उत्तुंगतेचा प्रवास...||२||

ओ's picture
in भटकंती
17 Mar 2017 - 9:08 am

पहाटेचे चार वाजले मी आणि माझा मित्र घड्याळाच्या गजराने उठलो रोजचे सोपस्कार उरकून,रूम च्या बाहेर आलो,अजून बाहेर पहाटेचा अंधार आणि हवेत आल्हाददायक गारवा होता

बाहेर पडल्यावर ढाबा वजा हॉटेल वर सकाळचा चहा घेतला आणि त्याच धाब्यावर रुपये 20 प्रति काठी ह्या दराने मी व मित्राने 2 काठ्या घेतल्या,कि जेणे करून आमचं ट्रेकिंग सोपं होईल

आता आम्ही ओम नमः शिवाय म्हणत,तृतीय केदार असलेल्या तुंगनाथ आणि चंद्राशीला ट्रेक ला सुरवात केली

घनदाट जंगला मधून जाणारा तो रस्ता फारच सुंदर होता,तुंगनाथ मंदिरा पर्यंत चा रास्ता उत्तराखण्ड सरकारने सिमेंट चा बनवुन यात्रेकरूंची चांगली सोय केली आहे ,

आज पर्यंत एवढ्या सुंदर रस्त्या वरून मी कधीच प्रवास केला नव्हता,त्या रस्त्याने आमच्या साठी जणू काही झाडावरून गळलेल्या पानांचा आणि अधेमधे खेचराची लिद असलेल्या पायघड्या घातल्या होत्या,....आ हा हा त्यावरून चालण्याचा अनुभव काही औरच

आता जस जसे आम्ही वरती चढू लागलो तस तस समोरच्या पर्वत रंगांमधली हिमशिखर आम्हाला खुणावत होती,जणू काही ते डोकवर करून आम्हाला पाहत आहेत ,मस्त वाटलं एकदम

मला वाटत त्या दिवशी निसर्ग आमच्या वर जरा मेहेरबान होता ,ते दृश्य नजरेत साठवतो ना साठवतो तोच सूर्य नारायणाच्या आगमनाची चाहूल लागली,आणि एखाद्या आई ने सकाळी उठल्यावर आपल्या बाळांना न्हाऊ घालावं तस आपल्या सोनेरी किरणांनी पांढऱ्या शुभ्र बर्फाच्छादित शिखराना सूर्य नारायण न्हाऊ घालत होता,निसर्गाचा तो दिव्य सोहळा आम्ही डोळे भरून पाहत होतो तिथून पाय निघेना,पण निघालो,आता वाटेत लागलेल्या एका ठेल्या वर चहापाना साठी थांबलो,

चुली वरच्या चहा ची मजाच काही और,त्या ठेल्या वरच्या काकूंशी जरा गप्पा मारल्या आणि पुढच्या प्रवासाला सुरवात केली

काही अंतर चालून गेलो तर एका झुडपात माझ्या मित्राला काही तरी हालचाल दिसली,जरा जवळ गेल्या वर लांडोर सारखा तिच्या पेक्षा हि सुंदर असा पक्षी दिसला,जर त्याला पिसारा असता तर तो मोरच झाला असता असं त्याच देखणं रूप,त्याच्या त्या रूपाला कॅमेरात बंधिस्त करून आम्ही पुढची वाट धरली,एका उत्तराखंड मधल्या माणसांनी सांगितलं की तो उत्तराखंड चा राज्य पक्षी मुनाल आहे,

साधारणतः आम्ही 10 च्या सुमारास मंदिराच्या परिसरात पोचलो,काही लोक रस्त्यात भेटली चार शब्द बोलली आणि आपल्या मार्गाला लागली,त्यातही एक गृहस्तांचे शब्द मनाला भिडले म्हणाले जमलं तर राहा आज तुंगनाथ ला ,चंद्रप्रकाशातल्या रात्रीचा अनुभव घ्या आणि नशीबवान असाल तर कस्तुरी मृगाचे हि दर्शन घडेल ,तसाही mumbai has many reason to be busy,here u r free,नुसतीच हसुन मान डोलावली आणि मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला,

मंदिराच्या गेट वरच सरकारने लावलेला बेटी बचाव बेटी पढाव ह्या जाहिरातीचा फलक दिसला, आणि मनाला बर वाटल,लोकांत ह्या बद्दल जागरूकता निर्माण करण्या साठी यात्रा हे चांगलं option होत

तुंग नाथाच डोळे भरून दर्शन घेतलं,मित्रा ने शिवमानस पूजा गायला सुरवात केली आणि हे मन शिवचरणी लीन होऊ लागल त्या साठी मित्रा ला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच,आम्ही दोघांनीही थोडा वेळ त्या शांततेचा अनुभव घेतला,पण आता पुढच्या प्रवासाला सुरवात करायची होती,चंद्राचे विश्राम स्थान असलेलं चंद्राशीला शिखर

ती उत्तुंग शिखर आम्हाला वरूनच खुणावू लागली

---- ओंकार जोशी

प्रतिक्रिया

जगप्रवासी's picture

17 Mar 2017 - 1:38 pm | जगप्रवासी

फोटो नसतील तर प्रवासवर्णन अधिकृत मानलं जात नाही. त्या मृणाल पक्षाचा, त्या शिखरांचा येऊ दे की फोटो. काही अडचण असल्यास "मदत पान" वर जा तिथे संपूर्ण माहिती दिलेली आहे.

मोनाल नाव आहे त्या पक्ष्याचे.

मी मोबाईल वरून फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न केला पण होत नाही…..मला ही फोटो टाकायला आवडले असते पण कसे करावे काळात नाही,पोस्ट इमेज हि site देखील वापरून पहिली पण प्रयत्न असफल झाला,माझा लॅपटॉप सध्या माझ्या कडे नाही तो आला की सर्व फोटो अपलोड करेन….तो पर्यंत क्षमस्व ,
….लोभ असावा
----ओंकार जोशी

जगप्रवासी's picture

18 Mar 2017 - 10:50 am | जगप्रवासी

तोपर्यंत आम्ही दम धरू पण फोटो नक्की अपलोड करा.

ओ's picture

18 Mar 2017 - 2:10 pm |

धन्यवाद

ऋतु हिरवा's picture

28 Mar 2017 - 5:35 pm | ऋतु हिरवा

अजून थोडं विस्तृत येउ दे. खूपच अपुरं वाटतय प्रवास वर्णन