ताज्या गैर-राजकीय घडामोडी भाग-१

अमितदादा's picture
अमितदादा in काथ्याकूट
13 May 2017 - 2:40 pm
गाभा: 

ताज्या घडामोडी ची चर्चा करण्याकरता ताज्या घडामोडी हा धागा होता, परंतु सध्याची त्याची नवीन आवृत्ती फक्त राजकीय घडामोडी ची चर्चा करण्यासाठी असल्याने नवीन अराजकीय घडामोडी किंवा घटना तिथे टाकण्यास मर्यादा येत आहेत, त्यामुळे अराजकीय घडामोडी साठी हा नवीन धागा.

नुकतीच एक चिंताजनक बातमी वाचली, हीच बातमी मी तीन कि चार वर्षपूर्वी वाचलेली, परंतु यातून सरकार ने कोणताही धडा घेतला नाही हे पाहून आणखी चिंताजनक वाटतेय. हि बातमी आहे भारतातील औषधनिर्माण कंपन्यातील औषध कचऱ्यापासून तयार होणार्या सुपरबग ची. भारतातील हैदराबाद मध्ये औषद निर्माण कंपन्यांचा मोठा परिसर आहे तेथूनच भारतातून निर्यात होणार्या औषधापैकी ५०% औषधे तयार होतात. यातील बर्याच कंपन्या औषध निर्मिती साठी असणारे standards and regulations पाळतात, परंतु औषध कचरा/ drug residues बाहेर सोडताना मात्र कोणतीही काळजी घेत नाहीत, यातून ह्या गोष्टी जमीन आणि पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित करतायत आणि यातूनच जन्म होतोय सुपरबग चा. खाली दिलेला रेपोर्ट काय म्हणतोय पहा (हा रेपोर्ट साधा सुधा नसून Infection ह्या अंतराष्ट्रीय नियतकालिकात पब्लिश झालेल्या पेपर वर आधारित आहे)

India’s pharma industry is creating superbugs with its dirty effluent discharges

The presence of drug residues in the natural environment allows the microbes living there to build up resistance to the ingredients in the medicines that are supposed to kill them, turning them into what we call superbugs.

ह्या सुपरबग मुळे साधे साधे आजार सुधा गंभीर रूप धारण करतायत कारण antibiotics हे कुचकामी ठरतायत. हा रेपोर्ट काय म्हणतोय बगा

India has become the epicentre of the global drug resistance crisis, with 56,000 newborn Indian babies estimated to die each year from drug-resistant blood infections, and 70% to 90% of people who travel to India returning home with multi-drug-resistant bacteria in their gut, according to the study.

भारतातील कुचकामी कायदे आणि त्याची अंमलबजावणी याला कारणीभूत आहे, तसेच प्रशासकीय पातळीवर नसणारे गांभीर्य सुधा याला कारणीभूत आहे.

आता थोडी चांगली आणि सुखद बातमी
भारतातील अत्यंत नामवंत अश्या संस्थांनी (IISc and IISER) E. coli ह्या drug resistant bacteria वरती प्रयोग करून यातील antibiotic न विरोध करणाऱ्या enzyme चा शोध घेतला, आणि antibiotic ला कश्या पद्धीने निष्प्रभ केले जाते हे शोधून काढल. खालील बातमी मध्ये या पूर्ण प्रोसेस मध्ये H2S वायू च कार्य अत्यंत सहजरीत्या समजावून सांगितलं आहे. या शास्त्रज्ञाना पुढच्या प्रयोगात यश येवो हि सदिच्छा.
Reversing drug resistance made possible

जाता जाता आपल्या देशाचा राजधानीचे नाव बदनाम करणाऱ्या NDM-१ ह्या bacteria resistant enzyme विषयी माहिती विकिपीडिया वरती वाचता येयील
NDM-1

टीप: मी ह्या क्षेत्रातील जाणकार नाही, एक सामान्य वाचक म्हणून पहिल्या बातमी विषयी भीती आणि दुसर्या बातमी विषयीची उत्सुकता व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया

हे चिंताजनक आहेच, पण अशा बातम्या येण्यामागे कधीकधी थोडाबहुत राजकारणाचा आणि व्यावसायिक स्पर्धेचाही भाग असतो. याबद्दल अजून माहिती खोलात जाऊन आणि निष्पक्षपणे काढली गेल्यास सत्य उमजू शकेल.

अमितदादा's picture

13 May 2017 - 3:52 pm | अमितदादा

माझ थोडस वेगळ मत आहे, मला नाही वाटत कि यात व्यावसायिक स्पर्धेचा मोठा भाग असाव, मुळात त्या लेखात हैदराबाद मधले sample घेवून प्रयोग केलेला आहे. त्यानंतर त्याचे findings एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले आहेत. भारता बरोबर चीन चा उल्लेख आहे. हा जगभर कोठेही होणारी घटना आहे.
पण सुपरबग तयार होण्याचे ते एकमेव कारण नाही हे हि खरे, सध्या रोगावर antibiotic चा होणारा अनियंत्रित मारा त्या जंतू मध्ये antibiotic विरोधी शक्ती वाढवतो हे काही संशोधनातून सिद्ध झालेलं आहे असे वाचले आहे. याबाबत आणखी खोलात जावून चौकशी करावी याशी सहमत.
* मूळ किंवा उपप्रतिसादात काही चुकल्यास नवीन माहिती जाणून घेण्यास उस्तुक..

पैसा's picture

13 May 2017 - 3:58 pm | पैसा

अनेकजण अँटिबायोटिक्सचा आवश्यक डोस पुरा करत नाहीत त्यामुळेही जंतूंची त्या औषधाला प्रतिकार करायची शक्ती वाढते असं वाचलंय.

अत्रे's picture

13 May 2017 - 5:39 pm | अत्रे

सध्या रोगावर antibiotic चा होणारा अनियंत्रित मारा त्या जंतू मध्ये antibiotic विरोधी शक्ती वाढवतो हे काही संशोधनातून सिद्ध झालेलं आहे असे वाचले आहे.

अमेरिकेत अँटीबॅक्टेरिअल साबणावर बंदी घातली आहे म्हणे (http://sitn.hms.harvard.edu/flash/2017/say-goodbye-antibacterial-soaps-f...) त्याचा काही संबध असेल का सुपरबगशी ?

पैसा's picture

13 May 2017 - 3:54 pm | पैसा

पहिली बातमी वाचून धसका बसला तर दुसऱ्या बातमीमुळे अजून काही चांगल्या उपचारांच्या शक्यता दिसत आहेत

वरुण मोहिते's picture

13 May 2017 - 4:11 pm | वरुण मोहिते

मल्टिपल ड्रग रेसिस्टन्ट टीबी ह्या मुळे पुढे आलंय. बाकी डॉक्टर किंवा जाणकार लोक सांगतीलच .

Nitin Palkar's picture

14 May 2017 - 9:38 pm | Nitin Palkar

भारतातील कुचकामी कायदे आणि त्याची अंमलबजावणी याला कारणीभूत आहे, तसेच प्रशासकीय पातळीवर नसणारे गांभीर्य सुधा याला कारणीभूत आहे. पर्यावरण प्रदूषणाबाबत कार्य करणाऱ्या हिरेमठ नावाच्या एका डॉक्टरचे व्यक्तिचित्र अनिल अवचटांच्या 'कार्यरत' मध्ये दहा एक वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते.

अमितदादा's picture

20 May 2017 - 12:01 am | अमितदादा

@पैसा ताई आणि @नितीन पालकर
तुमच्या मताशी सहमत आहे
@आनंदयात्री
तुम्ही दिलेला दुवा माहितीपूर्ण आहे. खालील माहिती सुधा रोचक आहे.
WannaCry ransomware: Meet the expert who stopped the global cyberattack

आता एक जुनी परंतु रोचक बातमी
UPS ह्या कुरियर/कार्गो कंपनीने आपल्या मालवाहतूक करताना डावीकडे (उजवीकडून वाहने चालतात) न वळण्याचा निर्णय घेवून चांगलाच फायदा कमावला आहे. किती तरी लिटर इंधन बचत केली आहे, तसेच प्रदूषण कमी करण्यास हि मदत केलीय. गणिती दृष्ट्या विचार केला तर हा optimization प्रोब्लेम आहे. अधिक माहिती खालील दुव्यात...

Why UPS trucks (almost) never turn left

रामदास२९'s picture

9 Nov 2017 - 8:18 pm | रामदास२९

दिल्ली धूर्धुक्याने ( smog ला पर्यायी मराठी शब्द) चोन्दली ..

आपण विनाशकारी विकासाच्या कडून 'शाश्वत विकासा' कडे केव्हा जाणार .. आज दिल्ली जात्यात आहे आणि बाकी शहरे सुपात आहेत .. उद्या सगळी शहरे याच मार्गाने जाणार ..

खरच राजकारणावर आणि राजकारण्यान्वर अति चर्चा करण्यापेक्षा ह्यावर बोलू कारण पर्यावरणाचा विनाश केला आणि पर्यायी मार्ग काढला नाही तर माणूस आणि बाकी सर्व प्रजाति नामशेष होतील ..

मराठी_माणूस's picture

11 Nov 2017 - 9:52 am | मराठी_माणूस

अजुन एक श्रावण बाळ
https://www.loksatta.com/mumbai-news/the-child-does-not-have-time-for-fa...

सुबोध खरे's picture

11 Nov 2017 - 10:57 am | सुबोध खरे

हि सामाजिक अपरिहार्यता आहे.
एका वेगळ्या दिशेने विचार करून पहा.
आजकाल केवळ आईबापांची काळजी न घेणारी मुले आहेत यावर उहापोह चालताना दिसतो तिथेच अनाथालयातील मुलांची वाढती संख्या काय सांगते? केवळ मुलेच नव्हे तर आईबापसुद्धा जन्माला आलेल्या मुलांना टाकून देताना आढळतात.
आणि हीच स्थिती महाभारत काळापासूनची आहे. केवळ आधुनिक काळ ची नव्हे.

मराठी_माणूस's picture

11 Nov 2017 - 12:13 pm | मराठी_माणूस

हि सामाजिक अपरिहार्यता आहे.

ती कशी काय ?

मार्मिक गोडसे's picture

11 Nov 2017 - 12:24 pm | मार्मिक गोडसे

जन्माला आलेल्या मुलांना टाकून देनाऱ्यांत सुशिक्षितांचे प्रमाण किती आहे ,जन्मदात्याना वृद्धाश्रमात टाकणाऱ्यांत अशिक्षितांचे प्रमाण किती आहे आणि अनाथ मुलांना दत्तक घेण्याचे प्रमाण कमी झाले की वाढले ह्यावर कोणाकडे माहिती असेल तर वाचायला आवडेल.

श्रावण बाळ म्हणून टोमणे कशाला मारताय? अशा केसमधे (शक्यतो) पेराल तेच उगवलेलं असतं.

https://www.maayboli.com/node/63931 इथला vijaykulkarni चा प्रतिसाद वाचा. छान आहे!

मराठी_माणूस's picture

18 Nov 2017 - 2:58 pm | मराठी_माणूस

प्रतिसाद वाचुन सार्थक झाले.

जन्माला आलेल्या मुलांना टाकून देनाऱ्यांत सुशिक्षितांचे प्रमाण किती आहे
सुशिक्षित कि अशिक्षित हि माहिती कशी मिळणार हो ?
कारण आपले मूल टाकुन देणे हा गुन्हा आहे

मार्मिक गोडसे's picture

11 Nov 2017 - 12:45 pm | मार्मिक गोडसे

बरोबर आहे तुमचे म्हणणे, परंतू कधीकधी मुल टाकताना काहींना पकडले जाते,त्यावरून माहिती मिळू शकते. सुशिक्षित व्यक्ती अनावश्यक मूल गर्भपात करून टाकण्याची शक्यता जास्त असू शकते.
वृद्धाश्रम व दत्तकाबद्दल माहिती मिळण्यास कसली आलीय अडचण?

babu b's picture

17 Nov 2017 - 4:00 pm | babu b

ड्रग रजिस्टन्स हा एक शाश्वत प्रश्न आहे , कारण जगण्यासाठी सगळे सजीव सतत संघर्ष् करत असतात.

अर्धवट उपचार केले गेले तर जंतूंच्यामध्ये ते औषध पचवायची ताकत येते. काही काळाने ते त्या औषधाला दाद द्यायचे बंद करतात. उपचाराचा कोर्स चुकीचा / अर्धवट केला की ही शक्यता वाढते .. त्याची प्रमुख कारणे ..
१. डॉक्टरांकडुनच चुकीचा कोर्स प्रिस्क्राइब होणे. उदा. बोगस डॉक्टर
२. पैशा अभावी रुग्णाने अर्धवट गोळ्या विकत घेणे
३. दीर्घकाळ कोर्स असेल तर गोळ्या घ्यायला टाळाटाळ करणे.

इ इ

बाकीची कारणे , वर उल्लेखल्याप्रमाणे वातावरणात औषधांचे अंश रहाणे वगैरे .. पण डॉक्टर - रुग्ण - हॉस्पिटल .. मुख्यत: रसिस्टन्सची पार्श्वभूमी हीच असेल असे वाटते.

ड्रग रेसिस्टन्स तपासण्या करून आधीच शोधता येते. उदा. थुंकीच्या तपासणीतला टीबीचा जंतू साधा आहे की रेजिस्टन्स आहे , हे आधी शोधता येते व पहिल्या दिवशीपासून तसे उपचार देता येतात.
पण अशा तपासण्या सर्वत्र उपलध नसतील किंवा महाग असतील तर त्या सुरुवातीला होत नाहीत. काही टेस्ट भारतात सहजा सहजी उपलब्ध नाहीत. २ महिना टीबीला उपचार देउनही आजार आटोक्यात नाही आला की मग नाइलाजाने टेस्ट करून घेतली जाते. पण तोवर ड्रग रसिस्टन्स जंतू आणखीच फोफावलेला असतो.

पुर्वी नवेनवे ॲंटीबायोटिक शोधण्यात कंपन्या आघाडीवर असायच्या
पण ॲंटीबायोटिक नवीन शोधून जरी हजार रुपयाला विकले तरी पेश्ंट ते किती दिवस घेणार ? १५ दिवस , २० दिवस ! त्यापेक्षा आयुष्यभर गोळ्या गिळायला लावणार्या डायबेटिस , बीपी , अशा आजारांवरील संशोधनात कंपन्या आघाडी घेत आहेत. नवी ॲंटीबायोटिके येण्याचा वेग कमी असल्याने जे उपलध आहे तेच पुरवून वापरणे भाग आहे.

अमितदादा's picture

17 Nov 2017 - 5:31 pm | अमितदादा

तुमच्या कारणांशी सहमत आहे.
मध्यंतरी लोकसत्ता मध्ये याविषयीचा सुंदर लेख वाचला होता, त्याची लिंक खाली देतो.
प्रतिजैविके – वेळ निघून चाललीय..

सुबोध खरे's picture

17 Nov 2017 - 6:36 pm | सुबोध खरे

प्रतिजैविकांना रोध (रेसिस्टन्स) निर्माण होण्याचे मूळ कारण म्हणजे नैसर्गिक निवड (natural selection)
समजा आपल्या शरीरात १००० जंतूंचा शिरकाव झाला आणि त्यासाठी आपण एक प्रतिजैविक "क्ष "मायसिन वापरले तर या १००० जिवाणूंपैकी १० जिवाणू नैसर्गिक रित्या "क्ष" मायसिनला रेझिस्टंट असतात ते जिवंत राहतात आणि पुनरुत्पादन करतात. आता यांची संख्या १०० झाली आणि बाकी क्ष मायसिनला (susceptible) दाद देणारे जंतू पुनरुत्पादन करून ५०० पर्यंत गेले. एक काळ असा येतो कि क्ष मायसिनला रेझिस्टंट असलेले जंतूंच जिवंत राहतात आणि त्याला (susceptible) असणारे मात्र मरून जातात. हे जंतू आपल्या निष्काळजीपणा मुळे प्रसारित होतात आणि मग प्रतिजैविकांचा दाद न देणारे जंतू सर्वत्र दिसू लागतात.
असे होऊ नये म्हणूनच सुरुवातीला क्षय रोगासाठी सर्वात परिणामकारी अशी चार औषधे EHRZ/SHRZ एकत्र दिली जातात. जेणेकरून सुरुवातीला एका किंवा दोन औषधाला रेझिस्टंट असले तर तिसऱ्या किंवा चौथ्या औषधाला ते बळी पडावेत.
हेच डावपेच कर्करोगाच्या केमो थेरपी मध्ये हि वापरले जातात. उदा. ल्युकेमिया लिंफोमा मध्ये तीन किंवा चार औषधे (ABVD)एकत्र वापरली जातात. पूर्वी एकाच औषध वापरले असताना सुरुवातीला या औषधाला susceptible असलेल्या कर्करोगाच्या पेशी मारत आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वाने ज्या पेशी रेझिस्टंट असतात त्या बचावतात आणि कर्करोग त्या औषधाला जुमानेनासा होतो.
प्रतिजैविक काय कि कर्करोगाची केमोथेरपि काय तोफखान्याचा नियम वापरला जातो hit first, hit hard, keep hitting
दुर्दैवाने वर म्हटल्याप्रमाणे डॉक्टर, केमिस्ट आणि फार्म कंपन्यांचा प्रतिजैविकांचा माणसात आणि जनावरात अनिर्बंध वापर,त्यःचे निष्काळजीपणे वातावरणात सोडून देणे जंतू पूर्ण मरण्याअगोदर "उष्ण" पडल्यामुळे किंवा "साईड इफेक्ट" होतो म्हणून प्रतिजैविक बंद करणारे महाभाग हे सर्व घटक या सर्व प्रक्रियेला पुढे हातभार लावण्यात कारणीभूत होतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2017 - 2:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

धाग्याचे नाव बदलावे असे वाटते.

मराठीत "अराजक" हा शब्द "शासनाच्या अभावामुळे झालेली अनावस्था" किंवा इंग्लिशमधील "केऑस (chaos)" या अर्थी वापरला जातो.

त्याऐवजी "ताज्या गैरराजकिय घडामोडी" किंवा "राजकिय नसलेल्या ताज्या घडामोडी" असे नाव योग्य होईल.

अमितदादा's picture

18 Nov 2017 - 2:40 pm | अमितदादा

नक्कीच म्हात्रे सर. कृपया योग्य तो बदल करावा, आपल्याला योग्य वाटते ते नाव द्यावं मला तुम्ही सुचवलेलं पहिलं नाव योग्य वाटतेय. धन्यवाद.

सर्वोच्च न्यायालयातील मागील काही दिवसातील घडामोडींवर भाष्य करणारे आजच्या लोकसत्तातील दोन लेख
न्यायालयीन विश्वासार्हतेचा मूळ मुद्दा वळचणीला!

आणि

अस्तित्वहीन सर्वोच्च न्यायालय

Abp

भारतीय तरुणीच्या हातातील फलकाचं मॉर्फिंग, पाकचा बनाव

नवी दिल्ली : एका भारतीय तरुणीच्या फोटोतील मजकूर बदलून तो व्हायरल करणं पाकिस्तानच्या संरक्षण खात्याला चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटरकडून हे व्हेरिफाईड अकाऊण्ट सस्पेंड करण्यात आलं आहे.

कलवप्रीत या भारतीय तरुणीनं भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांचा प्रसार करणाऱ्या एका फलकाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र माथी भडकवण्याच्या हेतूनं त्या फोटोतील मजकूर बदलून पाकिस्तानच्या संरक्षण खात्यानं तो ट्वीट केला.

भारताविषयी प्रेम असल्याचं सांगणाऱ्या कवलप्रीतच्या मूळ फोटोतील मजकूर बदलून भारताचा द्वेष वाटत असल्याचं लिहिण्यात आलं. त्यामुळे मॉर्फिंग केल्याप्रकरणी पाक संरक्षण खात्याचे कान उपटण्यात आले.

मूळ फलक :

“I am a citizen of India and I stand with secular values of our Constitution. I will write against communal mob lynching of Muslims in our country.”

‘मी भारताची नागरिक आहे. मी आपल्या संविधानातील सांप्रदायिक मूल्यांच्या बाजूने ठाम उभी राहते. देशातील मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात मी आवाज लेखणीच्या माध्यमातून उठवणार’ असं कलवप्रीतने लिहिलं आहे.

बदललेला मजकूर :

“I am an Indian but I hate India because India is a colonial entity that has occupied nations such as Nagas, Kashmiris, Manipuris, HyderabadJunagard, Sikkim, Mizoram Goa.”

‘मी भारतीय आहे, पण मला भारताचा तिरस्कार वाटतो. भारतात वसाहतवाद आहे, ज्यात नागा, काश्मिरी, मणिपुरी, हैदराबाद, जुनागड, सिक्कीम, मिझोरम, गोवा अशा प्रदेशांचा समावेश आहे.’

श्रीगुरुजी's picture

19 Nov 2017 - 7:32 pm | श्रीगुरुजी

आपण निधर्मी, मानवतावादी, उदारमतवादी, पुरोगामी, मुस्लिमप्रेमी, मुस्लिमांवर अत्याचार होत असून त्याविरूद्ध लढणारे इ. असल्याची जाहिरात करीत बसलात, तर देशद्रोही व पाकिस्तानी त्याचा कसा गैरफायदा घेतात याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

अमितदादा's picture

20 Nov 2017 - 11:02 pm | अमितदादा

चीन ने आपल्या लष्करामध्ये २०१८ पर्यंत अत्यंत विकसित असे Dongfeng-41 हे Intercontinental Ballistic Missile दाखल करण्याचे नियोजन केले आहे.
याचे वैशिष्ट म्हणजे १२००० किमी पर्यंत असणारी रेंज, १० Mach वेग आणि १० अणुबॉम्ब घेवून जाण्याची असणारी क्षमता हे होय. एकाच वेळी १० अणुबॉम्ब वेगवेगळ्या ठिकाणावर मारा करू शकतात याच क्षमतेमुळे मिसाईल विरोधी यंत्रणाना असे क्षेपणास्त्र शोधून नष्ट करणे अवघड बनते. अर्थात अमेरिकेला लक्ष ठेवून चीन हे विकसित करत असणार यात शंका नाही.
China's New Multi-Nuke Missile Can Target 'Anywhere In The World': Report

एक साध गणित>
पृथ्वी ची त्रिजा ६३०० किमी आहे म्हणजे तिच circumference २*pi*r, म्हणजे साधारण ४०,००० किमी भरेल, एखाद्या गोलावरील (sphere) दोन बिंदू मधील अंतर हे जास्तीतजास्त pi*r असेल म्हणजे २०००० किमी, चिन चे पूर्वेच्या टोकापासून पश्चिमेच्या टोका पर्यंतचे अंतर ५००० किमी आहे. म्हणजे चीन ला १७५०० किमी रेंज चे क्षेपणास्त्र लागेल पृथ्वी वरील कोणत्याही बिंदू ला strike करण्यासाठी (दोन्ही दिशेने). अर्थात चीन चे शत्रू पाहता १२०००-१५००० हे अंतर नक्कीच पुरेसे आहे.
क्षेपणास्त्राची रेंज देताना त्याने प्रवास केलेल्या अंतरापेक्षा पृथ्वी वरील दोन बिंदू मधील अंतर (striking range) देत असावेत असे मी समजतो.

माहितगार's picture

20 Nov 2017 - 11:25 pm | माहितगार

पाच एक हजार वर्षापूर्वीपासून याम्नाया असे नाव दिलेल्या पशुपालक आशिया आणि युरोपात भ्रमण करण्यास सुरवात केली असावी. त्यांच्या DNA चा अभ्यासाकडे गेल्या दोनएक वर्षात अनुवंश आणि पुरातत्व विशेषज्ञांचे लक्ष जाऊ लागले असावे. सायन्स न्यूज मध्ये एक लेख प्रकाशित झाला आहे. संशोधनास अद्याप अजून बराच वाव असला तरी नवी दिशा म्हणून दखल घेणे क्रम प्राप्त असावे. लेखातील विश्लेषण रोचक आहे. खरेतर त्यावर स्वतंत्र लेख मिपावर यावयास हवा. पण वेळे अभावी मला शक्य नाही इतर कुणास शक्य अस्ल्यास जरूर लिहावे.

How Asian nomadic herders built new Bronze Age cultures

अमितदादा's picture

20 Nov 2017 - 11:50 pm | अमितदादा

अर्धा लेख वाचला , उरलेला अर्धा फक्त डोळ्याखालून घातला. लेखात आर्य लोकांचा कुठे ही संबध जोडलेला आढळून आला नाही, भारताविषयी कोणतेही भाष्य नाही. लेख मुख्यतः करून सेंट्रल आणि ईस्ट युरोप, वेस्ट आणि सेंट्रल आशिया ह्या भूभागाबद्दल बोलतो. वाचायचे काही राहिले असल्यास सांगावे.
जाणकारांनी किंवा तुम्ही या पूर्ण लेखाचा सोप्या भाषेत सारांश लिहल्यास वाचायला आवडेल।

मराठी_माणूस's picture

21 Nov 2017 - 10:57 am | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/mumbai-news/extra-governmental-work-to-school-t...

इतर सरकारी कर्मचार्‍यांचा ह्या असल्या कामात सहभाग असतो का फक्त शिक्षकांनाचा ही कामे दिली जातात ?

पुंबा's picture

21 Nov 2017 - 3:17 pm | पुंबा

http://www.thehindu.com/news/national/isro-opens-doors-to-private-sector...

या बातमीचे स्वागत करावे का?

गामा पैलवान's picture

21 Nov 2017 - 9:03 pm | गामा पैलवान

पुंबा,

के कधीतरी अपेक्षित होतंच. गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून इस्रो अग्निबाणांचे भाग (अगदी इंजिनांसकट) खाजगी उत्पादकांकडून बनवून घेत आहे. हेच उत्पादक पुढे बांधणी व चाचणी (= असेम्ब्ली + टेस्टिंग) सेवा देऊ करू लागलेत. फक्त हे ज्ञान अत्याधुनिक नसावं इतकी काळजी इस्रोचे लोकं घेतील.

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

21 Nov 2017 - 4:03 pm | गॅरी ट्रुमन

सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ट्रिपल तलाकवर बंदी घालायचे विधेयक मांडायची शक्यता आहे असे https://timesofindia.indiatimes.com/india/centre-likely-to-introduce-bil... ही बातमी म्हणत आहे. तसे झाले आणि त्या विधेयकाचे भिजत घोंगडे न पडता लवकर कायद्यात रूपांतर झाले तर ते ऐतिहासिक असेल. खोट्या धर्मनिरपेक्षतेला तिलांजली द्यायचे महत्वाचे काम त्यातून सुरू होईल.

गॅरी ट्रुमन's picture

21 Nov 2017 - 4:05 pm | गॅरी ट्रुमन

हा प्रतिसाद ताज्या घडामोडी या धाग्यात लिहायचा होता. तो चुकून इथे आला आहे. हा प्रतिसाद उडविण्यात यावा ही विनंती.

मी ताज्या घडामोडी धाग्यात हा प्रतिसाद लिहित आहे.

मराठी_माणूस's picture

28 Nov 2017 - 10:06 am | मराठी_माणूस

एक वेगळा दृष्टीकोण

https://www.loksatta.com/aurangabad-news/independent-marathwada-state-is...