चायनीज प्लास्टिक तांदूळ

अलोकस's picture
अलोकस in काथ्याकूट
7 Jul 2017 - 7:43 pm
गाभा: 

तांदुळातील भेसळ ओळ्खण्याकरता काही घरगुती
प्रयोग सुचवा विशेष करून चायनिस प्लास्टिक तांदूळ ओळखता यावा..

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 9:20 pm | मुक्त विहारि

........ हे काही माहीत नाही.तांदूळातील खडे माहीत आहे, पण तांदूळ., गहू, ज्वारी, बाजरी इ. धान्यात भेसळ आम्ही तरी बघीतली नाही.कदाचित आमचे मारवाडी दुकानदार (हो, आमच्या डोंबोलीत तरी बरेचसे दुकानदार मारवाडीच आहेत.) ह्या धान्यात भेसळ करत नाहीत.

"चायनिस प्लास्टिक तांदूळ" ही काय नविन भानगड?

बरंय बाबा आमच्या डोंबोलीत तरी हे प्रकरण नाही आहे ते.

सतिश गावडे's picture

7 Jul 2017 - 9:28 pm | सतिश गावडे

तुम्हाला व्हाट्सअप मेसेज आला होता का चायनीज प्लास्टिक तांदळाचा?

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 9:57 pm | मुक्त विहारि

फेसबूक आणि व्हॉट्स अप वरून धोरण ठरवायची वेळ आली आहे आजकाल.

मध्यंतरी, (म्हणजे परवाच पुण्याला पी.एम.टी. मध्ये) एकाने दुसर्‍याशी चायनीझ प्लॅस्टिकची अंडी" ह्यावर वाद घातला होता. पुरावा म्हणून व्हॉट्स अपचे नाव घेतले.

आमच्या कडे जुना नोकिया असल्याने त्यांचा हा वाद-विवाद काही रेकॉर्ड नाही करता आला...

वाद जरी पुण्याला झाला तरी ते बहूदा पुणेकर नसावेत.कारण पुण्यातील जनता पी.एम.टी,ने प्रवास करत नसावी.असा अंदाज..... कारण आजकाल असली पुणेकर पी.एम.टी.ने प्र्वास केला की तिकिटे जप्पुन ठेवतात, असा अंदाज आहे.

पण पुणे म्हटले की....असो....

ओरिजिनल तांदळाचा भात होतो
प्लास्टिकच्या तांदळाने घात होतो

सौन्दर्य's picture

8 Jul 2017 - 4:53 am | सौन्दर्य

मी देखील 'प्लास्टीकचा मेड इन चायना तांदूळ' हा whatsapp वर आलेला व्हिडियो पाहिला. त्यात एक महिला, शिजवलेल्या भाताचे गोळे करून जमिनीवर आपटते व ते बॉलसारखे उडतात असे दिसते. मला वाटते हे खोटे आहे. तांदूळ काही इतका महाग नाही की प्लास्टिकचा तांदूळ भेसळीसाठी वापरावा लागावा. त्या व्हिडियोमध्ये दाखवलेला तांदूळ हा 'रॉयल बासमती राईस' दाखवला आहे जो आमच्या इथे (ह्युस्टन, टेक्सास स्टेट) मिळतो. वरील प्रकार खरा आहे की खोटा हे ठरविण्यासाठी माझ्या मते खालील प्रयोग करून बघण्यास हरकत नसावी.

मुठभर तांदूळ तव्यावर भाजावेत, जर त्यात खरोखरीच प्लास्टिकचे दाणे असतील तर ते उष्णतेने वितळतील व तव्याला चिकटतील.

जाणकारांनी आपले मत कळवावे.

अलोकस, याचं उत्तर मिळालं की मला चायना मेड शिंकेच्या वासाच्या उदबत्तीबद्दलही सांगा हॉं प्लिस.

जेम्स वांड's picture

8 Jul 2017 - 1:46 pm | जेम्स वांड

तांदूळ खाऊन पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी काटकी घेऊन जायचं लोट्या/टमरेला सोबत नदीकाठी तुळस लावायला जाताना..... संबंध तांदळाचे दाणे घावले तर त्यो भुसारमाल व्यापारी अन तो तांदूळ परत न घेणे........

सौन्दर्य's picture

9 Jul 2017 - 7:38 am | सौन्दर्य

हे तांदूळ पाण्यात भिजवले असता प्लास्टिकचे दाणे पाण्यावर तरंगतील व खरे दाणे पाण्यात बुडतील.

उगा काहितरीच's picture

9 Jul 2017 - 8:03 am | उगा काहितरीच

पण मुळात अशी भेसळ करतीलच कशाला ? प्लास्टिकचे तांदूळ वजनाला किती हलके असतील ! भेसळ करायला पण परवडलं पाहिजे ना. ;-)

सौन्दर्य's picture

9 Jul 2017 - 6:46 pm | सौन्दर्य

मी देखील हेच म्हंटलं होतं. पण ही भेळसेळ बासमती राईसमध्ये केल्याचे दाखवले आहे त्यामुळे शंकेला थोडीफार जागा आहे.
मागे कोबी देखील प्लास्टिकचा बनवतात असं दाखवणारा व्हिडियो फिरत होता. आता कोबी सारखी स्वस्त भाजी कोण कशाला प्लास्टिकची करतील ?

इथं म्हटलंय कि अश्या गोष्टी ढकलताना पाहून जगातली विकृत माणसं पोट धरून हसत असतील,
पण मी ही अश्या गोष्टींना जेव्हा लोक खूपच मनावर घेतात तेव्हा पोट धरून हसतो.