महावितरण वीजबिलाचा झोल

Primary tabs

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in काथ्याकूट
17 Jul 2017 - 4:39 pm
गाभा: 

जून महिन्यात महावितरणच्या सगळ्याच ग्राहकांची वीजबिलं नेहमीपेक्षा अधिक आल्याची तक्रार होती. जे ग्राहक तक्रार करायला गेले त्यांना उन्हाळ्यात पंख्यामुळे बिल जास्त येते असं कारण सांगितले. मी बिल नीट बघितले तर आमचे बिल १ महिन्याचे नसून १.३ महिन्याचे होते. म्हणजे ९ दिवस उशीरा मिटर रिडींग घेतले होते, त्यामुळे अधिक युनिट पडल्याने बिलही जास्त आले होते . बाबा तक्रार करायला महावितरणच्या कार्यालयात गेले, तेथील अधिकार्‍याने उशीरा रिडींग घेतल्याचे मान्य केले. पुढील महीन्यात ८-९ दिवस आधी रिडींग घेतले जाईल ,त्यामुळे पुढचे बिल कमी येईल. खरोखरच पुढील महिन्याचे बिल ०.७३ महिन्याचे म्हणजे २२ दिवसाचे आले , बिल कमी आल्याचे समाधान वाटले. वरवर पाहता ह्यात आपले काही नुकसान झाले नाही असं वाटेल, परंतू प्रत्यक्षात महावितरणने ग्राहकांच्या खिशातून पैसे चोरले आहेत.

ज्या ग्राहकांचा नेहमी महिन्याचा वीज वापर १०० किंवा वरील स्लॅबच्या आत असेल त्यांचे रिडींग १.३ महिन्याने घेतल्याने काही युनिट वरच्या स्लॅबमध्ये गेल्याने तितक्या युनिटला अधिक दर लागल्याने त्या ग्राहकाला नाहक भुर्दंड पडला. पुढील महिन्यात लवकर रिडींग घेतले तरी त्या ग्राहकाला त्याचा काहीही फायदा झाला नाही,कारण जरी एक महिन्यानी रिडींग घेतले असते तरी त्याचा वीज वापर ठरावीक स्लॅबच्या आतच आला असता. ह्याला महावितरणची छुपी भाववाढ म्हणायचे काय?

वीजबिलातील 'आकार' हे नक्की काय असतात हे कळतच नाही. नोव्हें.१६पर्यंत वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार, वीज शुल्क व इंधन समयोजन आकार ह्यांचा समावेश होता. डिसें.१६ पासून त्यात वहन आकाराची भर पडली.वीज आकार स्थिर ठेवले जातात व बाकीचे आकार वाढवून वीज ग्राहकांची लूट केली जाते. स्थिर आकार एक वर्षात २०% ने वाढला. ग्राहकाला बुचकाळयात टाकणार्‍या ह्या आकारांची खरोखरच आवश्यकता आहे का?

प्रतिक्रिया

साधा मुलगा's picture

17 Jul 2017 - 5:22 pm | साधा मुलगा

हे तर काहीच नाही, आमच्या बिलाचा मे पासून असा झोल चालू आहे.
सरासरी २२० दरमहा युनिट्स येतात आणि बिल २००० च्या घरात असते, एप्रिल महिन्याच्या बिलात एकदम ८०० युनिट्स दाखवले होते, मीटरचा फोटो धूसर होता, मीटर रीडिंग दिसत नव्हते, बिल ९००० च्या घरात , मी फोटो काढला आणि दाखवला कि अजून ३०० युनिट्स सुध्दा झाले नाहीयेत, तर त्यांनी मला प्रोवीजन्ल बिल दिले आणि सांगितले पुढच्या महिन्यात करेक्ट होईल, तरी अजून दोन महिने तोच प्रकार चालू आहे, आता मागचं बिल भरू नका असा लिहून दिले आहे, आता पुढच्या महिन्यापासून बिल सुरळीत होईल असा त्यांचा दावा आहे. फोटो तसाच धूसर येऊन मीटर रीडिंग दिसत नाही.
आम्हाला गेले दोन महिने मीटरचा रीडिंग चा फोटो घ्यायला कुणी येतच नाहीये असा संशय आहे, आणि हे लोक मनाला येईल ते रीडिंग टाकतात असे वाटते.
आमच्यासारखे असे ४-५ लोक होते, एकाला तर मीटर बिघडले म्हणून नवीन घायला लावले तरी हा प्रकार चालूच आहे.

मार्मिक गोडसे's picture

17 Jul 2017 - 5:46 pm | मार्मिक गोडसे

एकाला तर मीटर बिघडले म्हणून नवीन घायला लावले तरी हा प्रकार चालूच आहे.

महवितरणचा फॉल्टी मिटर तर 'महा'झोल प्रकार आहे. तुमचे मिटर मिटरर्बॉक्स मध्ये असेल तर त्याच्या काचेवर तुमचे नाव कागदावर लिहून चिकटवा निदान तुमच्याच मिटरचा फोटो घेतला ह्याची खात्री होइल

तीस दिवसांच्या आत रीडिंग घेणे किंवा त्यानंतर रीडिंग घेणे हे प्रकार सर्रास करतात महावितरणवाले.

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

17 Jul 2017 - 6:27 pm | सिद्धेश्वर विला...

एखादा आकडेवाला शोधा .. सर्व कटकट क्षणात निघून जाईल .. ना लेख टाकण्याची ना बिल भरण्याची ... मला एकदा येऊन भेटला होता ... महावितरणचा कर्मचारी .. सोसायटीतल्या पहारेकर्याच्या त्याला माझ्याबद्दल काय सांगितले कोणास ठावूस .. लेकाचा नंतर दिसेनासा झाला ... तो म्हणे निव्वळ २००० रुपयात मीटर सेट करून देणार होता .. अगदी वर पासून खालपर्यंत सेटिंग बरं का .. कुणी विचारणार नाही कुणी बोलणार नाही .. आपण फक्त कुणालाही बिल दाखवायचं नाही .. इथपर्यंत सेटिंग ... मी अजूनही २५०० ते ३००० पर्यंत बिल भरतोय पण तो काही अजून समोर आला नाही .. तुम्हाला कोण दिसतोय का ते बघा ... मग चांदी होईल तुमची

सुबोध खरे's picture

17 Jul 2017 - 9:06 pm | सुबोध खरे

महावितरणच्या स्लॅब असतात. तुमचे ३० ऐवजी ३९ दिवसांनी बिल घेतले अंतर तुम्ही २९९ ऐवजी ३०० च्या वरच्या स्लॅब मध्ये येत मग तुम्हाला सरसकट सगळ्याच युनिटला जास्त पैसे भरावे लागतात. महावितरणचा तोटा कमी करण्यासाठी उन्हाळ्यात हा झोल ते सर्रास सगळीकडे करतात.
मी एक दोनदा तक्रार केली होती त्यांनी बिल कमीही करून दिले. पण नंतर शेवटी आपण सरकारलाच पैसे भरतो आहोत. दुसरी समाजसेवा करण्या ऐवजी पैसे भरून मोकळे व्हा.
महावितरणचा एक माणूस माझे ५००० रुपये बिल पाहून मला "भेटायला" आला होता. २ हजार रुपये द्या सर्व "ऍडजस्ट" करून देतो.
मी त्याला शांतपणे नकार देऊन परत पाठवले. कारण असे करणे आणि वीज चोरी करणे यात गुणात्मक दृष्ट्या फरक नाही.

जेम्स वांड's picture

17 Jul 2017 - 9:30 pm | जेम्स वांड

पण नंतर शेवटी आपण सरकारलाच पैसे भरतो आहोत. दुसरी समाजसेवा करण्या ऐवजी पैसे भरून मोकळे व्हा.

ह्या वाक्याला काहीच अर्थ नाही असं वैयक्तिक मत आहे माझं डॉक्टर साहेब. तुम्ही सांगितलेलं बाकी होतं अन सेटिंग पैसे देवाणघेवाण सगळं बरोबर आहे, पण पैसे भरून टाका म्हणणे मला चूक वाटतं. एकतर आपण पांढरपेशे हारामाचं कमवत नाही, परत सगळे करही भरतो (भक्तिभावे पापभिरूपणे) अजून कसले पैसे भरून मोकळे व्हायचे?

सुबोध खरे's picture

18 Jul 2017 - 9:32 am | सुबोध खरे

जेम्स वांड साहेब
आपण म्हणता ते बरोबर आहे पण प्रत्येक वेळेस तेथे जाऊन भांडायचा आता उत्साह राहिला नाही आधीच म्हटल्याप्रमाणे तीन वेळेस मी जाऊन बिल कमी करून आलो आहे.प्रत्येक वेळेस वरचे साहेब म्हणणार डॉकटर "हे आमचे कर्मचारी वेळेत कामंच करत नाहीत काय करायचं"
कदाचित हि हताशपणाची प्रतिक्रिया समजा किंवा निदान कुणाला खायला पैसे देत नाही आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत नाही याचे मानसिक समाधान समजा आणि माफ करा.

थॉर माणूस's picture

17 Jul 2017 - 11:09 pm | थॉर माणूस

>>>पण नंतर शेवटी आपण सरकारलाच पैसे भरतो आहोत.

सरकार वीज पुरवठा करुन आपल्यावर कोणतेही उपकार करत नाही. त्यांनीच वीज द्यायला हवी हा त्यांचाच हट्ट आहे. आणि एखादे खाते सेवा देण्याचे पैसे घेऊन असे काम करत असेल तर त्यांना अजून चार पैसे देणे म्हणजे केवळ अपव्यय असेल.

एकूण सगळी चर्चा ग्राहकच कसे नालायक असतात ह्याकडे वळणार ह्याची १०० टक्के खात्री होती.
नशीब आपले, आपण इतके नालायक असून एमेसीबी अजून सर्वत्र उजेड पाडतीये.

थॉर माणूस's picture

17 Jul 2017 - 11:04 pm | थॉर माणूस

सरकारी यंत्रणा गडबड घोटाळ्याशिवाय चालली तर चमत्कार वाटावा अशीच एकंदर परीस्थीती आहे आपल्याकडे. अजून तरी वीज वितरणात सर्रास खाजगी कंपन्या दिसत नसल्याने यांना सहन करण्यापलीकडे पर्याय नाही.

थॉर माणूस's picture

17 Jul 2017 - 10:57 pm | थॉर माणूस

आम्ही एक महीनाभर बाहेरगावी असल्याने गेल्या महीन्याचे बील कमी येणे अपेक्षित होतेच. पण प्रत्यक्ष बील आले तेव्हा बिलाचा आकडा -१२० होता! :) त्यामुळे या महीन्याचे बील सुद्धा प्रत्यक्ष वापरातून १२० वजा करून उरलेली रक्कम असेल असं वाटतंय.

त्रिवेणी's picture

18 Jul 2017 - 11:28 am | त्रिवेणी

आमच्या सोसायटीत ही बऱ्याच लोकांना खूप बिल येतंय सध्या.धागा लेखकांची परवानगी असेल तर सोसायटी ग्रुपवर धागा शेअर करू का म्हणजे त्यांना काही फायदा होईल तर बरं होईल.

मार्मिक गोडसे's picture

18 Jul 2017 - 12:53 pm | मार्मिक गोडसे

जरूर शेअर करा.

त्रिवेणी's picture

18 Jul 2017 - 1:23 pm | त्रिवेणी

धन्यवाद

मार्मिक गोडसे's picture

18 Jul 2017 - 2:48 pm | मार्मिक गोडसे

चोरी प्रकाशाची (ग्राहकाकडून) ह्या लेखातील प्रतिक्रियेत स्नेहांकिताताईंनी आपल्या घरापर्यंत वीज वाहन करण्याकरिता जे नेटवर्क उभे करावे लागते, त्याकरिता आणि त्याच्या देखभालीकरिता स्थिर आकार आकाराला जातो असं सांगितले होते. मग वीजबिलात 'वहन आकार' कशासाठी लावला जातो?

सौन्दर्य's picture

19 Jul 2017 - 4:42 am | सौन्दर्य

मुंबईतील अनधिकृत वीज वापरणारे (मुख्यत्वे झोपड्या) जे वीज वापरतात त्यांच्याकडून वीज कंपन्यांना पैसे घेता येत नाहीत. अश्या चोरलेल्या विजेचे पैसे अधिकृत ग्राहकाकडून वीज कंपन्या वसूल करतात असे काहीसे वाचनात आले होते. त्याचप्रमाणे वीज गळतीचे पैसे देखील अधिकृत ग्राहकाकडून वसूल केले जातात असेही वाचले होते.

सुबोध खरे's picture

19 Jul 2017 - 11:26 am | सुबोध खरे

MSEDCL has over 2.20 crore consumers across the state, including 4.38 lakh industrial customers (2%), who consume 44% of power in the state. There are 1.62 crore residential, 36.67 lakh agriculture and 5 lakh BPL consumers.
म्हणजे हे २ % उद्योगधंदे या १७.५ % शेतकी आणि दारिद्र्यरेषेच्या खालच्या २. ५ % लोकांना स्वस्तात आणि बिल न भरणार्यांना फुकटात वीज पुरवतात.

मार्मिक गोडसे's picture

19 Jul 2017 - 12:14 pm | मार्मिक गोडसे

म्हणजे हे २ % उद्योगधंदे या १७.५ % शेतकी आणि दारिद्र्यरेषेच्या खालच्या २. ५ % लोकांना स्वस्तात आणि बिल न भरणार्यांना फुकटात वीज पुरवतात.

१.६२ सामान्य घरगुती वीज ग्राहकांनाही स्वस्तात वीज पुरवतात.

धाग्याचा हा विषय नाही, परंतू बेस्टचा वीज पुरवठा विभाग आपल्या नफ्यातून तोट्यात चालणार्‍या आपल्याच वाहतूक विभागाला क्रॉस सबसिडी देत असे. सध्याची परिस्थिती माहीत नाही.