जिओच ठेवायचं की. . . .

उपयोजक's picture
उपयोजक in तंत्रजगत
26 Mar 2017 - 10:05 pm

या ३१ मार्चला जिओची फुकट नेट योजना संपतेय.बहुतेक जणांनी भारतात स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि मोफत कॉल्ससाठी ही "मोफतची" योजना वापरली.अर्थात जगात फुकट काहीच मिळत नाही.आपण काय सर्फिंग,डाऊनलोडींग इ.करतो त्याचा डेटा व्यवस्थित वर्गीकरण करुन आपल्यालाच वस्तू,सेवा विकण्यासाठी वापरला जातो.पण हा वेगळा विषय आहे.

आतापर्यंत जिओ मोफत असल्यानं काही दोष नजरेआडही करण्यात आले,जसं की सर्फिंगचा वेग 4G चा वाटत नाही.जिओवरुन केलेला कॉल बर्‍याचदा ड्रॉप होतो.इतरही काही त्रुटी अद्यापही आहेत.

तर आता ३१ मार्च २०१७ नंतरही स्मार्टफोनवर 4G इंटरनेट आणि कॉल्ससाठी जिओच ठेवावं का?
जिओमुळे बर्‍याच नेटवर्क कंपन्यांचे धाबे दणाणले.आयडीया,वोडाफोन,एअरटेल यांसारख्या नावाजलेल्या नेटवर्क कंपन्यांनी दरम्यानच्या काळात ग्राहक खेचण्यासाठी विविध योजनाही जाहिर केल्या.अजूनही येताहेत.

आता तर जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या नामांकित कंपन्या एकत्र येताहेत.BSNL सुध्दा काही चांगल्या योजना जाहिर करतंय.

आता फक्त ५ दिवस उरलेत.या ५ दिवसात जिओची मोफत कॉल्स आणि दर महिना २८ GB इंटरनेट एक वर्षासाठी मिळवण्यासाठी ९९ रु.भरुन JIO Prime ही योजना घ्यावी लागेल.त्यानंतर दर महिना ३०३ रु भरुन ही अॉफर वापरता येईल.त्यांच्या इतरही योजना आहेत.त्या इथे पाहता येतील.
https://www.jio.com/

आता जिओसाठी पैसे भरल्यानंतर कॉल ड्रॉप कमी होतील असं वाटतंय का?ज्यांना कामानिमित्य सतत प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी हा कळीचा मुद्दा आहे.

या पाच दिवसात अजून काही योजना जाहिर होतील.
संभ्रमावस्था वाढेल.
तर नेमकं काय करावं?घ्यावी जिओ प्राईमची योजना? भरावे दर महिना ३०३ रु.? की इतर कोणतं नेटवर्क निवडावं?
फक्त आर्थिकदृष्ट्या फायदेशीर योजना न पाहता आपल्या नेटवर्क संबंधित आवश्यक गरजांची पुर्तता करणारीही हवी!

तुम्ही काय ठरवलंय? जिओच चांगलं वाटतंय की जिओ व्यतिरिक्त आणखी कोणत्या नेटवर्क कंपनीची एखादी योजना फायदेशीर वाटतेय?

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

7 Apr 2017 - 10:27 am | सतिश गावडे

जिओसाठी जुने ३जीचे बराच स्पीड देणारे मोबाइल का फेकावे?

नाही. तुम्ही जिओफाय वापरु शकता.

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 6:27 pm | संदीप डांगे

बाकी अॅक्सेससाठी मोबाइलमधल्या तीन ते दहा एमबीपीएसने फारसा फरक पडणार नाही.
>> युजरच्या गरजेवर अवलंबून आहे. तसेच युजरच्या भोवतालच्या इन्फ्रावरही, व युजर्सच्या संख्येवरही. फ्लॉलेस सर्वीस साठी सतत वरची जनरेशन अपग्रेड करणे आवश्यक आहे. तुम्हाला स्टेशनवर गरजेपुरते मोफत वायफाय मिळते असे वाचले आहे. अशी सोय मिळणे प्रत्येकाला शक्य नाही.

मुद्दा २) जिओसाठी जुने ३जीचे बराच स्पीड देणारे मोबाइल का फेकावे?
>> हेही युजरच्या गरजेवर अवलंबून आहे. बहुतेक लोक ४जी वर (सगळ्या कंपन्यांचे ४जी आलेत आता) गेल्याने ३जी वाल्याना, २जी वाल्यांना बर्यापैकी स्पीड मिळत आहे. तरी उच्च दर्जाच्या कन्टेन्ट मुळे कचरा(कॅश) जास्त साठते, त्यासाठी जास्त क्षमतेचे (साठवण) मोबाईल लागतात, साठवण प्रोसेस करायला प्रोसेसर अपग्रेड हवेत. २जी ३जी चे दोन-तीन वर्षापेक्षा जुने मोबाईल हॅन्ग होणे-स्लो होणे हा प्रकार सर्रास आहे. जिओसाठी नव्हे तर ४जी साठी मोबाईल बदलावे, अर्थात ज्याचीत्यची गरज. पुढचे भविष्य एलटीई+४जीचे असेल किमान अजून दोन-तीन वर्षे तरी...

तुम्ही 'आम्ही कसे अपग्रेडेड आहोत बघा' वाल्या शोशायनिंग जनरेशनकडे, टाइप्स कडे निर्देश करत असाल तर आपला पास! :-)

पंचविस-तीस हजार कोटी गुंतवणूक केलेली कंपनी नंतर रेवन्युकडे लक्ष ठेवेलच. बिलिंगचेच गिह्राइक घेईल, प्रिपेड बाद.
२) कचरा क्याश साठणे हे android चे अंगभूत लक्षण आहे. २/३/४ जीचा संबंध नाही.
३) मोबाइल सर्विस प्रवाइडर दर तीन महिन्याला कन्फ्युजन वाढवत आहेत.
४) जियोच्या विरोधात बोलत नसून एकूण स्पीड किती असणे खरोखर गरजेचे आहे हा मुद्दा आहे. २जी/Edge च्या तुलनेत ३जी चा स्पीड खूप होता पण आता ३ विरुद्ध ४ फारसे परिणामकारक वाटत नाही.

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 9:01 pm | संदीप डांगे

स्पीडच्या गरजेबद्दल वरच सांगितले आहे.

आता जनरेशनवाईज फरक भासत नाही याचे कारण असे की ३जीचा स्पीड मिनिमम १४.४ एम्बीपीस तर ४जीचा (एचएसपीए) २१ एम्बीपीस आहे. सध्या सगळे सेवादार बहुतेक ४जी (एलटीई) च्या नावाखाली ४जी(एचएसपीए) देत आहेत. ४जी(एल्टीई) चा स्पीड मिनिमम १०० एम्बीपीएस आहे. कोणाला हा स्पीड मिळाला असल्यास कळवावे. मलातरी अजून नाही मिळाला.

२जी(जीपीआरस) चा स्पीड ५१२ केबीपीएस होता, त्याच्या तुलनेत ३जी चा १४ एम्बीपीस खूपच वाटणार.

जिओ सुरु होण्याआधी चारपाचमहिने आरकॉमच्या नंबरवर एकदोनदा अचानक मला ३० ते४० एमबीपीएसचा स्पीड मिळाला होता, ते काय भुताटकी होती ते कळले नाही.

आनंदी गोपाळ's picture

30 Mar 2017 - 9:30 pm | आनंदी गोपाळ

ग्राहकांना फसवणे ही रिलायन्सची खासियत आहे.

पहिल्या रिलायन्स फोनमधे "वायरलेस इन लोकल लूप" ही टेक्नॉलॉजी वापरून चोरी केली गेली होती.

जिओमधे तुम्ही जो फोन करता, तो व्हॉट्सॅप कॉलसारखा असतो. इंटरनेट बंद केली, तर रिलायन्सची "रेंज" जाते.

शिवाय तुमचं आधार कार्ड अन नको तो डेटा तुम्ही ऑलरेडी त्यांना दिलेला आहेच.

तेव्हा, लवकरात लवकर ते जिओचं कार्ड तोडून फेकून द्या, हा प्रेमाचा फुकट सल्ला आहे.

आनंदी गोपाळ's picture

30 Mar 2017 - 9:38 pm | आनंदी गोपाळ

ज्याप्रमाणे या डब्लूएलेलला कनेक्टिविटी द्यायला सुरुवातीला इतर कंपन्यांना भाग पाडले अन नंतर ते बारगळले, त्याचप्रमाणे जिओचे "व्हॉट्सॅप" कॉल्स इतर नेटवर्कशी (जीएसेम) जोडण्यास इतर कंपन्यांना भाग पाडण्यात येत आहे. याविरोधात कोर्टकचेर्‍या सुरू आहेत, अन जिओ नॅचरल जस्टिसच्या विरोधी काम करीत असल्याने ते बंद पडेल अशी अंधुकशी शक्यता आहे.
नसल्यास, इतर कंपन्या आपले नाक कापून या नव्या शूर्पणखेस अपशकून करतील अशी दाट शक्यता आहे. अर्थात, मल्टीनॅशनल्सचे हात भरपूर लांब असतात, अन ते रिलायन्सला पुरून उरतील असेच (मॅगीच्या उदाहरणावरून) वाटते.

साहेब,
आता सगळेच मोबाईल कंपन्या आधार कार्डचा डेटा घेतात. रिलायन्स अपवाद नाही. शिवाय या पुढील काळात मोबाईल कनेक्शनला 'आधार' चा आधार लागणार आहे.
इंटरनेट बंद केले तर जीओ ची रेंज जात नाही तर जे हँडसेट volte कंपॅटीबल नाहीत त्याच हँडसेट वर रेंज जाते. बाकी ते ग्राहकांना फसविण्याबाबत काही अंशी सहमत.

आनंदी गोपाळ's picture

30 Mar 2017 - 10:36 pm | आनंदी गोपाळ

आधार ची झेरॉक्स घेणे, वि बोटांचे ठसे घेणे. काही फरक?

धर्मराजमुटके's picture

30 Mar 2017 - 10:41 pm | धर्मराजमुटके

नुकतेच वोडाफोन कार्ड घेतले. अंगठेबहाद्दर समजुन ठसाच घेतला. जुने लोक अंगठा का लावायचे ते आत्ता कळाले. खरच काळाच्या पुढं होती ही मंडळी !

आनंदी गोपाळ's picture

30 Mar 2017 - 10:38 pm | आनंदी गोपाळ

रेंज सर्व हँडसेट वर जाते. नेट बंद करून पहा.

धर्मराजमुटके's picture

30 Mar 2017 - 10:43 pm | धर्मराजमुटके

रेडमी ३ एस प्राईम आणि लेनोवो के ४ नोट. दोन्ही वर ! दोन्ही VOLTE सपोर्टेड हँडसेटस आहेत.

माझीही शॅम्पेन's picture

31 Mar 2017 - 12:10 pm | माझीही शॅम्पेन

दोन्ही प्रतिक्रिया वाचून गोंधळ झाला आहे , डेटा बंद केला तर कनेक्शन बंद होत ना ? कारण ऑफ लाईन दाखवतो

संदीप डांगे's picture

31 Mar 2017 - 12:33 pm | संदीप डांगे

माझादेखील लेनोवो के ४ नोटच आहे. माझ्याकडे तर बंद होतं सगळं, डेटा बंद केला की जिओ नंबर ऑफलाइन. तुमचं कसं काय राहतंय..?

धर्मराजमुटके's picture

31 Mar 2017 - 1:09 pm | धर्मराजमुटके

माहित नाही पण मी डबल चेक केलं दोन्ही हँडसेटवर. कॉल होत आहेत. कदाचित सेटींगमधे VOLTE चा काही पर्याय आहे. नीट बघून सांगतो.

हेमंत८२'s picture

31 Mar 2017 - 1:10 pm | हेमंत८२

माझ्याकडे ओप्पो / रेडमी अ४ आहे तर काही प्रॉब्लेम नाही.. माझ्याकडे तर चालू राहते..

माझे पन झाले होते नविन घेतले तेव्हा पन सॉप्टवेअर अपडेट केले नि झाले चालु ......

संदीप डांगे's picture

2 Apr 2017 - 9:43 pm | संदीप डांगे

ओके, करुन बघतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2017 - 9:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धर्मराज मुटके बरोबर बोलत आहेत. ,ज्यांच्या हॅन्डसेट मध्ये volte आहे त्यांना नेटची गरज पडत नाही. त्यांना जियोचं व्हाईस कॉलचं App टाकायची सुद्धा गरज नसते.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

31 Mar 2017 - 6:01 am | कंजूस

मूलभूत मुद्दा जिओ VOLTE वर चालते म्हणजे ते विवक्षित आहे उलट संदीप म्हणतात तसे इतर कंपन्याचे ४जी एचएसपिए म्हणजे सर्वांना लागू होणारे जिएसएम आहे. याचा स्पिड थोडा कमी असला तरी बय्राच मोबाइलला चालेल कॅाल आणि डेटासाठी.

सुबोध खरे's picture

31 Mar 2017 - 9:42 am | सुबोध खरे

काळ एक जिओ वाय फाय राऊटर घेतला रुपये १९९९/-
९९ रुपये जिओ प्राईम चे सदस्यत्व शुल्क आणि एक महिन्याचे ३०३/- असे रुपये २४०२/- भरून आलो. यात २८ एप्रिल पर्यंत ३३ GB डेटा मिळणार आहे.
जिओ चा वेग साधारण ६-८ mbps एवढा मिळतो आहे. सध्या माझ्या आणि पत्नीच्या भ्रमणध्वनी वर एअरटेलने दरमहा १० GB अतिरिक्त डेटा तीन महिने पर्यंत फुकट दिला आहे. घरात हाथ वे चा वायफाय ९९९ रुपयात १०० GB १०० mbps वेगाने ( प्रत्यक्ष मिळणारा वेग १० mbps आहे) आणि त्यानंतर २ mbps या दराने आहे. घरच्या चौघात मिळून १५३ GB डेटा वापरता येईल. याचा सध्याचा खर्च फोनचे बिल लक्षात घेता साधारण रुपये १९००/- महिना होतो आहे. ( दोन फोनचे ३००/- प्रत्येकी३०३ जिओचे आणि ९९९ हॅथवेचे.
सांगण्याचा मुद्दा एवढाच कि दोन हजार रुपयात कितीही वेळ ब्रॉड बँड वापरता येतो. लोकांना दाखवण्यासाठी अँपल घेऊन ५०,०००/- च्या वर खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात चार वर्षे भरपूर नेट वापरता येते. जाणीव चार वर्षांनी फोन बदलला कि मीटर परत चालू. आमच्या चौघांचे फोन १५०००/- च्या आतले पण ४G VOLTE आहेत. माझा संगणक आणि दोन्ही मुलांचे लॅप टॉप एवढ्या सगळ्या गोष्टी डोक्याला त्रास न होता सुरळीत पणे वापरता येतात. मी याची तुलना अतिद्रुतगती मार्गाच्या टोल शी करतो. एकदा टोल भरला कि सुखात सुरळीत प्रवास करता येतो. हि या सुविधेची किंमत आहे.

जिओमुळे लोक तिकडे जाऊ नये म्हणून इतर कंपन्या भरपुर डेटा प्लान देत आहेत. साधारण पाचशे सहाशे रुपयांत प्रत्येक कंपनीचे चांगले combo 3g data+ calls plan होतेच आणि आहेत. खरी तुलना जिओच्या वेलकम ओफर संपल्यानंतरच करता येईल. फक्त मोबाइल नेटचीच तुलना करायला हवी. जियोच्या फक्त ४जी volte ची सर्वव्यापी ३/४जी सर्वीसशी तुलना होऊ शकत नाही.
२) सर्व सरकारी बँका,कार्यालये यांना अजुनही bsnl ची सेवा घ्यावी लागते.
३) घरचे ब्रॅाडबँड घरीच राहाते आणि भारतात प्रवासात शेवटी मोबाइलचे ३जीच उपयोगाला येते.
४) उद्या रेल्वे/ कॅालेज/शाळांमधून ब्रॅाडबँड दिले तर ते बहुतेक bsnl चे असेल. इतर कंपन्या सब्सिडाज्ड नेट सर्विस देतील का?

रविकिरण फडके's picture

31 Mar 2017 - 11:36 pm | रविकिरण फडके

(For some reason, whatever I write is not being converted to Devnagari, hence my response in English.)
(a) it has almost zero coverage in Konkan which I visited frequently in the recent past, (b) I doubt if the speed is even 2G, forget about 4G; e.g., streaming takes hell of time while watching HFM video songs on YT on my laptop (it works okay with the not so good MTNL broadband), (c) often, the signal is weak; the middle LED is rarely green, (4) my iPad VERY RARELY WORKS with Geo- it simply indicates 'no internet connection'.
So no point to continue beyond today.

त्यांना अपेक्षित गिह्राइकं मिळाली नाही का माहित नाही पण मुदत १५ एप्रिलपर्यंत का वाढवली?

जव्हेरगंज's picture

1 Apr 2017 - 12:07 am | जव्हेरगंज

"Every Jio Prime member - when they make their first paid recharge prior to 15th April using Jio's Rs 303 plan (or any higher value plan) - will get services for the initial 3 months on a complimentary basis. Your paid tariff plan will be applied only in July, after the expiry of the complimentary service," Reliance Industries Chairman Mukesh Ambani said.

उपयोजक's picture

2 Apr 2017 - 8:36 am | उपयोजक

मुकेशभाईनं हे जरा उशीराच जाहिर केलंय! तोवर बर्‍याच जणांनी आयडीयाला स्विच केलंही असेल!

अविनाशकुलकर्णी's picture

2 Apr 2017 - 1:54 pm | अविनाशकुलकर्णी

डाटा बेस पल्यान्स बोगस ...........डाटा सम्पला कि १२८ च्या स्पीड न नेट चालणार

मदनबाण's picture

2 Apr 2017 - 2:20 pm | मदनबाण

हचीसन मॅक्स ते ऑरेंज ते व्होडाफोन असा प्रवास मी पाहिला आहे... आता आयडिया + व्होडाफोन मधुन चांगली अपेक्षा ठेवण्यास हरकत नसावी !
ते व्होडाफोनचं यडं कुत्तरडं आपल्याला लयं आवडता बघा ! ;) ते जाहिरात येण्या आधी पासुन मला आवडतं व्हतं बघा !
कसं ?
तर...
असं...

हा व्हिडियो एकदा फुल स्कीन करुन पहाच ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बिन तरे सनम... मर मिटेंग हम... आ मेरी जिंदगी ! :- [ Yaara Dildara ]

टवाळ कार्टा's picture

4 Apr 2017 - 10:51 am | टवाळ कार्टा

माझा jio च्या कार्डावरून कॉल लागत नाहीये...इंटरनेटमात्र व्यवस्थित सुरू आहे, सिम नवीन होते तेव्हा VOLTE असे लिहून यायचे ते आता दिसत नाहीये
माझ्याकडे lenovo के४ note आहे

सॅगी's picture

4 Apr 2017 - 1:25 pm | सॅगी

मलाही हाच प्रॉब्लेम आला आहे. VOLTE आणि त्याच्याशी रिलेटेड सेटींग दिसत नाहीये.
आणि LTE च्या जागी 4G दिसत आहे.
SIM Card Damage झाले आहे असे सांगण्यात आले आहे.
Mobile Data मात्र व्यवस्थीत चालतो. Calls आणि Outgoing SMS चालत नाहीयेत.
मोबाईल: Motorola G4 Plus

टवाळ कार्टा's picture

4 Apr 2017 - 4:24 pm | टवाळ कार्टा

मोबल्यात कार्ड काढ-घाल केल्यावर VOLTE सुरु झाले परत

सॅगी's picture

4 Apr 2017 - 4:47 pm | सॅगी

माझा प्रॉब्लेम मात्र सिम कार्ड बदलल्यावरच दुर होईल असे वाटतय.

सतिश गावडे's picture

7 Apr 2017 - 10:32 am | सतिश गावडे

मलाही हाच प्रॉब्लेम येत होता. फोन बंद करुन पुन्हा चालू केल्यावर झाले सुरळीत.

सॅगी's picture

10 Apr 2017 - 12:37 pm | सॅगी

सिम कार्ड बदलुन घेतल्यावर VOLTE सुरू झाले एकदाचे.

मी कालच जिओ फाय ऑर्डर केलंय, येईल एक दोन दिवसांत मग सांगतो काय आहे स्पिड अन काय ते.

हे जिओ फायने डेस्कटॉपला कसं कनेक्ट करता येईल, मार्गदर्शनाची गरज आहे.

रॉजरमूर's picture

8 Apr 2017 - 8:53 pm | रॉजरमूर

USB

हे जिओ फायने डेस्कटॉपला कसं कनेक्ट करता येईल, मार्गदर्शनाची गरज आहे.

USB पोर्ट ला डायरेक्ट कनेक्ट करता येते .
त्यासोबत डेटा केबल येते त्याच्या साहाय्याने.
मी वापरतोय याच पद्धतीने .....
ब्रॉडबँड कनेक्शन बंद करून आता जिओफाय वापरतोय .
अतिवेगवान स्पीड मिळतोय आधीच्या ब्रॉडबँड पेक्षा.
त्याच प्रमाणे पी सी ला USB वाय फाय अँटेना लावूनही वापरता येते.

सतिश गावडे's picture

7 Apr 2017 - 10:30 am | सतिश गावडे

जिओफाय हे डेडीकेटेड हॉटस्पॉट आहे असं समजा. तुम्ही मोबाईलमधून हॉटस्पॉट ऑन करण्याच्या ऐवजी या डिव्हाईसचे हॉटस्पॉट ऑन कराल. नाकी सारे सेम.

संदीप डांगे's picture

7 Apr 2017 - 12:52 pm | संदीप डांगे

डेस्क टॉप पीसी विचारलं त्यांनी... मला वाटत वाय फाय कनेकटर लागेल

सतिश गावडे's picture

8 Apr 2017 - 9:17 pm | सतिश गावडे

>> मला वाटत वाय फाय कनेकटर लागेल
होय. हा मुद्दा माझ्याकडून निसटला. बहुतेक नविन डेस्कटॉपमध्ये ही सुविधा असावी. नसल्यास अजून एक उपकरण खरेदी करणं आलं.

मी माझ्या एका अश्मयुगातील डेस्कटॉपला TP-Link TL-WN725N 150Mbps Wireless N Nano USB Adapter बसवला आहे.

asdf

हे छोटे उपकरण युएसबी पोर्ट्मध्ये टाकायचे. हे झाले हार्डवेअर. पहील्या वेळी हे उपकरण प्लग केले की ते त्याचे सॉफ्टवेअर (डिव्हाईस ड्रायव्हर) इन्स्टॉल करते. हे झाले की सॉफ्टवेअरचे स्कॅन बटन क्लिक केले की ते उपलब्ध वायफाय दाखवते. पुढची प्रक्रिया मोबाईलवरुन वायफायला कनेक्ट करण्यासारखीच.

सर्वांना धन्यवाद, कालच संध्या काळी ह्या यंत्राचा वापर सुरु केला आहे,

खिडकीजवळ ४ ते ५ एम्बिपिस आणि कोप-यात ०.४ ते ०.५ अशी रेंज आहे पण हे फक्त डाउनलोडला, अपलोडला कुठेही ७ ते ९ एम्बिपिस दाखवतंय, हे काय भानगड आहे कळाले नाही.

आज रात्री डेस्क्टॉपला जोडुन पाहतो काय होतेंय ते.

मिलिंद के's picture

10 Apr 2017 - 10:34 am | मिलिंद के

सध्या तरी जिओ फायद्याचेच आहे.
रीलायंस ने मोबाईल रेट मधे क्रांतीच घडवून आणली. आठवा,४० पैसे कॉल,दुनिया मुठ्ठी मे तेच आताही घडतेय.२५० रू चे १जीबी देणार्या कंपण्यांनी आतापर्यंत कीती लूटले. त्याच कंपण्या आता धडाधड रेट कमी करत आहेत. म्हणजे कमी करूनही परवडत असेल तर या आधी या कंपण्यांनी केवढी माया जमवली असेल ?तेव्हा आपली जुनी सीम कार्ड बंद न करता त्या मधे अत्यावश्यक कॉल साठी कमी कीमतीचे टॉप अप भरावे.आणि नेट साठी जिओ ऊत्तम ! मी माझ्या जिओ मार्फत यु ट्युब , न अडकता पाहतो. समस्या येते ती एच डी लाईव्ह पाहताना. रेल्वे रीझर्वेशन,लाईट बील ,एल आई सी, इ. सर्व सोपस्कार व्यवस्थीत पार पडताहेच की सर्फीगलाही अडचन येत नाही.मोठ्या फाईल डाऊनलोड करण्यासाठी चालू ठेऊन ईतरही कामे करू शकतो. तेव्हा माझे म्हणणे सध्या तरी जीओ च ऊत्तम !

मिलिंद के's picture

10 Apr 2017 - 10:35 am | मिलिंद के

सध्या तरी जिओ फायद्याचेच आहे.
रीलायंस ने मोबाईल रेट मधे क्रांतीच घडवून आणली. आठवा,४० पैसे कॉल,दुनिया मुठ्ठी मे तेच आताही घडतेय.२५० रू चे १जीबी देणार्या कंपण्यांनी आतापर्यंत कीती लूटले. त्याच कंपण्या आता धडाधड रेट कमी करत आहेत. म्हणजे कमी करूनही परवडत असेल तर या आधी या कंपण्यांनी केवढी माया जमवली असेल ?तेव्हा आपली जुनी सीम कार्ड बंद न करता त्या मधे अत्यावश्यक कॉल साठी कमी कीमतीचे टॉप अप भरावे.आणि नेट साठी जिओ ऊत्तम ! मी माझ्या जिओ मार्फत यु ट्युब , न अडकता पाहतो. समस्या येते ती एच डी लाईव्ह पाहताना. रेल्वे रीझर्वेशन,लाईट बील ,एल आई सी, इ. सर्व सोपस्कार व्यवस्थीत पार पडताहेच की सर्फीगलाही अडचन येत नाही.मोठ्या फाईल डाऊनलोड करण्यासाठी चालू ठेऊन ईतरही कामे करू शकतो. तेव्हा माझे म्हणणे सध्या तरी जीओ च ऊत्तम !

सतिश गावडे's picture

10 Apr 2017 - 11:41 am | सतिश गावडे

सहमत. मी ही माझा व्हॉइसचा एअरटेलचा पोस्टपेड चालूच ठेवून डेटासाठी जिओ वापरतो.

>>२५० रू चे १जीबी देणार्या कंपण्यांनी आतापर्यंत कीती लूटले. त्याच कंपण्या आता धडाधड रेट कमी करत आहेत. म्हणजे कमी करूनही परवडत असेल तर या आधी या कंपण्यांनी केवढी माया जमवली असेल ?

केवळ यासाठी आपण जिओचे आभार मानायला हवेत. :)

कंजूस's picture

11 Apr 2017 - 8:29 am | कंजूस

आता RCom ने रु २९९/महिना अनलिमिटेड ३जी डेटा + अनलिमिटेड कॅाल्स दिले आहे त्यासाठी आहे तो ३जी फोन वापरता येणार आहेच. त्यांचा स्पीड ७/३असतोच.

एमटिएनेलने ९९/२८ दिवस प्रिपेडमध्ये २जिबी ३जी नेट दिलं आहे. स्पीड ३/३ असतोच.

कल्याण स्टे फ्री वाइफाइ एक तासभर ४०/३० एमबिपिएस देते।तिथे सहा जिबी कंटेंट झटकन डाउनलोड होते.

वगिश's picture

30 Apr 2017 - 5:32 pm | वगिश

हा जीओ चा परिणाम झाला.

होय नक्कीच॥ अगोदर लुटत होते सर्व॥

सतिश गावडे's picture

11 Apr 2017 - 9:39 pm | सतिश गावडे

जिओने आज "धन धना धन" योजना जाहीर केली आहे.

आधीच्या ३०३ आणि ४९९ च्या योजनेत ट्रायच्या नियमांचे उल्लंघन होत होते. आता ३०९ आणि ५०९ च्या योजनेत नाही होणार.

कसे ते ट्राय आणि रिलायन्सलाच माहिती :)

>>ट्रायच्या नियमांचे उल्लंघन होत होते.>>

प्रमोशनल ओफर ठेवण्याच्या मुदतीवर बंधन आहे ठराविक महिन्यांचे. जियोवाले नाव बदलून स्किम चालवतात त्यावर एरटेलने आक्षेप घेतला आहे.

काजुकतली's picture

14 Apr 2017 - 5:30 pm | काजुकतली

इतर नेटवर्क सारखा जीओचा स्पीड दिवसभर कमीजास्त होत नाही, बहुतेक वेळेस चांगला मिळतो , 1 gb खाऊन झाले की तो धापकन 128 kbps ला येतो.

कॉल dropping चा मात्र खूप त्रास आहे. फुकटे गेले कीं त्रास संपणार ह्या आशेवर आहे. जिओ नेटवर्क अजून सगळीकडे उपलब्ध नाहीये. ह्या सगळ्या वर कधी मात होणार देव जाणे.

जव्हेरगंज's picture

14 Apr 2017 - 6:29 pm | जव्हेरगंज

Indoor speed (घराच्या आत) प्रचंड कमी मिळतोय.
10 ते 15kbps
:(

घराच्या बाहेर
3.5mbps
:)

याचं जरा काहीतरी झालं पाहिजे.