एवढ्यात काय खरेदी केलत - २

रेवती's picture
रेवती in काथ्याकूट
19 Mar 2017 - 8:05 am
गाभा: 

नमस्कार,
गविंनी सुरु केलेल्या खरेदीच्या पहिल्या धाग्याने शतक ठोकल्याने दुसरा धागा सुरु करत आहे. हा धागाही शतकी व्हावा अशी इच्छा आहे. आज माझी अ‍ॅमेझॉनची उरलेली ऑर्डर आली. मुलाच्या खोलीत इकडे तिकडे ठेवलेली पुस्तके नीट राहण्यासाठी जड बुक एन्डस मागवले होते ते आले. दोन मनुष्याकृती आधार देऊन पुस्तके सरळ करतायत अशा प्रकारातले बुक एन्डस आहेत. एक लोशन मागवलेले आले. कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला. नवर्‍याच्या कारसाठी चार्जर, ५ युएसबी आउटपुटस असलेला मागवला होता. या वस्तू अजून वापरलेल्या नाहीत. उद्यापासून वापरात येतील. हे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये हिंडावं लागलं नाही म्हणून बरं वाटतय. एक वॉल क्लॉक मागवलं आहे ते अजून आलं नाही. त्यावर टॉम ब्रेडीचं चित्र आहे. तुम्ही तुमची खरेदी येथे लिहून धागा यशस्वी करा किंवा धागा यशस्वी होण्यासाठी खरेदी करा.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

इडली डोसा's picture

19 Mar 2017 - 8:51 am | इडली डोसा

कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला

याची लिंक द्याल का? मलाही घ्यायचा आहे पण क्णता घ्यावा हे ठरत नाहिये. आणि मुलीला सेफ अशी पाण्याची बाटली कोणती घेऊ एनी सजेशन्स? (प्लॅस्टीक आणि काच नको आहे)

रेवती's picture

19 Mar 2017 - 7:07 pm | रेवती

https://www.amazon.com/gp/product/B01KM1J38G/ref=oh_aui_detailpage_o02_s... हा सेलफोन होल्डर आहे.

काचेची बाटली जड होते, फुटते असे वाटत असेल तर बाहेरून रबरी आवरण असलेल्या मिळतात, अन्यथा स्टीलच्या वापराव्यात असे वाटते. अ‍ॅल्यूमिनिअम आणि स्टीलमध्ये गफलत होवू शकते म्हणून स्टीलचीच बाटली बघून घ्यावी. मी दोन घेतल्यात टारगेटमधून व भेट म्हणून तिसरी मिळाली. अडगळीत पडलेली चौथी काढली पण ती अ‍ॅल्यूमिनिअमची असल्याने लक्षात आले. प्रथमदर्शी ती बाटली स्टीलची वाटते. प्लास्टिक मलाही नको वाटते पण मुलासाठी घेतली कारण खेळताना मैदानाच्या कडेला नीट ठेवणे वगैरे मुलांच्या लक्षात रहात नाही.

सेलफोन होल्डर चांगला वाटला. बाटली मुलीसाठीच घ्यायचीये त्यामुळे स्टील बघतीये. पण फार फसव्या दिसतात आणि स्टील / अ‍ॅल्युमिनीअम फरक कसा ओळखायचा? मी एक स्टील म्हणुन वापरते पण ती बहुतेक अ‍ॅल्युमिनीअम आहे अशी शंका येतीये आता मला.

लॉरी टांगटूंगकर's picture

20 Mar 2017 - 11:25 am | लॉरी टांगटूंगकर

मॅग्नेट?
स्टील का? अ‍ॅल्युमिनिअम का नाही? काही स्पेसिफिक कारण?

इडली डोसा's picture

21 Mar 2017 - 12:57 am | इडली डोसा

इथे कंपॅरीजन वाचु शकता. स्टील जास्त सेफ म्हंटल आहे.

रेवती's picture

21 Mar 2017 - 12:27 am | रेवती

याची हेल्प होतिये का बघ.
Aluminum sounds duller and has less of a ring than stainless steel. Rap your knuckles on the edge of the pot or bang it with a wooden spoon.
Aluminum feels slightly warmer than stainless steel at room temperature.
After being washed, aluminum tends to dull slightly, while stainless steel usually stays bright.
Because aluminum is softer than stainless steel, a key will scratch aluminum much more readily than stainless steel.
If a magnet sticks to the side of the pot (even weakly), it is definitely stainless steel and not aluminum. (Note: If a magnet does not stick, you still can’t tell which metal it is, but you can be sure it’s stainless steel if the magnet does stick!)

पुण्यात असाल तर रामेश्वर चौकात (शनिपार कडून शिवाजी रस्त्याकडे जाताना बाबुगेनु चौकापुढचा चौक) उत्तम क्वालिटीच्या तांब्याच्या बाटल्या मिळतात. अल्युमिनियम अजिबात नकोच. तांबे नाही मिळाले तर स्टील घ्या.

अभिजीत अवलिया's picture

19 Mar 2017 - 11:00 am | अभिजीत अवलिया

हल्लीच हा कार चार्जर अमेझॉन वरून घेतला. खूप फास्ट चार्जिंग करतो. आवडला.
Tech Sense Lab Qualcomm Certified Quick Charge 2.0 Car Charger

यामाहाची 'फसिनो' घेतली ३ आठवड्यापूर्वी. गाडी खूप आवडली.

तांब्याची भांडी रोजच्या जीवनातून तशी हद्दपार झालेली आहेत म्हणून पाण्यासाठी एक तांब्याची बाटली घेतली तुळशीबागेतून.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2017 - 8:19 pm | अत्रुप्त आत्मा

@यामाहाची 'फसिनो' घेतली ३ आठवड्यापूर्वी. गाडी खूप आवडली. ››› मीही घ्यायच्या विचारात आहे. सस्पेंशन,लाइट, ब्रेक्स कसे आहेत. १५ ते ५० कि. मी. अंतर चालवताना सीट कंफर्टेबल वाटतय का?
गाडित काही उणिवा जाणवल्यात का?

अभ्या..'s picture

19 Mar 2017 - 8:21 pm | अभ्या..

घ्या गुरुजी,
मांडी घालून येतीय चालवायला.
मानो या ना मानो
मांडी फसियानो

अभिजीत अवलिया's picture

19 Mar 2017 - 9:45 pm | अभिजीत अवलिया

मी नवीन मॉडेल घेतले आहे ज्यात केंद्र सरकारच्या हल्लीच्या नियमाप्रमाणे गाडी चालू केली की हेडलाईट आपोआप चालू होते आणी गाडी बंद केली की हेडलाईट बंद. हेडलाईटला वेगळे चालू बंद करायचे बटन नाही. त्याची एक मुख्य समस्या म्हणजे बऱ्याच लोकांना केंद्र सरकारच्या ह्या नवीन नियमांबद्दल माहीत नसल्याने रस्त्यावरून जाताना बरेचजण हेडलाईट चालू असल्याची सूचना करतात. :)
आतापर्यंत १०० किमी पण चालवलेली नाही कारण नंबर मिळाला न्हवता. कालच नंबर मिळाला त्यामुळे आज एका दिवसातले सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास १६ किमी ड्रायव्हिंग केले. तुलनेत बऱ्या रस्त्यांवरून गाडी चालविल्याने अजूनतरी सस्पेन्शन चांगलेच वाटतेय. ब्रेक्स देखील ठीक आहेत.
सीट कंफर्टेबल वाटतेय. गाडीची उंची थोडी कमी आहे त्यामुळे महिलांसाठी अतिशय उत्तम आहे.

उणिवा -
१) पेट्रोल टाकीचे झाकण सीटच्या खाली आहे. त्यामुळे पेट्रोल भरताना सीट उचलावी लागते.
२) किक मारून गाडी चालू करायची असल्यास गाडी सेन्टर स्टॅन्डला उभी करावी लागते.

अनन्त्_यात्री's picture

20 Mar 2017 - 10:54 am | अनन्त्_यात्री

दुचाकीला "गाडी" म्हणणे ही खास पुणेरी सवय !!!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2017 - 9:56 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद.

इरसाल कार्टं's picture

20 Mar 2017 - 12:22 pm | इरसाल कार्टं

मीही घेतलीय. अगदी आरामात चालवता येते. ४५ वर्षी बाबा शिकलेत चालवायला. तारुण्यातली राहिलेली हौस फिटवतायेत.

संदीप डांगे's picture

21 Mar 2017 - 12:59 am | संदीप डांगे

४५ म्हणजे तरुणच आहेत की... :-)

एमी's picture

20 Apr 2017 - 11:57 am | एमी

+1

old age = own age + 20 years हे नेहमी ध्यानात ठेवायचं :D

कुत्र्याशी संबंधित सप्लाईज अमेझॉनवर अतिशय स्वस्त पडतात असा अनुभव आहे.

डॉग फूड, लीशेस, पिंजरा (जस्ट इन केस), खेळणी वगैरे पुष्कळ मागवून समाधानकारक आहे अमेझॉन (पेटशॉपपेक्षा कमी किंमत आणि वेळेत डिलीव्हरी याबाबत)

पण दोन ब्लॅक स्पॉट्स असे:

१. कारसीट कुत्र्याने खराब करु नये म्हणून वेगळं प्रोटेक्टिव्ह कव्हर घेतलं. ते कारमधे लावताच लगेच फाटलं (त्याचे लटकवणारे बेल्ट्स.

२. प्रवासात थंडीपासून कुत्र्याच्या रक्षणासाठी पुलओव्हर गरम कोट मागवला होता. त्यात आगोदरच एका पांढर्या कुत्र्याचे केस आतून चिकटले होते. यक्क.

..परत केला. रिफंड मिळाला.

अभ्या..'s picture

19 Mar 2017 - 7:42 pm | अभ्या..

प्रवासात थंडीपासून कुत्र्याच्या रक्षणासाठी पुलओव्हर गरम कोट मागवला होता.

ऐश आहे बाबा.

संजय क्षीरसागर's picture

19 Mar 2017 - 11:57 pm | संजय क्षीरसागर

व्यू ४०" फुल एचडी टिवी विथ टाटा स्काय एचडी सेट टॉप बॉक्स घेतला. निव्वळ धमाल क्वालिटी आहे ! इतरांकडचे टिवी पुन्हा निःपक्षपतीपणे पाहिले..... व्यूच्या परफॉर्मन्सला खरंच तोड नाही .

रेवती's picture

20 Mar 2017 - 12:02 am | रेवती

अरे वा! बरय.
गविंनी सुचवल्याप्रमाणे लेनोवोचा सेलफोन (आवडला म्हणून) ऑर्डर केलाय. अजून आला नाहीये. वाट बघिंग.

श्री's picture

25 Mar 2017 - 5:19 pm | श्री

व्यु ४० कितिला पडला, फ्लिपकार्ट वर २ मॉडेल दिसतायेत, युएसबी किती पोर्ट आहेत?

मीही इतक्यात गावच्या घरासाठी व्यु ४० घेतला. आजून इंस्टाल करायचा बाकी आहे.
दोन मॉडेल म्हणत असाल तर १) साधा ४० इंच आहे रुपये २१,९९९/- २) स्मार्ट ४० इंच आहे रुपये २६,९९९/-

मला गावाच्या घरासाठी स्मार्ट TV ची गरज नसल्या मुळे साधा घेतला. युएसबी पोर्ट १ आहे

मॉडेल २०१५ कि २०१७ आहे, वारंटी किती वर्षाची?

किसन शिंदे's picture

20 Mar 2017 - 12:18 am | किसन शिंदे

लिहायला पेन नव्हतं म्हणून मग आज दुपारीच बाहेरून येताना दोन रुपयांचे यूज अॅण्ड थ्रो पेन घेतलं नटराजचं.

आमच्या चाळीतला बोका पक्का बदमाश आहे. माझ्यावर खुन्नस असल्याने नेमकं माझ्याच टू व्हिलरच्या सीटवर ओरखडे करतो. त्यापासून बचावासाठी एक ताडपत्रीचे कव्हर काल घेतले जुन्या मार्केटला. लय घासाघीस करावी लागली.

अरे हो, गावी रात्रीच्या वेळी कोंबड्या डालण्यासाठी एक मोठी पाटी (डालं?) हवी होतं आजीला. खूप शोधाशोध केली भुलेश्वरला जावून तेव्हा कुठे मिळालं.

पैसा's picture

20 Mar 2017 - 11:49 am | पैसा

मी परवा तूरडाळ आणली. भाव किलोला ७३ रुपये बघून डोळ्यावर विश्वास बसत नव्हता! हल्ली १२०/१३० बघायची सवय झालेली ना!

सस्नेह's picture

20 Mar 2017 - 2:29 pm | सस्नेह

अय्या ! कित्ती स्वस्त !
मला परवा ८० रु. किलो मिळाली.
आता गोव्याला येईन ना, तेव्हा पोतं घेऊन येईन हं, तूरडाळ घ्यायला ! =))

सस्नेह's picture

20 Mar 2017 - 2:31 pm | सस्नेह

रच्याकने, कालच सिहोरी गहू घेतले १०० किलो, २७ रु. ने.
त्यात बरेच नमुने होते. हा एम पी सिहोरी.

पैसा's picture

21 Mar 2017 - 9:06 am | पैसा

गोव्यात गव्हाचे प्रकार मिळत नाहीत. मी हल्ली कसे ओळखायचे ते विसरलेय!

पैसा's picture

21 Mar 2017 - 9:04 am | पैसा

नाहीतर इकडेच घेऊ.

अनुप ढेरे's picture

20 Mar 2017 - 2:40 pm | अनुप ढेरे

जरा संक्षींना द्या एक किलो माझ्यातर्फे. अलिकडेच वाद घालत होते डाळ स्वस्त झालेली नाही म्हणून.

स्वस्त झाली असेल तर आनंदचे. मायला, कुकींग गॅस एकदम ५४० चा ७२० झालायं, त्यात थोडासा दिलासा !

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2017 - 2:42 pm | श्रीगुरुजी

काहीतरी गडबड दिसते. मागच्याच आठवड्यात ऑनलाईन ७६२.१५ रूपये भरून सिलिंडर बुक केला आणि ३-४ दिवसांनी घरी आला. सिलिंडर आल्यानंतर दुसर्‍या दिवशी खात्यात अनुदानाचे २९०.८२ रूपये जमा झाल्याचा लघुसंदेश आला. म्हणजे सिलिंडर ४७१.३३ ला मिळाला.

संजय क्षीरसागर's picture

22 Mar 2017 - 7:06 pm | संजय क्षीरसागर

अकाऊंट बघतो. धन्यवाद !

कपिलमुनी's picture

22 Mar 2017 - 8:29 pm | कपिलमुनी

मा. पंप्र. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देउन तुम्ही सबसिडी सोडली नाही का ??
leave gas subsidy

संजय क्षीरसागर's picture

22 Mar 2017 - 8:58 pm | संजय क्षीरसागर

सबसीडी सोडा म्हणायला त्यांना काय जातंय ? ७२० रुपयाला गॅस घेऊन त्याच्यावर काय कुकवणार ?

झक मारली आणि भावनेच्या भारात सबसीडी सोडली, असं आता पब्लिकला वाटायला आता वेळ लागणार नाही.

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2017 - 9:08 pm | श्रीगुरुजी

मुनीवर्य,

इथे परत फिरकला नाहीत हो? पलायन केलेलं दिसतंय?

कपिलमुनी's picture

23 Mar 2017 - 12:49 am | कपिलमुनी

;) :)

केजरीवाल छाप प्रतिसाद. =))

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2017 - 9:26 am | श्रीगुरुजी

आपला आदर्श असलेल्या केजरीवालांप्रमाणे हे पण पळपुटे.

कपिलमुनी's picture

23 Mar 2017 - 3:45 pm | कपिलमुनी

राजकारण्याचे आदर्श माझे नाहीत , तुमची गल्ली चुकत आहे !
मूळ प्रश्नाला बगल छान दिलीत .
बाकी पळपुटे म्हणत असाल तर म्हणा काय शष्प फरक पडत नाही , प्रत्येक धागा , प्रतिसाद मॉनिटर करत बसण्या एवढा मी रिकामटेकडा नाही.
तुम्हाला खोटारडा म्हणाले होते कारण तुम्हाला पुरावे मागून तुम्ही ते दिले नव्हते , तेव्हाही बऱ्याच कोलांट्या उड्या मारल्या होत्या हवे तर जुने धागे चाळोन बघा .

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2017 - 7:39 pm | श्रीगुरुजी

ज्या हिरिरीने तुम्ही केजरीवालांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींचे समर्थन करीत असता, त्यावरून तुमचे आदर्श कोण आहेत हे अत्यंत स्पष्ट आहे. केजरीवाल छाप प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक धागा, प्रत्येक प्रतिसाद मॉनिटर करण्याची गरज नसते. समोर दिसलेला कोणताही धागा उघडायचा आणि धाग्याचा विषय कोणताही असला, धाग्याच्या विषयाचा राजकारणाशी अजिबात संबंध नसला तरी तिथे संदर्भहीन केजरीवाल छाप प्रतिसाद द्यायचे हे तुमचे व्यवच्छेदक लक्षण आहे (उदा. हा धागा). तुमच्या असल्या केजरीवाल छाप प्रतिसादावर समोरच्याकडून सणसणीत उत्तर मिळाले की तिथून पलायन करायचे हे देखील याच लक्षणाचा भाग आहे (उदा. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धागा). असंख्य पुरावे देऊनसुद्धा एखाद्याला वारंवार खोटारडा म्हणणे, त्याला कावीळ झाली आहे असे म्हणणे हे केजरीवालांच्या बिनदिक्कत खोटे आरोप करण्याच्या व्यसनाशी सुसंगतच आहे. आपले केजरीवाल छाप प्रतिसाद पहायचे असतील तर जुने धागे चाळोन बघा.

संदीप डांगे's picture

30 Mar 2017 - 12:39 am | संदीप डांगे

असो.

सदर प्रतिसादावरुन असे लक्षात येतंय की साक्षात मोदींनी आवाहन करुनही तुम्ही सबसिडी घेत आहात. विषय संपला.

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 2:39 pm | श्रीगुरुजी

मुनीवर्य या धाग्यावरून नाहीसे झाले तेव्हाच विषय संपला होता. तुम्ही तो परत उकरून काढलात. असो.

सबसिडी सोडण्याइतके आम्ही श्रीमंत नाही. श्रीमंतांचे ट्रकचालक सुद्धा खिशात २०-२० लाख रूपये रोख घेऊन हिंडतात. आम्ही तेवढे श्रीमंत नाही.

कपिलमुनी's picture

31 Mar 2017 - 7:19 pm | कपिलमुनी

मिपा सोडून बरीच कामे आहेत. त्यामुळे "शेवटचा प्रतिसाद माझा " टाईप लिहिणे जमत नाही.
आणि मूळ प्रश्नाला सोडून इतर गोष्टी मधे आणल्यात तेव्हाच उत्तर कळाले . अर्थात तो तुमचा वैयक्तीक चॉईस आणि निर्णयस्वातंत्र्य आहे.
फक्त भाजपाचे धोरणाचे एवढे कट्टर पुरस्कर्ते असूनदेखील तुम्ही मा.पंप्रंच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचे वाचून अंमळ मौज वाटली इतकेच !
बाकी चालू द्या !
(गायब) मुनी

नेहमीप्रमाणे व्यक्तीगत प्रतिसाद.

आपवाल्यांकडून वेगळे काय अपेक्षित असणार.

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 8:37 pm | श्रीगुरुजी

मिपा सोडून बरीच कामे आहेत. त्यामुळे "शेवटचा प्रतिसाद माझा " टाईप लिहिणे जमत नाही.

"शेवटचा प्रतिसाद माझा" टाईप लिहिणे जमत नसले तरी केजरीवाल टाईप प्रतिसाद लिहिण्यात मात्र आपण प्रचंड कौशल्य कमावले आहे याविषयी दुमत नसावे.

आणि मूळ प्रश्नाला सोडून इतर गोष्टी मधे आणल्यात तेव्हाच उत्तर कळाले . अर्थात तो तुमचा वैयक्तीक चॉईस आणि निर्णयस्वातंत्र्य आहे.

धागा खरेदीवर आहे. "गॅसवरील सबसिडी सोडणे" हे विषयांतर तुम्ही करून धागा भरकटविण्याचा प्रयत्न केलात. मी फक्त प्रत्युत्तर दिले. अर्थात केजरीवालांच्या पित्त्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नव्हती.

फक्त भाजपाचे धोरणाचे एवढे कट्टर पुरस्कर्ते असूनदेखील तुम्ही मा.पंप्रंच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचे वाचून अंमळ मौज वाटली इतकेच !
बाकी चालू द्या !
(गायब) मुनी

कोणताही विषय असला तरी केजरीवाल छाप प्रतिसाद देण्याचे आपले व्यसन बघून कायमच मौज वाटत आली आहे.

संदीप डांगे's picture

31 Mar 2017 - 8:46 pm | संदीप डांगे

उकरुन बिकरुन काही काढला नाही हो, इथेच याच धाग्यावर आहे जे आहे ते, तेवढेच दिसले ते बोललोय, उकरुन काढणे म्हणजे एकिकडचे दुसरीकडे उकरुन क्षुद्रपणे ज्या त्या धाग्यावर ट्रक घेऊन फिरणे, वगैरे वगैरे....

बाकी तुम्ही सबसिडी सोडण्याइतके श्रीमंत नाही म्हणून सोडली नाही हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न. त्यात भोचकपणा करणे योग्य नाही. त्रास झाल्याबद्दल मनापासून दिलगीरी व्यक्त करतो.

पण....
हे आधीच अनावश्यक थयथयाट न करता नीट सांगितले असते तर काहीच नसतो हो बोललो.

विषयांतराबद्दल क्षमस्व.

श्रीगुरुजी's picture

31 Mar 2017 - 8:55 pm | श्रीगुरुजी

त्याचं असं आहे डांगेराव, मुनीवर्यांनी धाग्याच्या विषयाशी अजिबात संबंध नसलेला विषय या धाग्यावर आणून त्या निमित्ताने माझ्यावर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाईलाजाने मला त्यावर उत्तर द्यावे लागले. त्यानंतर मुनीवर्य ६ दिवस गायब असल्याने तो विषय तिथल्या तिथे संपला असे मी समजत होतो. तुम्ही विनाकारणच धाग्याशी संबंधित नसलेला तो विषय पुन्हा उकरून काढला. नाईलाजाने मला पुन्हा एकदा उत्तर द्यावे लागले. जर दुसरीकडचा ट्रक इथे घेऊन येणे म्हणजे क्षुद्रपणे दुसर्‍या धाग्यावरचा मुद्दा इथे उकरणे असेल, तर त्याच न्यायाने ,माझ्या मोदीसमर्थनाचा, या धाग्याच्या विषयाशी अजिबात संबंध नसलेल्या सबसिडीशी संबंध जोडणे, हेसुद्धा क्षुद्रपणे दुसर्‍या धाग्यावरचा मुद्दा इथे उकरणेच आहे. असो. जर यापुढे या धाग्यावर माझ्याबद्द्ल नवीन व्यक्तिगत टिप्पणी येणार नसेल, तर हा विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे.

संदीप डांगे's picture

31 Mar 2017 - 9:04 pm | संदीप डांगे

सबसिडी सोडण्याइतके आम्ही श्रीमंत नाही

>> माझ्यासाठी हा विषय इथेच संपला आहे. धन्यवाद!

किसन शिंदे's picture

20 Mar 2017 - 2:43 pm | किसन शिंदे

स्वस्तंय की मग.. =))

जास्तीचं सामान घेतलं की त्यावरही दोन-तीन रूपये डिस्काऊंट मिळून जातं आमच्याकडे डिमार्टला. =))

पैसा's picture

21 Mar 2017 - 9:07 am | पैसा

तूरडाळ आणलीस का ते सांग आधी!

इरसाल कार्टं's picture

20 Mar 2017 - 12:23 pm | इरसाल कार्टं

ख्या ख्या ख्या

वरुण मोहिते's picture

20 Mar 2017 - 12:32 am | वरुण मोहिते

खरेदी केलं रुपये २१५ एक पाकीट . १५ दिवसांपूर्वी कामानिमित्त सिंगापूर ला गेलो असताना

आतिज्याला, काय सांगतोस? २१५?
सिंगापूरला मिळाले?
गायछाप मिळते का बे? केवढ्याला असते?

गवि's picture

20 Mar 2017 - 7:38 am | गवि

आर एम डी काय अाहे?

रसिकलाल माणिकचंद धारिवाल अर्थात पूर्वाश्रमीचा माणिकचंद गुटखा. खोली पुडी खुशबू उडी.

अभ्या..'s picture

20 Mar 2017 - 11:06 am | अभ्या..

उंचे लोग उंची पसंद रे.

वरुण मोहिते's picture

20 Mar 2017 - 12:46 am | वरुण मोहिते

आर एम डि पण दुबई वैग्रे वरून एक्स्पोर्ट केलेला माल असतो . ऑस्ट्रेलिया ला ३०० च्या आसपास .. काहीतरी कर लेका आपल्या गायछाप साठी ,, मेक इन इंडिया

वेदांत's picture

20 Mar 2017 - 10:24 am | वेदांत

Fujitsu Lifebook A555 लॅपटॉप घेतला. ८जीबी रॅम,१टीबी साटा हार्डडिस्क , मेड इन जर्मनी @२२४४० रुपये.

संजय क्षीरसागर's picture

20 Mar 2017 - 11:16 am | संजय क्षीरसागर

परफॉर्मन्स कळवा.

एकदम मस्त आहे लॅपटॉप. या २-४ दिवसात उबुन्टु १६.०४ आणि लायनक्स मिंट १८.०१ इंस्तॉल करुन पाहिल्या. दोन्ही ओएस १५ मिनीटात लोड झाल्या. बॅटरी बेकॅप चांगला आहे.

नितीन पाठक's picture

20 Mar 2017 - 3:25 pm | नितीन पाठक

अभिनंदन
कुठून घेतला ? ऑनलाईन का दुकानातून ??

वेदांत's picture

20 Mar 2017 - 4:35 pm | वेदांत

ऑनलाइन घेतला, ईबे वरुन
http://www.ebay.in/itm/FUJITSU-LIFE-BOOK-A555-LAPTOP-CORE-I3-5th-GEN-8GB...?

मराठी कथालेखक's picture

23 Mar 2017 - 1:42 pm | मराठी कथालेखक

विथ ओएस ? असल्यास कोणती ? प्रोसेसर कोणता ?

वेदांत's picture

23 Mar 2017 - 4:47 pm | वेदांत

Brand :FUJITSU
Model :-A555
Processor :-CORE I3 5TH GEN (Intel® Core™ i3-5005U processor, 3 MB, 2 GHz)
Processor Speed :-2.00 GHz

Graphics Processing Type:- Intel HD Graphics
Memory (RAM):-8 GB , 16 GB, 2 Memory slot(s) SO DIMM (DDR3, 1600 MHz)Dual channel support
DDR3L – 1,600 MHz
Hard Drive:-1 TB
Color :-BLACK
Optical Drive:- 8X SUPER MULTI DRIVE
Operating System:-DOS

@ गवि, तुम्हाला पुर्वि बोललो होतो, एक डॉबरमॅन घेण्याचा विचार आहे, अजुन घरुन पुर्ण परवानगी मिळालेली नाही, या महिनाअखेर पर्यंत मिळेल.

बाकी, जेसिबि चे सेफ्टी शुज घेतले, जड आहेत पण १००% कडक आहेत, इतर शुज पेक्षा.

ऑफिससाठी टोलेक्सो वरुन बरंच काही काही घेतलं जात दर महिन्याला, टुल्स वगैरे, चांगली आहे सर्विस.

हेमंत८२'s picture

20 Mar 2017 - 1:19 pm | हेमंत८२

दुचाकी चालवताना वापरण्या साठी एक जाकीट घ्यावयाचे आहे. कोणी सजेस्ट करू शकेल काय? ऑनलाईन पेक्षा स्वतः पाहून खरेदी करण्याचा विचार आहे..पुणे किंव्हा औरंगाबाद किंवा कोल्हापूर मध्ये एखादा शॉप असल्या सांगा.

.

LS2 कंपनीचे जॅकेट घ्या. ७७००/-

एकदम चांगले आहे. रेन लाईन आणि विंटर लाईन सह आहे.

दिपस्वराज's picture

22 Mar 2017 - 10:23 am | दिपस्वराज

मोदक, हे जॅकेट मुंबईत कुठे मिळेल? मी ऑन लाईन शोधले ते ८५००/- रु.

आपले फोनवर बोलणे झालेच..

इतरांच्या माहितीसाठी या लिंकवर चेकवा.

मदनबाण's picture

20 Mar 2017 - 8:53 pm | मदनबाण

अजुन काही नाही, २ दिवसांनपूर्वी मोह झाला होता, पण आवरला ! विश लिस्ट मध्ये कधीचा अ‍ॅडवुन ठेवला आहे... आता ती विश पूर्ण होणार का ?
हा प्रतिसाद फक्त हातभार म्हणुन हो ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सतरंगी रे... :- Dil Se

दोन जुड्या मेथी घेतली. पंधराला एक, पंचवीसला दोन. बायको रागावली, खूप महाग मिळाली म्हणून. जाऊ दे म्हटलं, मेथी जितकी महाग होत जाते तितकी ती चवदार लागते, आणि जितकी स्वस्त होते तितकी बेचव! ;-) खरं आहे की नाही?

इडली डोसा's picture

21 Mar 2017 - 1:15 am | इडली डोसा

जास्त चांगली लागेल = )

पैसा's picture

21 Mar 2017 - 9:09 am | पैसा

गुलटेकडी मार्केट यार्डापर्यंत चालत जावा. जास्त छान मिळेल

त्यापेक्षा मुविंच्या शेतावरून थेट खरेदी करावी म्हणतो. =))

मुवि, व्हेअर आर यू?

त्यापेक्षा मुविंच्या शेतावरून थेट खरेदी करावी म्हणतो. =))

सायकलने गेलात तर वृत्तांत टाका.

औरंगजेब's picture

21 Mar 2017 - 8:19 am | औरंगजेब

मी नुकताच आजीसाठी फ्लिपकार्टवरुन स्मार्टफोन मागवला होता
सॕमसंग झेड-२
४९९९/- ला मिळाला.

कसुरी मेथी ( पोपटी हिरव्या काड्या असलेली) महागच मिळते. मेथीप्राठासाठी बेस्ट.

दिपस्वराज's picture

22 Mar 2017 - 10:47 am | दिपस्वराज

मी नुकतंच, QUECHUA Forclaz 200 जॅकेट खरेदी केलं. Quechua 200

शब्दबम्बाळ's picture

22 Mar 2017 - 10:50 am | शब्दबम्बाळ

नुकताच logitech x50 हा ब्लूटूथ स्पीकर घेतला! किंमत - १४००/-
एकदम क्लास, माझ्या अपेक्षांपेक्षा भारी आहे... मला प्रत्यक्ष आवाज ऐकून मगच घ्यायचा होता त्यामुळे ऑनलाईन न मागवता क्रोमा मधून टेस्ट करून मग घेतला...
JBL Go पेक्षा पण भारी वाटलं मला प्रत्यक्ष ऐकताना! सध्या बेस्ट ब्लूटूथ स्पीकर म्हणता येईल हा. फिलिप्स वगैरे टिकत पण नाही याच्यासमोर!
दिसायला पण एक्दम छोटू आणि पोर्टेबल...
speaker

याशिवाय सोलर लॅम्प घेतलाय एक, एक्दम ग्रीन लँटर्न टाईप! आवडला मला, 2 महिने झाले नीट सुरु आहे.
lamp

अरे वा. दोन्हींच्या किंमती किंवा लिंका देऊ शकाल का?

शब्दबम्बाळ's picture

23 Mar 2017 - 8:52 am | शब्दबम्बाळ

X50 स्पीकर साठी लिंक. इथे तो १३०० रुपयांना मिळेल!

सोलर लॅम्प लिंक . मी २५० ला घेतलेला आता ३३३ रुपये दाखवतोय...

तेजस आठवले's picture

23 Mar 2017 - 4:47 pm | तेजस आठवले

अरे वा, एखादा सोलर लॅम्प घेऊन वापरायचा आहे, बाल्कनीत लावायला. मेन्टेनन्स काही करावा लागतो का ?
कोणी वापरले आहे का, वापरात असल्यास कृपया लिंक द्या

मी सालीची मूगडाळ घेतली धिरडी करायला. झालंच तर चितळेंच्या फुल क्रीम दुधाची (घरी तूप बनवायला बरं पडतं) एक बॅग आणि ब्रिटानिया न्यूट्री चॉईसचा एक पुडा!!
मागल्या म्हयन्यात फिनिक्समध्ये स्पीडोची स्विमिंग क्याप आणि सेल चालू होता म्हणून स्पीडोची स्विमिंग ट्रंक!!!

तूर्तास इतकंच!!

कुंदन's picture

22 Mar 2017 - 2:32 pm | कुंदन

१ ते ४ मध्ये नका बनवु बरं का....

१ ते ४ मध्ये नका बनवु बरं का....

ब्रँड चितळ्यांचा असला तरी दूध गाईम्हशी देतात, त्यामुळे काही फरक पडेल असं वाटत नाही. =))

प्रसन्न३००१'s picture

22 Mar 2017 - 2:53 pm | प्रसन्न३००१

ऑफिस समोरच्या पानटपरी वरून १ मार्लबोरो क्लोव्ह सिगारेट आणि बारबॉन बिस्किटाचा पूड घेतलाय.

५० फक्त's picture

22 Mar 2017 - 4:51 pm | ५० फक्त

हल्ली आमच्या ऑफिसात देखिल सिगारेट पिणारे बार्बॉन बिस्किटे खातात त्यानंतर, हे काय नविन कॉम्बिनेशन आहे का नशेचे ?

जसं गांजा पिल्यावर गोड खातात तसं.

चैला, हे काय नवीन म्हणायचे फ्याड

५० फक्त's picture

22 Mar 2017 - 7:08 pm | ५० फक्त

अशात बार्बोन्चे ५/- आणि १०/- चे पुडे आले आहेत, पुर्वी मोठा पुडा असायचा २५- ३० चा.

जशी डिमांड बदलते तसा बदल करतात.

आताच एका कलिगशी बोललो, तो म्हणाला , बिस्किट आधी चहाबरोबर खायचं, मग सिगारेट, सिगारेट नंतर त्या बिस्किटातलं चॉकलेट तेवढं खायचं, घशात एकदम भारी वाटतंय.

धुरकाम आटपेपर्यंत चाकालेट कुठे ठेवायच ?

प्रसन्न३००१'s picture

23 Mar 2017 - 9:58 am | प्रसन्न३००१

आमच्या ऑफिस जवळच्या टपरीवर १० चा पुडा मिळतो... बार्बोन बिस्किटांचा दर्जा घसरलाय एवढा मात्र नक्की

सिगारेट नंतर चहा-बिस्कीट खायला मजा येते... तुम्ही म्हणताय तसं चहा-बिस्कीट आणि नंतर सिगारेट ट्राय करायला पाहिजेल..

बाय द वे, सिगारेट आणि मसाला छास हे सुद्धा अफाट कॉम्बिनेशन आहे...

हा BlueTooth स्पीकर आहे
या आधी १ घेतला होता. अतिशय सुन्दर पर्फोरमन्स आहे. २ स्पीकर आहेत, आवाज सुस्पश्ट आहे पुर्ण वाढवुन सुद्धा.

टवाळ कार्टा's picture

22 Mar 2017 - 7:52 pm | टवाळ कार्टा

बाजूच्या सोसायटीतल्या मनीला चव फार आवडते म्हणून काल स्ट्रॉबेरी आणायला गेलेलो...जाता जाता वरच्या मजल्यावरच्या सवीता आंटी खाली भेटल्या, त्यांना गाजर-मुळ्यांचा किस फार आवडतो म्हणाल्या...बाजूचे काका संत्री-आंबे शोधतच असतात, नाहीतर कधी कधी कलिंगडे चाचपतात

किसन शिंदे's picture

22 Mar 2017 - 8:28 pm | किसन शिंदे

अश्लिल..अश्लिल =))

टवाळ कार्टा's picture

22 Mar 2017 - 9:12 pm | टवाळ कार्टा

काहीही हा कि

Nitin Palkar's picture

22 Mar 2017 - 8:39 pm | Nitin Palkar

नशीबवान!... बाजूचे काका!!

अभ्या..'s picture

22 Mar 2017 - 8:52 pm | अभ्या..

चैला मंडईच की.

जाता जाता वरच्या मजल्यावरच्या सवीता आंटी खाली भेटल्या, त्यांना गाजर-मुळ्यांचा किस फार आवडतो म्हणाल्या...बाजूचे काका संत्री-आंबे शोधतच असतात, नाहीतर कधी कधी कलिंगडे चाचपतात

तरीच!!

कधीकधी कुत्रं लैच डाळ नासायला लागलं की त्याला आत टाकण्यासाठी कुत्रापिंजरा घेतला ४२ इंची मोठ्ठा. अमेझॉनवरुन. पॉज फॉर अ कॉज ब्रँड. अतिशय उपयोगी पडतो.

B

शिवाय एक टिप म्हणजे जेरहाय ग्रेव्हीज अमेझॉनवर लोकल दुकानापेक्षा फारच कमी किंमतीत मिळतात. पेडिग्री जेरहाय इतकं हाय क्वालिटी नाही असं पेटशॉपवाल्यांकडून ऐकलं. तरीही पेडिग्री उत्पादनं हवी असल्यास तीही आणखीच स्वस्त पडतात.

गूगल क्रोमकास्ट घेतले मागच्या महिन्यात. ३३०० रुपयात साधा टीवी स्मार्ट झाला. youtube वगैरे क्रोमकास्ट करू शकणारी आप्स छानच चालतात. मोबाईल वरून प्राईम विडीयो ला थोडा प्रोब्लेम येतो पण laptop वरून छान चालतो.

सतिश गावडे's picture

1 Apr 2017 - 3:12 pm | सतिश गावडे

हे बेणं तुम्हाला कुठे मिळालं? मी अ‍ॅमेझॉनवर शोधून दमलो.

मोदक's picture

23 Mar 2017 - 3:02 pm | मोदक

एक ६४ जीबी मेमरी कार्ड घ्यायचे आहे.

क्लास १० वाले कार्ड हवे, यापेक्षा आणखी काय बघावे..?

तेजस आठवले's picture

23 Mar 2017 - 4:42 pm | तेजस आठवले

ऑफिस मध्ये संगणकावर बसताना कामाच्या रगाड्यात ताठ बसले जात नाही, पोक काढून बसले जाते. ताठ बसण्यासाठी काही चेअर अटॅचमेंट्स अथवा काही टूल्स आहेत का? कोणी वापरते का, काही अनुभव ?

तेजस आठवले's picture

23 Mar 2017 - 7:27 pm | तेजस आठवले

धन्यवाद. ट्राय करून बघतो.

मी-सौरभ's picture

23 Mar 2017 - 6:16 pm | मी-सौरभ

कोल इंडिया घेतले १५ आणि ३० गुडलक स्तील

कुंदन's picture

30 Mar 2017 - 1:03 pm | कुंदन

इक्विटास होल्डिंग - १००

मन्नपुरम चे घ्यायचे होते , पण भाव एकदम वाढलाय म्हणुन थोडे थांबावे लागेल.....

हेमंत८२'s picture

30 Mar 2017 - 1:36 pm | हेमंत८२

RCF घेणार होतो पण बघू..
Equitos कसा आहे. कुठे पर्यंत जाईल..

कुंदन's picture

30 Mar 2017 - 1:41 pm | कुंदन

कुठे पर्यंत जाईल , काही कल्पना नाहि ..... मी म नी कंट्रोल वर , शेअर होल्डिंग पाहिले तर म्युच्युअल फंड यात गुंतवणुक करत असलेले दिसले. शिवाय त्यांनी तमिलनाडुत बँकही सुरु केली आहे स्प्टंबर मध्ये.

मी-सौरभ's picture

30 Mar 2017 - 5:28 pm | मी-सौरभ

मी तसा आय डी एफ सी बँक घेत आहे. दर महिन्याला थोडे थोडे विकत घेणार आहे.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 2:08 pm | श्रीगुरुजी

सध्याच्या काळात भांडवल बाजारात गुंतवणूक करताना व समभाग विकत घेताना जरा सावध रहा. मुंबई व राष्ट्रीय भांडवली बाजाराचा निर्देशांक ऐतिहासिक सर्वोच्च पातळीला पोहोचला आहे. अनेक ब्लू चिप कंपन्यांच्या समभागांची किंमत ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळीला पोहोचली आहे. यात आता फारशी वाढ संभवत नाही. ही गुंतवणूक करण्याची वेळ नसून गुंतवणूक मोकळी करून नफा कमविण्याची वेळ आहे. संख्याशास्त्राच्या व बाजाराच्या नियमानुसार बाजारात करेक्शन येऊ शकते. When the whole world is buying, I sell and when the whole world is selling, I buy हे वॉरन बुफेचे जगप्रसिद्ध वाक्य आहे. सर्वोच्च पातळीला विकायचे व सर्वात कमी किंमतीच्या जवळपास विकत घ्यायचे हे बॉरन बुफेचे सूत्र आहे.

अभिजीत अवलिया's picture

1 Apr 2017 - 2:17 pm | अभिजीत अवलिया

सर्वोच्च पातळीला विकायचे व सर्वात कमी किंमतीच्या जवळपास विकत घ्यायचे हे बॉरन बुफेचे सूत्र आहे.
--- हे कितीही म्हटले तरी अमलात आणणे तसे शक्य नाही. कारण सर्वोच्च पातळी व सर्वात खालची पातळी कोणती असू शकते ह्याचा अचूक किंवा जवळपासचा अंदाज येणे देखील तितकेसे शक्य नाही. खुद्द बॉरन बुफेने शेअर मार्केट मध्ये अगणित चुका करून पैसे गमावलेले देखील आहेत. मी रोज cnbc aawaj बघतो. त्यातले एक्सपर्ट सांगतात त्यांचे पण ७०% अंदाज चुकतच असतात. त्यामुळे गुंतवणूक करताना स्टॉप लॉस ह्या तंत्राचा वापर करून करावी.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 3:10 pm | श्रीगुरुजी

बरोबर आहे. मी त्यासाठी २-३ सूत्रे पाळतो. पहिले सूत्र म्हणजे माझी बहुतेक सर्व गुंतवणूक ब्लू चिप कंपन्यांमध्येच आहे. इतर काही कंपन्या असल्या तरी बहुतेकवेळा ब्लू चिप कंपनीतच मी गुंतवणूक करतो. दुसरं म्हणजे कोणत्याही कंपनीच्या समभागाची मागील आठवड्यातील सर्वोच्च व सर्वात कमी किंमत पहायची व जर आजचा भाव त्या भावाच्या जवळपास असेल तर समभाग विकायचे किंवा खरेदी करायचे. जर आपल्याला हव्या असलेल्या कंपनीच्या समभागांची आजची किंमत ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळीच्या खूप जवळ असेल तर विकत न घेता भाव कमी होण्याची वाट पहायची व जेव्हा किंमत बर्‍यापैकी कमी होईल त्या प्रत्येक वेळी थोडे थोडे समभाग विकत घेऊन पोर्टफोलिओ वाढवत न्यायचा आणि जेव्हा किंमत पुन्हा वाढून सर्वोच्च पातळीच्या जवळ पोहोचेल तेव्हा जास्त मोहात न पडता विकून टाकायचे. सध्या टाटा स्टील व स्टेट बँकेचे समभाग चांगलेच वाढले आहेत. ज्यांच्याकडे या दोन कंपन्यांचे समभाग आहेत त्यांनी ते विकून नफा खिशात घालावा. एल अ‍ॅण्ड टी सुद्धा चांगलाच वाढला आहे. गरज नसल्यास तो सुद्धा विकून टाकावा.

आतापर्यंत तीनवेळा असं झालं की अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर केल्यावर आपोआप क्यान्सल झाली. बरं, सगळ्या वस्तू नाही तर एखादीच वस्तू आपोआप क्यान्सल होते. आणि त्याचे पैसे चार्ज अर्थातच केले जात नाहीत (दुसर्‍या बाजूने असतं तर तोट्याचं होतं, मग स्वस्थ बसले नसते). एकदा विंटर कोट, मग ग्लव्हज, आणि आता लेनोवोचा सेलफोन यांच्या ऑर्डरी वेगवेगळ्या वेळांना करून आता येईल म्हणून वाट बघतिये तर क्यान्सल झालेल्या. स्टॉकमध्ये असतात तरी असे का होत असावे?

अभ्या..'s picture

23 Mar 2017 - 11:48 pm | अभ्या..

हायला हे सेटिंग कस केल रंगाकाकाला विचारले पाहेजे. ;)

विचार बाबा विचार! हितं विंटर संपला तरी कोट आला नाही अन काही नाही.

स्रुजा's picture

24 Mar 2017 - 1:52 am | स्रुजा

हीहीही . कशाला त्यांना अडचणीत आणतोयेस?

मी पहिल्यांदाच अमेझॉन वरुन पर्स घेतली. भारतात आले होते तेंव्हापासून पर्स शोधत होते - आख्खा एफ सी रोड, दादर मार्केट फिरुन ऑफिसला जाण्याजोगी पर्स मिळेना . म्हणजे होत्या पण मला फार महाग वाटत होत्या. त्या फिरण्यात मी २ ऑफिसला जाताना काही उपयोगाच्या नाही अशा छोट्या पर्सेस घेतल्या हा त्यातला त्यात एक फायदा.

पण अमेझॉन वर एक ३ पर्सेस चं छान डील होतं - एक मोठी पर्स - लॅपटॉप आणि डबा मावेल अशी - म्हणजे छोट्या मोठ्या ट्रॅव्हल साठी पण वापरता येईल. आणि त्याच डिझाईनच्या आत दोन पर्सेस - त्यातली एक क्रॉस ओव्हर आणि एक छोटी - नाणी वगैरे ठेवायला होईल अशी. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यावरचं डिझाईन. हल्ली वेगवेगळ्या जागांचे एम्बॉसिंग केलेले डिझाईन असतात त्यातली आहे. तशीच एक मी छोटी बॅगपॅक पण भारतातुन घेतली होती - वेगवेगळे ट्रॅव्हल स्टँप्स आहेत त्यावर आणि ती स्वस्त होती. तशी पर्स अमेझॉन वर दिसल्या दिसल्या उचलली - डिलीव्हरी एका आठवड्यात आली - पॅकिंग चांगलं होतं आणि मुख्य म्हणजे चित्रातल्या सारखीच दिसते आहे. त्याचीच जरा भीती होती पण आता धीर चेपल्याने २ टॉप्स आणि एक भारतीय शॉर्ट कुर्ता ऑर्डर केलेत लगोलग :प

सही रे सई's picture

28 Mar 2017 - 12:53 am | सही रे सई

लिन्क द्या नं मॅडम

सही रे सई's picture

28 Mar 2017 - 1:12 am | सही रे सई

ह्या काही आवडलेल्या पर्सेसः

पहिली - ६ पीस ची

दुसरी - हि तू म्हणत्येस ती असावी स्रुजा

तिसरी - छान आहे पण पांढरी आहे त्यामुळे मळायची भीती

अजुन कुठल्या वेगळ्या छानश्या पर्स तुम्हाला आवडल्या तर इथे सांगा.

स्रुजा's picture

28 Mar 2017 - 1:18 am | स्रुजा

हो हो हीच (म्हणजे दुसरी तुझ्या लिंक मधली) मला पण पहिली खुप आवडली होती पण दुसरी जास्त आवडली आणि दोन्ही न घेण्याचा संयम ठेवला ;)

सगळ्या पर्सा पाहिल्या. पहिली व तिसती आवडली. दुसरीही आवडली असती पण तुळशीबागेत अशा खूप होत्या. ते पाहूनच पुरेसं झालं.
पांढरी पर्स मळणार नाही फारशी. लेदर आहे ना.

स्टॉकमध्ये असतात तरी असे का होत असावे?

माझं पण असं एकदा झालं आहे. मला वाटतं या विक्रेत्यांचे फिझिकल स्टोर्स असतील आणि ऑनलाइन ऑर्डर देतानाच तीच गोष्ट कोणीतरी त्यांच्या दुकानातून विकत घेतली असेल (आणि म्हणून स्टॉक संपला असेल).

किंवा काही वेळेस विक्रेते किंमत वाढवून तोच आयटम ठेवतात (आधीची ऑर्डर कॅन्सल करून)l

रेवती's picture

28 Mar 2017 - 3:20 pm | रेवती

वाचतिये.

हेमंत८२'s picture

24 Mar 2017 - 3:01 pm | हेमंत८२

कालच अमेझॉन वर सेल चालू होते म्हणून ऑर्डर केला आहे एक्सपेक्टड डिलिव्हरी ३०-६ एप्रिल आहे बघू आल्यानंतर review टाकीन.

rain6100's picture

24 Mar 2017 - 3:53 pm | rain6100

हेमंत८२'s picture

30 Mar 2017 - 2:49 pm | हेमंत८२

आज मोबाईल आला. चांगला आहे एवढेच..
कॅमेरा Quality :-- ओके
इंटर्नल मेमरी :- ८.५०गब शिल्लक./१६ गब ओरिजिनल..( किंडल/ फबी/फ्लिपकार्ट इंस्टॉलेड
सिम:- १+१/मेमरी कार्ड
इअरफोन यात येत नाहीत.

कंजूस's picture

31 Mar 2017 - 8:40 pm | कंजूस

यापेक्षा 3 S घ्या असा रिव्ह्यु आहे.

रेवती's picture

25 Mar 2017 - 1:14 am | रेवती

.....और ये मारी शेंचुरी!
धन्यवादस. ;)

कुंदन's picture

25 Mar 2017 - 1:21 am | कुंदन

नोटबंधीच्या काळात लोक्स महागडे शोपिंग कर्ताना पाहुन डोले पानावले हो

मोदक's picture

25 Mar 2017 - 1:31 am | मोदक

अच्छे दिन.. अच्छे दिन.. म्हणतात ते हेच...! =)

प्रसन्न३००१'s picture

27 Mar 2017 - 10:14 am | प्रसन्न३००१

Go Noise या वेबसाईट वरून, मोटो झेड प्ले आणि मोटो एक्स प्ले या २ फोनसाठी बॅकपॅनल कव्हर्स घेतले. २ दिवसात डिलिव्हरी मिळाली, उत्तम पॅकिंग...

यशोधरा's picture

27 Mar 2017 - 5:11 pm | यशोधरा

अरे, किती खरेद्या करता! =))

कुंदन's picture

27 Mar 2017 - 11:16 pm | कुंदन

सौ लेन्सेस खरिद के , मैया चली हिमालयाज

यशोधरा's picture

28 Mar 2017 - 3:22 pm | यशोधरा

बोल्ला जळकूट!

पद्मावति's picture

28 Mar 2017 - 1:05 am | पद्मावति

आमच्या एका लोकल ऑनलाइन शॉप मधून एक कुर्ती घेतली चिकन वर्क्स केलेली. आणि फॅब इंडिया(ऑनलाइन) मधून दोन सूती सलवार कमीज, दोन इयररिंग्स आणि एक नोज पीन. सगळ्याची क्वालिटी आणि फिटिंग उत्तम. मुख्य म्हणजे डेलिवरी अगदी जलद. इयरिंग्स दिसायला खूप हेवी दिसतात पण कानाला झेपतील असे आहेत त्यामुळे आवडले. मागच्या वेळी मी आमच्या इथल्या दुकानातून घेतले होते त्यानी कान तुटतो का काय अशी भीती वाटू लागली होती.

हाईला, फॅब इंडिया चं ऑनलाईन स्टोअर भारताबाहेर डिलीव्हर करतं? बघायला हवं ( मिनिमलिझमच्या इराद्यांना सुरुंग लावतो हा धागा)

सई, ही लिंक - तुझा प्रतिसाद वर गेलाय बराच पण इथे बघ - उजवीकडुन दुसरीवाली मी ऑर्डर केली:

https://www.amazon.ca/gp/product/B01CZE62C8/ref=oh_aui_detailpage_o02_s0...

यशोधरा's picture

28 Mar 2017 - 3:24 pm | यशोधरा

हल्ली अशा पर्सेस खूपच लोकप्रिय झाल्यात नं?

रेवती's picture

28 Mar 2017 - 3:28 pm | रेवती

होय. तेच माझ्या वरील प्रतिसादात म्हटले आहे. तुळशीबाग ब्रँडच्या आहेत पण त्या. स्रुजाने ऑर्डर केलेली साधी नाहीये पण पुण्यात या पर्सा दिसतात.

पद्मावति's picture

28 Mar 2017 - 1:15 am | पद्मावति

स्रुजा, भारताबाहेर करतात पण शिपिंग फार घेतात. त्यापेक्षा तू इंडियाच्या वेबसाइट वरुन ऑर्डर कर. अड्रेस भारताचा दे आणि मग कोणी येत असेल तर त्यांच्याबरोबर येऊ दे. किंवा भारतातून घरच्यांना सांगून कुरियर करव.

हो तसंच करेन. काही नाही तर वस्तु घेऊन येण्यासाठी बहिणीला ये म्हणुन भरीस घालेन ;)

आता कोणीतरी नवीन धागा काढा. भाग ३ .

गविंसारखचं म्हंटे. शंभरावर प्रतिसादांची माझी हौस फिटली. आता खरेदीचा धागा क्र. ३ काढा रे कोणीतरी. इथे उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. आपणा सर्वान्ला चांगल्या खरेदीचे योग येवोत, प्रॉडक्ट चांगले लागो, वाजवी किमतीला मिळो, फसवणूक न होवो या सदिच्छांसह बाय म्हणते.

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2017 - 9:05 pm | श्रीगुरुजी

चांगला रूम एसी कोणी घेतला आहे का? असल्यास किंमत व कंपनीचे नाव व इतर माहिती सांगावी.

प्रसन्न३००१'s picture

2 Apr 2017 - 8:53 pm | प्रसन्न३००१

माझ्याकडे ब्लुस्टार चा १ टन स्प्लिट AC आहे.. मी साधारण दसऱ्याच्या आसपास घेतला होता २४९९९/- ला विथ झिरो कॉस्ट ईएमआय

श्रीगुरुजी's picture

2 Apr 2017 - 9:15 pm | श्रीगुरुजी

ब्लु स्टारचा परफॉर्मन्स कसा आहे? काही समस्या, कमतरता आहेत का?

गविंसारखचं म्हंटे. शंभरावर प्रतिसादांची माझी हौस फिटली.
चला,एकादाच झालं समाधान तर ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बिन तरे सनम... मर मिटेंग हम... आ मेरी जिंदगी ! :- [ Yaara Dildara ]

आता थोड्या दिवसांची निश्चिंती म्हणायची अन काय..................पुन्हा उबळ येईलच, तेंव्हा बघू. ;)

प्रसन्न३००१'s picture

2 Apr 2017 - 8:59 pm | प्रसन्न३००१

क्विकहिल चं अँटी-व्हायरस सब्स्क्रिप्शन रिन्यू केलं