आपलेच दात आणि...

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in काथ्याकूट
29 May 2017 - 3:49 pm
गाभा: 

एक विचित्र विषय आणि समस्या मांडत आहे, माझ्या बोलण्याचा कृपया कुणीही विपर्यास करून घेऊ नये कारण हा धागा मी तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी अजिबात काढलेला नाही तर कोणाला असे अनुभवले असतील तर त्यांनी अश्या प्रसंगी काय केले हे जाणून घेणे हा एकच या धाग्याचा हेतू.

समस्या अशी आहे कि माझा एक मित्र आहे ज्याने तीन वर्षांपूर्वी लग्न केलं. तो मुंबईच्या एका उपनगरात राहात होता एका चाळीतली वन रूम किचन खोली होती ती काही दिवसांनी त्याची आई त्यांच्याकडे राहायला आली आणि तिचं विक्षिप्त वागणं सुरु झालं. हे नवदाम्पत्य दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचं अमी आईसाहेब घरी दिवसभर मस्त झोप घ्यायच्या. पण समस्या त्यांच्या झोपण्याची नाहीये, ती आहे रात्रीच्या जगण्याची. आईसाहेब रात्रभर झोपत नव्हत्या. आणि सतत काहीतरी धडपड करत असायच्या. उद्देश एकच- या दोघांना एकत्र येऊ न देणे. आधी या दोघांना काही कळले नाही पण हे प्रकरण चालूच राहिले जेव्हा त्याने चाळीतली खोली सोडून एक वन बेड रूम किचन वाला फ्लॅट भाड्याने घेतला. आता आईसाहेबांची अस्वस्थता वाढली होती कारण घर चाळीच्या मानाने मोठे असल्याने त्यांची उपद्रवक्षमता कमी झाली. पण हार मनातील त्या आईसाहेब कसल्या, त्यांनी उपद्व्याप तीव्र केले जसे कि, रात्री पुन्हा पुन्हा पाणी पिण्यासाठी उठणे, वारंवार लघुशंकेला जाणे, उगीचच मित्राला हाक मारणे, किचनमधली भांडी पाडणे आणि अजून काहीबाही... बरं आईला हे सगळं आवरतं घ्यायला कसं सांगायचं म्हणत दोघे नवरा बायको मूग गिळून गप्प.
एवढं सगळं करूनही आईसाहेबांच्या कानांवर अचानक एक दिवशी बातमी धडकली कि सुनबाई गरोदर आहे. आणि आभाळ कोसळलं. आईसाहेबांना आपल्या कर्तृत्वावर एवढा विश्वास की हे गरोदरपण आपल्या मुलाबरोबरच्या मिलनाने झालं असेल हे मान्य करायला त्या तयार नाहीत. आणि त्यांनी सुंबाईच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. चक्क बिल्डिंगच्या बाहेर येऊन तमाशे केले. आता तिच्या सुनबाईला डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितलंय आणि आईसाहेबांनी घरकामाला असहकार सुरु केलाय, त्याहून महत्वाचे कि ती कधी सुनबाईंवर हात उचलेल ते सांगता येत नाही. दिवसभर हि जीव मुठीत घेऊन राहते. या समस्येवर आता काय करावे या चिंतेने आम्हाला ग्रासले आहे कारण आईसाहेब हार मानायला तयार नाहीत.
आता तुम्ही म्हणाल कि एखाद्या व्यक्तीचं वागणं असं असू शकते पण खरी मेख पुढे आहे,
आताच एका ओळखीच्या मुलाचे लग्न झाले आणि त्याची बायको माझ्या बायकोची जिवलग मैत्रीण आहे. आणि लग्नानंतर तिच्या सासूच्या वागण्यात तोच विक्षिप्तपणा यायला लागलाय. त्याच्या घरी देखील 'रात्रीस खेळ चाले' अशी परिस्थिती.

आता या दोन्ही प्रकरणात खालील बाबी तंतोतंत जुळतात:
प्रेम विवाह.
प्रेमविवाहाला घरून झालेला विरोध.
दोघांच्या आईचे वैधव्य.
दोघीही सुना तोंड दाबून बुक्यांचा मर दिला तरी गुपचूप सहन करतील अश्या आहेत(अजून तरी).

आणि आई कशीही वागली तरी दोघेही मित्र त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाहीत. तेच त्यांचे आधार आहेत.

हा धागा काहींना मनोरंजक वाटेल कदाचित(काही अंशी आहे ही) पण ही दोन्ही प्रकरणे गंभीरही आहेत कारण दिवसभर दोन्ही सुना त्यांच्या सासवांच्या हवाली असतात.

या अश्या वागण्यामागे नक्की काय कारण असावे आणि यावर काय उपाय करता येऊ शकतात याची जर कोणा जाणकाराला माहिती असेल तर कृपया कळवावी.

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

29 May 2017 - 4:06 pm | शैलेन्द्र

मी जे लिहितोय ते गमतीने नाही,
लवकरात लवकर नातवाची व्यवस्था करणे हाच यावरचा उपाय आहे, इतर उपाय कठीण आहेत.

इरसाल कार्टं's picture

29 May 2017 - 4:20 pm | इरसाल कार्टं

तेच तर होऊ देत नाहीत ना

शैलेन्द्र's picture

29 May 2017 - 4:27 pm | शैलेन्द्र

पूर्वीच्या चाळीतल्या घरात, एका खोलीत 12 जण झोपायचे तरी मुलं व्हायचीच,
घ्यायचं उरकून पटकन..चोचले नंतर करता येतात.

इरसाल कार्टं's picture

29 May 2017 - 5:17 pm | इरसाल कार्टं

तेही खरंय, पण तेव्हा म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत कुटुंबीय नावविवाहितांना प्रायव्हसी द्यायची. इथे रात्री डोंबऱ्याचे खेळ चालू होतात राव.

माम्लेदारचा पन्खा's picture

29 May 2017 - 4:11 pm | माम्लेदारचा पन्खा

पण असं वागू शकतात माणसं . . . . . . तो एक सिनेमा होता . . . माझं घर माझा संसार . . . . त्यात रिमा लागूचं पात्र असंच होतं . . . . . .

अशा लोकांना एखादा विकृत आनंद मिळत असतो पण आपण दुसऱ्या माणसाचं नुकसान करतोय ही जाणीव नसते त्यांना . . . . हा मानसिक आजाराचा भाग आहे . . . एखादा मानसोपचारतद्न्य गाठायला हवा .

अत्रन्गि पाउस's picture

29 May 2017 - 4:31 pm | अत्रन्गि पाउस

जोडीदार लौकर सोडून गेलेल्या वृद्ध लोकांमध्ये असा काही विकृत विचार असतो किंवा कसे ?

व्हॉटस अ‍ॅपवर सकाळी सकाळी नाती सांभाळा, मुले नालायक असून आई बापाना कशी छळतात, सगळे बिचारे वॄध्द कसे दयनीय झाले असून तरूण पिढी नालायक आहे अशी दळणे दळली जातात, त्याला ह धागा चांगले उत्तर आहे. मनुष्य काळा किंवा पांढरा नसतो ,तर दोन्ही शेडसचा बनलेला असतो हे काही संस्कारी बाबूजी मान्यच करायला तयार नसतात. असो.
तुमच्या धाग्यापुरते बोलायचे तर कठीण आहे ईतकेच म्हणता येईल. या व्यक्ति मानसोपचार तज्ञाकडे येतील याची खात्री नाही, उलट वेड्याच्या डॉक्टरकडे मला नेले असा कांगावा करतील. स्वता सुखाने जगायचे नाही आणि ईतरांना सुखाने जगू दयायचे नाही अशी प्रवृत्ती. एकतर कोणी आईकडचे नातेवाईक अस्तील तर त्यांना मध्यस्थी करायला सांगून काही होतय का हे पहायचे, नसेल तर थोडे स्पष्ट सांगून किंवा वृध्दाश्रमाची केवळ धमकी देउन पहायची. वाघ म्हटंला तरी खाणार आणि वाघोबा म्हंटला तरी खाणार. किती काळ भीत भीत जगायचे.

vikramaditya's picture

29 May 2017 - 8:36 pm | vikramaditya

+111

इरसाल कार्टं's picture

30 May 2017 - 10:35 am | इरसाल कार्टं

या व्यक्ति मानसोपचार तज्ञाकडे येतील याची खात्री नाही, उलट वेड्याच्या डॉक्टरकडे मला नेले असा कांगावा करतील.

हीच परिस्थिती आहे.

आणि इतरांकरवी समजूत घालायचं तर हा विषय जरा नाजूक असल्यामुळे मित्र या नात्याने फक्त आमच्याशीच चर्चा झालीय.

सुबोध खरे's picture

29 May 2017 - 8:54 pm | सुबोध खरे

आमच्या एका बहिणीची कथा अशीच होती. सासू(विधवा) पण जहाँबाज. ती चक्क नवरा बायको च्या मध्ये येऊन झोपायची आणि आमच्या बहिणीचे यजमान बुळे होते. शेवटी चक्क घटस्फोट झाला आणि बहिणीने दुसरीकडे लग्न केले आणि मुले नातवंडे होऊन गेली ३५ वर्षे ती सुखात आहे.
आमच्या घरात घडलेली आणि आमच्या वडिलांनी सांगितलेली कथा.
आमच्या आजोबाना त्यांच्या आईने( जी बाल विधवा होती) आपल्या सुनेबद्दल( आमच्या वडिलांची आई) कागाळ्या सांगायला सुरुवात केली. शेवटी एक दिवस आमचे आजोबा आपल्या आईला म्हणाले आई तू सांगतेस ते सर्व मला मेनी आहे पण मला तिच्याबरोबर जन्म काढायचा आहे.
सुदैवाने आमची पणजी सुज्ञ असावी. कारण यानंतर सासू सुने मधील बेबनाव बराच कमी झाला.
या प्रकरणात नवऱ्याने स्पष्ट आणि खमकी भूमिका घेणे आवश्यक आहे अन्यथा त्याचा संसार रस्त्यावर येईल.

कारण मुलाचं एवढ्यात लग्न झालंय म्हणजे त्या ४५/५० असतील. नांव नोंदवल्यावर बरेच ऑप्शन्स येतील. त्यातला योग्य पर्याय निवडा आणि साधेपणानं पण आनंदात रजिस्टर लग्न लावून द्या. सुरुवातीला लोकलज्जेस्तव आईश्री नकोनको करतील पण त्यांना जगाला फाट्यावर मारायला सांगा. सौ. आई सेक्श्युअली सॅटिसफाय होऊन खुशीत जगायला लागतील. आगामी बालकाला आजीबरोबर आजोबा फ्री मिळतील. आईश्रींची जी काय उत्तर आयुष्यातली उर्वरित वर्ष आहेत ती भन्नाट जातील. एका विधुराला घरचं जेवण मिळायला लागेल. तुमच्या मित्राचं वैवाहिक आयुष्य पुढची किमान २० वर्ष सुखाचं होईल आणि सगळीकडे केवळ आनंदी आनंद होईल.

प्रसाद_१९८२'s picture

30 May 2017 - 12:29 pm | प्रसाद_१९८२

पर्याय त्यातल्यात्यात उत्तम दिसतोय.

आणि सर्वांसाठी सुखाचा आहे ! :)

इरसाल कार्टं's picture

30 May 2017 - 4:08 pm | इरसाल कार्टं

पण हा पर्याय आता शक्य नाही कारण दोघीही जवळ जवळ अशिक्षित आहेत आणि नाही म्हटले तरी आमच्याकडे ती मानसिकता अजून तयार झाली नाहीये. त्यांच्यापेक्षाही तरुण आणि शिकलेल्या तसेच आधुनिक विचार करणाऱ्या विधवा/घटस्फोटित एकट्या राहतायत.

इरसाल कार्टं's picture

30 May 2017 - 4:09 pm | इरसाल कार्टं

पण हा पर्याय आता शक्य नाही कारण दोघीही जवळ जवळ अशिक्षित आहेत आणि नाही म्हटले तरी आमच्याकडे ती मानसिकता अजून तयार झाली नाहीये. त्यांच्यापेक्षाही तरुण आणि शिकलेल्या तसेच आधुनिक विचार करणाऱ्या विधवा/घटस्फोटित एकट्या राहतायत.

संजय क्षीरसागर's picture

30 May 2017 - 4:33 pm | संजय क्षीरसागर

पण नवी परंपरा आकाशातून चालू होत नाही, ती आपल्यातल्याच कुणी तरी चालू करावी लागते. लोकांची मानसिकता बदलणं शक्य नाही. आपण वेगळा विचार मांडला की लोकांना विचार करावा लागतो (हे माझे आंतरजालावरचे प्रतिसाद वाचून एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच) :)

आईश्रींच्या अंतर्मनातली इच्छा तीच आहे, फक्त कुणी तरी हवा देण्याचा प्रश्न आहे. तुम्हाला कल्पना आवडली असेल तर तुम्ही मित्राला हवा द्या आणि तो मातोश्रींना भरारी देईल.

इरसाल कार्टं's picture

30 May 2017 - 6:08 pm | इरसाल कार्टं

प्रयत्न करतो.

भक्तीमार्गीयांच्या तिर्थक्षेत्र सहली फार जोरात असतात. एकदा अशी सहल केली की मग तो नाद वाढत जातो. जमल्यास पुढे नर्मदा परिक्रमा वगैरे भन्नाट कल्पना त्यांच्या मनात भरवा. एकदा परिक्रमा केली की व्यक्ती पुरती भक्तीभावात रंगून जाते. एकूण त्यातनं पायपिटीशिवाय काही गवसत नाही पण साधकाला मात्र प्रत्येक वेळी काहीना काही तरी `अनुभव' येतात आणि या नाही तर पुढच्या परिक्रमेत तरी आपल्याला मनोवांच्छित गवसेल या भ्रमात ते खुष राहातात. हा एकदम निर्धोक आणि समाजप्रतिष्ठाप्राप्त मार्ग आहे. हळूहळू आईश्री `मला देव भेटेल' या कल्पनेत गेल्या की तुमच्या मित्राला इतर काही उपाय करावे लागणार नाहीत. :)

इरसाल कार्टं's picture

31 May 2017 - 9:51 am | इरसाल कार्टं

खरंतर मुलांना वाढवण्यासाठी त्या दोघींनीही कष्ट घेतलेत पण आता मात्र काही करायला तयार नाहीत. त्यामुळे पायपीट किती करतील याबद्दल शंकाच आहे. तरीही हाही मार्ग विचारात घेण्यात येईल.
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2017 - 12:27 pm | संजय क्षीरसागर

एकदम नर्मदा परिक्रमा झेपायची नाही पण भक्तीमार्गाचा नाद जरुर लावा. तिर्थपर्यटन (या सहली इकॉनमीकल असतात) हा भक्तीमार्गीयांचा आवडता छंद आहे. पहिली वैष्णवदेवीची सहल घडवा, लै मजा येईल आईश्रींना. आणि तुमच्या मित्राला आणि त्याच्या पत्नीला इकडे धमाल करता येईल.

इरसाल कार्टं's picture

2 Jun 2017 - 11:02 am | इरसाल कार्टं

:D

चित्रगुप्त's picture

31 May 2017 - 12:09 pm | चित्रगुप्त

संक्षिंचे सर्व प्रतिसाद आवडले. एकदम अभिनव आणि परिणामकारक सूचना.

आयला...अश्या पण आया जगात आहेत ह्याची माहिती नव्हती. जुन्या काळात एक-दोन खोल्यांमध्ये सगळं कसं "व्हायचं" याबद्दल नेहमी कुतूहल वाटते.

चित्रगुप्त's picture

31 May 2017 - 12:23 pm | चित्रगुप्त

अश्या मातांना योग्य तो जोडीदार लाभावा, म्हणून स्पेशल मॅट्रीमनी साईट उघडायला हवी. त्यांचे विरहात 'जळणे' आणि सुनांवर 'जळणे' अशी ज्वालाग्रही स्थिती लक्षात घेऊन 'ज्वाला मातृ-मोहिनी' विवाह संस्था असे नाव देता येईल.

साहेब, पण एक-दोन खोल्यांच्या घरात "ती स्पेस" कोणाला मिळावी यावरूनही भांडणं होतील.

संजय क्षीरसागर's picture

31 May 2017 - 1:00 pm | संजय क्षीरसागर

मातृ हा शब्द सामाजिक रोष ओढवेल. तस्मात, चिरयौवना-युवक- मिलन- मंडळ हे नांव सुचवतो. आणि एक स्टेप पुढे जाऊन इकाच्या मित्रानंच हे मॅट्रीमनी पोर्टल चालू करावं जेणे करुन घटना फास्ट घडतील.

क्या बात हैं!! जबरदस्त नाव..

संजय क्षीरसागर's picture

31 May 2017 - 3:47 pm | संजय क्षीरसागर

लिहा एक, दोन-तीन अंकी मस्त विनोदी कथा हे बीज घेऊन ! :)

कुटस्थ's picture

1 Jun 2017 - 10:23 pm | कुटस्थ

ज्या सुनबाई गरोदर असतील त्यांनी सरळ नवऱ्याशी बोलून तिच्या आईकडे जावे म्हणजे टेन्शन कमी होऊन होणाऱ्या बाळावर त्याचे परिणाम होणार नाहीत.
दुसऱ्या उदाहरणात जिथे सून नुकतीच लग्न होऊन आलेली आहे तिथे जर सासूबाईंचा रात्री त्रास होत असल्यास चक्क झोपेची गोळी द्यावी काही दिवस आणि कार्यभाग साधावा. कुटुंब वाढवण्याचा विचार असल्यास नवऱ्याशी बोलून सासूबाईंच्या नकळत दुसऱ्या गावी जाऊन हनिमून चे बुकिंग करावे. सासूबाईंना अगदी जाण्याआधी सांगावे. जिथे राहत असतील तिथे सासूबाईंच्या वयाच्या मैत्रिणी मिळतात का ते पाहावे आणि त्यांच्यात मिसळण्यासाठी सासूबाईना किंवा सासूबाईंच्या समवयस्क मैत्रिणींना गळ टाकावी म्हणजे सासूबाईंचे दिवसा झोपणे कमी होईल आणि त्यांचा रात्रीचा त्रास कमी होईल. सासूबाईंना एखादा छंद आहे का ते पाहावे आणि दिवसा तो छंद जोपासण्यास उदयुक्त करावे.
अगदी कोणताच उपाय लागू होत नसल्यास सासूबाईंशी सरळ सरळ या विषयावर बोलावे आणि गरज भासल्यास तंबी देखील द्यावी.

संजय क्षीरसागर's picture

1 Jun 2017 - 11:23 pm | संजय क्षीरसागर

१) ज्या सुनबाई गरोदर असतील त्यांनी सरळ नवऱ्याशी बोलून तिच्या आईकडे जावे

मित्राची गैरसोय होईल त्याचं काय ?

२) जर सासूबाईंचा रात्री त्रास होत असल्यास चक्क झोपेची गोळी द्यावी काही दिवस आणि कार्यभाग साधावा.

सासूबाईंना डाव कळला आणि त्यांनी सूनबाईंनाच पाण्यात विरघळवून गुपचूप गोळ्या दिल्या तर कार्यभागाचं काय ?

३) सासूबाईंच्या नकळत दुसऱ्या गावी जाऊन हनिमून चे बुकिंग करावे

पुत्रप्रेमाखातर अचानक आईश्री तिथे दत्त म्हणून हजर झाल्या तर त्यांची सोय तिथेच एक्स्ट्रा बेड लावून करावी लागेल ना !

४) सासूबाईना किंवा सासूबाईंच्या समवयस्क मैत्रिणींना गळ टाकावी

मैत्री घनिष्ठ होऊन सासूबाईंच्या मैत्रिणीपण रात्री मुक्कामाला येवू लागल्या तर काय करणार ?

५) सासूबाईंना एखादा छंद आहे का ते पाहावे आणि दिवसा तो छंद जोपासण्यास उदयुक्त करावे.

सासूबाईंचा छंद तुमच्या लक्षात आला नाही काय ? तोच तर त्या जोपासतायंत !

६) सासूबाईंशी सरळ सरळ या विषयावर बोलावे आणि गरज भासल्यास तंबी देखील द्यावी.

हा उपाय योग्य आहे पण अंमलबजावणीस अशक्य दिसतो. मी आधी चुकून तांबी वाचले त्याबद्दल क्षमस्व !

इरसाल कार्टं's picture

2 Jun 2017 - 11:18 am | इरसाल कार्टं

यु आर ग्रेट संक्षी, बरीचशी परिस्थिती अशीच आहे.

इरसाल कार्टं's picture

2 Jun 2017 - 11:14 am | इरसाल कार्टं

जिथे राहत असतील तिथे सासूबाईंच्या वयाच्या मैत्रिणी मिळतात का ते पाहावे आणि त्यांच्यात मिसळण्यासाठी सासूबाईना किंवा सासूबाईंच्या समवयस्क मैत्रिणींना गळ टाकावी

या मैत्रिणींच्यात बसूनच तर कुचाळक्या चालू असतात.

झोपेची गोळी द्यावी

तुलनेने सोपा उपाय. :प

पैसा's picture

1 Jun 2017 - 11:44 pm | पैसा

सासवांच्या अशा वागण्यामागे जेलसी असते. आपल्याला जे मिळालं नाही ते दुसर्‍या कोणाला तेही सुनेला मिळते आहे हे बघवत नाही. मुलगा सुनेच्या आहारी जातोय अशी विनाकारण भीती वाटते आणि आपला हक्क दाखवून देण्यासाठी असले काही प्रकार केले जातात. या दोन्ही केसेसमधे सासवा जर निरोगी असतील तर लहान जागेचे कारण सांगून मित्रांनी जवळपास भाड्याने स्वतंत्र रहाण्यासाठी दुसरी जागा घ्यावी. लोक काय म्हणतात याचा अजिबात विचार करायची गरज नाही किंवा आईच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायची गरज नाही.

सुनेवर बाहेरख्यालीपणाचा संशय घेणे हे तर फारच वाईट आहे. इतर काही छळाचे प्रकार असतील तर लग्नानंतर सात वर्षेपर्यंत छळ झाल्याची नुसती तक्रार झाली तरी आपल्याला जेलमधे जावे लागेल अशी नवर्‍यानी आपापल्या आयांना भीती घालावी. निर्वाणीचा उपाय म्हणजे या वागण्यासाठी तुला मानसोपचाराची गरज वाटते आहे हे सरळ सांगून टाकावे. वाघोबा म्हणून खाणार असेल तर वाघ्याच का म्हणू नये? सोशीक सुनांनाही जरा कडकलक्ष्मी व्हायला शिकावे लागेल. बिनबुडाचे आरोप वगैरे केलेत तर मी सासू छळतेय अशी बोंब मारून शेजारी गोळा करीन अशा धमक्या द्याव्यात. असे सहन करण्याचे दिवस कधीच निघून गेले आहेत. अरे ला कारे म्हणून उत्तर दिले नाहीत तर सहन करण्यापलिकडे काहीच हातात रहाणार नाही.

कुटस्थ's picture

2 Jun 2017 - 12:02 am | कुटस्थ

संक्षी,
मित्राची गैरसोय होईल त्याचं काय ?---> गैरसोय फारशी होईल असे वाटत नाही. कामाचे म्हणाल तर पत्नी माहेरी गेल्यावर नवऱ्याची आई किंवा असल्यास घरगडी लागेल ती मदत करायला असतीलच. तसेही पहिल्या बाळाच्या वेळी गरोदर स्त्रिया माहेरी जातातच. एवढे असूनही जर गैरसोय म्हणाल तर बाळाचे आणि आईचे आयुष्य महत्वाचे कि थोडे दिवस होणारी मित्राची होणारी गैरसोय महत्वाची हे ज्याचे त्याने ठरवावे?

सासूबाईंना डाव कळला आणि त्यांनी सूनबाईंनाच पाण्यात विरघळवून गुपचूप गोळ्या दिल्या तर कार्यभागाचं काय ?----> अश्या वेळी सावधानता मुलाने बाळगावी. गोळ्या ह्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सहजपणे बाजारात मिळत नाहीत. अश्या गोळ्या मिळवणे हे मित्राला फार जड जाईल असे वाटत नाही ( उदा डॉक्टरांना सांगून, एखादा केमिस्ट ओळखीचा असल्यास त्याच्याकडून etc etc) पण सासूबाईंना नक्कीच जड जाईल.

पुत्रप्रेमाखातर अचानक आईश्री तिथे दत्त म्हणून हजर झाल्या तर त्यांची सोय तिथेच एक्स्ट्रा बेड लावून करावी लागेल ना ! ---> म्हातारवयात एकट्याने असे उपद्व्याप करण्याची शक्यता कमीच. अशी शंका असल्यासच यावर बरेच मार्ग आहेत. एकतर गावाजवळ न जाता दूरच्या ठिकाणी जावे. तसेच आईश्री यांना हॉटेल चा पत्ता देऊ नये. अगदीच गरज भासल्यास कुठे चाललो आहोत हेही सांगू नये आईला. आईला सांगावे कि ते पत्नीलाही माहित नाही आणि तिला सर्प्राईस देण्यासाठी तिलाही कुठे चाललो आहोत हे सांगितले नाही.

मैत्री घनिष्ठ होऊन सासूबाईंच्या मैत्रिणीपण रात्री मुक्कामाला येवू लागल्या तर काय करणार ?----> अश्या बालिश आणि फिल्मी (अगदी चित्रपटातही अश्या शक्यता दाखवलेल्या माझ्या पाहण्यात नाहीत) शक्यतांवर काय बोलणार. अगदी आल्याच तर सरळ आपण त्यांच्या घरी जावे.

सासूबाईंचा छंद तुमच्या लक्षात आला नाही काय ? तोच तर त्या जोपासतायंत !---> याला छंद नाही तर मानसिकता म्हणता येईल. छंद म्हणण्याचा माझा मुद्दा हा एखादी आवड वाचन, चित्रकला, संगीत etc हा होता.

हा उपाय योग्य आहे पण अंमलबजावणीस अशक्य दिसतो.---> यात अशक्य काय आहे? हे २१ वे शतक आहे १२ वे नाही. यात अशक्य दिसेल असे काहीच नाही.

संजय क्षीरसागर's picture

2 Jun 2017 - 12:15 am | संजय क्षीरसागर

लाईटली घ्या :)

कुटस्थ's picture

2 Jun 2017 - 12:45 am | कुटस्थ

अगदी अगदी :-)

तुमच्या मुद्द्यांचा विचार मी खरोखर करत आहे, संक्षींचे विनोद कृपया हसण्यावारी घ्या.

गामा पैलवान's picture

2 Jun 2017 - 12:46 am | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

सासूबाईंचा पुनर्विवाह करून द्यायचा तुमचा उपाय नक्कीच मननीय आहे. मात्र इथे एक धोका संभवतो. जुन्या जमान्यात काही लोकं लग्न झाल्यावर सगळं ठीक होईल असा भाबडा आशावाद बाळगून असंत. मात्र हल्ली सगळं ठीक न होता बिघडत जातं. थोडक्यात काय, सासूबाईंची कटकट नव्या नवऱ्याच्या गळ्यात मारली तर जाणार नाही ना? एक समस्या सोडवू पाहता दुसरी उभी राहायची.

आ.न.,
-गा.पै.

अभ्या..'s picture

2 Jun 2017 - 1:25 am | अभ्या..

हो ना, रोज उगी "कसला नवरा बघून दिला मला" म्हणून पोराच्या अन सुनेच्या डोस्क्याला त्रास.

हो ना..आणि परत ते डोपामाईन का काय असते त्याच सेक्रेशन नाही झालं तर काय करायचं??

श्रीगुरुजी's picture

2 Jun 2017 - 8:39 am | श्रीगुरुजी

सासूचं नवीन लग्न लावून दिलं आणि तिची नवीन सासू हिच्या नवीन संसारात हिच्यासारखंच वागायला लागली तर?

इरसाल कार्टं's picture

2 Jun 2017 - 11:23 am | इरसाल कार्टं

बस करा आता. :p

सासूबाईंचा नेमका त्रास अतृप्त वैवाहिक जीवन आहे हे एकदा लक्षात घेतलं की सगळी उत्तरं मिळतात :)

१) सासूबाईंची कटकट नव्या नवऱ्याच्या गळ्यात मारली तर जाणार नाही ना?

२) "कसला नवरा बघून दिला मला"

गामाश्री, फ्रॉईडच्या मते बहुतेक सर्व प्रॉब्लम्सचं मूळ अतृप्त कामेच्छेत आहे. नवा नवरा उत्साही असल्याखेरीज मॅट्रीमनीला डाव लावणार नाही. थोडक्यात, दोघंही (या वयात) एकमेकांना `चालवून' घेणारे असणार. किचन आणि बेडरुम हे दोन मुख्य प्रश्न सुटले की बाकीचे आपसूक सुटतील. तस्मात, तुम्हाला वाटतंय तसं होण्याची शक्यता फार कमी.

३) आणि परत ते डोपामाईन का काय असते त्याच सेक्रेशन नाही झालं तर काय करायचं??

कामेच्छा हा `सर्व संप्रेरक' आहे ! वैवाहिक जीवनात `डोपामाईन' हे उगीच काही तरी कारण पुढे करायचं म्हणून सांगितली जाणारी गोष्ट आहे.

४) सासूचं नवीन लग्न लावून दिलं आणि तिची नवीन सासू हिच्या नवीन संसारात हिच्यासारखंच वागायला लागली तर?

पन्नाशी उलटलेल्या माणसाची आई असेल किंवा नाही हा पहिला प्रश्न. बरं असली तरी तिला त्या वयात `असला' प्रश्न असायची शक्यता अती धूसर. त्यातून ही तिची त्रास देण्याची क्षमता ती किती असणार ?

सुनबाई फारच आशा काळे, अलका कुबल होऊन राहात असतील तर कठीण आहे. आपल्याला त्रास होतोय ना? मग लोक काय म्हणतील याचा विचार सोडून सरळ खमकेपणा घ्यावा. सासवेला एकदा ताटाखालचं मांजर केलं की परत काय बिशाद आहे पुढे बोलेल.

आमच्या आईला सासू नसताना आमच्या तीर्थरुपांच्या वडिलांकडून अगदीच असा नाही पण थोडा फार त्रास सोसावा लागला होता. सुरुवातीला ती मूग गिळून गप्प बसायची, नंतर जे काय तिने सगळ्यांना धारेवर धरलं की ज्याचं नाव ते!!

चावला नाहीत तरी फणा काढून राहा, नाहीतर ठेचायला लोक तयारच असतात.

आणि एक, हे व्हॉट्सपवर सकाळी सकाळी आईबापाचे गुणगान गाणारे श्रावणबाळ छाप लोक असतात, त्यांनी असले ओवाळून टाकलेले आईबाप बघितलेले नसतात. सुनबाईने वागणं बदलल्यावर अजून गप्प असलेल्या श्रावणबाळांना मायेचे उमाळे येतील. सुनबाईने सरळ माझ्या सासवेला तुझ्याकडे नेतोस का विचारावं. नेतो म्हणाला तर खुशाल जाऊ द्यावं.

स्रुजा's picture

2 Jun 2017 - 7:46 pm | स्रुजा

+१११११११ अत्यंत योग्य प्रतिसाद. आणि प्रत्येक वेळेस नवर्‍याने काही तरी मध्ये पडून करावं अशी अपेक्षा पण चुकीचीच आहे. तुमच्या लढाया तुम्ही लढा आणि मग दुसर्‍याला त्याचं काम करायला लावा.

सच्चिदानंद's picture

2 Jun 2017 - 8:31 pm | सच्चिदानंद

मुळात समस्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत आहे हो. म्हणजे असे की मातृसत्ताक व्यवस्था केली म्हणजे मुलगा त्याच्या सासूबाईंच्या घरात रहायला गेला आणि मुलगी तिच्याच आईच्या घरी राहीली असती म्हणजे हे प्रश्नच उद्भवले नसते. :)
सगळ्या आया आपल्या मुलीला आई झालेली बघायला आसुसलेल्या असतात पण मुलाचे लगीन झाले की त्याच्याबद्दल पझेसिव होतात (आणि त्या मुलांच्या डोक्याला दोन्हीकडून ताप सुरु होतो.!) त्यापेक्षा सरळ पोरगा सासरी गेला म्हणजे कसं सगळेच खुश.
थोडक्यात समस्त पुरुष जातीने घेतलेलं हे ओझं (परत एकदा) स्त्रीवर्गाच्या हवाली करावं आणि निवांत व्हावं.

(तुम्ही मांडलेल्या समस्येबद्दल इतके उपाय सुचवले गेलेत इथे की त्यावर अजून काय सुचवणार म्हणून मी फक्त मुळ प्रॉब्लेमबद्दल बोलतोय. )

सतिश गावडे's picture

2 Jun 2017 - 9:30 pm | सतिश गावडे

समस्येच्या मुळाशीच पोचलात तुम्ही.
पुन्हा एकदा मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात आली तर मुलंही होम लोन नावाच्या जन्मोजन्मांतरीच्या गुलामगिरीतून मुक्त होतील.

अर्थात होम लोनची जबाबदारी मातृसत्ताक पद्धतीत स्त्रीकडे असेल असे गृहीत धरले आहे. तिथेही जर होम लोनची जबाबदारी (घर)जावयांवर पडली तर "तेलही गेले आणि तूपही गेले, नशिबी घरजावई होणे आले असे होईल.

सच्चिदानंद's picture

4 Jun 2017 - 7:07 am | सच्चिदानंद

समस्येच्या मुळाशीच पोचलात तुम्ही.

मग काय तर, मुळाशीच घाव घालावा.

पुन्हा एकदा मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात आली तर मुलंही होम लोन नावाच्या जन्मोजन्मांतरीच्या गुलामगिरीतून मुक्त होतील.

अर्थात मातृसत्ताक म्हणजे जबाबदार्‍या पण आल्याच की. हो पण अर्थात समानतेच्या आधुनिक काळाप्रमाणे आता घरी नांदायला आलेल्या मुलांचा छळ करता येणार नाही हे अजूनच बरे (अत्ता होतो तो छळही यानिमित्ताने वाचेल हा वेगळाच फायदा अजून ;) ).

मातृसत्ताक प्रकारात स्वतःच्या आई-वडिलांच्या घरात "बेडरूम" संस्कृतीला बायका तयार होतील का?
बऱ्याच मुलींना आई-बाबांसमोर बेडरूमचा दरवाजा कसा लावायचा हा प्रश्न असतो.

सच्चिदानंद's picture

4 Jun 2017 - 7:00 am | सच्चिदानंद

मातृसत्ताक प्रकारात स्वतःच्या आई-वडिलांच्या घरात "बेडरूम" संस्कृतीला बायका तयार होतील का?
बऱ्याच मुलींना आई-बाबांसमोर बेडरूमचा दरवाजा कसा लावायचा हा प्रश्न असतो.

अहो, कारण तुम्ही अजूनही पुरुषप्रधान व्यवस्थेप्रमाणे विचार करताय. सोच को बदलो जरा आनि मग देखो.
अर्थात, त्यावेळी बर्‍याच मुलांना त्यांच्या माहेरी गेल्यावर असा प्रश्न पडेल कदाचित. ;)

संजय क्षीरसागर's picture

4 Jun 2017 - 2:19 pm | संजय क्षीरसागर

मातृसत्ताक की पितृसत्ताक असा फिक्स्ड पॅटर्न वापरण्यापेक्षा, दोघांनी परस्पर संमतीनं जो योग्य वाटेल तो पॅटर्न आणि त्यातही कालानुरुप फ्लेक्सिबिलिटी ठेवली तर ती जास्त योग्य होईल.

तस्मात, मातृसत्ताक हा 'मुळाशीच घाव ' वगैरे वाटत नाही. वरील उदाहरणात तर आईश्री विडो आहेत. त्या एकट्या किती वेळ विंडोतून बाहेरची मजा बघणार ? मला एकटीला करमत नाही म्हणून त्या सूनबाईंच्या घरी मुक्कामाला आल्या तर एका ऐवजी दोन घरात राडा सुरु होईल.

थोडक्यात, वेगळा विचार म्हणून मातृसत्ताक प्रयोग करायला प्रॉब्लम नाही पण ते धाग्यातल्या प्रश्नाला उत्तर नाही.

रातराणी's picture

2 Jun 2017 - 11:03 pm | रातराणी

:O

अवघडे.. नवराबायकोनी शिस्तीत वेगळा संसार उभा करावा. केसरी, वीणा वर्ल्डच्या टूरला वरचेवर आईसाहेबांना पाठवीत जावे.. सणासुदीला आपले आईसाहेबांकडे जाऊन चार दिवस पूर्ण त्यांच्या मनासारखे वागावे. सुनांनी कितीही वाईट वाटले तरी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन राहावे.

अभिजीत अवलिया's picture

3 Jun 2017 - 10:22 pm | अभिजीत अवलिया

कठीण परिस्थिती आहे खरी. मुलगा आणि सुनेने स्पष्टपणे आईला फक्त एकदा समजावून सांगावे आणि तरीही न ऐकल्यास (न ऐकण्याची शक्यता जास्त आहे) तिची वेगळी सोय करावी. आईची वेगळी सोय करताना 'जग काय म्हणेल' असली बिनकामाची फालतू विचारणा डोक्यात अजिबात आणू नये. जग काही म्हणाले तरी आपल्या अंगाला भोके पडत नाहीत हे लक्षात ठेवावे.

मी जाती बाहेर प्रेम विवाह केला, अगदी जगाची दोन टोकं म्हणजे माझी आई व बायको! जैन असल्याने आम्ही शाकाहारी व बायको आगरी असल्याने फक्त नो शाकाहारी! शहाणंपणा केला व सर्वात आधी मी वेगळी चूल मांडली, लग्न झाल्या झाल्या. पण नवीन घर देखील जवळच अगदी हाक पोचेल एवढ्या अंतरावर. पण त्या आधी आईला तिचा व्यवसाय सुरू करून दिला होता त्यामुळे तसा काही त्रास नाही. आता मुलगी झाली आहे दिवसभर आज्जीकडे व रात्री आमच्याकडे. ना तिला त्रास ना आम्हाला.

मोकळ्या हाताला काम द्या, भले राम नामची मणीमाळ द्या, काही त्रास होणार नाही. बाकी प्रत्येक घरात अडचणी वेगळ्या, वेगळे स्वभाव, हे असतेच, जमेल तेवढे सगळ्यांना सोबत घेऊन आंनद घ्यावा! हाच सल्ला.

इरसाल कार्टं's picture

4 Jun 2017 - 1:17 pm | इरसाल कार्टं

आंतरजातीय विवाह असूनही माझ्या आई बाबांनी उशिरा का होईना पण आम्हाला सकारात्मकतेने स्वीकारले, आई आणि बायकोचे नाते तर माय लेकीसारखे आहे. आम्ही आजही वेगळेच राहतो पण हाकेच्या अंतरावर. कित्येक वेळा जर आम्ही खूप बिझी असलो तर आई दोघांसाठी डबे पाठवते. आणि आमच्या छोट्याश्या घरातही आईबाबा कधीही असले वागले नाहीत.
मित्राच्या बाबतीत हे घडताना त्यामुळेच कदाचित जास्त सलते.