शोध स्तूप आणि स्तव शब्दांचा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
9 May 2017 - 12:48 pm
गाभा: 

अलिकडे मराठी विकिपीडियातील संपादनांवर लक्ष ठेऊन असताना शतपथ ब्राह्मणातील 'स्तूप' या शब्दोल्लेखाचा संदर्भ दिला गेला आणि वगळला गेला. विकिपीडियातील उल्लेख शक्यतो केवळ प्रथम स्रोतावर आधारीत न राहता समिक्षीत ग्रंथांवर आधारीत असणे श्रेयस्कर असते पण बर्‍याचदा बर्‍याच नोंदींची साक्षेपी समिक्षा झालेली नसते त्यादृष्टीने त्यास समिक्षापोकळी म्हणावे असे वाटते.

शतपथ ब्राह्मणातील 'स्तूप' शब्दाचा उल्लेख दोन कारणांनी साक्षेपी समिक्षेस पात्र होतो असे वाटते तो उल्लेख कोणता ते पाहू

देवांचे स्तूप चौकोनी व असुरांचे गोलाकार असत. (शतपथ ब्राह्मण १३.८.२.१.४ ) संदर्भ

(हा संदर्भोल्लेख नंतर लेखातून वगळला गेला आहे. शतपथातला मूळ संस्कृत श्लोक कोणता ते माहित नाही, जाणकारांनी मूळ श्लोक उधृत केल्यास आभारी असेन.)

प्राचीन भारतीय उल्लेखातील असुर या शब्दाभोवतीचा गुंफलेला निगेटीव्ह नरेटीव्ह पाहता किमान प्रथम दर्शनी हे स्पृहणीय नसलेले स्टिरिओटायपींग असल्याचे आणि आजच्या काळात तार्कीककतेच्या कसोट्यांवर घासले असता तार्कीक उणीव असलेले आणि विनोदी वाटते. पण तरीही संस्कृत ग्रंथातील मर्यादीत आणि उशीराने आलेले उल्लेख पाहता, स्तूप शब्द वापरणार्‍या संस्कृत ग्रंथांच्या काल निश्चितीसाठी या शब्दाचा शोध उपयूक्त ठरावयास हवे असे वाटते. दुसरे स्तूपांची उभारणी मुख्यत्वे अशोकाच्या काळानंतर झाली भारतातील तत्पुर्वी अलेक्झांडरचे भारतात आक्रमण होऊन गेल्या नंतर ग्रिक कलांचा प्रभाव पडावयस लागला असावा तर स्तूप हा शब्द अलेक्झांडर पूर्व भारतीय शब्दातूनच तयार झाला असण्याची शक्यता किती कि ग्रिक आक्रमक येऊन गेल्यानंतरच्या इंडोयुरोपीयन प्रभावाने तयार झाला असू शकेल असा प्रश्न मनात येऊन गेला.

संस्कृत विकिस्रोतात स्तूप शब्दाचा शोध घेतला असता प्रथम दर्शनीतरी शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेदातील काही उल्लेखांपलिकडे इतर वेदांमध्ये हा शब्द येऊन गेल्याचे दिसत नाही. (चुभूदेघे) शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेदातही कोणत्या अर्थाने आला आहे ते संस्कृत भाषा जाणकारच सांगू शकतील.

शतपथब्राह्मण, तैत्तिरीयब्राह्मण आपस्तम्ब गृह्यसूत्र व्यतरीक्त मानसारम् नावाच्या संग्रहात स्तूप शब्दाचा मर्यादीत उपयोग झालेला दिसतो आहे. अर्थशास्त्रम् निघण्टुशास्त्रम् , वाचस्पत्यम् मध्ये उल्लेख दिसताहेत पण ते कदाचित शब्दकोश समकक्ष असावेत (चुभूदेघे)

'स्तूप' या वास्तूरचनेचा उपयोग मुख्यत्वे बौद्धधर्मीयांनी केलेला दिसतो. "महान व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी, केस इ. जमिनीत पुरून त्यावर दगड व मातीचा ढिगारा रचत." असा स्तूप आणि चैत्य यांचा उल्लेख सध्या मराठी विकिपीडियात दिसतो आहे. 'स्तूप' शब्दाची निर्मिती वस्तू शब्दावरून पवित्र वस्तू या अर्थानी झाली असेल आणि 'व' या अक्षराचा लोप झाला असेल. तर 'वस्तू ह्या शब्दाचे संस्कृत ग्रंथातील प्राचिनत्व शोधावे लागते' मग तो पुराण काळांपर्यंत मागे गेलेला दिसतो यात महाभारत आणि अग्निपुराणातील उल्लेख महत्वाचे असावेत कारण भवन निर्मितीचे उल्लेख या ग्रंथांमध्ये ठळकपणे येत असावेत. वास्तू शब्दही पौराणिक समकालीन पण कदाचित अजून थोडा जूना पण अधिक व्यापक उपयोग असावा (चुभुदेघे)

युरोपियन भाषांचा मागोवा केवळ stup या चारच अक्षरांवर घेतला तर नॉर्वेजीअन भाषात cliff अथवा स्टीप उतार या अर्थाने आल्याचे दिसते. विषय निघालाच आहे तर stupa या अक्षर समूहाची इंग्रजी विक्शनरीवरील नोंदीची दखल घेण्यासही हरकत नसावी. topos हा शब्द ग्रीक भाषेत literally "place, region, space," या अर्थाने दिसतो. भारतीय भाषातून ग्रीक मध्ये गेला कि ग्रीक मधून भारतीय भाषेत आला माहित नाही पण 'टोपोस'चे 'स्तूप' शी उच्चार साधर्म्य लक्षणीय वाटते त्या शिवाय ग्रीक 'टोपोस' मध्ये अर्थ केवळ प्लेस या अर्थानी आहे त्यात धार्मिक अर्थ सामावलेला नाही ह्याचीही नोंद घ्यावी असे वाटते. topic शब्दाची व्युत्पत्ती शोधताना from Latin Topica, from Greek Ta Topika, literally "matters concerning topoi," "commonplaces," neuter plural of noun use of topikos "pertaining to a common place, of a place, local," from topos "place" असा उल्लेख एटीमऑनलाइनवर मिळाला. तोही दखल घेण्या जोगा वाटतो म्हणजे नुसते प्लेस म्हणण्या सोबत commonplaces असाही त्याचा जवळ जाणारा अर्थ topos शब्दास प्राप्त झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Top या इंग्रजी शब्दाची uppermost part of a visual field ह्या अर्थछटेस peak, summit हे समानार्थी शब्द दिसतात. to-peak पासून Top शब्द आला असेल का हा एक वाईल्ड गेस झाला. एनीवे हे मुद करण्याचे कारण हे की summit या शब्दासही दोन अर्थछटा आहेत एक उंचीवरची जागा आणि आणि gathering of leaders ह्या अर्थाने इंग्रजीतील उल्लेख अर्वाचीन दिसत असलातरी इतर युरोपीअन भाषात केव्हापासून आहे हा वेगळ्या अनुषंगिक अभ्यासाचा विषय ठरावा असे वाटते.

'स्तूप' शब्दाशी सरळ कोणताही संबंध नसलेल्या एका शब्दाने अवांतर लक्ष वेधले ते म्हणजे stove या इंग्रजी शब्दाचे 'विस्तव' या शब्दाशी असलेले उच्चर साधर्म्य. stove शब्दाच्या सध्याच्या प्रचलीत युरोपीय भाषाशास्त्रींच्या व्युत्पत्ती वेगळ्या दिशेने जातात पण फारशा लांब पोहोचत नाहीत त्यापेक्षा विस्तव स्तवन या शब्दांचे साधर्म्य मला व्यक्तिगत पातळीवर जवळचे वाटते ते कदाचित चुकीचेही असेल तरीही. तसेच स्टॉप या इंग्रजी शब्दाची व्युत्पत्तीही त्यांच्या भाषाशास्त्रींना फार दूरवर नेता आल्याचे दिसत नाही. असो.

या धाग्यासाठी चर्चेचे मुख्य विषय म्हणजे; स्तूप शब्द वापरलेले संस्कृत ग्रंथातील श्लोक त्यांचे अर्थ; स्तूप शब्दाची व्युत्पत्ती काय असू शकेल ? स्तूप शब्दाचा वापर भारतीय भाषांमध्ये कोणत्या कालखंडात चालू झाला असावा ? वापर चालू होण्यावरून संस्कृत ग्रंथांच्या कालनिर्णयात काही मदत होण्याची शक्यता असू शकते का ? शतपथ ब्राह्मणातील असुर हा उल्लेख ग्रीकांबद्दल असण्याचीही काही शक्यता असू शकते का ?

अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार

प्रतिक्रिया

कंजूस's picture

9 May 2017 - 5:43 pm | कंजूस

स्तूप या शब्दाची १) व्युत्पत्ती आणि २) त्याचा आकार असा का हे दोन प्रश्न आहेत त्यापैकी प्रथम क्र २ चा माझा एक तर्क आहे. परंतू विकिपिडियाला तर्क अपेक्षित नसतात. क्र १ बद्दल थोडे संशोधन करावे लागेल पण ते संस्कृत ग्रंथांत नव्हे तर उप्र च्या हिंदीच्या तिकडच्या बोली भाषेत मूळ सापडण्याची शक्रता आहे

प्रचेतस's picture

9 May 2017 - 6:52 pm | प्रचेतस

स्तू म्हणजे ढिगारा

माहितगार's picture

9 May 2017 - 8:58 pm | माहितगार

ढिगारा या अर्थाने 'स्तू' हा एकाक्षरी शब्द वापरला गेल्याची काही उदाहरणे उपलब्ध आहेत का ? किंवा इतर काही तर्क उद्भवतो आहे का ? किंवा खाली मोल्सवर्थात सापडलेले 'स्थ' पासूनचे काही शब्द दिले आहेत त्यांच्याशी काही संबंध जोडता येणे शक्य असू शकेल का ?

स्तू नव्हे पण 'स्तर'/'थर', या शब्दात 'लेयर' हा अर्थ येताना दिसतो; मराठीतील 'ठेप'/'थप्पी' उचारणे जवळची वाटतात (इंगिल्श मधील 'स्टेप' उच्चारणही सहजच आठवले-संबंध सुचवतोय असे नव्हे) , 'स्तान/स्थान/स्थल' भौगोलीक प्रदेशाचे निर्देश करते तर 'स्तंभ' मधील उल्लेख रचनेचा अर्थ ध्वनीत होताना दिसतो. असाच मालमत्ते संबंधाने 'स्थावर' हा शब्द आपण मराठीत वापरतो तो बहुधा 'स्थायी' समकक्ष असावा. स्थापना हाही जवळचा वाटतो.

मोल्सवर्थात 'स्थ' वरुनचे खालील शब्दही नमुद केलेले दिसतात

* स्थंडिल (p. 506) sthaṇḍila n S A leveled, squared, and somewhat raised piece of ground, as prepared for a sacrifice &c., an altar.
* स्थाणु (p. 506) sthāṇu m n S A pillar or post. Ex. स्थाणूचे ठायीं दिसे चोर ॥. 2 A stake, a long peg, a naked and bare trunk: also the trunk of a tree generally.
* स्थाता (p. 506) sthātā a S That stands, stays, rests, is; that occupies place, or that maintains a state.

प्रतिसादांसाठी धन्यवाद

माहितगार's picture

10 May 2017 - 8:54 am | माहितगार

सतह हा हिंदी शब्द 'सत' या अक्षरांपासून असून भौगोलीक वैशिष्ट्यासाठी वरच्या बाजूचे आवरण या अर्थाने वापरला जातो.

माहितगार's picture

9 May 2017 - 8:36 pm | माहितगार

विकिस तर्कसुसंगत दुजोरा मिळालेले संदर्भ लागतात ते मिळतात कि नाही ते काळाच्या ओघात ठरेल; आपल्या व्यक्तिगत तर्कांची मनमोकळे पणाने मिपावर चर्चा करण्यास हरकत नसावी.

कंजूस's picture

9 May 2017 - 5:46 pm | कंजूस

*शक्यता*

स्तुपाचा आकार - बुद्धाच्या कुशिनगरच्या महानिर्वाणानंतर बुद्धाचे जिथे अधिक वास्तव्य होते त्या शहरातले अनुनायी आले आणि अस्थि, अथवा इतर काही केस,दात,नखे वगैरे मागू लागले त्यात वाद झाला. निर्णय होईपर्यंत तो ढिगारा विटांनी झाकून ठेवण्यात आला. भोवती विटांचीच रचरेली कच्ची भिंत ठेवण्यात आली. मग निर्णय होऊन ठेव घेऊन अनुनायी गेले. अशोकाने बुद्ध धर्म घेतला तो काळ यानंतर दोनअडिचशे वर्षानंतरचा. तोपर्यंत जुनीच रचना लोकांच्या डोळ्यासमोर उदाहरण म्हणून असेल . अशोकाच्या काळात याच रचनेला पक्के बांधकामात परिवर्तित केले असावे. गोल स्तुप,भोवती कुंपण,कट्टा. स्तुपावरची हर्मिका,पुढचे तोरण हे नंतर सुचलेले सुशोभिकरण असेल. गांधार (अफगाणिस्तान) प्रांतातल्या काही बुद्ध मूर्ती डोंगरात होत्या त्यावर इजिप्त मंदिरांतील शिल्पांचा प्रभाव दिसतो. त्याच न्यायाने बुद्धाचे शरीरावशेष ठेवायचे झाले असते तर कारागिरांनी पिरामिड्स बनवले असते. तसे झाले नाही. स्तुप ही परंपरेने प्राप्त अशी रचना ठरली तीच वापरली गेली.

त्याकाळी तिकडच्या बोली भाषेत ढिगारा यास काही शब्द असेल त्याचेच स्तुप हे रूप असेल. हे सर्व संस्कृत लेखन/काव्यात असण्याचे काहीच कारण दिसत नाही.

दशानन's picture

9 May 2017 - 10:58 pm | दशानन

या प्रतिसादाशी सहमत!

माहितगार's picture

9 May 2017 - 11:00 pm | माहितगार

पुस्तक डॉट ऑर्ग वर खालील प्रमाणे एक नोंद दिसते आहे.

थूआ : पुं० [सं० स्तूप; प्रा० थूप, थूव] १. मिट्टी आदि का ऊँचा टीला। ढह। २. गीली मिट्टी का लोंदा। धोंधा। ३. मिट्टी का वह ढूह या मेंड़ जो सीमा आदि सूचित करने के लिए बनाई जाती है। ४. गीली मिट्टी का वह ढेर या लोंदा जो ढेकली आदि की लकड़ी पर भार के रूप में रखा जाता है। ५. किसी गीले पदार्थ का गोलाकार ढेर। जैसे—पीने के तमाकू का थूआ जो तमाकू की दुकानों पर रहता है। ६. वह बोझ जो कपड़े में बँधी हुई राब के ऊपर उसकी जूसी निकालने के लिए रखा जाता है।(यह शब्द केवल स्थानिक रूप में प्रयुक्त हुआ है)

माहितगार's picture

10 May 2017 - 1:43 pm | माहितगार

कॅप किंवा हॅट साठी भारतीय भाषात वापरला जाणारा टोप/टोपी शब्दाचे इंग्रजीतील Top शब्दाशी उच्चार साधर्म्य आहे पण आंजावरील पहिल्या शोध प्रयत्नात तरी Topi शब्द टोपी या अर्थाने ग्रीक अथवा अन्य युरोपीय भाषात आल्याचे दिसले नाही. दाते-कर्वे कोश मात्र टोपी शब्दाची एक व्याख्या 'युरोपियन लोकांचे शिरस्त्राण' असे देताना दिसतो मात्र त्याचा त्यांनी संदर्भ कुठून घेतला ते समजत नाही. दाते-कर्वे कोश टोप म्हणजे संस्कृतात स्तूप असा अर्थही देताना दिसतो पुन्हा नेमके कोणते संदर्भ त्यांनी वापरले हे प्रश्न शिल्लक राहतात. ( संदर्भ -ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवरील दाते कर्वे शब्दकोश)

भारतात मात्र उत्तर ते दक्षीण पूर्व ते पश्चिम सर्व भाषात टोप/टोपी शब्द प्रचलीत झाल्याचे दिसतात. यातील टोपीचे बंगाली लेखन 'टूपी' असे केले जाते आहे ते उल्लेखनीय आहे. (संदर्भ इंग्रजी विक्शनरी)

अडिच हजार वर्षांपुर्वीचे साहित्य/लेखन/शिल्प हे खरे व्युत्पत्ती दाखवणारे ठरेल. इजिप्तच्या काळात असे काही दिसत नाही.

व्ही. डी. सी.'s picture

10 May 2017 - 9:17 am | व्ही. डी. सी.

बुद्धविचार आणि विश्‍वशांती

तथागत बुद्ध हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातही सर्वांत श्रेष्ठ व्यक्‍ती आहेत. इंग्लंडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठाने मागील 10 हजार वर्षांमधील अशा ‘टॉप 100’ जगातील विश्‍वमानवांची यादी तयार केली, ज्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केलीत, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. इतिहासातील सर्वाधिक महान व्यक्‍तिमत्त्व म्हणजे तथागत बुद्ध होय.
आज सर्वच खंडांत भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (49टक्के) लोकसंख्या ही बौद्धधर्मीय आहे. भारतातील कोट्यवधी हिंदूधर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही 2.3 अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (2.3 अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचे धम्मविचार हे सार्‍या जगाला विश्‍वशांतीचा संदेश देणारे आहे. बुद्ध धम्म म्हणजे काय, हे जाणून घेण्यासाठी आपणास भगवान बुद्धांनी अंगीकारलेला जीवनव्यवहार आणि त्यांनी मांडलेले धम्मतत्त्वज्ञान या दोन्ही बाजू नीट समजून घ्याव्या लागतात. प्रज्ञा, शील आणि करुणेचा संदेश घेऊन भगवान बुद्ध अवतरले. जगाच्या पाठीवर अनेक बौद्ध देश आहेत. ही संख्या चाळीसच्या आसपास आहे. बुद्धाचा विचार प्रमाण माणून विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगावर राज्य करता येते हे काही देशांनी दाखवून दिले आहेच.
आजच्या ग्लोबल दुनियेत वावरताना आजच्या पुरोगामी तरुणांनी भगवान बुद्धांचा अष्टांगमार्ग, बुद्धांचा अनात्मवाद आणि त्यांचा अखेरचा संदेश या तीन गोष्टींकडे अत्यंत सम्यकपणे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. आज आपण अशा एका जमान्यात उभे आहोत की, जिथे प्रज्ञा, शील आणि करुणेचा लवलेशही दिसत नाही. आपण अशा एका स्पर्धेच्या युगात उभे आहोत की, जिथे माणसांच्या घामाचे आणि रक्‍ताचेही मोल होत नाही. आपण अशा एका सामाजिक आणि राजकीय वास्तवाला सामोरे जात आहोत की, जिथे माणूसपण हरले आणि पैसा जिंकला आहे. 1991 नंतर तर भारतीय समाज अनेक अंगांनी बदलला आहे.
जागतिकीकरणात जात संपेल असे अनेकांना वाटत होते; पण वास्तवात तसे झाले नाही. उलट जात अधिक प्रखर होत चालली आहे. एकीकडे जात नष्ट करा, माणूस जे कर्म करतो त्यावर त्याची श्रेष्ठता अवलंबून आहे, असे बुद्ध सांगत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी भारतीय संविधानाच्या रूपाने एक कृतिशील कार्यक्रम दिला; पण दुसरीकडे जात मात्र संपली नाही. आज जागतिकीकरणाचा पुरस्कर्ता वर्ग नवसाम्राज्यशाहीचे गोडवे गात-गात असे सांगत आला आहे की, जागतिकीकरण एकदा स्थिर झाले की, पृथ्वीवरच्या प्रत्येक मनुष्यप्राण्याला अन्‍न, वस्त्र आणि निवारा या गरजा सहजपणे पूर्ण करता येतील. सर्वांना शिक्षणाचा आणि नोकरीचा अधिकार प्राप्‍त होईल, सर्वांना स्वच्छ हवा, स्वच्छ प्रकाश मिळेल, दारिद्य्रनिर्मूलन होईल, जात नष्ट होईल, समानतेचे वारे वाहतील, वस्तू माणसांपर्यंत जातील आणि प्रत्येकाला स्वत:च्या मनाप्रमाणे स्वत:चा विकास घडविण्याचे स्वातंत्र्य असेल. नवसाम्राज्यवादाने ही आश्‍वासने जगभर पसरविली; पण वास्तवात तसे झाले आहे का?
आपल्या आजूबाजूच्या सामाजिक व राजकीय घडामोडींचा उदय आणि त्यांचा अस्त याकडे पाहण्याची वैज्ञाननिक द‍ृष्टी बौद्धदार्शनिकातले ‘असंग’ आपल्याला देतात. आधुनिक विचारांवर स्वार झालेल्या या नव्या पिढीने बुद्धांच्या सम्यकद‍ृष्टीने भावतालच्या जगाकडे, त्यातील घडामोडींकडे आणि प्रश्‍नांकडे पहायला पाहिजे. बौद्धदार्शनिक असंग, बुद्धांचा अनात्मवाद, त्यांचा कर्मसिद्धांत आणि अखेरचा संदेश हे समजून घेतले तर आजूबाजूचे भौतिक जग नीट कळू लागते. ‘असंग’ आपणास सांगतात की या जगातील सर्व वस्तू या हेतूंच्या आणि आवश्यकतांच्या संयोगातून तयार होत असतात, त्यांना त्यांचे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व नसते. जेव्हा हा संयोग विसर्जित होतो तेव्हा त्याचा परिणाम म्हणून त्या वस्तूचा विनाश ठरलेला असतो.
बौद्ध धम्म म्हणजे परिवर्तनशीलता आहे. हा धम्म स्थितिशील नसून नित्यनूतन आहे, गतिशील आहे. हा धम्म माणसाला स्वातंत्र्य देतो आणि समतेने वागवितो. म्हणूनच बौद्ध धम्म म्हणजे माणसाच्या सर्जनशीलतेला जन्म देणारी, ताजगी भरलेली रोजची नवी पहाट आहे. ही पहाट अधिक सुंदर आणि सार्थ करायची असेल तर आपल्याला अधिक व्यापक असे कृतिकार्यक्रम हाती घ्यावे लागतील.
बुद्धविचार म्हणजे माणसाचा आतला उजेडच आहे. त्याला सतत प्रकाशमान ठेवणे म्हणजेच ‘अत्त दीप भव’ आहे. आपले जीवन प्रकाशमान होण्यासाठी बुद्धांनी सांगितलेले अष्टांगमार्ग आपण पुन्हा-पुन्हा आठवायला हवेत. योग्य ज्ञान, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, योग्य कृती, योग्य उपजीविका, योग्य प्रयत्न, योग्य जागरूकता आणि सम्यक समाधी म्हणजे योग्य एकाग्रता, भगवान बुद्धांनी सांगितलेले हे अष्टांगमार्ग जीवनमार्ग आहेत. पण आज आपण अशा एका वळणावर उभे आहोत की जो रस्ता प्रचंड संपत्तीच्या निर्मितीचा, अमाप उपभोगाचा, परस्परांच्या स्पर्धेचा आणि विनाशाच्या, वैराच्या दिशेने जाणारा आहे. एक बुद्धाचा मार्ग ज्या रस्त्याने गेले तर माणूस बनता येईल आणि दुसरा प्रचंड स्पर्धेचा मार्ग, ज्या रस्त्याने गेले तर गुलाम बनता येईल. तेव्हा आपल्यासमोरचे आजचे मोठे आव्हान म्हणजे जागतिक भांडवली व्यवस्थेत गुलाम म्हणून वावरताना सम्यक माणूस कसे व्हायचे? सम्यक माणूस बनायचे असेल तर युद्धाची नव्हे तर बुद्धाचीच वाणी ‘जीवनमंत्र’ बनवावी लागेल.
शिक्षण काय असते, हे भारतीय समाजाला बुद्धाने सांगितले. पर्यावरणशास्त्र, निसर्ग आणि पाण्याचे महत्त्व याविषयी मूलभूत विचार बुद्ध वाङ्मयात पहायला मिळतो. स्थापत्यशास्त्र, शिल्पकला आणि लेणी या ऐतिहासिक देणग्या आपल्याला बुद्धांनीच दिल्या. शेती आणि शेतीच्या अवजारांचा शोध, विशेषत: नांगराचा शोध हा बुद्धकाळातलाच आहे. म्हणूनच या देशात वॉटर मॅनेजमेंट आणि अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंटचे पहिले उद‍्गाते बुद्ध आहेत, याकडे आधुनिक शिक्षण घेणार्‍या तरुणांनी दुर्लक्ष करून कसे चालेल? बुद्ध हे जसे शिक्षण आणि संस्काराचे प्रणेते आहेत तसेच ते समग्र सांस्कृतिक आणि राजनैतिक घडामोडींचे भाष्यकार तत्त्ववेत्तेही आहेत. म्हणून आजच्या पिढीने अंत:करणापासून बुद्धविचार समजून घ्यायला हवेत.

माहितगार's picture

10 May 2017 - 1:15 pm | माहितगार

उपरोक्त प्रतिसाद स्वतंत्र लेखास यूक्त असा खूप मोठा वाटतो आहे, प्रतिसाद लेखकाची हरकत नसल्यास दुसर्‍या स्वतंत्र धागा लेखात स्थानांतरीत करुन दिला जाऊ शकेल का ?

व्ही. डी. सी.'s picture

10 May 2017 - 9:22 am | व्ही. डी. सी.

स्तूप हे श्रमण संस्कृतीतून चालत आलेले मृतांचे थडगे, बाकी काहीही नाही.

माहितगार's picture

10 May 2017 - 1:08 pm | माहितगार

@ व्ही. डी. सी. धागा लेख चर्चेचा मुख्य विषय

१) स्तूप शब्दाची व्युत्पत्ती काय काय असू शकते? त्यातील कोणता तर्क अधिक तर्कसुसंगत वाटतो आणि का ?

१.१) स्तूप हा शब्द इतर काही अर्थाने आलेला असल्यास तत्संबंधी मूळ संदर्भ श्लोक आणि अनुवाद

२) स्तूप हा शब्द नेमका केव्हा पासून प्रचलीत झाला असा आहे. म्हणजे जसे की, स्तूप हा शब्द गौतम बुद्ध काळाच्या पुर्वी पासून उपयोगात होता का ? की गौतम बुद्ध नंतर पण अलेक्झांडर पूर्व काळापासून उपयोगात आला ? की अलेक्झांडर नंतर पण सम्राट अशोकपूर्व काळापासून उपयोगात आला ? कि स्तूप शब्दाचा उपयोग सम्राट अशोकाच्या काळानंतर चालू झाला ?

३) स्तूप हा शब्द वापर केव्हा पासून चालू झाला हे नेमके पणाने समजले तर त्याचा इतर ग्रंथांच्या काल निर्णया बद्दल विचार करणे शक्य होऊ शकेल का ?

व्ही. डी. सी.'s picture

10 May 2017 - 10:03 am | व्ही. डी. सी.

What is stupa?

A buddist monument, generally of a dome-shaped form, originally erected over sacred relics of the buddha and at places consecreted as yhe scenes of his acts. Various matrials, such as clay, brick, carved stone, and wood are used in its construction.

माहितगार's picture

10 May 2017 - 1:12 pm | माहितगार

धागा लेख चर्चेचा विषय स्तूप म्हणजे काय असते इतपत मर्यादीत नाही, स्तूप शब्दाची तर्कसंगत व्यूत्पत्ती काय असू शकते असा आहे.

व्ही. डी. सी.'s picture

10 May 2017 - 10:18 am | व्ही. डी. सी.

स्तूप :

एक बौद्ध धर्मीय घुमटाकार समाधिस्थान-पूजास्थान वास्तु- प्रकार. स्तूप ही मुख्यत्वेकरून बौद्ध धर्मीयांची वास्तुरचना आहे. जैन धर्मीयांनीही काही स्तूप बांधलेले असले, तरी बुद्धाचे परिनिर्वाण दर्शविणारी वास्तू म्हणून बौद्ध धर्मीयांत स्तूप एक आदरणीय वास्तू ठरली आहे. स्तूपाची कल्पना मृतावर रचलेल्या मातीच्या ढिगार्‍यावरून उत्स्फूर्त झाली असावी, असे मानले जाते.

रूवनवेली स्तूप, अनुराधपुर, श्रीलंका.रूवनवेली स्तूप, अनुराधपुर, श्रीलंका.बौद्ध धर्मीयांनी बुद्धपरिनिर्वाणाशी स्तूपवास्तूचा संबंध लावल्याने जेथे जेथे बुद्ध धर्म प्रचलित होता, त्या त्या प्रदेशात स्तूप सापडतात. भारतात, त्याचप्रमाणे श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, जावा, सयाम, तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान इ. ठिकाणी बौद्ध स्तूप आणि बौद्ध अवशेष सापडलेले आहेत. बौद्ध धर्माची उत्पत्ती आणि प्रसार भारतात झाल्याने भारतीय स्तूप सर्वांत प्राचीन आहेत. सम्राट अशोकाने निरनिराळ्या पवित्र बौद्धस्थळी ८४,००० स्तूप बांधल्याचा उल्लेख बौद्ध वाङ्मयात मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच छोटे छोटे स्तूप धर्मकृत्याचाच एक भाग आहे, अशी भाविकांत समजूत झाल्याने अनेक ठिकाणी असे शेकडो स्तूप बांधलेले आढळून आले आहेत. भारतात मौर्य कालापासून ( इ. स. पू. तिसरे शतक ) ते इ. स. बाराव्या शतकापर्यंत स्तूपांची बांधणी होत होती. पुढे त्यात खंड पडला आणि पुन्हा विसाव्या शतकात काही ठिकाणी त्यांची नव्याने बांधणी झाली व काही जीर्णशीर्ण झालेल्या स्तूपांची पुनर्बांधणी करण्यात आली.

स्तूपाची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यांचे विटांत बांधलेले प्रतिवेष ( दगडबंदी ) घुमट हे पूर्णतः अर्धवर्तुळाकार असून ते वर्तुळाकार पायावर बांधलेले आहेत. चौथर्‍यावर बांधलेल्या या भरीव घुमटाला ‘अण्ड’ अशी संज्ञा दिली जाते. त्याचा अश्मास्थीवरील छत्रीवजा चबुत्रा ठेंगणा असून त्याभोवती कठडा वा वेदिका कुसू व खोबणीद्वारे एकत्र सांधलेल्या असतात. तिच्या मध्यावर एक स्तंभ असून त्यावर ‘ छत्र ’ असते. स्तूपा-भोवती ‘ प्रदक्षिणापथ ’ असतो आणि त्याभोवती कुंपण ( वेदिका ) असते. स्तूपावर पेटीसारखे आसन आणि त्यावर छत्र तयार केलेले असे. हे सम्राटाचे लक्षण होय.

स्तूपांच्या रचनेतील वैशिष्ट्यांवरून त्याचा काल सर्वसाधारणपणे ठरविता येतो. आधीच्या कालातील स्तूपाचे अण्ड बसके, तर नंतरच्या कालातील अण्ड जास्त उंच आढळून येतात. त्याचप्रमाणे उत्तरकालातील स्तूप अनेक चौथर्‍यांवर बांधलेले व अनेक छत्र असलेले आढळतात. पूर्वकालातील स्तूप साध्या बांधणीचे, तर उत्तरकालातील स्तूप नक्षीने सजविलेले असल्याने वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. उत्तरकालातील भारताबाहेरील प्रदेशांतील स्तूप त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण उंच निमुळत्या छत्रावलीमुळे काहीसे वेगळे वाटतात.

भारतातील पिप्रावा ( उत्तर प्रदेश ) व वैशाली ( बिहार ) येथे सापडलेले स्तूप बुद्धसमकालीन असावेत, असे एक मत आहे. सांची, सारनाथ आणि तक्षशिला येथील धर्मराजिका स्तूप अशोकाने प्रथम बांधले अशी परंपरा सांगते. सांचीचा स्तूप भव्य आहे; परंतु याची डागडुजी, विस्तृतीकरण व प्रवेशद्वाराची बांधणी शुंगकालात झाली. जयपूरजवळील वैराट येथेही मौर्यकालीन स्तूपाचे अवशेष मिळाले आहेत.

मध्यभारतातील भारहूत, सांची तसेच बोधगया, कुमरहार येथील अपोत्थित स्तूपांचे अवशेष उत्कृष्ट शिल्पांसाठी प्रख्यात आहेत. दक्षिणेतही अमरावती, नागार्जुनकोंडा, जग्गय्यपेट, घण्टाशाला, गुडिवाडा, भट्टिप्रोळू येथील स्तूपावशेष अपोत्थित शिल्पासाठी प्रख्यात आहेत. यांचा काल इ. स. पू. पहिले शतक ते इ. स. तिसरे शतक असा असून वैशिष्ट्यपूर्ण बांधणी, उत्कृष्ट मूर्तिशिल्प व शुद्ध चुन्याचा वापर यांमुळे ते प्रख्यात आहेत. ते अनेक चौथर्‍यांवर बांधलेले, अनेक निमुळत्या छत्रांचे व कमी परिघाच्या अनेक अण्डांचे बांधलेले आढळतात. गांधार स्तूपावर ग्रीकांश वास्तूशैलीची छाप आढळते. बुद्ध-बोधिसत्त्वादिकांच्या अनेक मूर्ती यांच्याशी संलग्न आहेत. पेशावरजवळील शाहजीकी ढेरी येथील कनिष्काचा स्तूप प्रख्यात आहे. कुशाणकालीन जैन स्तूपाचे अवशेष मथुरेस सापडले आहेत. सारनाथ येथील धमेख ( धर्माख्य ) स्तूप त्याच्या उंच अण्डाबद्दल व उत्कृष्ट कोरीव कामाबद्दल प्रसिद्ध असून तो गुप्तकालीन आहे.

बृहद्भारतातील स्तूप अनेक चौथरे व निमुळत्या छत्रावलीमुळे प्रसिद्ध आहेत. तिबेट, नेपाळ, म्यानमार, सयाम, कंबोडिया व इंडोनेशियात असे स्तूप असून ते बहुधा गुप्तकालानंतरचे आहेत. नेपाळमधील पाटणचा स्वयंभूनाथ स्तूप, श्रीलंकेमधील ( अनुराधपुर ) थूपाराम डागोबा, रूवनवेली इ. स्तूप आणि जावामधील बोरोबूदूरचा स्तूप उल्लेखनीय आहेत.

बुद्धाचे विचार, त्याकाळी असलेले निरनिराळे तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान याचा सम्यक विचार करून समाज,देव,कर्म आणि धर्म यांतून एक चांगले भक्कम ज्ञान जगासमोर आणले ते पूर्णपणे वस्तुनिष्ठ होते यात शंकाच नाही. हिंसा/अहिंसेबद्दलही दोन टोकाचे गट होते त्यावेळी. त्याचे अवडंबर माजवले नाही हे विशेष.

स्थापत्यशास्त्र, शिल्पकला आणि लेणी या ऐतिहासिक देणग्या आपल्याला बुद्धांनीच दिल्या. शेती आणि शेतीच्या अवजारांचा शोध, विशेषत: नांगराचा शोध हा बुद्धकाळातलाच आहे. म्हणूनच या देशात वॉटर मॅनेजमेंट आणि अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंटचे पहिले उद्गाते बुद्ध आहेत, याकडे आधुनिक शिक्षण घेणार्या तरुणांनी दुर्लक्ष करून कसे चालेल?~~~~हे कशावरून ते कळले नाही.

माहितगार's picture

10 May 2017 - 2:36 pm | माहितगार

etymonline.com वर PIE *teuk- from root *teue- चा अर्थ "to swell" दिला आहे, thigh, tumulus, tomb असे शब्द त्यात येतात. या दुव्यावरील संशोधन पेपरात (PDF फॉर्मॅट) तर PIE *teuk- from root *teue चा संबंध तर प्रोटो वर्ल्ड लँग्वेजशी लावण्याचा प्रयत्न दिसतो.

टोंब सोबत थडगे या मराठी शब्दाचाही शब्द अभ्यासासाठी विचार व्हावयास हवा असे वाटते.

व्ही. डी. सी.'s picture

10 May 2017 - 10:45 pm | व्ही. डी. सी.

थुपो मूळ पाली / प्राकृत शब्द आणि त्याचे संस्कृतीकरण स्तूप असे आहे. स्तूप या शब्दाची संस्कृत मध्ये व्युत्पत्ती मिळणे कठीण आहे. पाली / प्राकृत भाषेतच याची व्युत्पत्त्ती मिळू शकेल.

माहितगार's picture

11 May 2017 - 6:35 pm | माहितगार

तसे पाहता जमीन, जागा, 'शेत', 'शीते', ते शेती आणि धान्य विषययक अर्थांनी अनेक भाषातून येणारा सिता शब्द 'सत' या दोन अक्षरांचा वापर प्राचीन ठरवत असावा -काही उदाहरणे आधीच्या प्रतिसादातून दिली आहेत {संदर्भ) त्यामुळे स्तूप आणि आपण म्हणता तसे थूपो या शब्दांच्या वापराच्या कालनिर्णयासाठी अधिक अभ्यासपूर्ण संशोधन होण्यास वाव असावा असे वाटते.

बाकी थुपो शब्दाचा वापर असलेला बेडसे लेणितील शिलालेखाचा प्रचेतस यांचा दुसर्‍या धाग्यावरील एक प्रतिसाद रोचक आहे.