कॅनडामधील आय.टी. क्षेत्रातील नोकरीच्या संधी

Primary tabs

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in काथ्याकूट
8 Jul 2017 - 8:03 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
सन्माननीय डोनाल्डदादा ट्रम्प ह्यांच्या अमेरिका फर्स्ट ह्या धोरणामुळे एकंदरीतच H1B व्हिसा मिळवून अमेरिकेत जाणे हे बरेच कठीण झालेले आहे असे वाटते. तिकडे अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या कॅनडामध्ये सरकारने सुरु केलेल्या एका नवीन उपक्रमानुसार विशेष प्रावीण्य असलेल्या व्यक्तीना कॅनडात काम करण्याचा परवाना फक्त दोन आठवड्यात मिळणार आहे असे सकाळ साप्ताहिक मध्ये वाचले. मला बऱ्याच कन्सल्टन्सी मधून ई-मेल वा फोन येतात. प्रत्येकाच्या मेलमध्ये कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोनच देशांचा उल्लेख असतो. तुम्ही फक्त व्हिसा काढा भरपूर डिमांड आहे तुमच्या स्किल सेटला असे सांगतात (तसे सांगावेच लागणार म्हणा :) ). त्या अनुषंगाने तुमच्यापैकी कुणाला कॅनडामधील आय.टी.च्या संधींबाबत माहिती असेल तर कृपया द्यावी.
१) कॅनडामधील आय.टी. क्षेत्र हे अमेरिका किंवा भारतासारखे विस्तृत आहे का?
२) कॅनडाचा पर्मनंट रेसिडन्स व्हिसा मिळवल्यास भारतातूनच कॅनडामधील कंपनीत नोकरी मिळवणे शक्य आहे का ? तुमच्यापैकी कुणी किंवा तुमच्या ओळखीत कुणी असा स्वत: व्हिसा काढून भारतातूनच कॅनडामधील कंपनीचा इंटरव्ह्यू देउन नोकरी मिळवली आहे का?

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

8 Jul 2017 - 8:15 pm | स्रुजा

कॅनडामधलं आयटी मार्केट सध्या चांगलं आहे. तुमचा स्किलसेट काय आहे?

कॅनडाचा पर्मनंट रेसिडन्स व्हिसा मिळवल्यास भारतातूनच कॅनडामधील कंपनीत नोकरी मिळवणे शक्य आहे का ? तुमच्यापैकी कुणी किंवा तुमच्या ओळखीत कुणी असा स्वत: व्हिसा काढून भारतातूनच कॅनडामधील कंपनीचा इंटरव्ह्यू देउन नोकरी मिळवली आहे का?

ऑन पेपर हे शक्य आहे पण प्रत्यक्षात असं होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आधी येणारे स्क्रिनिंग चे कॉल्स. नॉन - कॅनडा नंबर बघुन बर्‍याचदा हा कॉल केला जात नाही. दुसरं म्हणजे इथे माणुस प्रत्यक्ष बघुन, भेटुन, त्याच्याशी कितपत रिलेट करता येतंय, या माणसाबरोबर मी कामाच्या वेळेस आणि कामानंतर कंफर्टेबल असु शकतो का, हा कुठे तरी अप्रत्यक्ष पैलु असतो. शिवाय तुम्हाला कुणी रेफर केलं तर तो एक मोठा अ‍ॅसेट ठरतो, त्याच्याशिवाय नोकरी मिळत नाही असं नाही. पण ते असलं तर लवकर मिळते.

मी इथे यायच्या आधी, आत्ता ज्या कंपनीत काम करते तिच्या सी ईओ बरोबर २ महिने एका प्रोजेक्ट वर काम केलं होतं, त्याला जेंव्हा मी येते आहे कळलं तेंव्हा त्याने ओपनिंग बद्दल सांगितलं आणि पुढे वर्क आऊट झालं. नवर्‍याचं पण थोडं फार असंच झालं, तुमचं काम माहिती असणारं कुणी असेल तर पुढचं सोपं होतं. आम्ही तेंव्हा एका वर्षाच्या बोलीवर आलो होतो आणि वर्क परमिट वर होतो पण त्याने फार फरक पडला नाही कारण कंपनीला पण गरज होतीच.

शक्यतो बरेचसे लोकं पी आर घेऊन, फॅमिलीपैकी एक जण लँडिंग करुन इकडे मुव्ह होतो आणि जॉब मिळाला की बाकीच्यांना आणतो - म्हणजे पी आर वरील इतरांना. ते सोयीचं असलं तरी थोडंसं अस्थिर असतं पण तेवढी मनाची तयारी अनेक जण करुन येतात आणि शक्यतो पहिल्या काही महिन्यात जॉब मिळतो. मिपाकर पण कॅनडामध्ये आहेतच, तुमच्या स्किलसेट च्या इंडस्ट्री मध्ये तुमच्या ओळखीचं कुणी असेल तर रेफरल करता येऊ शकतं.

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 9:34 pm | मुक्त विहारि

भारतातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणारे आणि भारत सोडणारे कमी नाहीत...पण,,,,आमचे परखड सत्य असलेले प्रतिसाद दिसतात......

बादवे.

@ अभिजित,

अमेरिका व्हाया ----कॅनडा/ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड/स्कँडेव्हिअयन कंट्रीज/युरोप हा सर्वोत्तम मार्ग आहे. सध्यातरी ट्रंप प्रशासन असे पर्यंत "स्कँडेव्हिअयन कंट्रीज"चा वापर करून अमेरिकेत स्थाइक होणे हा राजमार्ग."स्कँडेव्हिअयन कंट्रीज"चे नागरिकत्व मिळायला ३-४ वर्षे खूप झाली.

माझ्या दोन्ही मुलांसाठी मी आणि मुलांनी मिळून "युरोप" निवडले आहे. ((काही वेळा पालकांनी मुलांना योग्य ते मार्गदर्शन केलेले उत्तम असते. अर्थात हे मार्गदर्शन पण "किरण जोग" ह्यांचेच आहे."किरण जोग" कोण ? हा प्रश्र्न इथे विचारू नये.पुण्या बाहेर पण बर्‍याच जणांना उत्तम माहिती असते.)(व्यनि केलात तर "किरण जोग" ह्यांचा फोन नंबर आणि पत्ता देईन.)) कदाचित वेळ लागेल पण अशक्य नक्कीच नाही.

(वरील प्रतिसाद हा "अभिजित अवलिया" ह्यांनाच आहे.)

असो,

काय पुणे पुणे चा पिंगा लावलाय राव!
की उगाच दंगा करायची खाज आहे? दोन तीन धाग्यावर पाहिले तुमचे हे पुणे रामायण.. एवढा प्रॉब्लेम आहे तर वेगळा धागा काढा.
पण उगाच प्रत्येक जागी... अती तेथे माती!

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 9:55 pm | मुक्त विहारि

असो,

तुम्ही मिपाकर आहात की पुणेकर?

खरा मिपाकर हा फक्त मिपाकरच असतो....

पण काही मिपाकर हे फक्त पुणेकरच असतात.....

समजनेवाले की इशारा काफी़ है....

(बादवे, तुम्हाला व्य. नि करत आहे.)

उपेक्षित's picture

9 Jul 2017 - 2:37 pm | उपेक्षित

नका नादी लागू राजे, मी पण समजावण्याचा प्रयत्न केला होता पण कदाचित पुण्याबद्दल काहीतरी जुने दुखणे असावे (अवघड जागीचे - जे सांगता येत नाही आणि दाखवता तर मुळीच येत नाहीये म्हणून मग अशी चीड चीड करावी लागतेय ;P )

गेट वेल सून मूवी काका ;)

श्रीरंग_जोशी's picture

10 Jul 2017 - 6:30 pm | श्रीरंग_जोशी

अमेरिकन ग्रीन कार्डासाठी इतर कुठल्याही देशाचे नागरिक बनून प्रयत्न केला तरी अर्ज करणार्‍या जन्म कुठल्या देशात झाला आहे हे तो कुठला नागरिक आहे यापेक्षा महत्वाचे असते. ग्रीनकार्डसाठी अंदाजे किमान ५ लक्षांहून अधिक भारतात जन्मलेले लोक सध्या रांगेत आहेत असे वाचले आहे.

सतरंगी_रे's picture

12 Jul 2017 - 5:30 am | सतरंगी_रे

+११११

लय लोचा आहे हा.....

म्हणजे अस बघा

  1. जर्मनी मध्ये जन्म झाला आणि पारपत्र भारतीय आहे (उदा. आई वडील तिकडे होते आणि नंतर भारतात आले वगैरे )
  2. भारतात जन्म झाला आणि पारपत्र जर्मन आहे (उदा. नोकरीनिमित्त जर्मनी ला गेला आणि तिकडे नागरिकत्व मिळाले)

तर क्रमांक १ वाल्या माणसाला हरितपत्र लगेच मिळेल कारण तो जर्मन लोकांच्या रांगेतून जाईल (जी भारतीयांपेक्षा खूपच छोटी आहे ) आणि क्रमांक २ मात्र भारतीयांच्या रांगेतून जाईल त्यामुळे "थांबा आणि वाट पहा"

या ठिकाणी सामान्य नोकरी आधारित उदाहरण लक्षात ठेवून वरील माहिती दिली आहे अर्थात तुम्ही शास्त्रज्ञ असाल किंवा ऑलिम्पिक पदक विजेते असाल अथवा भरपूर गुंतवणूक केलीत आम्रविकेत तर गोष्ट वेगळी

अभिजीत अवलिया's picture

8 Jul 2017 - 10:00 pm | अभिजीत अवलिया

सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद.

तुमचा स्किलसेट काय आहे?

total experience जवळपास १० वर्षे होत आलाय. त्यातील ६ वर्षे IBM Lombardi Business Process Management ह्या टूल वरचा आहे. बाकी थोडेफार जावा, ओरॅकल.

शक्यतो बरेचसे लोकं पी आर घेऊन, फॅमिलीपैकी एक जण लँडिंग करुन इकडे मुव्ह होतो आणि जॉब मिळाला की बाकीच्यांना आणतो - म्हणजे पी आर वरील इतरांना.

म्हणजे थोडक्यात इकडचे सगळे सोडून तिकडे यावे लागेल. इकडून जॉब शोधणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार होईल.
पी.आर. काढताना ज्याला नोकरीसाठी कॅनडाला जायचे आहे त्याच्यासह सगळ्या फॅमिलीचा एकत्रितच काढावा लागतो का?

व्य. नि करतो.....

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2017 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

http://www.cic.gc.ca/english/express-entry/

या कॅनडा सरकारच्या express-entry बद्दलच्या संस्थळावर सर्व माहिती आहे. त्यांच्या अटींत बसत असला तर बहुदा कोणत्याही एजंटची गरज पडणार नाही. सर्व सोपस्कार ऑनलाईन करता येतात.

अभिजीत अवलिया's picture

8 Jul 2017 - 10:03 pm | अभिजीत अवलिया

धन्यवाद म्हात्रे साहेब, लिंक बघतो.

+१११ एजंट्स च्या भानगडीत पडू नका. प्रोसेस मोठी असली तरी समजण्यास सोपी आहे. आपली आपण करता येण्याजोगी आहे. काकांनी दिलेल्या लिंक वर व्यवस्थित माहिती आहे. शिवाय कॅनडाचं इमिग्रेशन डिपार्टमेंट भारतातल्या बहुतांश मोठ्या शहरात एक ओरिएंटेशन प्रोग्राम घेतं - पी आर चं इन्व्हिटेशन आलं की तो अटेंड करावा , बरीच बेसिक माहिती मिळते. काही आपल्याला माहिती असते काहींवर नव्या दृष्टिकोनातुन विचार करता येतो.

पी.आर. काढताना ज्याला नोकरीसाठी कॅनडाला जायचे आहे त्याच्यासह सगळ्या फॅमिलीचा एकत्रितच काढावा लागतो का?

काढावाच लागतो असं नाही पण पी आर स्टेटस संपुर्ण फॅमिलीचा असतो. उद्या तुम्ही तिकडे नोकरी मिळाल्यावर बायका मुलांचा पी आर केल्यास ती अजुन एक मोठी प्रोसिजर आहे, त्याला वेळ जास्त लागतो शिवाय तेवढ्या वेळात जर फॅमिली इथे व्हिजिटर व्हिसा वर आली तर त्यांना कुठलेही हेल्थ बेनेफिट्स मिळत नाहीत. तुम्ही सिंगल असाल तर फक्त स्वत: चा पी आर काढु शकता. आई वडिलांना अ‍ॅड केलंच पाहिजे असं काही नाही.

स्रुजा's picture

8 Jul 2017 - 10:22 pm | स्रुजा

शिवाय आता पॉईंट सिस्टीम सुरु झाल्यापासून एजंट्स काही करु शकत नाहीत. तुमचा तेवढा स्कोअर असतो अथवा नसतो. कागदपत्रं तुमची तुम्हालाच जमवावी लागतात. त्या सगळ्याचे १-२ लाख द्यायची काही गरज नाहीये माझ्या मते.

म्हणजे थोडक्यात इकडचे सगळे सोडून तिकडे यावे लागेल.

हो, बहुतांश केसेस मध्ये हेच होतं. पण यात बरीच मोठी उडी आहे, तिकडे ६ महिने पुरतील एवढे पैसे बँकेत आहेत असं दाखवणं वगैरे सोपस्कार आह्रेत आणि खरं सांगायचं तर तेवढे पैसे तुमच्याजवळ खरंच हवेत. नाही तर इथे येऊन मानसिक त्रास होऊ शकतो. खुप मोठं स्थित्यंतर आहे. तुम्हाला खरोखर यात काही व्हॅल्यु अ‍ॅडिशन आहे असं वाटत असेल तरच उछलकुद करा हा माझा प्रामाणिक सल्ला आहे. अनेक कारणं आहेत, मुख्य म्हणजे ९० च्या दशकात जसा आणि जेवढा फरक भारतात आणि इथे होता तो आता मुळीच उरलेला नाहीये. वेदर, तुमची सपोर्ट सिस्टीम या सगळ्याचा विचार करा.

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 10:37 pm | मुक्त विहारि

इथे तर लिहाच पण....ह्यासाठी वेगळा धागा काढा ना....(ही विनंती)

कारण त्यामुळे सगळ्यांनाच फायदा होईल.

माझ्या मुलांचे युरोपातले नागरिकत्व मिळाले तर मी पण असा धागा काढणार आहेच....अद्याप तरी ते भारतात असल्याने आणि त्यांना परदेशात पाठवायची प्रोसेस सूरु असल्याने ते अर्धवट ज्ञान इथे देणे अयोग्य. त्यांचे काम झाले की सांगीनच.

बर्‍याच मिपाकरांना ह्या गोष्टी हव्या असतीलही...पण परखड सत्य बोलायला कुणीच तयार नसतो...

स्रुजा's picture

8 Jul 2017 - 10:44 pm | स्रुजा

कशावर धागा काढू मुविकाका?

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 10:46 pm | मुक्त विहारि

कॅनडा इमीग्रेशन...

अभ्या..'s picture

9 Jul 2017 - 3:36 pm | अभ्या..

किती दगदग कराल काका,
आता रेस्ट घ्या थोडी वर्षे.
वाटल्यास "ओ कॅनडा(युरप वगैरे जे काही असेल ते) मधील १० वर्षे" असा धागा काढायलाच या. ;)

जेम्स वांड's picture

10 Jul 2017 - 5:40 pm | जेम्स वांड

तुमचे पण संबंधितांशी जुने 'ऋणानुबंध' आहेत काय अभ्या साहेब, नाही त्यांच्या गरळ ओकण्यास अन फुकट पांचट तपशीलांस हरकत घेतल्यास संबंधित ऋणानुबंध वगैरे बोलून कन्नी कापतात असा हल्लीच आलेला अनुभव आहे =)) =))

अभ्या..'s picture

10 Jul 2017 - 6:22 pm | अभ्या..

कायकी ब्वा.
म्या कधी विचार केलो नाही.
लिहून मोकळे व्हायचे न्हायतर गप्प वाचत बसायचे इतकाच अजेंडा.

अधिक चांगल्या जीवनमानाच्या शोधात स्थलांतर किंवा देशांतर करण्यात काही वाईट नाहीये. मानवजात ही स्थलांतर करूनच उत्क्रांत होत गेली. ज्यांना इकडे तिकडे जायचे असेल त्यांनी अवश्य जावे. फक्त जाताना आपल्या सद्यस्थिती व स्थानाला उगीच हिणवत बसू नये. (आणि पुण्याची एव्हढी अॅलर्जी असेल तर पुण्याला येऊच नये ना!)

आदूबाळ's picture

9 Jul 2017 - 12:34 pm | आदूबाळ

अगदी अगदी.

'आम्हाला' आता लय बोर व्हायला लागलंय.

त्या निमित्ताने पुण्यातल्या पुणेकरांचा याखंदा कट्टा करावा काय :) ?

यशोधरा's picture

10 Jul 2017 - 12:38 am | यशोधरा

हो, आणि पुण्यातच करुयात हं. ;)

उपेक्षित's picture

10 Jul 2017 - 11:10 am | उपेक्षित

:)

चला तर मग कधी ठरवायचा कट्टा (पुणेरी ;) )

आधी ३ धागे हून जौदेत. मग ठरेल 'पुणेरी' कट्टा!

उपेक्षित's picture

10 Jul 2017 - 5:36 pm | उपेक्षित

खिक्क :)

कॅनडा मधल्या हवामानाचा खूप परिणाम होईल असं वाटत मला., extreme weather कंडिशन आहेत ना?

उपेक्षित's picture

9 Jul 2017 - 2:43 pm | उपेक्षित

साधारण ८/९ महिन्यांपूर्वी माझ्या Ex. Partner चा मित्र PR वर गेलाय कॅनडाला आधी job वगेरे काही नव्हता बघितला but आता व्यवस्थित चालू आहे त्याचे
तो CA आहे

रघुनाथ.केरकर's picture

10 Jul 2017 - 2:09 pm | रघुनाथ.केरकर

सण्गण्क दुरुस्ती येणार्‍यांना आणी जेम्तेम ईंग्रजी बोलता येणार्‍यांना काही स्कोप आहे का?

इथे आता काही राम राहीला नाही. लोक्स २०० रुपयांत संगणक दुरुस्ती करु लागलेय्त. बाकिचे युट्युब वरुन शिकायलेत. बर नवीन सूटे भाग विकावे तर ल्यामींगट्न वाले भी सही भाव द्देइनात.

म्हणुन क्यानडा ट्राय करावा अशा विचारात आहे. धागा वाचल्या पासुन नावकरी डाट खाम पन पालथा घातला.

कुठे डॉलरातली रोजि असेल तर कळवा.

संगणक हार्डवेअर मधे आता काही राम राहिलेला नाही. त्यापेक्षा तुम्ही इलेक्ट्रीशिअन, प्लंबर वगैरे व्हा. चांगले पैसे कमवाल.

अभ्या..'s picture

10 Jul 2017 - 8:35 pm | अभ्या..

हा, बरोबरे.
झालंच तर काचा क्लीन करणारे, पिझ्झा डिलेव्हरी, ड्रायव्हिंग ट्रेनर.
भारी जॉब असतेत राव. ;)

जेम्स वांड's picture

10 Jul 2017 - 9:23 pm | जेम्स वांड

अर्रर्रर्र, बेक्कार काय तर आठवलं, असो ;) :P

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jul 2017 - 9:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यापेक्षा तुम्ही इलेक्ट्रीशिअन, प्लंबर वगैरे व्हा. चांगले पैसे कमवाल.

हे वाक्य तुम्ही गंभीरपणे लिहिले की गमतीने हे कळले नाही. पण, ऑस्ट्रेलिया/कॅनडात इंजिनियर्सपेक्षा ट्रेड्समनना (प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, फिटर, इ) जाणे जास्त सुकर असू शकते. कारण...

या देशांत स्थलांतरीत होण्यासाठी / नोकरीसाठी वेगवेगळ्या विषयांखाली गुण दिले जातात. तिथली सरकारे तेथे कमतरता असलेल्या व्यवसाय/नोकर्‍यांची एक प्राधान्यक्रम यादी बनवते व त्यांच्यामध्ये प्राविण्य असणार्‍या उमेदवारांना वरचे जास्त गुण मिळतात. विसाच्या यादीतील अनुक्रम (अ) पात्रता आणि (आ) देशाची गरज या दोन मुख्य मुद्द्यांवरून ठरतो व वेळोवेळी वरखाली जातो. कॅनडाचे सरकार तर ही यादी सरकारी विभाग व खाजगी कंपन्यांना खुली ठेवते... व त्यावरून नोकरीची ऑफर मिळालेल्या उमेदवाराला अधिक ६०० गुण देते (जास्तीत जास्त १२०० गुण शक्य असतात). अर्थात उमेदवाराची पात्रता आणि देशाची गरज यांचे सर्वोत्तम गुणोत्तर जमल्याने ते नाव व्हिसाच्या यादीत बरेच वर जाते आणि ३ ते ६ महिन्यांत व्हिसा मिळण्याची शक्यता निर्माण होते. थोडक्यात, देशाला फायदेशीर ठरणार्‍या लोकांनी प्राधान्याने स्थलांतर करावे याकडे सरकार लक्ष ठेवते... जे उमेदवार व देश या दोघांच्याही फायद्याचे ठरते.

याविरुद्ध, अमेरिकेची नोकरी/स्थलांतरीत व्हिसा व्यवस्था उमेदवारांच्या अर्जांच्या लॉटरीवर आधारीत आहे ! आणि त्यापेक्षा जास्त गमतीदार गोष्ट अशी की, "लॉटरीवर आधारीत पद्धत बंद करून कॅनडा-ऑस्ट्रेलियासारखी आपल्या देशाला फायदेशीर आणि उमेदवाराच्या गुणवत्तेवर आधारीत व्हिसा प्रणाली असावी", असे म्हणणार्‍या राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा तेथे विरोध आणि चेष्टा चालू आहे !

काका, कॅनडाला मुव्ह होताय का? खुपच तपशील आहेत तुमच्या प्रतिसादांत :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jul 2017 - 10:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

अभ्यास, अभ्यास !

सत्तरीच्या दशकांत विमानाचे एकदिशा तिकिट काढून पश्चिमेत स्थलांतराच्या संधी होत्या, "तिकडे कायमचे स्थलांतर करायचे नाही" असे तेव्हाच ठरवले होते... आता तर तसे करायची जरूरही नाही ! :)

अभिजीत अवलिया's picture

10 Jul 2017 - 10:18 pm | अभिजीत अवलिया

अभ्यास आवडला :)

स्रुजा's picture

10 Jul 2017 - 10:23 pm | स्रुजा

+१११

रघुनाथ.केरकर's picture

11 Jul 2017 - 11:14 am | रघुनाथ.केरकर

पुन्हा नवीन शिक्षण घेउन नव्याने सुरुवात करणे नाही जमणार त्या पेक्षा पार्ट टाइम नांगर हाती घेतलेला उत्तम.

बाकी धागा छान आहे. बरीच नवीन माहीती मीळाली.

अद्द्या's picture

12 Jul 2017 - 12:36 pm | अद्द्या

काय वय तुमचं ?

पन्नाशीत नवीन शिक्षण घेऊन नवीन व्यवसाय / नोकरीत उतरणाऱ्या लोकांना मी ओळखतो .. त्या पेक्षा जास्ती आहे का ?

कि सरळ शब्दात हार मानताय ? पैसे कमवायचा तर झाक मारून जे गरज आहे ते शिकायलाच पाहिजे.. त्यात वय वगैरे गोष्टी कुठून आल्या ?

ट्रेड मार्क's picture

11 Jul 2017 - 12:22 am | ट्रेड मार्क

अमेरिकन व्हिसा आणि हरितपत्राच्या कटकटींना कंटाळून मी पण कॅनडा पीआर साठी अर्ज केला होता. त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी -

१. Educational Transcripts - तुमच्या युनिव्हर्सिटीकडून तुमची Educational Transcripts मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. युनिव्हर्सिटी हे तुम्हाला एका सीलबंद पाकिटात पाठवते. ते तसेच्या तसे बंद पाकीट WES कडे पाठवावे लागते.

साधारण खर्च - तुमची युनिव्हर्सिटी जवळपास रु. १५०० प्रतिव्यक्ती व प्रतिपदवी. WES - जवळपास CAD ३०० प्रतिव्यक्ती.
लागणारा वेळ - युनिव्हर्सिटी १-३ महिने (युनिव्हर्सिटीवर अवलंबून), WES - १-२ महिने

२. IELTS - ही इंग्लिशची टेस्ट असते. याचे क्लास असतात किंवा ऑनलाईन स्टडी मटेरियल मिळते. यात ४ भाग असतात. प्रथम एक लेखी परीक्षा असते, ज्यात तुमची ऐकण्याची, वाचण्याची व लिहिण्याची क्षमता बघतात. नंतर एक इंटरव्यू होतो. यात मला सगळ्यात अवघड वाटलेला भाग म्हणजे ऐकण्याची क्षमता, कारण यात एका संभाषणाची रेकॉर्ड ऐकवतात आणि मग त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची. अधिक माहिती येथे, यातील जनरल ट्रेनिंग ची टेस्ट बघा. महाराष्ट्रात मुंबई व नवी मुंबई मध्ये एक सेंटर आहे तिथे जाऊन ही टेस्ट द्यायला लागते.

साधारण खर्च - रु. १२,००० प्रत्येकी
लागणारा वेळ - तयारीसाठी - १ महिना कमीतकमी. परीक्षेसाठी आधी रजिस्टर करावे लागते त्यामुळे प्रत्येक सेंटरची उपलब्धता बघून तारीख ठरवा.

३. जर का विवाहित असाल तर वरील दोन्ही दोघांचेही करणे श्रेयस्कर आहे. कारण पॉईंट्स मोजताना मुख्य अर्जदाराच्या स्पाऊजचे (नवरा अथवा बायको) सुद्धा मार्क धरतात. उदा. IELTS मध्ये मुख्य अर्जदाराला पूर्ण म्हणजे ९ पॉईंट्स मिळणे आवश्यक आहे पण दुय्यम अर्जदाराला सुद्धा ७ पॉईंट्स आवश्यक आहेत.

४. स्किल्स प्रमाणे वर्गीकरण - त्यांनी सोयीसाठी वेगवेगळ्या स्किल्सचे वर्गीकरण केले आहे.

५. पॉईंट्स कसे मोजतात - WES कडून जे तुमचं मूल्यमापन होईल त्याप्रमाणे शैक्षणिक पात्रतेचे पॉईंट्स + IELTS चे पॉईंट्स + तुमचे तुमच्या क्षेत्रातील नोकरीचा अनुभवावरून होणारे पॉईंट्स + वय... (मला आठवतंय त्याप्रमाणे वय २५-३२ वयाला १०० पॉईंट्स असतात, ३२ च्या वर गेलं की प्रतिवर्षी १० पॉईंट्स वजा होतात).

६. तुम्ही CIC च्या वेबसाईटवर माहिती भरली की तुमचे पॉईंट्स तुम्हाला कळतात. या अर्जाबरोबरच त्यांचे एक जॉब पोर्टल आहे त्यात सुद्धा रजिस्टर करावे लागते.

७. पॉईंट्स सिस्टीम - टोटल १२०० पॉईंट्स असतात.

- यात ६०० पॉईंट्स तुमच्या वैयक्तिक स्किल्सचे असतात. म्हणजे क्र. ५ मध्ये जे आहेत ते सर्व पॉईंट्स मिळून तुमचे ६०० पैकी किती होतात ते बघायचे. गेल्या २ वर्षात तरी हा स्कोअर ४१५ च्या खाली आलेला बघितला नाही. साधारण अंदाज द्यायचा तर, मुख्य अर्जदाराने मास्टर्स डिग्री (१२+३+२) घेतली असेल व दुय्यम अर्जदाराने पदवी घेतली असेल (१२+३) आणि IELTS मध्ये ९ आणि ७ असे अनुक्रमे मार्क मिळाले असतील, मुख्य अर्जदाराला ५ वर्ष्यांच्या वर अनुभव असेल व दुय्यम अर्जदार स्किल टाईप या मधील नोकरी करत नसेल (किंवा नोकरीच करत नसेल) व दोघांचे ही वय ३२ च्या आत असेल तर पॉईंट्स कसेबसे ३६०-३८० च्या आसपास होतात. ४०० च्या वर पॉईंट्स होण्यासाठी दोघेही मास्टर्स वा डॉक्टर वगैरे हाय स्किलवाले, शिवाय ५+ वर्ष त्या क्षेत्रातला अनुभव आणि वय ३२ च्या आत असावे लागतील असा माझा अंदाज आहे.

- दुसरे ६०० पॉईंट्स तुम्हाला जॉब ऑफर असेल तर सर्व मिळतात. म्हणजे जरी तुमचे वैयक्तिक स्किल चे ३५० असतील आणि तुम्हाला जॉब ऑफर मिळाली तर ६००+३५०=९५० पॉईंट्स मिळतील. म्हणजे पुढच्या ड्रॉ मध्ये तुम्हाला PR चा निमंत्रण येईल.

एकदा निमंत्रण आलं की तुम्हाला तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत याचा पुरावा द्यायला लागतो, जो ४ जणांच्या कुटुंबासाठी साधारणतः CAD २०,००० आहे. हे लिक्विड ऍसेट लागतात, म्हणजे माझं भारतात घर आहे ज्याची किंमत ५० लाख आहे असं दाखवून चालत नाही. तर बँकेत ठेव, शेअर्स, सोनं वगैरे दाखवू शकतो. पण बँकेतले पैसे सगळ्यात ग्राह्य मानतात, हे पैसे कुठून आले याचाही पुरावा द्यायला लागतो. तसेच मेडिकल टेस्ट करायला लागते. त्याचे रिझल्ट्स सादर केले की मग २ महिन्यात पीआर मिळतं. त्याची फी साधारणतः CAD ४५० प्रतिव्यक्ती आहे (मुलांसाठी बहुतेक CAD १०० आहे). PR मिळालं की ते घेण्यासाठी तुम्हाला कॅनडाला जावे लागते. पोर्ट ऑफ एन्ट्रीला CAD १०० द्यावे लागतात.

यातला महत्वाचा भाग म्हणजे जॉब ऑफर मिळवणे. मी सापडेल तेवढ्या जॉब पोर्टल्सवर व माहित असलेल्या कंपनांच्या पोर्टल्सवर रेझ्युम टाकला होता. तसेच सापडतील तेवढे अमेरिकेतले पण कॅनडामध्ये जॉब देणारे कंसल्टंट्स व कॅनडामधले कंसल्टंट्स यांकडे रेझ्युम दिला होता. पण जे काही फोन आले ते तुमच्याकडे पीआर आहे का विचारतात नाहीतर वर्क व्हिसा मागतात. एकाने मला कॅनडामध्ये इंटरव्यूला ये म्हणून सांगितलं. ते खर्च द्यायलाही तयार नव्हते. माझं म्हणणं होतं की पहिले २-३ राऊंड्स आधी आपण skype आणि फोनवर करू. अगदी शेवटच्या राऊंडला मी माझ्या खर्चाने येतो मग समोरासमोर इंटरव्यू घ्या. पण त्याला कोणीच तयार होत नाही. अमेरिकेत रहात असूनही, माझा फोन नंबर +१ च्या कंट्री कोडने असूनही फारसे कॉल आले नाहीत.

यातला थोडा फ्रस्टेटींग भाग हा आहे की १ वर्षाने तुमचे प्रोफाइल रद्द होते, जे परत तयार करायला लागते. तसेच दर २ वर्षाने IELTS चा स्कोअर कुचकामी ठरवतात. म्हणजे २ वर्षाने परत प्रोफाइल तयार करायचे असेल तर IELTS परत द्यायला लागते. गमतीचा भाग हा आहे की मी ६ वर्ष अमेरीकेत काम करत असूनही मला इंग्लिश येतं हे IELTS देऊन सिद्ध करावं लागलं.

जाता जाता: सिटिझनशिप मिळवण्यासाठी प्रत्येक देशाने एक पळवाट ठेवलेली आहे. ज्यात तुम्ही एका ठरावीक रकमेची गुंतवणूक, सरकारी रोख्यांमध्ये अथवा बिझनेसमध्ये, करू शकलात तर लगेच सिटिझनशिप मिळते. अमेरिकन सिटिझनशिप हवी असेल तर फक्त $५००,००० गुंतवणूक लागते. बघा कोणाला जमतंय का! नजीकच्या भविष्यात ही रक्कम वाढणायची शक्यता आहे, त्यामुळे लवकर निर्णय घ्या.

अभिजीत अवलिया's picture

11 Jul 2017 - 9:30 am | अभिजीत अवलिया

अतिशय उपयुक्त आणि तपशीलवार माहिती दिली तुम्ही ट्रेडमार्क साहेब. खूप खूप आभारी आहे.

ट्रेड मार्क's picture

11 Jul 2017 - 9:36 pm | ट्रेड मार्क

अजूनही काही माहिती पाहिजे असल्यास व्यनी करा.

मी स्थलांतरित होण्यासाठी अजून काही देशांची माहिती गोळा केली आहे. जे माहित आहे ते सांगीन.

उपाशी बोका's picture

11 Jul 2017 - 1:40 am | उपाशी बोका

६५ रुपये प्रतिडॉलर या दराने ३.२५ कोटी रुपये असतील तर कोण कशाला अमेरिकेत जाईल? नुसत्या व्याजावरसुद्धा भारतात आरामात जगता येईल.

इडली डोसा's picture

11 Jul 2017 - 4:45 am | इडली डोसा

कॅनडामधे बर्‍याच लोकांनी याप्रकारे नागरिकत्व मिळवले आहे. सामान्य नागरीकांसाठी हा आकडा मोठा असला तरी धनाढ्य लोकांसाठी हि किंमत काहीच नाही.

सामान्य नागरीकांसाठी हा आकडा मोठा असला तरी धनाढ्य लोकांसाठी हि किंमत काहीच नाही.

आत्ता कळाला विजय मल्ल्या सारखे लोका दुसरया देशान्चा नागरिकत्व कसा सहज मिळवतात ..

उत्तम माहिती देत आहेत लोक.

कॅनडा मध्ये स्थायिक केला होता, माहिती जुनी आहे पण उपायोगी ठरेल

१. कॅनडा मध्ये स्थायिक होण्यासाठी पॉईंट बेस्ड सिस्टम आहे. आपले शिक्षण, स्किल इत्यादी वरून पॉईंट्स ठरतात.
२. कॅनडा चे tech क्षेत्र विशेष मोठे नाही पण जॉब मिळणे मुश्किल नाही.
३. पगार SF च्या तुलनेने सुमारे ६०% असेल. जॉब बदलणे मुशिक्ल.
४. आरोग्य क्षेत्र सरकारी आहे. फुकट असले तरी प्रत्येक गोष्टीसाठी फार वेळ लागतो.
५. हवामान अगदीच खराब आहे. थंडी पसंद नसेल तर इथे जाण्याचा विचार सुद्धा करू नये.

धर्मराजमुटके's picture

11 Jul 2017 - 10:07 am | धर्मराजमुटके

वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना कितपत कितपत रुजलेल्या आहेत किंवा निकालात निघालेल्या आहेत हा ही एक मुद्दा स्थलांतर करतांना तपासला पाहिजे. नाहितर महाराष्ट्रातील बिहारींसारखी अवस्था होऊ नये.

अभिजीत अवलिया's picture

11 Jul 2017 - 10:19 am | अभिजीत अवलिया

ते देखील आहेच. पण मला वाटते कॅनडा हे राष्ट्रच मुळी स्थलांतरितांनी बनलेले आहे. त्यामुळे वंशभेद नसावा.

इडली डोसा's picture

11 Jul 2017 - 12:42 pm | इडली डोसा

गेले १० महिने मी व्हॅंकुवर मध्ये राहात आहे. नवऱ्याचे इंट्रा कंपनी ट्रान्सफर वर्क परमिट असल्यामुळे मलाही स्पाउजल वर्क परमिट मिळाले. वर्क परमिट असल्यामुळे कॅनडाला जाऊन जॉब सर्च करण्याचा विचार होता. ( वर्क परमिट असेल तर जॉब मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण कंपनीला काही व्हिसा प्रोसेसिंग आणि त्याच्यासोबत येणारा खर्च करावा लागत नाही ) योगा-योगाने मलाही सेम कंपनी मध्ये जॉब मिळाला.

व्हॅंकुवरमध्ये स्थलांतरित होण्यची ढोबळमानाने कारणे

- दोघांपैकी एकाला खात्रीशीर जॉब
- कुटुंबाची प्राथमिकता असलेल्या ऍक्टिव्ह जीवनमानासाठी पुरेपूर वाव
- मुलीच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक सामाजिक वातावरण
- पालकांना भेट देण्याकरिता किंवा स्थलांतरित होण्याकरिता व्हिसाची सुलभता
- कॅनडातले सर्वोत्तम वेदर असलेले ठिकाण ( या वर्षी कमीत कमी -५ deg C आणि जास्तीत जास्त ३२ deg C )
- जागतिक क्रमवारीत राहण्यासाठी उत्तम ठिकाणांमध्ये सतत पहिल्या दहात

स्थलांतरित होण्यापूर्वी केलेला विचार आणि प्रयत्न

- सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे आणि ते कुठे उपलब्ध आहे. थोडक्यात तुमच्या प्रॉयोरिटीज काय आहेत?
- पालकांना येण्यासाठी सुलभ अशी व्हिजा प्रोसेस ( पालकांचा वारंवार नाकारला गेलेला यूएस व्हिजा हे एक मुख्य कारण होते ज्यामुळे आम्ही यूएस बाहेर पर्याय शोधायला सुरुवात केली )
- कायम स्वरूपी रहिवासी (परमनंट रेसिडेन्सी)आणि नागरिकत्व यासाठी लागणारा वेळ
- पगार आणि बचत आणि इतर गुंतवणूक यावर होणारा परिणाम ( यूएस च्या मानाने कॅनडामध्ये पगार कमी आहेत. शिवाय दोघांपैकी एकालाच जॉब मिळाला असता तर बचत ५०% ने कमी झाली असती )
- एकदा यूएस बाहेर पडायचे ठरवल्यावर नवऱ्याने सतत दोन वर्ष खूप नेटवर्किंग केले. म्हणजे कंपनीतल्या वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटणे आणि त्यांना दुसऱ्या देशात काही संधी असतील तर त्याबद्दल माहिती विचारणे किंवा आपली दुसरीकडे जायची तयारी आहे हे नोंदवून ठेवणे इत्यादी इत्यादी. ग्लोबल कंपनी असल्यामुळे युरोप, ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका अश्या इतरत्र संधी असतात
- याशिवाय आम्ही स्वतःहून ऑस्ट्रेलिया PR साठी देखील प्रयत्न केले. मी त्यासाठी तीन वर्षांपूर्वी IELTS दिली, तसेच एका व्हिसा कन्स्लटिंग फार्म कडून पॉईंट असेसमेंट करून घेतली पण तिथली अनिश्चितता जास्त होती. म्हणून तो प्रयत्न पुढे नेला नाही.
- शेवटी सगळ्या प्रयत्नाना फळ येऊन २०१६ च्या फेब्रुवारीत मुलाखतीचे राउंड पार पडून नवऱ्याला कॅनडामधली जॉब ऑफर मिळाली.
- वर्क व्हिसा आणि एकाच कंपनी असली तरी वर्क परमिट यायला साधारण ६ महिने लागले (३महिने कागदपत्र जमा करण्यासाठी, ३ महिने प्रत्यक्ष अ‍ॅप्लिकेशन नंतर लागलेला वेळ)

कॅनडात यायच्या आधी आणि आल्यानंतर

- चांगल्या एरिआतले अपार्टमेंट रेंटसाठी लिस्ट झाल्या झाल्या लगेच जातात , त्यामुळे आम्हाला कंपनीने दिलेल्या इस्टेट एजन्टने स्काईपवर अपार्टमेंट दाखवले आणि आम्ही ते बघायच्या आधीच सिलेक्ट केले ( नवरा इंटरव्यूसाठी आला असताना साधारण या अपार्टमेंट कॉप्लेक्सच्या इथला एरिया बघून गेला होता. )
- मूव्हिग कंपनीकडून झाले आम्हाला स्वतःचा एक पैसा खर्च करावा लागला नाही. आधीचेच सामान आणता आल्याने नवीन सामान घ्यायला काही खर्च आला नाही. भारतातून फॅमिली घेऊन यायची असेल तर या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
- मेडिकल आणि इतर विमा - पहिले तीन महिने सरकारी विमा किंवा सरकारचे हेल्थ कार्ड/ केअर कार्ड मिळाले नव्हते तेव्हड्या काळात कंपनीने खाजगी विम्याची सोय केली होती. हा विमा वापरायची गरज पडली नाही.
- ३ -४ महिन्यांनी केअर कार्ड आले , मध्यंतरी एकदा मुलीला किरकोळ आजारपणासाठी दवाखान्यात न्यावे लागले. रजिस्टर्ड जिपी नाही , जवळच्या वॉक इन क्लिनिकमध्ये १ तासात नंबर आला , मधल्या वेळात घरी जाऊन येऊ शकलो तिथे ताटकळत बसायला लागले नाही. तपासणी झाल्यानंतर एकही पैसा द्यावा लागला नाही फक्त केअर कार्ड दाखवून भागले. या कार्डवर ज्या गोष्टी कव्हर होत नाहीत त्यासाठी कंपनीतर्फे खाजगी विमा आहे.
- सेव्हिंग यूएस पेक्षा साधारण ३०% कमी झाले आहे पण इतर गोष्टी ज्या करायला मिळत आहेत त्यामुळे त्याचे फारसे काही वाटत नाही
- आल्यापासून जवळपासच्या ५-६ नितांत सुंदर ठिकाणांच्या एक एक दिवसाच्या सफरी झाल्या
- सगळे मिळून (नवरा, मी आणि कन्या) या वर्षी स्कीईंग शिकलो.
- नवर्‍याच्या इनडोअर आणि आउटडोअर रॉक क्लायंबिंगचे प्रमाण त्याच्या अपेक्षेनुसार वाढले
- मुलीसाठी घराजवळच चांगले डे -केअर, लायब्ररी, खेळायला मोठे पार्क आणि स्विमिंग पूल मिळाले
- शिवाय माझ्या आईचा व्हिसा होऊन गेल्या सहा सात वर्षात पहिल्यांदाच घरून कोणीतरी आम्हाला भेटायला आमच्या सोबत राहायला आले.
- त्यामुळे एकंदरीतच या स्थलांतरातून अपेक्षित होत्या त्या गोष्टी होत आहेत आणि पुढेही होतील असा विश्वास आला आहे.

तर एवढं सगळं घडाभर तेल नमनाला वाहण्याचा उद्देश असा कि अमुक एक देशात व्हिसा आणि नोकरी सहज उपलब्ध आहे हि एक बाजू झाली . तुम्हाला या स्थलांतरातून नक्की काय हवय त्याचा विचार करा हवं तर लिहून काढा. अशी संधी अजून कुठे दुसरीकडे उपलब्ध आहे का त्याचाही शोध घ्या. तुमच्या कौटुंबिक , सामाजिक आणि आर्थिक जीवनावर याचा काय परिणाम होईल आणि तो तुम्हाला अपेक्षित असाच आहे का किंवा स्वीकारण्याजोगा आहे का याचा विचार करा. या आणि अशा इतर बाजूही यशस्वी आणि आनंदी स्थलांतरासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत.

शिवाय ट्रेमा, म्हात्रेकाका आणि स्रुजाने वर उत्तम माहिती दिली आहेच, कॅनडा इमिग्रेशनसाठी गव्हर्मेंट वेबसाईटवर शक्यतो सगळी माहिती उपलब्ध आहे. कॅनडा इमिग्रेशनसाठी काही फोरम असतील तर तेही वाचून बघा.

नवीनच पास झालेल्या C -६ सिटिझनशिप बिल बद्दलही वाचा.

तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

ट्रेड मार्क's picture

11 Jul 2017 - 9:33 pm | ट्रेड मार्क

तुमचा स्थलांतरित होण्याचा उद्देश स्पष्ट पाहिजे. स्थलांतरित झाल्यावरचे पहिले ६ महिने/ वर्ष हे अगदीच वाईट जातात. नवीन देश, तिथल्या चालीरीती, हवामान, कामाच्या ठिकाणी जुळवून घेणे, घर मिळवणे आणि सेट करणे याच बरोबर आपले सगेसोयरे नसणे यामुळे फ्रस्ट्रेशन येतं. भाषेची पण अडचण सुरुवातीला जाणवते, जरी इंग्लिश असलं तरी उच्चारांमध्ये फरक असतो. त्यात काही वर्णभेद करणारे लोक भेटतात. कशाला इथे आलो असं वाटतं. मुख्यतः थंडीच्या दिवसात तर जेव्हा संध्याकाळी ४-४.३० लाच अंधार पडतो आणि कसंबसं घरी पोचून घरातच कोंडून घ्यावं लागत तेव्हा तर फारच होमसिक वाटतं.

त्यात जर तुम्ही नोकरी नसताना आलात तर फारच त्रासाचं होऊ शकतं. जवळ असलेले रुपयातून कन्व्हर्ट केलेले CAD आणि १ CAD म्हणजे ५०-५२ रुपये हे गणित आपल्याला सतत त्रास देत राहतं. एकदा पाहिलं वर्ष काढलंत की मग पुढे तुम्ही रुळता. टोरोंटो आणि कॅलगरीमध्ये तर खूप भारतीय आहेत, सरदार तर खूपच. मराठी लोक पण बरेच आहेत.

इडली डोसा: व्हॅंकुवर खूपच छान आहे असा ऐकलंय पण त्याबरोबर बरंच महाग आहे (कॅनडातील इतर शहरांपेक्षा) असं पण ऐकलंय. यूएस पेक्षा ३०% कमी सेविंग होतं म्हणताय, म्हणजे यूएस मध्ये $१०० सेव्ह करत होतात आता फक्त CAD ७० करता असं म्हणताय का भारतीय रुपयांच्या हिशोबाने म्हणताय का १ USD ~ ०.७५ CAD यामुळे म्हणताय? त्यात तुम्ही मेडिकल इन्शुरन्सचा प्रीमियम धरला आहे का? कॅनडामध्ये खाण्यापिण्याच्या खर्च कमी येतो, पण टॅक्स आणि घराचं भाडं जास्त आहे असं मला वाटतं. बरोबर आहे का?

व्हॅंकुवर मधे इन्कमलेव्हलची तुलना केल्यास घर विकत घेणं महाग आहे. पण भाड्याने घेणं कोणत्याही नॉर्थ अमेरिकन मोठ्या शहरात भाड्याने राहाण्यासारखचं आहे.

३०% कमी सेविंग होतं म्हणताय, म्हणजे यूएस मध्ये $१०० सेव्ह करत होतात आता फक्त CAD ७० करता

म्हणजे यूएस $१०० करत होतो ते आता यूएस $७० झाले आहे.

मेडिकल इन्शुरन्सचा प्रीमियम धरला आहे का?

हे कंपनी कडुन कव्हर होतयं, पे चेक मधुन आमची कॉन्ट्रि जाते पण ती युएसपेक्षा कमी आहे.

टॅक्स आणि घराचं भाडं जास्त आहे असं मला वाटतं.

टॅक्सला युएस मधल्या टॅक्सशी तुलना केल्यास आम्हाला फार काही फरक नाही पडला. घर भाड्याचं वर आलचं आहे.

अनिवासि's picture

11 Jul 2017 - 5:01 pm | अनिवासि

सर्व प्रतिसाद वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि जग किती बदले आहे हे जाणवले.
१९५२ साली ( वय १९) परदेशात जाऊन अभ्यास करावयाचा विचार आला - माहिती काढायला सुरवात केली. मिळाली ०. मुर्खात काढणारे शेकडो ! खटपट चालू राहिली पासपोर्ट काहीही खळखळ न होता मिळाला . २००० रुपयाचे कर्ज वडील व त्यांच्या मित्रांमुळे मिळाले. आणि ऑक्टोबर ५२ला धुरकटलेल्या / काळोख्या संध्याकाळी लंडनमध्ये पोहोचलो. ओळखी नाहीत. मित्र नाहीत.
आज ६५ वर्षानंतर हे सर्व वाचले कि वाटते आपली आजकाल काही वाट लागली नसती. मी फक्त SSC झालेला वेडा.
आता सर्व आकाक्षिताना सुयश चिंतणे हाती आहे ते करतो.
( सर्व कर्ज व्याजासहित परत केले व वर दुसर्या मुका/मुलींसाठी देणगी पण दिली)

हर्मायनी's picture

12 Jul 2017 - 9:41 am | हर्मायनी

काका.. तुमच्या त्यावेळच्या लंडन बद्दलच्या गोष्टी वाचायला आवडतील! :)

खरोखर काका, तुमच्या त्या वेड्या साहसाबद्दल लिहाच. तुमचे अनुभव आजच्या पिढीतल्या माझ्यासारख्यांना मार्गदर्शक ठरतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2017 - 3:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी आहे हे सगळे !

हे सगळे एका वेगळया लेखाद्वारे इथे सविस्तर लिहा अशी आग्रहाची विनंती आहे !

अभिजीत अवलिया's picture

12 Jul 2017 - 3:59 pm | अभिजीत अवलिया

१९५२ म्हणजे महायुध्दाने उध्वस्त झालेले लंडन. ते आजचे एक सुंदर वैभवशाली लंडन. हा प्रवास तुम्ही जितका काही अनुभवला असाल तो देखील वाचायला आवडेल.

अमित खोजे's picture

12 Jul 2017 - 2:42 am | अमित खोजे

वर्गातील बहुसंख्य मुलांनी अमेरिकेत शिक्षणासाठी प्रवेश घेतला तेव्हा त्यांच्याबरोबर मीसुद्धा तयारी करून GRE वगैरे देऊन ठेवली परंतु मध्यमवर्गीय असल्याने आपल्याला त्यांच्यासारखे खर्च परवडणार नाही याची खात्री असल्याने पुढे काहीच हालचाल ना करता चुपचाप पुण्यात नोकरी पकडली. नंतर अमेरिकेत जाऊन राहिलेल्या मित्राने एकदा तो दिवाळीच्या सुट्टीत आलेला असताना पैशाचे गणित कसे मांडायचे ते समजावून सांगितले आणि मग प्रयत्न करून २ वर्षांनी अस्मादिक न्यूयॉर्क मध्ये दाखल झाले. २ वर्षात MBA करून H1 ला अर्ज केला व तो मिळाल्यावर नोकरी सुरु झाली. H1 लॉटरी नसण्याची आमची शेवटची बॅच - मे २०११. २०१२ पासून त्यांनी लॉटरी लावायला सुरुवात केली.

लॉटरी सुरु झाल्यावर मला माझ्या कॉलेजमधील खालच्या वर्गातील मित्रांची काळजी वाटू लागली कारण बहुतांशीजण माझ्याप्रमाणेच शैक्षणिक कर्ज वगैरे काढून आले होते. एवढे पैसे खर्च करून कॉलेजमध्ये यायचे आणि H1 work visa मिळणयाची काहीही खात्री नाही हे समजल्यावर त्यांच्या पायाखालील जमीनच गेली. कॉलेज मध्ये असताना H1 आणि नोकरी मिळालेल्या वरील वर्गातील मित्रांचा हेवा वाटायचा. मला H1 मिळाल्यावर तो हेवा फक्त ग्रीनकार्ड मिळालेल्या लोकांवर गेला एवढाच फरक झाला.

तब्बल ८ ते १० वर्ष तुम्हाला ग्रीनकार्ड मिळण्यासाठी थांबावे लागते हेच मी कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासून ऐकत आलो होतो. आणि ते काही अंशी खरे पण आहे. तुमच्या कंपनीला हे माहित असते त्यामुळे ती सुद्धा तुम्हाला सरासरी पगार एवढाच पगार देते. काहीही विशेष नाही. मग भले तुमच्या कडे बाजारातील कितीही अद्यावत माहिती-कला-ज्ञान असो. तेच जर तुमच्याकडे ग्रीनकार्ड असेल तर मात्र तुम्हाला बाजारभावाप्रमाणे नोकरी-मोबदला (कॉन्ट्रॅक्टर असाल तर दर ताशीच्या पैश्याचा दर) मिळतो. हे पाहून माझी चिडचिड झाली. त्यात लग्न केलेले असेल तर बायको कितीही शिकलेली व कितीही कार्यानुभवी असेल तरीही तिला घरी बसून स्वयंपाक व भांडीच करावी लागतात. (माफ करा - भांडी अस्मादिकांकडे असतात.) तेव्हा मग मी कॅनडाचा विचार सुरु केला व सर्व माहिती मिळवली.

वर ट्रेंड मार्क यांनी सर्व प्रवेशाची माहिती दिली आहेच. ती सर्व पूर्ण करेपर्यंत १ वर्ष निघून गेले. अगदी अमेरिकेत MBA केले असले व त्यासाठी TOEFL झालेली असली तरीही परत IELTS बायको व मी दोघांनी दिली. दोघांचे सर्व कागदपत्रे - अमेरिकेतील व भारतातील दोन्ही - जमा केली. ६ महिने दाखवायचे पैसे जमा केले. ते गोळा करे पर्यंत अर्ज देण्याची तारीख उलटून गेली. (मे २०१३) मग परत पुढच्या वर्षी अर्ज भरला. (मे २०१४). तेव्हा काही कागदपत्रे परत गोळा करावी लागली. त्यानंतर मात्र ऑक्टोबर महिन्यात लगेच शारीरिक तपासणीसाठी बोलावणे आले. (असे बोलावणे आले कि समजावे तुमचा PR झाला.) ती सर्व तपासणी होऊन जानेवारी २०१५ मध्ये COPR (Confirmation of PR ) मिळाले. तेव्हा न्यूयॉर्क मध्ये चांगली नोकरी चालू होती. तेथील मॅनेजरने मला ग्रीनकार्ड करायचे का म्हणून विचारले हि होते. परंतु त्याला नाही म्हणालो. तो वेडाच झाला. 'का' असे विचारल्यावर जेव्हा त्याला कॅनडाच्या PR बद्दल सांगितले तेव्हा तो म्हणाला कि 'अगदी योग्य निर्णय घेतला आहेस. माझाही ग्रीनकार्ड आज ६ वर्ष झाली तरीही आलेले नाही. कॅनडात हेल्थ केअर मोफत असते ना? कसा अर्ज करायचा मलाही सांग.'

ट्रेंड मार्क यांनी जसा अमेरिकेतच राहून कॅनडातील नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला तसाच मी सुद्धा केला. परंतु त्यात यश नाही आले. फोन नंबर जरीही +१ ने सुरु होत असेल तरीही नंबर लावल्यावर तो नंबर कोणत्या राज्यातील आहे ते लगेच दिसते त्यामुळे कॅनडामधील HR त्यांना फारसा भाव देत नाहीत. अगदी कॅनडातील मित्राचा पत्तासुद्धा दिला होता. त्यामुळे घरात बसून आपल्याला कॅनडात नोकरी मिळेल हि वेडी आशा बाळगू नका. तुम्हाला PR अथवा वर्क परमिट घेऊन प्रत्यक्ष इथे यावे लागेल. माझा न्यूयॉर्क चा नंबर असल्याने मला ३ मुलाखतींसाठी बोलावणे आले. तीनही वेळा मी न्यूयॉर्क ते टोरांटो (१० तास बस प्रवास) रात्री केला - सकाळी मुलाखत - कि परत त्याच दिवशी गाडीत बसून दुसऱ्या दिवशी नोकरीवर हजर असं उद्योग केला. ३ मुलाखतीत नंतर लक्षात आले हे असे काही जमण्यासारखे नाही. मग प्रयत्न थांबवले. चालू नोकरीचा राजीनामा दिला, गाडीत सामान भरले आणि 'गणपती बाप्पा मोरया' म्हणून टोरांटोच्या दिशेनं प्रस्थान केले.

टोरांटो
Toronto

टोरांटो का? तर एक - न्यूयॉर्क पासून जवळ होते. मला माझ्या स्वतःच्या गाडीतूनच सर्व सामान नेता येणार होते. आणि दुसरे म्हणजे मला फक्त बँकेतच नोकरी हवी होती. टोरांटो कॅनडाची आर्थिक राजधानी आहे. सर्व पाचही बँकांचे मुख्य कार्यालय टोरांटोमध्ये आहे. बाकी हवामान वगैरे म्हणाल तर मला न्यूयॉर्क मध्ये असल्याने बर्फाची तशी सवय आहे. त्यामुळे फार फरक नाही पडणार असे सुरुवातीला वाटले. काय एक ४-५ डिग्रीचा तर फरक. पण तो एक गोड गैरसमज होता.

नायगाराला इमिग्रेशन अतिशय छान झाले. इमिग्रेशन अधिकारी आपल्याशी हसून बोलतात हे पाहून तर फार आश्चर्य वाटले. इतके दिवस अमेरिकेत जाणे येणे असल्याने एअरपोर्टला दर वेळी भीती वाटायची कि आपल्याला आत सोडतील कि नाही कि परत पाठवतील? जरीही सर्व कागदपत्रे बरोबर असतील तरीही. परंतु येथे तर सर्व कारभारच वेगळा होता. सर्व काही छान हसून खेळून चालले होते. आमचे सर्व सामान - अगदी गाडीसकट - फुकट कॅनडात आले. (तुम्ही पहिल्यांदा जेव्हा कॅनडात PR वर येता तेव्हा बाहेरील देशातून कितीही म्हणजे अगदी कितीही सामान आणा तुम्हाला त्यावर इम्पोर्ट ड्युटी भरावी लागत नाही. माझी गाडी अमेरिकेतील होती. कॅनेडिअनसना त्यावर टॅक्स भरावा लागला असता.) भारतातून येणार असाल तर साधारण मनाशी २ बॅगांशिवाय आपण फारसे आणत पण नाही.

आल्यानंतर अगोदर जिथे मुलाखती दिल्या होत्या त्यांची पुण्याई कामाला आली व नोकरी मिळाली. कॅनडातील जॉब मार्केट अमेरिकेपेक्षा थोडे वेगळे आहे. येथे थोडा 'रेफरन्स' लागतो. अगदीच कोणीही तुम्हाला नोकरीवर सरळ सरळ घेत नाही. MBA मध्ये शिकलेला 'नेटवर्किंग इव्हेंट्सचा' सराव येथे कामाला आला. 'MeetUp' सारख्या समूहात जाऊन नवीन ओळखी बनवल्या. अगदी IT कामगार जरीही असाल तरीही नोकरी लगेच मिळणे थोडेसे मुश्किल आहे. 'कॅनेडीअन एक्सपेरियन्स' आहे का म्हणून विचारतात. 'अर्रे आत्ताच इथे पाऊल ठेवलाय अन कसाकाय मला कॅनडातील कामाचा अनुभव असेल? कोंबडी आधी कि अंड आधी?' असा विचार करून जळफळाटहि करून घेतला. उगीच 'IT skills are transferable skills ' म्हणून गवगवा करू नये.

येथे पगार अमेरिकेपेक्षा जरा कमी आहे. म्हणजे असे कि जर तुम्हाला न्यूयॉर्क मध्ये वार्षिक १००,००० डॉलर पगार असेल तर तो येथे साधारण ६०,००० -७०,००० च्या घरात येतो. आयकर मात्र इथे जास्त आहे. १३% सेल्स टॅक्स - सर्व वस्तूंवर. अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये तो ८-८.५ आहे. त्यामुळे वस्तू महाग वाटतात. प्रवास खर्च मात्र न्यूयॉर्क सारखाच मला वाटला. रोज ६ डॉलर GO ट्रेनला - एका दिशेने - अर्ध्या तासाचा प्रवास करायला लागतात. (मी मिसिसागामध्ये राहतो. तेथून टोरांटो अर्ध्या तासावर आहे.)

गो ट्रेन
Go Train

Graduate लोक इथे भरपूर आहेत. PhD वाले पण बँकेत काम करतात. त्याच ६०-७० हजर वार्षिक पगारात. त्यामुळे आपल्या उच्च शिक्षणाचा माज येथे करू नयेत. तरीही सर्व डॉक्टर लोक इथे टॅक्सी चालवत नाहीत. उगीच नाही त्या गोष्टी ऐकू नयेत.

सांगायचं उद्देश असा कि येथे PR वर यायचे असेल तर तुम्हाला तुमचे सर्व काही सोडून येथे यावे लागेल. It is a leap of faith. आल्यावर सर्व काही स्थिर स्थावर व्हायला थोडा वेळ लागेल. काही महिने लागतील. तेवढे दिवस थांबायची तयारी हवी. एकदा नोकरी लागली कि पुढील गोष्टी आपोआप मार्गी लागतात.

मिसिसागा
Mississauga

भारतातून येणाऱ्या तुमच्या लहान मुलांसाठी तर कॅनडा उत्तम आहे. वेगवेगळ्या देशातील मुले शाळेत असतात. शाळा फुकट. मुलांचा सर्वांगीण विकास तर येथे सरकारी शाळेतच होतो. तसे विषयच शाळेत असतात. वेगळे क्लास लावावे लागत नाहीत. मात्र गणित येथे फारसे होत नाही असे वाटू शकते. मुलांना शिकण्यासाठी वेगवेगळ्या कला, खेळ अगदी भरपूर आहे. येथील मूलभूत सोयी सर्व अमेरिकेसारख्या असल्याने तसा फार फरक वाटत नाही. मोठमोठे रस्ते, बागा अगदी छान आहे. ओंटारियो हे राज्य तर तळ्याचे राज्य म्हणूनच प्रसिद्ध आहे. दर एक किलोमीटरला एक तळे असे म्हटले तरीही अतिशयोक्ती होणार नाही. गूगल मॅप बघा हवं तर.

तळे Lakes

वैधानिक इशारा :- अतिशय स्वच्छ हवेचा श्वसनास त्रास होऊ शकतो.

हेल्थ केअर फुकट. डोळे आणि दात यांसाठी तुम्हाला इन्शुरन्स लागतो तो तुमची कंपनी तुम्हाला देते. राहण्यासाठी म्हणाल तर १४०० - १८०० मध्ये १ अथवा २ बेडरूम चा कॉंडो तुम्हाला मिळू शकतो. येथे कॉंडो-अपार्टमेंट (फ्लॅट), टाऊन हाऊस (आपले रो हाऊस), सेमी डिटॅचड (डुप्लेक्स) व डिटॅचड(एकटे घर) अशी घरांची चढत्या क्रमाने घर प्रकार यादी असते.

टाऊन हाऊस
Town house

इति - आयुष्यातील काही वर्षे कॅनडात नक्की घालवावीत. कुटुंबासाठी खूपच छान जागा आहे.

स्रुजा's picture

12 Jul 2017 - 3:48 am | स्रुजा

सगळं पटलं. मी पुण्याहुन अल्लाद हातात ऑफर घेऊन् च कॅनडाला आले पण रेफरन्स मुळेच. आधी कामा साठी कॅनडाला यायचे त्याचा उपयोग झाला. त्यामुळे तेवढं सोडुन तुमचा आमचा सगळा मत्त अगदी बराब्बर जुळता बघा !

ता.क. आटोवा टोराँटो पेक्षा जास्त लिव्हेबल आहे. दोन शब्द संपले, आता मी बसते.

ट्रेड मार्क's picture

12 Jul 2017 - 8:36 pm | ट्रेड मार्क

आटोवा आणि टोरोंटो मध्ये एकदा थंडीत येणे झाले होते. तेव्हा आटोवाला उणे ३३ डिग्री सेल्सिअस तापमान अनुभवले. तशी उणे २०-२२ डिग्रीची सवय असूनही ते २ दिवस जी काही वाट लागली होती ते शब्दात सांगता येणार नाही. सगळीकडे बर्फ आणि त्यात अरुंद रस्ते यामुळे माझ्या मनात आटोवा पेक्षा टोरोंटो बरे अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. एक तर मी नॉर्थ कॅरोलिनापासून ड्राईव्ह करून आलो होतो. रात्री ८ वाजता हॉटेल सापडेना. त्यात अरुंद रस्ते, बर्फ आणि नो एंट्र्या यांनी वैताग आणला. मी अगदी डाउनटाउन मध्ये राहिल्यामुळे असेल, पण जरा बाहेर गेल्यावर चांगला एरिया वाटला.

अर्थात २ दिवसांचा अनुभव काही ग्राह्य धरण्यासारखा नाही, त्यामुळे तिथे राहणाऱ्यांनी सांगितलेले जास्त बरोबर असेल.

उपाशी बोका's picture

12 Jul 2017 - 11:57 pm | उपाशी बोका

कॅनडातली थंडी म्हणजे एकदम बेक्कार. व्हँकुवर त्यातल्या त्यात बरे. पण शेवटी कायै की जिकडे पोटापाण्याची सोय होणार तिथेच राहावे लागते. आणि मग हळूहळू त्याचीपण सवय होते आणि मग तीच जागा एकदम भारी वाटायला लागते. मनुष्याचा स्वभावच आहे हा.
त्यामुळे संधी मिळाली तर जरूर जा, उगीच थंडीचा बाऊ नको, काय म्हणता?

ट्रेड मार्क's picture

13 Jul 2017 - 7:09 pm | ट्रेड मार्क

मी फक्त अनुभव म्हणून सांगितलं. बाकी थंडी काय आणि उन्हाळा काय जिथे आपल्याला पोटापाण्याची सोय होते, कुटुंबाला सुरक्षित वातावरण मिळतं आणि मुलांना चांगलं शिक्षण मिळतं तिथे राहायचं.

माझी बहीण फोर्ट मॅकमरेला रहाते. तिथे उणे ५० पर्यंत ताप(?)मान जातं. ते कॅलगरी पासून उत्तरेकडे ६०० किलोमीटर आहे. नेहमीप्रमाणे मी ड्राईव्ह करून जावे असा विचार करून कॅलगरी ते फोर्ट मॅक असा कारने फेब्रुवारीमध्ये गेलो. वाटेत इतकी तुरळक वस्ती होती की फोर्ट मॅक मध्ये अगदीच ५०-१०० घरं असतील असं मला वाटत होतं. जायला इतका वेळ लागला की अजून थोडं पुढे गेलो तर उत्तर ध्रुव येईल. पण तिथे गेल्यावर आश्चर्याचा धक्का बसला कारण जवळपास ७०,००० घरं असलेलं ते गाव आहे. त्याहून मोठा धक्का म्हणजे बरीच मराठी लोक राहतात, माझ्या बहीणचा मराठी गृप ३० कुटुंबांचा आहे.

फोर्ट मॅकमरेबद्दल पहिल्यांदाच ऐकलं. तेथे मराठी कुटुंबे राहतात हे वाचून तर मजाच वाटली.

खूप माहितीपूर्ण प्रतिसाद वाचायला मिळत आहेत.

अभिजीत अवलिया's picture

12 Jul 2017 - 9:49 am | अभिजीत अवलिया

धन्यवाद इडो आणि अमित ...

सोपे नाही तर कठिण पण नाही... नोकरी असेल तर सर्व नीट.

धाग्यावरील माहितीपूर्ण प्रतिसाद आवडले.

अनिवासि's picture

13 Jul 2017 - 8:47 pm | अनिवासि

माझ्या मागच्या प्रतिसादाला मिळालेले प्रतिसाद वाचून धन्य वाटले. मी जरूर माझ्या परदेश वास्तव्याविषयी लिहीन. सध्या माझ्या लहानपणातील पुण्यातील आयुष्याबद्दल लिहीत आहे. एक दोन आठवड्यात संपेल नंतर हा प्रकल्प.
माझे पुणे - माझे लंडन - माझे विश्व असे ८५ वर्षाच्या मस्त आयुष्याचे म्हातारा होण्यापूर्वी शब्दांकन करावयाची इच्छा आहे.
पाहू कसे जमेल ते.
मिपाकरांच्या वरील प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

जुइ's picture

13 Jul 2017 - 9:59 pm | जुइ

तुमच्या पुण्याच्या वास्तव्याविषयी देखील इथे वाचायला आवडेल!

बा़की या लेखातून खूप चांगली माहिती मिळत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2017 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! तर मग त्या सगळ्या लेखनाची एक लेखमालाच टाका की इथे !

तुमचे अनुभव मिपावर वाचायला नक्कीच आवडेल. जरूर लिहा.

मस्तच! लेखमालेची वाट पहात आहे.

लिहाच काका.. आम्ही वाट पाहतोय..

रामदास२९'s picture

14 Jul 2017 - 2:34 pm | रामदास२९

अनिवासि काका - तुम्ही जरूर तुमच्या लन्डन च्या अनुभवा विषयी लिहा. तुम्ही वर्णन कराल ते लन्डन म्हणजे अपुर्वाइ मधे पुलन्नी आम्हाला दाखवलेल लन्डन आहे.

रामदास२९'s picture

14 Jul 2017 - 2:36 pm | रामदास२९

_/\_ _/\_

सौन्दर्य's picture

14 Jul 2017 - 3:22 am | सौन्दर्य

सुरवातीचे काही प्रतिसाद वगळता एकूण सगळ्यांनीच फार छान आणि विविध दृष्टीकोनातून माहिती दिली. ह्यामुळेच मला 'मिसळपाव' आवडते.

आय टी एक्प्रेस एन्ट्री संदर्भात ही माहिती कदाचित तुम्हाला उपयोगी पडेल.

रामदास२९'s picture

14 Jul 2017 - 1:37 pm | रामदास२९

अतिशय उपयुक्त माहिती .. @अमित खोजे, इडली डोसा, ट्रेड मार्क .. अजून कोणी राहिला असल्यास .. क्षमस्व .. मला वाटतय .. बाकिच्या हिरवळी च्या देशा (ऑस्ट्रेलिया, न्यूझिलन्ड, इन्गलन्ड) विषयी माहिती द्यावी ..