जिओच ठेवायचं की. . . .

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
26 Mar 2017 - 10:05 pm

या ३१ मार्चला जिओची फुकट नेट योजना संपतेय.बहुतेक जणांनी भारतात स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि मोफत कॉल्ससाठी ही "मोफतची" योजना वापरली.अर्थात जगात फुकट काहीच मिळत नाही.आपण काय सर्फिंग,डाऊनलोडींग इ.करतो त्याचा डेटा व्यवस्थित वर्गीकरण करुन आपल्यालाच वस्तू,सेवा विकण्यासाठी वापरला जातो.पण हा वेगळा विषय आहे.

आतापर्यंत जिओ मोफत असल्यानं काही दोष नजरेआडही करण्यात आले,जसं की सर्फिंगचा वेग 4G चा वाटत नाही.जिओवरुन केलेला कॉल बर्‍याचदा ड्रॉप होतो.इतरही काही त्रुटी अद्यापही आहेत.

तर आता ३१ मार्च २०१७ नंतरही स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि कॉल्ससाठी जिओच ठेवावं का?
जिओमुळे बर्‍याच नेटवर्क कंपन्यांचे धाबे दणाणले.आयडीया,वोडाफोन,एअरटेल यांसारख्या नावाजलेल्या नेटवर्क कंपन्यांनी दरम्यानच्या काळात ग्राहक खेचण्यासाठी विविध योजनाही जाहिर केल्या.अजूनही येताहेत.

आता तर जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या नामांकित कंपन्या एकत्र येताहेत.BSNL सुध्दा काही चांगल्या योजना जाहिर करतंय.

आता फक्त ५ दिवस उरलेत.या ५ दिवसात जिओची मोफत कॉल्स आणि दर महिना २८ GB इंटरनेट एक वर्षासाठी मिळवण्यासाठी ९९ रु.भरुन JIO Prime ही योजना घ्यावी लागेल.त्यानंतर दर महिना ३०३ रु भरुन ही अॉफर वापरता येईल.त्यांच्या इतरही योजना आहेत.त्या इथे पाहता येतील.
https://www.jio.com/

आता जिओसाठी पैसे भरल्यानंतर कॉल ड्रॉप कमी होतील असं वाटतंय का?ज्यांना कामानिमित्य सतत प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी हा कळीचा मुद्दा आहे.

या पाच दिवसात अजून काही योजना जाहिर होतील.
संभ्रमावस्था वाढेल.
तर नेमकं काय करावं?घ्यावी जिओ प्राईमची योजना? भरावे दर महिना ३०३ रु.? की इतर कोणतं नेटवर्क निवडावं?
फक्त आर्थिकदृष्ट्या फायदेशीर योजना न पाहता आपल्या नेटवर्क संबंधित आवश्यक गरजांची पुर्तता करणारीही हवी!

तुम्ही काय ठरवलंय? जिओच चांगलं वाटतंय की जिओ व्यतिरिक्त आणखी कोणत्या नेटवर्क कंपनीची एखादी योजना फायदेशीर वाटतेय?

प्रतिक्रिया

च्यामारी त्या जिओच्या, दोन तीन वर्षापूर्वी नेट मिळायची मारामार होती. बॅलन्स कसा उडला तेही कळायचे नाही. बीएसनेल ब्रॉबॅ तर नावालाच. महिन्याला एखादा जीबी पार व्हायचा. अ‍ॅटचमेंट पाठवण्यापेक्षा चक्क पेन ड्राईव्हवर कॉपी करुन हपिसचा मुलगा प्रेसना अ‍ॅड लवकर देऊन यायचा.
आज जिओचे ३० जी बी असते. व्होडाफोनला ऑफरमध्ये ४ जीबी फोरजी आहे, एअरटेलात २० जीबी शिल्लक आहे, प्लस हपिसातल्या प्रायव्हेट ब्रॉबॅ ला ८० जीबी चा प्लान आहे. कुठे उधळू हे सगळे जीबी?

कुंदन's picture

26 Mar 2017 - 11:27 pm | कुंदन

मि पा वर मे गा बायटी प्रतिसाद देउन ;-)

कपिलमुनी's picture

27 Mar 2017 - 1:38 pm | कपिलमुनी

जसा काय सायटींची नावे माहिती नाहीत ;)

तरीपण पाठवू का ?

रावसाहेब म्हणत्यात's picture

2 Apr 2017 - 8:36 pm | रावसाहेब म्हणत्यात

ही ही

आयडिया सद्य वापरतोय मी आता
आधी एअर टेल वापरायचो
आयडियाला इंटरनेट लै जातंय असं वाटत मला

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Apr 2017 - 5:58 pm | अनिरुद्ध.वैद्य

:)

जव्हेरगंज's picture

26 Mar 2017 - 11:31 pm | जव्हेरगंज

सध्या जिओशिवाय पर्याय नाही. सगळ्यात कमी रेटस जिओचेच आहेत.

1 तारखेपासून speed मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार. user कमी होतील. आणि commercial जिओला आपली रिसोर्सेस पूर्ण उघड करावी लागतील.

आपली चंगळ असणार

उपयोजक's picture

27 Mar 2017 - 6:20 am | उपयोजक

जिओची सेवा अजून सुधारेल असं वाटतंय, पण आयडिया आणि वोडाफोन एकत्र येऊन काय करतात त्याकडे लक्ष आहे.

एमटीएनएलने ३१९/- रुपयात २जीबी (३जी)डेटा /दिवसाला जाहीर केला आहे. अधिक रोज थोडे कॅाल्स स्वस्तात. ( MTNL Mumbai :http://www.mtnlmumbai.in/index.php/3g-menu/prepaid-3g-packs )

कंजूस's picture

27 Mar 2017 - 7:40 am | कंजूस

"कुठे उधळू एवढे जीबी"
हे बरोबर आहे. केवळ फास्ट नेट असणे आणि ते फक्त जिओच देत आहे असे काही नसेल. इतरही कंपन्या देतील. राहिला प्रश्न किंमतीचा. प्रिपेडमध्ये आपण महिन्याची अमुक रकमेला बांधलेलो नसतो. स्कीममध्ये राहातो.ते प्लान्स सतत बदलत असतात.
आमचे RCOM ३जी 5Mbps download,4Mbps upload वेगाने चालते ते पुरेसे आहे. २२०/1GB/-prepaid मध्ये सर्व काम होते. जेव्हा अति स्पिड हवा असढो तेव्हा रेल्वे स्टेशनात फ्रि वाइफाइवाले देतात 50Mbps ते 20mbps नेहमीच असतो. कधीकधी 150 असतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2017 - 8:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्याकडे जीओचे तीन सीमकार्ड आहेत. मी त्या नंबर वरुन कोणालाही कॉल केले नाहीत. लोकांना कॉल केले की लोक आलेला कॉल नंबर आपल्या नावाने सेव्ह करून ठेवतात. मला उद्या ही फुकट सिम योजना भविष्यात बांधून ठेवेल म्हणून मी हे केलं. मी या तीनही सिमचा उपयोग. मोबाइलचे कष्टम रोम डाऊनलोड करण्यासाठी वापरले. एक रोम जवळ जवळ ८०० एम् बी ते १ जीबी पर्यत असतो मला त्यांच्या स्पीडचा उपयोग झाला आणि वाट्सप फेसबुक मिपा यासाठी २४×७ ऑनलाइन राहता आलं.

आता काय करायचं ? आता दोन सिम कार्ड फेकून देऊन एक सिम कार्ड ठेवावे असा विचार आहे. ९९ रूपये प्राइम यूजर आणि ३०० रूपये प्लानचा.

रिलायंसवाले चतुर आहेत. ९९ रूपये प्लस कमीत कमी १५० रूपये असे २५० रूपयाला ते ग्राहकाला चावणार आहेतच. आता २५० रूपयात इतर कंपन्या किती डाटा, स्पीड, कॉल फ्री देतात यावर आपण ते निवडावे असे वाटते.

तुर्तास इतकेच धाग्यावर लक्ष ठेवून असेन.

-दिलीप बिरुटे

पोस्टपेड/ स्कीमवाले हेच खरे अकाउंट्सला गिह्राइक म्हणून कंपनी दाखवू शकते.सर, तुमच्याकडे जिओचा स्पीड तपासला का मोबाइलला? dnld/upld किती?

हेमंत८२'s picture

27 Mar 2017 - 10:53 am | हेमंत८२

जीओ चे एक कार्ड १ वोडाफोन आणि एक आयडिया चे पोस्ट पेड आहे.
आयडिया ३७५+टॅक्सेस मध्ये १.५ गब डेटा अँड ग्रुप कॉल + std देते. बिल साधारणतः ४३१ पर्यंत येते. आत्ता पहिले काम करतोय पोस्टपेड तो प्रीपेड मध्ये तो नो कॉन्व्हर्ट करतो आहे.
जीओ घरी देणार आहे जेणेकरून श्रीरामपूर+कोल्हापूर ला स्पीड चांगली येते. नो प्रॉब्लेम फॉर मी फॉर कॉल ड्रॉप- जास्त करून व्हाट्सअप कॉल करण्यास परेफेरन्स आहे.
वोडाफोन चे कुत्रे कुठे पण पाठीमागे येते त्यामुळे तो पर्सनल आणि लिमिटेड कॅल्लिंग साठी वापरतो नेट वापरात नाही.. पण त्याचे स्पीड आयडिया पेक्षा चांगले भेटते असा माझा अनुभव आहे.
आयडियाचे दुसऱ्या नंबरचे बिल कंपनी पेड करते त्यामुळे फुल्ल नेट व कॅल्लिंग साठी वापरले जाते. नो प्रॉब्लेम.

जीओ ९९ रुपयाचे prime साठी रिचार्जे केले आहे महिन्याला ३०३ चे रिचार्जे करून कॅल्लिंग आणि नेट जर फुकट मिळणार असेल तर चांगले आहे. सगळी कडे चेक केले पण त्या तोडीचा प्लॅन कुठेहि मिळाला नाही. जे काही नवीन ऑफर चालू आहेत ते नव काँनेक्टिव साठी आहेत.

समाधान राऊत's picture

27 Mar 2017 - 1:28 pm | समाधान राऊत

वोडाफोन चे कुत्रे कुठे पण पाठीमागे येते >>>खरंय खरंय

आमच्या घरात नाय येत हे कुत्रं, कितीपण चुचकारलं तरी !
बाहेर येऊनच त्याला खेळवावे लागते.

उपयोजक's picture

27 Mar 2017 - 5:35 pm | उपयोजक

आमच्यापण घरी नाही येत हे कुत्रं! पार मेल-बिल वरुन तक्रार केली.त्यांच्या हापिसात तक्रार केली.काय फरक नाय!
बहुतेक आख्ख्या कोल्हापुरात या वोडाफोनचा प्रॉब्लेम असावा!
मोठ्या शहरात मात्र याला चांगली कनेक्टीव्हिटी आहे.

आयडिया 4G चा स्पीड १ एमबी च्या पुढे भेटतोय .३४७ चा प्लॅन सुरु आहे .. अनलिमिटेड मोबाइलला कॉल फ्री आणि रोज १ GB डेटा फ्री आहे सो सध्या तरी मस्त चाललंय

जव्हेरगंज's picture

27 Mar 2017 - 6:56 pm | जव्हेरगंज

हा जिओ इफेक्ट आहे हे विसरू नये :)

जिओ नसतं तर हाच प्लान रू.१५०० च्या पुढे गेला असता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2017 - 8:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयडिया वाल्यांना लै माज आला होता मी अक्षरक्ष २५० रुपये देऊन एक जीबी घेतलेले आहे. च्यायला त्याचयातही डाटा जायचा. जिओ ने या कंपन्यांचा माज उतरवला हे मात्र नक्की. डाटा आणि कॉल २८ दिवस हा फार्मुला आयडियानेच आणला. नाय तर ३१ दिवस ३० दिवस असं होतं पूर्वी.

-दिलीप बिरुटे

उपयोजक's picture

31 Mar 2017 - 5:59 pm | उपयोजक

रेन६१०० धन्स! माहितीबद्दल!
ही योजना चांगली आहे.आयडियाचा स्पीड जबरी आहे.

कंजूस's picture

27 Mar 2017 - 12:25 pm | कंजूस

>>आयडिया 4G चा स्पीड १ एमबी च्या पुढे>>

फार केविलवाणा आहे. rcom 3g त्यापेक्षा चांगलं आहे.

धर्मराजमुटके's picture

27 Mar 2017 - 12:32 pm | धर्मराजमुटके

आपलं पहिलं प्रेम.. वोडाफोन. कोठेही गेले तरी चांगली सर्विस. मुख्यतः अवाजवी दावे नाहीत. मात्र जिओचे डेटा नेटवर्क त्याच्यापेक्षा चांगले. एक व्यावसायिक म्हणून वोडफोन आणि जिओ दोन्ही गरजेचे वाटतात. त्यामुळे दोन्ही ठेवणार. प्लॅन आता जिओचे सरस असले तरी कालांतराने सगळे एकाच लेव्हलवर येतील. त्यामुळे सर्विस कोणाची चांगली हे महत्त्वाचे. फुकट काय मिळते, स्वस्त किती मिळते ते महत्त्वाचे नाही. चांगली सेवा जो देईल त्याला त्याला पैसे मोजायची तयारी आहे.

माझीही शॅम्पेन's picture

27 Mar 2017 - 1:00 pm | माझीही शॅम्पेन

मला तर जीओ चा सध्या फक्त 1 MBPS स्पीड मिळतोय , त्यातून मी जीओ फाय घेतल , सध्या पश्चाताप चालू आहे 1 एप्रिल नंतर स्पेड बघणार मग बघू

कोणास जीओ फाइ दुसर्या नेटवर्क साठी ओपन कस करायाच हे माहीत आहे का ?

उपयोजक's picture

27 Mar 2017 - 5:41 pm | उपयोजक

आमचंही असंच!
डाऊनलोडींगचा स्पीड १ एम्बीपिएस!
मग आयडीया बरं वाटतं!

कंजूस's picture

27 Mar 2017 - 6:09 pm | कंजूस

हे rcom 3g speed नेहमी.

म्हणजे 4g ला 20 mbps speed हवा ना?

उपयोजक's picture

29 Mar 2017 - 6:01 am | उपयोजक

काल जिअो प्राईम मधे नोंदणी केली. ३०३ चा प्लान घेतला. ५ गब एक्स्ट्रा फ्री!

सही's picture

29 Mar 2017 - 3:30 pm | सही

९९ भरुन नोंदणीचा जो प्रकार आहे तो भुलावणीचा असावा अशा स्कीम नेहमीच येत रहातील असे वाटते

डोके.डी.डी.'s picture

29 Mar 2017 - 3:57 pm | डोके.डी.डी.

सध्या तरी gio चांगलं आहे मी 99 * 303 चा रिचार्ज केला आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2017 - 8:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी पण ४०२ रुपये अक्कल खाते टाकले. बघू या पुढे काय होतं ते नाय तर मी आयडिया वाप्रेन. ३४७ अनलिमिटेड डाटा & कॉल.

-दिलीप बिरुटे
(जिओ प्राईम मेंबर)

पंतश्री's picture

4 Apr 2017 - 1:49 pm | पंतश्री

अजुन ९९ वरच आहे. नेट सुरु आहे अजुन आणि आउट गोइन्ग पण

रॉजरमूर's picture

29 Mar 2017 - 8:29 pm | रॉजरमूर

जिओ इज द बेस्ट ........

जिओ निश्चितच वेगवान आहे ....
फ्री स्कीम संपल्यानंतर अजून वेग वाढेल .
सध्या दिवसाच्या वेळेस 7 ते 12 एम बी पी एस डाउनलोड चा वेग मिळतोय तर रात्रीच्या वेळेस १२ नंतर ३० ते ४५ एम बी पी एस च्या दरम्यान मिळतोय .
कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाण साधारण वीस टक्के आहे . बरेच कॉल होतात त्यावरून त्यामुळे तसा खूप काही प्रश्न नाही.
ज्या ब्रॉडबँड साठी १ एम बी पी एस रडत खडत चालणाऱ्या प्लॅन ला महिन्याला मी ७००+ रु. द्यायचो तो आता जिओ फाय ने रिप्लेस केला आहे .
परिणाम -कित्येक पट स्पीड जास्त आणि किंमत निम्म्या पेक्षा कमी त्यामुळे निदान माझ्यासाठी तरी जिओ घाट्याचा सौदा नाहीये.

संदीप डांगे's picture

29 Mar 2017 - 10:38 pm | संदीप डांगे

सध्या चार महिन्यांपासून जिओ वापरत आहे, ९९ भरले आहेत. ४९९ चा प्लान घेणार आहे, आवडला, पटला तर तीन महिन्यानंतर कन्टीन्यू ठेवेन... नाहि जमलं तर आयडिया आहेच दुसर्‍या सीमस्लॉटमध्ये.

फुकट युजर कमी झाल्याने कदाचित स्पीड वाढेल. आता प्रचंड ताण आहे नेटवर्कवर असे दिसते. प्रीपेड प्लान मध्ये असल्याने जास्त विचार करायची गरज नाही. चले तो चांदतक नही तो शामतक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2017 - 8:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> फुकट युजर कमी झाल्याने कदाचित स्पीड वाढेल.
आपण सर्वच फुकट युजर कमी झाल्यास स्पीड वाढेल म्हणतो, तशी अपेक्षा धरून आहोत. पण मला विश्वास नाय राव असं काही होईल म्हणून...!

दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 1:03 pm | संदीप डांगे

युजर च्या संख्येचा उपलब्ध bandwidth वर ताण येतो. मी नाशिकला 2009-10 च्या वेळेस आलो होतो त्यावेळेस टाटा फोटोन 3 mbps चा अधिकृत मेन स्पीड असतांना down लोड ला 1 ते 2 mbps देत होते, तेव्हा नाशिकमध्ये फोटोन युजर अतिशय कमी होते, नंतर म्हणजे 2013-14 मध्ये speed 512 mbps मिळाला तरी मिळवली अशी वेळ आली. युजर भरमसाठ वाढले व त्या तुलनेत इन्फ्रा वाढवला नाही म्हणून.

डेटा फ्लो हा नळाच्या पैपलाईन प्रमाणे असतो, जितक्या तोट्या जास्त चालू तितका सर्वांना फ्लो कमी मिळतो, सर्वांना जास्त व जोरात फ्लो हवा असेल तर पाणी वाढवावे लागते, अर्थात इन्फ्रा वाढवावा लागेल. माझ्या अंदाजाप्रमाणे रिलायन्स ने याचा विचार आधीच करून फुकट च्या तुलनेत 10-20 टक्के लोक कन्व्हर्ट होतील असा अभ्यास केला असावा, त्यानुसार इन्फ्रा उभारले असावं. कारण आजकाल गेल्या दोन महिन्यांपासून स्पीड कमी झालाय, आता जसे पेड मेम्बर वाढतील त्याप्रमाणे हळू हळू इन्फ्रा वाढवता येईल असं मला वाटतं, खरे खोटे मुकेसभाई ला मालूम...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2017 - 5:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयडिया स्पीडच्या बाबतीत जिओ पेक्षा भारी आहे. आता मी जिओ डाऊनलोड स्पीड टेष्ट केलं तर दोन एमबीपीएस पेक्षा जास्त नाही. तेव्हाच आयडिया १५ एमबीपीएस स्पीड दाखवतेय.

-दिलीप बिरुटे
(चांगली स्पीड पकडलेला)

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 5:13 pm | संदीप डांगे

हो ते मात्र खरं आहे.

सध्या माझ्याकडे आयडिया, जिओ व टाटा इन्डिकॉम आहे. स्पीडच्या बाबतीत टाटाला जास्त स्पीड आहे, आयडिया सेकंड व जिओ थर्ड वर आहे. आता टाटाचे नाशिकमध्ये कस्टमर कमी आहेत त्यामुळे सुसाट स्पीड मिळतो

माझीही शॅम्पेन's picture

30 Mar 2017 - 8:34 pm | माझीही शॅम्पेन

2013-14 मध्ये speed 512 mbps मिळाला तरी मिळवली अशी वेळ आली

बाब्बो , तुम्हाला बहुधा KBPS म्हणायाच आहे

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 8:43 pm | संदीप डांगे

अर्रर्र... मोबाईलमध्ये टंकतांना गडबड झाली.

उपयोजक's picture

31 Mar 2017 - 6:02 pm | उपयोजक

सहमत डांगे साहेब!

सतिश गावडे's picture

29 Mar 2017 - 10:57 pm | सतिश गावडे

आजच्या सकाळला बातमी होती, एकूण जिओ सिमधारकांपैकी फक्त १३ टक्के लोकांनी प्राईम घेतलंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2017 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरसकट १५० रुपयात सबकुछ मिलेगा असं पाहिजे होतं. पण तेही नुकसान भरून काढायला आपला गळा दाबायला निघाले.

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

30 Mar 2017 - 9:29 pm | सतिश गावडे

>>सरसकट १५० रुपयात सबकुछ मिलेगा असं पाहिजे होतं.
त्यांनी असं का करावं?

जिथं जिओ यायच्या आधी २९९ रुपयात ७५० एम बी मिळायचे महिन्याला तिथे जिओ ३०३ रुपयात महिन्याला २८ जीबी देणार हे खूपच चांगलं झालं की.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे जिओने इतर केरीयर्सना ते वर्षानुवर्षे करत असलेली लूट थांबवण्यास भाग पाडले. सारे कसे आता सुतासारखे सरळ झालेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2017 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>जिओने इतर केरीयर्सना ते वर्षानुवर्षे करत असलेली लूट थांबवण्यास भाग पाडले. सारे कसे आता सुतासारखे सरळ झालेत.

१००% सहमत...!

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

2 Apr 2017 - 1:40 pm | सस्नेह

आमच्याकडे जिओला मस्त स्पीड आहे. झमझम डालो होतोय डाटा.
जुग जुग जियो, जिओ !

४जी पाहिजेच अथवा ते नसेल तर कोणते काम अडते?
यु ट्युब व्हिडिओ डाउनलोड करूनच पाहतो त्यामुळे बफरिंगचा संबंध नाही. ओनलाइन रेडिओसाठी ३जी चालते.

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 1:17 pm | संदीप डांगे

असा का विचार करता काका? जेवढा जास्त स्पीड तेवढा कमी वेळ लागतो कामे होण्यात, online transactions, डेटा अपलोड download पटापट झाले तर बाजारात वेगाने कामे होतात, सात आठ एमबी चा स्पीड म्हणजे फक्त 700 kbps download स्पीड, online व्यवहार रिअल टाइम होण्यासाठी हा डाउनलोड स्पीड कमीत कमी 10 mbps हवा, ड्रॉप्स नको, डिस्टरबंस नको.

100 mpbs चा स्पीड असेल तर डिजिटल व्यवहार वाढतील, ते सोयीचे होईल.

मला व्यक्तिशः 100 एमबी ची file अपलोड करायची तर पूर्वी अंगावर काटा यायचा, ते अभ्याने वरच सांगितले आहे ते शब्दशः खरे आहे. आता तेवढ्या वेळात अपलोड डाऊनलोड होऊन प्रिंटिंग होऊन कस्टमरच्या हाती डिलिव्हरी पोचते.

बाकीच्यांच्या व्यवहारातही याचा फायदा होत असेलच. केवळ मनोरंजन जरी म्हटले तरी पूर्वी यूट्यूब वर व्हिडियो आधी येणाऱ्या जाहिराती लोड व्हायला वेळ लागून व्हिडियो टाळले जायचे, आता स्पीड चांगला असल्याने 30 सेकंदाची जाहिरात रिअल टाइम लोड होऊन जाते व पुढचा व्हिडीओ बफरशिवाय पाहता येतो त्यामुळे जाहिरात दारांचे काम होते.

उपलब्ध वेळेत जास्त काम करता येत असल्याने सर्वांची वीनविन सिच्युएशन आहे.

कंजूस's picture

30 Mar 2017 - 3:35 pm | कंजूस

संदीप ,पुर्वी फास्ट काम करायचे तर मोबाइल घरच्या ब्रॅाडबँड वाइफाइवर चालवून करायचे. आता मोबाइलमध्ये फास्झ प्रसेसर,रॅम येऊ लागल्याने विचार बदललाय लोकांचा. मोठे काम कोणी मोबाइलच्या किबोर्डने करणार नाहीत. २) जिओने अजून त्यांचे खरे पत्ते उघडे केले नाहीत. ओप्टिकल फाइबर केबल टाकत आहेत ते झाले की घरच्या ब्रॅाडबँडला १००एमबिपिएस स्पीड येईल आणि परत लोक ल्यापटॅापकडे वळतील.

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 5:04 pm | संदीप डांगे

अच्छा! तुमचा मुद्दा मोबाइलवर इतका स्पीड का हवा ह्याबद्दल आहे काय? तर त्याचे असे आहे की पूर्वी जी कामे लॅपटॉपवर केली जायची त्यासाठी आता बहुसंख्यलोक टॅब किंवा मोबाईल वापरतात. कारण जास्त सोयीचे पडते म्हणून. आमच्या सारख्या हार्डकोअर कम्प्युटर वाल्यांची कामे लॅपटॉप-डेस्कटॉपशिवाय होऊ शकत नाहीत, तो एक मुद्दा वगळला तर कम्युनिकेशनसाठी मोबाईलच योग्य आहे. मेल पाठवणे, व्हॉट्सप मेसेजेस करणे, तिकिटे बुक करणे, ओला-उबेर किंवा कोणतीही ऑनलाइन सेवा विकत घेण्यासाठी, अगदी अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या खरेदीसाठीही मोबाइल सोयीचा आहे. त्यासाठी फास्टेस्ट इन्टरनेट स्पीड असेल तर ग्राहकांचा कन्वर्जन रेशो वाढतो असा अनुभव आहे. शिवाय मोबाईल हा ऑन-द-गो प्रकार असल्याने लॅपटॉप च्या मर्यादा त्याला नाहीत. त्यामुळे ग्राहकांचे डिसिजन मेकिन्ग फास्ट होतं. कमी वेळात, कमी श्रमात जास्तीत जास्त काम होते. हे ग्राहक व विक्रेते दोघांनाही उपयोगाचे आहेच.

जास्ट क्षमतेची रॅम-प्रेसेसर हे डेटाप्रोसेसींगच्या दर्जावर परिणाम करतात, त्यामुले अधिक दर्जेदार कन्टेन्टचा अनुभव उपभोक्त्याला येतो. जसे एचडी विडिओ हे साधारण १ मिनिटाचा असेल तर २५-५० एमबी पर्यंत असू शकतो, हा एक मिनिटाचा विडियो एक मिनिटापेक्शा कमी वेळात डाऊनलोड व्हायला तितका स्पीड पाहिजे, तसेच त्या विडियोल प्रोसेस करायला (म्हणजे स्क्रीनवर दाखवायला) प्रोसेसर रॅमचा स्पीड चांगला हवा. हे सर्व काम चांगल्या कन्फिगुरेशनच्या मोबाइल्समध्ये उत्तम होतं, त्यामुळे त्यासाठी लॅपटॉप बाळगायची गरज नाही. माझा २००१० ला घेतलेला एचपी लॅपटॉप २ जीबी रॅम चा ड्युअल कोर ६४ बिट चा अजूनही कोरल-फोटोशॉपच्या हेवी फाइल्स प्रोसेस करत जीवंत आहे. आतातर बाजारात चार जीबी रॅमचे क्वाड्रा - ऑक्टा प्रोसेसर वाले मोबाइलच आले आहेत. त्यात गेमींग, सिनेमे बघणे, शॉपिंग व कम्युनिकेशन असे सर्व एका छताखाली होते. जे चांगलेच आहे.

घरी फायबर ऑप्टिक आली तरी आता परत लॅपटॉपच्या कुशित बसायची गरज कुणाला पडणार नाही असे वाटते. मोबाईलला पर्याय नाही. मोबाइलमुळे लॅपटॉपच्या खपावर परिणाम झाल्याचे समजते. तसेही टेक्नॉलॉजी उलटी पावले चालेल असे मला वाटत नाही.

जिओच्या पत्त्यांबद्दल काही सांगू शकत नाही. सध्या तरी माझ्यामते तो फार क्षुल्लक मुद्दा आहे. जोवर कोणी बिलिंग मध्ये मान अडकवून घेत नाही तोवर कोणत्याही कंपनीची सर्विस उत्तमच असते. पटले नाही तर पोर्ट-आउटही करण्याचा मार्ग असतो. ज्यां कोणी आपले दुसर्‍या कंपनीचे नंबर जिओ मध्ये आधीच पोर्टाऔट केले असतील तर त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही असे वाटते.

उपयोजक's picture

2 Apr 2017 - 8:24 am | उपयोजक

मिपावरचे लांबलचक धागे आणि प्रतिसादसुध्दा मोबल्यावर आरामात टायपवता येतात!

क्रिएशनसाठी लोकांना मोठा कीबोर्ड लागतो. बाकी अॅक्सेससाठी मोबाइलमधल्या तीन ते दहा एमबीपीएसने फारसा फरक पडणार नाही.
मुद्दा २) जिओसाठी जुने ३जीचे बराच स्पीड देणारे मोबाइल का फेकावे?