अनवट किल्ले ४ : चहाडघाटाचा रक्षक काळदुर्ग (Kaldurg )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
21 Apr 2017 - 6:09 pm

आतापर्यंत पाहिलेले किल्ले बलदंड आणी सामरीकद्रुष्ट्या महत्वाचे आहेत. पण आज आपण माहिती घेत असलेला काळदुर्ग हा तुलनेने कमी महत्वाचा किल्ला म्हणावा लागेल. पालघरच्या पुर्वेला समुद्राला संमातर उत्तर दक्षिण अशी एक डोंगररांग आहे. या रांगेत तीन किल्ले आहेत, असावा, काळदुर्ग आणि
तांदुळवाडी. हि डोंगररांग घनदाट वनश्रीने नटलेली आहे, ईथे किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी पाझर तलाव अशी रचना आहे. या गडाची उंची ३५० मी. आहे.
आज आपण जाणार्‍या काळदुर्ग हा किल्ला पालघर - मनोर- वाडा या रस्त्यावर असलेल्या चहाड घाटावर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला आहे. या भागात असलेल्या सागवानी झाडांची तोड करून जहाज बांधणीसाठी त्याची वहातुक चालायची , त्यावर देखरेख करण्यासाठी या किल्ल्याची उभारणी झाली असावी.
ईतिहासात डोकावले असता, हा किल्ला माहिमच्या बिंब राजाकडे होता. याची उभारणी बहुतेक शिलाहारानी केली असावी. शिवकाळात हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात असावा. पुढे संभाजी रांज्याच्या काळात हा किल्ला मराठ्यांनी घेतला.
काळदुर्ग ह्या किल्ल्याला काळमेघ, नंदिमाळ अशीही नावे आहेत.
इथे यावयाचे झाले तर दोन मार्ग आहेत. १) मुबंई - अहमदाबाद धावणार्या पॅसेंजर पालघरला थांबतात किंवा विरार - डहाणु लोकलने पालघरला उतरावे.
किल्ला जरी पुर्वेला असला तरी पालघर पश्चिम हुन मनोर किंवा वाडाकडे जाणार्‍या बस किंवा खाजगी जीप पकडायच्या व वाघोबा देवस्थान हा स्टॉप
सांगायचा. चहाड घाटात हे मंदिर आहे. इथे मांकडाचा प्रचंड सुळसुळाट आहे.
२) स्वताची गाडी असेल तर विरार हून अहमदाबादच्या दिशेने निघाल्यानंतर मस्तान नाक्यापाशी गाडी डावीकडे मनोर रस्त्याला वळवायची आणी चहाड घाटामधे वाघोबा मंदिरापाशी थांबायचे.
kl1
या रस्त्याने जाताना किल्ल्याचे दर्शन होते, तेंव्हा शंकराच्या पिडिसमोर बसलेल्या नंदीसारखा आकार दिसतो, कदाचित यामुळेच याचे नाव नंदिमाळ पडले
असेल.
kl2
वाघोबा देवस्थान हे छोटे मंदिर आहे. जंगल्यातल्या खिंडीत अशी व्याघ्रस्थाने दिसतात, उदा. अशेरी, हरिश्चंद्रगड.
kl3
मंदिराच्या मागे हा पाण्याचा हातपंप आहे. हवे असेल तर पाणी या ठिकाणी भरुन घेतलेले चांगले कारण गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. ठीक याच्या जवळुन चढायला सुरवात करायची हे लक्षात ठेवायचे. डाव्या, उजव्या वाटा सोडून सरळ चढत रहायचे. शक्य झाल्यास एखादा स्थानिक वाटाड्या घ्यावा म्हणजे चुकण्याची शक्यता नाही तसेच कमी वेळात किल्लाही पाहून होतो. साधारण पाउण ते एक तासात आपण एका सपाटीवर पोहचतो.
kl3
इथे किल्ला डाव्या हाताला किंवा पुर्वेला दिसत असतो, जर तासाभरात सपाटी आली नाहीतर वाट चुकली असे समजावे.
kl2
पठाराजवळुन दिसणारा माथा.
या पठारावरून सरळ चालात राहिल्यानतंर एक वाट सरळ जाते तर एक वाट डावीकडे चढाला लागते, या डाव्या वाटेने चढण्यास सुरवात करायची कि अर्ध्या तासात एका छोट्या सुळक्यासारख्या दगडाजवळ आपण पोहचतो,
kl6
जणु हा नैसर्गिक बुरुजच. इथे थोड्यावेळ थांबुन आजुबाजुचा नजारा बघायचा. घाटातून अंखड गाड्यांची वर्द्ळ चालू असते. इथून पंधरा वीस मिनीटात आपण गडमाथ्यावर पोहचतो.
kl7
नैसर्गिक बुरुजापासून एखद्या सुळक्यासारखा दिसणारा कातळमाथा.
kl8
माथ्याजवळ आलो कि आधी हे कड्यालगत कोरलेले पाण्याचे टाके दिसते. माथा म्हणजे चौकोनी कातळ आहे. याचे पायर्‍यासारखे दोन भाग पडतात. आपला प्रवेश आधी खालच्या माची वर होतो.
kl9
इथे एक मोठ टाक कोरलेल आहे तसेच काही खळगे आहेत. या खळग्याजवळुन एक वाट उतरते,
kl11
या वाटेने उतरल्यास एका भग्न शिवमंदिराजवळ आपण येतो. हे आहे मेघोबाचे मंदिर. इथे शिव पिंड, नंदी व इतर काही मुर्त्या दिसतात. उत्तर कोकणातला पहिला पाउस इथे पडतो म्हणुन हा आहे "मेघोबा".
kl13
हे पाहुन कातळ कोरीव पायर्‍या चढून आपण येतो सर्वोच्च माथ्यावर. किल्ला चढायला एकंदर तास दिड तास लागतो आणि माथ्यावर विशेष अवशेष नसले तरी इथून दिसणार्‍या द्रुष्याने सर्व कष्टांचा विसर पडतो.
इथेही एक कोरडे टाके आहे. गडावरुन विस्त्रूत परिसर दिसतो. उत्तरेला असावा किल्ला, ईशान्येला अशेरी, पुर्वेला कोहोज आणि सुर्या नदी, आग्नेयेला टकमक , दक्षिणेला तांदुळवाडी, तर पश्मिमेला पालघर शहर दिसते. हवा स्वच्छ असेल तर समुद्राची रेघही दिसेल, तर वायव्येला देवखोप पाझर तलाव दिसतो.
kl87
देवखोप पाझर तलाव व मागे काळदुर्ग
गडाचा एकंदर चिंचोळा माथा विचारत घेता हा फार महत्वाचा किल्ला नसणार, फक्त निरीक्षणाचे ठाणे असणार असा अंदाज बांधता येतो. दोन दिवसाची सवड असेल तर, या भागातले काळदुर्ग, असावा व तांदुळवाडी असे तीनही किल्ले पहाता येतील.
kl56
काळदुर्ग किल्ल्याच्या परिसराचा नकाशा ( किल्ल्यावर विशेष अवशेष नसल्याने गडमाथ्याचा नकाशा दिलेला नाही)
(टिपः- या भटकंतीचे मी काढलेले फोटो सापडत नसल्याने सर्व फोटो आंतरजालावरुन साभार)
संदर्भ ग्रंथः-
१ ) दुर्गसंपदा ठाण्याची- सदाशिव टेटविलकर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध - सतीश गुरुसिध्द अक्कलकोट
३ ) ठाणे जिल्हा गॅझेटिअर
४ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

21 Apr 2017 - 7:08 pm | यशोधरा

सुरेख!

प्रचेतस's picture

21 Apr 2017 - 8:43 pm | प्रचेतस

तपशीलवार लिहिलंय.
ही मालिका खूप छान होतेय.

कामणदुर्ग उर्फ कामण्या वेगळा ना?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2017 - 7:42 am | अत्रुप्त आत्मा

प्लस वण टू आगोबा.

दुर्गविहारी's picture

22 Apr 2017 - 10:33 am | दुर्गविहारी

कामणदुर्ग वेगळा आहे. तो वसई जवळ आहे. येत्या आठवड्यात आसावा या किल्ल्यावर लिहील्यानंतर पुढचे दोन धागे कामणदुर्ग आणि गुमतारा असे येतील.

इरसाल कार्टं's picture

22 Apr 2017 - 5:32 pm | इरसाल कार्टं

तीन चार वर्षांपूर्वी गेलो होतो तिथे. आयुष्यात पहिल्यांदा आणि रान केळी खाल्ली तिथं, सीताफळा एवढ्या बिया त्याच्या.

एस's picture

21 Apr 2017 - 11:44 pm | एस

क्या बात है! खूप छान, तपशीलवार आणि नेटके लिहिलं आहे.

दुर्गविहारी's picture

22 Apr 2017 - 10:34 am | दुर्गविहारी

यशोधराताई, वल्ली आणि बुवा व एस सर सर्वांचे मनापासून आभार.

इरसाल कार्टं's picture

22 Apr 2017 - 5:34 pm | इरसाल कार्टं

पालघराला जाणे झाले तर हा किल्ला दिसतो पण मी आतापर्यंत डोंगर समजत होतो याला. आज कळले की इथे किल्लाही आहे. किती जवळ आहे मला.

दुर्गविहारी's picture

22 Apr 2017 - 8:25 pm | दुर्गविहारी

किल्ला जरुर बघून या. अवशेष फार नाहीत, पण वरुन परिसर फार छान दिसतो.

आज चक्क मेन बोर्ड्वर लेख आला. खुपच समाधान वाटले. मिपा वर चांगल्या लिखाणाची कदर होते.

पैसा's picture

22 Apr 2017 - 8:49 pm | पैसा

खूप छान लिहिताय. फोटोही आम्हाला अगदी नवीन असल्याने खास आहेत! शेवटचा फोटो दिसत नाहीये. जरा बघा.

दुर्गविहारी's picture

23 Apr 2017 - 10:21 pm | दुर्गविहारी

शेवट्चा फोटो म्हणजे परिसराचा नकाशा का दिसत नाही याचे कारण मलाही समजत नाही आहे. तरी नव्याने जाणार्‍या लोकांच्या द्रुष्टीने नकाशा महत्वाचा असल्याने परत पोस्ट करीत आहे.
map

यशोधरा's picture

25 Apr 2017 - 7:26 am | यशोधरा

नकाशा दिसत नाहीये.

किसन शिंदे's picture

24 Apr 2017 - 10:42 am | किसन शिंदे

हि लेखमालिका आवर्जून वाचतो आहे. अपरिचीत आणि अनवट गडांची माहिती लिहिताय हे खूप चांगलं आहे.

अद्द्या's picture

24 Apr 2017 - 11:18 am | अद्द्या

लेखमालिका खूप छान होतीये .. फोटो तर सुंदरच .. सोबत लिहिलंय हि छान .. लगे रहो

लेखमालिका खूप छान होतीये - खरंच. इकडे फारसं जाणं होत नाही. एकदाच तुंगारेश्वरला वरपर्यंत गेलो आहे.

राघवेंद्र's picture

25 Apr 2017 - 9:02 am | राघवेंद्र

लेखमाला मस्त चालु आहे.
नविन किल्यांची माहिती मिळत आहे.

मी-सौरभ's picture

25 Apr 2017 - 5:38 pm | मी-सौरभ

पु. भा. प्र.

दुर्गविहारी's picture

25 Apr 2017 - 5:48 pm | दुर्गविहारी

किसन शिंदे, अद्द्या, कंजुस काका, राघवेंद्र, मी-सौरभ सर्वांचे मनापासून धन्यवाद. ह्या परिसरात शिवकालात फार मोठी युध्दे झाली नाहीत. तसेच सुरतेच्या पहिली स्वारी सोडली तर शिवाजी महाराज आले नाहीत. त्याद्रुष्टीने फक्त माहुली किल्लाच महत्वाचा. फक्त चिमाजी अप्पानी वसईची मोहिम हिच काय ती जमेची बाजु. म्हणून ट्रेकर्सना नवीन किल्ल्याची सविस्तर ओळख व्हावी यासाठीच हि मालिका सुरु केली आहे. पुढे काही किल्ले तर एकून ही माहित नसलेले असणार आहेत.

विशाल कुलकर्णी's picture

26 Apr 2017 - 2:22 pm | विशाल कुलकर्णी

मस्त लेख ! माहितीसाठी आभार !!

वा! छान लेख. छोटा किल्ला म्हंटलं की मला फार आनंद होतो! पालघरात हक्काची मैत्रीण असल्याने हा किल्ला जमवणार.
धन्यवाद!

दुर्गविहारी's picture

26 Apr 2017 - 8:21 pm | दुर्गविहारी

जरुर जाउन या आणि व्रुतांतही मिपावर लिहा