रानभाजी महोत्सव २०१७

Primary tabs

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in भटकंती
1 Jul 2017 - 5:50 pm

रानभाजी - ऑगस्ट २०१७

चिंब पाऊस अल्लड वारा, धुंद हवा मृदगंध नवा l

रानातुनी बहरे रानमेवा, तयाचा मज आस्वाद हवा ll

या वर्णनासारखे अगदी नितांत सुंदर, श्यामल आणि पावसाळी व सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदूषण मुक्त अस्सल नैसर्गिक वातावरण भीमाशंकर डोंगराईत असलेल्या आहुपे या गावात दर पावसाळ्यात असते.

या गावात गेली २ वर्षे वनवासी कल्याण आश्रमातर्फे, आदिवासी समाजातील आपल्या बंधू/भगिनींसाठी ""रानभाजी महोत्सव"" अशी एक नाविन्यपूर्ण स्पर्धा घेतली जाते.

आपल्याला माहीतही नाहीत अशा काही उत्तम पालेभाज्या या भागात श्रावण मासात उगवतात. आपल्या सर्व आदिवासी भगिनींना आणि मातांना या भाज्यांचे विविध गुण माहीत आहेत, व त्या विविध प्रकारे शिजवण्यातही पारंगत आहेत.

या अश्या भाज्यांची स्पर्धा घेऊन उत्तम सादरीकरण आणि स्वाद आणि माहिती असणाऱ्या या जनजाती समाजातील स्पर्धकांना बक्षीसे देण्यात येतात. वनस्पती शास्त्राचे नामवंत लोक परीक्षक म्हणून असतात.

पुण्यातून आपण बऱ्याच लोकांना सहल म्हणून या ठिकाणी घेऊन जातो,नाम मात्र शुल्क असते, स्पर्धेच्या ठिकाणी घरटी काही लोकांना चुलीवर शिजवलेले अन्न व रानभाजी, नाचणी सत्व असा आस्वाद घ्यायला मिळतो. जमा केलेल्या शुल्कातील काही रक्कम घरटी कातकरी कुटुंबाला दिली जाते, या निमित्ताने आहुपे हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध होऊन, सहलीस येणाऱ्या पाहुण्यांच्या चहा, नाष्टा व जेवणाच्या सोयीतून त्यांना रोजगार मिळावा ही कल्याण आश्रमाची मुळ इच्छा.

आश्रमाच्या माध्यमातून तिथे चालू असलेल्या बचत गटाच्या काही गोष्टी जसे, हातसडीचा तांदूळ, अस्सल नाचणी, लोणची, कुरडई, पापड, मध विकायला ठेवलेला असतो.

एकंदरीत या मस्त खुशाल आणि निवांंत गारव्याचा आस्वाद घ्यायला आपल्याला आवडेल ना!!!

रानभाजी तारखा:-

१२ व १३ ऑगस्ट २०१७ - आहुपे

१९ व २० ऑगस्ट २०१७ - कुकडेश्वर

२६ व २७ ऑगस्ट २०१७ - तळेरान

प्रवास सुरुवात शनिवारी दुपारी ४ वाजता, व परत ठरलेल्या पुण्यातील ठिकाणी रविवारी रात्री.

प्रत्येक व्यक्तीचे शुल्क ₹२०००/-

पैसे जमा करण्यासाठी -  खालील खात्यावर कृपया जमा करावेत.

Vanvasi Kalyan Ahsram , Maharashtra
Bank Of Maharashtra, Chinchwad Branch, Pune
Account Number- 20160364136,
IFSC Code – MAHB0000127

PAN NO- AAATV3624K

पैसे जमा करताना "Ranbhaji" असा संदर्भ लीहावा, व खालील संपर्क दिलेल्या व्यक्तींना SMS किंवा whatsup वरच आपले नाव, पत्ता, जमा केलेली रक्कम व लोकांची संख्या कळवावी.

समाविष्ट करण्यात येेणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित असणार आहे.

एकूण प्रवास, बस कुठे येणार वगैरे गोष्टी काही दिवसात विस्तृत स्वरूपात कळवण्यात येतीलच.

या कार्यक्रमासाठी तयारी व अंमलबजावणीसाठी काही स्त्री व पुरुष स्वयंसेवकांची गरज आहे, तेंव्हा ही माहिती प्रसारित झाली की लवकरात लवकर आपली व आपल्या मित्र मैत्रिणींची नावे सहलीसाठी व कार्यकर्ता म्हणून नोंदवण्यासाठी कृपया तयार रहा.

टीप - अशा निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर तेथील स्वच्छता, शुद्धता यास बाधा न आणता, त्याचे अधिक संवर्धन कसे करता येईल हे आपले प्रथम कर्तव्य आहे. 

प्लास्टिक पिशव्या/बाटल्या इत्यादी कचरा इतरत्र टाकण्यास सक्त मनाई आहे.

वनवासी कल्याण आश्रम, पुणे

ll वनवासी और शहरवासी, तू मै एक रक्त ll

नरेंद्र पेंडसे - 7709013232

अंजली घारपुरे - 9604622628

विजय भालिंगे - 9225302055/ 9689502350

वैशाली जोशी - 9552558197

सचिन दीक्षित - 9822082444

ऋषभ मुथा - 9850258408

सचिन कुलकर्णी - 9921574108

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 12:50 pm | जेम्स वांड

अतिशय उत्तम आहे हा उत्सव अन हेतू, कुकडेश्वरला गेलो होतो मागे एकदा, आता ह्यानिमित्ताने परत एकदा ट्रिप होईल एखादी. बाकी हे वनवासी म्हणजे ? आदिवासी का?

त्रिवेणी's picture

2 Jul 2017 - 6:16 pm | त्रिवेणी

आदिवासी म्हणू शकतो. वना/जंगलात राहणारे कातकरी, भिल्ल समाजाचे लोक.

जेम्स वांड's picture

2 Jul 2017 - 10:51 pm | जेम्स वांड

का आदिवासींना वनवासी म्हणू शकतो? =))

अर्थात हा शब्दच्छल गंम्मत म्हणूनच हो ताई, एरवी हे काम खूप जोरदार अन भिल्ल कातकरी बांधवांना मुख्यधारेशी जोडणारे आहे, असं वेगळं सांगत नाही मी :)

त्रिवेणी's picture

3 Jul 2017 - 11:11 am | त्रिवेणी

स्माईली कशा येतात तुम्हा लोकांच्या. मी स्मायली टाकायचा प्रयत्न करते तर error येते.

जेम्स वांड's picture

3 Jul 2017 - 12:43 pm | जेम्स वांड

टेक्स्ट फॉरमॅट मध्ये टाका स्मायली ताई, येतील.

सुखी's picture

2 Jul 2017 - 12:53 pm | सुखी

अनेक धन्यवाद..
यावर्षी योग्यवेळी धागा काढलात, दरवेळी उशिरा निघतो बऱ्यापैकी.

स्वतःची गाडी घेऊन आलं तर चालेल का?

त्रिवेणी's picture

2 Jul 2017 - 6:19 pm | त्रिवेणी

चालेल ना. फक्त त्या दिवशी या महोत्सवात नक्की येणार असाल तर तस आधी सांगावे लागेल कारण त्या लोकांच्या घरी जायचे असते जेवायला, घरटी ३ ते ४ माणस जातात. तिथल्या लोकांनाही तयारी करावी लागते. आणि त्या दिवशीचे वेगळे चार्जेस आहेत का विचारून ठेवते.

एक दिवसीय सहल नसते का?

त्रिवेणी's picture

5 Jul 2017 - 12:14 pm | त्रिवेणी

रविवारी सकाळी तुम्हाला स्वतःच्या वाहनाने यावे लागेल मग.रात्री तिथे पोहोचल्यावर गप्पा गोष्टी वैगरे होतात, तो पण एक छान अनुभव असतो. नवीन ओळखी होतात. मागच्या वर्षी तर आमचे पहिलेच वर्ष होते, जातांना थोडी धाकधूक होती की आपण ऍडजस्ट होऊ का अगदीच अनोळखी लोकात. पण छान अनुभव होता.
कुकडेश्वर हून नाणेघाट ला गेलो होतो.

माहितगार's picture

6 Jul 2017 - 11:52 am | माहितगार

ग्रामीण पर्यटनाची संकल्पना चांगली आहे. काही छायाचित्रे असती तर बरे झाले असते पण कदाचित जे मिपाकर जाऊन येतील ते छायाचित्रे टाकतील अशी अपेक्षा करुयात. अर्थात काही गोष्टी पुरेशा स्पष्ट झाल्यास सर्वांनाच उपयूक्त ठरेल.

१) शनिवारी रात्री जे लोक तेथे जातील त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेचे स्वरुप काय आहे ?
२) रविवारी जेवणा शिवाय Things to do चे काय स्वरुप / शक्यता असते ?
३) जेवणाचे पैसे घेतलेल्या शुल्कात अंतर्भूत आहेत का वेगळे ?

त्रिवेणी's picture

6 Jul 2017 - 2:27 pm | त्रिवेणी

१. कुकडेशवर साठी लेण्याद्रीच्या भक्तनिवसात सोय केली होती. भक्तनिवास स्वछ होते. एका रूम मध्ये तीन जण. तशीच व्यवस्था इकडे ही असेल. आहुपेत बहुतेक ngo ने बांधलेले रूम्स आहेत बहुतेक.
२.मागच्या वर्षी इतिहासकार घाणेकर आले होते त्याच्याबरोबर कुकडेशवर मधली दोन देवळे फिरलो. त्यानंतर जुन्नर विभागाचे वनअधिकारी(नाव विसरले) ना बोलावले होते.त्याच्याशी थोडं बोलणं झालं सर्वांचं. तोवर गावातील बायका त्यांचे भाजी, भाकरीचे ताट घेऊन आले होते, मग सर्वांनी थिटे थोडी थोडी भाजी भाकरी खाऊन बघितली. परीक्षक म्हणून वनस्पती sahsrtache प्राध्यापक बोलावले होते. आलेल्या स्त्रियांपैकी तिघींना बक्षीस देण्यात आले मग आम्ही तीन-चार च्या गटात गावकर्यांच्या घरी जेवायला गेलो. येतांना नाणेघाटात गेलो होतो.
३.हो जेवणाचे, राहण्याचे पैसे घेतलेल्या शुल्कात आहेत.
जमा झालेल्या पैशातून गावकऱ्यांना गरजेच्या वस्तू घेतल्या जातात. मागच्या वर्षी कुकडेश्वर ला सोलर लॅम्प दिले होते.
मी मागच्या वर्षी फोटोंसाहित लेख टाकला होता,लिंक देत येते का बघते नाहीतरी कुणीतरी मदत करा लिंक शेअर करायला.

गवि's picture

6 Jul 2017 - 2:35 pm | गवि

बाकी सर्व उत्तम, पण खाद्यपदार्थाच्या स्पर्धेला जज्ज म्हणून "वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक"? अयायायाया..

हे म्हणजे "फोटोजेनिक बालक" स्पर्धेसाठी जज्ज म्हणून गायनॅकॉलॉजिस्टला बोलावण्यापैकी आहे...

आम्हाला तरी बोलवा. आम्ही सर्टिफाईड खवय्येखिलवय्ये आहोत. ;-)

त्रिवेणी's picture

6 Jul 2017 - 2:46 pm | त्रिवेणी

भारी उपमा.
पण बहुतेक ते भाज्यांचे गुणधर्म आणि अजून महत्व त्यांना जास्त कळत असावे अशी आपली समजूत करून घ्यावी.
पण परीक्षक म्हणून बोलवावे तरी कुणाला असाही प्रश्न असावा.या वर्षी बघूया कुणाला बोलावतायेत.

त्रिवेणी's picture

6 Jul 2017 - 2:46 pm | त्रिवेणी

भारी उपमा.
पण बहुतेक ते भाज्यांचे गुणधर्म आणि अजून महत्व त्यांना जास्त कळत असावे अशी आपली समजूत करून घ्यावी.
पण परीक्षक म्हणून बोलवावे तरी कुणाला असाही प्रश्न असावा.या वर्षी बघूया कुणाला बोलावतायेत.

त्रिवेणी's picture

6 Jul 2017 - 2:47 pm | त्रिवेणी

भारी उपमा.
पण बहुतेक ते भाज्यांचे गुणधर्म आणि अजून महत्व त्यांना जास्त कळत असावे अशी आपली समजूत करून घ्यावी.
पण परीक्षक म्हणून बोलवावे तरी कुणाला असाही प्रश्न असावा.या वर्षी बघूया कुणाला बोलावतायेत.

त्रिवेणी's picture

6 Jul 2017 - 2:47 pm | त्रिवेणी

भारी उपमा.
पण बहुतेक ते भाज्यांचे गुणधर्म आणि अजून महत्व त्यांना जास्त कळत असावे अशी आपली समजूत करून घ्यावी.
पण परीक्षक म्हणून बोलवावे तरी कुणाला असाही प्रश्न असावा.या वर्षी बघूया कुणाला बोलावतायेत.

त्रिवेणी's picture

6 Jul 2017 - 2:47 pm | त्रिवेणी

भारी उपमा.
पण बहुतेक ते भाज्यांचे गुणधर्म आणि अजून महत्व त्यांना जास्त कळत असावे अशी आपली समजूत करून घ्यावी.
पण परीक्षक म्हणून बोलवावे तरी कुणाला असाही प्रश्न असावा.या वर्षी बघूया कुणाला बोलावतायेत.

त्रिवेणी's picture

6 Jul 2017 - 2:47 pm | त्रिवेणी

भारी उपमा.
पण बहुतेक ते भाज्यांचे गुणधर्म आणि अजून महत्व त्यांना जास्त कळत असावे अशी आपली समजूत करून घ्यावी.
पण परीक्षक म्हणून बोलवावे तरी कुणाला असाही प्रश्न असावा.या वर्षी बघूया कुणाला बोलावतायेत.

तेजस आठवले's picture

12 Jul 2017 - 6:11 pm | तेजस आठवले

कृपया फोटो टाका.
तसेच रानभाज्यांचे फोटो प्रचलित सर्व नावांसकट टाकल्यास सर्वांनाच त्यांची ओळख होईल आणि त्या आग्रहाने विकत घेतल्या आणि खाल्ल्या जातील. निदान बाजारात असलेल्या रानभाज्या ओळखता तरी येतील सुरवात म्हणून.

खाली दिलेल्या लिंकमध्ये आहेत बघा फोटो.

त्रिवेणी's picture

6 Jul 2017 - 2:29 pm | त्रिवेणी
त्रिवेणी's picture

6 Jul 2017 - 2:30 pm | त्रिवेणी
अनन्त अवधुत's picture

7 Jul 2017 - 10:49 am | अनन्त अवधुत