गायत्री

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
7 Jul 2017 - 10:35 am
गाभा: 

एका अनुभवी व्यक्ति चे मत ऐकले की
साधकानेी गायत्री जपाची योग्य व्यक्तीकडून संथा घेतल्याशिवाय जप करू नये.
गायत्रीचा जप जास्ती केला की अंगात उष्णता भडकते. त्यातल्या त्यात तीन प्रणव सहित केला तर की जो ब्राह्मणांना सांगितलाय. जिव्हेवर फोड येणे वगैरे प्रकार घडु शकतात
पुण्यात कोणी चितळे की दातार नावाचे योगी आहेत जे गायत्री मंत्राने शरीर तप्त करून लाल करतात म्हणे, असे एका प्रसिद्ध किर्तनकाराने सांगितले होते.
ज्ञानेश्वर माऊलीनी मांडे भाजले आणि संत जनाबाई यांनी सूळ वितळवले ते या ताकदीनेच.. असे मत वाचण्यात आले,
बऱ्याच वर्षापूर्वी एका मासिकात एका साधकाने अनुभव लिहिल्याचे वाचल्याचे स्मरते.
त्याने असेच काही अचाट प्रकार सुरु केले होते य्याला श्वासाचा गंभीर स्वरुपाचा त्रास होउ लागला. डाँक्टरनाही समजेना.तो साईबाबांचा परम भक्त होता.त्यांने करुणा भागताच ,साईनी स्वप्नात येउन सागितले, कि हा प्रकार बंद कर. नेहमीसारखे राहा.व ते अद्रुष्य झाले.
जपा चे ३ प्रकार आहेत ते या प्रमाणे
जप कायिक ( मोठ्याने जपणे) , उपांशु (पुटपुटणे) की मानसिक (मनात)
काही साधकाना..जप करताना..उष्णता जाणवलेली आहे. डोळे बंद असताना काळ्या रंगाचं रुपांतर लाल रंगात होताना अनुभवलंय
त्रिपदा गायत्री जप करताना आहार सात्विक असावा
देवता सवितृ आहे त्यामुळे जसजसा जप वाढेल तशी उष्णता वाढणार हे निश्चित.
गायत्री मंत्र म्हणे पर्यंत, उजव्या हाताचे करंगळी शेजारील बोट (usually अंगठी घालतात ते) चांदीच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात बुडवावे. मंत्र म्हणून झाल्यावर त्या पाण्याचे सेवन करावे.असे केल्यास मंत्राच्या उच्चारणाने होणारे त्रास कमी व्हायला मदत होते.
स्त्रीयांनी गायत्रीचा जप क्करु नये असे पण संकेत आहेत.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 10:39 am | मुक्त विहारि

आणि मग लेख वाचतो.

(अकू कथा फॅन) मुवि

सतिश गावडे's picture

7 Jul 2017 - 10:57 am | सतिश गावडे

अकुकाका, तुमचा वेळ जात नाही हे आम्हाला माहिती आहे. पण जरा बरा टाईमपास शोधा की.

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 11:35 am | मुक्त विहारि

अकुंच्या लेखनात ना कमरेखालचे वार असतात ना वैयक्तिक टीका.

त्यामुळे "उपद्र्वमुल्य शून्य."

रामदास२९'s picture

11 Jul 2017 - 5:01 pm | रामदास२९

नविन गोष्टी कळाल्या ..

सुबोध खरे's picture

11 Jul 2017 - 7:41 pm | सुबोध खरे

आमच्या लडाख लेह कारगिल मधील सैनिकांना स्वतःला गरम ठेवण्यासाठी या मंत्राचा उपयोग होईल काय?

नारायण नाड्कणि's picture

12 Jul 2017 - 10:30 pm | नारायण नाड्कणि

गायत्री मंत्राविषयी माहिती.

१. मंत्र हे बाणासारखे असतात. मंत्रांचा उच्चार योग्य आणि स्वरांसहित असेल, तरच मंत्र म्हणण्याचा उद्देश साध्य होतो. मंत्र म्हणतांना चुकीचा म्हटल्यास त्यातून निर्माण झालेल्या त्रासदायक (अयोग्य) स्पंदनांमुळे संबंधित व्यक्तीला त्रास होतो; म्हणून वरील गायत्री मंत्र केवळ उपनयन झालेल्यांनी योग्य गुरूंच्या मार्गदर्शनानुसार म्हणावा. सकाळच्या वेळी स्नान झाल्यावर मंत्रपठण केल्यास या मंत्राचा जास्त लाभ होतो.
२. हा मंत्र एखाद्याला त्याच्या गुरूंनी उपासना म्हणून म्हणण्यास सांगितला असल्यास गुरूंच्या संकल्पामुळे त्या व्यक्तीला मंत्रातून निर्माण होणार्यास शक्तीचा त्रास होत नाही.
३. मंत्रपठण करतांना आहार आणि आचार यांचे नियम पाळणे आवश्यक आहे, तरच त्या मंत्राचा योग्य प्रमाणात लाभ होतो. आहार आणि आचार यांचे नियम न पाळल्यास त्यातून निर्माण होणार्या् दोषांचे निरसन करण्यासाठी मंत्रशक्ती वापरली जाते; त्यामुळे मंत्रपठण करणार्यांोना अपेक्षित लाभ होत नाही.

गायत्री मंत्र कधी म्हणू नये ?
१. गायत्री मंत्र सूर्यास्तानंतर म्हणू नये.
२. सुवेर आणि सूतक यांच्या कालावधीत मंत्रपठण करू नये.
३. स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणू नये; कारण मंत्रातील तेजतत्त्वामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.

गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे होणारे लाभ.

वाणी शुद्ध होणे : गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे वाणी शुद्ध होते. शुद्ध वाणीनेच वेदमंत्रांचे उच्चारण करायचे असते. त्यामुळे उपनयनाच्या वेळी बटूला गायत्रीमंत्राची दीक्षा दिली जाते.

पिंडाची शुद्धी होणे : गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे पिंडाची शुद्धी होऊन जिवांमध्ये वेदमंत्रांचे उच्चारण केल्यानंतर निर्माण होणारी दैवी ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता निर्माण होते.

जिवाची अंतर्बाह्य शुद्धी होणे : गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे प्राणवहनातील अडथळे दूर होऊन देहातील रक्तवाहिन्या, ७२००० नाड्या आणि प्रत्येक पेशी यांची शुद्धी होऊन जिवाची अंतर्बाह्य शुद्धी होते.

वेदाध्ययनास सहाय्यक असणे : गायत्रीच्या उपासनेमुळे वेदाध्ययन करणे सुलभ जाते.

कर्मकांडानुसार उपासना करण्यासाठी साहाय्यक असणे : गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे देवतांचे तत्त्व त्यांच्यातील दिव्य तेजासहित जागृत होऊन कार्यरत होते. त्यामुळे कर्मकांडानुसार उपासना करतांना, म्हणजे धार्मिक विधी आणि यज्ञादी कर्मे करत असतांना गायत्री मंत्र किंवा विशिष्ट देवतेचा गायत्री मंत्र याचे आवर्जून उच्चारण केले जाते.

. गायत्रीमंत्राचे पुरश्चयरण केल्यामुळे विविध प्रकारचे ऐहिक लाभ होणे : प्रतिदिन नियमितपणे एक सहस्र वेळा गायत्रीमंत्राचे पुरश्चचरण केल्यामुळे व्यक्ती पापमुक्त होते, तिला धनलाभ होतो आणि स्वर्गसुखाची प्राप्ती होते.

गायत्रीमंत्राचे पुरश्च्रण केल्यामुळे पारमार्थिक लाभ होणे : संपूर्ण आयुष्यभर गायत्रीमंत्राचे भावपूर्ण, नियमित आणि श्रद्धेने पुरश्चारण केल्यामुळे गायत्रीदेवी प्रसन्न होऊन त्या व्यक्तीला मुक्ती अन् मोक्ष यांची प्राप्ती होते.’

नारायण नाडकर्णी.

प्रचेतस's picture

13 Jul 2017 - 8:33 am | प्रचेतस

सनातन प्रभाती प्रतिसाद.

माहितगार's picture

13 Jul 2017 - 7:19 am | माहितगार

एका वर एक फ्री !