उद्यानांचे सुशोभीकरण ( संशयास्पद चाल म.न .पा. ची )

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in काथ्याकूट
12 Jul 2017 - 6:30 pm
गाभा: 

फार पूर्वी जर आपल्याला माहित असेल तर महानगर पालिकेच्या उद्यानात कुंपण म्हणून एक कडू वनस्पतीचा वापर केला जायचा .. त्या वनस्पतीचे नाव मला माहीत नाही आता .. पण पूर्वी माझ्या कॉलेजमध्ये मी संशोधन करत असताना एका विद्यार्थी मित्राने त्या वनस्पतीवर भरपूर शोधनिबंध सादर केले होते .. माझी त्यावर त्याच्याशी चर्चा देखील झाली ... त्या वनस्पतीचे फायदे ऐकून तर मी चाट पडलो होतो .. त्यातील एक म्हणजे कित्येक मीटरपर्यंत ती डास आणि माश्याना लांब रोखू शकत होती .. मला अजूनही आठवतंय .. आम्ही सारे आमच्या येथील उद्यानात बिनधास्त खेळायचो ..

आजची परिस्थिती

आज आपण सारे बघतो ते उद्याने निव्वळ बनकामाच्या फुलझाडांनी सुशोभित केलेली असतात .. त्यामुळे काही विषारी कीटकही त्या फुलझाडांमुळे आकर्षित होतात .. मागे लोकसत्तामध्ये वाचताना तर मला चीड आली ... एका मुलीचा विषारी कीटकाने चावा घेतल्याने अकस्मात मृत्यू .. ती फक्त उद्यानात तिच्या वडिलांसोबत बॅडमिंटन खेळात होती ... तिथे तिला काहीतरी चावले .. तिने त्याला मारले देखील .. घरी आल्यावर तिला मळमळु लागले आणि इस्पितळात दाखल केल्यावर उपचारादरम्यान तिचा मृत्यू ... काय तर म्हणे त्याचा ऍंटीडोट उपलब्ध नव्हता ... ह्या अश्या विचित्र केसेस पूर्वी तर वाचनात आल्या नव्हत्या ... एक मात्र नक्की .. ती औषधी झाडं का काढली .. का कुणी सोयीस्कर रित्या काढली .. हे सीशोभीकरण आहे कि म . न. पा .ची एक विशेष चाल आहे .. त्यामागे काही अर्थकारण आहे का कि अजून काही ? त्या औषधी झाडांची आजही तेवढीच गरज आहे जेवढी पूर्वी होती .... आपले मत या विषयावर आवश्यक आहे ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

12 Jul 2017 - 6:37 pm | प्रसाद_१९८२

.... आपले मत या विषयावर आवश्यक आहे ...

--

नक्की कोणत्या विषयावर ??

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

12 Jul 2017 - 7:07 pm | सिद्धेश्वर विला...

त्या औषधी वनस्पतीवर ... जिचा उपयोग आजही लोक खेड्यापाड्यात गुरंढोरं येऊ नयेत म्हणून करतात .. त्या विषयावर

सुबोध खरे's picture

12 Jul 2017 - 7:20 pm | सुबोध खरे

ती वनस्पती कडू मेंदी असावी. त्याचे पान तोडले तरी हात कडू होत असत आणि साबणाने समूळ धुवावे लागत. आमच्या सोसायटीत कुंपणाला होती. पण त्यामुळे डास होत नाहीत असे मात्र नव्हे.हा एक दुवा पण आहे.
http://www.loksatta.com/thane-news/benefits-of-a-living-fence-for-planti...

सुबोध खरे's picture

12 Jul 2017 - 7:21 pm | सुबोध खरे
ज्योति अळवणी's picture

12 Jul 2017 - 7:28 pm | ज्योति अळवणी

सूचना चांगली आहे. औषधी वनस्पती लावली जावी.

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

12 Jul 2017 - 7:30 pm | सिद्धेश्वर विला...

धन्यवाद खरे साहेब .. इथे या लिंकमध्ये जो हँगिंग गार्डनचा उल्लेख केलेला आहे तीच वनस्पती .. आजही तिथे आहे .. या वनस्पतीमुळे डास होतं नाहीत हे हि खरे आहे .. माझ्या मित्राचे शोधनिबंध मी वाचले आहेत .. तो संशोधनदरम्यान नेहेमी गटाराशेजारून डास पकडून आणायचा आणि त्या वनस्पतीच्या बनवलेल्या अर्कामध्ये बंद करून ठेवायचा ...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jul 2017 - 1:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शोधनिबंधामधे नाव नव्हतं काय? कुठल्या उण्वर्सि्टीत हो???

'त्या' औषधी वनस्पतीचं नाव काय आहे?

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

12 Jul 2017 - 7:34 pm | सिद्धेश्वर विला...

खरे साहेबानी पाठवलं आहे ते असावं बहुधा .. कडू मेहेंदी

सतिश गावडे's picture

13 Jul 2017 - 8:58 am | सतिश गावडे

मेहंदी नाही. तुम्ही म्हणताय तशी वेगळी कुंपण म्हणून लावली जाणारी कडू वनस्पती आहे. आमच्याकडे मेती म्हणतात (खायची मेथी वेगळी)

आमच्या लहानपणी एक अफलातून कल्पना होती या वनस्पतीबद्दल. आताही असेल. एरव्ही कडू लागणारा या वनस्पतीचा पाला सापाचे विष अंगात भिनल्यावर गोड लागतो म्हणे.

सतिश गावडे's picture

13 Jul 2017 - 9:00 am | सतिश गावडे

आता डॉ. खरेंनी दिलेल्या दुव्यावर फोटो पाहिला. हीच ती वनस्पती. आमच्याकडे कडू मेहंदी न म्हणता मेती म्हणतात.

'त्या' औषधी वनस्पतीचं नाव काय आहे?

त्याच्याशी काय घेणं देणं आहे? आपल्याला रतीब घालता आला म्हणजे झालं.

चष्मेबद्दूर's picture

13 Jul 2017 - 9:40 pm | चष्मेबद्दूर

माझ्या आठवणीत ही वनस्पती कुंपणाला असायची आणि तिला हात लागला असेल तर आमची आई आम्हाला हात धुतल्या शिवायकाही खाऊ देत नसे.

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

12 Jul 2017 - 7:34 pm | सिद्धेश्वर विला...

एक निंबळक म्हणून गाव आहे .. सोलापूर रोडला ... त्या गावात मी वर्षाकाठी एकदा तरी जातो .. तिथे प्रचलित असलेल्या आख्यायिकेप्रमाणे त्या गावात कडुलिंबाची काडीपण जाळली जात नाही .. का तर म्हणे त्या घरातून साप निघेल आणि तो सर्व नष्ट करेल .. त्या गावात आजही कडुलिंबाची प्रचंड प्रमाणावर झाडे आहेत .. तिथे गेल्यावर एक वेगळाच आल्हादायक आनंद मिळतो .. शुद्ध हवा .. कुठलाही कीटक नाही ..

चौथा कोनाडा's picture

12 Jul 2017 - 9:30 pm | चौथा कोनाडा

छान महिती !
आख्यायिकेतल्या भितीनुसार वारसा जपला गेलाय ! भारी !

अभिदेश's picture

12 Jul 2017 - 9:35 pm | अभिदेश

गाव नगर रोडला आहे , सोलापूर नाही ..

नेत्रेश's picture

13 Jul 2017 - 3:06 am | नेत्रेश

निगडीची झाडे असावीत. गुरे अजीबात खात नाहीत. कायम गीरहीरवीगार असतात, ५ ते १० फुटापर्यंतच वाढतात. बर्र्‍याच ठीकाणी कुंपणाला वापरतात.

अभ्या..'s picture

13 Jul 2017 - 7:16 am | अभ्या..

ओ ते निगडी आकुर्डी नाही, निर्गुडी म्हणत्यात त्याला.

सतिश गावडे's picture

13 Jul 2017 - 8:52 am | सतिश गावडे

आमच्याकडे* निंगडी म्हणतात.

*दक्षिण रायगड

कपिलमुनी's picture

13 Jul 2017 - 9:54 am | कपिलमुनी

सगा सर ,
तुम्हीं 'आमच्याकडे' शब्दकोश का प्रकाशित करत नै ??

कंजूस's picture

13 Jul 2017 - 2:41 pm | कंजूस

तो कडू मेंदा!

याच्या पांढय्रा फुलांची तिपेडी वेणी करता येते. पण कुण्णाला नको असायची.

सिरुसेरि's picture

13 Jul 2017 - 2:43 pm | सिरुसेरि

कडुलिंब , निर्गुडी आणी दगडी या औषधी वनस्पतींचा पाला जखमेवर उपयुक्त असतो .

सरल मान's picture

13 Jul 2017 - 5:23 pm | सरल मान

dodonaea plant बोलतात त्याला...

कलंत्री's picture

14 Jul 2017 - 4:45 pm | कलंत्री

घाणेरीच्या झाडाजवळ डास फिरकत नाही असे वाचले आहे.

काही वनस्पती या किटक भक्षकही असतात.

तुळशीच्या रोपावरही संध्याकाळी डास बसतात आणि तेथेच चिटकून राहतात.

माणसांना चावण्याचं काम डासीन बाई करतात, ते ही अंड्यांच्या पोषनासाठी, मग डासोबा कशावर जगतात? ते झाडांच्या कोवळ्या फांद्यांमधुन जिवन रस शोषुन जगतात असं ऐकुन आहे, हे जर खरे असेल तर, त्या औषधी झुडपाच्या प्रकारात तथ्य आहे असे म्हनावे लागेल.

स्थितप्रज्ञ's picture

15 Jul 2017 - 8:49 am | स्थितप्रज्ञ

सादर लेखातील उदाहरण म्हणजे specific केमिकल्सची ऍलर्जी असू शकते. जर तिथे खरंच विषारी कीटक असतील तर अशा केसेस सारख्या घडल्या असत्या ज्या सुदैवाने घडत नाहीयेत. मागे एका व्यक्तीचा मृत्यू धनुर्वात प्रतिबंधक इंजेक्शनच्या ऍलर्जीमुळे झाल्याचे ऐकिवात आहे (त्या व्यक्तीने आयुष्यात ते इंजेक्शन पहिल्यांदाच घेतले होते). असो!

बाकी औषधी वनस्पतींच्या लागवडीच्या गरजेबद्दल सहमत!

लेखात उल्लेखलेली वनस्पती म्हणजे कोयनेल किंवा कडू मेंदी हीच आहे. हिचे शास्त्रीय नाव clerodendrum inerme असे आहे. हिला छोटी छोटी पांढरट गुलाबी फुले येतात. पराग केसर गुलबट असतात. देठ थोडे लांब असल्याने एकात एक गुंफून वेणी करता येते. फुलांना मंद वास असतो. सार्वजनिक बागांमध्ये कुंपणाला किंवा पायवाटांच्या बाजूबाजूने कोयनेल लावतात. हिची योग्य छाटणी करून वेगवेगळे आकार देतात. त्यामुळे कुंपणाची शोभा वाढते.

राही's picture

15 Jul 2017 - 5:05 pm | राही

आपल्याकडे लोकमानसात कोयनेल हे औषध म्हणून हिवतापाशी जोडले गेले आहे. पण हिवतापावरचे क्विनाइन हे औषध ज्या वनस्पतीत असते ती सिंकोना (cinchona) ही वनस्पती अगदीच वेगळी आहे. तिचा क्लेरोडेन्ड्रम इनेर्मे शी काहीच संबंध नाही.