न्याहारी शब्दाचा उद्गम

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
19 May 2017 - 9:33 am
गाभा: 

http://www.loksatta.com/lekhaa-news/haji-shabrati-nihari-wale-delhi-1475...

आजचा वरील लेख वाचताना एका शब्दाच्या उद्गमाचा उलगडा झाल्यासारखे वाटले.

सकाळच्या अल्पशा जेवणासाठी सर्वसाधारण पणे आपण न्याहरी हा शब्द वापरतो. शहरीभागात नाश्ता हा शब्द वापरतात. ग्रामीण भागात सर्रास न्याहारी हा शब्द वापरला जातो. ( चुभुदेणे घेणे).

मोगलाच्या काळी अश्या जेवणाला निहारी असे म्हणायचे, या शब्दावरून तर, न्याहरी हा शब्द आला तर नसावा ना?

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

19 May 2017 - 12:40 pm | गामा पैलवान

माहितगार,

न्याहार हा शब्द बहुधा नि + आहार असा असावा. आहार म्हणजे मुख्य जेवण असावं. त्याच्या अगोदरचं म्हणून नि प्रत्यय लागलेला असू शकतो. इटालियन जेवणांत आन्तेपास्ती म्हणजे पास्तापूर्व खाद्याची संकल्पना आहे. तसाच काहीसा न्याहारीचा उगम असावा.

आ.न.,
-गा.पै.

"निहारी" हा शब्द अरेबिक 'नहर' पासून आला आहे - म्हणजे 'सकाळ'. 'नहरला खायचं अन्न' --> निहारी --> न्याहारी.

अत्रुप्त आत्मा's picture

20 May 2017 - 12:27 pm | अत्रुप्त आत्मा

ते नल्लीनिहारी म्हनतेत ते बी सकाळीच खातेत ना ते लोक.. . मागं गणपानी थेची पा. क्रु. हितेच दिल्ती तेच नव्ह का ह्ये?

शित्रेउमेश's picture

24 May 2017 - 8:43 am | शित्रेउमेश

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

न्याहरीला माझी आजी निहरी म्हणायची ते आठवलं.

गामा पैलवान's picture

19 May 2017 - 10:45 pm | गामा पैलवान

आदूबाळ,

नहर म्हणजे हिंदीत झरा ना? झऱ्याच्या काठी करायची ती निहारी ....?

आ.न.,
-गा.पै.

आदूबाळ's picture

20 May 2017 - 10:51 am | आदूबाळ

उर्दू आणि फारसीमध्ये 'नहर' म्हणजे झरा.

अरेबिकमध्ये नहर म्हणजे 'दिवस'. संदर्भः स्टेन्गॅस शब्दकोश. इथे पहा (पीडीएफचे पान ९९/४७६).

a

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2017 - 8:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नहर म्हणजे आजच्या भाषेत पाणी वाहवुन नेणारी पाइपलाईन. पाट, लहानशी नदी...जिच्यातून पाणी वाहत चालले आहे .

न्याहरी सकाळचं अल्पसं जेवणच.

नाहारी हा फ़ारसी शब्द. संस्कृत नि+आहार = फराळ, अल्पाहार, मीताहार.

-दिलीप बिरुटे

अत्रे's picture

20 May 2017 - 8:42 am | अत्रे

"उगम" आणि "उद्‌गम" यात काय फरक असतो? दोन्ही शब्द समानार्थी आहेत असे वाटते. पहिला शब्द हा दुसऱ्या संस्कृत शब्दाचे मराठी रूपांतर आहे का?

दीपक११७७'s picture

20 May 2017 - 2:48 pm | दीपक११७७

माहितगार जी

निहारी हा शब्द अरेबी मध्ये
तर,
न्याहरी हा संस्कृत मधुन आला आहे

कारण अलीकडील सांस्कृतीक आक्रमणा पुर्वी ज्या संस्कृती होत्या त्यामध्ये
breakfast हा प्रकार असणारच ना.
मग त्याला शब्द पण असनारच ना.
मग केवळ उच्चार जवळ पास म्हणुन शंका घेण बरोबर नाही असे वाटते.

अविनाशकुलकर्णी's picture

21 May 2017 - 5:57 am | अविनाशकुलकर्णी

कमाल आहे..लोकानी हा लेख क्वापी करुन स्वताच्या नावावर फेसबुकावर टाकला पण

दीपक११७७'s picture

21 May 2017 - 2:31 pm | दीपक११७७

लिंक द्या

कलंत्री's picture

22 May 2017 - 9:57 am | कलंत्री

चर्चा होणे हे महत्त्वाचे आहे. यातूनच आपले भावनिक आणि सांस्कृतिक ऐक्य सिद्ध होते. ही सर्व चर्चा वाचल्यानंतर आपण किती जवळचे आहोत हे लक्षात आले.

शेवटी मिठाईशी मतलब, मिठाईवाला कोणीका असेना? नाव कोणाचेही असो.

निहारी, न्याहारी हा शब्द ग्रामीण भागात जास्त लोकप्रिय आहे, आज ही. आमच्या कोल्हापूर बेळगावी भागात नियमित वापरात असलेला शब्द. कधी त्याच्या उगमाबद्दल विचार केला नव्हता पण आता विचार केल्यावर जाणवतं की हा शब्द उत्तर भारतातून इकडे आला असावा, आधी मुनी लोक सकाळ प्रहरी येत अन्न गोळा करण्यासाठी व त्यांनी हा शब्द इकडे आणला असावा.

चौथा कोनाडा's picture

21 May 2017 - 9:33 pm | चौथा कोनाडा

न्याहरी या शब्दाच्या उगमाचा कधी विचार नव्हता केला. या धाग्यावरून उलगडला !
अल्पोपहार हा शब्द देखिल छान आहे, उच्चारायला फारसा अवघड नसलेला ! अल्प्+उप्+आहार.

नुकताच फेबु किंवा व्हॉअवर बिर्याणी शब्दाचा उगम वाचला. हा शब्द बिर्यान या पर्शियन शब्दापासून तयार झाला.
कुपोषित सैनिकांसाठी सकस पुर्णान्न असलेला भाताचा हा चविष्ट प्रकार शोधला गेला.
याचा उगम असाही असावा का अशी मला शंका आहे. वीर+अन्न्=वीरान्न/विरान्नी/बिर्यानी
(अन्न्/अन्ना=भात)

हुप्प्या's picture

22 May 2017 - 7:54 pm | हुप्प्या

जर सकाळी खाण्याच्या पदार्थांना निहारी म्हणत असतील तर केवळ ह्या मांसाहारी पाककृतीलाच निहारी का म्हणतात? सकाळच्या वेळेस अन्य पदार्थ खाल्ले जातात त्यांना निहारी म्हणत नाहीत असे का? मुघल लोक काय केवळ हाच पदार्थ सकाळी खायचे का?
मराठीतील न्याहारी हा विशिष्ट पदार्थाला उद्देशून नसून सकाळच्या वेळेस केलेल्या अन्नसेवनाकरता वापरला जातो. तेव्हा न्याहारी व निहारी हे दोन शब्द संबंधित असले तरी समानार्थी आजिबात वाटत नाहीत.

कलंत्री's picture

24 May 2017 - 3:15 pm | कलंत्री

जे कोणी मराठी सरदार मोगलाच्या दरबारात नोकरी करित असत, मोगलांचे सरादार, शाही घरातले लोक निहारी करित असावेत आणि त्याचा उल्ल्लेख कोठे होत असावा. ते पाहुन तात्कालिन प्रतिष्ठित मराठा सरदारांनी हा शब्द आपल्या पद्धतीने अर्थात तसाचा तसा नघेता रुजवला ( निहारी चा न्याहारी या उच्चाराने ).

सकाळाचा भरपेट अन्नसेवन प्रत्येक संस्कृतीमध्ये होत असेलच. पण शब्द कसा आला याचा शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

त्याचं काये, सकाळी हरी अंगणात खेळत बसला होता. आणि अचानक रडायला लागला. हरीची आज्जी म्हणाली "ऑ कॉ पॉज्जे हरीला, पोहे, उप्पीट की बेडेकरांची मिसळ"...
हरी म्हणाला "अरे देवा, परत पुण्यात?"..

मग हरीची (पुणेरी) आज्जी म्हणाली "बुवाऽऽ या आणि न्या हरीला...नतद्रष्ट कार्टा!! न्या हरीला न्या"....

मग पुणेकर न्याहरी म्हणायला लागले आणि पुणेरी भाषा हीच प्रमाणभाषा असल्याने बाकीचे लोक पण न्याहरी म्हणायला लागले.