यासाठी इथल्या पोलिसांकडे वेळ नसतो. ते येतात, प्रश्न विचारतात, रिपोर्ट लिहून घेतात व जाताना "तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम पास करून घ्या" सांगून निघून जातात.

चौकटराजा's picture

25 Jul 2017 - 8:03 pm | चौकटराजा

आम्ही नुकतेच इटलीला गेलो होतो. इटालीचा क्रमांक गुन्हेगारीत खूप वरचा आहे पण आम्हाला तिथे "वॉचमन " कुठे च आढळले नाहीत. कुलूप एका भरभक्कम दरवाजाला अंगचेच असते. शेजारी नंबर पॅड असते. ठराविक क्रमाने दार उघडते. पण आत गेल्यावर आणखी एक बॉक्स असते त्याला ही नम्बर पॅड असते. कोड वापरून ती बॉक्स उघडते .मग आत एक किल्ली. ही पद्धत तिथे सर्रास वापरली जाते. आपल्या इकडे सी सी टीव्ही लावूनही " वॉचमन " संस्थेवर उगीचच लाखो रूपये उधळले जातात.

सौन्दर्य's picture

27 Jul 2017 - 9:12 am | सौन्दर्य

म्हणजे थोडीफार लॉकबॉक्स सारखीच पद्धत आहे