सदाभाऊ

Primary tabs

Vinayak sable's picture
Vinayak sable in राजकारण
12 May 2017 - 8:41 pm

एकेकाळी शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करणारे सदाभाऊ आज स्वतः सत्ताधारी विशेष म्हणजे कृषिमंत्री झाल्यावर त्यांच्या भूमिकेत झालेला बदल कवी व वक्ते जगदिश ओहोळ यांनी त्यांच्या *सदाभाऊंचा ऊर* या कवितेतून नेमकेपणाने मांडला आहे.

शेतकऱ्याचा जीव घेतेय
त्यानेच पिकवलेली तूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

गोडी लागली सत्तेची
वारं लागलं AC चं
अन चळवळ झाली दूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

भावनिक बोलून
गाजवायचे सभा
अन अश्रूंचा त्यांच्या
सभेत वाहायचा पूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

मातीची नाळ तुटली
की माणूस माणसातनं उठतो
शेतकऱ्यांतला पांडुरंग त्याला
लाल दिव्यातच भेटतो
अन आयुष्यभर लागून राहते
स्वतः ला फसवल्याची हुरहूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

कधीकाळी कुणब्याचं बोलणार तुमी
आता TV वर सरकारवाणी बोलता
तुमचीच जुनी तत्व तुमी
इटी वानी कोलता
शोभत नाही तुमच्या तोंडी
सत्ताधाऱ्यांचा सूर...
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

या मातीशी गद्दारी करणारांना
माती करत नाही माफ
गद्दारांचं भविष्य
माती करते साफ
एका लाल दिव्या पायी
मातीमोल झाला चळवळीचा कोहिनूर
आता भरून कसा येत नाही
शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर

प्रतिक्रिया

सदाभाऊ खोत हे काही पहिलं उदाहरण नाही. बरेच आहेत. पण हे दुर्दैवच. राष्ट्रवादी-काँग्रेस सत्ता असताना बारामतीत ऊस दरासाठी इतकं मोठं आंदोलन करणारी शेतकरी संघटना आता तुरीच्या संकटात का गप्प आहे हे तेच जाणोत.

सदाभाऊ, शेट्टी हे बोगस शेतकरी नेते होते. त्यांच्या कडे शेतीविषयी ना सखोल अभ्यास ना शेतकऱ्यांविषयी तळमळ.
शेट्टी नी तर आंदोलनाच्या जीवावर भरपूर माया कमावली आहे म्हणतात. (७०० एकर का काय? माहिती ऐकीव आहे ).

विशुमित's picture

13 May 2017 - 3:57 pm | विशुमित

सदाभाऊंची तब्येत ठीक नाही आहे म्हणे.
पण शेट्टी आत्मक्लेश करणार आहेत तुरीसाठी. काळजी नसावी.

http://www.loksatta.com/pune-news/swabhimani-shetkari-sanghatana-leader-...

अभिजीत अवलिया's picture

13 May 2017 - 4:18 pm | अभिजीत अवलिया

२ वर्षांपूर्वी तूर महाग झाली म्हणून खूप शेतकऱ्यांनी तूर लावली. परिणामी विक्रमी उत्पादन होऊन भाव पडले. मुळात एवढ्या प्रमाणात तुरीची गरज देशाला होती का?
आता ह्या वर्षी तुरीला भाव नाही म्हणून परत कमी लोक तुरीचे उत्पन्न घेतील आणी भाव वाढू शकतील पुढच्या वर्षी.

मुळात आपल्याकडे कुठल्या पिकाची किती गरज आहे ह्याचा काही अभ्यास होतो का? मला तर वाटते नसेल होत.

विशुमित's picture

13 May 2017 - 4:25 pm | विशुमित

सरकारनेच शेतकऱ्यांना तूर उत्पादन घेण्यासाठी आर्जव केले होते मागच्या वर्षी, असे कोठे तरी वाचले होते. लिंक मिळाली तर डकवतो.

डिमांड सप्लाय चा अभ्यास होत असेल पण पब्लिक डोमेन वर झळकत नाही. तलाठ्यानी पीकपाणी काटेकोर पद्धतीने लावले तर आश्वासक चित्र उभे राहील.

विशुमित's picture

13 May 2017 - 4:31 pm | विशुमित

जालावरती हे सापडले. http://agricoop.nic.in/sites/default/files/Pulses.pdf

याचा काय उपयोग झाला तुम्हाला तर बघा आणि आम्हाला पण समजावून सांगा.

वरुण मोहिते's picture

13 May 2017 - 4:03 pm | वरुण मोहिते

असो खोत आणि शेट्टी ह्यांना लोक भुलले . बोलायचं एक आणि सत्तेत गेल्यावर करायचं एक. आंदोलन सोपी असतात . सत्ता राबवणे कठीण असते . तरी राजू शेट्टी अजून अभ्यासू आहेत हे एक निरीक्षण . बाकी खोत , शेट्टी , महादेव जानकर , ह्यांना चूक झाली हे कळत आहेच पण सत्तेची वाटचाल अशीच असते .

>> अभ्यासू आहेत हे एक निरीक्षण
याचे निकष काय लावता तुम्ही?

प्रत्येक एका आड एक नेता अभ्यासू आहे असे तुमचे म्हणणे असते.

रामदास२९'s picture

1 Jun 2017 - 1:00 pm | रामदास२९

स्वतः राजु शेट्टी पण शरद जोशीन्ची साथ सोडुन स्वार्था तुनच कॉन्ग्रेस च्या मागे लागले होते मग सदाभाउन्ना कसा दोष देता येइल

मराठी_माणूस's picture

1 Jun 2017 - 2:13 pm | मराठी_माणूस

या मातीशी गद्दारी करणारांना
माती करत नाही माफ

हा बाकी भाबडा आशावाद आहे.

गावठी फिलॉसॉफर's picture

13 Feb 2018 - 10:40 am | गावठी फिलॉसॉफर

जिकडे खाऊ तिकडे सदाभाऊ!!